✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे काय कमी काय?

श — शिव कन्या, Wed, 09/16/2015 - 21:46
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

प्रतिक्रिया द्या
4447 वाचन

💬 प्रतिसाद (13)

चटका लावला.

शुचि
Wed, 09/16/2015 - 22:56 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

फारच छान.. आवडली.

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/16/2015 - 23:14 नवीन
फारच छान.. आवडली.
  • Log in or register to post comments

भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!

चांदणे संदीप
Wed, 09/16/2015 - 23:26 नवीन
"भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?" हे प्रचंड आवडल! तसे बेवारस कुणीही न मरो हीच प्रार्थना!
  • Log in or register to post comments

नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि

मांत्रिक
Wed, 09/16/2015 - 23:31 नवीन
नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि प्रत्येक वेळीस एक सुंदर काव्य वाचायला मिळतंच! अप्रतिम लिहिता! तुमची एक स्वतंत्र शैली आहे, जी शब्दांत सांगता येत नाही, पण तुमचा ठसा लगेच ओळखू येतो. असो, अप्रतिम काव्य!
  • Log in or register to post comments

+१

रातराणी
गुरुवार, 09/17/2015 - 05:18 नवीन
वेगळ्याच असतात तुमच्या कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मांत्रिक.

शिव कन्या
Wed, 09/23/2015 - 20:44 नवीन
चला टोपण का असेना, नावा पर्यंत तरी पोहचलो. वाचनासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अहो धन्यवाद आम्हीच देतो! इतकं

मांत्रिक
Wed, 09/23/2015 - 21:07 नवीन
अहो धन्यवाद आम्हीच देतो! इतकं सुंदर काव्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल! लिहित रहा! वाचत राहू!!! आनंद घेत राहू उत्तम काव्याचा!!! प्रचंड आवडते तुमची काव्याची स्टाईल!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

सुरेख

एक एकटा एकटाच
गुरुवार, 09/17/2015 - 09:17 नवीन
सुरेख रचना पुढिल लिखाणास शुभेच्छा
  • Log in or register to post comments

खूप छान!

पैसा
गुरुवार, 09/17/2015 - 21:31 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Fri, 09/18/2015 - 15:10 नवीन
मस्त... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Gajanana... :- Bajirao Mastani
  • Log in or register to post comments

सुंदर!!!!

प्राची अश्विनी
Fri, 09/18/2015 - 16:32 नवीन
सुंदर!!!!
  • Log in or register to post comments

सुरेख! खूप आवडली.

पद्मावति
Wed, 09/23/2015 - 23:59 नवीन
सुरेख! खूप आवडली.
  • Log in or register to post comments

कमालीची आवडली! काही ओळी तर

वेल्लाभट
गुरुवार, 09/24/2015 - 00:08 नवीन
कमालीची आवडली! काही ओळी तर अचूक वेध घेणा-या बाणासारख्या... वाह
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा