✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 10/26/2015 - 17:36  ·  लेख
लेख
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
40894 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

कल्पनाविलास

चित्रगुप्त
Mon, 10/26/2015 - 17:53 नवीन
रामायण, महाभारत आणि सर्व देशातील पौराणिक कथा या थोर कवींच्या कल्पनाविलासाचा परिपाक आहेत. यात आपल्या परीने मीही काही भर घातलेली आहेत. ते सर्व लेख खालील धाग्यात एकत्र सापडतील. ज्यांनी अद्याप वाचले नसतील त्यांचेसाठी दुवा देतो आहे: अजब महाभारत http://www.misalpav.com/node/32588
  • Log in or register to post comments

बाप रे! आता झुंबड उडणार

याॅर्कर
Mon, 10/26/2015 - 18:29 नवीन
जाता जाता..... .. .. पांडवांचा जन्म - मंत्राने देवतेचे आवाहन केल्याने देवता येते,आणि डायरेक्ट बाळ हातात ठेऊन जाते,हे चूकीचे आहे. त्याचे असे आहे,मंत्राने देवतेचे आवाहन केल्यास ती देवता आवाहन करणार्याच्या अधीन होते,आता अधीन होणे म्हणजे काय? आणि कुंतीला तीन पुत्र का हवे होते?एक का नको? तीन पुत्र हवे होते तर त्यांची वये एकसारखी हवीत ना? मग युधिष्ठिर जेष्ठ त्यानंतर काही वर्षांनी भीम मग अर्जुन. मला काय म्हणायचे ते कळले का? मुलं डायरेक्ट हातात आली नाहीत,त्यांचा क्रमाने जन्म झाला गर्भधारणा होऊन. पुढे द्रौपदीनेही तोच आपल्या सासूचा वसा पुढे चालू ठेवला.
  • Log in or register to post comments

>>

हेमंत लाटकर
Mon, 10/26/2015 - 21:23 नवीन
<<<पांडवांचा जन्म - मंत्राने देवतेचे आवाहन केल्याने देवता येते,आणि डायरेक्ट बाळ हातात ठेऊन जाते,हे चूकीचे आहे.>>> हे मलाही माहित आहे. कुंतीला यमापासून युद्धिष्टर, इंद्रापासून अर्जून, वायूपासून भीम. माद्रीला अश्विनीकुमारांपासून नकुल व सहदेव झाले. देव म्हणजे मानवच पण त्यांनी चांगले काम केले म्हणून ते देव. द्रोपदीला मुले स्वत:च्या नवर्यापासून (पाच पांडव) पासून झाले. कुंती व माद्री सारखे नियाेग पद्धतीने नव्हे. संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्पनाविस्तार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्

होबासराव
Mon, 10/26/2015 - 21:40 नवीन
संपुर्ण महाभारत व रामायण म्हणजे अतिशयोक्ती नाही काही गोष्टीत कल्पनाविस्तार आहे. क्या रे कांचा बंदुक भि दिखाता है और पिछे भि हटता है. तुमच्या प्रश्णाचे उत्तर तुम्हिच दिले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हा हा, द्रौपदी?

याॅर्कर
Mon, 10/26/2015 - 23:01 नवीन
द्रौपदीचं काय सांगूच नका तुम्ही,आणि ते कौमार्य टिकून राहते म्हणजे काय नेमके? पाच पुरूषांबरोबर संबंध आले कि ही नंतरची सारवासारव कि कौमार्य टिकण्याचा वरदान होतं म्हणे जन्मतः नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो? गादीवर अधिकार राजाच्या ज्येष्ठ पुत्राचा असतो(त्या काळी) आणि तो अधिकार धृतराष्ट्राचा त्यानंतर त्याच्या ज्येष्ठ पुत्राचा म्हणजे दुर्योधनचा.पण धृतराष्ट्र अंध असल्यामुळे तो केवळ कार्यकारी राजा असतो,राज्याभिषेक झालेला नसतो.भीष्मांच्या म्हणण्यानुसार त्याचा हक्क राहत नाही,कारण राजा अंध असू शकत नाही.मग पांडू गादीवर बसतो आणि भीष्म,विदूर इ.च्या मते पांडूनंतर तो हक्क युधिष्ठिराकडे जातो.पण हे पूर्ण चूकीचे आहे.खरा वारसदार धृतराष्ट्र असतो जरी अंध असला तरी, मग त्यानंतर दुर्योधन.आणि ते योग्यतेनुसार युवराजनियुक्तीसाठी रंगभूमी वगैरे ढोंग होतं. खरा अन्याय दुर्योधनबरोबर झालाय. आणि कर्णाला त्याची जात दाखवून अपमान करणारी स्त्री,आणि नंतर त्याच्याकडे त्या नजरेने(?) पाहणारी स्त्री सदाचारी,शीलवान असू शकत नाही. (जांभूळ आख्यायन माहित आहे का?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

यावरून आमणदेव आणि

प्रचेतस
Mon, 10/26/2015 - 23:07 नवीन
यावरून आमणदेव आणि रामदेवरायाचे वैर आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

जरा हमको भी तो बताओ वो कहाणी.

गणामास्तर
Tue, 10/27/2015 - 11:38 नवीन
जरा हमको भी तो बताओ वो कहाणी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कृष्णदेव यादवाचा मुलगा

प्रचेतस
Tue, 10/27/2015 - 13:46 नवीन
कृष्णदेव यादवाचा मुलगा रामदेवराय तर कृष्णाचा धाकटा भाऊ महादेवराय. कण्हदेवो कटकी आला संगे धाकुटा महादेव होता. कृष्णाच्या मृत्युनंतर रामदेवराय अल्पवयीन असल्याने धाकटा महादेव देवगिरीच्या सिंहासनावर आला. महादेवाच्या मृत्युनंतर रामदेवरायाला राज्य मिळण्याचे ऐवजी महादेवाचा मुलगा आमणदेवास मिळाले. तेव्हा रामदेवरायने उठाव करुन आमणदेवास पदच्युत केले व देवगिरी राजसिंहासनावर अभिषिक्त झाला. आमणदेवे डोळे काढीयले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

धन्स रे.

गणामास्तर
Wed, 10/28/2015 - 09:36 नवीन
धन्स रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नियोग पद्धतीने झालेला

हेमंत लाटकर
Mon, 10/26/2015 - 23:55 नवीन
नियोग पद्धतीने झालेला युधिष्ठिर राजा कसा काय बनू शकतो? धुतराष्ट्र, पन्डू, विदुर हे अंबिका व अंबालिकाला व्यासापासून नियोग पद्धतीनेच झाले. हिमालयात अजूनही काही आदिवासीत बहु पती पद्धत अस्तित्वात आहे. पाच पाडवात द्रोपदीमुळे फट पडू नये म्हणूम कुंतीने पाच भावात वाटून घ्या असे सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

नियोग पद्धतीने असले तरी त्यातही धृतराष्ट्र ज्येष्ठ

याॅर्कर
Tue, 10/27/2015 - 07:07 नवीन
त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता,कारण सगळेच नियोग पद्धतीने झाले होते.पण इथे दुर्योधन हा पर्याय आहे ना? सभ्य समाजाची आदिवासींबरोबर तुलना होऊ शकते काय? बहु पती पद्धत त्यांच्यात आहे म्हणून काय हे पण तसेच? द्रौपदीमुळे भावांमध्ये फूट पडण्याइतके पांडव बायले होते काय? आणि ते व्यास पार्ट टाईम जाॅब करत होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

व्यास पार्ट टाईम जाॅब करत

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 08:09 नवीन
व्यास पार्ट टाईम जाॅब करत होते काय?
सत्यवतीने वंशविस्तारासाठी सुरवातीला भीष्माला विचारले पण भीष्माने नकार दिला म्हणून सत्यवतीने व्यासाला विचारले. व्यास म्हणजे सत्यवतीला लग्नाआधी पराशरापासून झालेला मुलगा. द्रोपदीला स्वयंवरात अर्जुणाने जिंकले. द्रोपदीचे सोंदर्य बघून युद्धिष्टरचे चित्त ढळले. पांडवामध्ये फुट पाडण्यासाठी दुर्याधनाचे प्रयन्त चालत. व्यास सत्यवतीला लग्नाआधी झालेला असुनही प्रसिद्ध झाले. कर्ण कुंतीला लग्नाआधी झाला पण त्याची सुतपुत्र म्हणून अवहेलना झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

हे सगळं माहिती आहे हो!

याॅर्कर
Tue, 10/27/2015 - 10:40 नवीन
आता सगळं महाभारत सांगता कि काय? . . . . . आपल्या विवेकबुद्धीस काही गोष्टी पटत नाहीत, बाकि महाभारत घडलेच नाही असे मी म्हणत नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा काहीही हेतु नाही,मी ही त्याच 'हिंदू'नामक कंपूतील एक जीव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

सभ्य समाजाची आदिवासींबरोबर

टवाळ कार्टा
Tue, 10/27/2015 - 12:38 नवीन
सभ्य समाजाची आदिवासींबरोबर तुलना होऊ शकते काय?
आदिवासींना उग्गाच बदनाम करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

@मग पांडू गादीवर बसतो

अत्रुप्त आत्मा
Tue, 10/27/2015 - 00:08 नवीन
@मग पांडू Image removed. गादीवर बसतो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

प्रतिसाद ऑफ ड दे.

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:40 नवीन
प्रतिसाद ऑफ ड दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवा, तुमच्याइतकी पांडूची

बॅटमॅन
Tue, 10/27/2015 - 17:41 नवीन
बुवा, तुमच्याइतकी पांडूची अठवण मीनाक्षी देवरूखकरही काढत नसेल हो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कोण ही मीनाक्षी देवरूखकर ?

चित्रगुप्त
Tue, 10/27/2015 - 17:51 नवीन
आता ही मीनाक्षी देवरूखकर कोण बुवा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खी खी खी, कोणी नै ओ. ;)

बॅटमॅन
Tue, 10/27/2015 - 18:11 नवीन
खी खी खी, कोणी नै ओ. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आपल्या महान प्राचीन हिंदु

जेपी
Mon, 10/26/2015 - 18:49 नवीन
आपल्या महान प्राचीन हिंदु देवदेवतांची,वेदपुराणांची धागाकर्ते अतिशयोक्ती म्हणुन जी खिल्ली उडवत आहेत त्याची निर्भत्सना करावी तेवढी कमी आहे. -जगबुडी
  • Log in or register to post comments

तीव्र

नाखु
Tue, 10/27/2015 - 09:20 नवीन
हाणुन मोदन !!! -खरपुडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ब्वॉर्र

टवाळ कार्टा
Mon, 10/26/2015 - 19:01 नवीन
ब्वॉर्र
  • Log in or register to post comments

शान्या मनसानं कथा अयकावी.हात

वडाप
Mon, 10/26/2015 - 20:06 नवीन
शान्या मनसानं कथा अयकावी.हात जुडावे अन कय मागाचं ते माघून घियावं.शिंवाशनाची मापं कशाला क्हाढावी?
  • Log in or register to post comments

धार्मिक ग्रंथांवर प्रश्न

विवेकपटाईत
Mon, 10/26/2015 - 20:20 नवीन
धार्मिक ग्रंथांवर प्रश्न उपस्थित करण्याआधी एकदा तरी त्यांचे वाचन करणे योग्य.
  • Log in or register to post comments

ब्वॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र् मग

उगा काहितरीच
Mon, 10/26/2015 - 20:21 नवीन
ब्वॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र् मग ??
  • Log in or register to post comments

पुराणकथांवर विश्वास ठेवण्याआधी

याॅर्कर
Mon, 10/26/2015 - 20:46 नवीन
पुराणकथांवर विश्वास ठेवण्याआधी एकदा तरी त्या तर्कबुद्धीने वाचणे योग्य. नाही म्हणजे त्याला देवाधर्माची जोड आहे म्हणून त्यावर काही बोलायचेच नाही कि काय? याला "धार्मिक दहशतवाद" म्हणतात. . . . .____(एक दिव्य अलौकिक शक्ती आहे हे माननारा याॅर्कर)
  • Log in or register to post comments

4. यादवांचे पाप वाढल्यामुळे

नाव आडनाव
Mon, 10/26/2015 - 21:33 नवीन
4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. पन, तरीबी लालू, मुलायम, अखिलेश, पप्पू ... सारे यादव जित्ते र्‍हायले. काय ऊपेग? याहिले पव्हता यत व्हतं भवतेक.
  • Log in or register to post comments

पुराणानुसार यादव द्वारकेत

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/26/2015 - 21:37 नवीन
पुराणानुसार यादव द्वारकेत नाही तर प्रभास क्षेत्री मेले बहुतेक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

बाहुबली ने मारले ?

सागरकदम
Wed, 10/28/2015 - 20:44 नवीन
बाहुबली ने मारले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

हर हर..आमच्या टनाटनी

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/26/2015 - 21:44 नवीन
हर हर..आमच्या टनाटनी धर्मातल्या चूका काढता काय!? परमेश्वर तुम्हाला उकळत्या तेलात फ्राय करो टना टन फ्राय!
  • Log in or register to post comments

पापड फ्राय!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 10/26/2015 - 21:58 नवीन
पापड फ्राय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हर हर..आमच्या टनाटनी

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 17:04 नवीन
हर हर..आमच्या टनाटनी धर्मातल्या चूका काढता काय!?
शांती, कालसर्पयोग, नारायण नागबली केल्याने आयुष्यात येणार्या अडचणी व संकटे टळतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग

जातवेद
Sat, 10/31/2015 - 16:42 नवीन
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग केल्याने काहि टळतात म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग

हेमंत लाटकर
Sat, 10/31/2015 - 17:45 नवीन
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग केल्याने काहि टळतात म्हणे.
शांती,कालसर्पयोग,नारायण नागबली,ग्रहांचा जप हे काही खर नसतं. सर्व मनाची समाधानी व पुरोहिताला लाभ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

चित्रगुप्तकृत कालसर्पयोग

चित्रगुप्त
Sat, 10/31/2015 - 22:50 नवीन
चित्रगुप्तकृत कालसर्पयोग नाही, 'कालसर्प'वियोग'. अर्थात याचा ज्योतीष वगैरेंशी काहीही संबंध नसून आहारात बदल करण्याशी आहे. याविषयी माहिती माझ्या खालील लेखात आहे: शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ? http://www.misalpav.com/node/33321
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

शांती,कालसर्पयोग,नारायण

होबासराव
Sun, 11/01/2015 - 20:41 नवीन
शांती,कालसर्पयोग,नारायण नागबली,ग्रहांचा जप हे काही खर नसतं. सर्व मनाची समाधानी व पुरोहिताला लाभ. सर आपण एकदम योग्य बोललात, रच्याकने कोकिळ्व्रता बद्दल आपले मत जाणुन घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हं बरोबर राजे! प्रतिसाद

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 20:44 नवीन
हं बरोबर राजे! प्रतिसाद मिळवण्यासाठी आपली साईड बदलू नये या मताचा मी आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

केवळ टीआरपी हाच उद्द्येश असला

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/01/2015 - 23:10 नवीन
केवळ टीआरपी हाच उद्द्येश असला तर मग स्वतःचे मत असायलाच पाहिजे असे नाही, वादग्रस्त होईल असा धागा/वाक्य (उर्फ काडी) पुरेशी असते. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

तुम्हीच सांगा 1 ते 9 मधल्या

हेमंत लाटकर
Mon, 10/26/2015 - 22:36 नवीन
तुम्हीच सांगा 1 ते 9 मधल्या कोणत्या गोष्टी विज्ञानाच्या आधारे खर्या वाटतात.
  • Log in or register to post comments

३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथा होती.

गामा पैलवान
Tue, 10/27/2015 - 00:05 नवीन
हेला, ३० वर्षांपूर्वी मिपा ही एक कपोलकल्पित कथाच होती. १९८५ साली कोणी जर म्हंटलं असतं की आजपासून काही वर्षांनी मिसळपाव नामे संकेतस्थळावर जगभरातले मराठी भाषिक जमून लेखी चर्चा करतील, तर त्याला लोकांनी वेड्यात काढला असता. किंवा विज्ञानकथालेखक म्हणून डोक्यावर तरी घेतला असता. तस्मात, आपल्या कक्षेबाहेरची माहिती असेल तर घाईघाईने निष्कर्ष काढू नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

+१

ट्रेड मार्क
Tue, 10/27/2015 - 00:21 नवीन
जगात कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समोर असून आपल्याला त्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देत येत नाही. तसेच अजून कितीतरी गोष्टी असतील की ज्या आपल्याला अजून माहित नसतील. त्यामुळे आपल्याला माहित नाही म्हणून ती गोष्ट जगात नव्हतीच अथवा नाहीच असं होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक

नाना स्कॉच
Tue, 10/27/2015 - 08:48 नवीन
बऱ्याच गोष्टींचे वैज्ञानिक स्पष्टीकरण समजत नाही म्हणून त्या बऱ्याच गोष्टींना शेंदुर फासुन भक्ति करायलाच हवी असेही नाही न बॉस! चौकसपणा हा मुळ मानवी स्वाभाव आहे, अनुत्तरित प्रश्नांना उत्तरे मागायची नाहीत अन वरतुन "ही आपल्या बुद्धीची पातळी" म्हणून स्वतःच स्वतःला थांबवणे हेच असले तर आपला महान धर्म अन एकेश्वरवादी एकपुस्तकवादी धर्मांत अंतर ते काय उरेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

माझा प्रतिसाद

ट्रेड मार्क
Tue, 10/27/2015 - 20:03 नवीन
माझा प्रतिसाद गा. पै. ना अनुमोदन म्हणून आहे. त्यांच्या अथवा माझ्या प्रतिसादात कुठेही शेंदूर फासून भक्ती करण्याबाबत कुठलाही उल्लेख नाही. म्हणणे फक्त एवढेच आहे कि आत्ता आपल्याला माहित नाही म्हणून एखादी गोष्ट पूर्णपणे नाकारू शकत नाही. तुमच्या मनात शेंदूर फासून भक्तीविषयीचे विचार असतील तर त्याच्या समर्थनार्थ अथवा विरोधी कुठल्याच गोष्टीवर मी भाष्य केलेलं नाही. माणसाने चौकस असावेच, प्रश्न हे पडलेच आणी विचारलेच गेले पाहिजेत. परंतू फक्त मी करतो तोच विचार बरोबर आणि मला माहिती आहे तेवढेच सत्य हा हेका नसावा. ज्ञान मिळवण्यासाठी इतरांची मते पण स्वीकारता आली पाहिजेत. अवांतर - कुठल्याही दगडाला शेंदूर फासून देव मानण्याला माझाही विरोधच आहे. भक्तिभाव असणे/ नसणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक मामला आहे. कुठल्याही गोष्टीचे अवडंबर माजू नये. (आपला महान धर्म अन एकेश्वरवादी एकपुस्तकवादी धर्माविषयी टिपण्णी करण्याचे, या धाग्याचा काश्मीर होऊ नये म्हणून, मुद्दाम टाळले आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

बाप मुलास ,

दिवाकर कुलकर्णी
Tue, 10/27/2015 - 00:43 नवीन
बाप मुलास , गाढवाच्या लेका तुला हजार वेळा सांगीतलंय अतियशयोक्ति करत जाऊ नको म्हणून आचार्य अत्रे एकदा एका सभेत आता हे विठ्ठलराव(गाडगीळ) म्हणतात आम्ही अतियशयोक्ति करतो, हे विठ्ठलराव काका साहेबांचे चिरंजीव, क्षणभर थांबून ,ही अतिशयोक्ति नव्हे ना १,३,५ हे प्रत्यक्षात घडू शकते रामायण ,महाभारत म्हणजे चांदो बातल्या गोष्टी न्हवेत याच भान ठेवावं कुसपटं काढणं हे सगळ्यात सोपं काम महाभारतातलया सारखा एखादाश्लोक अतियशयोक्ति असू दे त्यात रचून दाखवावा या धाग्यतून काय सिद्ध करायचे आहे
  • Log in or register to post comments

सर्वच प्रतिसाद वाचले. काही

ज्योति अळवणी
Tue, 10/27/2015 - 01:51 नवीन
सर्वच प्रतिसाद वाचले. काही दिवसांपूर्वीच माझ्या मुलीने मला असेच काहीसे प्रश्न विचारले होते... महाभारता मधील अतिशायोक्तीवर. त्यावर मी तिला जे सांगितले ते इथे नमूद करते. आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराज खरेच होते. त्यांनी लहान वयापासून हिंदू राष्ट्राचा ध्यास घेतला आणि त्याप्रमाणे लढाया करून यश मिळवले. या इतिहासाला तशी फार वर्ष झाली नाहीत. तरीही त्यांच्या भोवती काही चमत्कार जोडले गेलेच की. जसे भवानी तलवार शिवाजी महाराजांना भवानी मातेने दिली. महाराजांचा मृत्यू देखील आता थोडा वादात आणि गुढतेत अडकला आहे. त्याचप्रमाणे कदाचित महाभारत लाखो करोडो वर्षांपूर्वी घडले ही असेल. आणि हळू हळू त्याबाबतीत देखील अतिशयोक्तीची जोड मिळाली असेल. कदाचित तो आपला इतिहास असेलही. त्याकाळातील मानव निसर्गाच्या जास्त जवळ असल्याने काही वेगळ्या शक्ती असतीलही त्याकाळच्या मानवात. आणि त्या शक्तीना जास्त भव्य दिव्य रूप पुढे दिल गेल असेल. कदाचित अजून लाख वर्षानंतर शिवाजी महाराज देखील महाभारताप्रमाणे दंत कथा होतील. आणि मग त्यावेळच्या अशाच कोणत्या तरी व्यनीवर त्यांच्या बद्दल काही खिल्ली उडवली जाईल आणि चर्चा होऊन विषय संपेल. कदाचित................................................
  • Log in or register to post comments

हा धागा लिहून मला महाभारत व

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 08:51 नवीन
हा धागा लिहून मला महाभारत व रामायण या ग्रंथाची खिल्ली उडवायची नाही तर त्यातील काही गोष्टीतील अतिशयोक्ती सांगायची. उदा. कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला.
  • Log in or register to post comments

कोकीळाव्रताची माहिती देणारे तुम्हीच का???

अमृत
Tue, 10/27/2015 - 09:10 नवीन
का आय्डी हॅक झाला होता? असले पांचट धागे इतर धर्मांविरूद्ध काढण्याचे धाडस आहे काय तुमच्यात? उत्तर माहिती आहे. संपादक मंडळ असल्या टिआरपीछाप धाग्यांवर कारवाई का करत नाही? माझ्यालेखी हे धार्मिक भावना दुअखावणारे धागे आहेत. बरेच दिवसांपासून बघतोय दर २-३ दिवसांनी एक असला धागा येतोच येतो. नाहीतर काहीतरी करून असले विषय इतर धाग्यंवर जाणूनबुजून काढले जातात. आशा आहे की मिपाला धार्मिक भावना दुखवणारे संस्थळ अशी मान्यता मिळू नये वा अशी मिपा संमची इछापण नसावी. स्पष्ट लिहितोय पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असावी. बरेच धागे दुर्लक्षित केले पण आता नाही.
  • Log in or register to post comments

सहमत!

नया है वह
Tue, 10/27/2015 - 11:46 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

असे धागे इतर धर्मांविरूद्ध

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 18:02 नवीन
असे धागे इतर धर्मांविरूद्ध काढण्याचे धाडस आहे काय तुमच्यात?
इतर धर्माचे काय करायचे. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा व गोष्टी विषयी आपण बोलायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

इतर धर्माचे काय करायचे.

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 18:06 नवीन
इतर धर्माचे काय करायचे. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा व गोष्टी विषयी आपण बोलायचे.
आँ म्हणजे आपला तो धर्म आणी इतरांचा तो अधर्म वगैरे मानता की काय ? तसेही अनिश्ट गोष्टी धर्म-जात भेदभाव बघत नसतात. असो मला अंडे आधी निर्माण झाले हे पटत नाही तुम्हाला काय वाटते प्रथम कोंबडे निर्माण झाले असावे की अंडे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा