अहो "प्रा०५०३"......बोलतानां भाषा निट वापरा हो.... निदान कोणाशि बोलत आहत याचे तरि भान ठेवा....तात्या कोण आहेत हे तरि माहित आहे का तुम्हाला.. त्या मुळे प्रतिसाद देतानां विचार करा. आणी मगच प्रतिसाद द्या
The only opinion about your dream and your work that really counts is yours !!
The NEGATIVE COMMENTS of others merely
REFLECT THEIR OWN LIMITATIONS - NOT YOURS
:-) insha-allah हे ही दीवस जातील !
~ वाहीदा
मी सुध्दा नॉन आयटी मधुन आयटी मधे आलेलो आहे,,,त्यामुळे आयटीवाले किती मेहनत करतात याची जाणिव झाली !!!
तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
हे म्हणजे बी.ई वाल्या माणसाने एम.बी.ए केल्याला माणसाला म्हणावे की तुझा पगार जास्त आहे..तो का जास्त आहे याचा आधी विचार करण्याची तसदी घेण्याची इच्छाच नसते मुळी...
ज्या कस्ल्टंट चे बिलींग दर तासाचे असते आणि ते सुध्दा डॉलर किंवा युरो मध्ये त्याला महिन्याचा पगार मिळतो तो सुध्दा रुपयांमधे...
बसून तर असता दिवसभर कंप्युटरसमोर आणि तेही एसी मधे.
कॉस्ट कटींगमुळे गेली २ वर्ष शनि आणि रवि या दोन दिवसांनमधे काम करताना आमच्या इथे साध्या टेबल फॅनचा उपयोग होतो त्यामुळे नो एसी ऍट ऑल..एसी कायम असण्याचे दिवस कधीच गेलेत..
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
वरचे सगळे मुदद्दे पटलेच शिवाय डेड लाइन जवळ येते तेव्हा २/२ - ३/३ ऑफिस मधेच मुक्काम ठोकावा लागतो.तेव्हा घर-बिर ,पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.वरुन क्लांयट च्या शिव्या खाव्या लागतात ते वेगळे.परत टेस्टर लोंकाचा ससेमिरा मागे असतोच(ते तरि काय करणार ,त्यांच्या वर पण प्रेशर असतेच). आहो कुठ्ल्याही कंपनि चा मेन उद्देश नफा हाच असतो. मग अशा कुठ्ल्या कंपनि ला पैसे वर आले असतात जे असे सहजासहजि भरभक्कम पगार देतिल. जेव्हा आम्हि त्यांना कोट्यावधी रुपये मिळवुन देतो तेव्हाच त्यातला काहिसा भाग ते पगार म्हणुन आम्हाला देतात्.एका CMM ५ लेवल च्या कंपनि मधे (मी स्वतः या कंपनि मधे २ वर्ष कामे केले आहे) सर्व साधारण पणे per day ,per employee १०,००० रुपये charge(Billing) करते कंपनि क्लांयट ला.म्हणाजेच एका employee मागे एका महिन्यात कंपनि ३ लाख रुपये कमवते.आणी या ३ लाखा पैकी आम्हाला मिळतात ६०-७० हजार रुपये(avrage). आणी क्लांयट तेवढे द्यायला तयार होतात्.कारण ते सुद्धा त्या सॉफ्टवेअर वर अब्जाबधी रुपये कमवणार असतात. त्यामुळे पगार जास्त मिळतो हा मुद्दा चुकिचा आहे.
दुसरा मुद्दा ए.सी. मधे बसुन कामे करतात. अहो डोक्यावर ए.सी. असला म्हणजे सगळे आरामात असते, कामाचे प्रेशर नसते असे थोडिच आहे.
आणी १०-१२ तास काँम्युंटर समोर बसुन काम करायचे म्हणजे बाकिच्या शारीरिक त्रास होतातच.
पर्सनल लाइफ सगळ विसरायला लागते.
अगदी बरोबर...कुठे बाहेर जायचा प्लान करायचा आणि त्याच दिवशी एक्स्ट्रा शिफ्ट करण्यासाठी हापिसात हजर व्हायचे..कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच !!!
त्यांचे थॅक्स गिव्हींग,,ख्रीसमस तर अमची असते एक्स्ट्रा शिफ्ट...ते आयुष्याचा आनंद घेतात तर आम्ही शिफ्टचे तास मोजतो...
आणि लोकांना फक्त पैसाच दिसतो !!! :(
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
कोणाचे बारसे,,कोणाचे लग्न,,,,,,कुठले सण्,,कुठली दिवाळी आणि दसरा??हे सगळ आयटीत आल्यावर विसराच
(सतत दोन दिवाळ्या घर-कुटुंबापासून दूर, एकट्याने काढलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
बरं बुवा! आयटीवाले गिरेट! झालं समाधान? खुश?
छयां ! तात्या तुम्ही पोपट केलात!
चांगला तिकडे बेटींग घेत होतो... कोण जिंकणार... आयटी की नॉन आयटी ...
चला रे चला! पळा घरी ! सामना रद्द.
नॉन आयटी च्या कप्तानाने मॅच फिक्स केली.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
डीस्क्लेमरः मी आयटीवाला नाही..
आधी मी पण असाच विचार करायचो की हे लोक म्हणजे फुल्ल टू ऐश..
बक्कळ पैसा ,एकदम जीवाची मुंबई..
पण नंतर एक मित्र आय टीत गेला .आणी त्याच्या कडे बघुन कळालं की घी देखा ,लेकीन बडगा नही देखा...
जितका पैसा कमावतात्,तीतकीच मेहेनत करावी लागते.जागरण म्हणा किंवा बॉसींग म्हणा.ज्याचं जळतं त्यालाच माहिती....
असो...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
मॅन्युफॅक्चरींग मधे दिवाळीला तगडा बोनस मिळतो. जो आयटी मधे नसतो.
अहो विसरा आता ते सगळं
इथं दर महिन्याला मिळतो पगार फक्त
आपला
मॅन्युफॅक्चरींग कामगार
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
असेच म्हणतो.
मग, याच प्रमाणे , ज्यांना वाटते की आय टी वाल्यांना बसल्या जागी भरपुर पैसा मिळतो , त्यांनी आय टी मध्ये नोकर्या शोधाव्यात की.
त्याला तर कोणी बंदी घातलेली नाही ना.
आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता?
ये बात सही है !! :? :-?
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
आय टी मधे जर इतके कष्ट आहेत तर तिथे का काम करता?
कारण दिवसभर इंटरनेत वापरायला मिळते आणि ते सुद्धा भारी स्पीड आणि छान कनेक्टिवीटी...
आणि त्यामुळेच दिवस भर मिपा मिपा खेळता येते :-)
पुर्व लेखी परवानगीशिवाय याचा अर्थ काय?
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
वरील वाक्य पूर्ण चुकले आहे
लेखकाची पूर्व परवानगी लेखी असू शकते
त्याच्या लेखी ती परवानगीच असते.
अनुल्लेखापेक्षा पूर्वलेख वेगळा ठरतो
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
आज आय.टी.वाले जी काही कामं करतात (असं ऐकून आहे) त्यातून इंटरनेट, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू, यांचा शोध लागला नाही. माझ्या माहितीत हा प्रकार उसाच्या सैन्यातल्या लोकांनी काढला.
अगं अदिती ते तर मलाही माहित आहे :)
पण आजकाल प्रत्येक हापिसातून आयटी च वेगळं डिपार्ट्मेंट असतं, जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत, अस म्हणायच होत मला. एकदम उसात कुठे शिरतेस?:)
>>जे ह्या सुविधा त्या हापिसपुरत्या व्यवस्थित चालताहेत ना हे पहात असत
व्यवस्थित (???) =))
त्यांनी मि पा ब्लॉक करुन ठेवल तर खेळता येईल का तुम्हाला मिपा मिपा?
इंटरनेट, www हे शोध उसाच्या सैन्यात लागले हे खरं आहे. आत्ताच्या लोकांना AARPA म्हणजे काय, इतकं प्रिमिटीव्ह होतं ते. ( :? www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?)
पण आज त्याचा जसा वापर होत आहे ते आय. टी. ईजिनियर्समुळेच होत आहे.
तसचं आय. टी. म्हणजे फक्त इंटरनेट, www एवढचं नाही.
आय्. टी वाले या गोष्टींच्या शोधाच क्रेडीट घेत आहेत हे तुला कुठे दिसलं (तसा जर कोणी घेत असेल तर तो अर्धवट म्हटला पाहिजे). त्यामुळे वरील वाक्याचा उद्देश कळला नाही.
अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ?(होत असावी असा अंदाज हा.. मी स्वःत बघितलं नाही त्यामुळे ठोकून देता येत नाही.) जर तसं असेल तर ते लिहिणारा कोणीतरी फोकलीचा, पैशाला पासरीभर मिळणार्यांपैकी असलेला, प्रोग्रॅमरच असला पाहिजे..
खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत.
जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा.
आम्हाला दुस्वास, तुच्छता नवीन नाहीत..
१९९८-९९ साला पर्यंत संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स ला जाणारा म्हणजे मेकॅनिकल, मेडीकल यांसारख्या ग्लॅमरस शाखेला एडमिशन न मिळवता आलेला विद्यार्थी अश्या तुच्छतेने बघायचे. आता दुस्वास करतात.
काही काही प्रतिसाद बघितले तर हसायला येतं. आपणपण खपणार आहोत याकडे लक्ष नाही पण आय. टी. वाला खपतो आहे..ना "खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले " म्हणायला मोकळे.
चालायचच कभी उपर कभी निचे..
-इलेक्ट्रॉनिक्स-संगणक अभियंता.
जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून जे काही ऐकलं आहे, त्यावरून माझे सगळे अंदाजः
(www चा शोध कुठल्या तरी स्विस लॅब मधे लागला होता का?)
असू शकेल, माझी माहिती फारच तोकडी आहे. पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही?
खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत.
पण त्यात मी पण येते ना?
अंतराळ संशोधनात सुद्धा प्रचंड आकडेमोड, वेगवान पद्धतीने कुठल्यातरी संगणक प्रणालीमुळेच होते ना ?
अर्थातच! पण मी वापरते ती सगळी सॉफ्टवर्स खगोलशास्त्रज्ञांनीच लिहिलेली आहेत. खगोलसंशोधनात (किमान भारतातरी) एवढा पैसा नाही की जेनेरीक आय.टी.वाल्यांकडून सॉफ्टवर्स लिहून घ्यावीत. (आमच्याकडे बर्याचशा तरूण, वय वर्ष <~ ४५, खगोलअभ्यासकांना संगणकाबद्दल किमान माहिती असते की आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या आपणच करु शकतो, अगदी ऑपरेटींग सिस्टम इंन्स्टॉल करण्यापासून ते स्पीकर्सची कनेक्शन करेपर्यंत! अगदी सोप्या मराठीत सांगायचं झालं तर उठल्या-बसल्या सिस्टम ऍडमिनवाल्याला बोलावून आणावं लागत नाही.)
जास्त पगार किंवा सोयी यांसाठी आय. टी. वाल्यांचा दुस्वास जरूर करा पण त्यांची व्हॅल्युपण ओळ्खा.
दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का? आणि आम्हाला खगोलशास्त्रात शिकवतात तसं, तुलना समान गोष्टींची करावी, (Compare like to like!) असमान नाही!
तक्रार एवढीच आहे महिन्याला ५० हजार मिळवणार का १६ हजार असा प्रश्न वयाच्या तिसाव्या वर्षी विचारला तर माणूस ५० हजार असं उत्तर देतो. महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना?
प्रगती फक्त एकाच दिशेत, क्षेत्रात होत आहे आणि हे चांगलं आहे का? शरीरासाठी व्यायाम करताना फक्त दंडाचेच व्यायाम केले आणि तुंदीलतनू असेल तर ते कसं असेल?
हा प्रश्न जेनेरीक आय.टी.वाल्यांसाठी नाही, तर खरंतर "पॉलिसी मेकर्स"साठी आहे. ज्यांच्या हातात ससा नाही त्यांनी स्वतःला पारधी म्हणवून घेऊ नये.
महागाई कोणामुळे वाढली हा प्रश्न मी विचारत नाही, पण महिना १६ आणि २० हजारात, एका छोट्याश्या खोलीत घर-संसार मांडून तू "तारे मोजणार" का "मान मोडेस्तोवर" काम करुन महिना ५० हजार कमावणार याचं उत्तर सोपं आहे ना?
तारे संपणार नाहीत बै.
पण
५०००० चे ५००० पण होवु शकतात... डॉलर.... कोसळ्णार आहे.
(हे भाकित आहे. जास्त सिरीयसली घेवु नये. आमची भाकिते खरी होतातच असे नाही)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
>>खालील वाक्य जेनेरीक वाक्य आहेत फक्त तुला उद्देशून नाहीत.
>>पण त्यात मी पण येते ना?
डिपेन्डस तुला ते लागू होत असतील तर तू त्यात येतेस..तुझा बाकिचा प्रतिसाद बघितला तर येत नसावीस पण मला ते आधी माहित नव्हतं म्हणून "जेनेरीक" वाक्य.
>>दुस्वास अजिबातच नाही. पैसे छापायचे असते तर मी नक्कीच संशोधनाकडे वळले नसते, मला काय हवंय आणि काय आवडतं याचा विचार करुन मी या क्षेत्रात आले. आणि ही पण प्रांजळ कबूलीही की माझा नवरा माझ्यापेक्षा बरेच जास्त कमावतो म्हणून मला आज माझं विद्यार्थी म्हणून युकेमधे जे राहणीमान होतं ते बदलायला लागत नाही. आय.टी.वाल्यांचा दुस्वास करुन काहीही मिळणार नाही, त्यामुळे तो करावाच का?
धन्यवाद. पण ही मॅच्युरीटी मला इथल्या बर्याच प्रतिसादात आढळली नाही. इथे तर ब्लेम गेम सुरू झालेला दिसतो..
आय. टी खाली गेलं तर बाकिची फिल्ड्स (टाटा मोटर्स आठवड्यातून २-३ दिवस बंद असते..ते का?) पण खाली जाणार आहेत हे लोकांना कळत नसावं त्या शिवाय ""खपू दे..**व्यांची तीच लायकी होती, माजले होते साले "" अशी वाक्य दिसली नसती..
>> पण मुद्दा एवढाच होता की आंतरजाल, इमेल, www या गोष्टींचे "शोध" आणि जेनेरीक आय.टी.वाले करतात ती कामं यात प्रचंड फरक आहे का नाही?
हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही. उदा. औषधांचा शोध जनरल फिजिशियनने लावला नाही तरी तो ती औषधं कशी / कधी वापरायची ह्याचा योग्य सल्ला देतो (किंवा तसं अपेक्षित असतं.) आता जनरिक डॉक्टर्सची फी आपण देतोच ना... तो जी म्हणेल ती ? !!!!
--------
दुसरं म्हणजे आयटीचे पगार वगैरे हा सगळा मागणी - पुरवठा खेळ आहे.
-------
महत्वाचं म्हणजे आयटी म्हणजे फक्त programming or systems analysis or sys admin or testing or implementation असं नसतं... हे सगळं एकूण मिळून कंपनीचा / उद्योगाचा खर्च कमी करणे आणि/किंवा उत्पन्न वाढवणे ह्यासाठी कसं वापरलं जातंय ह्यावर आयटीचे खरं यश आहे.
हो नक्कीच फरक आहे पण म्हणून जेनेरिक आय्.टी.चे महत्व कमी होत नाही.
हे थोडं मान्य आहे. पण "आय.टी. नसतं तर मिपा-मिपा खेळता आलं नसतं" हे वाक्य थोडं अतिरंजित वाटतं. शिवाय आय.टी. मुळेच (च ला महत्त्व आहे) हे शक्य आहे असा जो सूर वाटला तो आंतरजाल, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू इत्यादींच्या संशोधकांवर अन्यायकारक वाटला म्हणून बोलले.
खुद के सांथ बातां: व्यवहारात उपयुक्त असणार्या अनेक गोष्टी, वस्तू, सेवांसाठी काम करणारे अनेक लोक आहेत, बहुतांश असेच लोक इथे (आणि समाजातही) आहेत. डोक्यातला किडा शमवायला म्हणून व्यवहारात संपूर्णपणे (?) अनुपयुक्त गोष्टींवर काम करून काय आवाज चाललेला आहे तुझा?
(संगणक वापरून तारे गणणारी) अदिती
हे वाक्य अतिरजिंत वैगरे नाही.सगळे आय टी वाले एकमेकांना मदत करुनच सिस्टीम बनते. प्रत्येकाचा थोडा तरी हातभार असतोच.
गटणे, उलटा विचार करा, जेनेरीक आय.टी.वाले नसते तर काय इंटरनेट, इमेल, ब्लॉगिंग, शेअरवर्स, फ्री सॉफ्टवर्स हे काही नसतंच का? थोडा हातभार असणं वेगळं असतं, (त्याला खारीचा वाटा म्हणतात) आणि "शो स्टॉपर" असणं वेगळं असतं. मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं.
कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही.
आणि हो गटणे, तुमचा कॉपीराईट आतातरी रिन्यू करा, २००९ उजाडलं.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
तुझे इतर लेख / अभिप्राय वाचून वाटत होतं कि एखाद्या क्षेत्राची व्यवस्थित माहिती नसताना तू बेधडक विधानं करत नाहीस म्हणून.
पण खालच्या वाक्यांनी तडा गेला..
"..मूळ संशोधकाशिवाय घोडं अडतं, पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं.
कोंबडं झाकलं म्हणून तांबडं उगवायचं रहात नाही..."
यातला पहिला क्लॉज खरा आहे. पण..
"..पण टर्नर-फीटरचं काम थोड्या ट्रेनींगच्या सहाय्याने कोणालाही जमतं..."
????
हे असं बेधडक विधान करायला तू कधी ऍप्लिकेशन लेव्हल - सर्व्हर लेव्हल प्रोग्रॅमिंग केलं आहेस का? हे करायला अगदीच संशोधक लेव्हलच नाही पण नक्कीच टर्नर-फिटर पेक्षा थोडं जास्त नॉलेज लागतं.
दुसरा मुद्दा, इतके शोध लागत आहेत, पेटंट्स घेतली जात आहेत मग ती सगळीच्या सगळी कमर्शियल डोमेन मधे का दिसत नाही. म्हणजे कुठेतरी संशोधकांना सुद्धा "टर्नर्-फिटर, कोंबड्या" ची गरज आहेच.. नाहीतर त्या संशोधनाचा उपयोग काय?
साधं उदाहरण.. नॅनो टेक. चा शोध लागला आहे. पण जो पर्यंत सामन्य वापरात ते येत नाही तो पर्यंत त्याचा काय उपयोग?
अशी प्रॉडक्टस तयार करण्यासाठी कुठल्याही येरा-गबळ्याला "थोडसं" ट्रेनींग देवून जॉब मिळणार आहे का? असं असेल तर आपला रेझ्यूमे पहिला. नाहीतरी प्रोग्रॅमिंग करून थोडा बोअर झालोच आहे.
आयटी विरुद्ध नॉन आयटी असा सामना ह्याआधीच एकदा रंगुन (?) गेला आहे.
धमाल ने चर्चा सुरु केली होती. बरेच महिने झाले त्याला.
काहि फायदे काहि तोटे सगळीकडेच.
ग्रे शेड लक्षात ठेवली तर चर्चा भरकटणार नाही.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
एक जमाना होता जेव्हा 'टेल्को' तल्या झाडुवाल्याला सुध्दा १०००० पगार होता आणि त्याच वेळी ईतरत्र मैनेजर असणा-यांना ५-६००० रु मिळत. त्यावेळी का नाही आरडा ओरड झाली?
विमानाच्या पायलट्स ना भरपुर पगार असतो त्या तुलनेत यस्टी च्या डायवर ला काय पगार मिळतो?
कामाचे स्वरुप, प्रशिक्षीत माणसांची उपलब्धता , कंपनीला मिळणारा नफा ह्यावर पगार ठरत असतो.
(आयटी वाला) आप्पा.
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
आयटी मुळे झालेले फायदे पण लक्षात घ्यायला हवेत... आज रेल्वे ची जी Centralised Reservation System आहे ज्यामुळे देशाच्या कानाकोपर्यातुन आरक्षण करता येतं, ते याचमुळे ना...
मान्य, की पगार बाकीच्या क्षेत्रांपेक्षा जास्त मिळतो, पण कामाचं स्वरुप पाहिल्यास का ते हि लक्षात येईल....
आणी भारत आज ज्या आर्थीक महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्यात थोडाफार वाटा आयटी वाल्यांचा सुद्धा आहेच की....
>> तुम्हाला कामाच्या मानानी उगीचच जास्त पगार मिळतो.
यामध्ये २ मुद्दे आहेत. पहिला मुद्दा "उगीचच" मिळतो. यावर माझे मत आहे की कोणी पैसे उगीचच जास्त देत नाही. मागणी आणी पुरवठा या तत्वाने पैसे दिले जातात (बहुतेक वेळा). उदाहरणार्थ माझ्या कंपनीत बरेच कंसल्टन्ट येतात ज्याना आम्ही तासाला $२५० किंवा जास्त देतो. कारण काय? मागणी आणी पुरवठा.
दुसरा मुद्दा "जास्त पगार मिळतो". या मताशी मी थोडाफार सहमत आहे. मी एके ठिकाणी नोकरीला होतो, तिथे पी.एच.डी. फिजिक्स माणसाला वर्षाला $३३,००० पगार होता. मला सांगा, आय.टी.चे काम पी.एच.डी. फिजिक्स पेक्षा फार महान असते का? मला भारतातील पगार काय आहेत याची फार कल्पना नाही, पण १-२ उ.दा.माहीत आहेत, सी.ए. झालेला आय.टी.च्या तुलनेत १/३ पगार कमवतो. आय.टी.वाला सी.ए.च्या ३ पट हुशार असतो का किंवा ३ पट आउटपुट देतो का?
>>१-२ उ.दा.माहीत आहेत
अशी ही उदाहरणे आहेत बी कॉम झालेला बी ई पेक्षा जास्त कमावतो. शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्याच गोष्टी अवलंबुन असतात.
शेवटी ज्याची त्याची क्षमता , कामातले कौशल्य , हर हुन्नरीपणा यावरही बर्याच गोष्टी अवलंबुन असतात.
चूक. डिमांड-सप्प्लाय, योग्य वेळी योग्य ठिकाणी व योग्य क्षेत्रात असणे, साहेबाची मर्जी असणे, चांगला ब्रेक मिळणे यावर बर्याच गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही स्वत:चे मालक असाल तरच उत्तम. नाहीतर नोकरदार आणी वेश्या यात काही फार फरक नाही. फरक इतकाच की एक जण शरीर विकतो आणि दुसरा बुद्धी. एकाची किम्मत अनुभवानंतर कमी होते तर एकाची वाढते. बस्स. (Sorry for such harsh words, but I think that is reality.)
प्रतिक्रिया