यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा.
दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा. भारतात माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?
आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो.
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो.
ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. मार्केटिंगचा माणूस पण कमिशनवर अवलंबून असतो. माल विकला नाही तर खाणार काय? माझा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण एखादी नोकरी घेतो तेव्हा आपण एक रिस्क घेतच असतो की आपला पगार कसा असणार आहे ते? (फिक्ड की बदलणारा). And you cannot claim a bonus as a matter of right. पण तरीही मी म्हणेन की आयटीमध्ये बक्कळ पैसा मिळतो. आणि कष्टाच्या तुलनेत तर खूपच जास्त.
डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच).
या मताशी १००% नाही तर २००% सहमत. पण हा आयटी प्रोग्रामर किंवा टेस्टर चा दोष नाही तर Project मैनेजमेंट चा दोष आहे.
कंपनी क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(average). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात.
मॅन्युफॅक्चरींगमध्ये खूप जास्त भांडवल लागते, आय.टी. मध्ये खूपच कमी. मग तू एखादी कंपनी का सुरू करत नाहीस? आपण ज्या प्रमाणात रिस्क घेतो त्या प्रमाणात पैसे मिळणार ना? २ रा जास्त पैसे कमावतो, म्हणून आपण बोलतो (आयटी आणी बिगर आयटी) पण आपल्याला फक्त १ च बाजू दिसते (किंवा आपण १ च बाजू बघतो). बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का?
कमी कष्टात सगळ्यानाच पैसे हवे असतात, पण ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत किंवा अजिबातच नाहीत त्याना पैशाचे महत्व जास्त कळते. ज्याला जे जमते, जे पटते, ते त्याने करावे.
आपण इथे चर्चा आणी वादावादी करत बसलेलो असताना ते हैदराबादी लोक ट्रेनिंग घेऊन, खोटे resume बनवून नोकरी कशी मिळेल ते बघत असतील. काही वर्षानी मग आपण "हे गुलटी लोक इतके पुढे कसे गेले" या विषयावर चर्चा करू.
(आयटी. वाला) उदय
>>सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो
काहीच्या काही... आयटीमधे असणार्याला जर ४००००/- पगार असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चार्टर्ड अकाऊंटंटला १/३ म्हणजे १३३३३/- रुपये मिळतात. आणि जरी असं क्षणभर मानलं की असेल एखाद्या सी.ए. चा पगार कमी, तरीही १-२ उदाहरणावरुन सरसकट असं विधान नाही करता येत की सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो.
>>बिन-आयटीवाले कष्ट करत नाहीत का?
असं आत्तापर्यंतच्या प्रतिसादामधे कोणीही म्हटलेलं नाही.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
म.टा. वर वाचलं....
''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं...
...
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''
आय टी मधला जास्त पगार हा बहुतेक ग्राहक विदेशी असून ते डॉलर मध्ये पैसे देतात त्यातले अर्धे जरी इथल्या कम्पनीने दिले तरी भारतातील इतर लोकान्च्या पगारापेक्षा तो खूप जास्त दिसतो.
मी पण एक आय टी वालाच आहे.
आय टी वाल्यान्मुळे महागाई वाढली हे म्हणणे एकदम मान्य.
>>डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). <<
>>दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे. आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच.<<
>>अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!!
त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो...
आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! <<
जामच ओळखीचे वाटतायत वरचे तीनही मुद्दे. अर्थात शेवटचा पैशाचा उल्लेख सोडून. कुठे बरं ऐकलंय? अरे हो माझ्याच क्षेत्रात की. माझ्या बदनाम क्षेत्रात आम्ही सगळेच यातून जात असतो हो. कौतुक काय त्याचं? फक्त यातून जात असलो तरी पैसा मात्र कुणाच्या डोळ्यावर यावा इतका नाही मिळत. अर्ध्याहून अधिक ठिकाणी बुडतोच. सुरूवातीच्या काळात तर हे सगळं अति होत असतं आणि पहिला महिना संपताना पगार नाही पडत हो हातात. आणि हे काही नवीन नाही. त्याबद्दल तक्रारही नाही. अंगवळणी पडलंय. सगळे खाचखळगे, सगळे धोके, त्रास ह्या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवूनच आम्ही उतरतो या क्षेत्रात. कैक वर्षं हे असंच आहे. पण ते इतकं कौतुकाचं आहे हे आयटीवाल्यांमुळेच हल्लीच कळलं.
>>जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती.<<
इतका बिचारा सूर कशासाठी?
>>जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा. आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत.<<
आयटीवाले दुसर्यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले.
>>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे.<<
माझा वरचा मुद्दा सोदाहरण सिद्ध...
>>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्याच गोष्टी अवलंबुन असतात.<<
उदाहरण क्रमांक २
>>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं......
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''<<
संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी?
कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं. कारण अशी हार्डशिप करतानाही आपला उदरनिर्वाहच जेमतेम सावरू शकणारे, अत्यंत चांगल्या दर्जाचे, शिक्षित एडिटर्स, साउंड डिझायनर्स, कॅमेरामन, दिग्दर्शक मी सतत पहात असते. तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं. आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो. तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती.
(यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
>>''पूर्वी जो माणूस आपला संसार, आपलं वैयक्तिक आयुष्य, सुखसोयी-चैनी, अन्न, हास्य अशा सर्व भौतिक आणि ऐहिक गोष्टींचा त्याग करे त्या माणसाला 'संत' असं संबोधलं जायचं......
आता तसाच त्याग करणा-या माणसाला, 'आयटी प्रोफेशनल' म्हटलं जातं! ''<<
>>संत लोकांना पण पगार मिळायचे वाटतं यासाठी?
ज्यानी कोणी हे लिहीलं होतं ते केवळ विनोद म्हणून. हा विनोद मागे म.टा.मधे आला होता आणि प्रतिसाद देणार्यानि तो इथे सगळ्यांसोबत शेअर केला. कोणाचाच असा दावा नाहीये की आयटीवाले संत असतात.
>>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा.<<
कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे.
>>असो. तो वाद निराळा. पण कामातल्या हार्डशिपचं नको इतकं उदात्तीकरण वाचलं आणि विनोदी वाटलं.
तुम्ही केवळ एकच बाजु पहात आहात. आयटीवाले पैशाला पसारीभर मिळतात हे वाक्यही इथेच बोललं गेलं आहे. मी (आणि प्रतिसाद देणार्या मित्र-मैत्रिणींनी) केवळ त्यांना आपल्या क्षेत्राबद्दल काय वाटतं ते मांडलं आहे. कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधेच कष्ट घ्यावे लागतात. बाकीच्या क्षेत्रांमधेही कौशल्य लागतचं की.
>>तुम्हाला निदान नोकरी लागताक्षणी पगाराची खात्री असते. इथे सुरूवातीची ७-८ वर्ष (किमान.. कमाल कितीही!) तरी पैसा जमवणं अवघड असतं.<<
ती सर्व नोकरदारांना असते. चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई)
>>आणि शेवटी एकदा काम थांबवलं की संपलं बँकेतली गंगाजळी असते तोवर असते. रिटायरमेंट प्लॅन इत्यादी गोष्टींचा संबंध नसतो हो<<
आम्हाला तरी कुठे पेन्शन मिळतं? रिटायरमेंट प्लॅन कोणीही घेऊ शकतं. ती काही आयटीवाल्यांची मक्तेदारी आहे असं थोडचे? तुम्ही लोकंसुद्धा ह्यात पैसा गुंतवू शकता. त्यामुळे तुमचा हा मुद्दा अगदी निरर्थक आहे.
>>तेव्हा कामाचे प्रचंड तास, प्रोफेशनल हॅझार्डस इत्यादी गोष्टींचं कौतुक जरा जास्तच होतंय ते थांबवावं ही विनंती.
त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती.
>>(यावर सगळे आयटीवाले तुटून पडतील माझ्यावर पण आहेत ही माझी मतं त्याला कोण काय करणार?)
तुमच्या उत्तरांना दिलेली प्रत्युत्तरं म्हणजं तुटून पडणं खचितचं नाही. संवाद दोन्ही बाजूनी व्हायला हवा. खरं ना?
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
कॉमेंट केली आहे म्हणून विचारतो.
>>आयटीवाले दुसर्यांना तुच्छ लेखत नाहीत असं काही म्हणणं आहे का यातून? कारण वरच्या अनेक प्रो आयटी पोस्टस मधे इतरांबद्दल तुच्छता, काम काय ते आपणच करतो बाकीचे नाहीत असे सूर दिसले. <<
कुठल्या पोस्ट मधे कुठलं वाक्यात हे सूर दिसले. ते जरा नमूद करा प्लिज.
>>आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे.<<
यात तुच्छता का दिसली.? तुम्ही सोदाहरण वगैरे म्हणत आहात ते का? ते कळत नाही.
".."खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साल".." ही एका नॉन्-आय टी वाल्याची कॉमेंट आहे. मी एवढच म्हणालो की "
आपण सगळेच बुडणार्या जहाजात आहोत. सगळ्याच क्षेत्रात मंदी आली/येणार आहे. हे अश्या कॉमेंटस लिहणार्याला कळत आहे का?"
>>शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्याच गोष्टी अवलंबुन असतात.<<
>>उदाहरण क्रमांक २ <<
हे तर एक प्लेन स्टेटमेंट आहे..असं कुठलं क्षेत्र आहे की ज्यात तुमची क्षमता, कौशल्य, काहीही असु दे, तुम्हाला मानधन एकच मिळेल?
मला माहित नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करता, पण तुमच्या पेक्षा कमी मोबदला मिळणार्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? कौशल्य, क्षमता हाच फरक असेल ना? आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काही कष्ट घेतले असतीलच ना? मग तसं म्हणण्यात तुच्छता कसली आली आहे? ती फॅक्टच आहे ना?
राहता राहिला, समान कष्टांना मिळणार्या पैशाचा प्रश्न..आय. टी वाल्यां ना मिळणार्या पैशाबद्दल तुम्हाला दुस्वास नाही हे तुम्हीच म्हणत आहात. मग तुमचा मुद्दा काय?
आय. टी. वाल्यांनी त्यांना जाणवणारे कष्ट, प्रेशर नमूद केले तर चुकलं काय? तुमचं क्षेत्र कुठलं, त्यात किती कष्ट आहेत हे आम्हाला कसं माहीत असणारं? ते तुम्हीच लिहिलं पाहिजेत.
का तुम्हाला असं म्हणायचं आहे? की आय. टी. वाल्यांना भरपूर मोबदला मिळत आहे ना मग त्यांनी त्यांच्या कष्टा-प्रेशर बद्द्ल ब्र सुद्धा काढू नये? हाच जर मुद्दा असेल तर हा वाद इथेच संपला.
>>कोणाचे पगार डोळ्यावर येत नाहीयेत. पैशासाठीच सगळं काही असतं तर माझ्या क्षेत्रात येऊन दळीद्री सिरियल्सच्या दळणाला वाहून घेता आलं असतं. तेही केलं नाही कारण चांगलं काम करण्याची आच आहे. असो. तो वाद निराळा.<<
कोणी कुठले क्षेत्र निवडावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न/आवड आहे. तुमच्याप्रमाणेच प्रत्येकाला वाटतं की तो/ती जे काम करत आहे ते चांगलं आहे.<<
ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका.
>>कोणीही असा दावा केला नाही की आयटीमधेच कष्ट घ्यावे लागतात. <<
ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की.
>>चित्रपट/दूरचित्रवाणी माध्यम ह्यांची तुलना करणंचं चुकीचं आहे. मान्य की तुम्हाला पहिली ७-८ वर्षं संघर्ष करावा लागतो. तेवढा पिरीयड तुम्हीही गृहीत धरलाच असतो. पण सेटल झाल्यावर रगड्ड पैसा मिळतो की. आज एवढ्या मालिका वेगवेगळ्या वाहिन्यांवर अव्याहतपणे चालू असतात. त्यामुळे पुर्वीपेक्षा रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. एका वर्षात कितीतरी मराठी/हिंदी आणि इतर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित होतात. कलावंत/तंत्रज्ञ गुणी असेल तर त्याला यश मिळाल्यावाचून रहाणार नाही. (उदा: कला दिग्दर्शक नितीन देसाई)<<
आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान. आम्ही अनेक गोष्टी गृहित धरून उतरतो आमच्या क्षेत्रात आणि म्हणूनच तक्रार नसते पण वरती बघावं तर तुम्हा लोकांची कामाच्या वेळा आणि कामाचं प्रेशर याबद्दल तक्रार आणि उदात्तीकरण हेच चाललंय. त्यावर आक्षेप आहे. आणि केवळ तेवढ्यासाठी माझ्या क्षेत्राचं उदाहरण दिलंय. बर सेटल झाल्यावर रग्गड पैसा मिळतो हा विनोदच करताय तुम्ही. किती तंत्रज्ञांना मालिकांच्या जोरावर रग्गड पैसा मिळतो हे जरा सांगाल का? अक्षरशः २४ तास काम करतात ते हे बघता जो मिळायला हवा तसा फार कमी वेळा मिळतो. आणि त्यातही ४-४ महिने उशीर. पैसा बुडणे, दोन कामांच्या मधे बरेच महिने बिनाकामाचे बसून रहावे लागणे, पगारी रजा, इतर पर्क्स यातलं काहीही माहित नसणे हे सगळं धरून मग विचार करा रग्गड पैसा की काय ते. मराठी चित्रपट किती प्रदर्शित होतात आणि त्यातून कोणाचा नक्की किती फायदा होतो (तंत्रज्ञांचा तर नक्कीच नाही.) याचं गणित एकदा कधीतरी बसून सविस्तर समजावून सांगेन. तूर्तास ते तुम्हाला माहित नाहीये एवढं मान्य केलंत तरी पुरे आहे. कलावंत/ तंत्रज्ञ गुणी असेल तर यश मिळेल हे मला कळत नसेल कारण मी आयटीवाली नाही असा तर तुमचा समज नाही ना झाला? अहो गुणी माणूस यशस्वी होतो ते माहितीये. मुद्दा तो नाहीये ना. मुद्दा आहे आयटीवाल्यांनी 'आम्ही ग्रेट म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात. आमची हार्डशिप जास्त म्हणून इतरांपेक्षा जास्त पैसे मिळतात' असं मिरवण्याचा. यात प्रत्येक आयटीवाला हा गुणी आणि एक्स्ट्रॉऑर्डिनरी असतो म्हणूनच त्याला एवढा पगार मिळतो असं गृहितक मांडलेलं दिसतंय. मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत.
>>त्याचप्रमाणे ऊठसुठ आयटीवाल्यांना धारेवर धरणं थांबवावं ही आमची विनंती. <<
धारेवर मी धरलेलं नाही. तुमच्या बाजूने येणारी अनेक विधानं ही इतरांसाठी तुच्छतापूर्वक आणि तुम्हीच ग्रेट अश्या स्वरूपाची यायला लागली तेव्हा बोललेय. मिळणार्या पगाराच्या बळावर समाजातला एक गट इतर सगळ्यांना कमी आणि तुच्छ समजू लागतो , आपल्यापेक्षा कमी पैसा मिळणारा आपल्यापेक्षा कमी दर्जाचा असतो असं म्हणू लागतो तेव्हा अशी प्रतिक्रिया येणारच. तुम्हाला १० पट काय १००पट पगार मिळाला तरी कुणाला वाईट वाटणार नाहीये पण त्या बळावर एखाद्या शास्त्रज्ञाला, एखाद्या प्राध्यापकाला, एखाद्या चित्रकाराला, एखाद्या विचारवंताला, एखाद्या समाजसेवकाला कमी लेखणार असाल तर धारेवर धरलं जाणारच ना. प्रत्यक्षात तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः असं वागत नसालही नव्हे नसालच पण आयटीवाले ह्या लेबलखालचे अनेक जण असे वागतात हे तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो आमचा अनुभव आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
>>ज्या संदर्भात तुमचा हा प्रतिसाद आहे त्याबद्दल म्हणायचं तर माझा मुद्दा तुम्हाला सपशेल बाउन्सर गेलेला आहे. कळलेला मुळीच नाहीये. तेव्हा त्यात पडूच नका. <<
कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली.
>>ह्या शब्दात कोणी म्हणालं नाही पण 'आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत म्हणून आम्हाला जास्त पगार मिळतात' हा सूर वेगळं काय सांगतो हो? इतरांबद्दलची तुच्छता भरपूर दिसली वरच्या अनेक पोस्टस मधे. ती तशी पावलोपावली अनुभवायला मिळतेच की. <<
आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात.
>>आयटीवाल्यांना सर्व क्षेत्रातलं ज्ञान असतं आणी सर्वकाही माहित असतं आणि सगळं काही त्यांनाच कळतं असा त्यांचा समज असतो हे उदाहरणासहित सिद्ध करणारं हे विधान.<<
असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही.
>>मध्यम बुद्धीचे, मिडिऑकर म्हणता येईल असे कैक आयटीवाले माहीतीयेत की मला ज्यांनी आयुष्यभराचे पैसे १० वर्षातच कमावलेत.<<
त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली. <<
या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं.
>>आम्ही इतरांपेक्षा वरचढ आहोत असं कु़णीही आयटीवाला म्हणाला नाही. हे तुम्ही तुमच्या चष्म्यातुन बघत आहात.<<
वरती अनेक ठिकाणी हा सूर दिसून आलाय आणि अनेक असे भेटलेही आहेत पण तुम्ही म्हणता म्हणून केवळ माझा चष्मा इत्यादी!!
>>असं कोण म्हटलय हो? जे वाचतो, पाहतो, ऐकतो त्यावरुन सांगितलं आणि ह्याबाबतीत मी काही बोललोय ते चुकीचं आहे असं मला अजिबात वाटत नाही. <<
वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात
>>त्यात चुकीचं काय? त्यांच्या नशिबात होतं म्हणून त्यांनी कमावले. सामान्य दर्जाचे कलाकार सुद्धा रग्ग्ड पैसा कमवतातच की. पण आमची काही तक्रार नाही त्यांच्याबद्दल<<
आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही.
>>Finally I will be so matured that I will react to nothing.<<
पलायनवादाचे उत्तम उदाहरण.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
>>कळला नसेल तर तुम्ही समजावा. त्यात पडूच नका ही उद्धटपणाची भाषा झाली.
या चर्चेचा तो विषय असता तर समजावलं असतं. <<
मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला?
तसेच
>>Finally I will be so matured that I will react to nothing.
पलायनवादाचे उत्तम उदाहरण. <<
इथे देखील तुम्ही विषयांतर करत आहे. माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. केवळ विरोधासाठी विरोध ह्या भुमिकेतूनच तुम्ही अशी विधानं करत आहात.
१० वर्षात आयुष्यभराची कमाई करणं ह्यात काय वावगं आहे? आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही. मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे.
>>वाक्यातच विरोधाभास आहे. दुसर्या क्षेत्राबद्दल माहित नसतानाही तुम्ही बोलताय तेच बरोबर असं म्हणणं याला उद्धटपणाच म्हणतात<<
जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली...
>>आमची तक्रार आहे असं तुम्ही मानताय? वास्तविक तक्रार नाही हे ह्याच शब्दात आम्ही बोलून दाखवले आहे. त्यांच्या नशिबात होते म्हणून लायकी असो नसो कमावले पण म्हणून ते श्रेष्ठ ठरत नाहीत. वरती अनेकांनी इतरांपेक्षा वरचढ असणारे पगार कसे योग्यच आहेत कारण त्यांची तेवढी लायकी आणि हार्डशिप आहे, ते कसे श्रेष्ठ आहेत असं तुणतुणं लावलंय आणि आता तुमचं हे वाक्य. डबल ढोलकी बाकी काही नाही.<<
परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला?<<
उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत.
>>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही.<<
दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही.
>> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे.<<
याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय.
>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. <<
ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.
>>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली...<<
मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही.
>>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. <<
असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय.
असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. <<
ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.
ही सिग्नेचरची ओळ अनेक महिन्यांपासून वाचल्याचं स्मरतं, बाकी या वादावादीमधे मला काही रस नाही हे मी आधीच सकारण सांगितलं आहे; तेव्हा चालू द्या.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
>>मग जर या चर्चेचा तो विषय नाही तर मुळात तुम्ही तो काढलाच कशाला?<<
उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत.
>>आणि ज्यांनी अशी कमाई केली त्यांचा - आम्ही श्रेष्ठ आहोत - असा दावा असल्याचं तुम्ही कुठेही लिहीलं नाही.<<
दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही.
>> मग ह्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की तुमचा आक्षेप त्यांच्या कमाईवरच आहे.<<
याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय.
>>माझ्या सिग्नेचरचा आणि प्रस्तुत विषयाचा अर्थाअर्थी संबंध नाही. <<
ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.
>>जसं तुम्ही आयटीमधे नसताना अधिकारवाणीनी त्यावर बोलता की नाही? तुम्हाला जे कोण लोक भेटले असतील आणि त्यांनी जे काय तुम्हाला सांगितलं असेल त्यावरुनच तुम्ही मतं बनवली असणार. त्याचप्रमाणे चित्रपट, मालिकांशी संबंधित लोकांना भेटून, त्यांच्याशी बोलून माझी मतं तयार झाली...<<
मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही.
>>परत तेच. कोण असा दावा करतय की आयटीवाले श्रेष्ठ आहेत? इथे तर कोणीही केला नाही. पगार योग्य आहेत याबाबतीत काही दुमत नाही. एका माणसामागे कंपनीला किती मोठा रेवेन्यु मिळतो ह्याची आधी माहिती घ्या आणि मगच बोला. <<
असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय.
असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
>>उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत.
मग (विषयबाह्य असलेल...) उदाहरण दिलं तर त्याचं सुयोग्य स्पष्टिकरण पण द्यावं.. त्यावर तुम्ही बोलूच नका वगैरे ही भाषा मग्रुरी दर्शवते.
>>दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. <<
हे तुमचं परसेप्शन झालं.. कोणीही श्रेष्ठ/कनिष्ठ असा भेदभाव केलेला नाही.
>>याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. <<
नाही ना तुम्हाला असं म्हणायचं? मग १० वर्षात आयुष्यभराची कमाई वगैरे बेसलेस वाक्यं कशाला टाकता? कमाईवर टिप्पणी करायची आणि नंतर पैशावर डोळा नाही/ त्याचं काही वाईट वाटत नाही अशी सारवासारव करायची. कृपया तुमची स्वतःची विधानं परत एकदा तपासून पहा.
>>ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही.
फक्त त्याच्या आधीच्या पोस्टमधून ते मिसिंग आहे. कारण ते चुकून डिलीट झालं होतं.. पण त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक पोस्टमधे आहे.
>>मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. <<
आयुष्याची कमाई किती असावी हे व्यक्तिगणिक बदलतं... तुम्ही हे विधान कसं करु शकता की अमुक माणसानी आयुष्यभराचा पैसा १० वर्षात कमावला? हे गणित तुम्ही कुठल्या आधारे मांडलं?
>>असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. <<
माझ्या कुठल्या पतिसादात मी इतरांना तुच्छ लेखलं? ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात.
ह्या वाक्याला तर काहीही अर्थ नाही. सिनेमावाले लोक वाईट असतात असंही लोक म्हणतात पण ह्याचा अर्थ तुम्ही लोक वाईट होता का? स्वतःलाच पहा विचारुन. मिळेल उत्तर.
>>असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. <<
फालतूपणा करायला वेळ नाही तर मुळात पहिला प्रतिसाद दिलाच कशाला? ह्यातूनच तुमचा खोटेपणा दिसून येतो आणि तुमचं हे वाक्यच पलायनवाद दर्शवतं...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
"जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की ..."
आय टी वाले जाऊन किम्मत वाढवा असे नाही म्हणाले पण त्यांनी मागणी फुगविण्याचे काम नक्कीच केले.
आयटी मधे खूप पैसा मिळतो हे खरे आहे. सिनेस्टार, राजकारणी, मोठे शेतकरी ह्यान्च्या तुलनेत आयटी मधे जास्त लोक असा रग्गड पैसा मिळवतात. त्याला सुरवातीची गुन्तवणूकही तुलनेने कमीच लागते. जसे प्रशिक्षण, सामग्री वगैरे. पण हा पैसा काही ते गादीत शिवून साठवून ठेवत नाहीत. त्याना मिळालेली समृध्दी वेगवेगळ्या मार्गाने उरलेल्या समाजालाही मिळते. तेव्हा त्याविषयी इतके वाईट वाटू नये.
पण आयटी उद्योगात बहुतेक काम मजूरी टाईपच असते. आपण आपली स्वतःची उत्पादने बनवत नाही. इन्फोसिस वा टीसीएस ह्या बड्या लोकानी कुठले स्वतःचे उत्पादन बनवले आहे का? मला माहित नाही. तुम्हाला माहित असल्यास सान्गा. गुगलचे सर्च इन्जिन, सनची जावा भाषा, याहूचा सर्च वा मेल, सिस्कोचे राऊटर उपकरण, नोकिया वा अन्य लोकान्चा मोबाईल असले काही स्वतःचे भारतीय उत्पादन का दिसू नये बाजारात?
जेव्हा चलती असेल तेव्हा आयटीतील मोलमजुरी पैसे मिळवून देईल पण दूरगामी गुन्तवणूक हवी असेल तर आपले स्वतःचे काहीतरी बनवले पाहिजे आणि ते विकता आले पाहिजे.
प्रतिक्रिया
माझे मत
>>सी.ए.
आयटीबद्दल
म.टा. वर
.
येक दुरुस्ती
सफरचन्दची
सर्व सोडूनीं द्यावे
इतर कोणत्याही गोश्तिपेक्शा (कसे लिहायचे?) कोण ग्राहक आहे यावर
>>डेड लाइन
>>''पूर्वी
तुंम्ही माझं वाक्य उचलून
>>कोणाचे
>>ज्या
>>कळला नसेल
>>कळला नसेल
>>मग जर या
एका वाक्याशी असहमत
+१
>>मग जर या
>>उदाहरण
वैयक्तिक नको
"जसं काही
एक खन्त