Skip to main content

पिंगा, बाजीराव मस्तानी, भन्साळी इत्यादी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/11/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
पिंगा. येऊ घातलेल्या बाजीराव मस्तानी या हिंदी चित्रपटातील हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रकशित झालं. या गाण्याविरोधातल्या पोस्ट्सनी कायप्पा, चेपूवर पिंगा घातलेला असताना, मिपावर धागारुपी पिंगा कसा झाला नाही या विचाराने डोक्यात पिंगा घालायच्या आत म्हटलं विषयास वाचा फोडू. मी गाणं बघितलं. पेशवाई, बाजीराव पेशवे, मस्तानी, काशीबाई यांबद्दल मला जे कमीअधिक ज्ञान आहे, त्या आधारे मी म्हणतो, की हे गाणं म्हणजे अचरटपणा आहे. मुळात भन्साळी ने बाजीराव-मस्तानी वर पिक्चर बनवणे, रणवीर सिंग नामक इसमाने बाजीरावाची व्यक्तिरेखा साकारणे, यातूनच समोर येणा-या गोष्टींचा टोन सेट झाला होता. बाजीराव पेशवे हे त्यांचं कर्तृत्व, पराक्रम, साहस, निष्ठा, इत्यादी गोष्टींसाठी कमी आणि मस्तानीसाठी जास्त ओळखले जातात हे आपलं दुर्दैव आहे. त्यांचं नव्हे. बरं, मस्तानीच्या नात्याकडे ज्या हीन नजरेने बघितलं जातं ते क्लेशदायक आहे. हे नातं, किंबहुना बाजीरावांबद्दल जितकं मला माहिती आहे त्या आधारे त्यांनी जोडलेल्या प्रत्येक नात्यात निष्ठेचं, कमिटमेंटचं उदाहरण घालून दिलेलं आहे. मस्तानी, काशीबाई, समशेर, कुणालाही वा-यावर न टाकता जपण्यात स्वतःची तगमग करून घेतलेली आहे. पण तरीही; मस्तानीकडे चीप या नात्याने आणि बाजीरावाकडे लफडेबाज या नात्याने बघितलं जातं. असो. हा विषय मोठा आहे आणि मी जाणकार नाही. गाण्याकडे येतो. गाण्यासंबंधी, पेशव्यांसंबंधी काही प्रश्न, काही विधानं. पुढे काथ्याकूट करण्यास मिपाकर समर्थ आहेच. भन्साळीला पेशव्यांबद्दल किती माहिती आहे? ती घेण्याचा त्याने किती प्रयत्न केला? मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात? वा! तेही उद्दीपित करणा-या साड्या घालून? वा! असं वाचलेलं आहे की काशीबाईंना पायाची व्याधी होती. त्यामुळे त्या नाचणं दुरापास्तच. (यावर कुणीतरी प्रकाश टाका) तेही ठीक; पेशवे घरंदाज होते, त्यांच्याकडे कलेची कदर होत असे. थिल्लर नाचांची नाही. पिंगा नेमका कधी घालतात? या गाण्यात एक दोन ठरलेल्या लावणीच्या अदा सोडल्यास त्याला लावणी म्हणण्यासारखं त्यात काही नाही. या गाण्याकडे बघता पिक्चर कसा असेल, काय दिवे लावले असतील, इतिहासाची विटंबना कशी केली असेल याचा अंदाज येतोच. त्यात दैवदुर्विलास असा की भन्साळीने म्हणे पेशव्यांच्या १०-११ व्या पिढीला जेवायला आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी या चित्रपटाची स्तुती केली. प्रमोशनचा भाग असेल हा कदाचित. तसं असेल तर अजूनच दुर्दैवी आहे हे. आता हा पिक्चर आला की बाजीराव पेशव्यांबद्दल किती आणि कसे गैरसमज अमराठी (कदाचित मराठीही) लोकांत पसरतील हे चिंताजनक तरीही अटळ आहे. मिपाकरांनी अजून सुचतील तसे मुद्दे मांडावेत असं आवाहन करतो. पिक्चरला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसलेला वेल्ला भट

वाचने 105837
प्रतिक्रिया 344

प्रतिक्रिया

पराचे फे बु वर सात्विकसंतापाचे बोल वाचले म्हणून तू नळीवर हे गाणे पाहिले, स्क्रिन फोडावासा वाटला. शेवटी कपाळाला हात लावून बसले. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

खरय गाण पाहून लॅपटॉप आणि त्या भन्साळीच थोबाड दोन्ही फोडावस वाटलं 1 2

माननीय श्री. विनोदजी, नुकतेच फेसबूक वर श्री संजय लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजय लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला, आदित्य जोशी

In reply to by आदिजोशी

@ आदित्य जोशी तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगलं केलं पण ह्या पत्राने खरच काही फायदा होणार आहे का ? मला नाही वाटत ह्याने काही होईल

In reply to by आदिजोशी

पत्र पाठवू नये अस अजिबात नाही मी वरच्या प्रतिसादातही म्हटलं आहे की तुम्ही पत्र पाठवलंत हे चांगल केलं

In reply to by आदिजोशी

अ‍ॅडी, पत्र लिहिलेस ते उत्तमच केलेस. काहीतरी चांगली अ‍ॅक्शन घेतली जावी ऑथोरिटीजकडून अशी अपेक्षा करू या. स्वाती

माननीय श्री. विनोद तावडे जी, सांस्कृतिक कार्यमंत्री , महाराष्ट्र राज्य नुकतेच फेसबूक व यूट्युब वर श्री संजल लीला भंसाली ह्यांच्या बाजीराव मस्तानी ह्या चित्रपटातील 'पिंगा' गाणे बघायचे दुर्भाग्य मला लाभले. ह्या गाण्यात बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि दुसरी पत्नी मस्तानी ह्या एकत्र लाडीगोडीने नाचताना दाखवल्या आहेत. हा इतिहासाचा केलेला केवळ बट्ट्याबोळ नसून चक्क विकॄतीकरण आहे. जगातील एकमेव अजेय योद्धा असे ज्यांना संबोधले जाते त्या बाजीरावांवर चित्रपट बनवल्याबद्दल श्री संजल लीला भंसाली जितके अभिनंदनास पात्र आहेत, तितकेच ते ह्या विकॄतीकरणासही जबाबदार आहेत. आधीच महाराष्ट्रातील वीर पुरुषांबद्दल भारतात फारशी कुणाला माहिती नाही. त्यात हे असलं काही तरी पाहून चुकीची प्रतिमा उभी रहायला नको. मुळात 'पिंगा' हे मंगळागौरीदरम्यान गायले जाणारे गाणे आहे. त्याचे सादरीकरण बघितले की बैठकीची लावणी बघत असल्याचा भास होतो. छत्रपतींचे पेशवे असलेल्या बाजीरावांची पत्नी आपल्या सवतीसोबत कंबर उडवत नाचते ही कल्पनाच सहन होत नाही. देवदासच्या निर्मीतीच्या वेळी कथेची अशीच मोडतोड करून सिनेमॅटीक लिबर्टी म्हणून एक घरंदाज स्त्री आणि एक वेश्या ह्यांना एकत्र नाचताना दाखवलं होतं. पण शेवटी ती एक काल्पनीक कथा होती. हा आपला इतिहास आहे. खरा खुरा, घडलेला आणि आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा इतिहास. त्याची अशी भयानक मोडतोड करून कसे चालेल? तो काळ, त्या वेळची संस्कॄती, पाळल्या जाणार्‍या मर्यादा, इत्यादिंविषयी मी तुम्हाला सांगायची अर्थातच गरज नाही. क्रिएटिव्ह फ्रीडमच्या नावाखाली आपल्या संस्कॄतीचे दिवसाढवळ्या होणारे हे विकॄतीकरण पाहवले नाही म्हणून आपणांस तसदी दिली. महाराष्ट्राचे सांस्कॄतीक मंत्री ह्या नात्याने आपण योग्य तो निर्णय घ्याल ही खात्री आहे. आपला नम्र एक "भन्साळीपीडित" मराठी माणूस ...

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भन्साळी विरोधाची दखल चॅनेल्सनी देखील घेतलेली आहे. आताच TV9, जय महाराष्ट्र आणि प्राईम ह्या चॅनेल्सनी खास फोन करून ह्या संदर्भात माझी मुलाखत घेतली. आज उद्या मध्ये हे चित्रीकरण सगळीकडे दिसेलच. हे खरेतर तुमच्या सगळ्यांच्या पाठींब्याचे यश आहे. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद __/\__ प्रसाद ताम्हणकर

In reply to by बॅटमॅन

आपली बहुतेक खफ वर याचसंदर्भात चर्चा झालेली. तेव्हाच मी याप्रकाराबद्दल शंका नोंदवली होती. अजून काय बोलावे..? बाजीरावासारख्या विस्मरणात टाकलेल्या महान इतिहास पुरूषाबद्दल आधीच योग्य असा चित्रपट/कादंबरी/नाटक निघाला नाही आणि जो काय निघाला तो तोही असा हे बघून कोणत्या मराठी माणसाची तळपायाची मस्तकात जाणारी नाही?

In reply to by टवाळ कार्टा

हे हे, तालिबान? नेहमी तालिबानच बरे आठवते बॉ तुम्हाला नेहमी. खाप, विहिंप, सनातन, बजरंग दल, श्रीरामसेने इत्यादी नै आठवत कंदी...

In reply to by संदीप डांगे

हे सगळे सुध्धा हिंदू तालिबान टैप किडे करत अस्तातच (फक्त कधी कधी...आणि उघडपणे नाही)...दूमत नाही

In reply to by संदीप डांगे

या पैकी कुठलीही संस्था युद्धाची तालीम देत नाही किंवा असे युद्ध पुकारण्याची क्षमता कुठल्याही संस्थेत नाही. जास्तीस्जास्त थोड्या प्रमाणात थोड्या खुरापती करू शकतात.

हैला! चर्चा मिसली होती. फारच तणतण केली मी हे गाणं पाहून! भन्साळीला घातलेल्या शिवांचे कलेक्षन खरडफळ्यावर आहेच. तेथील प्रतिसाद हिकडे चिकटवते. आताच्या काळात आमची आजीबाई मला नृत्याचा क्लासात घालायला राजी नव्हती तर त्या काळात काशीबाईंना नाचायला कोठून परवानगी असणार? नाचवायचच होतं तर मंगळागौरीच्या गाण्यावर जरा जुन्या पद्धतीच्या स्टेप्स घेऊ द्यायच्या. पण हिकडे फुल्ल दंगा! मस्तानी ही सवत्/मिस्ट्रेस किंवा कोणीही असली तरी त्या काळी मुसलमान लोकही अदबशीर, खानदानी बाजाचे कपडे घालत असत. महाराष्ट्रीय महिला कंबरपट्टा घालून साडी चापून चोपून अंग झाकेल अशी नेसत असत. त्या गाण्यात खटकलेल्या गोष्टीच जास्त आहेत. पुरेश्या अभ्यासाआभावी नाचवलं, तेही दोघी सवतींना एकत्र, नऊवारी साडी ब्राह्मणी घरात ज्यापद्धतीने नेसतात तशी नेसवलेली नाही. एका शॉटमध्ये प्रियंकाने जराशी तशी साडी नेसल्यागत दिसते की पुन्हा जैसे थे! नको तिथे (किंवा हवं तिथे) अंगप्रदर्शन! हे गाणं कोणत्यातरी सणाच्या निमित्तानं केलं असल्यास आपल्याकडे जरीच्या साड्याच नेसत असत. अगदी काठापदराच्या. चांदीची जर वगैरे असल्याशिवाय माझी आजी साडी नेसायची नाही तर पेशविणबाईंची कथा काय सांगायची! वेलवेटची ब्लाऊजे आणि त्यावर जी कारागिरी आहे त्याला जर्दोसी काम म्हणतात. तेही शक्यतो मुसलमानी क्यार्‍याक्टरे पूर्वी त्यांच्या कपड्यांवर करत असत. नाचणार्‍या बायकाही अंग झाकतेल असे कपडे करत असत. पेशवाईत नऊवारी साडी नेसल्यावर त्यावर शेला असणे जरूरीचे असे. महिलांच्या कार्यक्रमातही राजेरजवाड्यांकडील महिला नाचत नसत. त्या हे कार्यक्रम बघून मनोरंजन करून घेत असत. अगदी आग्रह केला तर फुगडी घालत असत. इतिहास विषयात शून्य गती असलेल्या मला नेहमीच्या बघण्यातून जर इतपत माहित असेल तर त्या भन्साळ्याला इतके पैसे इनव्हेस्ट करताना एखादा तज्ञ हायर करता येऊ नये? हा शिनेमा बघण्याचे माझ्या फार मनात होते. थेट्रात जाऊन पेशव्यांचा शिनेमा पहावा, अगदी पर्फेक्ट नसणार हे गृहित धरले होते पण जरा महाराष्ट्रीय काही येऊ घातलेय म्हणून बरे वाटले होते. या गाण्याचे हिरमोड केलाय अगदी! काय मेलं डोकं त्या मनुष्याचं..........

हि काल्पनिक कथा आहे, खर्या ऐतिहासिक घटनांशी या कथेचा काहीच संबंध नाही असे टायटल मध्ये दाखविले जाईल. आता हिंदीत सिया के राम येतात आहे, भव्य रामायण काळ बघायला मिळेल. अस्तित्वात नसलेल्या कथा पाहायला मिळतील. असो.

In reply to by विवेकपटाईत

मिपावर रामायण महाभरताच्या प्रक्षीप्त कथा चवीने चघळणारे अशा चित्रपटांवर किती ताठर भुमीका घेतात नै.

तो भन्साळि राहुद्या महारष्ट्रातच मुळात पेशवे-पेशवाई हा किती आणि कोणासाठी अभिमनाचा विषय आहे ? त्यातून पेशवे केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांच्या इतिहासकडे मुद्दामुहून दुर्लक्ष केले जाते असो आपण कितीही कळफलक बडवुन काय फायदा ?

मंडळी आपले आक्षेप अधिकृत व्हिडिओवर प्रतिक्रियेच्या स्वरुपात लिहा. आतापर्यंत आलेल्या सतराशेहून अधिक प्रतिक्रियांमध्ये आक्षेप फारसे दिसत नाहीयेत. तसेच डिसलाइक्सही केवळ दोन हजारहून थोडे अधिक आहेत अन लाइक्स लौकरच १५ हजार होतील.

In reply to by श्रीरंग_जोशी

तिथे तर अस लिहून आहे...
This is not an Official website of Bajirao Mastani Film. We do not represent the official team of Bajirao Mastani or any part of it. We are just providing you the information about Bajirao Mastani movie. The content is strictly copyrighted and may not create again without permission .

In reply to by चांदणे संदीप

चित्रपटाच्या नावाने वेबसाइट असल्याने मला ती अधिकृत वाटली. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तरी निर्मात्यांनी प्रत्यक्ष नाव वापरून अनधिकृत वेबसाइटबाबत तक्रार करायला हवी. चुकीची माहिती इथे दिल्याबद्दल मी दिलगीर आहे.

प्रसादराव पेशवे यांचे मुख्यमंत्र्यांना अत्यंत संयत भाषेत लिहिलेले ह्यासंदर्भातील पत्र पहा. . स्वाती

भंसाली बुवांना फार फरक पडणार नाहीच बहुधा, आजच एक अनुभव आला.. मी माझ्या एका नातेवाइकाकडे गेले होते, तिथे ३-४ बायका पोरी हे गाणं बघून खुपच चेकाळलेल्या किती मस्तंय मस्तंय करत आणि पुढ्च्या दिवाळीत याच गाण्यावर नाचायचं म्हणून... हे लोक १००% मराठी आहेत, मराठी माध्यमातून शिकलेले आहेत...

In reply to by दिपाली पाटिल

गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी.

आपल्याकडे खुद्द महाराष्ट्रात आणी उर्वरीत भारतात बाजीराव म्हटले की मस्तानी एवढेच लोकांना ठाऊक आहे त्यात आता पिंगा गाण्यामुळे सोशल मिडीयावर जी राळ उडाली त्याने खेदाने नमूद करावेसे वाटते की त्याचा ह्या सिनेमाला आयती नकारात्मक प्रसिद्धी मिळाली , आजकाल नकारात्मक प्रसिद्धी ही सिनेमाच्या पहिल्या ३ दिवसात गल्ला भरायला कामी येते. भारतात मला एखाद्या सिनेमाच्या आधी त्याचे ट्रेलर किंवा परीक्षण पाहून त्या सिनेमाच्या लायकीची कल्पना येउन सुद्धा लोक्स सिनेमाला पहिल्या आठवड्यात हजेरी लावतात. अनेक जण सिनेम पाहतोय असे चेपू वरून जगाला सांगतात. मग दुसर्या दिवशी चेपू वरील भिंती वर, समूहात त्या सिनेमाची चिरफाड करणारे परीक्षण खरडतात. तेव्हा त्यात सिनेमाची बिनपाण्याने करतांना हा सिनेमा आपण पैसे देऊन थेटरात पहिला , ह्याचे त्यांना सोयरसुतक नसते. वाईट सिनेमा पाहिला कि असह्य तगमग होते तर मग १ आठवडा कळ काढून थांबावे , सोशल मिडिया वर व आप्त स्वकीयांच्या कडून सिनेमाच्या वद्दल खात्री करून मग तो पहावा. पण अनेक परीक्षणसम्राट हे केवळ जनतेने वाईट शिनेमा पाहून पैसा खर्ची करू नये म्हणू अडीच तासाचे हलाहल स्वतः नेत्राने प्राशन करतात. येथे पोटतिडकीने प्रतिसाद देणारे कितीतरीजण थेटरात जाऊन काय नक्की भन्साळी ने गोंधळ घातला आहे हे स्वःताच्या डोळ्यांनी थेटरात जाऊन येतील आणि बाहेर येतांना खेटर खाल्या सारखा चेहरा करून बाहेर येतील. आणि मग तावातावाने सिनेमाला नावे ठेवतील पुढे असे सिनेमे १०० कोटीच्या वर गल्ला कसा जमवतात ह्या बद्दल सखेद आश्यर्य व्यक्त करतील. बाजीरावांच्या कर्तुत्वावर प्रेम व श्रद्धा असेल तर आज सगळ्यांनी पण करूया हा सिनेमा थेटरात जाउन पाहायचा नाही, पंचतारांकित नगरीत स्वागत आहे आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

बरोबर आहे तुमचं. आणि आजकाल तर १०० कोटी हा आकडा १० रुपयाचं चॉकोलेट खाल्लं इतक्या सहजतेने उच्चारतात. एक तर बर्‍याचशा उत्तर भारतीय जनतेला अशा ओव्हर द टॉप चित्रीकरणाचं आकर्षण आहे आणि त्याहीपेक्षा जास्त बाहेरील देशांत. हल्ली बड्या बॅनरचे सिनेमे मध्य पूर्वेत, उत्तर अमेरिकेत, कधी कधी काही युरोपियन देशांत एकत्र रीलीज होतात. मल्टीप्लेक्स चं तिकीट बघता आणि निव्वळ चकाचौन वाल्या बॉलिवुड सिनेमांचं बाहेर असलेलं आकर्षण बघता १०० कोटी कितीही रद्दी सिनेमा असला तरी गोळा होतातच. त्यात अजुनही काही मार्केटिंग गिमिक्स असतील. धुम ३ आणि प्रेम रतन नी जर २-३०० चा गल्ला गोळा केला तर मग बाकीबद्दल काही बोलायलाच नको. सिनेमाचा दर्जा आणि मिळणारा पैसा यांचा आपापसात सुतराम संबंध नाही. आतादेखील काही अ-मराठी भारतीयांच्या अगदी भारावुन गेलेल्या प्रतिक्रिया आहेत. आपण उगाच सात्विक संताप करत बसण्यात काही पॉईंट नाही. ते गाणं, तो सिनेमा बरेच पुरस्कार देखील घेऊन जाणार आहे . उद्या कदाचित करण जोहर भन्साळीला त्याच्या शो मधे बोलावुन या "काँट्रोव्हर्सी" बद्दल विचारेल , भन्साळी काहीतरी तद्दन दिखाऊ उत्तरं देऊन मराठी जनतेलाच मुर्ख ठरवेल. त्यामुळे गेला उडत तो भन्साळी आणि खड्ड्यात जाऊ दे तो सिनेमा !

भन्साळीकडून काय अपेक्षा होती? या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हाच कळले होते की काय होणार आहे. बाकी एक-दीड टक्के लोकसंख्येने पिच्चर पाहिला तरी १०० कोटी जमा होत असल्याने त्या आकड्यांना काहीही महत्त्व नाही. भन्साळीसारख्या येडपटांना आधीच जागा दाखवायला पाहिजे होती. त्याचा हम दिल दे चुके सनम हा पिच्चरच इतका इरिटेटिंग होता की पुढचे त्याला काढू दिले हेच आश्चर्य आहे.

आयला, मिपावर कोणी उदारमतवादी धर्मनिरपेक्ष मंडळी जिवंत नाहित का? त्यांच्याकडून खालील प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. १. मराठी माणसाचा कट्टरवाद फार वाढला आहे. भारतातील "Intolerance" वाडवण्यासाठी मिपावरचे असे लेख हातभार लावतात २. मिपावरील हा लेख म्हणजे कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांची उघड उघड गळचेपी आहे. ३. नऊ वारी साडी नेसून पोट दाखवले म्हणून आरडाओरडा हे बुरसटलेल्या मनोवृत्त्तीचे लक्षण आहे. कुणी काय दाखवावे हा ज्याचा त्याचा "my chioce" आहे. ४. वरील लेख आणि त्याला आलेले प्रतिसाद पाहता काही सहिष्णु मंडळी मिपावरील सनातनी विचाररसणीमुळे दुखावले गेले आहे. असे सर्व लेखक, छायाचित्रकार आणि शास्त्रज्ञ (ह्यांचा काय संबंध हा प्रश्न विचारू नये) दिवाळी अंकातून आपले लेख मागे घेण्याच्या विचारात आहेत. मिपातर्फे शनिवार वाड्यावर जंगी पुरस्कारवापसी सोहळा आयोजित केला जावा !

In reply to by पॉइंट ब्लँक

आणि त्या सोहळ्यात ह्या गाण्यावर सोनाली कुलकर्णी (ज्यु.) व अम्रुता खानविलकर यांचा या गाण्यावर नाच असावा (मधेच "लघुगुरु" बाजीराव म्हणुन स्पेशल अ‍ॅपिअरन्स)

In reply to by पॉइंट ब्लँक

अरे बाबा हा सिनेमा पुरोगामी लोकांनी बनविला असता तर मिपावर असे आक्षेप निश्चित आले असते. नयनतारा यांना सा.अ. पुरस्कार मिळाला आहे, अधिकांश लोकांना वापसी नंतर कळले.

नमस्कार, या गाण्यावर वाद याचमुळे आहे, की हे गाणे काशी बाई आणी मस्तानी वर एकत्रित चित्रित झाले आहे, मुद्दा असा पण वाचण्यात आलाय की मूळ सिनेमा मधे हे गाणे नाही, तर शेवटी दाखवले जाईल, अर्थात त्याने वाद समाप्त होत नाहीच... काशी बाई या पायाने अधू होत्या, त्यामुळे त्यांना नाचता येणे शक्य नाही, मुळात काशी बाई आणि मस्तानी बरोबर का नाचव्यात... ही सरळ सरळ इतिहासाची दिशाभूल आहे...एक मात्र खरं, या मुळे slb ची प्रसिद्धी नक्की होणार

"माळव्यातली हिरवीगार शेते..बाजीराव घोड्यावरून...मस्तानी पुढे फेर धरून नाचत जातीये...बाजीराव उतरतात मस्तानीचा हात धरुन गोल फिरवतात (शारुख स्टाईल)...पुढच्या सीनमधे मस्तानीच्या जागी काशीबाई...मागे शिंदे..होळकर वगैरे खासे हातात तलवारी घेऊन उधे गं अम्बे उदे स्टाईलने नाचतायत...बरोबर नऊवारीमधील बाया (झी मराठी पुरस्कार स्टाईल)...मग प्रत्येक कडव्याला मस्तानी व काशीबाई आलटुन पालटुन येतात" अशी ज्याची प्रतिभा त्या संजयने फक्त "पिंगा" वर भागवले ह्याबद्द्ल आपण खरंतर संजयचे जाहीर आभार मानायला हवेत व पुढिल वर्षीचा "महाराष्ट्र भूषण" त्यालाच मिळायला हवा व औस्कर मधील मानांकन सुदधा... आणि इथे मराठी लोक्स नऊवारी ब्राम्हणी की साधी रितीभाती वगैरे चर्चा करत बसलेत. "मस्तं पिक्चर बघा आणि थंड बसा" (आ. बाळासाहेबांना स्मरुन...) ता. क. कदाचित असं एखादं गाणं असेलही. मला माहीत नाही. असल्यास वरील लिखाण सपशेल मागे घेतले जाईल...

In reply to by एक सामान्य मानव

सहमत. बर्‍याच लोकांचा आक्षेप काशीबाई आणि मस्तानी एकत्र नाचण्यावर आहे. बाकी त्या कोणत्या पद्धतीने नऊवारी नेसल्या आहेत, बाजीरावांचे डोळे घारे दाखवले आहेत की काळे हे सगळं "poetic leverage" म्हणून माफ करता येईल. अजून चित्रपट रिलीज पण नाही झाला तरी त्याच्यावर एवढी आगपाखड. समजा, भंसाळी नी इतिहासाशी जास्त प्रतारणा न करता, पालखेड- भोपाळ च्या लढाईची सुंदर दृश्ये (ट्रोय स्टाइल) दाखवली, बाजीरावांची रणनीतीचं नाही पण युद्धनीती पण सुंदर रित्या लोकांसमोर आणली आणि हे जे गाणं आहे ते शेवटच्या एंडिंग ला पाट्या पडतानी दाखवले तर त्याच्या ह्या बारीक सारीक चुका कट्टर मराठी माणूस नक्कीच माफ करेल. तस्मात, चित्रपटाची वाट बघा आणि चुकीचं काही दाखवले असेल तर वाट लावा.

cinematic liberty च्या नावाखाली काय वाटेल तो फालतूपणा दाखवला तर लोकं धुणार, नंतर रडून काय उपयोग.

"भाऊंचे भाऊ - Thu, 19/11/2015 - 11:40 गाणं, डान्स संगीत सगळे उत्तम आहे. फक्त हे असं गानं पेशव्यांच्या चित्रपटात नको होतं असं टीजर बघुन नक्किच वाटतं. एकुणच चित्रपटाची काटछाट अथवा राडा होण्याची शक्यता भरपुर आहे. लेट्स सी. " -- सहमत . +१ संजय लीला भंसालीचा "खामोशी - द म्युझीकल" सिनेमा खुप सुंदर , अर्थपुर्ण होता. पण नंतरचे सिनेमे जास्तच व्यावसायिक होते . असे वाटते कि , जर आशुतोष गोवारिकरने "बाजीराव" सिनेमा बनवला असता , तर तो जास्त चांगला झाला असता .

मुळात भारतातले लोक रोज बागेत जाऊन एक गाणे म्हणतात अशातला भाग नाही. त्यामुळे कुठलेच चित्रपटगीत वास्तववादी असू शकत नाही. मानापमानात रुक्मिणीने का कोणीतरी गाणी म्हटली ती कशी चालली? बाजीराव असला तरी त्याने चोवीस तास तलवार घेऊन युद्धच करायला पाहिजे की काय? काशीबाई या आयुष्यात कधीही नाचल्या नाहीत किंवा नाचणे या शब्दाची त्यांना चीड होती असा पुरावा उपलब्ध आहे काय? नसेल तर मग काय बिघडलं त्या घटकाभर नाचल्या म्हणून? भगतसिंह आणि त्याचे जिच्याशी लग्न ठरले होते ती मुलगी (बायको नव्हे) हेही प्रत्येक हिंदी सिनेमात गाणी म्हणताना दाखवले आहेत. लोकांना काही तो खरा इतिहास वगैरे वाटला नाही.

नाच फारतर काल्पनीक आहे असं म्हणता येईल, विकृत कसा काय ?

In reply to by वेल्लाभट

कमरेला झाडू आणि गळ्यात मडके, वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता, डान्समध्ये काय वि़कृती आहे ?

In reply to by आबा

कमरेला झाडू... वगैरे गोष्टी दाखविल्या असत्या तर विकृत ठरला असता आता तुमच्यावर दिल्लीत एक निषेधाची प्रेस कॉन्फरन्स होणार बघा ! ;)

In reply to by आबा

काशीबाईला पायाचे दुखणे होते म्हणतात. शिवाय सवतीबरोबर असा डान्स, तोही अगदी बिनघरंदाज थाटाच्या बेंबीदर्शन साड्या नेसून केलेला दाखवणे हे चूकच. हेत्वारोप करावा की नाही हे ज्याचं त्यानं आपापलं ठरवावं, परंतु असे काही दाखवणे पाहून हेत्वारोप करावासा वाटणे यात काही चूक नाही असे वाटते. वैसेभी पेशवा म्हणजे सन ऑफ अ लेसर गॉड, त्यांच्या नावाला इतके उपद्रवमूल्यही नाही. त्यामुळे तितका परिणाम होणार नाही.

In reply to by बॅटमॅन

१) काशीबाईंना असलेले पायाचे दुखणे विचारात न घेणे २) सवतीसोबत नाचताना दाखवणे ३) तात्कालीन पद्धतीचे पोषाख न दाखवणे या सरळ सरळ फॅक्चुअल चूका आहेत, यात ईतिहासाचे विकृतीकरण काही नाही

In reply to by बॅटमॅन

हो तुमचं बरोबर आहे,, फॅक्ट्च्युअली चूकच आणि विकृतही म्हणता येईल, मुख्य मुद्दा म्हणजे, आर्टिस्टीक लिबर्टी घेऊन इतिहासाचं इंटरप्रिटेशन यापूर्वीसुद्धा झालेलं आहे (ऊदा. - राऊ, राजा शिवछत्रपती, श्रीमान योगी, मृत्युंजय, मी नथुराम गोडसे बोलतोय, वगैरे). असं इंटरप्रिटेशन चांगलं/वाईट्/विकृत कसंही असू शकतं. आपल्या अहंगंडांना सुखावणारं इंटरप्रिटेशन तेवढं लालित्यपूर्ण, आणि थोडं वेगळं असलं की विकृत; ही मांडणी तात्विक नाही. त्या डान्स मध्ये काय व्हल्गर/विकृत आहे, ते त्यांनाच माहीत. असो. पेशव्यांनी चालवलेला थयथयाट, थोडा जरी ऐतिहासिक कन्सिस्ट्न्सी साठी असता; तरी मी अहंगंड वगैरे शब्द वापरले नसते, परंतू तो तसा नाहीय याची मला बर्‍याच अंशी खात्री आहे. मोअरओव्हर, काशीबाईंच्या ऐवजी मस्तानीला नाचताना दाखविले असते तरी त्यांनी पत्र लिहिण्याचे कष्ट घेतलेच नसते (ते असं मान्य करायचे नाहीत, हेही मला माहीत आहे). आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे. तुमचा स्वतःचा विरोध फक्त अ‍ॅक्युरसी साठी आहे, तरीही तुम्ही विकृत का म्हणंत आहात ते मला कळंत नाहीये.

In reply to by आबा

आमच्या थोर, खानदानी (इत्यादी) घरातल्या स्त्रीया डान्स करत नाहीत, हा भन्साळ्या कोण लागून गेला आमच्या बायकांना नाचवणरा अश्या प्रकारचा पंचरंगी माज आहे.
मुळात काशीबाईस पायाचे दुखणे असतानाही ती नाचली असे दाखवणे हे विकृत वाटते. हे चेष्टा केल्यासारखे वाटते. शिवाय तत्कालीन समजानुसार खालच्या दर्जाचे मानले गेलेले गुणविशेष दाखवणे हेही खटकतेच. यात माज कसला आला?

In reply to by बॅटमॅन

ते आणि तत्सम गुणविशेष खालच्या दर्जाचे आहेत, असे अजूनही मानणे (आणि तेच पत्राचे कारणही असणे) हा माज

In reply to by बॅटमॅन

हे इतीहास-विकृत प्रदर्शनाचे समर्थन करणार्या अस्सल विचारवंताना प्र्शन करतो की तुमच्या घराण्याच्या इतीहासावर एखादा माहीती पट बनविला आणि त्यात तुमच्या आज्जीला खालील गाण्याप्रमाणे दाखविले तर तुम्ही तुमच्या आप्तेष्टासहीत मिटक्या मारत पहाल काय ? असेच समर्थन कराल काय? चला त्या निमित्ताने तुमच्या घराण्याची माहीत+जाहीरात तरी झाली सगळ्या जगाला असे ऊर बडवून सांगाल काय ? का त्यांचे खरेच काही कर्तुत्व होते ते दाखविण्याचा आग्रह धराल ?
इथे उत्तरे द्या किंवा देऊ नकाच, फक्त घरी गेल्यावर आपल्या आईसमोर आणि कन्येसमोर उत्तरे द्या आणि त्यांचीच उत्तरे इथे टंका.

In reply to by नाखु

नाखुकाका, ही तुलना गंडलेली आहे. पेशव्यांबद्दल आदर- प्रेम जरूर असावा, मात्र जिथे तिथे हे तुमच्या घराण्याबद्दल बोलले तर काय वगैरे प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. याने साध्य काहीच होत नाही.