घरात जरा उदासच वाटलं

अन्नू's picture
अन्नू in जे न देखे रवी...
7 Feb 2016 - 7:00 pm

जव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले... ;) ;)
Smiley face crying

घरात जरा उदासच वाटलं
हापिसात काल, जरा मटणंच हाणलं
सायबाच्या स्टेनोला बघण्यात पण- पाणी प्यायचं राह्यलं!

बोंबलून-ओरडून जवा घसा कोरडा पडला
मेल्या जोश्यानं त्यात जगभर पाणीच कोंबलं!
यावर हसून तिनं माझ्याकडे पाह्यलं
सगळ्या रागाचं जणू 'पाणी-पाणी' झालं!

दुपारी तिनं फिरायचं आमंत्रण दिलं
सिक नोटीस मागे ठेऊन, मी ऑफिस सोडलं-
रेल्वेनं मग दादर गाठलं
टॅक्सीत बसून हळूच तिनं चौपाटी सांगितलं

सावली बघून बसकण मारली.
बघता-बघता चार कणसं, तिनं माझ्याआधी संपवली!
समुद्राकडं बघत तिचा अर्धा तास चरण्यात गेला
तिला न्याहाळन्यातच माझा आईस्क्रीम-कोन वितळून गेला..

संध्याकाळची किरणं जवा समोर चम-चम चमकायला लागली
'आहा.....'
तिसरा पुडा फोडत तिने मला, 'एक' बिस्कीट ऑफर केली! :(
गॉसिप सांगून-सांगून जेव्हा तिच पुरती कंटाळली
"चला- जाऊ" म्हणत, तिने 'डेट' आपली संपवली.

आपल्याच कर्माला दोष देत आंम्ही कपाळावर हात मारुन घेतला
अन्
उठता-उठता तिने मागितलेला पॉपकॉर्न (तिच्या) हातात ठूसून दिला!
मऊ-मऊ वाळूत चालत तिने हळूच एक कटाक्ष टाकला
खुदू-खुदू हसत मग माझा हात हातात घेतला

'कित्ती रे लाजरा?' म्हणत तिने (स्वतःच्याच तोंडात) पॉपकॉर्न कोंबला
समुद्रात हुदडून आंम्ही परतीचा रस्ता धरला.
पाण्यात चालताना दुप्पटा तिचा फडफडला
तो सावरुन देत असतानाच- (आमच्या) महामायेनं मला हेरला!

त्या दिवसापासून- हापिस आमचं, कायमचं बंद आहे
बाहेर तरी जाऊ कसा, महामाया समोरच आहे
रोज उठून धुणं-भांडी करुन मन आज वैतागलं
काहीही म्हणा मंडळी पण- तेच-तेच वरणभात खावून
...घरात जरा उदासच वाटलं! :( :(

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगागरम पाण्याचे कुंडचिकनमुक्त कविताभयानकहास्यमांडणीवावरकविताविडंबनस्थिरचित्र

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Feb 2016 - 7:43 pm | पैसा

:) कविता अगम्य नाही. तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का?

अन्नू's picture

7 Feb 2016 - 7:46 pm | अन्नू

तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का?
त्यांच्याच शोधात आहे. ;)

टवाळ कार्टा's picture

7 Feb 2016 - 7:47 pm | टवाळ कार्टा

=))

जव्हेरगंज's picture

7 Feb 2016 - 7:57 pm | जव्हेरगंज

:-D

पद्मावति's picture

7 Feb 2016 - 10:55 pm | पद्मावति

:)

एक एकटा एकटाच's picture

1 Mar 2016 - 6:16 pm | एक एकटा एकटाच

मस्तय