✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Sun, 01/31/2016 - 19:53  ·  लेख
लेख
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.) स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ? त्याज्ज्य्य नवर्‍याने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्‍यावर जाण्याचे कारणंच काय ????????????????????????????? (असतील तर..) सुज्ञ नवर्‍यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... ==================================================== स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्‍या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" ) इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
पाकक्रिया
इतिहास
बालकथा
बालगीत
विडंबन
शुद्धलेखन
राहणी
औषधोपचार
भूगोल
देशांतर
राहती जागा
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
शुभेच्छा
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35717 वाचन

💬 प्रतिसाद (123)

प्रतिक्रिया

खी: खी: खी:!!

अन्नू
Sun, 01/31/2016 - 21:25 नवीन
गुर्जी यीज ब्याक!! ;) Image removed.
  • Log in or register to post comments

झाडावर सुमारे ३०० एक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 01/31/2016 - 21:39 नवीन
झाडावर सुमारे ३०० एक अनाहितांनी पोती भरभरुन पॉपकॉर्न नेल्याने झाड मोडल्याच्या बातम्या येत आहेत. वृक्षवल्ली अम्हा सोयरी वनचरे.
  • Log in or register to post comments

कधी तरी पुरुषांच्या

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/31/2016 - 21:42 नवीन
बाजूने पुरुशान्च्याही बातम्या सांगत राहा....;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हे काय सर. झाडासमोरच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 01/31/2016 - 21:46 नवीन
हे काय सर. झाडासमोरच्या कट्ट्यावर आपलीचं गाडी आहे पॉपकॉर्नांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हहपुवा

कपिलमुनी
Mon, 02/01/2016 - 01:09 नवीन
दंबूकी शिवाय चिमणी उडवलीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर का बर नाराज आहात आमच्यावर?

त्रिवेणी
Sun, 01/31/2016 - 21:45 नवीन
सर का बर नाराज आहात आमच्यावर?
  • Log in or register to post comments

हे मलाच दिसतंय का खरंच हा

अन्नू
Sun, 01/31/2016 - 21:54 नवीन
हे मलाच दिसतंय का खरंच हा प्रतिसाद चार वेळा टंकलाय?? अवांतर- छॅ!! आजपासून जरा कमीच घेतली पाहिजे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

मला पण ४ वेळा दिसतंय. नो वरीज

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 21:57 नवीन
मला पण ४ वेळा दिसतंय. नो वरीज... प्रतिसादकर्त्री जाम चिडली आहे पुरुष नामक दुष्ट प्रजातीवर! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

नाही हो मी खरच खुप कमी वेला

त्रिवेणी
Sun, 01/31/2016 - 22:05 नवीन
नाही हो मी खरच खुप कमी वेला चिड़ते.मोबाइल ची कृपा आहे ती इतक्या वेला प्रतिसाद येतो त्याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

नवरा असो किंवा बायको,

बॅटमॅन
Sun, 01/31/2016 - 21:45 नवीन
नवरा असो किंवा बायको,
स्वयं"पाक" चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?
भारतासारख्या देशात असे स्वयं"पाक" प्रेम पाहून भडभडून आले.
  • Log in or register to post comments

अगदी 'पाकात' मुरल्यासारखी

यशोधरा
Sun, 01/31/2016 - 21:51 नवीन
अगदी 'पाकात' मुरल्यासारखी कोटी हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कुठलीही नसली तरी

नाखु
Mon, 02/01/2016 - 08:34 नवीन
मिपावरील(काही काथ्याकुटाचादेखील;) काही मिठाया "पाक"उल्लेखाखेरीज गोड होत नाहीत याचा हा सज्जड पुरावा आहे. संदर्भ बुवांची सोत्ताबद्दलची व्य्वसाय माहीती हवी असलेली मिठाई. त्यामुळे स्वयं "पाका"चा उल्लेख अनिवार्य आहे. दुरून वाटपहाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फास्टेस्ट फिफ्टीबद्दल

अजया
Sun, 01/31/2016 - 21:56 नवीन
फास्टेस्ट फिफ्टीबद्दल गुर्जींचा लाटण्याने सत्कार करण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

"लाटण्याने सत्कार" यात श्लेष

टवाळ कार्टा
Sun, 01/31/2016 - 22:03 नवीन
"लाटण्याने सत्कार" यात श्लेष आहे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

स्वयंपाक चौथर्‍याच्या

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/31/2016 - 22:06 नवीन
स्वयंपाक चौथर्‍याच्या चौकटीतल्या गुप्त गोष्टी अश्या चारचौघांत सांगायच्या नसतात. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बस करो गुर्जी अब रु ला ओ गे

पियुशा
Sun, 01/31/2016 - 22:07 नवीन
बस करो गुर्जी अब रु ला ओ गे क्या ? पॉपकॉर्न खत्म प्याक अप !
  • Log in or register to post comments

झारा पण द्या एक

भुमी
Sun, 01/31/2016 - 22:09 नवीन
तळायला आणि माश्या मारायला उपयोगी पडेल:)
  • Log in or register to post comments

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

मुक्त विहारि
Sun, 01/31/2016 - 22:19 नवीन
कुठल्याही नवर्‍यावर अशी वेळ येवू देवू नये.... पण समजा आलीच तर.... खालील गोष्टी कराव्यात. १. बर्‍यापैकी दिसणारी स्वैपाकिण शोधावी. २. सुंदर दिसणार्‍या भाजी-पोळी वालीकडून रोज भाजी-पोळी आणावी. हे २ जालीम उपाय आहेत. (आमचे तरी ह्या उपायांनी काम भागते.) इति बाबा महाराजांचा "गृहस्थाश्रमी पुरुषांच्या समस्या" हा ग्रंथ, खंड ३रा, अध्याय १३, ओवी १७. पान ६०....
  • Log in or register to post comments

दोन्ही गोष्टी!

साती
Sun, 01/31/2016 - 22:24 नवीन
दोन्ही गोष्टी एकदाच करायच्यात की आळीपाळीने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आळीपाळीने करणेच योग्य....

मुक्त विहारि
Mon, 02/01/2016 - 09:41 नवीन
दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्यास, घरधनीण घर सोडून जायची शक्यता जास्त. आणि तसेही सुंदर दिसणारी स्वैपाकिण आली की, पुरुषांना स्वैपाकिण असे पर्यंत, स्वैपाकघरातच काय पण घरात पाऊल ठेवायला पण बंदी घातली जाते. "स्वानुभवाचे बोल" ह्या बाबा महाराजांच्या छोटेखानी १०,००० पानी पुस्तकातून साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

चालेल

अन्नू
Mon, 02/01/2016 - 17:29 नवीन
अशी स्वयंपाकीण भेटली तर आंम्ही घराच्या बाहेर (खिडकीजवळ) पण उभं राहू.. ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सांभाळून.... अस्तित्वात

संदीप डांगे
Mon, 02/01/2016 - 17:38 नवीन
सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

स्वयं'पाकीण' (जलेबी बाई!! ;)

अन्नू
Mon, 02/01/2016 - 17:57 नवीन
स्वयं'पाकीण' (जलेबी बाई!! ;) ) बद्दल मी बोलतोय, तुंम्ही कुठल्या रुपकाचं सांगताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ह्म्म्म

इरसाल
Sun, 01/31/2016 - 22:20 नवीन
मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !
  • Log in or register to post comments

संस्कृतिको तो अपनोने लूटा,

अभ्या..
Sun, 01/31/2016 - 22:24 नवीन
संस्कृतिको तो अपनोने लूटा, गैरोमे कहा दम था. अपनी संस्कृति डुबी वहापे, जहापे पानी कम था. . दिलवाले (जुना)फ्यान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

बाद्वे...

मुक्त विहारि
Sun, 01/31/2016 - 22:26 नवीन
संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

आणि काही दिवसांनी ती "उडत

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/31/2016 - 22:30 नवीन
आणि काही दिवसांनी ती "उडत जाईल". ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कोण ही संस्कृती?

अन्नू
Sun, 01/31/2016 - 23:32 नवीन
कोण ही संस्कृती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची

स्रुजा
Sun, 01/31/2016 - 22:29 नवीन
नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)
  • Log in or register to post comments

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात!

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 22:31 नवीन
घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

आग्ग्गाअग्गाआ

टवाळ कार्टा
Sun, 01/31/2016 - 22:31 नवीन
आग्ग्गाअग्गाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

चरणकमलांचा फोटु टाक. =)) _/\_

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 01/31/2016 - 22:34 नवीन
चरणकमलांचा फोटु टाक. =)) _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अगाग्गा!! =))

यशोधरा
Sun, 01/31/2016 - 22:54 नवीन
अगाग्गा!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना

पैसा
Sun, 01/31/2016 - 22:32 नवीन
स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-
  • Log in or register to post comments

और ये लगा सिक्सर !!

खटासि खट
Sun, 01/31/2016 - 22:35 नवीन
और ये लगा सिक्सर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

गुर्जी स्वतः हिट विकेट झाले

खटासि खट
Sun, 01/31/2016 - 22:34 नवीन
गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??
  • Log in or register to post comments

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 22:39 नवीन
अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...
  • Log in or register to post comments

त्यांनी म्हटलेच आहे की,

नीलमोहर
Sun, 01/31/2016 - 23:17 नवीन
असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...
  • Log in or register to post comments

:)

विजय पुरोहित
Mon, 02/01/2016 - 06:14 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मोरल ऑफ द ष्टुरी काल बुवांनी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/01/2016 - 06:36 नवीन
मोरल ऑफ द ष्टुरी काल बुवांनी पाव भाजी केलेली. गावडे सर सोडुन दुसर्‍या कोणालाही बोलवलं नव्हतं. =))
  • Log in or register to post comments

नवरोबा आत येऊन सारख्या सूचना

कंजूस
Mon, 02/01/2016 - 06:46 नवीन
नवरोबा आत येऊन सारख्या सूचना करतात स्वच्छतेच्या त्यामुळे ती आत असताना प्रवेश नाकारला जातो.तोंड फक्त चव घेऊन फक्त तिचीच आणि तिच्या पदार्थांची स्तुती करण्यासाठी उघडायचे असते. १) पाकातल्या पुय्रा/अळूवडी/-/-/-वग्रै आई फार छान करायची असलं काही चुकूनही बोलू नका. २) तुम्हाला अजून बरंच काही शिकायचं आहे. ३) तुमचे लग्नाअगोदरचे /पाक कौशल्याचे गोडवे गाऊ नका -कसंतरी उरकायचो हेच म्हणायचं. ४)तुमच्या चुकीच्या वागण्याने( जे तुम्हाला आतापर्यंत बरोबर वाटत होतं) प्रवेश नाकारला जात असावा.
  • Log in or register to post comments

@४)तुमच्या चुकीच्या वागण्याने

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/02/2016 - 10:11 नवीन
@४)तुमच्या चुकीच्या वागण्याने ( जे तुम्हाला आतापर्यंत बरोबर वाटत होतं) >> Image removed. अत्यन्त बरुब्बर! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/01/2016 - 07:29 नवीन
ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!
  • Log in or register to post comments

कोण हो ते?

प्रचेतस
Mon, 02/01/2016 - 09:27 नवीन
कोण हो ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भन्नाट प्रतिसाद

श्रीरंग_जोशी
Mon, 02/01/2016 - 07:36 नवीन
रोचक विडंबन अन एकाहून एक प्रतिसाद. आता मूळ प्रेरणा वाचणे आले.
  • Log in or register to post comments

प्रेरणा...

पगला गजोधर
Mon, 02/01/2016 - 09:49 नवीन
Image removed. स्वयंपाक चौथर्‍यावर, पाव-भाजीची भाजी रांधणारे, एक लोकप्रिय ''क्ष'' गुर्जी…….
  • Log in or register to post comments

परवाचं आंतरजालावर कोणीतरी

पैसा
Mon, 02/01/2016 - 12:05 नवीन
परवाचं आंतरजालावर कोणीतरी रिकामटेकड्यानेचं मांडलेला हा विचार. स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश देउन अन्नपूर्णा कोपली नाही तरं "पाक"स्थानाचा महिमा कमी होणार. आणि कोपली तर अजुन दुसरं नुकसान एवढं साधं गणित आहे ते. -Johnny Depp-
  • Log in or register to post comments

अगदी अचूक... हॅट्स ऑफ!

संदीप डांगे
Mon, 02/01/2016 - 12:42 नवीन
अगदी अचूक... हॅट्स ऑफ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Mon, 02/01/2016 - 14:34 नवीन
तुला कळलंय ना? जास्त फोड करून सांगू नको! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

;-) अळीमिळी गुपचिळी. पायावर

संदीप डांगे
Mon, 02/01/2016 - 18:03 नवीन
;-) अळीमिळी गुपचिळी. पायावर कोण धोंडा पाडून घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा