Skip to main content

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.) स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ? त्याज्ज्य्य नवर्‍याने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्‍यावर जाण्याचे कारणंच काय ????????????????????????????? (असतील तर..) सुज्ञ नवर्‍यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... ==================================================== स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्‍या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" ) इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!

वाचने 36055
प्रतिक्रिया 123

प्रतिक्रिया

In reply to by अन्नू

सांभाळून.... अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचे रुपक वापरले तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. "फोटोतली व्यक्ती जीवंत वा मृत असो, तीचा माझ्या प्रतिसादाशी काल्पनिक संबंध आहे" असे डिस्क्लेमर टाका.

In reply to by संदीप डांगे

स्वयं'पाकीण' (जलेबी बाई!! ;) ) बद्दल मी बोलतोय, तुंम्ही कुठल्या रुपकाचं सांगताय?

मी सिरीयस्ली गंभीरपणॅ संस्कृतीला पोहायला शिकवायचा विचार करतोय. ज्याला बघावं तो संस्कृतीला बुडवायला निघालाय !

In reply to by इरसाल

संस्कृतिको तो अपनोने लूटा, गैरोमे कहा दम था. अपनी संस्कृति डुबी वहापे, जहापे पानी कम था. . दिलवाले (जुना)फ्यान

In reply to by इरसाल

संस्कृती पोहायला कधीच शिकली आहे. आधी ती नऊवारीत पोहायची मग ती पाचवारीत पोहायला लागली. सध्या तरी बिकिनीत पोहत आहे.

नवरा आणि स्वैपाक चौथरा यांची युती झाली अन तो एकदा एखादा पदार्थ बनवत बसला की अरारा मग लै त्रास. दिवसातून दोनदा स्वैपाकघर फडक्याने पुसावं लागतं. हा त्रास टाळायचं असेल तर स्नान झाल्याबरोबर एक हाटेल चा फोन नंबर ३ वेळा (सकाळ, दुपार, संध्याकाळ) फिरवावा लागतो. (नंबर सांगायची फ़ीस घेते मी) आपल्या आयुष्यात एका दिवसात बाहेरुन नाश्ता, लंच डिनर नै लाभलं तर फ़ीस परत. घरात निरनिराळे सुवास राहतात. ज्यांना मुलबाळ नसेल त्यांना ( स्वैपाकातून वेळ मिळाल्यामुळे आणि तो सत्कारणी लागल्यामुळे) मुलं होतात. नौकरीत प्याकेज चांगलं मिळुन पण ते हाटेलच्या जेवणात खर्च होतं. नवरा बायकोचे सबंध मधुर होतात ( वर सांगितलेल्या कारणामुळे). सतत बाहेरुन जेवण मागवल्याने महिलांना सासू सास-यांचा त्रास कमी होतो कारण ते वरचेवर येणं टाळतात . मुला-मुलींसाठी चांगली स्थळे येतात. प्रा. डॉ. स्रुजा "बाहेरुन जेवण हादडे" (अंदाजपंचे पुरोहीत) :)

In reply to by स्रुजा

घ्या! आता तुम्हीच राहिलेलात! अरे देवा! धागा कुठला आणि पिसे कुणाची निघताहेत? चलु द्या निरर्थक अत्मरंजन! :)

स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश न देणे हे चुकीचे आहे. जिथे महिलांना मुक्त प्रवेश आहे तिथे पुरुषांना का प्रवेश नसावा? परंतु याबाबतीत पुरुषांचे आंदोलन सिलेक्टिव्ह वाटते. अनेक ठिकाणी पुरुषांना महिलांपेक्षा जास्त झुकते माप दिलेले आहे. टीव्हीसमोर कोचावर मुलग्यांना ३०% वेळा लाथांचा सुकाळ बघण्यासाठी राखीव (उर्वरीत ७०% वेळ टीव्ही बघण्यास पुरुषांना प्रतिबंध नाही), बेडरूमात सुटीच्या दिवशी लोळण्यास ५०% जागा राखीव (तिथे गिळायला तयार होईपर्यंत महिलांना प्रवेश नाही, परंतु पुरुष उर्वरीत वेळातसुद्धा येऊ शकतात), कारमध्ये पुरुषांसाठी राखीव ड्रायव्हरची जागा, उंच फळीवरचे डबे काढण्यासाठी खास सवलत अशा अनेक ठिकाणी पुरुषांना केवळ पुरुष आहेत म्हणून फायदा दिलेला आहे. स्त्री-पुरूष समानतेचा विचार करताना या विशेष हक्काचाही विचार व्हायला हवा. -पावभुर्जी-

गुर्जी स्वतः हिट विकेट झाले आणि तमाम नव-यांना पण ऑट केलं बघा. या बायका आता किचनचा चौथराच काय , ओटा, तांबं, भांडं, पिंप, गॅस, स्टोव्ह , चूल सगळंच नव-याच्या (आणि सासूच्याही) हवाली करतील आनंदाने आणि टीव्हीपुढं बसतील बघा. त्यांचे आशिर्वाद मिळतील तुम्हाला पण.... कळ्ळं ना ??

अत्मू गुर्जी, पाकदेवतेचाचा त्रास स्त्रियांनाच जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच हिंदु पाकशास्त्रात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... पाकदेवता फक्त पाककर्त्याने केलेल्या चुकीच्या कर्माबद्दल त्याला पोटात इक्व्हीव्हॅलंट पीडा निर्माण करून ते पाककर्म नलीफाय करतात... पाकदेवता कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपली वाईट रेसिपी पोटातून बाहेर काडणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारखा बाहेर काढणारा तोच... अगदी छप्पर फाडके बाहेर काढतात...

असल्या भंगार उपायांनी प्रसन्न होणारी ती देवता अन्नपूर्णा नव्हे. तिला फक्त तुमचे उत्तम 'पाक'कौशल्य आणि इतरांना तुम्ही कसे स्वादिष्ट चमचमीत अन्न खाऊ घालून तृप्त करता हेच पहायचे असते... आणि त्यात तुम्ही चुकला तर be ready to taste the bitter fruits .... (literally ;) Then you have no option... You have to go through it... No other options are available...

मोरल ऑफ द ष्टुरी काल बुवांनी पाव भाजी केलेली. गावडे सर सोडुन दुसर्‍या कोणालाही बोलवलं नव्हतं. =))

नवरोबा आत येऊन सारख्या सूचना करतात स्वच्छतेच्या त्यामुळे ती आत असताना प्रवेश नाकारला जातो.तोंड फक्त चव घेऊन फक्त तिचीच आणि तिच्या पदार्थांची स्तुती करण्यासाठी उघडायचे असते. १) पाकातल्या पुय्रा/अळूवडी/-/-/-वग्रै आई फार छान करायची असलं काही चुकूनही बोलू नका. २) तुम्हाला अजून बरंच काही शिकायचं आहे. ३) तुमचे लग्नाअगोदरचे /पाक कौशल्याचे गोडवे गाऊ नका -कसंतरी उरकायचो हेच म्हणायचं. ४)तुमच्या चुकीच्या वागण्याने( जे तुम्हाला आतापर्यंत बरोबर वाटत होतं) प्रवेश नाकारला जात असावा.

In reply to by कंजूस

@४)तुमच्या चुकीच्या वागण्याने ( जे तुम्हाला आतापर्यंत बरोबर वाटत होतं) >> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif अत्यन्त बरुब्बर! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!

x स्वयंपाक चौथर्‍यावर, पाव-भाजीची भाजी रांधणारे, एक लोकप्रिय ''क्ष'' गुर्जी…….

परवाचं आंतरजालावर कोणीतरी रिकामटेकड्यानेचं मांडलेला हा विचार. स्वयंपाक चौथर्‍यावर पुरुषांना प्रवेश देउन अन्नपूर्णा कोपली नाही तरं "पाक"स्थानाचा महिमा कमी होणार. आणि कोपली तर अजुन दुसरं नुकसान एवढं साधं गणित आहे ते. -Johnny Depp-

महिलाही चौथा-यावर जाऊन सैंपाक करत नैत आता. लांबूनच हाटेलाचा फोन फिरवतात आणि दुरुनच खाऊन घ्यावं लागतं. मी खुप वर्षापूर्वी ट्रिप घेऊन गेलो होतो तेव्हा सर्रास चौथा-यावर जाऊन सैंपाकघरात जाता येत होतं. एकदा महिलांना चौथा-यावर जाऊ द्या मग पुर्षान्ला घेऊन जाऊ. (वाक्यात घोळ होतोय काहीतरी) सैंपाकाघरातल्या अन्पुर्णेचा त्रास पुर्षान्ला जास्त होतो विशेषत: असो, असे म्हणतात. माझा काही अन्पुर्णेवर विश्वास नाही. पण मी रिस्क घेत नै. ;) संजीव कपूर आणि विष्णू मनोहर यांनी सैंपाकघराच्या या चौथर्‍याचं महत्व वाढवलं. नसता तिथे अजिबात गर्दी नसायची. -(खवट चिरोटे)

In reply to by सूड

चिरोटे सर, आन्पुर्णेचा त्रास पुर्शांना जादा होतो ही फार फार फार चुकीची इन्फो आहे... कुठल्याच रेशिपी बुकात असा रेफरन्स मला तर मिळाला नाहिये... आन्पुर्णा फक्त व्यक्तीने केलेल्या हावरटपणाबद्दल त्याला इक्व्हीव्हॅलंट पीडा करून ते कर्म नलीफाय करतात... आन्पुर्णा कुणालाच मुद्दामहून त्रास देत नाहीत. त्यांचा हेतु फक्त आपला वाईट्ट फसलेला सैपाक 'बाकी शून्य' करणे हाच्च असतो आणि जेव्हां तसं होतं तेव्हा त्यांच्यासारख्या देणार्‍या त्याच... अगदी छप्पर फाडके देतात... - जेवाय हाणा हितं -

रच्याकने: "पाकिस्तानास जाऊन आलो/ले" हा उल्लेख इथे बहुतेकांस परिचित असेलच. त्यातल्या त्या चिरपरिचित अर्थामुळे कुणा एका हिंदी साहित्यिकाची "कितने पाकिस्तान" नामक कथा सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित आहे असा आमचा समज झाला होता.

एका सहज विडंबनात, प्रतिसादंही विडंबले दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले. || धृ || सहज ताज्या अणु'भवांना,मी थोडे दही घातले पण काही (ह्ही ह्ही!) दुत्त अणाहितांनी त्याला बेसन लावले https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif आता करू मी नक्की काय? कोणते धरू पातेले? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले.||1|| णवा णवा चक्का त्यात थोडी साखर "मी" घातली मूळ पेरणेची इलायची गमतीत मधे घोटली! गोड त्यातले डावलून यांनी पीठ बदलले https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले.||2|| .... To be continued... Llllllluuuu http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-036.gif http://freesmileyface.net/smiley/happy/happy-wink-001.gif

In reply to by उगा काहितरीच

अरेच्या ! मस्त स्मायलीवाल्या बाबांपुरतीच मर्यादित आहेत काय ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

एका सहज विडंबनात, प्रतिसादंही विडंबले दिले होते श्रीखंड,त्याचे केले यांनी पिठले.
घ्या आमच्याकडून ही जीलेबी!

In reply to by अत्रुप्त आत्मा

टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं ह्या सुप्रसिद्ध काव्यपंक्ती असलेल्या एका गाजलेल्या कवितेची अठवण आली.

In reply to by जेपी

त्यांच्या आगामी कवीता संग्रहाचं नावच आहे "सावध एक पुढच्या हाका अर्थात पुढच्यास ठेच मागचा शहाणा" आगावू (अग्रीम या अर्थाने) नोंदणी चालू आहे स्वागत मुल्य १५१ रुपये. सवलतीत १०१ रुपये + बुवांसोबत सेल्फी आधीक तपशील चिमणकडे आहे. आपालप्ल्या भागातील संपर्क केंद्रे : प्रचेतस (पिंची साठी) टक्या (ठाणे- डोंबवली वगळून) अभ्या (सोलापुर) प्रा.डॉ. (औरंगाबाद) मुवि ( डोंबवली+अंबरनाथ ठाणेवगळून) अन्या दातार (कोल्हापुर व रत्नागिरी) कॅप्टन जॅक (झुमरीतलय्या आणि भाटा पारा) बॅट्टमण :मिरज सांगली. जेपी : लातुर सह उस्मानाबाद नाखु चि(क्)टवणीस प्रसीद्धी प्रमुख अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि समग्र बुवा काव्य प्रतिभा प्रकाशन समीती

In reply to by प्रचेतस

आता खुद्द कवीच शिव्वगड रस्त्यावर राहत असतील तर ते दुसर्‍या कुणाला फ्रेण्ची अशी का ब्रे देतील?

In reply to by सतिश गावडे

फ्रेण्ची शब्द काळजाला भिडला. व्हिआयपी अठवून ड्वाळे पाणावले. बाकी त्यांची वडगाव बुद्रुकची स्वतंत्र अस्मिता आहे म्हणे.

In reply to by नाखु

@
अखिल मिपा भावविश्व चाहता संघ आणि समग्र बुवा काव्य प्रतिभा प्रकाशन समीती
>> http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-013.gif

In reply to by नाखु

ज्या असाइनमेंटस आमच्याकडे छपाईला येतात त्याच आम्ही विकतो. दुसर्‍याची फ्रॅन्चायसी घेत नाही.

In reply to by अभ्या..

गावडे सर असले तरी मुद्रक आणि आतील (अतरंगी) बहुरंगी चित्रे तुझीच असतील याची खात्री बाळगणे. धाग्यावरचा दुसरा खुलासा.