Skip to main content

आयटीवाले....

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 23/12/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
गटणेंचा "आयटीतील मंदी आणखी दोन-तीन वर्षे" हा काथ्याकूट वाचत होतो. त्यावरचे काही प्रतिसाद वाचून आयटीवाल्यांवर उगीचच आगपाखड करण्यात येते असं जाणवलं. मी जवळपास दोन वर्ष मॅन्युफॅक्चरींग कंपनीत आयटी खात्यात नोकरीला होतो आणि आता गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत आहे. त्यामुळे मला आयटी आणि नॉन-आयटी अशी दोन्ही ठिकाणं पहायला मिळाली. आयटीवाल्यांवर सर्वसाधारणपणे खालील आक्षेप ऐकायला मिळतात. आक्षेप क्र.१. तुमच्यामुळे सगळं (घरांच्या किमती, भाजीपाला, इत्यादि) महाग झालं... जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की २ बीएचके घरासाठी १० लाख फार कमी होतात. आमचे पगार जरा जास्त आहेत तेव्हा तुम्ही जर २५ लाखाला देत असाल तरच आम्ही तुमच्याकडून फ्लॅट घेऊ. प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचं घर असावं असं वाटतं, तसच ते आयटीवाल्यांनाही वाटतं. बिल्डरनी ठेवलेली किंमत ज्यांना परवडते ते घर घेतात. ती काही फक्त आयटीवाल्यांची मक्तेदारी नाही. अवाच्या सवा किमती बांधकाम व्यावसायिकांनी वाढवल्या. ज्यांनी पूर्वी जमिनी किंवा घरं किरकोळ किमतीत विकत घेतली त्या सर्वांना नंतर बक्कळ फायदा झाला. पण ठणाणा मात्र आयटीवाल्यांच्या नावानी. आक्षेप क्र.२. तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो. आयटी मधला कॉस्ट टू द कंपनी आणि इन हॅंड/टेक होम मधला फरक हा तुलनेने इतर क्षेत्रांमधल्या (मॅन्युफॅक्चरींग, अध्यापन, इत्यादि) फरकापेक्षा बर्‍यापैकी मोठा असतो. कारण आयटीमधे performance pay/variable pay हा पगारातला एक मोठा भाग असतो. तो केवळ व्यक्तिगतच नाही तर कंपनीच्या performance वर पण ठरत असतो. त्यामुळे तो कायम वरखाली होत असतो. दुसरी गोष्ट अशी की आयटी मधला बेसिक पे (पगारातला एक महत्वाचा भाग) मॅन्युफॅक्चरींग तसेच इतर क्षेत्रांत मिळणार्‍या बेसिक पे पेक्षा भरपूर कमी असतो. त्यामुळे साहजिकच पी.फ. आणि एच.आर.ए. कमी मिळतो. पर्यायाने उत्पन्न कर जास्त बसतो. महिन्याच्या शेवटी जो पगार मिळतो तो कॉस्ट टू द कंपनी पेक्षा भरपूर कमी असतो. मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो. इतर क्षेत्रांचं म्हणाल तर सहाव्या वेतन आयोगामुळे केंद्रिय कर्मचार्‍यांचे पगार चिकार वाढणार आहेत. सरकारी अनुदानं लाभलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचेही पगार बक्कळ वाढणार आहेत. आक्षेप क्र.३ बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे. इथे बसून तर असता म्हणजे नेमकं काय अभिप्रेत असतं लोकांना देव जाणे!!! इतर क्षेत्रांतील कामांप्रमाणेच आयटीमधेही आव्हानात्मक स्वरूपाची कामं असतात. कामं म्हणजे फक्त प्रोग्राम लिहीणं नाही. देश-विदेशातील लोकांशी बोलावं लागतं, त्यामुळे संभाषण कौशल्य आवश्यक असतं. ठराविक कालांतराने प्रोजेक्ट बदलतो त्यामुळे नवनवीन संगणकीय भाषा सतत शिकत रहाव्या लागतात. विविध देशांतील कंपन्यांचे प्रोजेक्टस असल्यामुळे कधी कधी शिफ्ट्स मधे काम करावं लागतं. मला तरी प्रामुख्याने वरील तीन आक्षेप ऐकायला मिळाले. मी माझ्यापरीने आयटीवाल्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15425
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by नीधप

>>उदाहरण देणे अशी पण एक गोष्ट असते चर्चेत. मग (विषयबाह्य असलेल...) उदाहरण दिलं तर त्याचं सुयोग्य स्पष्टिकरण पण द्यावं.. त्यावर तुम्ही बोलूच नका वगैरे ही भाषा मग्रुरी दर्शवते. >>दहा ठिकाणी लिहिलंय की 'आम्हीच श्रेष्ठ' असा ऍटिट्यूड असतो. पण ते तुम्हाला वाचायचं नाहीये. समजायचं नाहीये किंवा अजून काही. हे तुमचं परसेप्शन झालं.. कोणीही श्रेष्ठ/कनिष्ठ असा भेदभाव केलेला नाही. >>याला म्हणतात काही शेंडा बुडखा नसलेले आरोप. तुमच्या पैशावर आमचा डोळा नाही आणि आम्हाला त्याचं वाईटही वाटत नाही. हे पण स्पष्ट शब्दात वरती लिहिलंय. तुम्हाला ते वाचायचं नाहीये. उगाच झोडाझोडी करण्यासाठी आरोप करताय. नाही ना तुम्हाला असं म्हणायचं? मग १० वर्षात आयुष्यभराची कमाई वगैरे बेसलेस वाक्यं कशाला टाकता? कमाईवर टिप्पणी करायची आणि नंतर पैशावर डोळा नाही/ त्याचं काही वाईट वाटत नाही अशी सारवासारव करायची. कृपया तुमची स्वतःची विधानं परत एकदा तपासून पहा. >>ही सिग्नेचर त्याच पोस्टपासून आहे. आधी नाही. फक्त त्याच्या आधीच्या पोस्टमधून ते मिसिंग आहे. कारण ते चुकून डिलीट झालं होतं.. पण त्याच्या आधीच्या आणि नंतरच्या प्रत्येक पोस्टमधे आहे. >>मी आयटी क्षेत्राबद्दल अधिकारवाणीने बोलले? खोटे दावे करू नका. आयटीमधल्या लोकांच्या ऍटिट्यूडचा जो अनुभव आहे केवळ त्याबद्दल बोललेय. माझा अनुभव म्हणून. तुम्ही माझ्या क्षेत्रात किती आणि कसा पैसा मिळतो हे अधिकारवाणीने बोललात आणि ते तसं नाहीये हे मी सांगूनही तुमचा हेका की तुम्ही म्हणता तेच बरोबर. दोन्हीमधला फरक समजायचा प्रयत्न करा. तो तुम्ही करणार नाही हे आता उघड दिसतंय. पहिल्यापासून भांडायच्या पावित्र्यातच आहात तुम्ही. आयुष्याची कमाई किती असावी हे व्यक्तिगणिक बदलतं... तुम्ही हे विधान कसं करु शकता की अमुक माणसानी आयुष्यभराचा पैसा १० वर्षात कमावला? हे गणित तुम्ही कुठल्या आधारे मांडलं? >>असा दावा कोण उघड उघड करतं का? पण ऍटिट्यूड तोच दिसून आलाय वरच्या सगळ्या चर्चेत आणि तुमच्याही प्रत्येक पोस्टमधे. पगार योग्य की अयोग्य हा प्रश्नच नाहीये. मिळालेला भला मोठ्ठा पगार इतरांना तुच्छ लेखण्याचं कारण ठरू शकत नाही पण दुर्दैवाने ही वृत्ती खूप आयटीवाल्यांची आहे. वरच्या चर्चेत एकदोन प्रतिसाद वगळता, अगदी तुमच्या प्रतिसादांसह सगळ्यात हिच वृत्ती दिसून आलेली आहे. ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. तुम्हाला फक्त वाटतं की तुमच्या पैशावर जळतात लोक. पण त्या पैशासाठी तुम्ही कष्ट करता आणि बाकीचे करत नाहीत म्हणून त्यांना काही मिळत नाही. तुमच्या बबल मधे रहा तुम्ही माझं काय जातंय. माझ्या कुठल्या पतिसादात मी इतरांना तुच्छ लेखलं? ही वृत्ती नसती तर आयटीवाल्यांबद्दल एवढी नाराजी दिसली नसती लोकांच्यात. ह्या वाक्याला तर काहीही अर्थ नाही. सिनेमावाले लोक वाईट असतात असंही लोक म्हणतात पण ह्याचा अर्थ तुम्ही लोक वाईट होता का? स्वतःलाच पहा विचारुन. मिळेल उत्तर. >>असो. यापुढे तुम्ही खोटे आरोप आणि खोटे दावे एवढंच करणार असं दिसतंय आणि या फालतूपणात घालवायला वेळ माझ्याकडे नाही. फालतूपणा करायला वेळ नाही तर मुळात पहिला प्रतिसाद दिलाच कशाला? ह्यातूनच तुमचा खोटेपणा दिसून येतो आणि तुमचं हे वाक्यच पलायनवाद दर्शवतं... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

सगळं फार वैयक्तिक होतंय. आवरा आपल्या स्वत:ला.

"जसं काही आयटीवालेच बांधकाम व्यावसायिकांकडे गेले आणि म्हणाले की ..." आय टी वाले जाऊन किम्मत वाढवा असे नाही म्हणाले पण त्यांनी मागणी फुगविण्याचे काम नक्कीच केले.

आयटी मधे खूप पैसा मिळतो हे खरे आहे. सिनेस्टार, राजकारणी, मोठे शेतकरी ह्यान्च्या तुलनेत आयटी मधे जास्त लोक असा रग्गड पैसा मिळवतात. त्याला सुरवातीची गुन्तवणूकही तुलनेने कमीच लागते. जसे प्रशिक्षण, सामग्री वगैरे. पण हा पैसा काही ते गादीत शिवून साठवून ठेवत नाहीत. त्याना मिळालेली समृध्दी वेगवेगळ्या मार्गाने उरलेल्या समाजालाही मिळते. तेव्हा त्याविषयी इतके वाईट वाटू नये. पण आयटी उद्योगात बहुतेक काम मजूरी टाईपच असते. आपण आपली स्वतःची उत्पादने बनवत नाही. इन्फोसिस वा टीसीएस ह्या बड्या लोकानी कुठले स्वतःचे उत्पादन बनवले आहे का? मला माहित नाही. तुम्हाला माहित असल्यास सान्गा. गुगलचे सर्च इन्जिन, सनची जावा भाषा, याहूचा सर्च वा मेल, सिस्कोचे राऊटर उपकरण, नोकिया वा अन्य लोकान्चा मोबाईल असले काही स्वतःचे भारतीय उत्पादन का दिसू नये बाजारात? जेव्हा चलती असेल तेव्हा आयटीतील मोलमजुरी पैसे मिळवून देईल पण दूरगामी गुन्तवणूक हवी असेल तर आपले स्वतःचे काहीतरी बनवले पाहिजे आणि ते विकता आले पाहिजे.