✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

व
वेल्लाभट यांनी
Wed, 11/18/2015 - 17:09  ·  लेख
लेख
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता. बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो. गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच. भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला? मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा! तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा! असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका) तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही. पिंगा नेमका कधी घालतात? या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही. या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे. मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो. पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला वेल्ला भट
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
104887 वाचन

💬 प्रतिसाद (344)

प्रतिक्रिया

लेखातल्या आशयाशी सहमत

अजया
Wed, 11/18/2015 - 18:39 नवीन
पण त्या गाण्यावरून पिक्चरचे नाव बदलून सवत माझी लाडकी हे ठेवले जाणार आहे असे ऐकले बुवा ;)
  • Log in or register to post comments

ते ह्याचे नव्हे, 'जय मल्हार'

जातवेद
Wed, 11/18/2015 - 23:35 नवीन
ते ह्याचे नव्हे, 'जय मल्हार' चे ठेवणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या

सूड
Wed, 11/18/2015 - 18:41 नवीन
म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली.
अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे. तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!! काल हापिसात यावर चर्चा चाललेली असताना एका मराठी महाभागाने विचारलेला प्रश्न ऐकून मी गारच पडलो. "काशीबाई ही बाजीरावाची बायको 'असते' का?"
  • Log in or register to post comments

तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा

बॅटमॅन
Wed, 11/18/2015 - 19:36 नवीन
तिथेही बीबीशीआयला ज्यायपीचा डबा जोडलेला असेल तर कौतुक करतील नाहीतर काय!!
ह्याचा काय संबंध आहे? असला प्रश्न सूडकडून अपेक्षित नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे , म्हणजे त्यातल्या

सूड
Fri, 11/20/2015 - 14:10 नवीन
अरे , म्हणजे त्यातल्या फारेनच्या पेशवीणी असतील तर त्यांना काय माहीत असणार अशा अर्थानं म्हणतोय मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे

मालोजीराव
Fri, 11/20/2015 - 15:10 नवीन
अहो त्या पिढीत अर्थाअर्थी महाराष्ट्राशी आणि मराठी संस्कृतीशी संबंध असलेले किती असतील हा ही प्रश्नच आहे.
सूड अरे त्यांची पिढी जाऊदे, इथे हिरोलाच माहित नाई कि खर्या हिरोच नाव काय आहे… 'बल्लाड' म्हणे :)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कहर!! =))

सूड
Fri, 11/20/2015 - 15:25 नवीन
कहर!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

गल्लत होते आहे मालोजीराव

आदिजोशी
Fri, 11/20/2015 - 18:08 नवीन
Ballad शब्दाचा अर्थ एखादी कथा सादर करणारे काव्य. आपल्याकडे पोवाडा असतो तसाच काहीसा इंग्रजांचा पोवाडा म्हणजे Ballad. ह्याच शब्दाचा अजून एक थोड अप्रचलीत अर्थ म्हणजे रोमँटीक काव्य. त्या अर्थाने शब्द बरोबर आहे. आडनाव म्हणून वापरलाय असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

=)) =))

बॅटमॅन
Fri, 11/20/2015 - 18:18 नवीन
=)) =)) ते एक असोच, पण बाजीरावाचे नाव पूर्ण लिहितोय असे वाटतेय. उत्तर भारतीय लोक्स ळ चे ड करतात त्यातलाच हा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

काहीही हां बॅ

आदिजोशी
Fri, 11/20/2015 - 18:25 नवीन
काहीही हां बॅ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅटमॅनचा तर्क बरोबर वाटतोय. ळ

खटपट्या
Fri, 11/20/2015 - 20:49 नवीन
बॅटमॅनचा तर्क बरोबर वाटतोय. ळ चा ड करतात ते लोक्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अमरावती विदर्भातले पण करतेत.

अभ्या..
Fri, 11/20/2015 - 21:09 नवीन
अमरावती विदर्भातले पण करतेत. सकाडी सकाडी तड्याकडे पडायला जातो ना. ;) बरेच मुस्लीम पण असेच करताना एकलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

........

_मनश्री_
Wed, 11/18/2015 - 18:52 नवीन
ह्या पेशवीणबाई आहेत का तमासगीरीण बाई ? आणि काशीबाई सवतीकडे इतक्या प्रेमाने का बघताहेत ? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

पिच्चर चे नाव - सवत माझी

sagarpdy
Wed, 11/18/2015 - 18:56 नवीन
पिच्चर चे नाव - सवत माझी लाडकी २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

जरासा बदल!! भारदस्त वाटायला ;)

सूड
Wed, 11/18/2015 - 19:07 नवीन
सवत माझी लाडकी (ऐतिहासिक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

अगदी हीन चित्रीकरण आहे...

मांत्रिक
Wed, 11/18/2015 - 18:57 नवीन
अगदी हीन चित्रीकरण आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

दागिने घालण्याचाही क्रम असतो.

रेवती
Wed, 11/18/2015 - 20:16 नवीन
दागिने घालण्याचाही क्रम असतो. वरील चित्रात हातातील दागिने, म्हणजे तोडे हे सगळ्यात शेवटी घालायचे असतात, ज्यायोगे ते सगळ्यात पहिले दिसतात. आधी पाटली मग गोठ, नंतर दोन (किंवा तीन.......हव्या तितक्या) हिरव्या बांगड्या, एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या, पुन्हा एक बिलवर, दोन हिरव्या बांगड्या व शेवटी तोडा घालावा म्हणजे तो सगळ्यात पुढे दिसतो. ही जुनी पद्धत आहे. आजकाल जसे हवे तसे घालतात ही गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

परफेक्ट .. एक तर साड्या च

स्रुजा
Wed, 11/18/2015 - 20:20 नवीन
परफेक्ट .. एक तर साड्या च धन्यवाद आहेत एकदम ! काठ पदर कुठे गेले त्या साड्यांवरचे? तू म्हणतेस तसं ही साडी मराठी नाहीच आहे. रमा माधव पण एकदम सॉरी सिनेमा होता पण त्यातल्या साड्या आणि बाकी सगळं नेपथ्य १०० % मराठी होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कालच कट्यार च्या धाग्यावर

sagarpdy
Wed, 11/18/2015 - 18:56 नवीन
कालच कट्यार च्या धाग्यावर म्हणले कि - चित्रपट हे उथळ माध्यम आणि मसाला हे त्याच्या यशाचे गमक. पण बाजीरावाच्या स्टोरीत एवढा मसाला (पराक्रम & प्रणय दोन्ही) असताना हा नको तो मसाला घालायची काय गरज. अति मसाला झाला तर आम्लपित्त होणारच! आणि या नको त्या भानगडींमध्ये बाजीरावाची रणनीती (हि शस्त्र कलेहून वेगळी) गाळणार.
  • Log in or register to post comments

एवढा गदारोळ बघून आत्ताच हे गाणे

दिपक.कुवेत
Wed, 11/18/2015 - 19:00 नवीन
तू नळी वर पाहिले. वादाचा मुद्दा सोडला तर प्रियांका आणि दिपीका दोघीहि कातील दिसत आहेत नउवारी मधे. कंबर पण काय लचकवतायत. वा!! जी खुष हो गया. पण बाकी कोरस च्या नऊवारी बघता ह्या दोघींच्या रेडीमेड वाटत आहेत. शीवाय काठ मधेच खोचलेला वाटतोय. तो साईडला हवा (वर पिरा म्हणते त्या प्रमाने ती पेशवाई किंवा ब्राम्हणी असेल तर!!) बाकी चालू द्या....
  • Log in or register to post comments

हीन

स्वाती दिनेश
Wed, 11/18/2015 - 19:04 नवीन
पराचे फे बु वर सात्विकसंतापाचे बोल वाचले म्हणून तू नळीवर हे गाणे पाहिले, स्क्रिन फोडावासा वाटला. शेवटी कपाळाला हात लावून बसले. स्वाती
  • Log in or register to post comments

खरय

_मनश्री_
Wed, 11/18/2015 - 19:20 नवीन
खरय गाण पाहून लॅपटॉप आणि त्या भन्साळीच थोबाड दोन्ही फोडावस वाटलं Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

मी विनोद तावडेंना हे पत्र पाठवलं

आदिजोशी
Wed, 11/18/2015 - 19:28 नवीन
माननीय श्री. विनोदजी, नुकतेच फेसबूक वर श्री संजय लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजय लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला, आदित्य जोशी
  • Log in or register to post comments

@ आदित्य जोशी

_मनश्री_
Wed, 11/18/2015 - 19:37 नवीन
@ आदित्य जोशी तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगलं केलं पण ह्या पत्राने खरच काही फायदा होणार आहे का ? मला नाही वाटत ह्याने काही होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

फायदा होईल न होईल माहिती नाही

आदिजोशी
Wed, 11/18/2015 - 19:41 नवीन
म्हणून पत्र पाठवू नये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

पत्र पाठवू नये अस अजिबात नाही

_मनश्री_
Wed, 11/18/2015 - 20:06 नवीन
पत्र पाठवू नये अस अजिबात नाही मी वरच्या प्रतिसादातही म्हटलं आहे की तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगल केलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

छान..

स्वाती दिनेश
Wed, 11/18/2015 - 19:45 नवीन
अ‍ॅडी, पत्र लिहिलेस ते उत्तमच केलेस. काहीतरी चांगली अ‍ॅक्शन घेतली जावी ऑथोरिटीजकडून अशी अपेक्षा करू या. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

विनयशील आणि संयतपणे केलेला

शब्दबम्बाळ
Wed, 11/18/2015 - 19:51 नवीन
विनयशील आणि संयतपणे केलेला विरोध... आपले अभिनंदन आणि आभार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

इथे मिपा वर काथा कुटत

वगिश
Wed, 11/18/2015 - 20:20 नवीन
इथे मिपा वर काथा कुटत बसण्यापेक्षा तुम्ही कृती केलीत हे उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

साभार- व्हाट्सॅप

मंदार कात्रे
Wed, 11/18/2015 - 19:29 नवीन
माननीय श्री. विनोद तावडे जी, सांस्कृतिक कार्यमंत्री , महाराष्ट्र राज्य नुकतेच फेसबूक व यूट्युब वर श्री संजल लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजल लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की बैठकीची लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला नम्र एक "भन्साळीपीडित" मराठी माणूस ...
  • Log in or register to post comments

हे पत्र सुद्धा लेखकाचे नाव

आदिजोशी
Wed, 11/18/2015 - 19:34 नवीन
हे पत्र सुद्धा लेखकाचे नाव गाळून? कमाल आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे

हे पत्र

मंदार कात्रे
गुरुवार, 11/19/2015 - 09:09 नवीन
दुसर्या एका व्हट्सॅप ग्रुप वरुन आले , तो ग्रुप आमच्या गावातिल मुलान्चा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

सागरकदम
Wed, 11/18/2015 - 19:32 नवीन
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भन्साळी विरोधाची दखल चॅनेल्सनी देखील घेतलेली आहे. आताच TV9, जय महाराष्ट्र आणि प्राईम ह्या चॅनेल्सनी खास फोन करून ह्या संदर्भात माझी मुलाखत घेतली. आज उद्या मध्ये हे चित्रीकरण सगळीकडे दिसेलच. हे खरेतर तुमच्या सगळ्यांच्या पाठींब्याचे यश आहे. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद __/\__ प्रसाद ताम्हणकर
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद सारक्यास्टिक आहे

बॅटमॅन
Wed, 11/18/2015 - 19:51 नवीन
हा प्रतिसाद सारक्यास्टिक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात

संदीप डांगे
Wed, 11/18/2015 - 20:08 नवीन
आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात चर्चा झालेली. तेव्हाच मी याप्रकाराबद्दल शंका नोंदवली होती. अजून काय बोलावे..? बाजीरावासारख्या विस्मरणात टाकलेल्या महान इतिहास पुरूषाबद्दल आधीच योग्य असा चित्रपट/कादंबरी/नाटक निघाला नाही आणि जो काय निघाला तो तोही असा हे बघून कोणत्या मराठी माणसाची तळपायाची मस्तकात जाणारी नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पण म्हणून डायरेक्ट तालिबान

टवाळ कार्टा
Wed, 11/18/2015 - 22:54 नवीन
पण म्हणून डायरेक्ट तालिबान टैप प्रतिक्रिया???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हे हे, तालिबान? नेहमी

संदीप डांगे
गुरुवार, 11/19/2015 - 11:39 नवीन
हे हे, तालिबान? नेहमी तालिबानच बरे आठवते बॉ तुम्हाला नेहमी. खाप, विहिंप, सनातन, बजरंग दल, श्रीरामसेने इत्यादी नै आठवत कंदी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/19/2015 - 13:21 नवीन
हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान टैप किडे करत अस्तातच (फक्त कधी कधी...आणि उघडपणे नाही)...दूमत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

या पैकी कुठलीही संस्था

विवेकपटाईत
गुरुवार, 11/19/2015 - 19:35 नवीन
या पैकी कुठलीही संस्था युद्धाची तालीम देत नाही किंवा असे युद्ध पुकारण्याची क्षमता कुठल्याही संस्थेत नाही. जास्तीस्जास्त थोड्या प्रमाणात थोड्या खुरापती करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हैला! चर्चा मिसली होती. फारच

रेवती
Wed, 11/18/2015 - 20:08 नवीन
हैला! चर्चा मिसली होती. फारच तणतण केली मी हे गाणं पाहून! भन्साळीला घातलेल्या शिवांचे कलेक्षन खरडफळ्यावर आहेच. तेथील प्रतिसाद हिकडे चिकटवते. आताच्या काळात आमची आजीबाई मला नृत्याचा क्लासात घालायला राजी नव्हती तर त्या काळात काशीबाईंना नाचायला कोठून परवानगी असणार? नाचवायचच होतं तर मंगळागौरीच्या गाण्यावर जरा जुन्या पद्धतीच्या स्टेप्स घेऊ द्यायच्या. पण हिकडे फुल्ल दंगा! मस्तानी ही सवत्/मिस्ट्रेस किंवा कोणीही असली तरी त्या काळी मुसलमान लोकही अदबशीर, खानदानी बाजाचे कपडे घालत असत. महाराष्ट्रीय महिला कंबरपट्टा घालून साडी चापून चोपून अंग झाकेल अशी नेसत असत. त्या गाण्यात खटकलेल्या गोष्टीच जास्त आहेत. पुरेश्या अभ्यासाआभावी नाचवलं, तेही दोघी सवतींना एकत्र, नऊवारी साडी ब्राह्मणी घरात ज्यापद्धतीने नेसतात तशी नेसवलेली नाही. एका शॉटमध्ये प्रियंकाने जराशी तशी साडी नेसल्यागत दिसते की पुन्हा जैसे थे! नको तिथे (किंवा हवं तिथे) अंगप्रदर्शन! हे गाणं कोणत्यातरी सणाच्या निमित्तानं केलं असल्यास आपल्याकडे जरीच्या साड्याच नेसत असत. अगदी काठापदराच्या. चांदीची जर वगैरे असल्याशिवाय माझी आजी साडी नेसायची नाही तर पेशविणबाईंची कथा काय सांगायची! वेलवेटची ब्लाऊजे आणि त्यावर जी कारागिरी आहे त्याला जर्दोसी काम म्हणतात. तेही शक्यतो मुसलमानी क्यार्‍याक्टरे पूर्वी त्यांच्या कपड्यांवर करत असत. नाचणार्‍या बायकाही अंग झाकतेल असे कपडे करत असत. पेशवाईत नऊवारी साडी नेसल्यावर त्यावर शेला असणे जरूरीचे असे. महिलांच्या कार्यक्रमातही राजेरजवाड्यांकडील महिला नाचत नसत. त्या हे कार्यक्रम बघून मनोरंजन करून घेत असत. अगदी आग्रह केला तर फुगडी घालत असत. इतिहास विषयात शून्य गती असलेल्या मला नेहमीच्या बघण्यातून जर इतपत माहित असेल तर त्या भन्साळ्याला इतके पैसे इनव्हेस्ट करताना एखादा तज्ञ हायर करता येऊ नये? हा शिनेमा बघण्याचे माझ्या फार मनात होते. थेट्रात जाऊन पेशव्यांचा शिनेमा पहावा, अगदी पर्फेक्ट नसणार हे गृहित धरले होते पण जरा महाराष्ट्रीय काही येऊ घातलेय म्हणून बरे वाटले होते. या गाण्याचे हिरमोड केलाय अगदी! काय मेलं डोकं त्या मनुष्याचं..........
  • Log in or register to post comments

हि काल्पनिक कथा आहे, खर्या

विवेकपटाईत
Wed, 11/18/2015 - 20:11 नवीन
हि काल्पनिक कथा आहे, खर्या ऐतिहासिक घटनांशी या कथेचा काहीच संबंध नाही असे टायटल मध्ये दाखविले जाईल. आता हिंदीत सिया के राम येतात आहे, भव्य रामायण काळ बघायला मिळेल. अस्तित्वात नसलेल्या कथा पाहायला मिळतील. असो.
  • Log in or register to post comments

मिपावर रामायण महाभरताच्या

भाऊंचे भाऊ
Wed, 11/18/2015 - 20:15 नवीन
मिपावर रामायण महाभरताच्या प्रक्षीप्त कथा चवीने चघळणारे अशा चित्रपटांवर किती ताठर भुमीका घेतात नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे

काळा पहाड
Wed, 11/18/2015 - 20:17 नवीन
देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि राज ठाकरे यांचा इमेल कुणाला माहिती आहे का?
  • Log in or register to post comments

बघा काय जमतय का....

नन्दादीप
गुरुवार, 11/19/2015 - 11:40 नवीन
Chiefminister@maharashtra.gov.in / min_l&jd@maharashtra.gov.in DeputyChiefMinister@maharashtra.gov.in Min_Rev@maharashtra.gov.in / min_earthquakerehab@maharashtra.gov.in Min_Home@maharashtra.gov.in Min_Sports&YouthWelfare@maharashtra.gov.in Min_Forest@maharashtra.gov.in Min_Socjust@maharashtra.gov.in Min_Waterresources&cada@maharashtra.gov.in Min_Rdd@maharashtra.gov.in Min_Coop@maharashtra.gov.in Min_Energy@maharashtra.gov.in Min_Agri@maharashtra.gov.in Min_WSSD@maharashtra.gov.in Min_FCSCP@maharashtra.gov.in Min_PWD_PU@maharashtra.gov.in Min_FDA@maharashtra.gov.in Min_Horticulture@maharashtra.gov.in Min_Finance@maharashtra.gov.in Min_WaterResources_KVIC@maharashtra.gov.in Min_TD@maharashtra.gov.in Min_HigherEdu@maharashtra.gov.in Min_industry&Emp@maharashtra.gov.in Min_Textile@maharashtra.gov.in Min_Env@maharashtra.gov.in / Min_PH@maharashtra.gov.in Min_Labour@maharashtra.gov.in Min_ANHS@maharashtra.gov.in Min_W&CHD@maharashtra.gov.in जालावर शोधल्यावर हेच मिळाले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

तो भन्साळि राहुद्या

माझीही शॅम्पेन
Wed, 11/18/2015 - 20:21 नवीन
तो भन्साळि राहुद्या महारष्ट्रातच मुळात पेशवे-पेशवाई हा किती आणि कोणासाठी अभिमनाचा विषय आहे ? त्यातून पेशवे केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या इतिहासकडे मुद्दामुहून दुर्लक्ष केले जाते असो आपण कितीही कळफलक बडवुन काय फायदा ?
  • Log in or register to post comments

एक विनंती

श्रीरंग_जोशी
Wed, 11/18/2015 - 20:34 नवीन
मंडळी आपले आक्षेप अधिकृत व्हिडिओवर प्रतिक्रियेच्या स्वरुपात लिहा. आतापर्यंत आलेल्या सतराशेहून अधिक प्रतिक्रियांमध्ये आक्षेप फारसे दिसत नाहीयेत. तसेच डिसलाइक्सही केवळ दोन हजारहून थोडे अधिक आहेत अन लाइक्स लौकरच १५ हजार होतील.
  • Log in or register to post comments

कृती झालेली आहे.

वेल्लाभट
गुरुवार, 11/19/2015 - 11:55 नवीन
कृती झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अधिकृत संकेतस्थळ

श्रीरंग_जोशी
Wed, 11/18/2015 - 20:36 नवीन
या चित्रपटाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या होमपेजवर खाली 'कॉन्टॅक्ट अस' फॉर्म आहे. तिथेही आपले आक्षेप जरूर पाठवा.
  • Log in or register to post comments

तिथे तर अस लिहून आहे...

चांदणे संदीप
गुरुवार, 11/19/2015 - 12:23 नवीन
तिथे तर अस लिहून आहे...
This is not an Official website of Bajirao Mastani Film. We do not represent the official team of Bajirao Mastani or any part of it. We are just providing you the information about Bajirao Mastani movie. The content is strictly copyrighted and may not create again without permission .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/19/2015 - 21:25 नवीन
चित्रपटाच्या नावाने वेबसाइट असल्याने मला ती अधिकृत वाटली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तरी निर्मात्यांनी प्रत्यक्ष नाव वापरून अनधिकृत वेबसाइटबाबत तक्रार करायला हवी. चुकीची माहिती इथे दिल्याबद्दल मी दिलगीर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा