Skip to main content

लाजाळू नि गुलाब

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 30/10/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाजाळूच्या झाडापुढे गुलाबाच फूल नको स्पर्शाविना मिटण्याची त्याला नवी भूल नको! गुलाबाच फूल भारी लाजाळूला खेटलेल लाजाळूच झाड वेड येता जाता मिटलेल! कुणी द्या रे रंग-वास लाजाळूला मिरवाया तोरा नवा दाखवून ताटव्याला फुलवाया! - संदीप चांदणे

वाचने 2698
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

धन्यवाद दमामि आणि पैसाताई! :)) @टका: इथे लाजाळूच झाड म्हणजे एक मुलगा आहे आणि गुलाबाचं फूल म्हणजे अर्थातच मुलगी! बहुतेक आता यापुढे हा अधिक चांगला कच्चा माल होऊ शकेल! येउद्या काहीतरी फर्मास! अजून सविस्तर नंतर लिहीन! ;-) Sandy

येकदम मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त...झकास.