रन फॉरेस्ट रन
मिपावर मध्यंतरी 'काही वेगळे चित्रपट' या धाग्यावर हॉलीवुडचे बरायचश्या सुंदर चित्रपटांचे उल्लेख मिळाले, त्यापैकी 'टॉम हँक्स' अभिनीत 'फॉरेस्ट गम्प' पासून सुरवात केली. निसर्गाने मानवाला बनवताना कोणते रसायन वापरले याचा उलगाड़ा अजूनही आपल्याला झालेला नाही, फॉरेस्ट गम्प मधून पुन्हा एकदा हे रसायन समजुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. विन्स्टन ग्रूम या लेखकाने लिहिलेल्या "फॉरेस्ट गम्प' याच शीर्षकाच्या कादंबरीवर हा चित्रपटला ऑस्करचे उत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, अभिनेता, संपादन इत्यादी एकूण सहा पुरस्कार मिळाले. प्रमुख भूमिकेत असणारा टॉम हॅन्क्स याला तर सर्वांगसुंदर अभिनयाकरिता सलग दुसऱ्या वर्षी "ऑस्कर' मिळाला होता. चित्रपटाची सुरवात होते तो जेनिला भेटायला आलेला फॉरेस्ट एका बस स्टॉप वर फ्लॅशबॅक मधे स्वताची गोष्ट सांगत असताना, बोलताना तो कायम, "My mumma always said" ने सुरवात करतो. त्याच्या सगळयाच गोष्टी निराळ्या होत्या, लहानपणापासून पायाला लागलेल्या सपोर्ट मुळे कायमच सगळ्यांचा चेष्टेचा विषय बननेला फॉरेस्टचा आईवर नितांत विश्वास आहे कारण त्याची ममा नेहमी त्याला सांगत असते, "लक्षात ठेव, तू इतर सर्वांसारखाच आहेस, थोडासुद्धा निराळा नाहीस.' पुढे शाळेत गेल्यावर त्याला मैत्रीण भेटते 'जेनी', हिच्या बरोबर त्याच मैत्रीच नातं अगदी मोरपिसाप्रमाणे आहे आसान फॉरेस्टला वाटतं आणि अगदी आयुष्यभर तो ते नातं तसच जपतो.एके दिवशी जेनी व तो रस्त्याने जात असताना केवळ त्रास देण्याकरिता तीन मुले सायकलवरून त्याचा पाठलाग करू लागतात. तेव्हा जेनी फॉरेस्टला सांगते, "रन फॉरेस्ट रन !'' तोही जीव एकवटून धावू लागतो-सुरवातीला अडखळणारा फॉरेस्टला तिचा आवाज जणू अनोखी ऊर्जा देतो तोही वेगाने, अधिक वेगाने धावू लागतो.सळ्या निसटून-गळून पडतात... पाय वाऱ्याचा वेग पकडतात आणि एका नव्या फॉरेस्टचा जन्म होतो.
कॉलेज मध्ये गेल्यावर या धावण्याच्या वेगाने त्याने अमेरिकन फुटबॉल च्या टीम मध्ये स्थान मिळते. यासगळ्यांमधे दूर निघून गेलेली त्याची बेस्ट फ्रेंड 'जेनी' एका बाजूने कायम त्याची सोबत करत असते. यथावकाश कॉलेज पासआउट होऊन फॉरेस्ट सैन्यात भरती व्हायला निघतो. व्हिएतनाम युद्धामधे आपल्या मित्रांचा जीव वाचवण्यासाठी फॉरेस्टला शौर्य पदक मिळतं, पण या सर्वांत, आपण जिवलग मित्र बूबा याला मात्र युद्धामध्ये वाचवू शकत नाही याचे एक शल्य राहते. पुढे त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे तो "बूबा आणि गम्प' नावाची मासेमारीची कंपनी तो सुरू करतो. यातही त्याला प्रचंड यश मिळतं. मग 'जेनी' पुन्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा जेनीला प्रपोज केल्यानंतर ती नकार देते तेव्हा टॉम हँक्स अर्थात फॉरेस्ट म्हणतो, "I an not smart, but i know what love is…" एखादया लहान मुलाने बोलावं इतकं निरागसतेने टॉम हे वाक्य म्हणतो. कदाचित या जान कुर्बान अभिनयासाठीच त्याला ऑस्कर मिळालं असणार. जेनिच्या रूपाने फॉरेस्टच्या आयुष्यात आलेला बहर ती निघुन गेल्याने जाते आणि यामुळे कोलमडलेला फॉरेस्ट नकळत पुन्हा एकदा धावायला सुरवात करतो अगदी न थकता न थांबता.....
सतत दोन-तीन वर्षे धावत असलेल्या फॉरेस्ट अचानकपणे थांबाव असं वाटतं, ज्या नकळतपणे तो धावायला सुरवात करतो त्याच नकळतपणाने थांबतो सुद्धा आणि म्हणतो,"मी आता दमलोय. मी घरी जाणार".
पुढे काही दिवसांनी त्याला जेनीच पत्र येते त्यात ती त्याला भेटायला बोलवते, तिथे त्याला जेनी सांगते की हां आपला मुलगा आहे जेनी त्याला त्यांच्या मुलाबद्दल सांगते तेंव्हा तो तिला विचारतो." Is he like me? she says no he is OK." हे वाक्य सांगून जाते कि त्याला त्याचातली कमतरता माहित असते.
चित्रपटाच्या शेवटी एका विस्तीर्ण झाडाखाली जेनीचे थडगे आहे. त्याच्याजवळ उभे राहून बापलेकांचे क्षेमकुशल तो थडग्यातील जेनीला सविस्तरपणे सांगतो आहे. त्याने तिला "सवडीने वाचण्याकरिता' एक पत्रही लिहिले आहे, तो ते वाचण्यासाठी तिथे ठेवतो तिथून परतताना आकाशात उडणारे पक्षी त्याचे लक्ष वेधून घेतात. लहानपणी दोघांनी मिळूनकेलेली प्रार्थना त्याला आठवते.
'सेविंग प्रायवेट रायन' म्हणा की 'दा विंची कोड' या मुळे मी टॉम हँक्स चा आधीपासूनच पंखा होतो पण 'फॉरेस्ट गम्प' पाहिल्यानंतर त्याच्यावर अजूनच जास्त जीव जड़ला अस म्हणायला हरकत नाही. माणसाने किती निरागसतेने अभिनय करावा. एकूणच काय संवाद म्हणा किंवा अभिनय सगळ्याचा लेवल वर 'फॉरेस्ट गम्प' आपली छाप नकळत पाडतो. आयुष्यात नक्की पहावा असा हा चित्रपट.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फार आवडता चित्रपट. परत पाहिला
सुदर सिनेमा आहे हा ! टॉम
प्रचंड प्रचंड आवडता पिक्चर...
+11111111111111111111111111
येक लंभर पिचकर हाय भौ त्यों.
येक लंभर पिचकर हाय भौ त्यों.
काही चित्रपट छान असतात
अगदी सहमत
नितांत सुंदर चित्रपट !
अत्यंत आवडीचा चित्रपट. कितीही
टॉम हँक्सचा कुठलाच चित्रपट
टॉम हॅंक्सचे सगळेच मूवी
टॉम हँक्सचे इतरही चित्रपट बघाच
saving mr. banks राहिला
बिग, फिडाडेल्फिया
व्यवस्थित परिचय..... बघणार.
I am not smart, but i know
लाखामोलाचा वाक्य
नुकताच आलेला 'ब्रिज ऑफ स्पाईज
थोडा स्लो आहे
हा धागा वाचून कालच हा चित्रपट
सेविंग प्रायवेट रायन
सर टॉम!
वे टू पर्डिशन
best movie!!!!!