चवदार तळ्याच्या काठी साधारण चार बदके बसली होती. पाण्यात मगरींचा सुळसुळाट होता. त्यातल्या एका बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो दुसऱ्या काठावर पोहोचला. तिकडुन त्याने या मागच्यांना खुण केली. मग दुसऱ्या बदकाने डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत तो पाण्याच्या मध्यभागी आला. एक बेडूक काठावरुनच या गोष्टींकडे बारीक लक्ष ठेऊन होता. मग त्यानेही डुबुक करत पाण्यात सुर मारला. पोहत पोहत त्याने दुसऱ्या बदकाला पाण्याच्या मधोमध गाठले. आणि त्याला म्हणाला, "हे बदकदादा, या पाण्यात भयंकर मोठ्या अशा मगरी आहेत. एकतर तू पाण्यात ऊतरून चुक केली आहेस. किंवा त्या पहिल्या बदकाने तुला संपविण्यासाठी हे षडयंत्र रचले असावे. तु ईथुनच मागे फिर"
आधीच दमलेल्या बदकाने त्याला टुचकन टोची मारली आणि पुढे निघाला. तेवढ्यात एक अगडबंब मगर पाण्याचा फवारा ऊडवत बाहेर आला. आणि बेडकाला तोंडात घेऊन पाण्यात निघुन गेला. दरम्यान त्या बदकाचीही चांगलीच तंतरली. आधीच धपापलेलं ते बदक या धक्क्याने पाण्यात बुडुन मरुन गेलं. काठावरुन ईकडुन दोन आणि तिकडुन एक असे तिन्ही बदक या प्रकाराकडे अवाक होऊन नुसतेच बघत राहीले.
तात्पर्य :
१. आधीच पेटलेल्या रणांगणात जाऊन ऐण आक्रमणाच्या वेळी ऊपदेशाचे डोस पाजू नयेत. खपले जाल.
२. ज्या ठिकाणी ज्या चुकीसाठी ज्या वेळी आपण सल्ला देताय तिथे आपणही अगोदरच काशी केलेली आहे. हे लक्षात असू द्या. तेव्हा पुन:श्च खपले जाल.
३. पाण्याबाहेर येताना शक्यतो फवाऱ्याचा वापर टाळावा. ऊपाशी मराल.
४. क्षुद्रांचे सल्ले बिनडोक वाटत असले तरी खरे ठरु शकतात. तेव्हा दुर्लक्ष करु नका. फुकट मराल.
५. परफेक्ट षडयंत्र असे रचावे की काठावर बसुन आपण नुसते अवाक होऊन पाहत रहावे.
६. तुम्हालाही काही सुचलं तर येऊ द्या. नसता.... (ह.घ्या.)
वाचने
11914
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
३. पाण्याबाहेर येताना शक्यतो
मगर पाण्याचा फवारा उडवत आली,
In reply to ३. पाण्याबाहेर येताना शक्यतो by बिपिन कार्यकर्ते
तिने बदकाऐवजी बेडकाला गटकावले
In reply to मगर पाण्याचा फवारा उडवत आली, by जव्हेरगंज
मेलेले बदक पाण्यातच पडले ना?>
In reply to तिने बदकाऐवजी बेडकाला गटकावले by बिपिन कार्यकर्ते
.
चान चान बोदो(क)कथा
दिसामाजी काहितरी लिहावे हे खर
खो खो खो
In reply to दिसामाजी काहितरी लिहावे हे खर by जेपी
जव्हेरगंजभौ...
चालू घडामोडींशी निगडीत ही कथा
In reply to जव्हेरगंजभौ... by चांदणे संदीप
तुमच्या प्रतिसाद आवडला नाही.
In reply to जव्हेरगंजभौ... by चांदणे संदीप
कुनी म्हनुनसे गेले आहे.
In reply to तुमच्या प्रतिसाद आवडला नाही. by तर्राट जोकर
गावडेकाका, उपरोध होता हो तो.
In reply to कुनी म्हनुनसे गेले आहे. by सतिश गावडे
लघुकथा प्रसवण्याचा विक्रम
आवरतं घेतोय मालक! आता दीर्घ
In reply to लघुकथा प्रसवण्याचा विक्रम by डॉ सुहास म्हात्रे
खपलो गेलो..
कंट्रोल यार....
In reply to खपलो गेलो.. by खटपट्या
काठावर बसुन नुसते अवाक होऊन
कथा वाचून काहीच बोध होत
लेट्स ट्राय टु मेक सेन्स ऑटॉफ इट...
बाहुबली _/\_ अभिनंदन. योग्य
In reply to लेट्स ट्राय टु मेक सेन्स ऑटॉफ इट... by द-बाहुबली
मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे
In reply to बाहुबली _/\_ अभिनंदन. योग्य by जव्हेरगंज
मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे
In reply to मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे by पिशी अबोली
असा आयडी आहे एक.
In reply to मिपाकरांपैकी कुणीही 'सोमेगोमे by टवाळ कार्टा
मुळात जव्हेरभाउ मिपाकरांबाबत
In reply to असा आयडी आहे एक. by प्यारे१
युद्धाच्या शेवटी गांधारीने
In reply to लेट्स ट्राय टु मेक सेन्स ऑटॉफ इट... by द-बाहुबली
ओह..! आवो जगातला प्रत्येकजण
In reply to युद्धाच्या शेवटी गांधारीने by कानडा
पांडू मोड ऑन \-
सॉक्रेटीस, कान्ट, प्लेटो,
काही लोकांनी आजारी घोडा आणि
अजाबात कल्लं सुदिक नाही,
उशीर झाला का मला? कुठे काय
मगरीच्या जबड्यात सुचलेलं
.
हे वाचताना काही दिवसांपुर्वी लिहिलेली आमची एक कविता आठवली...
वा बुवा सुरेख
In reply to हे वाचताना काही दिवसांपुर्वी लिहिलेली आमची एक कविता आठवली... by ज्ञानोबाचे पैजार
.
In reply to हे वाचताना काही दिवसांपुर्वी लिहिलेली आमची एक कविता आठवली... by ज्ञानोबाचे पैजार
वा! फार फार मस्त. =))
In reply to हे वाचताना काही दिवसांपुर्वी लिहिलेली आमची एक कविता आठवली... by ज्ञानोबाचे पैजार
ज्या ठिकाणी ज्या चुकीसाठी
चांगलेत खपवायचे धंदे. हितच
मग अजुन कुठं शिकणार भौ:)
In reply to चांगलेत खपवायचे धंदे. हितच by अभ्या..
ओह आय सी!!
जव्हेरगंज साहेब...
जव्हेरगंज साहेब...
जव्हेरगंज साहेब...
झोपु दया हो त्याना, एवढ्या
In reply to जव्हेरगंज साहेब... by प्रभू-प्रसाद
च्यायचं हलकट!
In reply to झोपु दया हो त्याना, एवढ्या by अभ्या..
खपले जाल ;)
In reply to च्यायचं हलकट! by प्यारे१
खिक्क्कुशा!
In reply to खपले जाल ;) by अभ्या..