Skip to main content

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

लेखक माहितगार यांनी सोमवार, 30/11/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद

वाचने 74857
प्रतिक्रिया 322

प्रतिक्रिया

In reply to by कवितानागेश

धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन वेगवेगळे मुद्दे मांडलेत. मला तरी दोन्हींची सांगड कशी घालावी हे कळले नाही. माझ्यामते 'समानतेचे तत्त्व' पुरुषवर्गाला समजावून सांगण्यात स्त्रिया कमी पडतात असे त्यांना म्हणायचे आहे. आता समानतेचे तत्त्व न पाळणार्‍यांमधे स्त्रि-पुरूष असा काही भेद दिसून येत नाही. त्यामुळे तो मुद्दा रद्दबातल होतो. बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल. शिर्षक वादग्रस्त असावे याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटत आहे. धागालेखकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

In reply to by संदीप डांगे

बहुतेक 'पुरूषांसोबत अर्ग्युमेंट मधे स्त्रिया कमी पडतात' असे त्यांना म्हणायचे आहे काय असा मला प्रश्न पडला कारण मग हा जरा गंमतीदार विषय होइल.
=)) अहो काहीही काय ? =)) एनीवे हा विषय या धागा लेखाच्या परिघातला नाही. बाकी धागा लेखाचा मुद्दा क्रमांक १ तुर्तास चर्चेसाठी पुरेशी हिंट देणारा आहे असे वाटते. अधिक स्पष्टीकरण म्हणजे प्रश्नही मीच विचारला उत्तरही मीच दिले होईल म्हणून चर्चा बरिच पुढे गेल्यावर अथवा संपताना देईन.

In reply to by कवितानागेश

" शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे." मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता या विषयी काही उपयुक्त माहिती मिळेल म्हणून, पण हे 'उल्लू बनाया बडा मजा आया' असं झालं आहे. बाकी जिथे आपलं स्वागत आहे तिथे जावं, जिथे नाही त्याचा विचारही करू नये असं आमचं तत्व. आमच्या आवडत्या तळ्यातल्या गणपतीचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात, तिथे जाऊन डोकं टेकून यायचं. दर्शनासाठी न येता कचरा करायला येणार्‍या बुरखेधारी भक्तांना नो एंट्री, असा फलक न लावलेलं सहिष्णू देवस्थान आहे ते.

स्त्रियांना किंवा अन्य कोणालाही मंदिर प्रवेशापासून रोखणे अयोग्य आहे याविषयी फारसे दुमत नसावे. पण मंदिरात जाऊन काय होते, सगळी मंदिरे बंदच करा वगैरे विचार असणारे लोक हमरीतुमरीवर येऊन चर्चा करताना दिसले की जरा मजाच वाटते. समजा माझे असे मत आहे की दारूचे गुत्ते बंद करून टाकावेत आणि कुठल्या दारूच्या गुत्त्याने "ट्रुमन अडनावाच्या लोकांना प्रवेश नाही" अशा स्वरूपाची पाटी लावली तर त्यामुळे मला काय शष्प फरक पडणार आहे? अन्यथाही मी तिथे जाणार नव्हतोच त्यामुळे बंदी असली काय आणि नसली काय--- हू केअर्स? मंदिरांविरोधात असे मत नसणार्‍या इतर सर्वांचे आक्षेप मात्र नक्कीच ग्राह्य आहेत असे मला वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी हे स्पष्ट भेदभावाचे निदर्शक आहे' हा चुकीचा ग्रह काहिजणांनी करून घेतला आहे असे दिसून येते आहे. त्यामुळे लगेच सामाजिक न्यायतत्त्वानुसार सर्वांना समान हक्क, दर्जा ह्याची भलामण करून सर्वांना मंदिरप्रवेशाचा आग्रह धरला जात आहे. पण हे इतके सरळ, साधे सोपे आहे काय? खरा मुद्दा साधनशुचितेचा आहे. वर काहींनी कपड्यांचे उदाहरण दिले आहे. कुणी बिकिनी घालून मंदिरप्रवेश केलेला चालेल काय? पुरुषांनी भले अंतर्वस्त्रांवर ओलेते गेले तर चालते, पण स्त्रियांनी तसेच करावे असा आग्रह धरून चालेल काय? तिथे समानतेचा आग्रह केला तर मान्य होईल काय? चपला, बूट घालून गेलेले चालेल काय? गुत्त्यात जायचेच नसेल तर प्रश्नच मिटतो पण ट्रुमन यांना गुत्त्यात जायची इच्छा आहे पण वय २१ पेक्षा कमी असल्याने प्रवेश नाकारला जाईल, त्यावेळी सामाजिक समानतेचा मुद्दा का लागू होत नाही हे सांगता आले तर बर्‍याच बाबी स्पष्ट होण्यास मदत होईल. तीच गोष्ट संवैधानिक पदांवरील व्यक्तिच्या वयाच्या अटीची, सरकारी नोकरीच्या पदावरील शैक्षणिक अर्हतेच्या अटीची. प्रत्येक जागी सरसकट प्रवेश नाकारणारे इतर मुद्दे असतात. तिथे भेदभाव होतो असे कसे म्हणता येईल?

या निमित्ताने उहापोह होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे. खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश नव्हता अगोदर, पाळी ऑर नॉन पाळी. तो ब्यान उठल्याचे कळते, तसेच इथेही होईल मोस्टली होपफुली.

शनि मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदीचे कारण कळल्यास ह्या विषयावर अजून विस्तृत व समर्पक चर्चेस मदत होईल म्हणून सामान्य जनमानसात रूढ असलेल्या काही मान्यता: स्त्रियांच्या शनिमंदिर प्रवेशाला खरा कारणीभूत आहे तो मारूतीराया. कसा? तर मारुतीराया, हनुमान हा आजन्म ब्रह्मचारी आहे, शिवाय तो चिरंजीव आहे, परत तो सर्वव्यापी-विशाल आहे. 'हनुमानतत्त्व' असं काही मानल्या जातं. समर्थांनी महाराष्ट्रात शेकडो ठिकाणी, गावोगावी मारुतीची प्रतिष्ठापना केली. गावात बलोपसाना व्हावी, त्यातून भक्ती आणि शक्तीची उपासना होऊन चांगले तरूण तयार व्हावे अशी त्यांची योजना. दुसरी मान्यता अशी की गावात मारुतीचे मंदीर असेल तर भूत-प्रेत-पिशाच्च यापासून गावाचे रक्षण होते. तीसरी मान्यता अशी की हनुमान हा जागृत देव आहे. म्हणजे त्याचे आवाहन केले तर तो खरंच त्या ठिकाणी येऊन भक्तांच्या समस्या दूर करतो. तो असे करु शकतो ही मान्यता इतकी घट्ट आहे कारण तो अजून जीवंत आहे, त्याला वेगवेगळे आकार, अवस्था घेता येतात ही मान्यता. त्यामुळे शक्यतो हनुमानमंदिरात गांभिर्य जास्त असते. तो इथेच आसपास आहे, आपण काही उलट सुलट केले तर कानफाटवेल अशीही भीती असते. चौथी मान्यता अशी की हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात. इतके त्याचे वीर्यतेज बलवान आहे. आता आपल्या लक्षात येईल की याचमुळे कुमारी मुलींना हनुमानमंदिरात बंदी असायची. (असायची असे म्हटले आहे कारण गेल्या १०-१५ वर्षात विचारधारा बदलत गेल्या). अघोरीसदृश्य तंत्रविद्येत मूल न होऊ शकणार्‍या स्त्रीने अनावृत्त अवस्थेत जाऊन मध्यरात्री हनुमानाची विशिष्ट तंत्राने पूजा करून हनुमानत्त्व जागृत करून त्यास प्रसन्न करणे व गर्भवती होण्याची इच्छा पूर्ण करणे असेही विधी आहेत. ह्याचे एक उदाहरण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. म्हणजे मध्यरात्री स्त्री हनुमान मंदिराकडे जातांना पाहिली आहे. ते सर्व दृश्य पार टरकवणारे असते, त्यामुळे पुढे काही बघायची हिंमत झाली नाही. तेव्हा माझे वयही १५-१६ होते. हेच वीर्यतेज नव्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणार्‍या नवरदेवाच्या अंगात संचारावे म्हणून लग्नाआधी नवरदेवाला हनुमानमंदिरात दर्शनाला घेऊन जाण्याची प्रथा आहे. आजकाल मानवी अहंकार वाढल्याने ह्या प्रथेचे कारण विचित्रपणे बदलल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. म्हणजे स्वतःमधे काहीच कमतरता नाही हे दाखवण्यासाठी त्याच्या विर्यतेजाची मला गरज नाही असे म्हणून त्याचे लग्न झाले नाही त्या बिचार्‍या ब्रह्मचार्‍याचा आशिर्वाद चांगला असेल म्हणून दर्शनाला आलो असं काहीसे. एवढं सगळं लक्षात घेतलं तर स्त्रियांनी हनुमानापासून दूर राहावे यामागचे कारण समजुन येईल. आता शनीमहाराजांनी काय घोडं मारलं? तर कुठल्याशा पुराणकथेनुसार शनीमहाराज हे हनुमानाचे अंकित आहेत, साडेसातीत त्रास कमी व्हावा म्हणून शनीसोबतच हनुमानाचीही उपासना करावी म्हणजे हनुमानजी शनीला तंबी देऊन आपल्या भक्ताचे त्रास कमी करून देतात. हनुमानजी आणि शनी हे एकसारखेच मानले जाऊ लागले. ३०-४० वर्षांआधी शनीमंदीर हे काही फार प्रस्थ नव्हते. एखाद्या गावात एखादे दुर्लक्षलेले शनीमंदीर असायचे. आता ते दुर्लक्षलेले नाही हा भाग वेगळा. पण हनुमानमंदिरापेक्षा शनीमंदिरास कमी महत्त्व होते, जे लोक साडेसातीने त्रस्त आहेत तेच तिथे पुजेला जात. पण तिथे गेल्यावरही हनुमानाचेच नियम लावत. परत शनीमहाराजांची कडक असल्याबद्दलची ख्याती. ह्यामुळे स्त्रियांना प्रवेश नाकारणे घडत आले आहे. ह्यात कुठेही भेदभाव, असमानता वैगेरे नाही. अनेक ठिकाणी आता स्त्रिया न घाबरता प्रवेश करत आहेत. काही हनुमान-शनी मंदिरांत अजून कर्मठ व्यवस्था आहे. हळूहळू सर्व बदलणारच आहे. वरील सर्व जनमान्यता आहेत. वैज्ञानिक सत्ये नव्हेत त्यामुळे चर्चा करतांना ह्याचे भान असणे गरजेचे.

गवि सर, तुमच्या टंचनिकेची- दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की- बहिण डांगे अण्णा कड़े पाठवली आहे ना? खरं सांगा सर.

दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि तत्त्वज्ञानात बऱ्यापैकी पक्की
हे दोन्ही फीचर्स नेहमीच गो टुगेदर असतात का?

In reply to by बॅटमॅन

चाल तीच- हट्टीकट्टी ... लुळीपांगळी ... आत्ता मुद्दा डांगे अण्णा कडे आलेल्या टंचनिकेचा आहे. कीप फोकस.

In reply to by बॅटमॅन

आपणास मुद्दा समजलेला नाही. डांगे साहेबांचे मेगाबाइटी प्रतिसाद हा आनंदाचा विषय नाही का बरे वाटत तुजला? त्यासाठी लागणारं विचारांचं पककं अधिष्ठान, शब्दाची अचूक निवड आणि तत्पर इंटरनेट सेवा याचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळत आहे. मान गये!

स्त्रिया काही बोलत नाहीत म्हणून काढलेल्या धाग्यावरही स्त्रिया काही बोलत नाहीत, असे का?

In reply to by संदीप डांगे

मितान बोल्लीये ना वर.. शिवाय तुम्ही सगळे मान्यवर आहातच.. चालु द्या.. मस्त चाल्लीये चर्चा!

In reply to by पिलीयन रायडर

हो ना, शिवाय विद्वान मंड्ळींना मेगाबायटी चर्चा करण्यास एनर्जी मिळावी म्हणून त्यांची पोटा-पाण्याची सोय, स्वयंपाकपाणी, घरकाम, मुलांचे संगोपन, राहिलेल्या वेळेत ऑफिस इ. फुटकळ कामे करण्यात वेळ घालवतात हो या स्त्रिया.. त्यांची बुध्दी तेवढीच शेवटी.

In reply to by संदीप डांगे

डिस्ट्रक्ट केलं का मी, अजून पुष्कळ महत्वाचे प्रतिसाद राहिले असतील नाही .. ? सॉरी हं, प्लीज कॅरी ऑन हं. .

In reply to by नीलमोहर

आपण आपले कर्तव्य अचूक बजावत आहात. त्यामुळे तुम्हीही कॅरी ऑनच करा... (रच्याकने, मेगाबायटी प्रतिसाद आपल्या बाजूने आहेत की विरोधात आहेत हे समजून घेऊन त्यावर टिप्पणी करावी इतकी माफक अपेक्षा जगङ्व्याळ कामात बिझ्झी असलेल्यांकडून करणे अंमळ जास्त आहे, त्यामुळे तो प्रयत्न सोडून दिला)

In reply to by संदीप डांगे

आमच्या बाजूने किंवा विरोधात मेगाबायटी प्रतिसाद देण्यासाठी व्होटींग पोल आम्ही काढला नव्हताच मुळी. आमच्या बाजूने किंवा विरोधात कितीही मेगाबायटी प्रतिसाद आले तरी त्याने काय फरक पडणार आहे .. ? मुळात स्त्रियांना कमी लेखणे बंद झाल्याशिवाय समाजात सुधारणा होणे अवघड आहे हे कोणा कोणाला सांगणार आणि सांगून समजणार का हा मोठा प्रश्न आहे. असो. धन्यवाद.

In reply to by नीलमोहर

अगं तसं नाही नीमो मुळात आपल्याला तत्त्वज्ञान कळत नाही, त्यात एवढ्या विद्वानांच्या समोर काही बोलायचं म्हणजे.... जाऊ दे बाई, मालक येतील मजुरीवरून. भाकरी थापायला घेते नाहीतर जोडे पडतील ;)

In reply to by अभ्या..

मागचे ऑर्डरचे टी-शर्ट झाले नैत अजून अन् गाऊन डीझाइनचं प्रॉडक्शन सुरू करताय काय...? नै लै बारिक बारिक चवकशी चालू आहे म्हणून विचारलं ब्वॉ...

या शनिवारी, माहितीगार यांचा, तेलाची वाटी आणि वडाच्या पानांचा हार घालून सत्कार करण्यात येत आहे हो.

In reply to by माहितगार

150 प्रतिसादानिम्मित्त आपला शनिमाहात्म्यची 7.5 प्रती देवून सत्कार करण्यात येत आहे.

In reply to by पगला गजोधर

+

In reply to by पगला गजोधर

as २०० निम्मित धागालेखकास 'शनि महिमा ची सी डी', व शिर्डी ते शिंगणापूर जीपडी चे भाडे म्हणून रोख ५१ रु., व छायाचित्रातील शनिदेवा बरोबर सेल्फी ची संधी देवून, सत्कार या ठिकाणी कलेला आहे.

In reply to by माहितगार

आपणास प्रसिद्ध देवस्थानातील बसाल्ट जातीच्या दगडाचा छोटा तुकडा (स्नानाच्या वेळी अंग घासतात तो), शेन्दुर न फासता व टोपी टॉवेल देवून सत्कार करण्यात येत आहे. basalt

शनि हि उग्र देवता आहे. शनीला रजस्वला स्त्रीच काय पण स्त्रीची सावलीही चालत नाही हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे कोणी सांगेल का ? . स्त्री म्हणू तिचा दुस्वास करायचा ह्या गालीछ गोष्टी सामान्य माणसांकडून घडतात. देवाकडून नव्हे . असं असतं तर देवाने स्त्री निर्माणच केली नसती . शनिमहाराज हि कर्माची देवता आहे . आणि ती ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देत असते . स्त्री आहे कि पुरुष हे बघून नव्हे . समस्त स्त्रिया शनि महाराजांना आपल्या मात्या पित्याच्या स्वरुपात बघत असतील तर लेकराला आईजवळ जाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण ? केवळ ४०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही . ह्या परंपरा पुरुषांनी स्वताच्या स्वार्थासाठी निर्माण केल्या आहेत . त्या मुलीने तेल वाहिल्याने काही फरक पडला का ? आभाळ कोसळलं का ? तिलाही काही फरक पडला नाही कि शानिलाही नाही . बाकीच्याच लोकांची च्याव च्याव चाललीये . स्त्रियांना आणि समाजातल्या काही लोकांना दुय्यम स्थान देण्यासाठी उच्चवर्णीयांनी ह्या वांझोट्या प्रथा निर्माण केल्या आहेत .त्या बंद झाल्याच पाहिजेत . महाराष्ट्रातल्या सर्व स्त्रियांनी मिळून शनीच्या चौथर्यावर जावून अभिषेक करावा . बघू प्रलय बिलय येतोय का . महाराष्ट्राबाहेर स्त्रिया सर्रास मूर्तीला स्पर्श करून शनीची पूजा करतात . आणि मुख्य म्हणजे शनिमंदिर हि आपली personal property असल्यासारखं शनिशिन्ग्नापुरचे लोक बोलत आहेत . देवीच्या गाभार्यात पुरुष पुजारी असतात . परपुरुशांनी देवीला स्नान घातलेलं, तिचे कपडे बदललेले , तिचा साजश्रुंगार केलेला चालतो का ? खरं तर हि प्रथा बंद करून सर्व देवी मंदिरांमध्ये स्त्री पुजारी ठेवायला हव्यात . गोकर्ण महाबळेश्वरलाही ही पद्धत आहे. पण सरसकट प्रवेशबंदी नाहीये. ऑ. गोकर्ण महाबळेश्वरला गेल्या वर्षीच जावून आलो आम्ही . मी आणि माझ्या बहिणीने अगदी शिवपिंडीला स्पर्श करून दर्शन घेतलंय. तिथे अशी काही प्रथा नाहीये . रजस्वला असलेली महिला कधीही मंदिरात तर जात नाहीच पण घरात देव्हार्याजवळ सुधा जात नाहीत . तेवढी अक्कल असते स्त्रियांना . ४ दिवस नियम पाळण वेगळं आणि आजन्म केवळ स्त्री आहे म्हणून चुकीचे नियम पाळण वेगळं.

In reply to by तुडतुडी

शनि हि उग्र देवता आहे. शनीला रजस्वला स्त्रीच काय पण स्त्रीची सावलीही चालत नाही हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे कोणी सांगेल का ? .
यग्क्झाटली… दुधाने शनीचे शुद्धीकरण करणारे, मंदिर विश्वस्त आणि गावकरीच, याविषयी माहिती देवू शकतील.
४०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .
करेक्ट पण
रजस्वला असलेली महिला कधीही मंदिरात तर जात नाहीच पण घरात देव्हार्याजवळ सुधा जात नाहीत .
हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे तुम्ही सांगाल का ? शिवाय जरी तुम्ही सांगू शकलात, तरी तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे 'xxx वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .'

नुकतीच दक्षिण भारताची सहल करू आलो . रामेश्वर आणि कन्याकुमारीला मंदिरात जायला , देवाचं दर्शन घ्यायला तिकीट आहे ५० रुपये . अरे हरामखोरांनो देव काय तुमच्या बापाची मालमत्ता आहे का ? देव सगळ्यांचा आहे . बाकीच्या पूजा बिज्या करायच्या असतील तर तिकीट लावणं समजू शकतं. पण नुसता देवाच्या मूर्तीकडे बघायला पैसे ? मग गरिबांनी दर्शना घ्यायचाच नाही का ?
हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात.
होय बरोबर आहे . पण ह्याचा अर्थ हनुमंत उठसुठ प्रत्येक स्त्रीला गर्भवती करतात असा अर्थ होतो कि काय ? साधा कॉम्मन सेन्स आहे . तसा असतं तर उच्छवासाने स्त्रीला गर्भवती करण्याची शक्ती असतानाही मैनावतीला त्यांच्यापासून पुत्रापाप्तीसाठी एवढी घोर तपस्चर्या करावी लागली नसती . अर्धवट लोकं कशातून काय अर्थ काढतील काही सांगता येत नाही .

In reply to by यशोधरा

ते खरंय मात्र हडळींची लक्षणीय वाढ चिंतनीय आहे. चर्चा नेहमीप्रमाणे 'चकवा' लागून भरकटली आहे.

माझं स्पष्ट मत आहे. भक्ती ही कंडिशनल असूच शकत नाही आणि तशी असेल तर ती भक्ती भक्ती नव्हे आणि तो देव देव नव्हे. दॅट्स ऑल.

अरे काय हे !! 140 प्रतिसाद एकाच पानावर,,कायतरी करा !!

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड का जातो ? कारण त्यांच्या तत्त्वात ज्ञान बसत नाही

१५०+ प्रतिसादांसाठी धन्यवाद. धागा लेखातील बहुतांश मुद्दे अद्याप चर्चेत येण्याचे बाकी वाटते आहे. शिवाय काही जणांनी द्वैत मताचा पुरस्कारही केलेला दिसतो आहे, अद्वैतींच बहुमत असूनही द्वैत सिद्धांताचा अद्याप फारसा प्रतिवाद दिसत नाहीए. गापैंच्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक २ बद्द्ल मंडळींच काय म्हणण आहे, कुणाला काही वेगळी बाजू मांडावयाची आहे का ?

गापैंच्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक २ बद्द्ल मंडळींच काय म्हणण आहे, कुणाला काही वेगळी बाजू मांडावयाची आहे का ?
म्हणजे मुळात निसर्गानेच शारिरीक भेदभाव केला? असे म्हणावयाचे .

तुमच्यासारख्या ( =समोरच्याला ) तत्वज्ञान समजणार नाही याची खात्री असल्याने स्त्रिया बय्राचदा याविषयी बोलत नसतील आणि यांना हा विषय अवघड आहे ही समोरच्या व्यक्तीची समजूत होते. आता तत्वज्ञानची व्याख्या =बिनकामाची/नसती चर्चा करत बसणे.जे स्त्रियांना करायचे नसते.

In reply to by कंजूस

आता तत्वज्ञानची व्याख्या =बिनकामाची/नसती चर्चा करत बसणे.जे स्त्रियांना करायचे नसते.
आयला, म्हणजे ती उणीदुणी काढत बसणे हे कामाचे असते की काय =))

In reply to by बॅटमॅन

हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष समानतेच्या युगात पुरुषही हे काम करण्यात कुठे मागे दिसत नाहीत हे वारंवार सर्व धाग्यांवर मिपावरदेखील दिसतेच आहे ;) बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने त्या संस्थळावर बाष्कळ बडबड करुन स्वतःच्या तत्त्वज्ञानाचे प्रदर्शन मांडत नसाव्यात!

In reply to by टवाळ कार्टा

बालिश आणि बाष्कळ वर्तनाचे प्रदर्शन कोणत्या तत्त्वज्ञानात येतं? ते कोळून प्यायलेले महाभाग सर्वत्र सांडताना दिसतात हे तत्त्वज्ञान!

In reply to by अजया

@ अजया तै धागा लेखाच्या संदर्भाने एक गंभीर प्रश्न, पुरुषकेंद्रीत धर्मसंस्थेच्या तत्वज्ञानांशी स्त्रीया त्यांना ते तत्वज्ञान समानतेचे नसतानाही कुटूंबसंस्थेसाठी प्रॅक्टिकल आहे म्हणून जुळवून घेत असतात का ? बाकी हा धागा उद्देश केवळ संस्थळांवरील स्त्री सहभाग एवढा मर्यादीत नाही. धर्मसंस्थांच्या स्थापनेपासून आजतागायत स्त्री सहभागाबद्दल प्रश्न उपस्तीत करून स्त्री समानतेचेच्या प्रतिपादनार्थ अजून काय करू शकेल ? असाही आहे. बाकीची इतर चर्चा चालुद्यात.

In reply to by माहितगार

आज खूप कामात आहे.पण लिहिल्याशिवाय राहवत नाही. म्हणून धागा वाचून डोक्यात आलेले विचार म्हणून हा प्रतिसाद वाचावा.विस्कळीत असू शकेल. तत्त्वज्ञान शब्द आलाय म्हणून.तत्त्वज्ञान माझ्यासाठी काय आहे एक व्यक्ती म्हणून? ते कदाचित जगण्याचे शास्त्र म्हणता येईल.मग जी गोष्ट मला तार्किक सुसंगतता दाखवते,जिला विज्ञानाची जोड आहे ती गोष्ट माझे तत्त्वज्ञान होऊ शकते.म्हणजे तत्त्वज्ञान ही वैयक्तिक गोष्ट आहे.जी माझ्या वाचनाने,विचार करण्याने,जडणघडणीतून बनत आलेली असू शकते.त्यामुळे अर्थातच सर्व स्त्रियांना मंदिर प्रवेश इ बाबत का खटकले नाही.मला एक स्त्री म्हणून या अशा धार्मिक नियमांचा त्रास होतो का ,हे माझ्या तत्त्वज्ञानात बसते का? मग स्त्रिया याबाबत बोलत का नाहीत असे आपले तार्किक वाटले. मी वर उल्लेख केलाय प्रॅक्टिकल आहे म्हणून मी असमानता चालवून घेते का तर नाही.पण एखाद्या उथळ कृतीचे मी केवळ स्त्रीवादाकरीता समर्थन करु इच्छित नाही.कारण मला हे असे ग्रह तारे देवच मान्य नाहीत.तसेच देवाची भिती दाखवून केले जाणारे धार्मिक भांडवल जिथे आहे तिथे देवच नसतो हे माझे ठाम मत आहे.त्यामुळे मुळात मी अशा कोणत्याही ठिकाणी निव्वळ उत्सुकता म्हणूनही जात नाही.ज्या देवापुढे सर्व मनुष्य प्राणी समान असावेत तो असे नियम बनवणार नाही.केवळ स्त्रीला दबावात ठेवण्याकरीता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तयार झालेले हे नियम मोडणे नाहीतर त्यांच्या अस्तित्वाची दखलही न घेता स्त्रीने आपला धर्म पाळणे हे तिचे तत्वज्ञान असावे. पण विचार करणे ही पुरषाची मक्तेदारी स्त्रीने केवळ पुरुषाच्या अधिपत्याखाली रहावे अशा विचारसरणीत वाढलेल्या अनेक स्त्रीया असतात. त्या देवाधर्माची भिती,धार्मिक कौटुंबिक दबाव यासर्वात येऊन त्यांना ही असमानता पण बरोबर वाटू शकते.इथे तत्त्वज्ञान तिला कळणे हा इश्यू नसून ते कळण्याच्या परिस्थिती पर्यंत तिचे न पोचणे किंवा तिश्रा न पोचवणे आहे. यात पण मग काहीतरी चुकीचे आहे वाटणारा स्त्री वर्ग असतो.तो आपसात निषेध करेल.पण या गोष्टीवरून टोकाला जाणारे कौटुंबिक वाद स्त्री जाऊ दे ना नंतर कटकट नको म्हणून टाळू पाहील तर ती त्या त्या परिस्थितीत कदाचित बरोबर असू शकेल. बर्याचदा स्त्रीवर सर्व कुटुंबाची करिअरची जबाबदारी असते. तिथे दर क्षणाला एक प्रॅक्टिकल इश्यू तिच्यासमोर जर उभा असेल तर ती शनि देवा पेक्षा कामवालीचा आधी धावा करेल अशा स्थितीत असते.याला मी तिला तत्त्वज्ञान कळत नाही नाही म्हणू शकणार.आपली मतं किती धारदार आहेत या विषयावर त्याचप्रमाणात ती व्यक्त होईल.आणि हे व्यक्ती सापेक्ष असेल.म्हणूनच स्त्रीला तत्त्वज्ञान विषय अवघड जातो नाही म्हणू शकणार मी.परंतु तिच्या जीवनानुभवाने आलेल्या तत्त्वज्ञानाला ती शरण जाते म्हणू शकते!

In reply to by अभ्या..

व्यक्तीसापेक्ष गोष्टीबद्दल खुलासा हा स्वतःचे तत्त्वज्ञान सांगुनच करतात.दुसर्याचे ऐकून नाही.किंबहुना दुसर्याचे सांगण्यावरून स्वतःचे मत बनविणारे मूर्ख असतात असेही आमचे एक फेसबुकी तत्त्वज्ञान आहे.