✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अशीहि एक धर्म निरपेक्शता

द
दिवाकर कुलकर्णी यांनी
Sat, 10/03/2015 - 23:31  ·  लेख
लेख
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
30266 वाचन

💬 प्रतिसाद (208)

प्रतिक्रिया

क्विलपँड बरेच खेपेला चालत

दिवाकर कुलकर्णी
Sat, 10/03/2015 - 23:46 नवीन
क्विलपँड बरेच खेपेला चालत नाही सबब शुद्ध(?) लेखन समजून घ्यावे

माझ्या गावात मंदिरातही

जव्हेरगंज
Sat, 10/03/2015 - 23:50 नवीन
माझ्या गावात मंदिरातही मुस्लिम बांधव येतात. दिवाळीही मोठ्या ऊत्साहाने साजरी करतात. रमजानला अख्खे गाव त्यांच्या वस्त्यांत शिरखुरमा वरपायला हक्काने जाते. हे लहानपणापासुन पाहत आलोय. त्यामुळे मला वरील उदाहरण विशेष वाटले नाही. पण तुमचा पहीलाच लेख आहे. प्रयत्न आवडला. 'ळ' काढायला शिका. :) येऊ द्या अजुन .:)

पटले नाही

अरुण मनोहर
Sun, 10/04/2015 - 05:45 नवीन
हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?
"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,

"हिंदी फक्त मुसलमानच बोलतात

दत्ता जोशी
Sun, 10/04/2015 - 11:36 नवीन
"हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?" मुद्दा मान्य आहे पण काही मुस्लिम जन्माने महाराष्ट्रीय असले, महाराष्ट्रात वाढले आणि शिकले असले तरी उर्दुच (!) बोलतात. तुम्ही मराठी बोललात तरी ते त्यांचीच भाषा रेटत राहतात हा अनुभव आहे. हाच अनुभव ( विशेषतः मुंबई स्थित, जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीय असलेल्या बर्याच गुज्जू आणि दक्षिण भारतीय लोकांच्या बाबतीत आला आहे. ) ते जाणून बुजून हिंदी बोलत राहतात. कधी कधी या सगळ्याची चीड येते.(पुन्हा: सगळेच मुस्लिम आणि परप्रांतीय तसे नाहीत. त्यांची माफी मागून ) पण असा विचार केला कि आमच्यावर शिवसेना, मनसे शिक्का बसलाच. महाराष्ट्रात जन्मलेला, लुंगी नेसून आणि कपाळाला गंध लावलेला मोडकीतोडकी का होईना मराठी बोलताना क्वचित पाहायला मिळतो. दिवाकर साहेब, दुर्दैवाने, नेमके हेच चित्र लावण्यावरून सांगली, मिरज सारख्या संवेदनशील भागात अनेक हिंदू- मुस्लिम दंगली झाल्या आहेत.

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 10/04/2015 - 12:00 नवीन
छान स्फूट रे दिवाकरा.'ये सबसे जादा खपता है'ह्यावरून ती बाई मराठीच असावी असे ह्यांचे मत.
हाच अनुभव ( विशेषतः मुंबई स्थित, जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीय असलेल्या बर्याच गुज्जू आणि दक्षिण भारतीय लोकांच्या बाबतीत आला आहे.
असाच अनुभव बेळगाव्,धारवाड भागात्,चेन्नईत राहणार्या मराठी माणसांबद्दल येतो असे ह्यांचे तेथे राहणारे मित्र म्हणायचे रे दत्ता. म्हणजे गणेशोत्सव जोरात साजरा करतील पण पोंगल्,ओनमच्या दिवशी मात्र कामावर जातील.

खिक्क,,, मान गये माई की पारखी

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 12:02 नवीन
खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =))
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

"खिक्क,,, मान गये माई की

दत्ता जोशी
Sun, 10/04/2015 - 12:55 नवीन
"खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =))" भा पो ध.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भा पो ध मध्ये ध म्हणजे काय?

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 13:07 नवीन
भा पो ध मध्ये ध म्हणजे काय?
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

>>> खिक्क,,, मान गये माई की

श्रीगुरुजी
Sun, 10/04/2015 - 13:13 नवीन
>>> खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =)) +१ माई गाजरपारखी आहेत. उगाच नाही त्यांनी नानासाहेबांना गटवलं!
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काहीही अश्लील हं..... श्री ;)

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 13:14 नवीन
काहीही अश्लील हं..... श्री ;)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आग्गाग्गा

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 13:16 नवीन
आग्गाग्गा
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी म्हटलंच होतं की माईसाहेब

श्रीगुरुजी
Sun, 10/04/2015 - 20:42 नवीन
मी म्हटलंच होतं की माईसाहेब गाजरपारखी आहेत म्हणून. या धाग्यावरचे नानासाहेबांचे अर्थपूर्ण आणि समर्पक प्रतिसाद वाचले की याची प्रचिती येईल
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खपता है'ह्यावरून ती बाई

नाव आडनाव
Sun, 10/04/2015 - 13:05 नवीन
खपता है'ह्यावरून ती बाई मराठीच असावी असे ह्यांचे मत तुमच्या आधीच्या प्रतिसादांवरून मला वाटायचं तुम्ही ह्यांचं मत मोठमोठे सामाजिक विषय, समस्या ह्यावरंच घेता. इथल्या प्रत्येक वाक्यावर / शब्दावर मत म्हणजे भारीच ना ! बाकी लई दिसांनी ? बर चाललंय ना?
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बाप जन्मात कधी बेळगाव /

अद्द्या
Sun, 10/04/2015 - 20:24 नवीन
बाप जन्मात कधी बेळगाव / धारवाड , चेन्नई भागात आलाय का ? कि आपलं उगा बडवला कळफलक . . गणेशोत्सव मुळात मराठी सण . पोंगल ला आपल्या कडे "संक्रांत " म्हणतात . . बाकी ओणम च म्हणाल तर श्रावणात येतो . पण असो . तुमचे "हे" जर अति शहाणे दिसतात . .त्यामुळे . .असोच
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

नाही हो माई. सहमत नाही.

दत्ता जोशी
Sun, 10/04/2015 - 12:45 नवीन
जन्माने, आणि शिक्षणाने महाराष्ट्रीयन म्हटलं मी. माझे अनेक मित्र आणि नातेवाईक जे गेले अनेक वर्षे किंवा पिढ्या न पिढ्या वेगवेगळ्या राज्यात राहत आहेत ते तिथल्या संस्कृतीशी आणि भाषेशी एकरूप झाले आहेत. ( उदा. केरळ, कर्नाटक, गुजरात). कामासाठी बदली निमित्ताने वगैरे काही काळ पार प्रांतात राहणाऱ्या न विषयी नाही लिहील मी. तामिळ लोकांविषयी काय लिहावे?

ज्या मिरजेच्या चित्रावरुन

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 13:03 नवीन
ज्या मिरजेच्या चित्रावरुन गोंधळ झाला ते कुणी काढले हे माहीत असल्याने पास.

क्या मय

पैसा
Mon, 10/05/2015 - 13:01 नवीन
क्या मय सही समझ रही हूँ!
↩ प्रतिसाद: अभ्या..

अफजलखानांचा कोथळा शिवाजींनी

फुलथ्रॉटल जिनियस
Sun, 10/04/2015 - 13:25 नवीन
अफजलखानांचा कोथळा शिवाजींनी बाहेर काढला याला कोणताही समकालीन पुरावा नाही, हिंदुत्ववाद्यांनी मारलेली ती लोणकढी थाप आहे.शिवाजी व अफजल खान यांचे शामियाण्यात वाद झाले , शिवाजींनी अफजलखान यांना हिसका दाखवल्यानंतर ते पळुन गेले, पुढे मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करुन वाईजवळ पाचवड इथे त्यांची हत्या केली, असे खरे प्रकरण आहे.

अरे वा. महाराजांच्या नुसत्या

अभ्या..
Sun, 10/04/2015 - 13:30 नवीन
अरे वा. महाराजांच्या नुसत्या हिसक्याला घाबरला अन पळाला. मर्द मावळ्यांनी गाठून मारला. लैच चिल्लर होता म्हणा की. ब्येस्ट ब्येस्ट.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

हट रे...थोरल्या राजांना

टवाळ कार्टा
Sun, 10/04/2015 - 13:33 नवीन
हट रे...थोरल्या राजांना भेटल्यावर खानाचे हृदयपरीवर्तन झाले अस्णार ;)
↩ प्रतिसाद: अभ्या..

खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्य ते

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 10/04/2015 - 19:27 नवीन
खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्य ते... "अफझलखानाचे हृदयपरीवर्तन झाल्यावर त्याने स्वतःच आपल्या हाताने आपाला कोथळा बाहेर काढला" आसे खानमामाकी (की खानसामाकी) बखर मध्ये पान ४८६ वर खुद्द खानाने स्वतःच्या रक्ताने लिहून मगच प्राण सोडला.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

डॉ

नाखु
Mon, 10/05/2015 - 10:10 नवीन
डॉ क सर आम्ही वाचला तो इतीहास असा होता: राजे अफझलखानासमीप बसले,त्यांचा लॅपटॉप उघडून मिपा लॉग इन केले आणी मिपावरील साहीत्य खजीना खानापुढे रिता केला. आता खानाची पडली उर्दु भाषा आणि भाषांतरकार ही पाहिजे तोडीचा (इथे ताडीचा काडीचाही उपयोग नाही म्हणून दादुमियांचे नाव आपसूक गळाले) बॅट्या संदर्भ भेंडोळी घेऊन तयारीत होताच (साथील एकाला दोन असावेत म्हणून मालोजीराव आणि अद्द्या होतेच) नेम्का जेपी काही कारणाने शामियान्याचे बाहेर गेला होता म्हणून या ऐतीहासीक प्रसंगात उपस्थीत नव्हता. (इतीहासच काय भूगोलही त्याला माफ करणार नाही,ऐनवेळी दांडी मारायची वाईट्ट खोड त्याला तेव्हा पासून आहे याची नम्र नोंद) राजेंनी एक एक धागा दाखवावा आणि त्याचा समजेल अश्या उर्दुत बॅट्याने अनुवादावा असा सुमारे २-३ तास संवाद चालला. आता अता राजेंनी धूर्तपणे आणि चाणाक्षपणे मिपा ऐतीहासीक मैलाचे दगड (शब्द नीट वाचा आणि अनर्थ करू नका) ठरलेल्या कलाकृती निवडल्या आणि त्याचे रसाळ निरूपणं अनुवाद बॅट्याने केले. त्या कलाकृती येन प्रकारे. मोकलाया दाही दिशा ऐ तू चल नं लाटकरांनी लाटलेले पण नीट न भाजलेले पापड जीवनभाऊंचे सुरस जीवन सार अकुंच्या बोधकथा निसोंच्या शोधकथा यानंतर सदर साहीत्या मेजवानीची सांगता स्नेहांकीता ताईच्या मिपाकर लक्षणे या सारांरुपाने झाली आणि परीणाम व्हायचा तोच झाला. खानाचे हस्सुन हसुन गडबडा लोळाल्याने आणि बेंबीच्या देठापासून हसल्याने लहान आतड्याबरोबरच मोठ्या आतड्यावरही अतिअति ताण आल्याने पोटाचा अल्सर होऊन अल्पषा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले. इती"हास" प्रेमी यमक सम्राट जिल्बी प्रेमी अत्मुदा चारोळीवाले यांच्या एका शोधनिबंधातून साभार अज्ञ बालक नाखु
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ख्या ख्या ख्या

टवाळ कार्टा
Mon, 10/05/2015 - 11:55 नवीन
ख्या ख्या ख्या खि खि खि खु खु खु
↩ प्रतिसाद: नाखु

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/05/2015 - 12:03 नवीन
=)) =)) =)) खानाने स्वहस्ते स्वरक्ते बखरीत लिहीलेल्या एकवाक्यी लिखाणावर त्याला शेवटचे पाजायला म्हणून आणलेले पाणी सांडल्यावर रक्त पानभर पसरले. त्या पानावर आता वरील मजकूर आहे... निदान नव(व्हं)इतिहासकारांचा तरी तसा दावा आहे. (असे त्या बखरीच्या संशोधनलेखनाच्या तळटीपेत नमूद आहे.)
↩ प्रतिसाद: नाखु

एकोळी?

पैसा
Mon, 10/05/2015 - 13:02 नवीन
एकोळी लिखाण कसे ठेवले? संपादक काय करत होते? =))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तेव्हापासूनच एकोळी लिखाण

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 13:10 नवीन
तेव्हापासूनच एकोळी लिखाण ठेवायचे नाही हा निर्णय झाला असेल.
↩ प्रतिसाद: पैसा

खी खी खी, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))

बॅटमॅन
Mon, 10/05/2015 - 12:16 नवीन
खी खी खी, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) =)) =)) सहीच ओ.
↩ प्रतिसाद: नाखु

lol !

सस्नेह
Mon, 10/05/2015 - 12:47 नवीन
काहीही हां नाखुकाका !
↩ प्रतिसाद: नाखु

काका _/\_ :)

रातराणी
Mon, 10/05/2015 - 12:52 नवीन
काका _/\_ :)
↩ प्रतिसाद: नाखु

इती"हास" प्रेमी यमक सम्राट

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/05/2015 - 13:26 नवीन
इती"हास" प्रेमी यमक सम्राट जिल्बी प्रेमी अत्मुदा चारोळीवाले यांच्या एका शोधनिबंधातून साभार
╰_╯ इसका बदला लिया जाएगा, बराब्बर लीया जाएगा! दू दू दू ना\^o^/खून!!! :-/
↩ प्रतिसाद: नाखु

=))

जेपी
Mon, 10/05/2015 - 17:10 नवीन
=))
↩ प्रतिसाद: नाखु

कहाँ थे इत्ते साल से मियाँ???

प्यारे१
Sun, 10/04/2015 - 13:49 नवीन
कहाँ थे इत्ते साल से मियाँ???? हिन्दुस्थान की अवाम आप के न होने के कारण दुनिया से पीछे रह गयी| खैर, देर आये दुरुस्त आये|
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

@फुलथ्रॉटल जिनियस

सुबोध खरे
Sun, 10/04/2015 - 14:26 नवीन
@फुलथ्रॉटल जिनियस अहो तसे झालेलं नाही. शिवाजी महाराजांनी धमकी दिल्याने अफझल खानाने घाबरून आत्महत्या केली असे खानसाम्याची बखर मध्ये वाचल्याचे आठवते. वाचा खानसाम्याची बखर (शव्वाल )हिजरी१३०६ -१३०७ जाता जाता -- उद्या हे इतिहास लिहिला तर मिसळपाव हे संस्थळ नव्हतेच ते तर खिमा पाव असे होते पण काही नतद्रष्ट उजव्या( किंवा भगव्या) लोकांनी त्याला शाकाहारी करायचे म्हणून मिसळ पाव केले म्हणतील. ह. घ्या.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

डॉक्टर माझ्या कमेंटमध्ये मी

फुलथ्रॉटल जिनियस
Sun, 10/04/2015 - 15:16 नवीन
डॉक्टर माझ्या कमेंटमध्ये मी जे लिहिले आहे ते खरे आहे, वाई पाचवड कडच्या कुणालाही विचारा ते सांगतील....
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जन्म गेला आमचा पाचगणी, वाई

प्यारे१
Sun, 10/04/2015 - 16:28 नवीन
जन्म गेला आमचा पाचगणी, वाई मध्ये. शेंड्या लावायची कामं बंद करा फुलथ्रॉटल. आधी खानाचा तळ वाईमध्ये होता त्याला त्या भागाची माहिती होती म्हणून तो वाई भागात आला नि महाराजांना तिकडे बोलावू लागला. महाराजांनी न जाता खानाला प्रतापगडावर बोलावलं नि तिकडेच मारला. कोथळा लिटरली काढला नसेलही कदाचित पण मारला तिकडेच असणार. अन्यथा प्रतापगडाच्या पायथ्याला खानाची कबर कशी आली असती?
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

मी लहानपणी ऐकलेली कथा वेगळीच

खटपट्या
Sun, 10/04/2015 - 17:00 नवीन
मी लहानपणी ऐकलेली कथा वेगळीच आहे अफजल खान हा अत्यंत कनवाळू, दयाळू आणि दानशूर म्हणून प्रसीध्द होता. गरीबांच्या बद्द्ल त्याला विशेष आदर होता. तो शिवाजी महारांजाच्या वडीलांना जुनियर असल्यामुळे शिवाजी महाराजांवर त्याचा विलक्षण लोभ होता. शिवाजी महाराज करत असलेल्या समाजसेवेबद्द्ल महाराजांना एकदा प्रत्यक्ष भेटून गळाभेट घ्यावी अशी त्याची फारा दीवसापासूनची ईच्छा होती. भेट ठरली. बरेच दीवसांची आपली ईच्छा पूर्ण होणार म्हणून खान नर्व्हस होता. भेटीचा दीवस उजाडला. आपल्या लहान भावाला भेटावे तशा ओढीने खान राजांना भेटला. या भेटीत महाराजांनी मावळ भागातल्या शेतकर्‍यांची दुर्दशा खानास ऐकवली. ती ऐकून खानास गहीवरुन आले. ईतके गहीवरुन आले की त्याचे काळीज पिळवटून मग आतडी पिळवटून ती बाहेर आली. आणि त्यातच खानसाहेबांचा अंत झाला.
↩ प्रतिसाद: प्यारे१

ही सर्व घटना ऐकून जिजाउ

खटपट्या
Sun, 10/04/2015 - 17:05 नवीन
ही सर्व घटना ऐकून जिजाउ प्रचंड संतापल्या आणि त्यांनी महाराजांना यास जबाबदार धरले. आणि मग प्रायश्चित्त्त म्हणून महाराजांना त्याची कबर बांधायला सांगीतली. मात्रुभक्त महाराजांनी ही आज्ञा मानून लगेच आलिशान कबर प्रतापगडावर बांधली,,,
↩ प्रतिसाद: खटपट्या

आसंय ते सगळं

खटपट्या
Sun, 10/04/2015 - 17:07 नवीन
आसंय ते सगळं
↩ प्रतिसाद: खटपट्या

फु. जि. सायबांचा आपण फॅन झालो.

बबन ताम्बे
Mon, 10/05/2015 - 17:33 नवीन
काय एक एक नवीन इतिहास कळतोय. मी इमॅजीन करतोय की शामियान्यात महाराज आणि अफजलखानात वादावादी काय झाली असेल. आणि महाराजांचा शेवटचा डायलॉग काय असेल की खान पाय लावून सैन्यासकट पळाला. "कसम भवानी की, मैं तुम्हारे टुकडे टुकडे कर दूंगा? " :-)
↩ प्रतिसाद: खटपट्या

अस मी पण काही ऐकल नाही कधी

धनावडे
Mon, 10/05/2015 - 12:17 नवीन
अस मी पण काही ऐकल नाही कधी आता तुम्ही म्हणताय तर दसऱ्याला गावी गेलो कि ऐकेन स्वगत: वाई आणि कमळगडाच्या परिसरात आयुष्याची २५ वर्षे वायाच गेली म्हणायची.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

@ हाडक्या, हा बघ सातारा गँग

प्यारे१
Mon, 10/05/2015 - 17:36 नवीन
@ हाडक्या, हा बघ सातारा गँग मेम्बर! ;)
↩ प्रतिसाद: धनावडे

ओ काय पन सांगू नका डागतर...

तर्राट जोकर
Sun, 10/04/2015 - 15:48 नवीन
ओ काय पन सांगू नका डागतर... शामियानात झुरळ घुसल्यालं बंगून हाफजलखानास हार्टटेक आलाय असं म्हंते. झुरलं घुसल्याचा आळ आपल्यावर येऊ नये म्हून 'खान्सामा खोटं बोलला' असं इंग्रजांच्या कोक्रोचीय डायारीज्मधे लिवलं हे.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

>>> वाचा खानसाम्याची बखर

श्रीगुरुजी
Sun, 10/04/2015 - 20:52 नवीन
>>> वाचा खानसाम्याची बखर (शव्वाल )हिजरी१३०६ -१३०७ चुकलात तुम्ही डॉक्टरसाहेब. तुम्ही नानाखाँची बखर (शव्वाल) हिजरी १३०५ -१३०६ यातील रूमाल क्रमांक ७८६ वाचा. हे वाचल्यानंतर नानासाहेबांचा दावा खरा असल्याचे ध्यानात येईल.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्याचं रुमालाला वेगवेगळ्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 22:18 नवीन
त्याचं रुमालाला वेगवेगळ्या वस्तु पुसल्या गेल्याने नीटसा संदर्भ लागत नाही. बादवे अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटल्यावर पापांचं परिमार्जन म्हणुन "सेप्पुकु" केलेलं म्हणे. थोर तो अफजुल्ला आणि थोर त्या त्याच्या अनौरस विचारसुंतक पिल्लावळी.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अगदी अगदी.

दत्ता जोशी
Sun, 10/04/2015 - 15:59 नवीन
शिवाजी राजांना ते करत असलेल्या थोर कार्यासाठी शाबासकी द्यायला खान दिल्लीहून आला होता. खान मराठी रयतेला भेट द्यावी म्हणून प्रचंड खजिना घेवून आला होता आणि येता येता मराठी मुलुखात आणि हिंदू देवळांवर उधळत उधळत येत होता. मी तर ऐकलय कि महाराजांनी खानाचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला होता. काय तरीच हे हिंदुत्ववादी! या लोण कढी लोकांनीच त्याची खोटी समाधी प्रतापगडावर बांधली. आणि त्याला पीर ठरवून पूजा अर्चा सुरु केली.
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

खान दिल्लीहून आला होता

तर्राट जोकर
Mon, 10/05/2015 - 13:35 नवीन
खान दिल्लीहून आला होता
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी

डी-ग्रेडी पुस्तक वाचणं सोडा

अद्द्या
Sun, 10/04/2015 - 20:26 नवीन
डी-ग्रेडी पुस्तक वाचणं सोडा ओ राजे .
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

हे सगळं तुम्ही लपून पाहिलंत ना फुजि -

बोका-ए-आझम
Sun, 10/04/2015 - 22:43 नवीन
सय्यद बंडाच्या अंगरख्यात? लब्बाड!
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

आँ !

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 22:47 नवीन
आणि जे या प्रसंगाचे साग्रसंगीत पोवाडे गातात ते कुठे बसले होते ? कृष्णाजी प्रभाकरने स्वप्नात दृष्टांत दिला काय ?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

दादा खान

सुबोध खरे
Mon, 10/05/2015 - 09:58 नवीन
दादा खान असे कृष्णाजी प्रभाकर त्याच काळात नव्हे तर आजच्या काळातही आहेतच कि (चार दमडयानसाठी स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसणारे.) ओळखा पाहू. एक हिंट -- सारखे डू आय डी घेत/ बदलत असतात.
↩ प्रतिसाद: dadadarekar
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा