✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिस करू नये असे टीवी कार्यक्रम

क
कैलासवासी सोन्याबापु यांनी
Mon, 01/25/2016 - 18:35  ·  लेख
लेख
आपण रोज टीवी पाहतोच, त्यात बहुसंख्य भरणा हा निरर्थक सीरियल किंवा तद्दन हलक्या दर्जाचे रियलिटी शो वगैरे असतात. पण ह्या सगळ्यांच्या मधे हिस्ट्री टीवी १८ किंवा नॅशनल जियोग्राफिक, डिस्कवरी वगैरे कधी कधी प्रसंगानुरूप प्रचंड उत्तम अन चांगले कार्यक्रम देतात, जागतिक उतरंडीमधे भारताची पोजीशन जशी थोड़ी थोड़ी बळकट होत जाते आहे तसे तसे २६ जानेवारी १५ ऑगस्ट वगैरे ला किंवा भारतीय सणवारांना किंवा मंगलयान प्रक्षेपण सारख्या इवेंट्स ना ह्या चॅनल वर डॉक्यूमेंट्री स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते हे मागच्या २ वर्षांपासुन दिसते आहे, तेव्हा आजचा मुहूर्त साधुन हा एक धागा सुरु करतोय डिस्कवरी एपिक नॅशनल जियोग्राफिक किंवा तुम्हाला जे चॅनल आवडते ते, त्यावर कुठलीही चांगली डॉक्यूमेंट्री असेल जी इतर मिपाकरांनी पहावी असे आपल्याला वाटत असेल त्या संबंधी आपण इथे माहीती शेयर करुयात मित्रहो १ डॉक्यूमेंट्री फ़क्त भारत अन इथल्या जीवनाशी निगडित असाव्यात असे काही नाही तर विज्ञान , समाज विज्ञानं (सोशल साइंसेज) कला काहीही असू शकते, जीवनविषयक आध्यात्मिक काय वाटेल ते फ़क्त क्वालिटी असावे असे कार्यक्रम आपण टाइमिंग सहित इथे शेयर करुयात *जर कार्यक्रम होऊन गेला असेल तर थोडक्यात कार्यक्रमाचा गोषवारा देता येईल चलो सुरु करूयात :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
माध्यमवेध
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
22400 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

आज रात्रौ २१०० (९ वाजता)

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 01/25/2016 - 18:43 नवीन
नॅशनल जियोग्राफिक इंडिया वर "बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़ इंडियन डिफेन्स" ही डॉक्यूमेंट्री आहे, ट्रेलर्स वरुन आमची अकादमी आठवली अन डोळे भरून आले होते (फिजिकल ते फाइनल पीक्ड कॅप टॉस पर्यंत सगळे), त्यामुळे ज्या कोणा मिपाकर बंधू भगिनी ला ते लाइफ पहायचे असेल त्यांनी आवर्जून ही डॉक्यूमेंट्री पहावी , बाकी कॉमेंट्स कार्यक्रम झाल्यावर देतो :) उद्या (२६/०१/२०१६) रात्री ९ वाजता सियाचेन : वर्ल्डस हाईएस्ट बॅटलफील्ड ही डॉक्यूमेंट्री आहे, भारतीय लष्कर (रेगुलर आर्मी) कसे सियाचेन मॅनेज करते ह्यावर ही डॉक्यूमेंट्री आहे दोन्ही कार्यक्रम आवर्जून पहा मंडळी
  • Log in or register to post comments

आजच व्हाॅट्स अॅपवर एका

अजया
Mon, 01/25/2016 - 19:57 नवीन
आजच व्हाॅट्स अॅपवर एका मैत्रिणीने जरुर पहा हा कार्यक्रम म्हणून लिंक पाठवली होती.तेव्हाच सोन्याबापूंची आठवण निघाली होती.जरुर पाहणार हा कार्यक्रम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

पाहिला हा प्रोग्राम कालच

पियुशा
Wed, 01/27/2016 - 14:57 नवीन
पाहिला हा प्रोग्राम कालच हँट्स ऑफ फॉर इंडियन आर्मी :)माझे फेव फूड factory on discovery
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आमच सेट टॉप बॉक्स जळल मेलं

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 01/27/2016 - 14:18 नवीन
आमच सेट टॉप बॉक्स जळल मेलं नेमकं तेव्हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ऑफिसात असल्यामुळे (हो, २६ ला

यशोधरा
गुरुवार, 01/28/2016 - 12:27 नवीन
ऑफिसात असल्यामुळे (हो, २६ ला पण ) हे कारेक्रम बघता आले नाहेत, मी यूट्युब वर शोधत आहे, कोणाकडे लिंक असल्यस द्यावी. सद्ध्या फक्त प्रोमोच दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

+1

जव्हेरगंज
Mon, 01/25/2016 - 18:48 नवीन
+1 एखादी डॉक्युमेंटरी युट्युबवर हिंदीमध्ये ऊपलब्ध असेल तर त्याचीही लिंक द्यावी!! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

उद्या (२६/०१/२०१६) रात्री ९

होबासराव
Mon, 01/25/2016 - 18:49 नवीन
उद्या (२६/०१/२०१६) रात्री ९ वाजता सियाचेन : वर्ल्डस हाईएस्ट बॅटलफील्ड ह्याचि तर जाहिरात येतेय तेव्हापासुन वाट पाह्तोय
  • Log in or register to post comments

अशा चालतील का?

यशोधरा
Mon, 01/25/2016 - 18:49 नवीन
हायवे ऑन माय प्लेट चे रिरन्स. चॅनेल - NDTV Good Times- तुम्ही वर लिहिलेय तशी काही भारदस्त सिरियल नाहीये पण भारताच्या विविध राज्यां, गावांमधली खाद्य संस्कृती या शो वर पहायला मिळेल. वे बॅक होम एम टीव्ही ईंडीज - आता ही यु ट्यूबवर पहायला मिळेल. १३ भागात विभागलेली ही सिरीज हिमाचलाचे अतिशय सुरेख दर्शन घडवते.
  • Log in or register to post comments

राॅकी आणि मयूर यांचे कार्यक्रम

बोका-ए-आझम
Tue, 01/26/2016 - 00:29 नवीन
कितीही वेळा बघायची आपली तयारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

१०० हिश्याने चालतील!!

कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/26/2016 - 06:49 नवीन
१०० हिश्याने चालतील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

झी टॉकिज

नया है वह
Mon, 01/25/2016 - 19:18 नवीन
टॉकिज लाईट हाउस रविवार ४:३० संध्या. http://www.zeetalkies.com/celebs-speak/zee-talkies-talkies-lighthouse-brings-short-films-to-television-for-the-audiences-of-maharashtra-this-new-year.html
  • Log in or register to post comments

ज्जे बात!!!!!!

मुक्त विहारि
Mon, 01/25/2016 - 20:08 नवीन
मुळात टी.व्ही. नामक येड्पट खोक्याचे आणि आमचे भरपूर वाकडे.... पण सोन्याबापूंनी धागा काढलाय, म्हटल्यावर धागा पहाणे भागच पडले. धाग्याने निराशा नाही केली. नॅशनल जिओग्राफिक आणि डिस्कव्हरी हे माझे आवडते चॅनल्स. त्यातही, हाऊ दे डू इट, सेकंड्स फ्रॉम डिझास्टर्स, एयर क्रॅश इंन्व्हेस्टिगेशन हे माझे आवडते कार्यक्रम. (गेली १० वर्षे मी टी.व्ही. बघीतलेला नाही.आजकाल यु ट्युबवरच भार टाकला आहे.)
  • Log in or register to post comments

ह्यावर मसाएपिसोड ओफ जान्हविच

किचेन
Mon, 01/25/2016 - 20:21 नवीन
ह्यावर मसाएपिसोड ओफ जान्हविच बाल अस का हि दिसायला नको, तेव्हा सार्थक होइल ह्या धाग्याच! कल्पना उत्तम!
  • Log in or register to post comments

@सोन्याबापु

भंकस बाबा
Mon, 01/25/2016 - 21:48 नवीन
काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे हंटिंग हिटलर पाहिला, अप्रतिम. काल नाव सापडत नव्हते, आज दिसले, धन्यवाद. माझ्या कामाच्या व्यापामुळे फ़क्त रविवार मिळतो. तुम्ही सुचवत रहा,नंतर यूट्यूब वर पाहिन्.
  • Log in or register to post comments

ज्यांना गाड्यांमधे विशेष रस

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/25/2016 - 22:48 नवीन
ज्यांना गाड्यांमधे विशेष रस आहे त्यांच्यासाठी काही शोज सुचवतो. (चॅनेलः डिस्कव्हरी टर्बो) १. फिफ्थ गिअर २. वेस्ट कोस्ट कस्टम्स ३. रिस्टोरिंग क्रोनिकल्स (ब्लॅक अँड व्हाईट, बराचं दुर्मिळपणे पहायला मिळतो) ४. व्हीलर डिलर्स (बर्‍याचं जुन्या आणि दुर्मिळ गाड्या पहायला मिळतात) काही आवडते शोज जे तुनळीवर पाहिले जातात. १. मेगा फॅक्टरीज (ह्यामधला फेरारी, पेप्सी आणि लँबोर्गिनीच्या फॅक्टरीजचे भाग विशेष उल्लेखनिय) २. मॅन वर्सेस वाईल्ड
  • Log in or register to post comments

मॅन वर्सेस वाईल्ड

मुक्त विहारि
Tue, 01/26/2016 - 09:44 नवीन
+ १ माझ्या मुलांकडून.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

टॅबु ही नॅशनल जिओग्राफीक वरील मालिका

मारवा
Mon, 01/25/2016 - 22:51 नवीन
टॅबु ही नॅशनल जिओग्राफीक वरील मालिका अत्यंत आवडती आहे. विलक्षण विषय दडवलेले दडपलेले विषय मानवी मनाचा तळ ढवळुन काढणारी मालिका आवडते.
  • Log in or register to post comments

क्रिमिनल माईंड्स.

बोका-ए-आझम
Mon, 01/25/2016 - 23:00 नवीन
अप्रतिम मालिका. सध्या झी कॅफेवर येतेय. सीझन्स १ ते ६. FBI च्या Behavioral Analysis Unit ची पार्श्वभूमी आहे. त्याच अनुषंगाने Mindhunter हे पुस्तकही वाचतोय. माणसाचं मन हा किती ढवळून टाकणारा विषय असू शकतो ते मनोरंजक पद्धतीने सांगणारी मालिका.
  • Log in or register to post comments

क्रिमिनल माइण्ड्स खूप आवडीची

संदीप डांगे
Mon, 01/25/2016 - 23:06 नवीन
क्रिमिनल माइण्ड्स खूप आवडीची मालिका... सगळे भाग आवर्जून पाहायचो. गेले वर्षभर टीवी नाही त्यामुळे काही मालिका बघायच्या असून बघायला मिळत नाहीत. इथे भरपूर चांगल्या मालिकांचे संदर्भ मिळतायत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बोकोबा

मारवा
Mon, 01/25/2016 - 23:14 नवीन
कीती वाजता असते हो वेळ मालिकेची ? म्हणजे कथानक अशा स्वरुपाची आहे की नॉन फिक्शन आहे ? आणि हे पुस्तक कोणत हो बोकोबा हे कोण लेखक ? काय विषय ? विस्तार करावा तुम्हाला इतकी आवडली म्हणजे कुछ तो बात होगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

क्रिमिनल माईंड्स

बोका-ए-आझम
Tue, 01/26/2016 - 00:37 नवीन
एरिक हाॅचनर उर्फ हाॅच हा या BAU चा प्रमुख आणि मग इतर लोक - जेसन गिडिआॅन, डेरेक माॅर्गन, जेनिफर जूरो, एमिली प्रेंटिस, डेव्हिड राॅसी, स्पेन्सर रीड हे एजंट्स आणि पेनेलोपी गार्सिया ही रिसर्चर अशा लोकांची कथा. प्रत्येक भागात एक नवीन गुन्हा - खून आणि त्याची उकल पण मानसशास्त्रीय पद्धतीने. मला आवडण्याचं कारण यातले एजंट्स हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं आहेत पण त्यांच्या प्रशिक्षणामुळे त्यांची कुठल्याही गोष्टीकडे पाहायची पद्धत वेगळी आहे. मुळात मानसशास्त्र हा माझा आवडता विषय आहे आणि यात तो अँगल खूप छान दाखवला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

९ वर्ष झाली मी टी व्ही पाहिला

Savnil
Mon, 01/25/2016 - 23:04 नवीन
९ वर्ष झाली मी टी व्ही पाहिला देखील नाही
  • Log in or register to post comments

पुर्वी, म्हणजे एक दोन

अन्नू
Tue, 01/26/2016 - 00:10 नवीन
पुर्वी, म्हणजे एक दोन वर्षापुर्वी डिस्कव्हरीवर अनेक कार्यक्रम येत होते. त्यात डिस्कवरीवरचे माझ्या आवडते कार्यक्रम म्हणजे- मॅन वर्सेस वाईल्ड: अगदी बोल खावून सुद्धा हा कार्यक्रम मी न चुकता बघायचो. ;) यात बिल ग्रील आपल्याला एखाद्या अज्ञात- निर्जन स्थळी फसल्यावर कशा प्रकारे खटपट करुन- त्यातून जिवंत बाहेर पडायचे याचे प्रात्यक्षिक करुन दाखवायचा. त्याच्या भ्रमंतीच्या काळात तो अनेक गोष्टींची उपयुक्त माहीतीही पुरवायचा. हाऊ डू दे डू दॅट: अवघड, टेक्निकल लेवलच्या वस्तू कशा तयार केल्या जातात हे यात दाखविले जाते. काही वेळा इतर छोट्या व खाण्यासंबंधीत वस्तूंची माहीतीही यात समाविष्ट केली जाते. हाऊ इट्स मेड: इथे छोट्या दैनंदिन वापराच्या किंवा खेळण्यापासून वस्तूपासून ते खाण्याच्या पदार्थांबद्दल त्या कशा तयार केल्या जातात याचे याशिवाय सायन्स ऑफ स्टुपिड, डायनामो- मॅजिशिअन इम्पॉसिबल, मेगा फॅक्टरीज, अ‍ॅण्ड माय फेवरेट- फूड फॅक्टरी (पण आत्ता मात्र या प्रोग्रामचे तेच-तेच भाग रिपिट केले जातायत! :(... )
  • Log in or register to post comments

मॅन वर्सेस वाईल्ड = बेअर

मयुरMK
Tue, 01/26/2016 - 12:16 नवीन
मॅन वर्सेस वाईल्ड = बेअर ग्रील, न चुकता पाहतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्नू

Homeland,

बबलु
Tue, 01/26/2016 - 02:27 नवीन
Homeland, Prison Break, Person Of Interest, How The Universe Works, House of Cards, The Sopranos, How to get away with murder, Cosmos, Blacklist
  • Log in or register to post comments

नेटफ्लिक्सवरून

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 01/26/2016 - 02:50 नवीन
भारतातही आता नेटफ्लिक्स आलंय असं कानावर आलंय. त्यामुळे माझ्याकडून ही शिफारस - १. रिव्हर - एकांडा आणि स्किझोफ्रेनिक पोलिस, जॉन रिव्हर आपल्या पोलिस मैत्रिणीच्या खुनाचा शोध घेताघेता आपल्या माणूसघाणेपणावर मात करण्याचा प्रवास करतो. २. ब्लॅक मिरर - याबद्दल मस्त कलंदरने स्वतंत्र लेखन केलेलं आहे. आणखी लिहीत नाही. ३. नार्कोस - कोलंबियन ड्रग बादशहाला अमेरिकन पोलिसांनी पकडण्याचा प्रवास; हाच ड्रग बादशहा स्थानिक रॉबिन हूड म्हणून परिचित असतो; त्याचा रॉबिन हूड ते गुंड असाही प्रवास यात आहे. या तिन्ही मालिकांना वेग, गती आहे. प्रेक्षकांना विचार करायला लावणारं बंदीस्त लेखन आणि प्रभावी दिग्दर्शन आहे.
  • Log in or register to post comments

तुमच्या सल्ल्याने

अनुप ढेरे
Tue, 01/26/2016 - 17:46 नवीन
तुमच्या सल्ल्याने नेट्फ्लिक्षचं उद्घाटन 'नार्कोज'ने केलं. २ एपिसोड बघितले. चांगले आहेत. (बीएसेनेलवर नेटफ्लिक्स एक्दम मक्खन चाललं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

I shouldn't be alive दुसरी

कविता१९७८
Tue, 01/26/2016 - 02:59 नवीन
I shouldn't be alive दुसरी बर्‍याचजणाना आक्षेपार्ह वाटेल तरीही नाव लिहीतेच The Haunting
  • Log in or register to post comments

एवढ्या रात्रीचं बरोबर हेच नाव

अन्नू
Tue, 01/26/2016 - 03:48 नवीन
एवढ्या रात्रीचं बरोबर हेच नाव सांगायचं होतं का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

एपिक

तुषार काळभोर
Tue, 01/26/2016 - 09:18 नवीन
स्टोरीज बाय रबिन्द्रनाथ टागोर परत सुरू झालंय. (पहिल्या कथेत राआ आहे :) ) जावेद जाफरीचा वन्स मोर राजा, रसोई और अन्य कहानियां (आता सुरू नसलेला) एकांत कधी कधी देवलोक (देवदत्त पटनाई़क) (अवांतरः देवदत्त पटनाईक उत्तम मराठी बोलतात.) हिस्ट्री: पॉन स्टार्स (डिस्कवरी/हिस्ट्री/नॅटजिओ वरचे अत्यंत उत्तम कार्यक्रम आता तिसर्‍यांदा-चौथ्यांदा रिपीट होऊन रटाळ होऊ लागले आहेत.) ट्रॅवलरः स्ट्रीट फूड, फूड सफारी
  • Log in or register to post comments

देवदत्त पटनाईक मराठी बोलू

आदूबाळ
Tue, 01/26/2016 - 12:28 नवीन
देवदत्त पटनाईक मराठी बोलू शकतात हे ठाऊक नव्हतं. कार्यक्रम बघायला पाहिजे. (हे एपिक काय आहे? चायनल आहे का? जालावर कुठे मिळेल?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+1

चांदणे संदीप
Wed, 01/27/2016 - 13:33 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

एपिकचे एपिसोड मायबोलीवरील

कंजूस
Tue, 01/26/2016 - 10:00 नवीन
एपिकचे एपिसोड मायबोलीवरील स्वप्ना राज यांचा धागा पहा. dw tv आणि nhkworld माझे आवडते चानेल.फक्त समयोचित नवीन डॅाक्यु व इतर कार्यक्रम असतात.रिपीट केलेच तर आठ दहा महिन्यांनी.
  • Log in or register to post comments

अरे हो!!!

अन्नू
Tue, 01/26/2016 - 10:11 नवीन
फॉक्स लाईफवरचं स्टाईल अ‍ॅण्ड सिटी राहीलंच कि! त्याचबरोबर फूड सफारी आणि येस् अफकोर्स.. शुगर स्टार्स Image removed. (अवांतर- खुप वर्ष अगोदर V चॅनेलवर एक कार्यक्रम लागायचा.. एक्स युअर एक्स! एकदम रिअ‍ॅलिलिस्टीक प्रोग्राम होता तो. तरास देनार्‍या पार्टनरची कशी जिरवतात- याचे प्रात्यक्षिक दाखवले जायचे. आंम्ही तर आवर्जुन ते बघायचो ;) )Image removed.
  • Log in or register to post comments

ट्रवेल xp खास भटकंती

मयुरMK
Tue, 01/26/2016 - 12:14 नवीन
ट्रवेल xp खास भटकंती करणार्यासाठी . जास्त जाहिरात सुद्धा नसते एपिक वरील शो पण मस्त आहेत खास करून एकांत ..
  • Log in or register to post comments

माझ्या सौ. ला आणि मातोश्रीना

विवेकपटाईत
Tue, 01/26/2016 - 12:46 नवीन
माझ्या सौ. ला आणि मातोश्रीना आवडणारी मालिका जी मिस करणे मला हि शक्य नाही. वेळ संध्याकाळी ७ वाजता. एक चांगले पुरुष मंडळी (दिल्लीत अधिकांश कामकाजी महिला हि संध्याकाळी सात नंतरच घरी पोहचतात).
  • Log in or register to post comments

+१

उपयोजक
Tue, 01/26/2016 - 15:44 नवीन
ट्रावल एक्स पी +१
  • Log in or register to post comments

भारतात नेटफ्लिक्स वर House of

पद्मावति
Tue, 01/26/2016 - 23:18 नवीन
भारतात नेटफ्लिक्स वर House of Cards मिळालं तर जरूर पहा. एका भयंकर पाताळ-यन्त्री आणि महत्वाकांक्षी कॉंग्रेसमन चा राजकाराणातला प्रवास. या प्रवासात त्याच्या तेव्हड्याच महत्वाकांक्षी बायकोचीही त्याला साथ असते. केविन स्पेसी ने जबरदस्त अभिनय केलाय. वॉशिंग्टन डीसी मधलं राजकारण, डावपेच, कुरघोडी, कारस्थाने ....डोकं चक्रावून जाईल इतक्या वेगाने कथा पुढे सरकते.
  • Log in or register to post comments

हाऊस ऑफ कार्ड्स

अभिजितमोहोळकर
Wed, 01/27/2016 - 06:35 नवीन
१९८९, १९९२ आणि १९९४ साली मायकल डॉब्जच्या हऊस ऑफ कार्ड्स, टू प्ले द किंग आणि द फायनल कट ह्या एकाच कादंबरी मालेतील तीन कादंबर्या प्रसिद्ध झाल्या. त्यावरून बीबीसी ने त्याच नावाच्या मालिका बनवल्या.मूळ कादंबर्या आणि मालिका दोन्ही लोकांना व समीक्शकांना आवडल्या. त्याचंच अमेरिकन रूपांतर करून नवीन हाऊस ऑफ कार्ड्स बनवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

Game of thrones

कपिलमुनी
Tue, 01/26/2016 - 23:49 नवीन
माझी अतिशय आवडती सिरीज ! टोरेंटवरुन पाहिली
  • Log in or register to post comments

History

tushargugale
Wed, 01/27/2016 - 01:07 नवीन
History varil pawn star Jarur paha
  • Log in or register to post comments

Orphan Black...

रानडेंचा ओंकार
Wed, 01/27/2016 - 10:00 नवीन
Orphan Black... Based on Human Cloning आत्ता तीसरा सीजन सुरु आहे...
  • Log in or register to post comments

हिस्ट्री 18

मितभाषी
Wed, 01/27/2016 - 10:08 नवीन
हिस्ट्री 18 पाॅन स्टार व्हाईस फायनल ऑफर हंटींग हिटलर गांधी
  • Log in or register to post comments

"बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़

होबासराव
Wed, 01/27/2016 - 13:24 नवीन
"बी एस ऍफ़ : फर्स्ट लाइन ऑफ़ इंडियन डिफेन्स" सियाचेन : वर्ल्डस हाईएस्ट बॅटलफील्ड दोन्हि जबराट होते, बी एस ऍफ़ वरचा एपिसोड पाहताना बापुंचे अकदमि वरचे सगळे भाग एकामागोमाग डोळ्यापुढे येत होते.
  • Log in or register to post comments

कॅप टॉसिंग पाहताना डोळे

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/27/2016 - 13:52 नवीन
कॅप टॉसिंग पाहताना डोळे पाझरायला लागले तशी बिचारी बायको आली आहे भेटायला ती पण कावरीबावरी झाली होती! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!! एक एक ऑब्स्टकल दिसले की जत्रेत जाणाऱ्या बारक्या पोरा सारखा हरवून जात होतो. सियाचेन डॉक्युमेंट्री सुद्धा अफाट होती, सियाचेनची हाईएस्ट पोस्ट आहे त्यापेक्षा २ हजार फुट खाली ड्यूटी केली आहे एक रोटेशन त्यामुळे तिथे ही लगेच कनेक्ट झालो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

सियाचेनची हाईएस्ट पोस्ट आहे त्यापेक्षा २ हजार फुट खाली ड्यूटी

होबासराव
Wed, 01/27/2016 - 15:19 नवीन
धन्य हो बाप्पु
  • Log in or register to post comments

द बिग बँग थियरी!

गुंड्या
गुरुवार, 01/28/2016 - 12:07 नवीन
द बिग बँग थियरी!
  • Log in or register to post comments

नको रे....काहीजणांचे नाकाचे

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/28/2016 - 14:24 नवीन
नको रे....काहीजणांचे नाकाचे केस जळतील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुंड्या

डिस्कव्हरी टर्बो वर काहीही

वेल्लाभट
गुरुवार, 01/28/2016 - 17:15 नवीन
डिस्कव्हरी टर्बो वर काहीही बघा बेस्ट असतं. अर्थात वाहनांची आवड असेल तर. अमेरिकन चॉपर ओवरहॉलिंग (आता लागत नाही बहुदा) पिंप माय राईड टीएलसी वर काहीही. आगोदर लोनली प्लॅनेट न चुकता बघायचो. हिस्टरी वर मेगा फॅक्टरीज इत्यादी अनेक. पण होणार सून मी या घरची ला तोड नाही!
  • Log in or register to post comments

खरंच की काय?

अन्नू
Fri, 01/29/2016 - 10:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा