✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित स्त्रियांचे कोकीळा व्रत

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 08/24/2015 - 22:31  ·  लेख
लेख

सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते. अधिक आषाढ महिना संपून निज आषाढातील पोर्णिमा येईल तेव्हा सुरू करून श्रावण पौर्णिमे पर्यंत करावे लागते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहेे.

हे व्रत विवाहित स्त्रिया करू शकतात. हे व्रत केल्याने स्त्रियांनां दीर्घकाळ सौभाग्य, घनवृद्धि, व सॆतंतीसौख्य व इतर प्रपंचातील सुखे प्राप्त होते. व्रत महिनाभराच्या पुण्यकाळात कुणी महिनाभर, कुणी 3 दिवस, कुणी 1 दिवस करतात. हे व्रत ब्रह्मर्षी वसिष्ठ मुनींनी शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमाला हिला सांगितले.

कोकीळा व्रताची कहाणी: ब्रह्मदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती,, त्याला 101 कन्या होत्या. जेष्ठ कन्या दाक्षायणीचा शंकराशी, 27 कन्या चंद्राला व इतर कन्यांचे विवाह इतर देवांशी करून दिले. दक्षाला पुत्र नव्हता म्हणून कपीलमुनीनूी त्यास पुत्रकामेष्टि यज्ञ करण्यास सुचविले. दक्षाने मग एका विशाल मैदानात यज्ञाची सिद्धता केली. दक्षाने सर्व देवांना, ऋषिनां आमंत्रणे पाठविली, पण शंकराला मात्र वगळले कारण दक्षाला शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे.

यज्ञाच्या वेळी सर्व देवांनी दक्षाला शंकराच्या अनुपस्थितीविषयी विचारले तेव्हा त्याने शंकराला बोलावण्यास स्पष्ट नकार दिला. मग यज्ञाला आरंभ झाला, पण नारदमुनी (कळलावे) तिथून थेट कैलासावर आले व दक्षाच्या यज्ञाचे रसभरीत वर्णन सांगितले. ते ऐकून शंकर शांत बसले पण दाक्षायणीला मात्र आपल्या वडिलांनी सर्वांना बोलावले पण शंकराला बोलावले नाही याचा राग आला. (बायकांना आपल्या नवर्याला माहेरी बाेलावले नाही तर फार राग येतो.)

शंकराने गणपती, शिवगणांचे सैन्य, वाहन नंदी यांना दाक्षायणी सोबत माहेरी पाठवले. तेथे यज्ञ धुमधडाक्यात चालला होता, तेथे वडिल व आईने तिच्याकडे दुर्लक्ष केले, हे दाक्षायणिला जिव्हारी लागले. तिने रागाने कुणाला काही कळण्याआधी यज्ञकुंडात उडी घेतली. अग्नीने काही क्षणातच तिची आहुती घेतली. सर्वजण स्तंभीत झाले. काही वेळाने सर्व भानावर आले. सर्वत्र हाहा:कार माजला. नारद गुपचूप निघून कैलासावर गेले व त्यानी शंकराला सर्व सांगितले.

हे ऐकूण शंकर ताडकन उठले व रागारागाने आपल्या जटा एका शिळेवर आपटल्या. त्या क्षणी तिथे एक विराट पुरूष (वीरभद्र) प्रगटला. शंकराने त्याला आज्ञा केली सर्व सैन्यानिशी तेथे जाऊन यज्ञाचा विध्वंस करा तसेच सर्व निमंत्रितांचा संहार करून दक्षाला मृत्युदंड द्या

वीरभद्र त्वरेने मोठ्या सेनेसह यज्ञस्थळी पोहचला. त्याने हल्ला सुरू केला, सर्व देवांनी व ऋषि-मुनींनी वेदमंत्रांनी दर्भ शक्तीयुक्त करून प्रतिकार केला. वीरभद्राने व त्याच्या सैन्याने भयानक संहार केला, वीरभद्राने तलवारीने दक्षाचे मुडंके छाटून यज्ञात फेकले.

बह्मा, विष्णू व नारदाने वीरभद्राने केलेला संहार सांगून वीरभद्राला शांत करण्यास सांगितले. तेव्हा शंकर उठले व यज्ञभूमीवर आले व सर्वांना जिवंत केले. बह्माने आपला पुत्र दक्षाला जिवंत करण्याची पार्थना केली. शंकराने त्याचे मुंडके आणण्यास सांगितले पण ते यज्ञात जळून खाक झाले होते. मग कोणतेही शिर आणा असे शंकर म्हणाले. तेव्हा जवळ पडलेले बोकडाचे मुंडके दक्षाच्या मानेवर ठेवले व त्याला जिवंत केले.

नारदाने दाक्षायणिला (शंकराची पत्नी) जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकराने सांगितले की तिचे दर्शन तुम्हाला घडवितो परंतु तिचे शरीर नसल्यामुळे ती पुर्नजीवित होणार नाही. असे म्हणून यज्ञकुंडातील राख हवेत फेकली तेव्हा दाक्षायणी प्रगटली. तिने हात जोडून शंकराची क्षमा मागितली. परंतु शंकर म्हणाले, प्रिये रागाच्या भरात तुझ्याकडून आत्महत्या व यज्ञाचा अपमान हे दोन अपराध घडले. त्याचे फळ अटळ असल्यामुळे पुढील दहा हजार वर्ष तुला काळ्या रंगाची व कुरूप पक्षिणी व्हावे लागेल.

दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील. शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
33985 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

अर्रर्रर्रर्र

अभ्या..
Tue, 08/25/2015 - 19:32 नवीन
अर्रर्रर्रर्र आता 'गावगाड्यातला वतनदारांचा रोल" यावर टाका एखादा धागा. तिथे तरी माहीती द्याल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

या धाग्यात कोणती माहिती

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 23:48 नवीन
या धाग्यात कोणती माहिती पाहिजे होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अभ्याजी तुम्ही फारच खोचक

हेमंत लाटकर
Wed, 08/26/2015 - 00:22 नवीन
अभ्याजी तुम्ही फारच खोचक बोलता बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रसाद खाल्ला नाही म्हणून

सूड
Tue, 08/25/2015 - 15:03 नवीन
प्रसाद खाल्ला नाही म्हणून सत्यनारायण बोट बुडवतो म्हणे!
बघा, देवासारखा देव प्रसादात बोट बुडवतो. लहानपणी कोणाला पाणी देताना चुकून त्यात बोट बुडालं; तर घरचे लोक मोठे डोळे करुन बघत असत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाव बुडवायचे धंदे

अभ्या..
Tue, 08/25/2015 - 19:33 नवीन
नाव बुडवायचे धंदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

.

कवितानागेश
Wed, 08/26/2015 - 10:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

प्रसाद खाल्ला नाही म्हणून

हेमंत लाटकर
Fri, 08/28/2015 - 11:04 नवीन
प्रसाद खाल्ला नाही म्हणून सत्यनारायण बोट बुडवतो म्हणे! मला लहान असताना सत्यनारायणाची भीतीच बसली होती! असे म्हणण्याचा उद्देश घरात काही पुजा केली तर प्रसाद न खाणे म्हणजे पुजेचा व श्रद्धेचा अपमान करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरेच्चा!

पैसा
Fri, 08/28/2015 - 11:43 नवीन
तुम्हाला आवडते तर तुम्हीपूजा करा ना! आणि मला पण बोलवा प्रसादाला. मला प्रसादाचा शिरा खूऊऊऊप्प्प्प्प आवडतो. पण "तू शिरा खाल्ला नाहीस तर बुडशील" असे सांगितले तर लहान मुले घाबरणारच ना! आता काय मी तेवढी लहान नाय्ये. मला पूजा बघायला आणि अत्रुप्त बुवांच्या रांगोळ्यासुद्धा लै अवडतात. मात्र मी पूजा करतो तू २५ जणांचा स्वयंपाक कर म्हटलंत तर मात्र नै अवडणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

अच्चा, मंजे प्रसाद म्हणून

बॅटमॅन
Fri, 08/28/2015 - 12:53 नवीन
अच्चा, मंजे प्रसाद म्हणून बेचव गोष्ट गळ्यात मारण्याची ट्याक्ट आहे तर! आवडले बरं का. (लहानपणी शिकरण खाऊन ओकायच्या घाईला आलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

म्हणून तू पक्षिणी जरी झालीस

थॉर माणूस
Tue, 08/25/2015 - 14:10 नवीन
म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील
इथे जरा लॉजिक गंडलं असं वाटत नाही काय? च्यायला, हे बरंय... गायला तर ती कोकीळा आणि चावली तर तो डास? ह्यो अन्याव हाय म्हाराजा.
  • Log in or register to post comments

सगळच गंडलय.

ऋतुराज चित्रे
Tue, 08/25/2015 - 15:48 नवीन
इथे जरा लॉजिक गंडलं असं वाटत नाही काय? सगळंच गंडलय. दाक्षायणिने शंकराच्या उ:शापाला फाट्यावर मारले, मस्तपैकी पक्षिणी होऊन चॉकलेटी व पांढर्‍या रंगाच्या ठिपक्यांची साडी नेसून नराला काळा कोट घालून गात बसायला लावले.पुरावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

दाक्षायणीला का शाप?

समीरसूर
Tue, 08/25/2015 - 14:26 नवीन
दाक्षायणीला का शाप? तिने बिचारीने शंकराचा अपमान झाला म्हणून यज्ञकुंडात उडी घेतली आणि शंकराने तिलाच व्हिलन ठरवून दहा हजार वर्षांचा शाप दिला? शाप यज्ञ ज्यांनी केला आणि शंकराला बोलावले नाही त्यांना दिला असता तर एक वेळ शंकराचं फ़्रस्ट्रेशन म्हणून खपवून घेता आले असते. टिपीकल भारतीय नवर्यासारखाच वागला की शंकर...काहीही झाले की बायकोवर राग काढायचा...ये बात कुछ हजम नाही हुई. आणि जटा शिळेवर आपटल्या???? ही कोणती राग व्यक्त करण्याची पद्धत? आणि शंकराला राग नेमका कसला आला? बायको भस्म झाल्याचा? की ज्यांनी यज्ञ केला त्यांचा? कन्फ्युजन है भाई. या कथेत शंकर स्वत:चे डोके अजिबात चालवत नाही. याने-त्याने जे सांगितले त्यावर विश्वास ठेवून आकांड-तांडव करतो. तो नेमका कुणाच्या बाजूला आहे हेच कळत नाही. पुत्रकामेष्टी यज्ञ - हेच पुत्र होण्याचे खूळ अजून उतरत नाही. स्त्री जणू दुय्यम, दासी, नाईलाजाने वाढवलेला जीव ही रोगट विचारांची लागण असल्याच बिनबुडाच्या कथांमुळे जास्त रुजली. ज्या नारदमुनीमुळे हे सगळे घडले ते नामानिराळे! शंकराला हे समजले नाही? बिचारी दाक्षायणी हकनाक बळी गेली कारण ती एक अबला आहे, स्त्री आहे. "कोणतेही शीर आणा". शंकराला एखाद्या मृत माणसाला जिवंत करता येते, एक शीर नाही मिळवता येत? आणि तमाम दुनियेला जिवंत करता येते, दाक्षायणीला नाही जिवंत करता येत. थोडा विचार केला तर लक्षात येईल; या कथेला किती अर्थ आहे ते. एक मनोरंजन करणारी कथा म्हणून जरी बघायचे म्हटले तरी या कथेला काही आकार असल्याचे जाणवत नाही. नुसताच थयथयाट! एखाद्या बी ग्रेड सिनेमासारखा! आपण या असल्या कथांमधून लवकर बाहेर पडायला पाहिजे. बाकी व्रत-बीत किती महत्वाचे हे ज्याचे-त्याने ठरवायचे.
  • Log in or register to post comments

आता लगेच तुम्ही हिंदूद्वेष्टे

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 14:39 नवीन
आता लगेच तुम्ही हिंदूद्वेष्टे, संस्कृतीद्वेष्टे असल्याचे प्रतिसाद येतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

या कथा भगवान शंकरांनी तरी

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 14:45 नवीन
या कथा भगवान शंकरांनी तरी नाहीत ना लिहिल्या? ज्यांनी लिहिल्या त्यांना दोष देणे सोडून हिंदू धर्मात अत्यंत प्रमुख देवता असणार्या भ. शंकरांचा इतका अपमानकारक उल्लेख कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

तो कथालेखकाचाच दोष नाही का?

बॅटमॅन
Tue, 08/25/2015 - 14:47 नवीन
तो कथालेखकाचाच दोष नाही का? त्यांनी हिंदू धर्मात अत्यंत प्रमुख देवता असणार्या भ. शंकरांचा इतका अपमानकारक उल्लेख कशासाठी केला? त्यांना शिव्या घालायलाच पाहिजेत. इतकेही साधे कळत नाही म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

=))

अजया
Tue, 08/25/2015 - 14:49 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अजिबात अपमानकारक नाही

समीरसूर
Tue, 08/25/2015 - 15:05 नवीन
अजिबात अपमानकारक उल्लेख नाहीये. कृपया याला देवतांचा अपमान, धार्मिक भावना दुखावणे वगैरे ठेवणीतला रंग देऊ नये. शंकराविषयी मी जे लिहिले आहे ते कथेतील पात्ररचनेच्या आणि त्या पात्राच्या वागणुकीच्या संदर्भात लिहिले आहे. देवाचा अपमान माझ्यासारखा टिनपाट माणूस करू शकत नाही. इन फ़ेक्ट कुणीच करू शकत नाही. आज-काल धार्मिक कट्टरता इतकी का फोफावतेय? परवा पाषाण रस्त्यावर कार बाजूला थांबवून खाली सतरंजी टाकून १५-२० मिनिटे नमाज पढणारा २०-२१ वर्षांचा मुलगा पाहिला. ही धार्मिकता नक्कीच नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. पाच-पाच वर्षांच्या पोरांना कडक रोजे करतांना पाहून हसावे की रडावे कळत नाही. वीस वर्षांची तरुणी बुरखा घालू न देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमामुळे मेडिकलची प्रवेश परीक्षा बुडवते आणि एक वर्ष वाया घालवते???? हे काय आहे? उच्चशिक्षित डॉक्टर हॉटेलमध्ये हलाल मटण आहे की नाही याची चौकशी करूनच जेवण घेतो. देव ही आपण जे म्हणू ते ऐकणारी यंत्रणा नाहीये; देव ही सकारात्मक सामर्थ्य देणारी एक संकल्पना आहे हे कधी कळणार लोकांना? अमुक वेळेला नमाज नाही पढली तर देव शिक्षा करेल, अभिषेक नाही केला तर काहीतरी वाईट (किंवा केला तर चांगलं) घडेल, नवस केला तर मुलगा होईल...असं काहीही नसतं. असं कधीही होत नाही. श्रद्धा श्रद्धा म्हणून तरी असल्या गोष्टी किती काळ कवटाळून बसणार आहोत आपण? मूळ मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

समीरसूर साहेब. तुमची बाजू

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 15:10 नवीन
समीरसूर साहेब. तुमची बाजू समजली मला. पण माझं यावरचं म्हणणं नंतर मांडतो. आत्ता मोबाईलवर शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

आज-काल धार्मिक कट्टरता इतकी

सूड
Tue, 08/25/2015 - 15:16 नवीन
आज-काल धार्मिक कट्टरता इतकी का फोफावतेय? परवा पाषाण रस्त्यावर कार बाजूला थांबवून खाली सतरंजी टाकून १५-२० मिनिटे नमाज पढणारा २०-२१ वर्षांचा मुलगा पाहिला. ही धार्मिकता नक्कीच नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. पाच-पाच वर्षांच्या पोरांना कडक रोजे करतांना पाहून हसावे की रडावे कळत नाही. वीस वर्षांची तरुणी बुरखा घालू न देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमामुळे मेडिकलची प्रवेश परीक्षा बुडवते आणि एक वर्ष वाया घालवते???? हे काय आहे? उच्चशिक्षित डॉक्टर हॉटेलमध्ये हलाल मटण आहे की नाही याची चौकशी करूनच जेवण घेतो.
गल्ली चुकलासा जनू? ही कट्टरता पाळणारे समोर आले की आपण सर्वधर्मसमभावाचे गोडवे गातो हो!! कथेच्या बाबतीत मुद्दा पटला, पण कट्टरतेच्या बाबतीत नाही. आम्ही स्वमतांध दांभिक असल्याने देव मानतो, दिव्यांच्या अवसेला साग्रसंगीत पूजा करतो, अंबाबाईच्या देवळात धोतर नेसून जातो आणि जाताना कोणी शिवणार नाही याची काळजी घेतो आणि एवढं सगळं झालं की संकेतस्थळांवर कट्टरतेच्या नावाने गळे काढतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

वर्षा-दीड वर्षातून

समीरसूर
Wed, 08/26/2015 - 09:41 नवीन
मी वर्षा-दीड वर्षातून एखाद्या वेळेस देवळात जातो आणि ते देखील फिरायला जायचे म्हणून, तिथे जाउन मला हे दे, मला ते दे असे गळे काढायला मी जात नाही. मी ओक्टोबर २०१३ मध्ये मित्रासोबत देवळात गेलो होतो त्यानंतर थेट एप्रिल २०१५ मध्ये देवळात गेलो. ते देखील एक मित्र अमेरिकेतून आला होता आणि त्याला सारसबागेतील गणपतीचे दर्शन घ्यायचे होते म्हणून गेलो होतो. देवळात नेमाने जायचे आणि माणसांशी तुसडेपणाने वागायचे असला दुटप्पीपणा मला कधी झेपलाच नाही. सोवळे वगैरे प्रकार मी कधीच मानले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओ, का पेटवताय?

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 14:53 नवीन
ओ, का पेटवताय? शंकरान्नी स्वत:चा अपमान सहन केला आणि बायको अपमान झाल्यानं आत्महत्या करून मेली म्हणून राडा केला. शिवाय आत्ता लाइफ कोटा संपला लगेच लग्न होऊ शकत नाही म्हणून नंतर लग्न करु असं म्हणून सांगितलं (तसं ते केलं सुद्धा) दाक्षायणी चुकीचं वागली(आत्महत्या अधिक यज्ञ अपमान) म्हणून शिक्षा दिली, उगाच नाही. यात सुद्धा आज जेवायला अमुक नाही,मीठ जास्त वगैरे वैयक्तिक कारणं नाहीत. असो. मारलेल्या बाणाभोवती वर्तुळ काढायचं असल्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

दाक्षायणीला का शाप? तिने

हेमंत लाटकर
Tue, 08/25/2015 - 18:12 नवीन
दाक्षायणीला का शाप? तिने बिचारीने शंकराचा अपमान झाला म्हणून यज्ञकुंडात उडी घेतली आणि शंकराने तिलाच व्हिलन ठरवून दहा हजार वर्षांचा शाप दिला? हा शाप दाक्षायणिला शंकराने दिला नाही तिने आत्महत्या व यज्ञाचा अपमान केला म्हणून तिच्या कर्माचे तिला फळ मिळाले. आणि जटा शिळेवर आपटल्या???? ही कोणती राग व्यक्त करण्याची पद्धत? आणि शंकराला राग नेमका कसला आला? बायकोने यज्ञात उडी घेतली त्याला कारणीभूत ठरलेल्या सासर्याचा (दक्षाचा) राग आला. या कथेत शंकर स्वत:चे डोके अजिबात चालवत नाही. शंकराला असे होणार हे माहित होते पण विधीलिखित घडणारच. पण नारदालाच लईच घाई कळ लावण्याची. नवरा नेहमी बायकाेकडूनच असणार. ज्या नारदमुनीमुळे हे सगळे घडले ते नामानिराळे! शंकराला हे समजले नाही? यात नारदमुनीचा दोष काय त्यांनी फक्त बातमी पुरवली. शंकराने दाक्षायणिला जाऊ नको असे सांगितले. पण बायकांना माहेर म्हणले की जायचा अट्टाहास असतो. तिला वाटले वडिल आमंत्रण द्यायला विसरले असतील. पण तिथे गेल्यावर आई-वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे रागाने तिने यज्ञकुंडात अविचाराने उडी घेतली ही चुकी तिचीच. "कोणतेही शीर आणा". शंकराला एखाद्या मृत माणसाला जिवंत करता येते, एक शीर नाही मिळवता येत? दाक्षायणिने यज्ञकुंडात उडी घेतली आणि तिची राख झाली. शीर आणि धड नसल्यामुळे शंकर तिला कसे जिवंत करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

यज्ञाचा अपमान म्हणजे नेमके काय?

समीरसूर
Wed, 08/26/2015 - 09:51 नवीन
यज्ञाचा अपमान म्हणजे नेमके काय? पतिदेवाच्या अपमानाने व्यथित होऊन जर एखाद्या पतिव्रतेने प्राण त्यागले तर हे उलट चांगले कर्म झाले ना? शंकराने तर उलट खुश होऊन तिला वर द्यायला हवे होते. यज्ञात आहुतीच जात असते. मनुष्यदेहाची आहुती तर अधिक चांगली मानली जायला हवी. दाक्षायणीने उलट यज्ञाचा सन्मान वाढवला आहे असे त्याकाळातील प्रचलित समजुतीनुसार माझे ठाम मत आहे. सासर्याचा राग आला तर बायकोला का शिक्षा? जो देव मृत माणसाला जिवंत करू शकतो त्याला सगळं आपोआप कळलं पाहिजे; नारद हवाच कशाला कळ लावायला? नारदाने जर शंकराची समजूत काढली असती आणि सांगतांनाच शंकराचे कान भरल्यासारखे सांगून तेल ओतले नसते तर हा सगळा तमाशा घडलाच नसता. अरे वा, कुठलेही धड लावून माणूस जिवंत करता येतो, शरीर नसतांना माणूस जिवंत नाही करता येत. हे काय गौडबंगाल? काहीतरी लॉजिक आहे का यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

यज्ञ चालु असतांना त्यात

हेमंत लाटकर
Wed, 08/26/2015 - 12:03 नवीन
यज्ञ चालु असतांना त्यात दाक्षायणीने आत्महत्या केली. म्हणजे यज्ञाचा भंग केला. येथे आमंत्रण न मिळाल्याने शंकराचा अपमान झाला होता, पण त्यांनी ते मनावर घेतले नाही. दाक्षायणिला समजावून सांगितले पण तिने जाण्याचा हट्ट केला. तेथे गेल्यावर आई-वडिलांनी दाक्षायणीकडे दुर्लक्ष केले हे तिला जिव्हारी लागले व अविचारानेे यज्ञात प्राणाची आहुती दिली. यात तिचा दोष असल्यामुळे त्याची शिक्षा तिला काळी व कुरूप पक्षिण व्हावे लागले. (हा शाप शंकराने दिला नाही तर तिच्या कर्मामुळे मिळाला. उलट शंकराने तिला उ:शाप दिली काळी कुरूप पक्षिण झाली तरी कोकीळसारखा ेगो़ड आवाज दिला. (ती कोकीळ/कोकीळा होती माहित नाही.) आणि अधिक अाषाढ मध्ये ज्या स्त्रियां कोकीळा व्रत करतील त्यांना सौभाग्य व इतर प्रापचिक सुख मिळतील असे सांगून तिला मानसन्मान मिळवून दिला. तसेच 1000 वर्षानंतर हिमालयाची पत्नी मैनावतीच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेशील व हरितालिका व्रत केल्याने माझ्याशी विवाह होईल असे आश्वासन (राजकारण्यांसारखे नाही) दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

अगदी सहमत.बी ग्रेडी सिनेमा!!

अजया
Tue, 08/25/2015 - 14:36 नवीन
अगदी सहमत.बी ग्रेडी सिनेमा!!
  • Log in or register to post comments

गोष्ट सांगण्याची हातोटी आवडली

तुडतुडी
Tue, 08/25/2015 - 17:10 नवीन
गोष्ट सांगण्याची हातोटी आवडली नहि. मुळ गोष्ट वेगळी आहे . कंसातले उगीचच मारलेले टोमणे (स्त्रियांना आणि नारदांना ) आवडले नाहीत . दाक्षायानी कोकिळा झाली असंहि कुठं कधी वाचण्यात आलं नाही . सतीचं जळालेलं शरीर घेवून शंकर फिरत होते तेव्हा त्यांना त्यातून बाहेर आणण्यासाठी विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्या शरीराचे ५२ तुकडे केले . ते जिथे जिथे पडले ते शक्तीपीठात रुपांतरीत झालं . तसंच कोकिल व्रताचा उपवास सोडताना कोकिळेचा आवाज ऐकून सोडायचा असतो . आता कुठं तो आवाज ऐकू येणार ;-)
  • Log in or register to post comments

दिलेल्या कथेचा आणि कोकीळ

थॉर माणूस
Tue, 08/25/2015 - 17:10 नवीन
दिलेल्या कथेचा आणि कोकीळ व्रताचा संबंध कळला नाही. हे व्रत शंकराने दाक्षायणिला करायला सांगितले असं काही नाही किंवा दाक्षायणिने स्वतः केले असं काही नाही. तिचा कोकीळ झाला आणि दहा हजार वर्षांनी पुन्हा स्त्री रुपात जन्म झाला. यात व्रत आणि त्याचा विधी कुठे आला? हे व्रत महाराष्ट्र सोडून इतर कुठल्या कुठल्या राज्यांमधे दिसते? बरं ही येवढी हाणामारी घडण्याला कारण असलेले नारदमुनी सहिसलामत सुटले राव... ये नाइंसाफी हय.
  • Log in or register to post comments

आजकाल मिडिया एखाद्या छाेट्या

हेमंत लाटकर
Wed, 08/26/2015 - 00:02 नवीन
आजकाल मिडिया एखाद्या छाेट्या गोष्टीचा इतका इशु करते मिडियाला कोणी जबाबदार धरत नाही. नारद सगळ्या देवांनां बातमी पुरवणारे माध्यम असल्यामुळे त्यांची काही चुक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस

हाच का तो

मार्मिक गोडसे
Wed, 08/26/2015 - 10:42 नवीन
हाच का तो बेरक्या नारद ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

दाक्षायणिने उ:शाप मागितला

प्रचेतस
Tue, 08/25/2015 - 17:27 नवीन
दाक्षायणिने उ:शाप मागितला तेव्हा शंकर म्हणाले तुला पश्चाताप झाला आहे म्हणून तू पक्षिणी जरी झालीस तरी गोड आवाजाची कोकीळा होऊन सदैव नंदवनात विहार करतील.
गोड आवाज कोकिळा नाय करत तर कोकिळ करत असतो.
शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल
मेनका नै हो. ती मेना. अप्सरा लग्न करत नसतात.
  • Log in or register to post comments

मस्तच प्रचेतसजी!

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 17:32 नवीन
मस्तच प्रचेतसजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अप्सरा लग्न करत नसतात.

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 17:56 नवीन
अप्सरा लग्न करत नसतात.
अप्सरांची हीच गोष्ट आपल्याला जाम आवडते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पण त्या अजिंक्य राहत नाहीत

अभ्या..
Tue, 08/25/2015 - 19:35 नवीन
पण त्या अजिंक्य राहत नाहीत म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बरोबर आहे पोथी मध्ये नावाची

हेमंत लाटकर
Wed, 08/26/2015 - 00:08 नवीन
बरोबर आहे पोथी मध्ये नावाची चुक झाली. हिमालयाची पन्ती मेनावती होती तिच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. तिने हरतालिका व्रत केल्यामुळे तिचा विवाह शंकराशी झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कुहु कुहु

इरसाल
Tue, 08/25/2015 - 17:38 नवीन
कुहु कुहु !
  • Log in or register to post comments

जेपीराजे ५० होत आले.

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 17:43 नवीन
जेपीराजे ५० होत आले. सत्काराला या!!!
  • Log in or register to post comments

बरच ठावुक आहे वो तुमाला.

जेपी
Tue, 08/25/2015 - 17:51 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांना कोकीळा व्रताची पोथी* देऊन सत्कार करण्यात येत आहे. शुभेच्छुक- जेपी आणी तमाम देवलसीकर्मकांडी कार्यकर्ते. *पोथ्या पोत्यात भरुन गुर्जीकडे ठेवल्या आहेत.घेऊन जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

धागालेखकाला खरेच व्रताचा

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 19:41 नवीन
धागालेखकाला खरेच व्रताचा महिमा पावला. चक्क ७१ प्रतिसाद. धन्य ते कोकिळा व्रत!
  • Log in or register to post comments

कर्मकांड -- एक वेगळा विचार

सुबोध खरे
Tue, 08/25/2015 - 19:46 नवीन
कर्मकांड -- एक वेगळा विचार कर्म कांडावर माझा मुळीच विश्वास नाही. मी रोज पूजा सुद्धा करत नाही. मी कर्मवादावर विश्वास ठेवतो. (स्वतःचे काम प्रामाणिक पणे करणे हि देवाची पूजा आहे) परंतु कर्मकांडाचे मानवी जीवनात एक नक्की स्थान आहे. माणूस जेंव्हा संकटात सापडतो आणी त्याची मती कुंठीत होते तेंव्हा त्याला एक मानसिक आधार लागतो. कितीही सज्जन माणूस असेल तरीही त्याच्या वर संकटे येतातच. आपले आईवडील किंवा भावंडं किंवा मुलं केंव्हा तरी आजारी पडतातच त्यातून एखादा आजार जास्त गंभीर असेल अशावेळेस माणूस उत्तमत उत्तम डॉक्टर पाहतो परंतु बर्याच गोष्टी डॉक्टरच्या हातात नसतात अशावेळेस पूजा करणे, यज्ञ करणे, दान देणे( ज्याचा अशा आजाराशी अजिबात संबंध नसतो) अशा गोष्टीनी त्या माणसाला एक मानसिक आधार मिळतो. यामुळेच सर्वच्या सर्व धर्मात कर्मकांड आहेच. साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा केल्याने एखाद्या माणसाला मानसिक समाधान मिळते किंवा आपण अमुक तमुक व्रत केल्याने आपल्या नवर्याला दीर्घायुष्य लाभेल म्हणून व्रत करणारी स्त्री तिच्या कर्मकांडाची थट्टा करणे चुकीचे आहे. मानवी जीवन हे अस्थिर आहे. पुढच्या क्षणाला काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही मग अशा दोलायमान परिस्थितीत मनाची समजूत काढणे किंवा मानसिक शांती मिळवणे यासाठी एखादा माणूस कर्मकांडाचा आधार घेत असेल तर त्या चूक नाही. मानसिक तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी दारू पिणारे लोक काय कमी आहेत का? आर्ट ऑफ लिव्हिंग ला जाणारे किंवा विपश्यना करणारे सुद्धा शेवटी मानसिक शांतीच्याच शोधात असतात. पण ते इंग्रजीत बोलले कि कसे अद्ययावत किंवा सॉफिस्टीकेटेड वाटते. गटारीला दारू प्याय्लीच पाहिजे आणी सामिष खाल्लेच पाहिजे आणी श्रावणात मी सामिष खात नाही, मंगळवारी किवा गुरुवारी मी मास मटण खात नाही हे अभिमानाने हे सांगणारे लोकही कर्मकांडच पाळत असतात. रमजान मध्ये रोजा पाळणारे किंवा पर्युशन करणारे जैन लोक पण कर्मकांडाचा आधारच घेत असतात. मी मागे एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे आपण सारे जण दांभिक आहोत. आपल्या जावयाने घेतले कि "ड्रिंक" आणी मोलकरणीच्या नवर्याने प्यायली कि "दारू". तसेच एखादी सवाष्ण जर मनोभावे पूजा/व्रत करीत असेल तर ते कर्म कांड पण आपण श्रावण पाळला तर तो स्वतःचा मनावरील "ताबा"( सेल्फ कंट्रोल). दुसर्याच्या कर्मकांडाचा आणी श्रद्धेचा गैरवापर करणे/ बाजार मांडणे हि अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मग ती पौरोहित्य करणाऱ्या गरीब( शहरात आता ते तसे गरीब राहिलेले नाहीत) माणसाने केली काय किंवा श्रद्धेचा बाजार मांडून आपली पोळी पिकवणार्या राजकारण्याने केली. अमुक तमुक चा राजा म्हणून ठणाणा बोम्बल्या( लाउड स्पीकर) लावून भव्य उत्सव काय किंवा दहा थरांची दहीहंडी काय? इफ्तार पार्टीचे आयोजन करणे काय? त्यावर बंदि घालायची भाषा करा लगेच आमच्या धार्मिक बाबतीत ढवळा ढवळ म्हणून कोल्हेकुई होते कि नाही? हि स्वतःची पोळी पिकवणारीच डांबरट माणसे आहेत ना? मी जेंव्हा माझा दवाखाना सुरु केला तेंव्हा माझ्या मित्रांनी काही रुग्ण पाठविले होते त्यांच्याशी बोलताना त्यांना काहीही झालेलं नाही हे मला दिसत असल्याने तुम्हाला सोनोग्राफीची गरज नाही असे सांगून मी परत पाठवले होते ( आणी त्याचे मला सात्विक समाधानहि वाटले होते) पण माझ्या मित्राने मला स्पष्ट सांगितले कि जसे तुझ्या सोनोग्राफीमध्ये काही आजार निघाला तर त्यचा फायदा आहे तसा सोनोग्राफी नॉर्मल आहे याचा पण एक प्रचंड फायदा आहे. रुग्णाला स्वतःला मानसिक शांतता मिळते आणी माझ्यासारख्या डॉक्टरला आपल्याकडून काही राहून जात नाही ना याची खात्री होते. मग तू त्याला कर्मकांड समजत असशील तरी चालेल. यामुळे माझेही डोळे उघडले. (बर्याच वेळेस आपल्या वृद्ध आई किंवा वडिलांना पोटात दुखते आहे त्याच्या सर्व तपासण्या करून काही गंभीर आजार नाही हे ऐकल्यावर होणारे मानसिक समाधान किती आहे याचा मी सुद्धा अनुभव घेतला आहे). कर्मकांड जोवर प्रमाणाबाहेर जाऊन तुमचे आयुष्य व्यापून टाकत नाही तोवर ठीक आहे अर्थात हि मर्यादा स्वतः ने घालून घेणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद डाॅक्टर साहेब. तुम्ही

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 19:57 नवीन
धन्यवाद डाॅक्टर साहेब. तुम्ही नेमके विश्लेषण केलेत या कर्मकांडामागच्या मानसिकतेचे. ज्यांची आयुष्ये अत्यंत खडतर आहेत अशांना नक्कीच फायदा मिळतो अशा उपायांचा. देव देवता यंत्र मंत्र तंत्र यांचे तेच प्रयोजन आहे. आपली मानसिक शक्ती एकत्र होऊन नक्कीच फरक पडतो परिस्थितीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मांत्रिक साहेब

सुबोध खरे
Tue, 08/25/2015 - 20:17 नवीन
मांत्रिक साहेब आयुष्यात सर्वांच्या चढ उतार हे येतातच. त्यावेळी मानसिक आधार देणारे कुणीतरी लागते. कुणी जर कर्मकांड करून तो मिळवत असेल तर त्यात फार चूक आहे असे मी मानत नाही. कर्मकांड म्हणजे शेवटी काय एखादी गोष्ट बुद्धीला पटत नाही किंवा ज्याचे आपल्याला विश्लेषण देता येत नाही किंवा ज्या बद्दल ज्ञान नाही त्याचे काय करावे हे आपल्या मतीचा बाहेर असते त्याबद्दल एखाद्या मोठ्या शक्तीला शरण जाणे. आणी अशी भक्ती करून आपले भले होईल असा आशावाद बाळगणे. ज्यामुळे कुणाचे नुकसान होत नाही अशा गोष्टी करून जर कुणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्यात काय चुकीचे आहे? आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे हे चुकीचे आहे. यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी अक्खा दिवस रस्ता बंद करणे किंवा नमाजासाठी रस्ता अडवणे हे एकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे

मांत्रिक
Tue, 08/25/2015 - 20:20 नवीन
आपले कर्मकांड दुसर्यावर लादणे हे चुकीचे आहे. यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी अक्खा दिवस रस्ता बंद करणे किंवा नमाजासाठी रस्ता अडवणे हे एकच आहे. हां डाॅक्टर साहेब, या मुद्दयाबाबत कुणीच आक्षेप घेणार नाही. असे थिल्लर उत्सव करून आपण त्या देवतेलाच कमीपणा आणतो हेच अनेकांच्या लक्षात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

यात घोळ कुठे होत आहे?

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 20:30 नवीन
यात घोळ कुठे होत आहे? ट्रस्ट्सच्या लोकांनी स्वत: पदरमोड न करता इतरांच्या देणग्यांवर आपापल्या आराशी उभारल्या आणि डॉल्बी आणल्या. ट्रस्ट चे पदाधिकारी कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित. राजकारण, व्यवहार आला की विषय देव धर्माच्या बाहेर गेला असं खुशाल समजावं आणि तिथे अजिबात पाया पडायच्या भानगडीत पडू नये. मेरे अल्पसंख्यांक भाईयोंके बारे में क्या बताए??? रहनेच दो|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

डाॅक्टर छान सांगितले.

हेमंत लाटकर
Wed, 08/26/2015 - 00:17 नवीन
डाॅक्टर छान सांगितले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, आपला विचार पटला.

समीरसूर
Wed, 08/26/2015 - 09:29 नवीन
डॉक्टरसाहेब, आपला विचार पटला. सकाळी केलेली पूजा घरदार प्रसन्न करून जाते आणि त्यातून मानसिक समाधान आणि स्थैर्य लाभते हे नक्की. शेवटी हा मनाचा खेळ आहे. हेच समाधान जर कुणी नुसते हात जोडून मिळवत असेल तर ते ही तितकेच महत्वाचे. हे मानसिक बळ मिळवणे याबद्दल दुमत नाहीच; असल्या कथांमधून आणि व्रतांमधून पुत्रप्राप्ती म्हणजेच श्रेष्ठ संतानप्राप्ती, कन्याप्राप्ती म्हणजे कनिष्ठ संतानप्राप्ती वगैरे भयंकर विचार रुजतात आणि फोफावतात. आपल्या समाजात अजूनही जे मुलींना गर्भातच मारण्याचे जे भयंकर प्रकार घडतात त्याचे मूळ अशा कथा आणि अशी कर्मकांडे फोफावल्यामुळे घडतात. कर्मकांडांच्या अशा विघातक परिणामांना आक्षेप आहे. आणि त्यासाठी कर्मकांडेदेखील डोळे आणि सदसदविवेकबुद्धी दोन्ही टक्क उघडे ठेवून करणे गरजेचे आहे. तसे होत नसेल तर आपले शिक्षण, अनुभव यांचे महत्व शून्य म्हणायला पाहिजे. अशा व्रतांमधून पुढे मग नरबळी वगैरे भयंकर प्रकार घडायला वेळ लागत नाही. देवाला प्रसन्न करून घेण्याच्या हव्यासापायी पशुबळी देणे, त्याचे मटण शिजवून प्रसाद म्हणून खाणे, कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी चेंगरा चेंगरी होऊन माणसे दगावणे, नद्यांना प्रदूषित करणे, दुष्काळ असतांना लाखो लोकांच्या शाही स्नानासाठी लाखो लिटर पाणी विनाकारण व्यर्थ दवडणे, वगैरे सगळ्या कर्मकांडांच्या अतिआचाराने प्रचलित झालेल्या नकारात्मक गोष्टी आहेत. राधे मां, आसाराम, सारथी बाबा (हा नवीन आहे; कृष्णजन्माष्टमीला हा स्त्रियांचे एकांतात स्तनपान करतो आणि त्याची कृपा रहावी म्हणून विवाहित, अविवाहित स्त्रिया, मुली त्याला बिनदिक्कत असे स्तनपान करू देतात) असल्या भोंदू लोकांचे कर्मकांडांविषयीच्या आपल्या हळव्या भावनेमुळे मस्त फावते. आणि ही हरामखोर मंडळी मग कोट्यावधी रुपयांची माया जमवून ऐशोआरामात राहते. दाराला कुलूप नीट लागले आहे की नाही हे बघण्यासाठी ते दोनदा-तीनदा खेचून बघणे आणि मनाचे समाधान साधणे निराळे आणि देवा-धर्माच्या बाबतीत नको त्या प्रथांना आणि कथांना मुभा देणे निराळे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

समीर सूर साहेब

सुबोध खरे
Wed, 08/26/2015 - 09:40 नवीन
समीर सूर साहेब मी म्हणालो तसे आपली सारी उदाहरणे श्रद्धेचा किंवा कर्मकांडाच्या बाजाराची आहेत.बाजार कुणी केला मग तो राजकारणी असो कि बाबा किंवा माताजी असोत अथवा पौरोहित्य करणारा भटजी असो.जोवर धर्माला घरात ठेवले जाते तोवर ठीक आहे. कोणतीही गोष्ट बाजारात आणली कि त्याचे अवमूल्यन झालेच. मग ती श्रद्धा असो कि कला असो कि पावित्र्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

विचार आवडला

नया है वह
Wed, 08/26/2015 - 17:25 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

>>>>>हे व्रत आषाढ शु 15 ते

प्यारे१
Tue, 08/25/2015 - 19:59 नवीन
>>>>>हे व्रत आषाढ शु 15 ते श्रावण शु 15 असे महिनाभर चालते आमच्या स्टाफ मध्ये बरेच उत्तरप्रदेश बिहार बंगाल आणि ओरिसा या राज्यामधले लोक आहेत. (मराठी कमीच्) या लोकांचा श्रावण आषाढ़ पौर्णिमा झाली की सुरु झाला आणि श्रावण पौर्णिमेला संपणार. आपण महाराष्ट्रात अमावस्येनंतरची प्रतिपदा ते अमावस्या असा महीना मानतो तर हे लोक पंधरा दिवस आधीच करतात. वर म्हटलेल्या तारखावरुन माझ्या मते हे कोकिला व्रत सुद्धा त्यांच्याकडे जास्त प्रचलित असावं.
  • Log in or register to post comments

असली बिनडोक व्रतवैकल्ये करून

तुडतुडी
Wed, 08/26/2015 - 12:34 नवीन
असली बिनडोक व्रतवैकल्ये करून आपणच आपल्या धर्माला कमीपणा आणतो आहोत. जरा उपनिषदे वाचावीत, थोडेथोडके नामस्मरण करावे ते सोडून असल्या मूर्ख गोष्टींना भाव देण्यात कुणाचाच फायदा नाही. (पुरोहितवर्ग सोडला तर - तुम्ही पुरोहितांचे प्रतिनिधी म्हणून बोलत असाल तर तुमचे म्हणणे मान्य कारण इन दॅट केस तुमचा प्रामाणिक स्वार्थ असेल.>>>+१११११११११११ सतीचं यज्ञात जाळून घेणं , ५१ शक्तीपीठं , पार्वतीने तपस्या करून शिवला प्राप्त करून घेणं , शंकरांनी ३ रा डोळा उघडून कामदेवाला जाळण , पार्वतीने तिच्या शरीराच्या उत्न्यापासून गणेशाला निर्माण करणं, गणेशाला हत्तीचं डोकं बसवणं, समुद्रमंथनातून १४ रत्न बाहेर येणं ह्या गोष्टी भौतिक जगात घडलेल्या नाहीत ओ . सामान्य माणसांना अध्यात्मिक रहस्य सहसा समजत नाहीत म्हणून ह्या अश्या कथा रचल्यात . त्यामागचं लॉजिक खूप थोड्या जनांना समजतं . गुरूचं वाक्य प्रमाण न मानता स्वताच्या मनानेच काहीतरी करणं, शिवप्राप्तीसाठी घाई करणं, मग त्यातून चुकीची साधना किवा यज्ञयाग करणं असलं काही केलं की कुंडलिनी चुकीच्या मार्गाने धावू लागते आणि मग साधकाचा सर्वनाश होतो . हे दाखवण्यासाठी ती सतीची कथा आहे . पार्वतीच्या(पार्वती म्हणजे साधकाच्या शरीरात असणारी आदिशक्ती कुंडलिनी ) कथेत योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती साधना करून शिवप्राप्ती होते हे सांगितलंय . कुंडलिनी आज्ञाचक्र ( तिसरा नेत्र ) भेदून पुढे जाते तेव्हा साधकाच्या कामवासनेचा कायमचा नाश होतो . ह्याला ऊर्ध्वरेता अवस्था असं म्हणतात (सामान्य लोक त्याला ३ रा डोळा उघडून कामदेवाला जाळण असं म्हणतात ). समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे . त्या प्रवासाचे डीटेल्स , ते हलाहल विष , ती १४ रत्न म्हणजे नेमकं काय ह्याचे डीटेल्स ज्ञानेश्वरीत वाचायला मिळतील . हि अशी बिनडोक व्रतवैकल्य (काही लोजिकल खरीखुरी व्रतवैकल्य आहेत ) करण्यात स्त्रियांना काय मजा येते समजत नाही मला . समाजाला चुकीच्या दिशेने नेण्यात स्त्रियांचा मोठा वाटा आहे
  • Log in or register to post comments

समुद्रमन्थानाचा अर्थ

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/26/2015 - 12:55 नवीन
समुद्रमन्थानाचा अर्थ कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासूनचा सहस्त्रारा पर्यंतचा प्रवास आहे. नाय हो, आमचा अभ्यास वेगळा दावा करतो... (ह घ्या. पण दावा पडताळून पाहण्यासारखा आहे खरा !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा