Skip to main content

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/11/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद

वाचने 74819
प्रतिक्रिया 322

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद१९७१

पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले म्हणून गरमागरम विषय चर्चेसाठी दिला आहे, खूप गरम वाटल्यास क्षुधाशांतीसाठी थंड पेयेही सोबत ठेवावीत

In reply to by जेपी

तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई. पहिल्या दिवसात १०० चा दर बरा असतो का ? धागा लेखातील बर्‍याच मुद्द्यांना अद्याप स्पर्श झाला नाही त्यातील अर्ध्या मुद्द्यांना स्पर्ष केलातरी भरपूर होतील असे वाटते.

स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ असतात.कोणी फुकाचं व्यवहाराला धरून नसलेलं बोललं की " तुझं तत्वज्ञान गेलं चुलीत " +"{ दोनवेळचं गिळण्यासाठी छनछन घेऊन ये मग ऐकते }."हे एक "बेसिक इंस्टिन्क्ट आहे". बाकी शनि काही शिंगणापुरलाच नाही घरातही बनवता येतो.

पहिल्या काही प्रतिसादांमध्ये गांभीर्य आले तरच इथे या विषयावर चर्चा करण्यात अर्थ आहे. अन्यथा वेळ शब्द शक्ती वाया घालवू इच्छित नाही.

शशी केसबद्दलः जिथे स्त्रियांना प्रवेशास बंदी आहे अशा प्रार्थनास्थळांमधे त्यांनी जाऊच नये. किंवा कुणीही जाऊ नये. देवाच्या गाभार्‍यावर हे बसलेले चोर का नियम ठरवतात..? बाकीचे का पाळतात? खरंच चालत नसेल (म्हणजे देव कोपत बीपत असेल) तर कोपू दे! ती तरुणी तिथेच शिळा होऊन पडली असती तर देव आहे हे सिद्धही झाले असते, नाही पडली त्यामुळे खरा प्रश्न आणि तमाशा चालू झाला. देव कोपण्याऐवजी गावकरीच कोपलेत. अकलेचे कांदे आणि डोळे असून आंधळे लोक अजूनही शनि-शिंगणापुरास जातात. दलितांच्या मंदीरप्रवेश आंदोलनाबद्दलही मला हाच प्रश्न पडला होता. अरे बंदी आहे तर लाथ मारा च्यायला त्या देवाला... जो स्वत: तुम्हाला जवळ घेऊ शकत नाही, तुमचे दु:ख दूर करू शकत नाही तो देव कशाला डोक्यावर घ्यायचा? (देवाने दु:ख दूर करून सुख द्यावे म्हणून लोक देव संकल्पना मानतात, सश्रद्ध लोकांनी अंगावर येऊ नये) दुसरा प्रतिसाद नंतर देतो.

In reply to by संदीप डांगे

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. दुर्दैवाने या अनुषंगाने स्त्रियांना जी सापत्न वागणूक मिळते ती देण्यात इतर स्त्रियाही पुढे सरसावतात.

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
ह्याला म्हणतात अनभ्यासातुन आलेले स्वकपोकल्पित निरर्थक अत्मरंजन ! पारश्यांच्या सर्व अग्यारी मधे कितीही हुच्चवर्णीय असला तरीही तुम्हाला प्रवेश दिला जात नाही ... कित्येक अग्यारीबाहेर "पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन सोडुन सर्वांन्ना प्रवेश निशिध्द " अशी स्पष्ट पाटी वाचली आहे मी !

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यावरून तुम्हाला वाचता येतं याशिवाय दुसरं काहीही सिद्ध होत नाही. पहिले तो 'निशिद्ध'शब्द 'निषिद्ध' असा नीट लिहायला शिका. शंभर वेळा लिहून काढा हवं तर. पारशांच्या धर्मस्थळात फक्त पारशांना परवानगी असते. पुरुष किंवा स्त्री. आणि जे पारशी नसतात त्यांना नसते. पुरुष किंवा स्त्री. इथे धाग्यात उल्लेख नसलेल्या मुद्द्यांवर वाद घालायचा असेल तर परीराज्यात जा. नाहीतर मुद्दा समजून घेऊन नीट वाद घाला. एवढा अभ्यास केलाय त्याचा उजेड पडू दे जरा!

In reply to by बोका-ए-आझम

किती ती असहिष्णुता ! तुमच्या ह्या प्रतिसादातुन वाक्य जसेच्या तसे कॉपी पेस्ट करुन लिहिले आहे >>>> http://www.misalpav.com/comment/777704#comment-777704 १००% सहमत. बोका-ए-आझम - Mon, 30/11/2015 - 19:50 आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. >>>> उगाच स्वतःच्या मनाचे काही घुसडलेले असेल तर दाखवा नाही तर वाक्य लिहायला चुकले असे कबुल करा की राव !! आम्ही आमचा शब्द सुधारतो तुम्ही तुमचे वाक्य सुधारा . हाकानाका.

In reply to by प्रसाद गोडबोले

तुम्ही खरोखर चूक दाखवली असतीत तर ती मान्य करायला हरकत नव्हती. चूक नसताना उगाचच आक्षेप घेणं याला काय अर्थ आहे? धागा स्त्रियांवरच्या धार्मिक बंधनांची चर्चा करतोय. त्यावर संदीप डांगे यांनी शनि शिंगणापूरच्या घटनेचा संदर्भ दिला. त्यावर मी प्रतिक्रिया दिली. त्याला संदर्भ हा शनि शिंगणापूरसारख्या हिंदू तीर्थक्षेत्रात स्त्रियांवर लादण्यात आलेल्या बंधनांवर होता. पारशांचा संबंध कुठे येतो यामध्ये? पारशी कोणत्याही पारशी नसलेल्या माणसाला त्याची जात/धर्म/लिंग/वर्ण यावरून अपवाद करुन अग्यारीत प्रवेश देत नाहीत. यात मुद्दाम पुरुष आणि उच्चवर्णीयांचा अपवाद केला जात नाही. तसंच कोणत्याही पारशी पुरुष आणि स्त्रीला तिथे प्रवेश असतो. त्यात लिंग आणि वर्ण यावरुन अपवाद केला जात नाही. त्यामुळे तुमचा आक्षेप निरर्थक ठरतो. उद्या स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये आणि ट्रेनच्या स्त्रियांच्या डब्यांमध्ये पुरूषांना प्रवेश नसतो असं कुणी तरी म्हणेल. ते विधानही तुमच्या आक्षेपाप्रमाणेच निरर्थक आहे.

In reply to by बोका-ए-आझम

वेरुळच्या घृष्णेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मात्र पुरुषांना बनेल काढल्याशिवाय अजूनही प्रवेश मिळत नाही.

In reply to by प्रचेतस

असा नियम असावा. सासवडजवळच्या हिवरे येथील मंदीराच्या गाभार्‍यातसुद्धा बनियन (आणि कमरेचा पट्टा-चामडी वस्तू नको म्हणून) काढून जावं लागतं. कानिफनाथांचं मंदीर हिवर्‍यापासून पुढेजवळच आहे. (शिवमंदीर नसले तरी) तेथेही हाच नियम आहे. या नियमामुळे बाय डिफॉल्ट महिला मंदीर प्रवेशास अपात्र ठरतात.

In reply to by तुषार काळभोर

मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे जाऊन आले आहे. दक्षिणेत अनेक शिवमंदीर्ांमध्ये असा नियम आहे पण तो पुरुषांसाठी. स्त्रियांना तस्सच्या तस्स आत जाऊ देतात.

In reply to by बोका-ए-आझम

अजूनही तुम्हाला काही प्रतिसादांना फाट्यावर मारणं जमत नै ये असा तो अर्थ. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी आपण उत्तरं देतोच ना सर! शिक्षकांच्या व्यवसायात हा occupational hazard असतोच ना! त्यामुळे इच्छा असूनसुद्धा फाट्यावर मारता येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

सहमत आहे. पण मला अनेक वर्षाच्या जालानुभव सांगतो आपल्याला त्रास होतो पेक्षा थांबणं परवडतं. म्हणजे उद्या एखाद्या मंदिराच्या विश्वस्तानी ठरवलं की महिलांनी यापुढे.... जाऊ देत. पुरुषांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर नागडं जावं लागेल तरी हे म्हणतील काय होतं मंदिराचे नियम पाळले पाहिजेत. शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा. शनीमंदिराचा चौथारा असू देत की रजस्वला असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश असू देत स्री पुरुषांनी मिळुन जनआंदोलन केलं पाहिजे, देव आहे नाही तो भाग वेगळा. पण प्रवेश बंदी कोणालाच नको. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं त्या प्रमाणे ही आंदोलनं झाली पाहिजेत, असं वाटतं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिकलेले असून सारासार विवेकबुद्धि वापरता येत नसेल तर काय उपयोग शिक्षणाचा.
अश्या लोकांना साक्षर म्हणावे, सुशिक्षित नव्हे, भलेही त्यांनी फुरोगामी/विचारजंत असे इतरांना शिव्या घालून हिणवलं तरी… call spade a spade.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटेसर, परस्परविरोधी विधाने करत आहात. सारासारविवेकबुद्धी असेल तर कुणी मंदिरात जाणारच कशाला? मंदिरातले नियम विश्वस्त ठरवत नाहीत, भक्त ठरवतात. भक्तांनी ठरवलेले नियम विश्वस्त पाळतात. पुढे विश्वस्त/पुजारी आपल्या सोयीनुसार ते वळवून घेतात आणि पुढे भक्त हेच नियम पाळायला लागतात. हे ज्या भक्तांना कळत नाही त्यांना नागडे जाण्याचाही नियम मान्य होतो. प्रथा एखाद्याच्या मूर्खपणामुळे तयार होतात. एखाद्याने नागड्याने जाण्याचा नवस केला अन् अनमानधपक्याने फळास आला तर ते पाहून अक्कल गहाण टाकलेले लोक तसेच करायला लागतील. बहुसंख्य तसे करतात पाहून मग तोच नियम होईल आणि तीच प्रथा होईल. मग ते न पाळणार्‍याला देवाचा उपमर्द करत आहे असे म्हणून प्रवेश नाकारला जाईल. कारण मेंढ्यांच्या कळपात ते फिट बसत नाहीत म्हणून. मंदिरात कुणालाच प्रवेशबंदी नसावी असे ज्यांचे मत आहे त्यांना मंदिर ही व्यवस्थाच समजली नाही असे म्हणावे लागते. चर्च, मशिद, गुरुद्वारा, विहार ह्यापेक्षा ही व्यवस्था कशी वेगळी आहे हे खालच्या माझ्या प्रतिसादात सांगितले आहे. काही चार बुकं शिकून अतिशहाणे झालेले लोक तिकडची व्यवस्था पाहून इकडंही तसेच असले पाहिजे ह्या दिव्य विचाराप्रत येतात. त्यांना तिकडचाही अभ्यास नसतो, इकडचाही नसतो. समानतेच्या तत्त्वाचा चुकीच्या ठिकाणी आग्रह होत आहे हे लक्षात येत नाही. जनआंदोलन जर करायचे तर मंदिरात कुणीच जाऊ नये यासाठी करावे. त्यानेच समाजाचे जास्त आणि योग्य भले होईल. सगळी मंदिरेच ओसाड पाडावीत. जिथे बंदी आहे तिथे जबरदस्ती मंदिरप्रवेश ही अतिशय हास्यास्पद संकल्पना आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by संदीप डांगे

आणि मंदिरात जाणं या परस्परविरोधी गोष्टी कशा काय? मंदिरात नवस करणं, तो पूर्ण होईल किंवा होतोच अशी अंधश्रद्धा ठेवणं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणं ही सारासारविवेकबुद्धी नसल्याची लक्षणं आहेत हे मान्य, पण मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

मंदिरात निव्वळ जाणं हे सारासारविवेकबुद्धीच्या विरोधात आहे हे पटलं नाही. सहमत....! योग्य आणि अयोग्य यातील समज . -दिलीप बिरुटे

In reply to by बोका-ए-आझम

दक्षिणेतल्या काही देवळांत प्रवेशबंदी नसली तरी पुरुषांना वेष्टि नेसावी लागते. अलीकडे बहुतेक पुरुष ती पँट्वरूनच गुंडाळतात. महिलांना साडी किंवा सलवारकमीज आवश्यक आहे. जीन्स अजूनही काही ठिकाणी चालत नाहीत. चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही. अवांतर : काही वर्षांपूर्वी केरळला गेलो असताना एकदा एका देवळात आमच्या मुलांना प्रवेश द्यावा की नाही याबद्दल तिथल्या पुजार्‍यांमध्ये चर्चा झाली. तिथल्या मुख्य प्रशासकाला बोलवण्यात आले. कारण मजेशीर होते. त्यावेळी तिथे आम्हीच फक्त उत्तरहिंदुस्तानी होतो आणि मुलांचा वर्ण तांबूस गोरा आणि केस पिंगट ही बाब तिथल्या समुदायात वेगळी दिसत होती. कदाचित परदेशी पाहुणी मुले एक्स्चेंज कार्यक्रमातून आली असतील असा संशय त्यांना आला होता. (केरळमधे बरेच परदेशी लोक येतात.) त्यांची समजूत पटवण्यात थोडा वेळ गेला. रांगेतल्या मागच्या लोकांचा खोळंबा झाला नाही कारण आम्हांला रांगेतून बाहेर काढले होते. थोड्या वेळाने सर्व ठीक झाले.

In reply to by राही

विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक भंपकपणा मी कोणत्याच देवळात पाहिला नाही! एका ठिकाणी मला सलवारवरून ते कळकट कापड ते ही भाड्याने घेऊन नेसले तरच मंदिरात जाता येईल असे सांगून अडवले. त्याचवेळी २ फिरंगी स्कर्टवाल्या मुलींना मात्र वाकून नमस्कारासह प्रवेश मिळाला. हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.

In reply to by मितान

हे बघून मला त्या आतल्या देवाचीच कीव आली. तसंही मला जाऊन न जाऊन काही फरक पडत नसल्याने बाकीच्यांचे दर्शन होईस्तवर मी देवळाबाहेरच्या दुकानांना माझे दर्शन देऊन आले.
तै मस्तच, मी सुद्धा जेजुरीला धन्दा होताना पाहीला, तेव्हा मी सुद्धा आत गेलो नाही.

In reply to by मितान

नै म्हणजे जो काय नियम आहे तो तरी सारख्या प्रमाणात राबवावा. हे असली चाटूगिरी डोक्यात जाईल नै तर काय!

In reply to by राही

चिपळूणमध्ये डेरवण येथे महिलांना नऊवारी नेसावे लागत असे तसेच तेथे महिलांनी महिना असताना आत जाऊ नये अशी पाटीही होती. आताची स्थिती माहीत नाही.
मी या वर्षी जानेवारीतच तिथे गेलो होतो. तिथे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही घटनांचे पुतळे आहेत आणि वालावरकर महाराज म्हणून कुणा महाराजांची समाधी आहे. पुतळ्यांच्या ठिकाणी असे वेषभूषेवर बंधन नाही.पण समाधीच्या ठिकाणी जायचे असेल तर स्त्रियांना "वयोमानानुसार फ्रॉक किंवा साडी ही वेशभूषा असेल तरच प्रवेश दिला जाईल" अशी पाटी वाचली होती. नऊवारी असा काही उल्लेख नव्हता. याविषयीच मी मिपावर मागे लिहिलेले थोडे चोप्य-पस्ते करतो--- "म्हणजे मी जीन्स घालून गेलो तरी त्या महाराजांना चालणार पण हिलरीने साडीच नेसली पाहिजे ही सक्ती. हे काही मला पटले नाही....ते पुतळे बघून झाल्यानंतर आणखी एक ठिकाण होते तिथे जायला आम्ही निघालो तेव्हा हिलरीने साडी नेसली नसल्यामुळे आत प्रवेश नाही हे कळले.आम्ही विचारले की आत नक्की काय आहे?त्यावर कळले की तिथे आत वालावलकर महाराजांची समाधी आहे.एक तर वालावरकर महाराज हे नाव मी आयुष्यात दुसऱ्यांदा ऐकले.कदाचित शाळेत असताना आमची सहल गेली होती त्यावेळी ते नाव ऐकले असेल ही शक्यता गृहित धरून दुसऱ्यांदा असे लिहितो.हे महाराज कोण होते किंवा ते खरोखर चांगले होते की नाही याविषयी मला काहीच माहित नव्हते. ज्या माणसाविषयी काही माहित नाही त्याची समाधी बघण्यात काय कपाळ इंटरेस्ट असणार? आणि समजा हे महाराज कोण हे माहित असते तरी तिथे जावेसे वाटायची शक्यता अगदी शून्य होती.उंटाच्या लहान आतड्याची लांबी किती असते हे समजून घेण्यात मला जितका इंटरेस्ट आहे त्यापेक्षाही कमी इंटरेस्ट या असल्या महाराजांच्या समाध्या वगैरे बघण्यात मला आहे.त्यामुळे आत जाऊ देणार नसाल तर नका देऊ, हू केअर्स असे म्हणत आम्ही तिथून निघालो."

In reply to by बोका-ए-आझम

आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
मी फक्त तुमचे हे वाक्य चुकले आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे . तुम्हाला कदाचित असे लिहायचे असावे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत. तुमची वाक्य रचना चुकली आहे इतकेच निदर्शनास आणुन देत आहे !

In reply to by पगला गजोधर

त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली प्रार्थनास्थळं कुठेच नाहीत.
>>> मी कमीत कमी सुधारणा सुचवत होतो , बरे झाले आपण अजुन एक अ‍ॅडीशन सुचवली ! बोकाराव तुमचे वाक्य असे असले पाहिजे आणि मजा म्हणजे पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना बंदी असलेली हिंदु पूजास्थळे कुठेच नाहीत.

In reply to by प्रसाद गोडबोले

बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्लर येथे हिंदू धर्मियांशिवाय कोणालाही प्रवेश नाही,अशी पाटी आहे.एकदा आय.टी.डी.सी.च्या बसने आलेल्या क्रिश्चन धर्मियांना मंदिराच्या प्रांगणात आणल्याबद्द्ल पंजाबी हिंदू गाईडला तिथले पुजारी आईबहिणीवरुन शिव्या देताना प्रत्यक्ष पाहिले आहे.

In reply to by नूतन सावंत

खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा एका आफ्रीकन (ख्रिश्चन) स्त्रीला विवेकनंदांच्या भूमिकेतून हिंदू धर्म या विषयावर माहिती दिली तिला हिंदू संस्कृती बद्दल सकारात्मक उत्सुकता निर्माण झाली आणि मंदिरांना भेट देण्याचीही इच्छा झाली पण मंदिरातील पुजारीवर्ग कसा वागेल या विचाराने मंदिर भेटीस आमंत्रण देण्याचे धाडस मलाच झाले नाही याची आठवण झाली.

In reply to by माहितगार

जिथे पुजारी नाहीत अशा मंदिरांना भेट द्यायला सांगावी. प्रसिद्ध व गर्दिने गजबजलेली मंदिरे म्हणजेच हिंदू धर्म असे नाही.

In reply to by संदीप डांगे

म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तुमच्या धर्मातील हेदभाव कबूल करणे, शिवाय हायलाइट करणे झाले असे नाही का ?

In reply to by माहितगार

नाही हो तसे नाही. मंदिरांबद्दल मी जे वर विवेचन दिले त्यानुसार काही मंदिरे खाजगी पद्धतीची आहेत. लोक तिथे गर्दी करतात म्हणजे ती लोकांची झाली असा अर्थ होत नाही. चित्रपटगृहांमधे लोक गर्दी करतात म्हणून तिथे वाट्टेल तसे वागण्याचा, किंवा तिथले नियम ठरवण्याचा अधिकार जाणार्‍या प्रेक्षकांना मिळत नाही. कुणाला प्रवेश द्यावा न द्यावा हे जसे चित्रमंदीर ठरवू शकते तसेच हे मंदिरही ठरवू शकते. टिकिट असणे म्हणजे प्रवेशास पात्र असणे हा साधा नियम तिकडे आहे, तर हिंदू असणे म्हणजे पात्र असने हा नियम इकडे आहे. ह्यात भेदभाव आहे असे मानणे चुकीचे आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' असे एखादा हिंदू मानतो म्हणून तुम्ही त्याच्या घरात घुसून राहणार हे योग्य नाही. भेदभाव आणि पात्रतानुसार प्रवेश ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत. मंदिरे आणि देव ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे मी आधीपासून सांगतोय. त्यात गल्लत होऊ देऊ नये. प्रवास हा प्रवास असतो पण गावातल्या एसटी स्टँडवर ज्या सहजतेने आपण फिरू शकतो, टिकट काढण्याची वेळ येईपर्यंत बसमधे बसू शकतो, तितक्या सहज कुठल्या एअरपोर्ट वर नाही फिरू शकत. म्हटले तर दोन्ही पब्लिक प्लेस, सार्वजनिक स्थळ आहेत. मग तिथेही भेदभाव समजायचा का? प्रवास म्हणजे हिंदू धर्म आणि मंदिरं म्हणजे एअरपोर्ट, बसस्थानकं असं समजा. (फार गुंतागुंत होतेय का? फारच दृष्टांतहेवी प्रतिसाद होतोय, माफी असावी)

In reply to by संदीप डांगे

सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे.

In reply to by बॅटमॅन

सरसकट कुणालाही गाभार्‍यात सोडणे आणि निव्वळ मंदिरात अलाउ करणे यात फरक आहे की नाही? हो. फरक आहे. फक्त मंदिरप्रवेश करू दिला तरी बास आहे. तेवढंही कबूल करवत नसेल तर हाईट आहे. बरोबर. माझ्यामते नियम जर असतील तर ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. अन्यथा तो सरळ भेदभाव आहेच. म्हणजे माहितगार म्हणत आहेत ती आफ्रिकन व्यक्ति जर सहज टूरीस्ट म्हणून मंदिरात आली आणि तीला प्रवेश नाकारला पण तीच व्यक्ती कुणा केंद्रिय मंत्र्यासोबत आली आणि तिला गाभार्‍यात घेऊन गेले तर हा भेदभावच झाला. मला वाटते इंदिरा गांधीसोबत जे त्या मंदिराने केले तेवढे कडक नियम कुणी मंदिर पाळत असेल तर तो भेदभाव समजू नये. अन्यथा हाईट आहेच.

In reply to by संदीप डांगे

कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.

In reply to by बॅटमॅन

अमेरिका/ गोव्यातल्या/केप टाउन चर्चमधे (डोक्यावर टोपी न ठेवणे की संपले) व सिंगापूर /थायलंड मधील बौद्ध मंदिरात (पादत्राणे न घालणे की संपले), मला प्रवेश मिळाला, फोटो सुद्धा काढता आले. (कोणीही जात धर्म विचारला नाही). गुरुद्वाराच्या लंगर मधे जेवलोय (कोणीही जात धर्म विचारला नाही).

In reply to by बॅटमॅन

हेच मी स्वतः शिवथर घळला अनुभवले आहे. सुमारे २०-२२ वर्षांपूर्वी (जेव्हा थेट नेट सेल्फी) इफे़क्ट नव्हता तेव्हा.. माझ्याबरोबर आम्च्या कंपनी समूहात दोन मुस्लीम २ केरळीयन ख्रिषचन यांनाही विना अटकाव प्रवेश दिला होता. शिवथर घळ हे संपूर्णतः खाजगी आहे असे मला वाटते तिथेही तुम्ही कुठल्या धर्माचे आहात हे विचारत नाहीत (किमान आम्हाला तरी विचारले नाही) फक्त पोषाख सभ्य असावा असा संकेत असावा.(किंवा मधल्या काळात काही वावगे घडले असावे म्हणून पेहरावाबद्दल काही नियम बन्विले असावेत). भेदभाव करणे कुठेही वाईच धाग्यावर आणि मंदीरातही...... लाईनीत (थांबण्याची सक्ती न करता लांबूनही नमस्कार)नमस्कारी नाखु

In reply to by संदीप डांगे

कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो. बाकी नियम कसाही असो मात्र पुजार्‍यांनी शिव्या देणे म्हणजे हाईट आहे. असे अनुभव वाईटच.

In reply to by बॅटमॅन

कडक नियम असतील तर असोत, मात्र सर्वांना सारखेच असोत काही बाबतीत. गुरुद्वार्‍यात पहा, तुमचे जातधर्मलिंग कोणी विचारत नाही. अंग झाकणारे कपडे घातले आणि डोके झाकले की संपले. असेच इथेही असावयास हरकत नसावी असे आपले मला वाटते. असो.
अ. कडक अथवा सौम्य, जे काही नियम असतील त्यांची कमाल व्याप्ती नागरिकाला एखाद्या खाजगी, प्री-डिफाईन्ड सीमारेषा असलेल्या जागेत प्रवेश नाकारणे इतकीच असेल आणि ब. या जागी न जाण्याने त्या व्यक्तीच्या अन्न वस्त्र निवारा यांपैकी एक अथवा अनेक गरजा बाधित होत नसतील किंवा या गरजांना मिळवण्याचा एकमेव मार्ग खंडित होत नसेल. आणि क. स्वतःच्या आवारात तसे किंवा कोणतेही नियम करण्याची पूर्ण कायदेशीर मान्यता नियम बनवणार्‍या बॉडीला त्या देशाच्या मुख्य कायदेशीर संस्थेने दिलेली असेल. तर कोणतेही नियम चूक ठरणार नाहीत / ठरु नयेत. आणि तसं नसेल तर सर्व नियम चूक ठरतील / ठरावेत. मग ते वस्त्र, लिंग, वर्ण, धर्म, भाषा, उंची, वजन, केसांची लांबी, आहारपद्धती, लैंगिक ओरिएन्टेशन किंवा अन्य कोणत्याही व्हेरिफायेबल पॅरामीटरवर आधारित असोत. बाकी कितीही काही बोललं तरी निरुपयोगी.

In reply to by गवि

म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का? मध्यंतरी कर्नाटकातील एका मंदिरातल्या गलिच्छ प्रथेबद्दल बरेच काही छापून आले होते. ब्रह्मवृंदाचे जेवण झाल्यावर त्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्यांवर लोटांगण घालत प्रदक्षिणा घालण्याचा प्रकार तिथे अगोदरपासून आहे. हाही कायदेशीर प्रकार आहे, कुणाच्या कसल्या हक्कावर गदा वगैरे येत नाही. पण यावर बंदी घालण्यात आली. आणि ते मलाही समर्थनीय वाटते. बर्‍याच जणांनी विरोधही केला, कैकांनी समर्थनही केले. नेमके देवळाचे नाव आठवत नै नैतर लिंक दिली असती. बाकी हा मुद्दा अंमळ भावनिकही आहेच. काही प्रमाणात अ‍ॅक्सेस ओपन केल्यास अजून बरे होईल असे बर्‍याच जणांना वाटते, तदनुरूप अनेक लोकांनी चळवळी केलेल्या आहेत आणि त्यांना कमीअधिक प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यामुळे यात निरुपयोगी असे काही वाटत नाही.

In reply to by बॅटमॅन

मंदिरनामक जागा केंद्रस्थानी ठेवून समाज त्याविषयी काय निर्णय घेतो हे समाजावर बंधनकारक असते. संपूर्ण समाजाने (यात स्त्रिया-पुरुष, दलित-उच्चवर्णिय, श्रीमंत-गरीब सगळे आले) स्त्रियांच्या गाभाराप्रवेशावर बंदी घातली तर तेही बरोबर, उठवली तरी बरोबर. पण समाजातले काही विशिष्ट घटक आपले स्वार्थ साधण्यासाठी, असमतोल मानसिकतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरीत समाजाला फसवत असतील आणि त्यायोगे काही भेदभाव घडत असेल तरच तो चुकीचा ठरेल. बाकी तुम्ही म्हणताय त्या अनिष्ट प्रथा ह्या सहज भावनेतून सुरु झालेल्या, पुढे विकृत रुप घेतलेल्या असतात. त्यांच्यावर प्रबोधनासह बंदी घालणे आवश्यकच आहे.

In reply to by संदीप डांगे

फसवणे म्हणजे काय? आर्थिक फायदा करून घेणे वगैरे? तसे असेल तर मग दलितांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात पुरोहितांचा तरी आर्थिक फायदा काय होता? उलट त्यांना अलाउ केले असते तर त्यांनीही दाने दिलीच असती की. तस्मात निव्वळ फसवणूक असेल तरच चूक ही व्याख्या अपुरी आहे असे वाटते. पण हा मुद्दा बर्‍याच अंशी सब्जेक्टिव्ह आहे हेही तितकेच खरे.

In reply to by बॅटमॅन

फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच असे नाही. खरे न सांगणे, सत्य दडवून ठेवणे, मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन दमदाटी करणे. 'एखादा अधिकार तुम्हालाही उपलब्ध आहे' हे जातीपातीच्या पूर्वग्रहातून निम्नजातींना न सांगणे ही फसवणूकच आहे. एक उदाहरण देतो. मी आणि माझ्या मित्राने अमेरिकेतल्या कुठल्या युनिवर्सिटीला अप्लाय केले. पण प्रवेश मिळेल की नाही हे तिथे गेल्यावरच समजते अशी अट आहे. माझा मित्र तिथे आधीच गेलेला आहे. काय निकाल आहे हे त्याने मलाही कळवणे अपेक्षित आहे. पण इर्ष्येतून, सामाजिक सन्मानाच्या हेतूने त्याने मला 'तुझा नंबर लागला नाही' असे चुकीचे सांगितले. मला त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्याने मी तोच निकाल खरा मानला. यात माझे नुकसान झाले. म्हणजे मला फसवले असेच म्हणेन ना मी? माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे. मंदिरव्यवस्थापनाच्या इतिहासाबद्दल मला तेवढे इत्थंभूत ज्ञान नाही. याविषयी जास्त माहिती मिळाली तर ह्या बंदीप्रथा कुठून उपजल्या हे शोधता येईल.

In reply to by संदीप डांगे

@माझ्यामते मंदिरांमधे विशिष्टांना प्रवेशबंदी ही खाजगीकरणातून आलेली आहे.>> आहो कुठचं काय आलय खाजगीकरण.? ही अस्पृश्यता पाळली जाते सरळ सरळ! ह्याला पोथ्यांचाही आधार असतो.. देवाची पॉवर कमी होइल्,अमके तमके शिवल्यानी..असली मूर्ख टनाटनी गणित असतात...ह्या देवाला शिवू न देण्याच्या प्रथांमागे.. आतल्या गोटातून ,माहिती घ्या ..मग कळेल

In reply to by अत्रुप्त आत्मा

अहो, अस्पृश्यता म्हणजेच खाजगीकरण. तेच म्हणायचे आहे. हे देवाची पावर कमी होईल वैगेरे बालीश कारणं देण्यामागे जी काय मानसिकता आहे ते म्हणजे खाजगीकरण. खरेतर अस्पृश्यता, देवाची पॉवर इतकी वरवरची कारणं बघण्यापेक्षा माणसाच्या अंतर्मनात ह्या गोष्टी निर्माण होण्यामागे आणि चराचरात देव आहे ह्या भावनेच्या विरूद्ध वागण्यामागे काय इतिहास असावा, कुठून सुरू झालं, नेमकं काय कारण असावं यावर विचार करतोय. काहीतरी आहे जे इतरांपासून लपवून, सुरक्षित ठेवायचं आहे. कुणाला तरी काही तरी फायदा असल्याशिवाय ह्या मान्यता व भेदभाव निर्माण होणार नाहीत. नुसतं 'आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ' एवढ्याशा भांडवलावर ही व्यवस्था इतकी शतके चालू शकत नाही. गूढत्वाच्या भांडवलावर असेल तरी सुरुवातीस काहीतरी अनुभव आल्याशिवाय लोक मानणार नाहीत. म्हणजे दहा समान दर्जा असलेल्या व्यक्ती प्रवासाला निघाल्या पण रस्ता माहीत नाही, त्यातल्या प्रत्येकाने प्रयत्न करून पाहिला पण एकाचेच रस्त्याबद्दलचे अंदाज दोन-तीन वेळा सलग बरोबर निघाले की तोच त्या गटाचा म्होरक्या होतो. मग भलेही पुढचे सगळे अंदाज चुकत गेले तरीही पुर्वसंचितानुसार त्यालाच तो मान मिळतो. पुढे इतरांची मते लक्षात घेऊन तो अंदाज वर्तवेल पण शेवटपर्यंत इतर लोक त्यानेच आपल्याला कसे योग्य मार्गदर्शन केले ह्यावर विश्वास ठेवतील. चातुर्वर्ण्य व्यवस्था होऊन ब्राह्मण सर्वश्रेष्ठ ठरवण्यामागे ब्राहमणांचे असेच काहीसे योगदान कारणीभूत असेल काय? ज्याचा गैरफायदा घेऊन जन्मनिहाय व्यवस्था निर्माण झाली आणि पुढे श्रेष्ठ कनिष्ठ चे मत मानवी मनाच्या विकृत बाजूचे दर्शन करत प्रभावी झाले. मूळावरच घाव घातला तर फांद्या आपोआप तुटून पडतात. बाजीरावपेशव्यांनीच सांगितलंय. म्हणून मूळ शोधावे. ते मनुस्मृतीच्याही पलिकडे असावे. जाणकारांच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बॅटमॅन

म्हणजे या न्यायाने दलितांच्या मंदिरप्रवेशाबद्दलची सर्व आंदोलने आणि महिलांच्या गाभाराप्रवेशाबद्दलची आंदोलने निरुपयोगीच ठरावीत, नै का?
माझा प्रतिसाद परत वाच. आजरोजीविषयी बोलायचं आहे. अ. जागा खाजगी आहे की सार्वजनिक मालकीची? ब. प्रवेश रोखणारा नियम अलिखित आणि लोकल पुजार्‍याने / बडव्यांच्या गटाने आपसात ठरवून केला आहे की मंदिराच्या ट्रस्टने अधिकृत ऑथॉरिटीसह केलेला आहे? यावर ते वैध की अवैध ते ठरेल. कधी भावना, कधी कायदा अशाने बरेच घोळ होतात.

In reply to by गवि

गाभाराप्रवेशाची आंदोलने गेल्या पाचेक वर्षांत झालेली आहेत. कर्नाटकातले उदाहरणही अलीकडचेच आहे. बाकी अधिकृत अ‍ॅथॉरिटीने घेतलेला निर्णय तांत्रिकदृष्ट्या वैध असला तरी योग्य असेलच का? ते अय्यप्पा मंदिरात पाळीवाल्या स्त्रिया ओळखण्यासाठी स्कॅनर बसवायचा निर्णय समजा उद्या अगदी अधिकृतपणे घेतला तर तुम्ही त्याला योग्यच म्हणाल का? वैध आणि योग्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दरवेळेस एकाच एक चौकटीत अशा गोष्टी पकडता येत नसल्या म्हणून नुस्ता घोळ आहे असे नाही.

In reply to by बॅटमॅन

पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी म्हणून देवापुढे गार्‍हाणे मांडतात, सेवा करतात तोपर्यंत ठिकच असते. जेंव्हा ते स्वतःला देवाचे प्रतिनिधी समजू लागतात तेंव्हाच अवघड होते. अशावेळी व्यवस्था त्यांना बदलते किंवा ते व्यवस्था बदलतात.

In reply to by संदीप डांगे

@ डांगेजी
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
काय होतय १) अनेक ऑदरवाईज सार्वजनिक असलेली मंदिरे/प्रार्थनास्थळे केवळ भेदभावाच्या सोईसाठी म्हणून खासगीपणा पुढे केला जाताना दिसतो यात कुणाच्या व्यक्तीगत घरात जाण्याचा तसा प्रश्न नाही आणि 'अतिथी देवोभव' म्हणणार्‍या संस्कृतीत अगदी घरातल्या मंदिरा बाबत सुद्धा भेदभावयूक्त व्यवहार आदर्श कसा म्हणता येईल ? २) मी समोरच्या परधर्मीय व्यक्तिशी माझ्या संस्कृतीतील उदात्तते बद्दल बोलणार आणि नंतर हजारो लोक जात असलेल मंदिर खासगी आहे आणि तुमच्या बॅकग्राऊंडमुळे प्रवेश नाही असे सांगणार यात माझ्या संस्कृतीच्या उदात्ततेच प्रदर्शन होत की कोत्या मनोवृत्तीच प्रदर्शन होते आहे?
म्हणून जिथे अपात्र ठरू तिथे न जाता जिथे पात्रतेचे निकष उपलब्ध नसल्याने खुला प्रवेश आहे तिथे जाणे इष्ट असे माझे मत.
मी माझ्या धर्माचा संस्कृतीचा अभिमान ठेवतानाच, सहिष्णूता बाळगाणारा समधर्म समभाव बाळगणारा व्यक्ती आहे, मला माझ्या प्रमाणेच माझ्या मुलांमध्ये सहिष्णूता वृद्धींगत व्हावी आणि इतर धर्म आणि विचार पद्धतीचा परिचय व्हावा म्हणून माझ्या मुलांना विवीध धर्मांच्या धर्म स्थळांना भेटीस न्यावयाचे आहे त्यावेळी मुलांनो अमुक अमुक मंदिरे/प्रार्थनास्थळांमध्ये तुम्ही तुमच्या बॅकग्राउंडमुळे प्रवेशासाठी अपात्र आहात हे सांगणे नेमकी कोणती गोष्ट बाल मनांवर बिंबवते ज्यांना धर्मंच्या दुकानांवरच्या प्रवेश नाकारणार्‍र्‍या असहिष्णु पाट्या पाहून त्या मुलांकडून मोठे झाल्या नंतर सहिष्णूतेची अपेक्षा करणे कितपत रास्त ठरते या बद्दल मी साशंक आहे. असो.