✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 08/24/2015 - 22:31  ·  लेख
लेख

सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे.

हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले.

कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे.

यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.)

शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले.

हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या

वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले.

बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले.

नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल.

दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
33985 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

डाॅ. लेख अतिशय उत्तम आहे. पण

मांत्रिक
Wed, 08/26/2015 - 15:01 नवीन
डाॅ. लेख अतिशय उत्तम आहे. पण वाखु. का साठवता येत नाहीये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तुडतुडी अक्का, या प्रतिसादा

प्यारे१
Wed, 08/26/2015 - 13:08 नवीन
तुडतुडी अक्का, या प्रतिसादा साठी तुम्हाला ___/\___ फ़क्त काही गोष्टी टाळल्या तर बरं जसं बिनडोक व्रत वैकल्य. काहीतरी करा म्हणताना कधीकधी का करा हे ठाऊक नसतं, समजलं तरी त्याबाबत विचार करण्याची क्षमता नसते. त्यामुळे करत रहा असं सांगितलं जातं. काही वेळा स्वार्थापोटी, भीती दाखवून प्रश्नांना बंदी केली जाते. अवांतर- ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका दुर्घटनेची आठवण झाली. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

धन्यवाद, काही माहिती अतिशय

मांत्रिक
Wed, 08/26/2015 - 13:19 नवीन
धन्यवाद, काही माहिती अतिशय उपयुक्त दिलेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

..........

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 14:25 नवीन
..........Image removed. @ गणेशाला-हत्तीचं डोकं बसवणं >> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

त्यात काय विनोद झाला कळलं

मांत्रिक
Wed, 08/26/2015 - 15:37 नवीन
त्यात काय विनोद झाला कळलं नाही? असो १०० वा प्रतिसाद माझा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खरच णविण दिसता मि पावर! ;-)

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 17:03 नवीन
खरच णविण दिसता मि पावर! ;-) असो! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

तुम्ही वसकन अंगावर येणार नसाल

पिलीयन रायडर
Fri, 08/28/2015 - 04:17 नवीन
तुम्ही वसकन अंगावर येणार नसाल तर एक सांगु का... चांगला आहे हा प्रतिसाद.. तुमची मतं ठाम आहेत.. माहिती सुद्धा खुप आहे तुम्हाला.. आणि वाचनही पुष्कळ असावं.. पण तुम्ही फारच अ‍ॅग्रेसिव्ह लिहीता म्हणुन तुमचं खरं वाटत नाही अनेकदा.. जर तुम्हाला पटला नाही हा प्रतिसाद तर सोडून द्या.. वाद नको घालायला.. ओके?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

समाजाला चुकीच्या दिशेने

यशोधरा
Fri, 08/28/2015 - 11:17 नवीन
समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे
अगदी अगदी. पटलंच मला. पण काय हो, समाजाने त्यांचं त्यांचं - स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं असतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

प्लीज प्लीज अंगावर येऊ नका

पैसा
Fri, 08/28/2015 - 12:08 नवीन
समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे
यात घोळ आहे असं नाही का वाटत? स्त्रियांना कसलेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात या असल्या, तुमच्याच भाषेत 'बिनडोक' व्रतवैकल्यांचा आरंभ झाला असावा. स्त्रियांना दुसरे काही करायला वेळ किंवा शक्ती रहाणार नाही यासाठी त्या काळात स्त्रियांना व्रतवैकल्यात अडकवून ठेवले असेल असे वाटत नाही का? तेव्हा त्यांना समाजाने आखून दिलं तसं जगायचं होतं. कुठच्या दिशेने जायचं स्वातंत्र्य नव्हतंच. (काही अगदी चमकदार अपवाद होते. पण ते अपवादच.) स्त्रिया स्वतःच प्रवाहपतित होत्या. त्या कसल्या कोणाला चुकीच्या दिशेने नेणार होत्या? आताच्या काळात मात्र स्त्रियांनी विचार करून यातून बाहेर यायचा प्रयत्न केला पाहिजे हे खरंय. म्हणजे निदान एकेक घर तरी अशा प्रथांतून बाहेर पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

ज्या काळात स्त्रीला चप्पल

अजया
Fri, 08/28/2015 - 12:42 नवीन
ज्या काळात स्त्रीला चप्पल घालणे माहित नव्हते ,तिचे स्थान माजघरापलिकडे नव्हते,तिला शिक्षणाचा गंध नव्हता त्या काळात ही व्रतवैकल्ये विरंगुळा तसंच त्या भाविक काळात निरनिराळ्या निमित्ताने देवाचे नाव घेणे,एक मानसिक आधार देणे यासाठी स्त्रिया व्रतवैकल्ये आदि गोष्टीत मन रमवत होत्या. आता शिक्षणाने विचार करु लागल्यावर यात बदल होतोय काही वर्गापुरता तरी.यातून बाहेर पडायचं म्हणजे काहीतरी पाप आहे,काहीतरी वाईट घडेल असल्या भितीतून हे वर्षानुवर्षे सुरूच राहिलंय. हल्ली मात्र पुन्हा एकदा असल्या व्रतवैकल्यांचे वाढते अवडंबर जाणवते.१९९६ मध्ये काहीही ऐकले नव्हते असे हे व्रत त्यावेळी पेक्षा आत्ताच करणारे मिरवणारे घाबरणारे असे लोकच जास्त दिसत आहे.सोशल नेटवर्कींगने या धाग्यावरनंसुध्दा हे व्रत जगभर पोचले असेल.आणि त्यातला फोलपणा लक्षात न घेता केलेल्या व्रताचे व्हाॅट्स अॅपी फोटो बघून हे व्रत सर्वव्यापी झाले तर आश्चर्य वाटू नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खरंय

पैसा
Fri, 08/28/2015 - 12:50 नवीन
संतोषी माता, गुरुवारचे महालक्ष्मीव्रत, हे कोकिळाव्रत यांचे प्रस्थ सुरू होऊन वाढत गेलेले अगदी डोळ्यासमोर घडले आहे. आपल्या जुन्या कहाण्या आठवतात ना? त्यात व्रतं करायची पद्धत साधी सोपी असायची. कुठे झाडाखाली जाऊन पूजा करा, तळ्याच्या काठी जाऊन पूजा करा. साध्या सरळ गोष्टी असायच्या. श्रावण महिन्यात खूप पाने फुले मिळतात त्यांचा वापर करून पूजा वगैरे. अगदी केनीकुर्डूची भाजी केली इ. उल्लेख त्या कहाण्यांत असतात. असे भटजींना बोलावून दाने द्या वगैरे कुठेही सांगितलेले नसायचे. मला त्या सगळ्या कहाण्या वाचायला खूप आवडतात. पण ही सगळी व्रते म्हणजे.... जौदे. एखाद्याच्या श्रद्धेला हसू नये हे खरे. पण असली व्रते वगैरे श्रद्धा नाही म्हणता येत. ती अंधश्रद्धा सदरात जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

असली व्रते वगैरे श्रद्धा नाही

यशोधरा
Fri, 08/28/2015 - 12:56 नवीन
असली व्रते वगैरे श्रद्धा नाही म्हणता येत. ती अंधश्रद्धा सदरात जातील. >> नाही ती 'फोफावणारा आणि कधीच मंदीत न जाणारा बिझनेस' ह्या सदरात जातील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+११११

प्यारे१
Fri, 08/28/2015 - 13:22 नवीन
+११११ आणि यांना आधार म्हणून किंवा जाहिरात म्हणून चित्रपट मालिकांमधून प्रमोट केलं जातं. जय संतोषी माता, साईबाबा सारखे चित्रपट किंवा जय मल्हार सारख्या मालिका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हे केनीकुर्डू काय प्रकार आहे?

बॅटमॅन
Fri, 08/28/2015 - 13:00 नवीन
हे केनीकुर्डू काय प्रकार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पावसाळी भाजी

पैसा
Fri, 08/28/2015 - 13:06 नवीन
पावसाळी रानभाजी आहे ती. केनी आणि कुर्डू. कुर्डू तू बघितले असशील नक्की. http://www.misalpav.com/node/25306 http://www.maayboli.com/node/9313
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद!

बॅटमॅन
Fri, 08/28/2015 - 13:11 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असे थिल्लर उत्सव करून आपण

तुडतुडी
गुरुवार, 08/27/2015 - 13:37 नवीन
असे थिल्लर उत्सव करून आपण त्या देवतेलाच कमीपणा आणतो हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.
अगदी बरोबर . वर्गणी द्यायला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे . कुणी हिंदू उत्सव , परंपरा आहे असा युक्तीवाद केला तर , हिंदू धर्माची एवढी चाड आहे तर देवघरातल्या गणेशाला रस्त्यावर आणून त्याचा अपमान करताना धर्माभिमान कुठे जातो असा उलट प्रश्न विचारावा
समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे.
हा दावा माझा नसून ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलंय . योगशास्त्रा वरची काही पुस्तकं वाचण्यात आली . योगानुभावावरून हेच खरं आहे हे सिद्ध होतं . बिनडोक एवढ्यासाठी म्हणलंय कि लॉजिक शोधण्याचा प्रयत्न केला कि ते सापडतं . माझ्या काही ब्राह्मण मैत्रिणी आहेत . त्यांच्याशी ह्या विषयाबाबत बोलताना हसावं कि रडावं हे समजत नाही . अक्कल घरातल्या तिजोरीत कुलूप लावून बंद ठेवतात काही बायका .
  • Log in or register to post comments

ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका

तुडतुडी
गुरुवार, 08/27/2015 - 13:39 नवीन
ऊर्ध्वरेता वगैरे वाचून एका दुर्घटनेची आठवण झाली.
कुठली घटना हो ? असं नै करायचं . कुतूहल वाढवून मधेच नाही सोडायचं . इथे सांगता येत नसेल तर व्य नि केला तरी चालेल
  • Log in or register to post comments

समीरसूर सर +++++ ११११

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 23:20 नवीन
समीरसूर सगळेच प्रतिसाद पट्ले/ आवडले . सगळ्यांणी आपापल्या स्वार्थासाठी कहाण्या तयार केल्या असाव्यात असे वाट्ते . एक कहाणी घ्या, तिचे अणेक व्हर्जण वाचयला मिळतील . ण्क्की कश्यावर विश्वास ठेवायचा? आणी का? लोक देव प्रसण्ण व्हावा म्हणूण अणेक व्रतवैकल्य करतात , मग देव का णाही वाचवत ? असो. ही घ्या ताजी बातमी http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4702027652677229192&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150827&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE
  • Log in or register to post comments

पैसा भाऊ , यशोधरा ताई

तुडतुडी
Fri, 08/28/2015 - 12:48 नवीन
पैसा भाऊ , यशोधरा ताई स्त्रियांना व्रतवैकल्यात अडकवण्याचा किवा त्यांना वेद वाचण्याचा अधिकार मध्ययुगीन काळात नाकारण्याच कारण काय आहे हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी आणि एका स्त्रीच्या संभाषणातून स्पष्ट होतं . स्त्रियांना स्वतःलाच व्रत वैक्ल्यात अडकून घ्यायला , अन्याय करून घ्यायला आवडत . ती स्त्री स्वामींना विचारते कि 'धर्म स्त्रीला माता , शक्ती वगेरे मानतो मग तिच्यावर अशी बंधनं का घालतो ?' तेव्हा ते म्हणतात स्त्री वर बंधन घालणारे आम्ही कोण ? स्त्रियांना स्वतःलाच बंधनात अडकायला आवडत . त्यांना मुक्तीची आस कधीच नसते . नवरा , पोरंबाळं ह्या पलीकडे कधी त्या विचार करत नाहीत . जन्मोजन्मी हाच नवरा मिळूदे म्हणून स्वतःहून स्त्री जन्म मागून घेतात . जन्माच्या फेर्यातून सुटण्याचा विचार करत नाहीत . आणि वेद हे ह्या मुक्तीसाठी आहेत . तेव्हा त्यांनी वेदांच्या नादी नं लागता सरळ व्रतवैकल्य करत बसावं .व्रतवैकल्य हि फक्त प्रापंचिक सुखासाठी असतात . कधी भजन , कीर्तनाला गेल्या तर गप्पाच मारत बसतील , वातीच वळत बसतील नाहीतर भाजी निवडत बसतील . ईश्वरप्राप्ती कडे त्यांचं लक्ष सुधा नसतं .मंत्र जप करण्यात स्त्रियांचं लक्ष कधीही केंद्रित होत नाही म्हणून त्यांना मंत्र दीक्षा देवू नये असं धर्म सांगतो . पण हे नियम जिला ईश्वरप्राप्तीची किवा मोक्षाची आस लागलीये तिला लागू होत नाहीत . बघा ना . गार्गी , मैत्रेयी वेदपठण करायच्या . अजूनही स्त्रिया करत असतील . जालिंदरनाथांनी मैनावती आणि तिची मुलगी चंपावतीला नाथपंथाची मंत्रदीक्षा दिली होती . एवढे मोठे रामकृष्ण परमहंस . त्यांना परमहंस पदाला पोचवणारी त्यांची गुरु 'भैरवी ब्राह्मणी' नावाची स्त्री होती . तिने त्यांना योगातल्या अत्यंत गूढ रहस्यांची दीक्षा दिली होती . तेव्हा स्त्रीनं व्रतवैकल्य करावीतच असा धर्माने काही आदेश दिलेला नाही .
  • Log in or register to post comments

तसं तर मग पुरुषांबाबतही

यशोधरा
Fri, 08/28/2015 - 13:45 नवीन
तसं तर मग पुरुषांबाबतही म्हणता येईल. विचार करुन पहा. दुसरं म्हणजे हा प्रतिसाद पहिल्या प्रतिसादाला contradict कर्तो आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तरही हे नव्हे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

समाजाने त्यांचं त्यांचं -

तुडतुडी
Fri, 08/28/2015 - 17:38 नवीन
समाजाने त्यांचं त्यांचं - स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं असतं का?
हाच प्रश्न आहे ना . अर्धा समाज स्त्रियांनीच तर बनलेला असतो कि . आणि अश्या काही स्त्रीयांमुळे बाकीच्या स्त्रियांना सुधा त्याचा त्रास सहन करावा लागतो . जास्त मनाला लावून घेवू नका हो . मी पण स्त्रीच आहे आणि अर्थातच स्त्री च्याच बाजूने असणार . पण काही स्त्रिया खरंच …… जावूदे
  • Log in or register to post comments

लैईच भारी!

यशोधरा
Fri, 08/28/2015 - 18:44 नवीन
अच्छा, ओके, ओके! म्हणजे अर्ध्याच समाजाला चुकीची दिशा दाखवतात होय ह्या बायका? बरं बरं. मग त्यांना पार्शल म्हणूयात की बॅलन्स ठेवतात एकूण समाजाचा, असं म्हणूयात? म्हणजे अर्धा समाज चुकीच्या दिशेने (स्त्रियांवाला) आणि अर्धा समाज योग्य दिशेला (पुरुषवाला?), असं होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

आपण त्यांचं घर उन्हात बांधू

सूड
Fri, 08/28/2015 - 20:44 नवीन
आपण त्यांचं घर उन्हात बांधू हा तुडतुडीतै/दादा!! आता तुडतुडणं थांबवा बघू. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा