काही महत्वाच्या कामासाठी किंवा चक्क सुट्टीमध्ये चार दिवस मजेत घालवण्यासाठी परगावी जायला आपण रेल्वेचे आरक्षण करावे, आणि स्टेशनवर जाऊन बघावे तर आपले आरक्षणच गायब ! शेवटी प्रवास रद्द करण्याची वेळ येते . जीव चडफडतो . रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याची चूक किंवा हलगर्जीपणा , पण त्याची केव्हडी किंमत ग्राहकाला द्यावी लागते ?ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेली अशा प्रकारची सेवा ही निश्चीतच सदोष असते. अशा वेळी जागरूक ग्राहक हा ग्राहक संरक्षण कायद्याचा (ग्रा.सं. का.) आधार घेऊन ग्राहक मंचाचे दार ठोठावतो आणि रेल्वे खात्याकडून झालेल्या मनःस्तापाबद्दल आणि गैरसोयीबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून दावा दाखल करतो . अशा परिस्थितीत रेल्वे खात्याने तक्रारदार ग्राहकाला नुकसानभरपाई द्यावी असे आदेश मंचानी दिलेले आहेत .
परंतु अशाच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला . सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देणाऱ्या संस्था अशा प्रकारे ग्राहकांना नुकसानभरपाई देऊ लागल्या तर त्यामुळे येणारी आर्थिक तूट ही त्या सेवांची किंमत किवा दर वाढवून ग्राहकांकडून वसूल केली जाईल किंवा करवाढ करून प्रामाणिक करदात्यांकडून घेतली जाईल अशी शक्यता आहे . अशा परिस्थितीत सेवा क्षेत्रातील कर्मचार्यांची याबाबतीत वैयक्तिक जबाबदारी काही आहे का असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला . या अनुषंगाने भारतीय घटना , आपले कायदे ,यांचा उहापोह करून अशा प्रकरणी ग्राहकाचे नुकसान भरून देण्यास सदर सेवा देणारी कंपनी / उपक्रम जरी जबाबदार असला तरी याबाबतीत जे अधिकारी /कर्मचारी ग्राहकांच्या नुकसानीस जबाबदार असतील त्यांच्याकडून ही नुकसानभरपाईची रक्कम वसूल केली पाहिजे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे . (लखनौ विकास प्राधिकरण विरुद्ध एम.के ग़ुप्ता . संदर्भ : १९८६-९५ कन्झुमर २७८)
५ नोव्हेंबर १९९३ या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सेवा देणाऱ्या संस्थांना याची त्वरित दाखल घ्यावी लागली . उदा. ठाण्याहून औरंगाबादला बदली झाल्यामुळे जीवन विम्याची आपली पॉलिसी औरंगाबादला पाठवण्याची विनंती एका ग्राहकाने आयुर्विमा महामंडळाला केली होती . पण ती पॉलिसी झाली गहाळ ! ग्राहक विम्याचे मासिक हप्ते देऊ इच्छितोय ,पण पॉलिसी मिळत नाही म्हणून विम्याचे हप्तेही घेण्यास नकार या परिस्थितीत काही कालावधीत पॉलिसी रद्द झाली . ग्राहकाने महामंडळाच्या या अंदाधुंद कारभाराविरुद्ध औरंगाबाद जिल्हा मंचापुढे दाद मागितली . या प्रकरणी ग्राहकाला नुकसानभरपाई देताना जिल्हा मंचाने सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाचा आधार घेतला . व नुकसान भरपाईची रक्कम पॉलिसी गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्याकडून वसूल केली जावी असाही आदेश दिला .
सर्वोच्च न्यायालयाच्या वरील ऐतिहासिक निर्णयामुळे सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांची ग्राहकांच्या प्रति असलेली कायदेशीर जबाबदारी आता स्पष्ट झाली आहे . याची नोंद घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील बऱ्याच संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांची ग्राहकांबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. ग्रा. सं . कायद्याचे हे एक मोठे फलित म्हणता येईल .
पूर्व प्रसिद्धी --ग्राहकनामा
मुंबई ग्राहक पंचायत ,पुणे विभाग
लेखक --Adv. शिरीष देशपांडे
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
10062
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही प्रमाणात सहमत , पण
त्यात कामाचा ताण अधिक
In reply to काही प्रमाणात सहमत , पण by उगा काहितरीच
जोक काय आहे?
In reply to त्यात कामाचा ताण अधिक by संदीप डांगे
सरकारी नोकर आणि त्यांना
In reply to जोक काय आहे? by मोदक
साहेब , हा जोक नाहीये .
In reply to सरकारी नोकर आणि त्यांना by संदीप डांगे
विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे
In reply to साहेब , हा जोक नाहीये . by उगा काहितरीच
इथे कुठे सरसकटीकरण दिसले?
In reply to विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे by संदीप डांगे
इथे कुठे सरसकटीकरण दिसले?सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण - जोक करता काय राव? सरकारी नोकर म्हणजे नक्की कोणते नोकर तुम्ही गृहीत धरले आहेत? पुणे म्युन्सीपालिटीमध्ये उंदीर मारणार्या लोकांपासून ते सीमेवर लढणारे जवान सगळेच सरकारी नोकर आहेत. सगळेच जण पाट्या टाकत काम करतात असे म्हणायचे आहे का? ..आणि एकदा "सरकारी नोकर आणि त्यांना कामाचा ताण" हा जोक आहे असे मान्य केल्यानंतर त्यामध्ये अपवाद असतात, वेरियेशन्स असतात वगैरे गोष्टी तुमच्या मूळ विधानालाच छेद देत नाहीत का? तुम्ही नेहमीच सरसकटीकरण करत नाही असे माझ्या स्वाक्षरीवरून तुमच्या लक्षात येईल असे वाटले होते. ;)मोदकजी,
In reply to इथे कुठे सरसकटीकरण दिसले? by मोदक
आक्षेप याच्यावर आहे की आपण
In reply to मोदकजी, by संदीप डांगे
मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला
In reply to आक्षेप याच्यावर आहे की आपण by मोदक
अपेक्षित प्रतिसाद. असो. :)
In reply to मी स्पष्ट बोलूनही तुम्हाला by संदीप डांगे
विदा काढा मग बोलू...
In reply to विदा काढा मग बोलू... ऑफिसमधे by संदीप डांगे
सॉरी लिंक गंडल्या...१ .2 .
In reply to विदा काढा मग बोलू... by उगा काहितरीच
इथे पण सरसकटीकरण का?
In reply to सरकारी नोकर आणि त्यांना by संदीप डांगे
+१ अंशतः सहमत.
In reply to काही प्रमाणात सहमत , पण by उगा काहितरीच
+१
In reply to +१ अंशतः सहमत. by मोदक
एक प्रश्न आहे
बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे
त्या पूर्वी तुम्ही बँकेला तशा प्रकारच्या सुविधांसाठी सांगितलेले
In reply to बँकेवर ग्राहक न्यायालयाकडे by विजुभाऊ
बँकामधे हे पूर्वीपासून आहे
अगदी एखादा अकांउंट एन पी ए
In reply to बँकामधे हे पूर्वीपासून आहे by पैसा
जबाबदारी निश्चित होतेच
In reply to अगदी एखादा अकांउंट एन पी ए by प्रसाद१९७१
लहान कर्जे वसूल करून घेतात.
In reply to जबाबदारी निश्चित होतेच by पैसा
असली कर्ज मंजुर करण्यात्
In reply to लहान कर्जे वसूल करून घेतात. by प्रसाद१९७१
सांगता येणार नाही.
In reply to लहान कर्जे वसूल करून घेतात. by प्रसाद१९७१
खरंच वसुली होते
Bad loans written off in the last 13 years Rs. 2,04,000 crores
आणि हे जर खरे असेल तर सामान्य नागरिकांचे किती पैसे हडपले गेले आहेत या बँकाचे शेअर होल्डर आणि कायदेतज्ञ /सल्लागार/ विचारवंत कसे मूग गिळून गप्प बसले आहेत. मिपा जाणकारांनी प्रकाश्/कंदील्/दिवा दाखवावा मुकाट वाचक नाखुह्या चोराच्या उलट्या बोंबा
In reply to खरंच वसुली होते by नाखु
त्यांच्या बरोबर मजा मारत होती
In reply to ह्या चोराच्या उलट्या बोंबा by प्रसाद१९७१