Skip to main content

अशीहि एक धर्म निरपेक्शता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 03/10/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
लेखनविषय:

वाचने 30367
प्रतिक्रिया 208

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

उघड उघड "चुकी"च्या गोष्टी बोलण्याला विरोध हे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कधीपासुन झाली टक्कुमक्कुशोनु?

In reply to by dadadarekar

ओ हितेस भाऊ तुम्ही तुमची सर्व स्थावर जंगम इष्टेट आम्हाला देऊन हाजला जाणार होतात ना ? पुण्य मिळवायला. आम्ही ष्टाम्प पेपर घेऊन वाट बघून र्हायलो ना? मग कायले हिकडे काथ्याकुट करून र्हायले? तिकडे काबा ला ष्टाम्पिड साठी तुमची वाट बघून राह्यलेना!

लेखासंबंधी: वपुस्टाइल मांडणी चांगली आहे. लेखनशैलीही चांगली आहे. काय चुकले? धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरून. ती बाई मुस्लिम होती-नव्हती हा भाग वेगळा. इथे लेखकाच्या मनातच धर्म किती रुतून बसला आहे याचे प्रत्यंतर आले. ऐकीव माहितींवरून व सतत एकतर्फी प्रचारावरून सुशिक्षितांचीही मते कशी मातकट होतात याचे हे उदाहरण. अफझलखानाचा वध करणारे शिवाजी हे हिंदू-विरुद्ध-मुस्लिम चे प्रतिक म्हणून प्रचार करून शिवाजींची प्रतिमा/इतिहास बदलण्याचे पातक काही विशिष्ट लोकांनी केले. खरे काय? शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या. कथेचं काय? इथे ती बाई व्यवसायहेतू हे पुतळे विकते, तीचे शिक्षण-विचारसरणी-मूल्ये लेखकांइतकी उच्च नक्कीच नसतील. ती अर्थव्यवस्थेच्या गरजेअनुरूप वागत आहे. त्यात तिला स्वतः न जाणवणारी धार्मिक बाब लेखकांना जाणवते व लेखकराव त्यांनीच शोधलेल्या तिच्या (गरजेपोटी आलेल्या) धर्मनिरपेक्षपणाचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतात. अफझलखानास मुस्लिम धर्म चिकटवतात व शिवाजींस हिंदू धर्म चिकटवतात. स्वतःचीच धर्मांध प्रतिमा या कथेतून उभं राहतांना त्यांना जाणवत नाही पण ते अशिक्षित गरीब बाईंच्या धार्मिक मूल्यांची मोजदाद करण्याचा प्रयत्न करतात. प्रतिसादकांचं काय? नेहमीचे यशस्वी लोक आपआपली नेहमीची आयुधे घेऊन नेहमीचे तीर सोडतायत. कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून? कथेवर चर्चा सोडून भलतेच विषय घेऊन एकमेकांवर फुटकळ शरसंधान करण्यात काय मिळतं? खरंच ही कथा शिवाजी-अफझलखान भेटीवर आहे? असो. प्रत्येकाच्या मनोरंजनाचे आपआपले फंडे असतात. कुठल्या दुखर्‍या नसा कोण कुठं कुरवाळीत बसेल ज्याचे त्याला ठवुक. धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

असाच काहीसा आपल्यासारखा सूर मी माझ्या "शिवजयंती हायजँक ????" या धाग्यात लावलेला. त्यामुळे आपल्या या सुज्ञ प्रतिक्रियेला माझे अनुमोदन.

" कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून?" तेही बरचसं धडधडीत खोटं.. अगदी असंच मला नेहमी वाटत या सेक्युलर लोकांच्या बाबतीत. यांच्या म्हणण्याप्रमाणे अफजलखान विजापूरहून निघून वाई ला येईपर्यंत काय शांतीचा संदेश पेरत आला होता असंच असं असतांना करंटे लोक आफ्जुल्याची दाढी बघतात म्हणजे काय? !!! बरं मग मग जर अफजलखानाचा वधाचे चित्र लावून खाली "दहशतवाद असाच संपवावा लागतो" असं चित्र दिसला तरी या सेक्युलर आणि शांती प्रिय लोकांना का मिरची लागते हे मात्र न कळलेले कोडे आहे !! मग ते शांतीप्रिय लोक चित्रे फाडतात, दगडफेक करतात अगदी मग हिंदू दैवतांच्या मूर्तींची विटम्बना होते, जाळपोळ आणि दंगल होते. त्यांना हेच ज्ञानामृत पाजण्याचे शानपन ( पक्षी: धारिष्ट्य) हे सेक्युलर विचारवंत लोक का दाखवत नाहीत असं विचारणे म्हणजे विचारणारे अजून धर्मांध. असो. लोकशाही है. चल्नेकाच . .

In reply to by दत्ता जोशी

दत्ताजी, काही प्रश्न आहेत. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे? वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? 'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?

In reply to by तर्राट जोकर

अफजलखान केवळ सरदार होता. पण गनिम शहेनशहा जर वाइइट होते तर त्यांच्या दारात रांग लावायला जाणे , माझ्या मुलाला जहागिरी द्या अशी पत्रे लिहिणे , असे प्रकार बाकीच्चे राजे का करत होते ?

In reply to by तर्राट जोकर

दुसर्‍या राजांविरुद्ध आणि सरदारांविरुद्ध लढाया शिवरायांनीही केल्या पण त्यांनी वाटेत इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याचे भडकाऊ प्रकार नाही केले. असो.

In reply to by मृत्युन्जय

तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं या वादाला काय अर्थ आहे का मृत्यूंजय साहेब? ते जाऊ द्या. आता ह्या तमाम सेक्युलर-विरोधी लोकांना नेमकं काय हवंय तेही स्पष्ट शब्दात कळवतील तर बरं होईल. म्हणजे त्यांच्या स्वप्नातला सेक्युलर-मुक्त भारत कसा असेल?

In reply to by तर्राट जोकर

मी केवळ तुमच्या प्रतिक्रियेला माझा अल्पसा प्रतिवाद दिला. बाकी तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं आणि त्याचा काही अर्थ आहे की नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल त्यामुळे इथे देत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मराठ्यांनी शृंगेरी शंकराचार्यांचा मठ लुटला होता . ( बरोबर ना ? ) या मठाला टिपू सुलतान मदत करत होता. अदिलशहाने चाफळ राममंदिराला जागा / अर्थसहाय्य दिले होते हे खरे आहे का ? खुद्द अफजलखान कर्नाटक दौर्‍यात असताना एकही मंदिर पाडले नव्हते. कारण तिथले हिंदू सरदार हे आदिलशाहीचे मित्र होते. माहाराष्ट्रात मात्र याच अफजलखानाने देवळे पाडली कारण महाराजाना उकसवायचे होते म्हणून. जाणकारानी माहितीत चुका असतील तर सुधारणा कराव्यात

In reply to by dadadarekar

एखाद्याला उचकावयचे राजकारण करण्यासाठी त्याच्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडणे उचित आहे???? नक्की??? हे मत फायनल ना?

In reply to by तर्राट जोकर

"सगळं काही क्षम्य असतं " तुमचे पहिले स्टेटमेंट नक्की आहे असे समजतो. हे वक्तव्य देखील फायनल समजु का? बदलणार नाही ना नक्की?

In reply to by मृत्युन्जय

अफजल खान वगैरे प्रभुतींनी मंदीरे उद्ध्वस्त केली हे धादांत खोटे आहे, समकालीन ऐतीहासिक साधानांमध्ये असा कोणताही पुरावा नाही.ते फक्त एक सरदार होते ,त्यांचा शिवाजीराजांवर कोणताही वैयक्तीक राग न्हवता.सत्तास्पर्धेत लढाया या व्हायच्याच , म्हणून अफजल खान दहशतवादी ठरत नाही.अफजल खान हा वाइचा सुभेदार होता,वाईच्या हिंदी घाटाला त्याने सुभेदार असताना मदद केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.तो हिंदूद्वेष्टा अजिबात न्हवता,प्रतापगड मोहिमेच्या वेळी वाईत त्याने जनकल्याणार्थ कोटीचंडी यज्ञ केला होता,आता मला सांगा, हिंदू द्वेष्टा माणुस हिंदूंची कर्मकांडे करेल काय?????

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

तो जान्हवेही घालायचा असाही काही पुरावा समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये सापडेल तुम्हाला. बघा बरे जरा.

In reply to by मृत्युन्जय

अरारारा! दुर्दैवाने या धाग्याची नोंद मिपाच्या इतिहासात सर्वात विनोदी धाग्यांपैकी एक अशी होणार भौतेक!

In reply to by पैसा

च्च च्च च्च....कस्ल्या संपादिका हो तुमी...जर्रा म्हणून दुस्र्यांन्ना हसायला चानस मिळाला तर आल्या लगेच्च...वाईच थांबा की :)

In reply to by पैसा

नव इतीहासात अश्या किरकोळ चुकांकडे तुम्ही बघीतले तर तुम्ही "खिळे-मोळे आणि छन्नी " पाहिलेच नाहीत इतकेच म्हणून मी माझ्या जाग्यावर बसतो. जय मिपा जय नव इतीह्रास. जय आमची शाळा, जय आमचे फुटॉ मास्तर जय बुरदुक वाडी. इ सातवी "फ" शेवटचा वर्ग बाकडे क्र ६ (भिंतीकडून दुसरे) वल्ली चिमण (निव्वळ शारीरीक)उंची मुळे मागच्या बाकड्यावर आहेत. मी, बॅट्या आणि सगा एका बाकड्यावर आहोत. बुवा जेपीला शोधायला गेलेत आणि टक्या अंगठे धरून (स्वतःचे) उभा आहे.

In reply to by नाखु

बाकावर उभे रहा. मिपावर्चे मास्तर मास्तरणी एवढे इतिहास 'घडवतायत' आणि तुम्ही लोक टिवल्या बावल्या करताय.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

अफजल खान वगैरे प्रभुतींनी मंदीरे उद्ध्वस्त केली हे धादांत खोटे आहे, समकालीन ऐतीहासिक साधानांमध्ये असा कोणताही पुरावा नाही
याच न्यायाने नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये दंगल घडवून आणली त्यालाही काहीही पुरावा नाहीये. पण तुमच्यासारखे धर्मनिरपेक्षतेचे स्वघोषित भाट तर त्यांच्याच नावाने शंख करुन राहिलेत. हा एक न्याय शांतताप्रेमी धर्माच्या लोकांना आणि दुसरा न्याय तथाकथित आक्रमक धर्मांधांना असं वागल्यामुळेच सेक्युलर हा शब्द बदनाम झालाय.

In reply to by बोका-ए-आझम

>>>> याच न्यायाने या शब्दावर तीव्र आक्षेप. मोदींची एसआयटी समोर ज्या पद्धतीनं आणि जितक्या वेळा चौकशी झाली, सलग दहा वर्षं त्यांना याबाबत बोललं गेलं (आजही बोललं जातंच) त्या न्यायानं 'उपरोक्त प्रभृतीं'ची चौकशी झालेली नाहीये. तुलना चुकीची आहे.

In reply to by तर्राट जोकर

मी दत्ताजी नाही पण हे प्रश्न पाहून माझ्या वकुबाप्रमाणे उत्तरे द्यावीशी वाटतात म्हणून हा पोस्टप्रपंच. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? >> त्याच्या कृत्यांनी. केवळ बंड करणार्‍या सरदाराच्या मुलाला पकडायला तो आला असे नव्हे तर सर्वसामान्य रयतेला उपद्रव पोहोचवत तो आला. त्यांना भरडून काढत आला, जसे आता काही विघातक प्रवृत्ती सामान्यांना वेठीला धरुन समाजाला उपद्रव पोहोचवतात, तसेच. केवळ तो मुस्लीम आहे म्हणून त्याला सर्व दहशतवादी म्हणतात हे गृहीतक तुम्ही कशावरुन मांडत आहात. जावळीच्या मोर्‍यांबद्दलही इतिहास अभिमानाने बोलत नाही, हे लक्षात घेतले आहे का? की आपण किती सर्व(किंवाएखादाविशिष्ट)धर्मसमभावी आहोत ह्या प्रतिमेला जपण्यासाठी साध्या साध्या गोष्टीही विसरायला होते आहे? "ब्राह्मण म्हणून मुलाहिजा कोण धरु पाहतो?" हे पत्र मुळातून वाचले आहे का? नसल्यास का नाही?
फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे
ह्याहीपेक्षा अफजल प्रवृत्तीच्या कारनाम्यांना सोयीसकर आणि खपेल असा धर्माचा मुलामा देऊन स्वतःच्या पुरोगामित्वाचे डंके बडवण्याची प्रवृत्ती असणे हे फार धोकादायक आणि समाजासाठी लागलेली कीड आहे!
'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?
अर्धवट माहिती असली वा काहीच माहिती नसली तरी उचलली बोटे, आणि लावली कळफलकाला की असे तोटे होतात. महाराजांचे समग्र चरित्र वाचावे ही अतिचशय नम्र विनंती. अजून बरीच उदाहरणे देऊन लिहिता येईल पण वेपांपेजाकोआकाबो?
वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? 'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?
ही निरर्थक भडकाऊ बडबड म्हणून सोडून दिली..

In reply to by यशोधरा

हम का बोले और आप का समझे? तुम्हाला काहीतरी वेगळंच लिहिलेलं दिसतंय का ताई? तुम्ही मला जो महाराजांचा अभ्यास करायला सांगत आहात तो तुम्हीच केलेला बरा. तो करण्याआधी आपण ज्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देतोय त्याचाही पुरेसा अभ्यास केलात तरी पुरे. माझ्या प्रतिसादातील खालील परिच्छेद न वाचताच टंकनश्रम घेतलेले दिसत आहेतः "शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या." हिंदूवाद्यांकडून जितके हे अफजलखान-शिवाजी भेट प्रकरण रंगवले जाते, तसे जावळीचे मोरे वा 'ब्राह्मणपत्र' वा "अजून बरीच" उदाहरणे याबद्दल आज लोक तितक्याच तडफेने आणि तावातावाने बोलतात का? किती पोवाड्यांमधे ही "अजून बरीच" प्रकरणे आहेत? किती गणेशमंडळांनी ह्या "अजून बरीच" घटनांचे देखावे बनवले आहेत? किती लोक ह्या "अजून बरीच" घटनांवर चर्चा, वाद करतात? माझा प्रश्न, तीनशे वर्षांपूर्वीच्या लढाईचा आधार घेऊन 'आज' महाराजांची ज्या प्रकारे कट्टर मुस्लिम-विरोधी प्रतिमा उभी केली जाते त्याबद्दल, होता. "महाराज काय होते व त्यांनी काय केले, नाही केले" याबद्दल मी प्रश्न विचारलेले नाहीत. "महाराजांचं आपण आज काय करत आहोत?" हा मोठा प्रश्न आहे. मी मुसलमान-भक्त नाही. शिवाजींचा भक्त आहे. खोट्या प्रतिमा आपल्या दैवतावर चढवल्या जाऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप. तो तुम्हाला मुस्लिम-धार्जिणा वाटत असेल तर तुमच्या नजरेचा दोष आहे. काही लोक शब्दांचे भ्रमजाल रचून भुलभुलैया करण्यात पटाईत असतात. तुमचा प्रतिसादही त्याचेच एक उदाहरण आहे.

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या मला खटकलेल्या प्रतिसादावर माझे मत मी मांडले. तुम्हीच तुमचे दोन्ही प्रतिसाद वाचा आणि परस्पर विरोधी विधाने केली आहेत ते पहा.
शब्दांचे भ्रमजाल रचून भुलभुलैया करण्यात पटाईत असतात. तुमचा प्रतिसादही त्याचेच एक उदाहरण आहे.
हायला! थ्यांक्यू! माझ्याकडे इतके शब्दसामर्थ्य होते/ आहे ह्याची मला कल्पना नव्हती! धन्यवाद :)

नेमके हेच चित्र लावण्यावरून सांगली, मिरज सारख्या संवेदनशील भागात अनेक हिंदू- मुस्लिम दंगली झाल्या आहेत.
काय बदनाम करताय ओ उगा फुकाफुकी आमच्या गावाला. बाबरीच्या वेळीही दंगली नाय झाल्या अन तरी आमचा भाग संवेदनशील? तेसुद्धा एका दंगलीपायी?

खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
केहेना क्या चाहते हो, हे मात्र आम्हाला उमजत नाही.... !!!

तसं म्हटलं तर मग कशालाच अर्थ नाही. अनेक वर्षे प्रार्थना न झालेली एक वास्तू पाडली असंही म्हणू शकतो पण तेव्हा सेक्युलर लोकांच्या नाकाला मिरच्या का झोंबतात? जगात प्रत्येकाला मृत्यू आहे. एखादा मेला दुस-याने मारलं म्हणून. काय फरक पडतो? इथे एखादाच्या ऐवजी दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची नावं घाला. मग बघा काय प्रतिक्रिया येते ती. आणि अजून एक, तुम्हाला (व्यक्तिगत घेऊ नका) ज्या गोष्टींनी फरक पडतो किंवा पडत नाही त्याच गोष्टींनी इतरांनाही फरक पडला पाहिजे असा आग्रह धरणं हेही फॅसिझममध्ये येतं. दुस-याच्या न पटणा-या मतावर प्रतिक्रिया देणं हे कधीपासून फॅसिस्ट व्हायला लागलं? अजून एक. सेक्युलर या शब्दाचा खरा अर्थ धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे सर्व धर्मांना समानता. ज्यांचा सेक्युलॅरिझमला विरोध आहे त्यांचा विरोध राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने त्याला विकृत स्वरूप दिलंय आणि sickular बनवलंय त्याला आहे आणि अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी आणि सत्तेसाठी चाललेल्या अनुनयाला (appeasement ) आहे. तुमच्या सेक्युलर मुक्त भारत या प्रश्नाचं उत्तर तेच आहे. जिथे धर्म हा प्रमुख मुद्दा असणार नाही आणि एखाद्या माणसाच्या मृत्यूची बातमी ही त्याच्या धर्मावर दिली जाणार नाही असा देश.

In reply to by बोका-ए-आझम

ज्यांचा सेक्युलॅरिझमला विरोध आहे त्यांचा विरोध राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने त्याला विकृत स्वरूप दिलंय आणि sickular बनवलंय त्याला आहे आणि अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी आणि सत्तेसाठी चाललेल्या अनुनयाला (appeasement ) आहे. तुमच्या प्रतिसादातून हे एक वाक्य अतिशय आवडलं. पण कदाचित हा विरोध 'राजकिय पक्षांच्या धार्मिक-जातीय अनुनयाला' न होता थेट एका विशिष्ट धर्माला व तो धर्म, ते सगळेच धार्मिक कसे वाइट्ट आहेत इतकं ताणण्यापर्यंत गेलाय हे तुमच्या लक्षात आहे ना? यातून दोन धर्मियांमधली तेढ व भविष्यकालिन अस्वस्थता प्रचंड गैरसमजूतीतून वाढत जात आहे हेही जाणवतंय की नाही? सामान्य लोक या बद्दल कसे विचार ठेवून आहेत हे फेसबुकीय अवतारांतून, चर्चा प्रतिक्रियांमधून सतत दिसून येतंय. सर्व समाजाचं धोरण हे "अनुनयाला विरोध" नसून "अनुनयाचे कारण असलेल्या समाजगटालाच विरोध' झाले आहे. अशा समाजघातकी धोरणास विरोध असणार्‍यांना हिंदूविरोधी हिंदू, गद्दार, सिक्यूलर अशी लेबलं चिकटवून सर्रास अपमानित केले जाते. एका विशिष्ट समाजाला जर राजकिय लोक मतांसाठी पुचकारत असतील तर त्यांचा विरोध हा त्या समाजाला संधी, शिक्षण, प्रेम व आपुलकी देऊन करावा जेणेकरून राजकिय पक्षांना असले ग्राउंडच मिळू नये. पण हा मार्ग कठीण आहे. सोपा मार्ग एका मोठ्या गटाला 'दुसर्‍या छोट्या गटामुळे तुमच्यावर अन्याय होतोय' असा प्रचार करून भडकवणे हा आहे. यात खरंच धर्मनिरपेक्ष भारत अपेक्षित आहे असं दिसत तर नाही. जागोजागी हिंदूत्ववाल्यांच्या जनगणनेच्या टक्केवारीची उलटसुलट मांडणी करून 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हा धादांत खोटा प्रचार करणार्‍या सभा होत आहेत. हे सगळे कशाचं द्योतक?

In reply to by तर्राट जोकर

फक्त एकच सिद्ध करा
जागोजागी हिंदूत्ववाल्यांच्या जनगणनेच्या टक्केवारीची उलटसुलट मांडणी करून 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हा धादांत खोटा प्रचार

In reply to by तर्राट जोकर

जागोजागी हिंदूत्ववाल्यांच्या जनगणनेच्या टक्केवारीची उलटसुलट मांडणी करून 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हा धादांत खोटा प्रचार कसा आहे हे नाही पटलं म्हणुन म्हटलं सिध्द् करा. कारण मलातर 'मुस्लिमांची संख्या वाढत आहे, ही काळजीची बाब आहे' हे खर वाटतं बाकी तुमच्याशी सह्मत आहेच

In reply to by नया है वह

ह्याबद्दल एक सविस्तर धागा काढायला लागेल. कारण सांख्यिकिच्या बर्‍याच गमती-जमती विस्ताराने सांगाव्या लागतील. त्याची कारणे, उपायही सांगावे लागतील. थोडक्यात सांगतो ते असे की जसे कुराणाच्या आयतींचे मनाप्रमाणे लोक अर्थ लावतात तसेच सांख्यिकीचेही आहे. जरा वेळ काढून लिहिन.