✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खपले जाल !!

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 10/11/2015 - 17:31  ·  लेख
लेख
चवदार तळ्याच्या काठी साधारण चार बदके बसली होती. पाण्यात मगरींचा सुळसुळाट होता. त्यातल्या एका बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो दुसऱ्या काठावर पोहोचला. तिकडुन त्याने या मागच्यांना खुण केली. मग दुसऱ्या बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो पाण्याच्या मध्यभागी आला. एक बेडूक काठावरुनच या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेऊन होता. मग त्यानेही डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत त्याने दुसऱ्या बदकाला पाण्याच्या मधोमध गाठले. आणि त्याला म्हणाला, "हे बदकदादा, या पाण्यात भयंकर मोठ्या अशा मगरी आहेत. एकतर तू पाण्यात ऊतरून चुक केली आहेस. किंवा त्या पहिल्या बदकाने तुला संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे. तु ईथुनच मागे फिर" आधीच दमलेल्या बदकाने त्याला टुचकन टोची मारली आणि पुढे निघाला. तेवढ्यात एक अगडबंब मगर पाण्याचा फवारा ऊडवत बाहेर आला. आणि बेडकाला तोंडात घेऊन पाण्यात निघुन गेला. दरम्यान त्या बदकाचीही चांगलीच तंतरली. आधीच धपापलेलं ते बदक या धक्क्याने पाण्यात बुडुन मरुन गेलं. काठावरुन ईकडुन दोन आणि तिकडुन एक असे तिन्ही बदक या प्रकाराकडे अवाक होऊन नुसतेच बघत राहीले. तात्पर्य : १. आधीच पेटलेल्या रणांगणात जाऊन ऐण आक्रमणाच्या वेळी ऊपदेशाचे डोस पाजू नयेत. खपले जाल. २. ज्या ठिकाणी ज्या चुकीसाठी ज्या वेळी आपण सल्ला देताय तिथे आपणही अगोदरच काशी केलेली आहे. हे लक्षात असू द्या. तेव्हा पुन:श्च खपले जाल. ३. पाण्याबाहेर येताना शक्यतो फवाऱ्याचा वापर टाळावा. ऊपाशी मराल. ४. क्षुद्रांचे सल्ले बिनडोक वाटत असले तरी खरे ठरु शकतात. तेव्हा दुर्लक्ष करु नका. फुकट मराल. ५. परफेक्ट षडयंत्र असे रचावे की काठावर बसुन आपण नुसते अवाक होऊन पाहत रहावे. ६. तुम्हालाही काही सुचलं तर येऊ द्या. नसता.... (ह.घ्या.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11864 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

३. पाण्याबाहेर येताना शक्यतो

बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/11/2015 - 17:35 नवीन
३. पाण्याबाहेर येताना शक्यतो फवाऱ्याचा वापर टाळावा. ऊपाशी मराल.
या गोष्टीत तरी असं काही दिसलं नाही ब्वॉ. मगर पाण्याचा फवारा उडवत आली, तरी उपास नाही घडला तिला.
५. परफेक्ट षडयंत्र असे रचावे की काठावर बसुन आपण नुसते अवाक होऊन पाहत रहावे.
परत तेच... गोष्टीत कोणी रचले षडयंत्र?
६. तुम्हालाही काही सुचलं तर येऊ द्या. नसता.... (ह.घ्या.)
आज वेळ होता, म्हणून दखल घेतली. अन्यथा... (ह. च घ्या हं!) ;)
  • Log in or register to post comments

मगर पाण्याचा फवारा उडवत आली,

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 17:43 नवीन
मगर पाण्याचा फवारा उडवत आली, तरी उपास नाही घडला तिला.>>>>> तिने बदकाऐवजी बेडकाला गटकावले. गोष्टीत कोणी रचले षडयंत्र?>>>>> बेडुकराव म्हणाले तसं पहिल्या बदकाने. आज वेळ होता, म्हणून>>>> बास का राव!! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तिने बदकाऐवजी बेडकाला गटकावले

बिपिन कार्यकर्ते
Sun, 10/11/2015 - 18:03 नवीन
तिने बदकाऐवजी बेडकाला गटकावले.
मेलेले बदक पाण्यातच पडले ना? की मेल्यावर भुर्रकिनी उडून गेले? ;) ... मग मगरीला बदकही मिळाले आणि बेडूकही. डब्बल फायदा. और उडावो पाणी! निष्कर्ष चूकच.
किंवा त्या पहिल्या बदकाने तुला संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे
हे त्या बेडकाचे म्हणणे. ते वास्तवात तसेच होते असे कुठेच ध्वनित होत नाहीये. आणि त्यामुळे, गोष्टीतून तसा निष्कर्ष निघत नाहीये.
बास का राव!! _/\_
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मेलेले बदक पाण्यातच पडले ना?>

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 18:18 नवीन
मेलेले बदक पाण्यातच पडले ना?>>>>> प्रत्येक वेळी बदक मरेलच असं नाही. तेव्हा पहिल्या डावातच त्याला पकडणे सोईस्कर. किंवा त्या पहिल्या बदकाने तुला संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे>>>>>>> जर खरच रचले असेल तर तो निष्कर्ष. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

.

dadadarekar
Sun, 10/11/2015 - 17:53 नवीन
छान
  • Log in or register to post comments

चान चान बोदो(क)कथा

प्यारे१
Sun, 10/11/2015 - 18:00 नवीन
चान चान बोदो(क)कथा -प्यारे बंगाली
  • Log in or register to post comments

दिसामाजी काहितरी लिहावे हे खर

जेपी
Sun, 10/11/2015 - 18:05 नवीन
दिसामाजी काहितरी लिहावे हे खर हाय .. पण
  • Log in or register to post comments

खो खो खो

जातवेद
Mon, 10/12/2015 - 11:53 नवीन
खो खो खो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जव्हेरगंजभौ...

चांदणे संदीप
Sun, 10/11/2015 - 18:12 नवीन
जव्हेरगंजभौ... या अशा कथा लिहिण्यासाठी तुम्ही पटाईत काकांच्या छोट्या छोट्या कथांचा अभ्यास करावा असे सुचवितो! कारण: १) त्यांची छान साधी सोपी लिहिण्याची शैली. २)कमीत कमी पण परिणामकारक आणि सुयोग्य शब्दांचा वापर. ३) त्यांच्या अशा छोट्या कथा नेहमीच चलू चालू घडामोडींशी निगडीत असतात. या कसोट्यांवर मी पाहिल्याने ही कथा मला आजिबात आवडली नाही! माफ करा! पुलेशु! Sandy
  • Log in or register to post comments

चालू घडामोडींशी निगडीत ही कथा

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 18:21 नवीन
चालू घडामोडींशी निगडीत ही कथा नाहीये. सल्ल्याबद्दल आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

तुमच्या प्रतिसाद आवडला नाही.

तर्राट जोकर
Mon, 10/12/2015 - 00:05 नवीन
तुमच्या प्रतिसाद आवडला नाही. कुनी म्हनुनसे गेले आहे. राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ? इथे संबंधित कुठलीच पार्टी राजहंस आहे असे आमचे अजिबात मत नाही पण.. मुद्दा समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कुनी म्हनुनसे गेले आहे.

सतिश गावडे
Mon, 10/12/2015 - 23:28 नवीन
कुनी म्हनुनसे गेले आहे. राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणोनि काय कवणे, चालोचि नये ?
अशी ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गावडेकाका, उपरोध होता हो तो.

तर्राट जोकर
Mon, 10/12/2015 - 23:39 नवीन
गावडेकाका, उपरोध होता हो तो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

लघुकथा प्रसवण्याचा विक्रम

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/11/2015 - 18:24 नवीन
लघुकथा प्रसवण्याचा विक्रम चालू आहे की काय ?!
  • Log in or register to post comments

आवरतं घेतोय मालक! आता दीर्घ

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 18:32 नवीन
आवरतं घेतोय मालक! आता दीर्घ विश्रांतीसाठी आम्ही सज्ज आहोत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खपलो गेलो..

खटपट्या
Sun, 10/11/2015 - 20:02 नवीन
खपलो गेलो..
  • Log in or register to post comments

कंट्रोल यार....

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 20:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

काठावर बसुन नुसते अवाक होऊन

बाबा योगिराज
Sun, 10/11/2015 - 20:13 नवीन
काठावर बसुन नुसते अवाक होऊन पाहनारा बाबा.
  • Log in or register to post comments

कथा वाचून काहीच बोध होत

हेमंत लाटकर
Sun, 10/11/2015 - 21:05 नवीन
कथा वाचून काहीच बोध होत नाहीये. विचारात पडलेला लट्टुकाका
  • Log in or register to post comments

लेट्स ट्राय टु मेक सेन्स ऑटॉफ इट...

द-बाहुबली
Sun, 10/11/2015 - 22:47 नवीन
आधीच पेटलेल्या रणांगणात जाऊन ऐण आक्रमणाच्या वेळी ऊपदेशाचे डोस पाजू नयेत. खपले जाल.
श्री़कृष्ण खपला न्हवता.
  • Log in or register to post comments

बाहुबली _/\_ अभिनंदन. योग्य

जव्हेरगंज
Sun, 10/11/2015 - 23:05 नवीन
बाहुबली _/\_ अभिनंदन. योग्य पॉइंट शोधलात. तुमच्यासाठी तात्पर्य थोडे बदलतो. असं.... आधीच पेटलेल्या रणांगणात जाऊन ऐण आक्रमणाच्या वेळी सोम्यागोम्यांनी ऊपदेशाचे डोस पाजू नयेत . खपले जाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे

पिशी अबोली
Sun, 10/11/2015 - 23:28 नवीन
मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे' नाहीत. तस्मात् तो मुद्दा मुळासकट रद्दबातल ठरत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे

टवाळ कार्टा
Mon, 10/12/2015 - 12:15 नवीन
मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे' नाहीत.
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

असा आयडी आहे एक.

प्यारे१
Mon, 10/12/2015 - 12:36 नवीन
असा आयडी आहे एक. सोम्यागोम्या म्हणून. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुळात जव्हेरभाउ मिपाकरांबाबत

द-बाहुबली
Mon, 10/12/2015 - 12:56 नवीन
मुळात जव्हेरभाउ मिपाकरांबाबत बोलत होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

युद्धाच्या शेवटी गांधारीने

कानडा
Mon, 10/12/2015 - 12:08 नवीन
युद्धाच्या शेवटी गांधारीने कृष्णाला यदुवंशाचा नाश होईल असा शाप दिला आणि त्यामुळेच कृष्ण खपला की हो ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

ओह..! आवो जगातला प्रत्येकजण

द-बाहुबली
Mon, 10/12/2015 - 12:55 नवीन
ओह..! आवो जगातला प्रत्येकजण खपतोच की हो. थोडक्यात काय कधीही जन्माले येउ नका खपले जाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा

पांडू मोड ऑन \-

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/11/2015 - 23:22 नवीन
पांडू मोड ऑन \- छाण लेखण! पांडू मोड ऑफ /- (अ)समांतर :- अ'ता खाटुक येइल दांडू घेउन! ;-)
  • Log in or register to post comments

सॉक्रेटीस, कान्ट, प्लेटो,

तर्राट जोकर
Sun, 10/11/2015 - 23:57 नवीन
सॉक्रेटीस, कान्ट, प्लेटो, मार्क्स सारख्या थोर प्रभृतींसमोर हलक्या फुलक्या पंचतंत्र कथा वाचल्यातर काय होतं हे प्रतिसादांवर कळलं.... एक 'म्हातारी आणि भोपळा या कथेवरचं तज्ञ विचारवंतांचे चर्चासत्र' अशा धाटणीची कथाही आठवली...
  • Log in or register to post comments

काही लोकांनी आजारी घोडा आणि

तर्राट जोकर
Sun, 10/11/2015 - 23:59 नवीन
काही लोकांनी आजारी घोडा आणि बकरा/कोंबडा/डुक्कर यांची कथा वाचलेली दिसत नाही हेही घ्या जोडून आधीच्या प्रतिसादात....
  • Log in or register to post comments

अजाबात कल्लं सुदिक नाही,

दिवाकर कुलकर्णी
Mon, 10/12/2015 - 00:12 नवीन
अजाबात कल्लं सुदिक नाही, लयी नाई पनं वाइच जरी इस्कटून सांगीतलं तरी ब्यास
  • Log in or register to post comments

उशीर झाला का मला? कुठे काय

रातराणी
Mon, 10/12/2015 - 01:40 नवीन
उशीर झाला का मला? कुठे काय तापल होतं?
  • Log in or register to post comments

मगरीच्या जबड्यात सुचलेलं

कंजूस
Mon, 10/12/2015 - 05:34 नवीन
मगरीच्या जबड्यात सुचलेलं शहाणपण- तुमचं म्हणणं { बरोबर आहे } थोडक्यात सांगा.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Mon, 10/12/2015 - 11:47 नवीन
पह्ले बदक... सेना उरलेलीए बदके ... जनता मगर ...... भाजपा बेडूक ..... केजरीवाल /आप
  • Log in or register to post comments

हे वाचताना काही दिवसांपुर्वी लिहिलेली आमची एक कविता आठवली...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 10/12/2015 - 12:09 नवीन
चवदार तळ्याच्या काठी, होती बदके सुरेख तळ्या मधे लपुनी,होती मगर एक ||धृ|| एका बदकने मारला, पाण्यात डुबुक सुर बाकी बदकांचा तेव्हा, धपापला रे उर काठावर पोचताना, पाहि वळुन क्षणेक, त्याचेच त्या कळाले, घेतली उगाच रिस्क ||१|| दुसर्‍या बदकास मग,फारच चेव आला, सारासार विचार, पाण्या मधे बुडला, वाटेवर अर्ध्या त्याला, दिसता मगर एक, क्षणात गुल झाला,त्याच्याच हार्टचा चोक ||२|| बाकी बदकांची इकडे, एवढी मोठी फाटली, पाण्यात जायची त्यांच्यात हिम्मत नाही उरली, काठावर चालताना, हसती तयांस लोक, सीर सलामत असे तो, पगड्या मिळती अनेक ||३|| चवदार तळ्याच्या काठी,..... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वा बुवा सुरेख

जातवेद
Mon, 10/12/2015 - 12:13 नवीन
वा बुवा सुरेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

.

जव्हेरगंज
Mon, 10/12/2015 - 13:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वा! फार फार मस्त. =))

शुचि
Mon, 10/12/2015 - 18:48 नवीन
वा! फार फार मस्त. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ज्या ठिकाणी ज्या चुकीसाठी

शुचि
Mon, 10/12/2015 - 18:48 नवीन
ज्या ठिकाणी ज्या चुकीसाठी ज्या वेळी आपण सल्ला देताय तिथे आपणही अगोदरच काशी केलेली आहे. हे लक्षात असू द्या. तेव्हा पुन:श्च खपले जाल.
हाहाहा. आवडली ही कथा.
  • Log in or register to post comments

चांगलेत खपवायचे धंदे. हितच

अभ्या..
Mon, 10/12/2015 - 18:50 नवीन
चांगलेत खपवायचे धंदे. हितच शिकलायत दिसतं? जव्हेर्भौ लै हल्के घ्येणार ह्येला हे म्हैते.
  • Log in or register to post comments

मग अजुन कुठं शिकणार भौ:)

जव्हेरगंज
Mon, 10/12/2015 - 18:58 नवीन
मग अजुन कुठं शिकणार भौ:) हलकी फुलकी प्रतिक्रिया आवडली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ओह आय सी!!

सूड
Mon, 10/12/2015 - 20:15 नवीन
ओह आय सी!!
  • Log in or register to post comments

जव्हेरगंज साहेब...

प्रभू-प्रसाद
Mon, 10/12/2015 - 23:22 नवीन
  • Log in or register to post comments

जव्हेरगंज साहेब...

प्रभू-प्रसाद
Mon, 10/12/2015 - 23:23 नवीन
  • Log in or register to post comments

जव्हेरगंज साहेब...

प्रभू-प्रसाद
Mon, 10/12/2015 - 23:23 नवीन
  • Log in or register to post comments

झोपु दया हो त्याना, एवढ्या

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 00:04 नवीन
झोपु दया हो त्याना, एवढ्या हाका मारू नका. अजून एक कथा टाकतील ते.;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभू-प्रसाद

च्यायचं हलकट!

प्यारे१
Tue, 10/13/2015 - 00:10 नवीन
च्यायचं हलकट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

खपले जाल ;)

अभ्या..
Tue, 10/13/2015 - 00:11 नवीन
खपले जाल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खिक्क्कुशा!

प्यारे१
Tue, 10/13/2015 - 00:14 नवीन
खिक्क्कुशा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा