विश्वाचे आर्त भाग १३ - 'आहे' आणि 'असावं'
लेखनप्रकार

वाचने
7699
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
नैतिकतेची नैसर्गिकपणापासूनची फारकत समजाऊन सांगणारा लेख आवडला. बहुतेक वेळेस नैतिक अधिष्ठान शोधू पाहणार्यांचे हेतू हे तद्दन अनैतिक आणि स्वार्थी असतात असेच सामान्यतः दिसून येते. या पार्श्वभूमीवर, निसर्ग कसा तटस्थ असतो व त्याचे नियम हे प्रत्यक्षात त्याला नियंत्रित करणारे असतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण आवडलं.
'केवळ नैसर्गिक म्हणून नैतिक' इतका सरळ संबंध लावता येत नाही
हे सगळ्यांना माहिती आहे.
त्यासाठी काय करावं हे सुजाण मानवी समाजाने ठरवायचं असतं.
म्हणजे नक्की काय करावं?
In reply to फक्त एका वाक्यासाठी फुले लेख लिहीला आहे by विवेक ठाकूर
.
गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण फारच जबरदस्त होतं.
(आपण अशा जागी आहात की केवळ आपण लिहिलं म्हणून वाचलं जातं, हे आपल्याला माहित असेलच. विनंती अशी आहे की आपण आपले लेख जरा काटेकोरपणे एडीट करायचा विचार करा. हा लेख जरा लहान होउ शकला असता. खरं म्हणजे या मालिकेतले सगळेच लेख वाचल्यावर असं वाटत राहिलेलं आहे. )
In reply to गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण फारच by असंका
क्लिष्ट कल्पना सोप्या करून सांगायच्या तर स्पष्टीकरणासाठी आणि उदाहरणांसाठी अधिकचे शब्द हवेतच.
मला तर वाटते की आधीचे काही लेख अधिक मजकुराचे हवे होते.
राजेशजींनी वेगवेगळया लेखांतुन दिलेली एकुण ३ उदाहरणे असामान्य बिनतोड युक्तिवादाचा नमुना आहेत.
१- ब्रेल लिपी च उदाहरण ( माझ सर्वात आवडत )
२- स्वेटर थिअरी उदाहरण
३- वरील गुरुत्वाकर्षण उदाहरण
उदाहरणकार घासकडवी म्हणुन भविष्यातली आंतरजालीय पिढी त्यांची आठवण काढेल.
वरील आक्षेपाशी असहमत घासकडवींचा माझ्या अंदाजानुसार प्रत्येक लेखाचा मुळ खर्डा किमान दुप्पट साइझ चा नक्कीच असेल तो एडीट त्यांनीच करुन निम्म्यावर आणला असेल मला खात्री आहे.
अजुन कात्री उलट चालवु नये
In reply to राजेश घासकडवींची ३ उदाहरणे असामान्य आहेत. by मारवा
सहमत. उदाहरणं एकदम चपखल आहेत. ते युवतीच्या चित्रावर झेरॉक्समध्ये तीळ येऊन ती अजूनच छान दिसणं हे उदाहरणं विशेष आवडलं होतं.
आवडला.
अनेकांनी लेखांच्या लांबीबद्दल प्रतिसाद दिलेला आहे. आधीच लिहिल्याप्रमाणे ही लेखमाला वर्तमानपत्रासाठी लिहितो आहे त्यामुळे सुमारे बाराशे शब्दांची मर्यादा येते. त्यामुळे उत्क्रांतीसारखा मोठा विषय हाताळणं जरा कठीणच जातं. त्या विषयाचे लहान लहान तुकडे करून एकेका लेखात एक संकल्पना सांगणं हा हेतू आहे. दर आठवड्याला लेखन येत असल्यामुळे क्रमशःचा पर्यायही नाही. तेव्हा प्रत्येक लेख हा एक स्वतंत्र निबंध व्हावा असा प्रयत्न करावा लागतो. काही वेळा एखादी संकल्पना इतकी मोठी असते की बाराशे शब्दांत मावत नाही. तर काही वेळा ती बरोबर बसते.
या लेखात मला डिस्क्रिप्टिव्ह विरुद्ध प्रिस्क्रिप्टिव्ह हा मुद्दा प्रामुख्याने मांडायचा होता. त्याचबरोबर 'हिटलरने उत्क्रांतीची तत्त्वं वापरली आणि बघा त्यातून काय निपजलं ते!' असं म्हणणारांनाही उत्तर द्यायचं होतं. आणि शेवटी 'निसर्ग केवळ असतो, त्याची इच्छा म्हणून काही नसते' हे लेखमालेतलं सूत्रही त्यात येऊ द्यायचं होतं. तसंच उदाहरणं दिली की क्लिष्ट असो वा सोपी असो, संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते.
माझी विनंती अशी आहे की ही संपूर्ण लेखमाला एक पुस्तक वाचतो आहोत अशा पद्धतीने वाचून पाहावी. आत्तापर्यंत एखाद्या पुस्तकाची सुमारे पस्तीस पानं भरावीत इतका मजकूर झालेला आहे. मला शब्दमर्यादा नसती तर याच विषयांवर कदाचित यापेक्षा जास्त मोठं लिखाण झालं असतं असं मला वाटतं.
एकंदरीत सस्तन प्राण्यांमध्येच जोडप्याने राहाण्याची प्रथा कमी प्रमाणात - फक्त सुमारे ४% प्रजातींमध्ये असतेहे प्राणी कोणते ? तसेच काही प्राण्यात दिसणार्या काही विशिष्ट प्रवृत्तींबद्दल त्या तशा का असू शकतील (जनूकीय वा उत्क्रांतीवादाच्या भूमिकेतून) हे सुचवू शकाल काय ? १) मांजर, वाघ , सिंह या जातीत नर हा दुसर्या नरावर हल्ला करुन त्यास मारु पाहत असतो. परिसरातील सर्व माद्यांना होणारी पिल्ले ही आपलीच असावी ही प्रेरणा असेल हे मी समजू शकतो. पण ही प्रेरणा नेमकी का निर्माण झाली असावी ? आणि सगळ्याच प्राण्यात विशेषतः कळपात रहाणार्या प्राण्यांत अशी प्रवृत्ती का नसते ? २) एका कीटकाच्या जातीत (बहूधा प्रार्थना कीटक) मादी समागमानंतर नरालाच खावून टाकते ? असे का ? त्याच नरापासून अधिक अपत्ये तिला नको असतात का ? ३) तसेच माणसांप्रमाणे जवळच्या नात्यांत [आई/बाप आणि भिन्नलिंगी अपत्य वा भिन्नलिंगी भावंड] सहसा संबंध न प्रस्थापित करणारे अजून कोणते प्राणी आहेत का ?
In reply to काही प्रश्न by मराठी कथालेखक
हे प्राणी कोणते ?Of the roughly 5,000 species of mammals, only 3 to 5 percent are known to form lifelong pair bonds. This select group includes beavers, otters, wolves, some bats and foxes and a few hoofed animals. इथे संपूर्ण लेख वाचायला मिळेल. जोडीदार निवड ही नैसर्गिक निवडीचा मोठा हिस्सा आहे. त्यासंबंधी एक लेख लवकरच येईल. मात्र थोडक्यात सांगायचं झालं तर प्राण्यांच्या बाबतीत शुक्रजंतू पुरवणारे आणि अंडं पुरवून अर्भकाच्या वाढीची जबाबदारी घेणारे अशी दोन लिंगं आहेत. त्यांच्यात असलेल्या या असिमेट्रीपोटी त्यांच्या लिंगभूमिका ठरतात. दोन्ही लिंगं आपापला फायदा पाहातात - त्यातून नर निवडण्याचा मादीचा अधिकार, चटकन संभोगाला तयार असण्याची नरांची प्रवृत्ती, नरांमध्ये होणाऱ्या मादीसाठीच्या लढाया या अनेक गोष्टींचा उलगडा होतो. १. आसपास आपली अपत्यं असावीत याहीपलिकडे आपण कुटुंब सांभाळण्यासाठी जे कष्ट घेऊ त्यातून आपलीच जनुकं पुढे जावीत अशी स्ट्रॅटेजी असते. हा जागृत विचार होत असेलच असं नाही. पण अशी स्ट्रॅटेजी घेणारी शरीरं जी जनुकं बनवतात ती पुढे जातात. २. हे कोळ्यांच्या अनेक जातींमध्ये दिसतं. पुन्हा निव्वळ शुक्रजंतू पुरवणारा नर त्या कोळिणीसाठी अन्न म्हणून उपयोगाला येतो. जोपर्यंत आपली जनुकं पुढे जाण्याची जवळपास खात्री नराला असते, तोपर्यंत त्यासाठी तो हा धोका पत्करतो. जे प्राणी कळपात राहात नाहीत, किंवा सामाजिकदृष्ट्या एकपती/पत्नी व्रत पाळत नाहीत त्यांच्यासाठी त्याच नराकडून अधिक अपत्यं मिळण्याची गरज राहात नाही. ३. प्राण्यांमध्ये इन्सेस्ट हा तितका टॅबू नसला तरी काही प्राण्यांमध्ये तो टाळण्यासाठी काही प्रथा आहेत. हाईनांमध्ये माद्या फक्त त्यांच्या कळपात ज्यांचा अलिकडेच जन्म झालेला आहे किंवा जे नर बाहेरून कळपात आलेले आहेत अशांबरोबरच समागम करतात. त्यामुळे आपोआपच वडील आणि भावंडं टाळली जातात. लेमूर एकमेकांच्या लिंगांचा वास घेऊन ठरवतात - जवळच्या नात्यांमध्ये तो वास निर्माण करणारी जनुकं सारखी असतात. तर उंदीरदेखील अंगाच्या वासावरून कोण आपल्यासारखाच आहे हे ओळखू शकतात. प्रयोगशाळेत असं दिसून आलेलं आहे की जर तुम्ही उंदीर भाऊ-बहिणीला एकत्र ठेवलं तर नाईलाजाने ते पिलावळ निर्माण करतात. पण जर तिथे बिननात्याचा दुसरा नर ठेवला तर ती मादी त्याला स्वीकारते. इतकंच नाही तर नवीन उंदीर येण्याअगोदर ती गरोदर झालेली असते तर ती गर्भपात घडवते (कशी हे नक्की माहीत नाही) आणि नवीन उंदरापासून पिलं होऊ देते.
In reply to हे प्राणी कोणते ? by राजेश घासकडवी
हे कोळ्यांच्या अनेक जातींमध्ये दिसतं. पुन्हा निव्वळ शुक्रजंतू पुरवणारा नर त्या कोळिणीसाठी अन्न म्हणून उपयोगाला येतो. जोपर्यंत आपली जनुकं पुढे जाण्याची जवळपास खात्री नराला असते, तोपर्यंत त्यासाठी तो हा धोका पत्करतो.असे नर जगण्याकरिता मादीशी लढण्याचा प्रयत्न करुन असफल होतात की असा कोणताही प्रतिकार न करताच मादीच्या रुपातील मृत्यूला कवटाळतात ?
In reply to हे कोळ्यांच्या अनेक by मराठी कथालेखक
नरांसाठी अर्थातच बचेंगे तो और भी लडेंगे या न्यायाने समागम करूनही जीव वाचवणं केव्हाही आवडतं. मात्र अनेक वेळा समागमात ते जर अडकलेले असते तर तो अर्धा सोडण्याऐवजी जीव देणं पसंत करतात. त्यांच्या शरीराची रचनाच अशी असते की मादीने डोकं खाल्लं तरी उरलेलं शरीर आपला कार्यभाग साधत राहातं.
In reply to नरांसाठी अर्थातच बचेंगे तो और by राजेश घासकडवी
मला वाटतंय मी याच विशिष्ट रचनेला कारणीभूत जनुकामूळे परपीडन/स्वपीडन (सॅडिसम, मॅसोचिसम) या प्रवृत्ती (विकृती म्हणू शकतो हवं तर) मानवात विकसित झाल्या असतील. मात्र त्या प्रवृत्तीची तीव्रता कमी झाली (म्हणजे अगदी जीव घेतला जात नाही, पण इजा मात्र पोचवली जाते) आणि मादीकडे परपीडन व नराकडे स्वपीडन असे सरळसरळ विभाजन न होता दोहोंमध्ये दोन्ही प्रवृत्ती काही प्रमाणात निर्माण झाल्या असतील.
मानवाखेरीज अन्य कोणत्या प्राण्यात मर्यादित स्वपीडन्/परपीडन असेल का याचा शोध घेणे रंजक असेल.
निसर्गात विकृत संस्कृत असं काहीच असत नाही.आपण तत्वत: सर्व रचना विधात्याने हेतूपूर्वक केली आहे असे मान्य केले तर प्राणीमात्र व जड यात स्वत:चा नाश करून घेण्याची ताकद प्राणॆमात्रात जडा पेक्षा जास्त आहे हे विधात्याने ओळखून प्राणीमात्रात नीति अनीति चे द्वैत निर्माण केले असावे.
In reply to नैसर्गिकता व् नैतिकता by चौकटराजा
आपण तत्वत: सर्व रचना विधात्याने हेतूपूर्वक केली आहे असे मान्य केले तरनिर्मितीच्या प्रश्नाला उत्क्रांतीचं उत्तर असं आहे की कोणी निर्माता नाही, त्यामुळे त्याच्या हेतूचा प्रश्न उद्भवतच नाही. अणूरेणूंपासून पेशी तयार झाल्या - एकपेशीय जीवांपासून अनेकपेशीय जीव झाले - त्यानंतर त्या पेशींच्या समुच्चयांचा अवयव म्हणून वापर व्हायला लागला - आणि त्यांची क्लिष्टता वाढत वाढत आजची जीवसृष्टी दिसते आहे. किंबहुना जड पदार्थांमध्ये जो टिकाऊपणा असतो त्यापेक्षा एक वेगळा टिकाऊपणा सजीव सृष्टीत असतो. तो म्हणजे तो विशिष्ट जीव नाहीसा झाल्यावरसुद्धा त्याची प्रतिकृती (हुबेहुब नाही, पण गुणधर्मांचा संचय) नवीन पिढीत टिकून राहाते. नीती-अनीती या संकल्पनाही मनुष्य जितक्या प्रमाणात स्वतःला लावतो तितक्या प्रमाणात प्राणीजगतात कुठेही दिसत नाही. क्रौर्य आणि स्वार्थीपणाचा प्रचंड प्रभाव दिसतो. निःस्वार्थीपणाही दिसतो, आणि त्याचीही जनुकीय कारणं सांगता येतात.
In reply to आपण तत्वत: सर्व रचना by राजेश घासकडवी
जग हेतूपूर्वक चालत नाहीच म्हणूनच तत्वत: मानले तर असा शब्द वापरला. माझ्या सारखा निरिश्वर वादी सुद्धा काही वेळा असे बोलून जातो ते असे " त्याने जास्त चां गली माणसे निर्माण केलीयत म्हणून जग चालले आहे.त्यालाच काळजी जगाची "
लेख उत्तम.