Skip to main content

मराठी अंताक्षरी

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 17/09/2007 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चला मराठी अंताक्षरी खेळूया! आजी सोनियाचा दिनु.. वर्षे अमृताचा घनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे र.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 172378
प्रतिक्रिया 317

प्रतिक्रिया

या रावजी.....तुम्ही बसा भाऊजी... कशी मी राखु तुमची महरजी...... तुम्ही बसा भाऊजी.... सुरेखा पुणेकर यांची एक गाजलेली लावणी....

ज : जीवनगाणे..... गातच रहावे.. जीवन गाणे.... --न :

जिवलगा.... राहीले रे.. दुर घर माझे.... पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे..... जिवलगा.... ...ग....

""ज"" जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला दीन भूकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालूनी ""न""

अगं सोनम, हा "ज" कुठून आणलास मध्येच? :-?

In reply to by मृगनयनी

अग ज वरुन गाण लिहित होते तोपर्यत अ॑ताक्षरी पुढे गेली होती. त्यामुळे माझा "ज" मध्येच आला

असो... नंदाच्या नंदना... मनाच्या मोहना.... नंदाच्या नंदना...मनाच्या मोहना.... भेट सख्या.. देइना... येईना... जिवलगा.. येईना... :) परत "न"..

केव्हा तरि पहाटे उलटुन रात्र गेलि... मिटले चुकुन डोळे परतुन रात्र गेलि....

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची "च" वरुन माझ्या आईचे आवडते गाणे :) (मराठी संगीतप्रेमी)सागर

चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना गेले आंब्याच्या वनी म्हटली मैनेसवे गाणी आम्ही गळ्यात गळे मिळवून चाफा बोलेना...

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी ! दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी अननुभूत माधुरी आज गीत गायने...
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

"न"... नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा.... सत्यम शिवम सुन्दरा......||धृ.|| शब्दरुप शक्ती दे... भावरुप भक्ती दे.... प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा.... ||१|| विद्याधन दे आम्हास... एक छंद एक ध्यास.... नाव नेई पैलतीरी दयासागरा..... ||२|| होऊ आम्ही नीतिमंत... कलागुणी बुद्धीमंत... कीर्तिचा कळस जाई उंच अंबरा.... ||३|| -- "र"....

राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा वीण बाई कोणता करू शृंगार सांगा तरी काही

ही वाट दूर जाते स्वप्ना मधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा || " व "

वारा गाई गाणे प्रितिचे तराणे धुन्द आज वेली धुन्द फुल पाने 'न'

नाव माझे फुलांनी विचारू नये नांव सांगेन तेव्हा शहारू नये

या कातरवेळी , पाहिजेस तु जवळी

लळा जिव्हाळा शब्दच खोटे मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही वेड्या कुणी कुणाचे नाही..

In reply to by प्रमोद्_पुणे

ही पोरगी कसली अरे ही मनात ठसली हिला पाहून काळीज करतय हो धकधक धकधक

कशी सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला...आज आनंदी आनंद झाला... "ल" वरुन

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे

वार्‍यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे जल्लोष आहे आता उधाणलेला कुणीतरी पूर्ण करारे ही विनंती - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

लव लव करी पातं, डोळं नाही थार्‍याला एक टक पाहू कसं, लुकलुक तार्‍याला

लाखांत लाभले भाग्य तुला ग बाई विटेवरच्या विट्ठलाची झालीस रखुमाई श्रेयः सुमन कल्याणपुर , शांताबाई जोशी आणि दशरथ पुजारी "ई" वरुन

ईल्लु ईल्लु पिल्लु गं....अजुन भलतच टिल्लु गं..... नाक छोटं तोरा मोठ्ठा....गाल रुसुन फुल्लु गं..... गायकः सलिल कुलकर्णी अल्बम : - अग्गो बाई ढग्गो बाई कवी : संदिप खरे

गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन...

नाही कशी म्हणू तुला येते जरा थांब पण हिरव्या वाटांनी जायचे रे लांब नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत एकांती पण अपुल्या आड येते रीत नाही कशी? तुमच्यावर "श" ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

शम्भो शन्करा ................... करुणाकरा जगपालका........ क घ्या क "राजे!"

कोणास ठावूक कसा पण शाळेत गेला ससा ... सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले शाब्बास ससा म्हणाला करा पास ... "स" घ्या ... (हे असे चांगले धागे वर आणल्याबद्दल धन्यवाद बरं का !)

सखी, मंद झाल्या तारका.. आता तरी येशील का.. येशील का.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by आशिष सुर्वे

काय बाई सांगू कस्सं ग सांगू मलाच माझी वाटे लाज काहीतरी होऊन गेलंय आज "ज" घ्या ...

In reply to by आशिष सुर्वे

जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी.. ज्योत्स्नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनि चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित वर्षू दे अमुच्या शिरी.. वागीश्वरी.. वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुळी संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी.. वागीश्वरी.. 'र' घ्या.. (इतकं सुंदर गाणं आहे.. पूर्ण लिहावंच असं वाटलं..) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

रामा रघुनंदना, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशिल ? मी न अहिल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना "न" ....

In reply to by मस्तानी

नच सुंदरी करू कोपा मजवरि धरि अनुकंपा रागाने तव तनु ही पावत कशि कंपा करपाशी या तनुला बांधुनि करि शिक्षेला धरुनिया केशाला दंतव्रण करि गाला कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा.. 'प' घ्या!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

लाजून हासणे अन् हासून ते पहांणे.. मी ओळखून आहे.. सारे तुझे बहाणे.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

ने मजसी ने , परत मातॄभुमीला , सागरा प्राण तळमळला .

लाल लाल पागोटं, गुलाबी शेला चिंट्या दादा गेला, जीव झाला वेडा. एक दोन तीन चार, हमालपुर्‍यातली पोरे हुशार...

रति रंगी रंगे ध्यान रंगवी तरंगा वांच्छिला प्रेमसंग परि होय मनोभंग विकचदल सुमनांग भ्रमरीस सुखसंग विपरीत परि दैव तरी होई रसभंग पुढचे अक्षर "ग " पैजारबुवा,

रुपानं देखणी, सुपारी चिकणी, सोळावं सरलं दुनिया फिरते माझ्या मागं पर तुलाच मी हेरलं तुझं पाऊल कुठे फसलं? हे हे हे हे हे, मला भुतानं पछाडलं, मला भुतानं पछाडलं.... याला भुतानं पछाडलं, याला भुतानं पछाडलं....

लवलव करी पात डोळं नाही थार्‍याला एकटक पाहु कसं लुकलूक तार्‍याला पैजारबुवा,

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

ठाऊक आहे का तुज काही, ठाऊक आहे का तुज काही, कशी होती रे माझी आई? कशी होती रे माझी आई? पैजारबुवा,

इवले इवले सुख चिमुकले जर निसटले मिळेल का पुन्हा हलके फूलके ढगाच्या सारखे व्हावे कधीतरी वाटते का मला उंच उंच झूला भासते गरगर धुंद मौज किती वाटते वरवर नाद लाव तू मनाला

चिन्मया सकल ह्रदया , सदया रे बा गोविंदा

तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं. नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल.. दिस जातील, दिस येतील भोग सरंल सुख येइल..

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे कृपासागर तो गोविंदू रे येथोनी आनंदू रे आनंदू पैजारबुवा,

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवेहिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

In reply to by रातराणी

हि दोन शेपरेट गाणी आहेत. दैवजात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा आणि एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे पैजारबुवा,

In reply to by द-बाहुबली

या बाबतीत त्यांचे बरोबर आहे माझ्या येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे कृपासागर तो गोविंदू रे येथोनी आनंदू रे आनंदू या गाण्यावरची त्यांची ती प्रतिक्रीया होती. (जस्टिस) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद आजोबा. मी असच म्हणत आलिये हे गाणं. कुणीच नाही करेक्ट केलं. हर एक दोस्त कमीना होता है.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

धन्यवाद आजोबा. मी असच म्हणत आलिये हे गाणं. कुणीच नाही करेक्ट केलं. हर एक दोस्त कमीना होता है.

वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे धुंद आज वेली धुंद फूल पाने

लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का? प्रीत लपवुनी लपेल का? पैजारबुवा,

नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू श्री रामाचे नाव घेत या श्रीरामाला पार करू ज्या गंगे ज्या भागीरथी ज्या ज्या राम दाशरथी पैजारबुवा,