✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिस करू नये असे टीवी कार्यक्रम

क
कैलासवासी सोन्याबापु यांनी
Mon, 01/25/2016 - 18:35  ·  लेख
लेख
आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात. पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे, तेव्हा आजचा मुहूर्त साधुन हा एक धागा सुरु करतोय डिस्कवरी एपिक नॅशनल जियोग्राफिक किंवा तुम्हाला जे चॅनल आवडते ते, त्यावर कुठलीही चांगली डॉक्यूमेंट्री असेल जी इतर मिपाकरांनी पहावी असे आपल्याला वाटत असेल त्या संबंधी आपण इथे माहीती शेयर करुयात मित्रहो १ डॉक्यूमेंट्री फ़क्त भारत अन इथल्या जीवनाशी निगडित असाव्यात असे काही नाही तर विज्ञान , समाज विज्ञानं (सोशल साइंसेज) कला काहीही असू शकते, जीवनविषयक आध्यात्मिक काय वाटेल ते फ़क्त क्वालिटी असावे असे कार्यक्रम आपण टाइमिंग सहित इथे शेयर करुयात *जर कार्यक्रम होऊन गेला असेल तर थोडक्यात कार्यक्रमाचा गोषवारा देता येईल चलो सुरु करूयात :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
माध्यमवेध
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
22400 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

हाऊस ऑफ सद्दाम - सद्दाम हुसेन

प्रसाद१९७१
गुरुवार, 01/28/2016 - 17:20 नवीन
हाऊस ऑफ सद्दाम - सद्दाम हुसेन आणि त्याच्या मुला-मुलींवरती बनवलेली ४ तासांचा सिनेमा आहे ( ५५ मिनिटांचे ४ भाग आहेत ) यु ट्युब वर आहेत का ते माहीती नाहीत, पण टोरंट वर मिळतील. तसाच एक सिनेमा इजिप्त्च्या अन्वर सादात वर पण आहे. तो पण बघण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

सोन्याबापु धन्यवाद.

स्वराजित
गुरुवार, 01/28/2016 - 17:39 नवीन
सोन्याबापु धन्यवाद.
  • Log in or register to post comments

...

वपाडाव
Fri, 01/29/2016 - 17:21 नवीन
साराभाई वर्सेस साराभाई
  • Log in or register to post comments

नेटफ्लिक्स वर रीवेंज. मालीका

पद्मावति
Fri, 01/29/2016 - 22:27 नवीन
नेटफ्लिक्स वर रीवेंज. मालीका पूर्ण झालीय पण उपलब्ध असेल तर जरूर पाहण्यासारखी आहे. अमॅंडा क्लार्क ही मुलगी आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायाचा सूड घेते. अतिशय खिळवून ठेवणारी कथा. मला आवडणारी गोष्ट म्हणजे या कथेचा वेग आणि सस्पेन्स. थ्रिलर असूनही संपूर्ण मालीकेचा मूड डार्क किंवा डिप्रेसिंग नाहीये. खूप छान मालीका. जुन्या पैकी एवरीबडी लव्स रेमंड. ऑल टाइम क्लॅसिक. आई- बायकोच्या भांडणात फसलेला मधे फसलेला रेमंड. कधीही कुठलाही एपिसोड पहा..अगदी फील गुड कॉमेडी.
  • Log in or register to post comments

Downton Abbey कोणी बघितलंय

पद्मावति
Sun, 01/31/2016 - 22:57 नवीन
Downton Abbey कोणी बघितलंय /बघतंय आहे का? मी आताच पाहयला सुरूवात केलीय. दोनच एपिसोड्स बघितले आतापर्यंत पण मला तरी खूप आवडतेय. मला स्वत:ला पीरियड ड्रामा, कॉस्ट्यूम ड्रामा आवडत असल्यामुळे असेल कदाचित पण अतिशय इण्टरेस्टिंग वाटतेय. Downtton Abbey या एस्टेट वर राहणार्या एका खानदानी, प्रतिष्ठीत कुटुंब आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या जीवनावर ही कथा आहे.
  • Log in or register to post comments

कित्येक सीरीज येतात मनांवर

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 23:12 नवीन
कित्येक सीरीज येतात मनांवर राज्य करतात अन जातात कोणाला कुठली ऑल टाइम हिट वाटते कोणाला कुठली माझी आवडती म्हणजे हाउस, एम्.डी ही सीरीज होय, एक माणुसघाणा डॉक्टर अन त्याने डिटेक्टिव सारखे रोग निदानात लावलेले डोके ही सीरियल पाहणे एक अनुभव आहे विशेषतः ह्यूज लॉरी ह्या गुणी अभिनेत्याने साकारलेला हाउस पाहताना अन तितकेच जास्त त्याला सपोर्टिंग कास्ट लिसा एडेलस्टिन, रॉबर्ट शॉन लियोनार्ड अन ओमर एप्प्स
  • Log in or register to post comments

हल्लीच एक उत्तम सिरीयल

कैलासवासी सोन्याबापु
Sun, 08/14/2016 - 09:03 नवीन
हल्लीच एक उत्तम सिरीयल पाहण्यात आली, हिचे नाव म्हणजे 'द युनिट' , एरिक हॅने ह्याच्या "इन्साईड डेल्टा फोर्स" नामक पुस्तकावर आधारित असा हा शो असून, ह्यात वेगळेपण म्हणजे डेल्टा फोर्सची माणसे आपली टॉप सीक्रेट मिशन्स ते फॅमिली प्रॉब्लेम कसे मॅनेज करतात ह्याचे अतिशय सुंदर चित्रण आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

ही लिंक

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/08/2016 - 21:42 नवीन
ही लिंक पूर्वाश्रमी आंध्रप्रदेश पोलीस स्पेशल टीम ग्रेहाऊंड्स अन सद्ध्या जिच्या काही बटालियन सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोज मध्ये सम्मिलित केल्या गेल्यात अश्या ईलाईट जंगल वॉरफेर गृप संबंधी एक अत्युत्तम डॉक्युमेंटरी आहे ही युट्यूबची , हा गृप जगातला सर्वोत्तम जंगल वॉरफेर गृप मानला जातो. यूएस नेव्ही सील्स सारख्या अत्युच्च ट्रेनिंग प्राप्त संस्था सुद्धा कधीच ०६ दिवसांच्यावर स्टँड अलोन ऑप करू शकत नाहीत जंगलात, ह्या टीमची तीच क्षमता किमान ०७ अन कमाल १६ दिवसांची आहे, हे एक प्रचंड मोठे अचिव्हमेंट आहे.
  • Log in or register to post comments

चित्रफित बघीतली !

धर्मराजमुटके
Sat, 09/10/2016 - 23:01 नवीन
चित्रफित बघीतली ! एवढे तंत्रज्ञान, जिद्द असूनही अजून नक्षली रोग आटोक्यात का येत नाहिये हे एक कोडेच आहे. कधीही बातम्या वाचल्या तर पोलीसच अधिक संख्येने मेलेले / जखमी झालेले दिसतात. अर्थात या फोर्स ने त्यांची आंध्रातून बर्‍यापैकी हकालपट्टी केली आहे. मात्र आता हा रोग महाराष्ट्र, छत्तीसगड येथे जास्त वाढत आहे. याच विषयावर अतिशय तपशीलवार मांडणी करणारे पुस्तक वाचले होते. आत्ता नाव आठवत नाहिये. संग्रह परत एकदा उघडून बघावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बापू.. हा व्हिडीओ बघितला आहे

मोदक
गुरुवार, 09/08/2016 - 21:58 नवीन
बापू.. हा व्हिडीओ बघितला आहे का..?
  • Log in or register to post comments

सुंदर विडिओ आहे! अडजुडन्टने

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/08/2016 - 22:44 नवीन
सुंदर विडिओ आहे! अडजुडन्टने दिलेल्या पेप टॉकची आठवण आली एकदम!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मिपावर असा विडिओ कसा

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 09/10/2016 - 23:10 नवीन
मिपावर असा विडिओ कसा चिकटवायचा हो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सह्याद्री वाहीनीवरची

रघुनाथ.केरकर
Fri, 09/09/2016 - 11:32 नवीन
सह्याद्री वाहीनीवरची "आमची माती आमची माणसं" साम टीवी वरचं अग्रोवन, सकाळच्या सातबाराच्या बातम्या, डिस्कोवरी वरच मेगास्ट्रक्चर ह्या अमच्या फेवरीट. पण युद्धावरच्या डॉकुमेंटर्‍या जास्त आवडतात, त्यातच जयंत कुल़कर्णी आणी बोका जींनी त्यांच्या लेखांनी उत्सुकतेत अजुन भर घातलीय.
  • Log in or register to post comments

Breaking Bad च्या चाहत्यांसाठी

बोका-ए-आझम
Fri, 09/09/2016 - 12:16 नवीन
- ५ सप्टेंबर पासून Breaking Bad season one सुरु झालेला आहे. कल्पनाच जबरदस्त आहे. ब्रायन क्रॅन्स्टनचा अभिनय लाजवाब. त्याने लिंकन लाॅयर मध्येही सुंदर काम केलं होतं.
  • Log in or register to post comments

लिविन्ग फूड्स वर...

अनिरुद्ध प्रभू
Fri, 09/09/2016 - 12:21 नवीन
रविवारी संध्यकाळी ७ वाजता गंगा द सोल ओफ इंडिआ लागतं...उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

Devlok With Devdutt

Shridhar Laxma…
Fri, 09/09/2016 - 18:48 नवीन
Epic channel वर devlok with devdutt नावाचा कार्यक्रम आहे. देवदत्त सरांच्या फॅन्स साठी चांगला कार्यक्रम आहे.
  • Log in or register to post comments

नेटफ्लिक्स वर काही

सही रे सई
Sat, 09/10/2016 - 01:43 नवीन
नेटफ्लिक्स वर काही दिवसांपूर्वी या मालिका पाहिल्या, जबरदस्त खिळवून ठेवतातः १. द १०० - एका संपूर्ण विनाशक आण्विक युध्दानंतर अंदाजे १०० वर्षांनी १०० कुमारवयीन मुले मुली उपग्रहावरून परत पृथ्वीवर पाठवली जातात हे पाहाण्यासाठी की अणूयुध्दानंतरची पृथ्वी रहाण्यायोग्य आहे की नाही. त्या मुलांना कशाकशाला तोंड द्यावे लागते याचे थरारक चित्रण दोन सिझनस् मधे केले आहे. २. झू - (मराठीत प्राणिसंग्रहालय) जेम्स पॅटर्सन आणि माईकल लेड्विज यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत ही मालिका आहे. यात असे दाखवले आहे की जर उद्या प्राण्यांनीही जमावाने ठरवून माणसांवर हल्ला करायला सुरवात केली तर काय आणि कसे भयानक होईल. ३. लिमिटलेस - ही मालिका पाहायला नुकतीच सुरवात केली आहे. ही पण एक थरारक मालिका आहे. सोन्याबापू, बरं झालं तुम्ही हा धागा काढला. चांगल्या मालिकांची त्यामुळे ओळख होत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा