विश्वाचे आर्त - भाग १५ - १३० दाण्यांची द्रौपदीची थाळी
लेखनप्रकार

वाचने
9884
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
उत्तम
वा! छान लिहिलेय. द्रौपदीच्या थाळीची उपमा आवडली.
वाह.. क्या बात है. मस्त.
शेवटून दुसरा परिच्छेद अतिशय रोमांचक!
आपल्या मेंडेलच्या प्रयोगाप्रमाणे तंतोतंत घडलेले होते. उंचपणाचा गुणधर्म प्रभावी होता, त्यामुळे पहिल्या पिढीत सर्व उंच झाडे असली तरी त्यांमध्ये बुटकेपणाचा गुणधर्म सूप्तावस्थेत होता. पुढच्या पिढीत - पिढी२ मध्ये - जिथे दोन्ही पालकांकडून बुटकेपणाचा गुणधर्म आला तिथे ती झाडे बुटकी होती. हा एक-चतुर्थांश दिसल्यावर लगेच शास्त्रज्ञांना लक्षात आले की हा बुटकेपणाचा एक जीन आपण वेगळा करून तो एकत्र करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. या पिढी२ मधली सर्व उंच झाडे सोडून देऊन पिढी३ तयार केली गेली. यातली २९८ रोपे निवडून त्यांच्या दाण्यांपासून विशिष्ट रांगांमध्ये रोपे लावली गेली - पिढी४. यातल्या २८८ व्या रांगेतले तिसरे रोप सर्वोत्तम ठरलं, आणि त्याला नाव पडले IR8-288-3. याच रोपापासून पुढची बियाणे तयार केली गेली. हाच तो सुप्रसिद्ध IR8! यापासून खत न घालता हेक्टरला पाच टन, तर योग्य खतपाण्यानंतर हेक्टरला दहा टन पीक निघाले. त्याकाळी सर्वसाधारणपणे हेक्टरला एक टन पीक यायचे. तसंच १६० ते १७० दिवसांऐवजी १३० दिवसातच पीक मिळायला लागले. हे बियाणे जगभर फुकटात उपलब्ध करून दिले गेलं, आणि भाताच्या बाबतीत हरितक्रांती घडली.
जेनेटीक्स समजून घेण्यासाठी मेंडेलच्या प्रयोगाची पारायणे केली होती. मात्र त्याचा भातशेतीमध्ये व्यवहारी वापर झाला आहे हे माहिती नव्हते.
प्रश्न विचारले, त्यांचा पाठपुरावा केला, आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला की उत्तरे मिळतात.वा!! सुंदर!
एक्झॅक्ट १/४ रोपं पिवळी का निपजली हे नाहि कळलं. डॉमीनंट्+रिसेसीव्ह च्या दोन जोड्यांचा संकर केला तर सतत डॉमीनंट गुणच प्रभावी ठरण्याची शक्यता नाहि का? नेमकं २५% संततींमधे रिसेसिव्ह गुण का आला?
In reply to नाहि कळलं by अर्धवटराव
तुमच्या प्रश्नाचे उत्तर लेखतल्या खालील परिच्छेदात आहे:
आता आईकडून कुठचातरी एक आणि वडिलांकडून कुठचा तरी एक असा गुणधर्म पुढच्या पिढीत जात असेल तर त्यांची चार संतती पुढीलप्रमाणे असेल. हि. हि, हि. पि., पि. हि., आणि पि. पि. हिरवा प्रभावी असल्यामुळे पहिले तीन हिरवेच होणार मात्र चौथ्यात दोन्ही पिवळे असल्यामुळे त्याच्या शेंगा पिवळ्या दिसतात. चारऐवजी जर शेकडो संतती असतील तर सरासरी एक चतुर्थांश झाडांना पिवळ्या शेंगा दिसतील.In reply to तुमच्या प्रश्नाचे उत्तर by डॉ सुहास म्हात्रे
सगळ्या हि-पि अपत्यांमधे पिवळ्या शेंगा येण्याची प्रॉबॅबीलिटी जर केवळ २५% टक्के असेल तर सरासरी १/४ झाडांना पिवळ्या शेंगा का येत असाव्या ? नॅचरल सिलेक्शन होताना २५% प्रॉबॅबिइटी सरासरी १/४ शी मॅच करावी हे थोडं अजब वाटतं ना??
In reply to माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. by अर्धवटराव
इथे थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे.
पिढी पहिली - प्यूअर हिरव्या आणि पिवळ्यांची मुलं. त्या सर्वांत एक हिरवं एक पिवळं अशी जनुकं असतात. ती सगळी हिरवी दिसणार, कारण हिरवा जीन डॉमिनंट आहे.
पिढी दुसरी - या मुलांचा एकमेकांशी संयोग केला की आई आणि वडील या दोघांमध्ये एक हिरवं एक पिवळं असणार. त्यामुळे जर त्यांच्यापासून शंभर मुलं जन्माला घातली तर त्यातल्या फक्त पंचवीसांमध्येच दोन्ही पिवळे असणार. त्यामुळे सुमारे ७५ हिरवी आणि पंचवीस पिवळी दिसतील. (खाली ऑर फंक्शनचं ट्रुथ टेबल दिलेलं आहे त्यात १ म्हणजे हिरवा आणि ० म्हणजे पिवळा असं समजावं).
In reply to इथे थोडं स्पष्टीकरण आवश्यक by राजेश घासकडवी
पण का?
तेव्हढं सुद्ध नको ना. तिसर्या पिढीतल्या प्रत्येक अपत्यामधे पॅरेण्ट्सकडुन गुणसुत्र उचलण्याची प्रॉबॅबिलिटी इंडीव्हिज्युअली अप्लाय होईल. प्रत्येकाला १-१ हिरवा आई-वडिलांपासुन १-१ पिवळा परत त्याच आईवडिलांपासुन आला असेल. त्याच्या भावंडाने कुठले गुण उचलले याच्याशी काहिही कर्तव्य नसेल. उपलब्ध चार गुणांपैकी कुठला रंग दाखवायचा याचा निर्णय प्रत्येक शेंग स्वतंत्र घेईल. आणि तिथे ७५% शक्यता हिरव्या रंगाची असेल. त्यामुळे सरासरी २५% पिवळा येणं कठिण असावं ??
In reply to नाहि कळलं by अर्धवटराव
ते थोडंसं ऑर फंक्शनसारखं असतं.
१ ऑर ० = १,
० ऑर १ = १
१ ऑर १ = १
० ऑर ० = ०
म्हणजे आईवडिलांपैकी ते जनुक आलं तर दोन्हीकडून ० येईल तेव्हाच उत्तर ० येतं. हे रॅंडमली होत असेल तर २५% बाबतीत शून्य (रिसेसिव्ह गुण) दिसून येईल.
In reply to ते थोडंसं ऑर फंक्शनसारखं असतं by राजेश घासकडवी
पण ऑर गेट चे इन्पुट्स नॅचरल सिलेक्शन ने होत आहेत, टॅब्युलर डाटाप्रमाणे नाहि. प्रत्येक अपत्यामधे इंडीव्हिज्युअली तीन वि. एक असा सामना असेल तर बहुतेक वेळा तीन ने जिंकायला हवं... सरासरी २५% का येते आहे?
याची निगेटिव्ह साईड नाही का काहीच? फेवरेबल पीक आलं हे उत्तमच. पण काही इतर गुण,क्षमता वगैरे नाहीश्या होणं, काही छुपे अवगुण वाढीस लागणं किंवा परतीची वाट नाहीशी होणं असं काही संभव कितपत?
In reply to याची निगेटिव्ह साईड नाही का by गवि
प्रत्येकच गोष्टीचे काही ना काही निगेटिव्ह साइड इफेक्ट्स असतात. शंभर रुपये पॉझिटिव्ह मिळण्यासाठी आपण दोनपाच रुपये खड्ड्यात जायला तयार असतो. मात्र या बाबतीत बिलियन लोकांना अन्न पुरवण्याच्या पॉझिटिव्हच्या तुलनेत अगदीच नगण्यही निगेटिव्ह माझ्या एेकिवात नाहीत. नाही म्हणता त्या काळात डीडीटीचा अतिरेकी वापर केला गेला, त्याचे काही वाईट परिणाम झाले हे ऐकून आहे.
परतीची वाट नाहीशी झालेली आहेच. आताच्या काळात जुनी बियाणं लावून हेक्टरी एक टन उत्पादन परवडणारं नाही. त्यामुळे नवीन तांदळांंत जे काही बरंवाईट आहे ते स्वीकारणं भाग आहे.
लेख मस्त आहे.
पण कहीतरी गडबड होते आहे.
मागच्या लेखात,
१९६० साली इंडियन राइस रीसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. संशोधनासाठी जगभरातून हजारो जाती मागवण्यात आल्या. त्यांमधले सर्वोत्तम गुणधर्म असलेल्या जाती शोधणे, त्यांच्यात संकर घडवून आणणे आणि त्यांचा अभ्यास करून योग्य ते गुणधर्म असलेली भारताच्या भौगोलिक परिस्थितीत टिकून राहील अशी जात शोधून काढणे हे कर्मकठीण काम होते. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि IR8 नावाची जात जन्माला आली.यावरुन IR8 भारतात जन्माला आली असे वाटले (अर्थातच अभिमानाने छाती फुगून आली) पण आता तुम्ही फिलिपिन्स म्हणत आहात...
In reply to लेख मस्त आहे. by मराठी कथालेखक
माफ करा, त्या लेखात मी चुकीचा फुलफॉर्म वापरला. गोंधळ होण्याचं कारण असं की हरितक्रांतीसाठीच्या संशोधनाला भारतात सुरूवात झाली. १९४९ साली कटकमध्ये युनायटेड नेशन्सतर्फे एक बियाणं सुधार कार्यक्रम हाती घेतला गेला होता. त्यातही अशाच प्रकारचं संशोधन झालं होतं. त्यात भारतीय शास्त्रज्ञांना एडिटी-२७ आणि महसुरी अशा दोन जाती निर्माण करण्यात यश आलं होतं. हरितक्रांतीचा पहिला टप्पा एडिटी-२७ वर पार पडला. त्यामुळे हरितक्रांतीच्या कथेची सुरूवात भारतात झाली आणि पुढचा प्रवास फिलिपीन्समध्ये झाला असं म्हटलं जातं.
In reply to माफ करा, त्या लेखात मी चुकीचा by राजेश घासकडवी
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
एडिटी-२७ मध्येही इतक (पाच टन प्रति हेक्टर) उत्पादन मिळायचं का ?
आणि आता आपण जे सहसा पहातो ते बासमती, इंद्रायणी, HMT हे सगळे ir8 वरुन पुढे विकसित झालेत का ?
त्यामुळे हरितक्रांतीच्या कथेची सुरूवात भारतात झाली आणि पुढचा प्रवास फिलिपीन्समध्ये झाला असं म्हटलं जातं.हुश्श..छाती पुन्हा थोडी फुगली
एकंदरीत असं म्हणता येईल का की तांदळाच्या कोणत्यातरी मूळ जातीत भरपूर उत्पादनाची क्षमता होती मात्र त्याचवेळी ती झाडे उंच असल्याने माना टाकत आणि क्षमता असूनही जास्त उत्पादन घेता येत नसे.
कारण "भरपूर उत्पादनाची" क्षमता मूळात कुठेतरी असल्यानेच पुढे संकरित जातीत आणता आली असेल ना ? कारण थेट जनुकीय फेरफार त्यावेळी तरी होत नसावे.
तसेच आता प्रयोगशाळेत थेट जनुकीय फेरफार शक्य असल्याने probability theory वर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली असेल ना ?
मेंडेलच्या प्रयोगामुळे हे सिद्ध झाले की संततीमध्ये जाताना, आईवडिलांचे गुणधर्म एकमेकांत मिसळत नाहीत. म्हणजे दोन रंग मिसळून जाऊन मधला रंग तयार व्हावा असे होत नाही. तर अनेक बाबतीत एकतर आईचा किंवा एकतर वडिलांचा असे गुणधर्म येतात.एक पाश्चात्य विनोद आठवला. एका कुणा अत्यंत हुशार पण कुरुप अशा लेखकाला एका अतिशय सुंदर तरुणीने लग्नाची मागणी घातली , ती म्हणाली "आपण लग्न करुया. आपल्याला होणारी मुले माझ्यासारखी सुंदर आणि तुमच्यासारखी बुद्दिमान असतील." त्यावर हजरजबाबी लेखकाने उत्तर दिले "पण त्याऐवजी ती माझ्यासारखी कुरुप आणि तुझ्यासारखी निर्बुद्ध झालीत तर ?"
पुढे जावून गहू, तांदूळ वा इतर धान्ये यांचा आपसात संकर झाला तर ?
कदाचित एकच धान्य (वा पदार्थ) खावून आपल्याला आवश्यक ती अनेक जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने ई मिळू शकतील.
मला वाटतय तो दिवस पण फार दूर नाही.
छान लेख !!
उत्कृष्ट लेख.
प्रतिसादांमधली चर्चा पण आवडली.
लेखमाला सुरेख सुरु आहे.
याची निगेटिव्ह साईड नाही का गवि - Thu, 21/01/2016 - 14:09 याची निगेटिव्ह साईड नाही का काहीच? फेवरेबल पीक आलं हे उत्तमच. पण काही इतर गुण,क्षमता वगैरे नाहीश्या होणं, काही छुपे अवगुण वाढीस लागणं किंवा परतीची वाट नाहीशी होणं असं काही संभव कितपत?ह्याबद्दल बोलावंसं वाटलं. काही दिवसांपूर्वी एका संस्थेबद्दल ऐकलं होतं. मधुमेह /डायबेटिस हा पूर्ण परतावून लावता येउ शकतो; मधुमेहाच्या गोळ्या किम्वा इन्शुलिन इंजेक्शन जे घेतात त्यांचं इंजेक्शन घेणं पूर्णतः थांबवता येउ शकतं; असे दावे संस्थेनं केले. हे सरळ सरळ "आल्टरनेट मेडिसिन " म्हणता यावं असं होतं. म्हणजे "मॉडर्न मेडिसिन" मध्ये (तथाकथित "अॅलोपथी" मध्ये ) मध्ये कदाचित बसणार नाही. त्यांनी कित्येक पेशण्ट्स बरे झाल्याचे दावे केले. त्यांनी चक्क जी टी टी -- ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट मध्ये सुद्धा यश मिळवलं. ही टेस्ट म्हणजे ऑल्मोस्ट मधुमेह पूर्णतः परतवल्याची पावती असते. सुमारे ( तब्बल) पंधरा एक चमचे साखर खायला साम्गतात; त्यानंतर दोन तासानं रक्तातली साखर वगैरे तपासतात . तर अशा ह्या टेस्टमध्ये हे लोक यशस्वी झाले. . . ह्यातून मला मिपा आणि उपक्रमावर लिहिलेली नरेंद्र गोळे ह्यांची लिहिलेली मालिका आठवली. त्यांनी हृदयविकार की हाय ब्लड प्रेशर कसे पूर्णतः परतवून लावले ; ह्याबद्दल त्यात लिहिले होते. सहसा ब्लड प्रेशर व डायबेटिस एकदा मागे लागले की जन्मभर तस्सेच राहणार अशीच मानसिकता दिसते. असो. तो मूळ मुद्दा नाही. . . ह्या थेरपी मध्ये बर्याच गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. त्यातील एक महत्वाचा मुद्दा होता; आप्ण खात असलेल्या गव्हाचा वापर संपूर्णतः बंद करणे. त्याऐवजी "खपली गहू" म्हणजेच " लाँग व्हीट " वापरणे. सध्या रुढार्थाने आपण सगळे जो गहू खातो; तो बाय डिफॉल्ट हरित क्रांतीतून आलेला गहू आहे . भरपूर उत्पादन क्षमता असणे , कमी पाणी लागणे ; कापणी वगैरे सोयीची असणे; अशा कारणातून ह्या हरित क्रांतीनंतरच्या हायब्रीड गव्हाचा प्रसार झाला . त्यापूर्वी बाय डिफॉल्ट गहू म्हणजे खपली गहू असेच समीकरण होते. तो गहू आज अत्यल्प ठिकाणी मिळतो. प्रचंड शोध घेतल्यानंतर आख्ख्या पुण्यात फक्त दोन किंवा तीन दुकाने साप्डली. अगदि कोपर्यावरच्या मारवाडी दुकानांपासून ते मोठ्या मंडईपर्यंत सर्वत्र शोधले. तीन शे चारशे दुकानं पालथी घातली असतील. अर्थात काही नेहमीचे आक्षेप म्हणजे संस्था कशाच्या ओरावर दावे करते आहे; वगैरे म्हणता येइल. तर त्यासाठी त्यांनी आधुनिक विज्ञानाल मान्य होतील असा सांख्यिकीय डेटा जमवायला सुरुवात केलेली आहे. मला ह्याबद्दल समजलंं; तेव्हा माझ्या एका परिचित मधुमेहिंना मी ह्याबद्दल सांगितलं. त्यांचाही विश्वास बसेना. दाव्यातील सत्यता पडताळण्यासाठी ह्याचा कुणी लाभ घेतला आहे का; हे आम्ही शोधू लागलो. मिपाचेच एक माजी संपादक ह्याचा अनुभव घेतलेले आहेत; असे समजले. ते दहाहून अधिक वर्शे इन्शुलिन घेत होते; इतका त्यांना प्रॉब्लेम होता. ह्या थेरपीचे कडक पालन केल्याने दोनेक महिन्यात त्यांचे इन्शुलिन पूर्णतः थांबले. आणी लवकरच गोळ्याही थांबल्या. . . मी परिचिताला ह्याबद्दल ( मिपाच्या माजी संपादकांच्या अनुभवाबद्दल) सांगितलं. परिचितांनी थेरपी सुरु केली. परिचितांना मधुमेह होउन दोनेक वर्षे झाली होती. आता त्यांचा मधुमेह ऑल्मोस्ट गेल्यात जमा आहे. ( HBA1C 6.1 आलेली आहे.) तर मी ज्या संस्थेबद्दल बोलत होतो तिची अधिक माहिती इथे मिळेल :- http://www.freedomfromdiabetes.org/Program . . ह्या संस्थेतील लोक नवीन काहीही सांगत नाहियेत. त्यांचे बहुतांश उपाय हे नील बर्नार्ड ह्या शास्त्रज्ञाच्या संशोधनावर आधारित आहेत. फक्त त्या़ंनी त्याचं भारतास / भारतीयांस अधिक अनुकूल असं रुपडं बनवलय. नील बर्नार्ड ह्यांची अधिक माहिती :- https://en.wikipedia.org/wiki/Neal_D._Barnard . . काही प्रमाणात Dean Michael Ornish ह्यांचीही स्कूल ऑफ थॉट्स हे लोक आचरीत असल्याचं दिसलं . . नवीन मिळणारी हल्लीची कोणतीही प्रजाती लोकवन असो किम्वा अजून कोणतीही ; ही मुळात अस्सल स्थानिक, भारतीय पारंपरिक प्रजाती नाहिये म्हणे. हायब्रीड आहे. तर ह्या हायब्रीड मध्ये काही त्रासदायक असे गुणधर्म आलेत (किंवा उपयुक्त गुणधर्म त्यातून निघून गेलेत) . ह्या हरवलेल्या गुणधर्मांमुळे सगळ्यांना नव्हे; पण कित्येकांना मधुमेहाचा धोका कैकपट वाढलाय. . . प्लीझ नोट:- १. हा प्रकार सध्या मेनस्ट्रिम मध्ये नाहिये; आधुनिक वैद्यकशास्त्र नाहिये; असे म्हणणे असेल तर ते मान्य आहे. आधुनिक वैद्यकास मान्य होण्यासाठी कित्येक निकष असतात; त्यातला सांख्यिकीय निकष, प्लासिबो बरोबर तुलना वगैरे सगळ्याची कल्पना आहे. "फ्रीडम फ्रॉम डडायबेटिश्या संस्थेतली लोकं; आधुनिक वैद्यकास ( अॅलोपथीस) मान्य होइल अशी रचना , रिसर्च पेपर बनवत आहेतच. सर्व रुग्णांची माहिती; मेडिकल रिपोर्ट्स ते जमवताहेत. . . २. हे सगळं सांगतोय म्हणजे हरित क्रांती ; हायब्रीड, नॉर्मन बॉरलॉग वगैरेंना नाकारत नाहिये. तातडीचा, महत्वाचा प्रश्न हा अन्न/भूक हा आहेच; हे मी जाणतो. खरं तर बोरलॉग, हरित क्रांती वगैरेला माझ्या सर्टिफिकेटचीही गरज नाहिये; फक्त मी भ्रमात नाहिये; इतकच सांगायचं आहे. (खपली गहू हा सामान्य गव्हाच्या चौपट ते पाचपट किमतीस मिळतो; ह्यावरुन काय तो अंदाज बांधावा.)
In reply to विरजण घालायचा उद्देश नाही by मन१
मला वाटते हायब्रीड जाती ज्या मूळ जातींपासून विकसित झाल्यात त्या पुर्णपणे नष्ट होवू देवू नये. तसेच त्या जातीच्या मुळ गुणधर्माची , वैशिष्ट्यंआची चाचणी होत राहणे आवश्यक आहे असे मला वाटते.
म्हणजे कालांतराने संशोधनातून , अनुभवांतून , सांख्यिकीतून मूळ जाती तसेच संकरित जातींचे गुण्/अवगूण समोर आल्यास पुन्हा काही प्रयोग करुन संकरित जाती अधिक सुधारता येतील.
प्रत्येक देशाने आपल्या मुख्य पिकांच्या पारंपारिक जाती निदान काही एकरांवर जतन करीत रहाणे शहाणपणाचे ठरेल.
छान लेख