Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दिवाकर कुलकर्णी on Sat, 10/03/2015 - 23:31
लेखनविषय (Tags)
कथा
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं, "जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो, "ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं, "ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही, खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!
  • 30266 views

प्रतिक्रिया

Submitted by dadadarekar on Mon, 10/05/2015 - 11:35

In reply to दादा खान by सुबोध खरे

Permalink

.

कृष्णाजी प्रभाकर की भास्कर ? बहुतेक कृष्णाजी भास्कर

Submitted by पैसा on Mon, 10/05/2015 - 13:06

In reply to . by dadadarekar

Permalink

आँ?

http://www.misalpav.com/comment/750526#comment-750526 इथे तुम्हीच लिहिलंत ना दादुस? विसरलात काय?

Submitted by अमित मुंबईचा on Mon, 10/05/2015 - 13:01

In reply to अफजलखानांचा कोथळा शिवाजींनी by फुलथ्रॉटल जिनियस

Permalink

+१

हे अस काही घडल होत हे माहीत नव्हत, काही पुरावे आहेत का?

Submitted by तुडतुडी on Sun, 10/04/2015 - 13:36

Permalink

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?
रोजचा स्वतःचा अनुभव आणि निरीक्षण आहे . तुम्ही मुस्लिमांशी (अत्यंत दुर्मिळ अपवाद वगळता ) कितीही मराठी बोलायचा प्रयत्न केलात तरी ते कधीही मराठीत बोलत नाहीत .उर्दू मिश्रित हिंदीतच बोलतात मग अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही . त्यांना मराठी समजत असतं आणि बोलताही येत असतं पण ते प्रतिसाद मात्र मराठीत देत नाहीत .त्यांचीच भाषा पुढे रेटतात . आपणही मग त्यांच्याशी त्याच भाषेतून बोलू लागतो .भाषा आणि पोशाख ह्या कुठल्याही धर्माच्या , संस्कृतीच्या महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे आपणही त्यांच्याशी हटकून मराठीतच बोलायला हवं . अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजी महाराजांचं खेळणं विकलं जातं हे त्या बाईने सांगितलं . आता ह्यात धर्मनिरपेक्षता कसली आलीय ?

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 10/04/2015 - 13:59

In reply to हिंदी फक्त मुसलमानच बोलतात by तुडतुडी

Permalink

वाजपेयी

अडवाणी,अमित शहा,राजनाथ्,अशोक सिंघल मुंबईत्,महाराष्ट्रात आले की मराठी कार्यकत्यांशी कुठच्या भाषेत बोलतात गे तुडतुडे?

Submitted by तर्राट जोकर on Sun, 10/04/2015 - 15:49

In reply to वाजपेयी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

माई, त्येंच्याशी वाद घालू नका

माई, त्येंच्याशी वाद घालू नका. मुसलमानांना त्येंच्या सोतोपेक्शा जास्त चाम्गलं व्ळीखतेत ते.

Submitted by दिवाकर कुलकर्णी on Sun, 10/04/2015 - 15:25

Permalink

सर्व प्रतिसादकांचे आभार

सर्व प्रतिसादकांचे आभार मे जे लिहीलंय ती एक सत्य घटना आहे, तसा मी कधीच लेखक नव्हतो व नाही,पण जे मनाला भिडलं कि, एका मुस्लिम बाईचं ब्रेड आणि बटर अफझल खानाच्च्या वधाचं खेलणं असावं ,ते उतरवलंय इतकंच, हा विरोधाभास मला धर्म निरपेक्शता वा सहिष्णुता वाटली , इतकंच माझा खरं तर शशक लिहायचा विचार होता त्यामुलं अधिक तपशील मी टालले, त्यामुलं ती मुस्लीम असल्याचा संदर्भ नीट येऊ शकला नाही, हे मान्य, प्रश्न राहिला ळ बद्दल ल लिहीलं जाण्याचा, अयोग्य की बोर्ड मुलं हे घडतंय, आपल्याला हे सहन करावं याबद्दल क्शमस्व ! मिपाच्या पंगतीत ,येणं अंत्यत आनंदाचं आहे याची प्रचिती मी घेतली आहे.

Submitted by फुलथ्रॉटल जिनियस on Sun, 10/04/2015 - 15:49

In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार by दिवाकर कुलकर्णी

Permalink

चाळु द्या चाळु द्या, ल ने

चाळु द्या चाळु द्या, ल ने तसाही काही फळक पडत नाही......

Submitted by दिवाकर कुलकर्णी on Sun, 10/04/2015 - 17:07

Permalink

घन निळा लडिवाळा झुलवू नको

घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या सार्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा ।।१।।झुलवूनको हिंदोळा सांज वेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे चंद्र निघे बघ झाडामागे कालिंदीच्या तटी खेळती गोपसुतांचा मेळा ।२। झुलवू.......... गदिंमांच्या या गीतात १४ वेळा ळ आलाय माणिक वर्मांच हे गाणं तू नळी वर ऐका,भरून पावल्याचा आंनंद मिळेल ़़शुभा खोटे वर हे गाणं चित्रीत झालंय, त्या वेळची शुभा खोटे किती मार्दव़ माझ्या कथेतील ल ,ळ ,च्या चुकार पणाची भरपाई करू इच्छितो

Submitted by चांदणे संदीप on Sun, 10/04/2015 - 17:24

In reply to घन निळा लडिवाळा झुलवू नको by दिवाकर कुलकर्णी

Permalink

छळा!

छळ छळ छळा सग ळ्या क ळ ळाव्यांना!

Submitted by अरुण मनोहर on Sun, 10/04/2015 - 17:59

Permalink

मिपावर स्वागत

कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ रे दिवाकरा, ळ विषयीची कळकळ तळमळ कळ्ळ्ळ कळ्ळालि

Submitted by dadadarekar on Sun, 10/04/2015 - 18:47

Permalink

अल्ला तेरो नाम .इश्वर तेरो नाम

आमचा लाडका अफजुल्या ६२ बायका , सरदारकी उपभोगुन ६० वर्षे तृप्तपणे जगुन मग मेला . शाइस्त्याचेही तसेच आहे. २२ की किती वर्षे बंगालचे की कुठले राजेपण भोगून मग मेला. बोटं तुटलॅ म्हणून कुठलं सुख कमी नाही पडले. (संपादित)

Submitted by यशोधरा on Sun, 10/04/2015 - 19:10

In reply to अल्ला तेरो नाम .इश्वर तेरो नाम by dadadarekar

Permalink

लाहौलविलाकुवत!!

बघा, असं आमचा लाडका, आमचा लाडका असं एका धाग्यावर म्हणता, आणि दुसर्‍या धाग्यावर कसा काय आमचा लाडका असं विचारता! ह्ये वागनं बरं नव्हं!

Submitted by dadadarekar on Sun, 10/04/2015 - 19:13

In reply to लाहौलविलाकुवत!! by यशोधरा

Permalink

बै बै ! किती गैरसमज !

लाडका अफजुल्या , लाडका औरंग्या असं म्हटलं की दौदही आमचा लाडकाच झाला का ?

Submitted by यशोधरा on Sun, 10/04/2015 - 19:21

In reply to बै बै ! किती गैरसमज ! by dadadarekar

Permalink

तुम्हीच सांगा :)

तुम्हीच सांगा :)

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 21:27

In reply to तुम्हीच सांगा :) by यशोधरा

Permalink

चायला वर्जीनल पर्तीसाद सं

चायला वर्जीनल पर्तीसाद सं पादीत झाला....कुणाकडे ब्याकप है का =))

Submitted by यशोधरा on Sun, 10/04/2015 - 21:33

In reply to चायला वर्जीनल पर्तीसाद सं by टवाळ कार्टा

Permalink

टक्या, इस हात दे और उस हात ले

टक्या, इस हात दे और उस हात ले. समझे? :D अवांतरः इतकं बोलून दादासैब काय दौद त्यांचा लाडका नाही म्हणले नैत, मग काय बरं समजावं?

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 21:40

In reply to टक्या, इस हात दे और उस हात ले by यशोधरा

Permalink

कि मंग्दा है...मैनू एवरेस्ट

कि मंग्दा है...मैनू एवरेस्ट बेस कँप जाण्णा जी...ओये त्वाड्डी मदद मंग्दा :)

Submitted by dadadarekar on Sun, 10/04/2015 - 22:17

In reply to टक्या, इस हात दे और उस हात ले by यशोधरा

Permalink

दाउद (सध्या )आमचा लाडका नाही.

.

Submitted by यशोधरा on Sun, 10/04/2015 - 22:19

In reply to दाउद (सध्या )आमचा लाडका नाही. by dadadarekar

Permalink

सद्ध्यापुरते अभिणंदन!

देर आये. कोई नहीं, आये तो सही!

Submitted by dadadarekar on Sun, 10/04/2015 - 22:23

In reply to सद्ध्यापुरते अभिणंदन! by यशोधरा

Permalink

दादाचे नवे बारसे करुन दाउद करु का ?

.

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 10/04/2015 - 22:25

In reply to दादाचे नवे बारसे करुन दाउद करु का ? by dadadarekar

Permalink

समाधी घेतलीत तरी चालेल.

समाधी घेतलीत तरी चालेल.

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 22:27

In reply to समाधी घेतलीत तरी चालेल. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी?

व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी??? अश्शी उघड उघड???

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 10/04/2015 - 22:32

In reply to व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी? by टवाळ कार्टा

Permalink

उघड उघड "चुकी"च्या गोष्टी

उघड उघड "चुकी"च्या गोष्टी बोलण्याला विरोध हे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कधीपासुन झाली टक्कुमक्कुशोनु?

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 22:38

In reply to उघड उघड "चुकी"च्या गोष्टी by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

चुकीच्या गोष्टी वगैरे काही

चुकीच्या गोष्टी वगैरे काही नस्तेरे...अफ्वा हैत त्या =))

Submitted by dadadarekar on Sun, 10/04/2015 - 22:57

In reply to उघड उघड "चुकी"च्या गोष्टी by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

चिमणीभौ.

चूक बरोबर कोण ठरवणार ?

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 23:00

In reply to चिमणीभौ. by dadadarekar

Permalink

चिमणी =)) आग्गाग्गा

चिमणी =)) आग्गाग्गा

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 10/04/2015 - 23:02

In reply to चिमणीभौ. by dadadarekar

Permalink

(No subject)

Image removed.

Submitted by यशोधरा on Sun, 10/04/2015 - 22:31

In reply to दादाचे नवे बारसे करुन दाउद करु का ? by dadadarekar

Permalink

भारतात तुमचे नाव हवे ते आणि

भारतात तुमचे नाव हवे ते आणि हव्या तितक्या वेळा बदलण्याचे स्वातंत्र्य तुम्हांला आहे.

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sun, 10/04/2015 - 22:32

In reply to भारतात तुमचे नाव हवे ते आणि by यशोधरा

Permalink

माझा पर्याय जास्तं सोपा आणि

माझा पर्याय जास्तं सोपा आणि पुण्यदायी आहे.

Submitted by dadadarekar on Sun, 10/04/2015 - 22:15

In reply to चायला वर्जीनल पर्तीसाद सं by टवाळ कार्टा

Permalink

काय इशेष नाय हो.

जे वाक्य दिसते आहे त्याच्याउलट दुसरे वाक्य होते. ते संपादित झाले.

Submitted by सुबोध खरे on Mon, 10/05/2015 - 09:45

In reply to काय इशेष नाय हो. by dadadarekar

Permalink

ओ हितेस भाऊ

ओ हितेस भाऊ तुम्ही तुमची सर्व स्थावर जंगम इष्टेट आम्हाला देऊन हाजला जाणार होतात ना ? पुण्य मिळवायला. आम्ही ष्टाम्प पेपर घेऊन वाट बघून र्हायलो ना? मग कायले हिकडे काथ्याकुट करून र्हायले? तिकडे काबा ला ष्टाम्पिड साठी तुमची वाट बघून राह्यलेना!

Submitted by dadadarekar on Mon, 10/05/2015 - 09:50

In reply to ओ हितेस भाऊ by सुबोध खरे

Permalink

असे मी कधी बोल्लो नव्हतो.

.

Submitted by पैसा on Mon, 10/05/2015 - 13:28

In reply to असे मी कधी बोल्लो नव्हतो. by dadadarekar

Permalink

असं काय कर्ता ओ!

असं काय कर्ता ओ! मला आठवतंय तुम्ही लिहिलेलं! लिंक शोधायचा लै कट्टाळा आलाय आता!

Submitted by dadadarekar on Mon, 10/05/2015 - 13:43

In reply to असं काय कर्ता ओ! by पैसा

Permalink

लिंक शोधून द्या.

.

Submitted by तर्राट जोकर on Sun, 10/04/2015 - 23:23

Permalink

लेखासंबंधी:

लेखासंबंधी: वपुस्टाइल मांडणी चांगली आहे. लेखनशैलीही चांगली आहे. काय चुकले? धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरून. ती बाई मुस्लिम होती-नव्हती हा भाग वेगळा. इथे लेखकाच्या मनातच धर्म किती रुतून बसला आहे याचे प्रत्यंतर आले. ऐकीव माहितींवरून व सतत एकतर्फी प्रचारावरून सुशिक्षितांचीही मते कशी मातकट होतात याचे हे उदाहरण. अफझलखानाचा वध करणारे शिवाजी हे हिंदू-विरुद्ध-मुस्लिम चे प्रतिक म्हणून प्रचार करून शिवाजींची प्रतिमा/इतिहास बदलण्याचे पातक काही विशिष्ट लोकांनी केले. खरे काय? शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या. कथेचं काय? इथे ती बाई व्यवसायहेतू हे पुतळे विकते, तीचे शिक्षण-विचारसरणी-मूल्ये लेखकांइतकी उच्च नक्कीच नसतील. ती अर्थव्यवस्थेच्या गरजेअनुरूप वागत आहे. त्यात तिला स्वतः न जाणवणारी धार्मिक बाब लेखकांना जाणवते व लेखकराव त्यांनीच शोधलेल्या तिच्या (गरजेपोटी आलेल्या) धर्मनिरपेक्षपणाचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतात. अफझलखानास मुस्लिम धर्म चिकटवतात व शिवाजींस हिंदू धर्म चिकटवतात. स्वतःचीच धर्मांध प्रतिमा या कथेतून उभं राहतांना त्यांना जाणवत नाही पण ते अशिक्षित गरीब बाईंच्या धार्मिक मूल्यांची मोजदाद करण्याचा प्रयत्न करतात. प्रतिसादकांचं काय? नेहमीचे यशस्वी लोक आपआपली नेहमीची आयुधे घेऊन नेहमीचे तीर सोडतायत. कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून? कथेवर चर्चा सोडून भलतेच विषय घेऊन एकमेकांवर फुटकळ शरसंधान करण्यात काय मिळतं? खरंच ही कथा शिवाजी-अफझलखान भेटीवर आहे? असो. प्रत्येकाच्या मनोरंजनाचे आपआपले फंडे असतात. कुठल्या दुखर्‍या नसा कोण कुठं कुरवाळीत बसेल ज्याचे त्याला ठवुक. धन्यवाद!

Submitted by पगला गजोधर on Mon, 10/05/2015 - 09:26

In reply to लेखासंबंधी: by तर्राट जोकर

Permalink

@TJ १++

असाच काहीसा आपल्यासारखा सूर मी माझ्या "शिवजयंती हायजँक ????" या धाग्यात लावलेला. त्यामुळे आपल्या या सुज्ञ प्रतिक्रियेला माझे अनुमोदन.

Submitted by दत्ता जोशी on Mon, 10/05/2015 - 10:29

Permalink

अगदी हेच म्हणायचं मला सेक्युलर विचारवंतांच्या बाबतीत.

" कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून?" तेही बरचसं धडधडीत खोटं.. अगदी असंच मला नेहमी वाटत या सेक्युलर लोकांच्या बाबतीत. यांच्या म्हणण्याप्रमाणे अफजलखान विजापूरहून निघून वाई ला येईपर्यंत काय शांतीचा संदेश पेरत आला होता असंच असं असतांना करंटे लोक आफ्जुल्याची दाढी बघतात म्हणजे काय? !!! बरं मग मग जर अफजलखानाचा वधाचे चित्र लावून खाली "दहशतवाद असाच संपवावा लागतो" असं चित्र दिसला तरी या सेक्युलर आणि शांती प्रिय लोकांना का मिरची लागते हे मात्र न कळलेले कोडे आहे !! मग ते शांतीप्रिय लोक चित्रे फाडतात, दगडफेक करतात अगदी मग हिंदू दैवतांच्या मूर्तींची विटम्बना होते, जाळपोळ आणि दंगल होते. त्यांना हेच ज्ञानामृत पाजण्याचे शानपन ( पक्षी: धारिष्ट्य) हे सेक्युलर विचारवंत लोक का दाखवत नाहीत असं विचारणे म्हणजे विचारणारे अजून धर्मांध. असो. लोकशाही है. चल्नेकाच . .

Submitted by तर्राट जोकर on Mon, 10/05/2015 - 11:21

In reply to अगदी हेच म्हणायचं मला सेक्युलर विचारवंतांच्या बाबतीत. by दत्ता जोशी

Permalink

दत्ताजी,

दत्ताजी, काही प्रश्न आहेत. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे? वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची? 'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?

Submitted by dadadarekar on Mon, 10/05/2015 - 11:39

In reply to दत्ताजी, by तर्राट जोकर

Permalink

हेच म्हणतो मी.

अफजलखान केवळ सरदार होता. पण गनिम शहेनशहा जर वाइइट होते तर त्यांच्या दारात रांग लावायला जाणे , माझ्या मुलाला जहागिरी द्या अशी पत्रे लिहिणे , असे प्रकार बाकीच्चे राजे का करत होते ?

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 10/05/2015 - 14:23

In reply to हेच म्हणतो मी. by dadadarekar

Permalink

जग असंच असतं, सायेब. सगळ्या

जग असंच असतं, सायेब. सगळ्या काळांत कोणीना कोणी दादासाहेब, मामासाहेब असतातच !

Submitted by मृत्युन्जय on Mon, 10/05/2015 - 11:48

In reply to दत्ताजी, by तर्राट जोकर

Permalink

दुसर्‍या राजांविरुद्ध आणि

दुसर्‍या राजांविरुद्ध आणि सरदारांविरुद्ध लढाया शिवरायांनीही केल्या पण त्यांनी वाटेत इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याचे भडकाऊ प्रकार नाही केले. असो.

Submitted by तर्राट जोकर on Mon, 10/05/2015 - 12:09

In reply to दुसर्‍या राजांविरुद्ध आणि by मृत्युन्जय

Permalink

तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय

तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं या वादाला काय अर्थ आहे का मृत्यूंजय साहेब? ते जाऊ द्या. आता ह्या तमाम सेक्युलर-विरोधी लोकांना नेमकं काय हवंय तेही स्पष्ट शब्दात कळवतील तर बरं होईल. म्हणजे त्यांच्या स्वप्नातला सेक्युलर-मुक्त भारत कसा असेल?

Submitted by मृत्युन्जय on Mon, 10/05/2015 - 12:13

In reply to तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय by तर्राट जोकर

Permalink

मी केवळ तुमच्या प्रतिक्रियेला

मी केवळ तुमच्या प्रतिक्रियेला माझा अल्पसा प्रतिवाद दिला. बाकी तीनशे वर्षांआधी काय घडलं नाय घडलं आणि त्याचा काही अर्थ आहे की नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल त्यामुळे इथे देत नाही.

Submitted by dadadarekar on Mon, 10/05/2015 - 12:18

In reply to दुसर्‍या राजांविरुद्ध आणि by मृत्युन्जय

Permalink

प्रार्थनास्थळे फोडणे वा मदत करणे हा एकंदर राजकारणाचा भाग होता.

मराठ्यांनी शृंगेरी शंकराचार्यांचा मठ लुटला होता . ( बरोबर ना ? ) या मठाला टिपू सुलतान मदत करत होता. अदिलशहाने चाफळ राममंदिराला जागा / अर्थसहाय्य दिले होते हे खरे आहे का ? खुद्द अफजलखान कर्नाटक दौर्‍यात असताना एकही मंदिर पाडले नव्हते. कारण तिथले हिंदू सरदार हे आदिलशाहीचे मित्र होते. माहाराष्ट्रात मात्र याच अफजलखानाने देवळे पाडली कारण महाराजाना उकसवायचे होते म्हणून. जाणकारानी माहितीत चुका असतील तर सुधारणा कराव्यात

Submitted by मृत्युन्जय on Mon, 10/05/2015 - 12:24

In reply to प्रार्थनास्थळे फोडणे वा मदत करणे हा एकंदर राजकारणाचा भाग होता. by dadadarekar

Permalink

एखाद्याला उचकावयचे राजकारण

एखाद्याला उचकावयचे राजकारण करण्यासाठी त्याच्या धर्माची प्रार्थनास्थळे पाडणे उचित आहे???? नक्की??? हे मत फायनल ना?

Submitted by तर्राट जोकर on Mon, 10/05/2015 - 12:28

In reply to एखाद्याला उचकावयचे राजकारण by मृत्युन्जय

Permalink

युद्धात सगळं काही क्षम्य असतं

युद्धात सगळं काही क्षम्य असतं म्हणतात. तुमचं मत धर्मानुसार बदलतं काय?

Submitted by मृत्युन्जय on Mon, 10/05/2015 - 12:46

In reply to युद्धात सगळं काही क्षम्य असतं by तर्राट जोकर

Permalink

"सगळं काही क्षम्य असतं "

"सगळं काही क्षम्य असतं " तुमचे पहिले स्टेटमेंट नक्की आहे असे समजतो. हे वक्तव्य देखील फायनल समजु का? बदलणार नाही ना नक्की?

Submitted by फुलथ्रॉटल जिनियस on Mon, 10/05/2015 - 12:40

In reply to दुसर्‍या राजांविरुद्ध आणि by मृत्युन्जय

Permalink

अफजल खान वगैरे प्रभुतींनी

अफजल खान वगैरे प्रभुतींनी मंदीरे उद्ध्वस्त केली हे धादांत खोटे आहे, समकालीन ऐतीहासिक साधानांमध्ये असा कोणताही पुरावा नाही.ते फक्त एक सरदार होते ,त्यांचा शिवाजीराजांवर कोणताही वैयक्तीक राग न्हवता.सत्तास्पर्धेत लढाया या व्हायच्याच , म्हणून अफजल खान दहशतवादी ठरत नाही.अफजल खान हा वाइचा सुभेदार होता,वाईच्या हिंदी घाटाला त्याने सुभेदार असताना मदद केल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.तो हिंदूद्वेष्टा अजिबात न्हवता,प्रतापगड मोहिमेच्या वेळी वाईत त्याने जनकल्याणार्थ कोटीचंडी यज्ञ केला होता,आता मला सांगा, हिंदू द्वेष्टा माणुस हिंदूंची कर्मकांडे करेल काय?????

Submitted by मृत्युन्जय on Mon, 10/05/2015 - 12:48

In reply to अफजल खान वगैरे प्रभुतींनी by फुलथ्रॉटल जिनियस

Permalink

तो जान्हवेही घालायचा असाही

तो जान्हवेही घालायचा असाही काही पुरावा समकालीन ऐतिहासिक साधनांमध्ये सापडेल तुम्हाला. बघा बरे जरा.

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com