मंडळी आपुन समदे जन ल्हानाचे मोट्ये हुताना काय ना काय लै भारी चालुपणा करत मोटे जालेलो असतो. तुमी तुमच्या आविष्यात कंदी काय चहाटळपणा केला आसल, काय बाय चंमतगं क्येली आसल, कुनाची टोपी उडवली आसल तर त्ये समदे आणुभव लै भारी असत्याती बगा….
आमी तरी काय कमी हुतो म्हन्ता काय? लै इपितर सोभाव हुता पगा आमचाबी… येकदा तर लै भारीच गमजा केली बगा..
त्येचं आसं जालं बगा कालेजच्या पयल्या का दुसर्या सालात शिकत असताना आमी सोलापुरला इज्यापुर नाक्यापाशी रायचो बगा. रोजच्याला बसनं कालिजात जायचु. आपली ७ लंबरची सम्राट चौकापत्तुर जाणारी बस वो. आयटीयापाशी बसाचु आन थेट पांजरापोळ चौकात उतराचो.
एका दिशी काय जालं, आमच्या मागच्या शीटावर (म्हंजी बशीतल्या वो) दोन चिकण्या पोरी बसल्या व्हत्या. आता आमाला एक ले इचित्र सवय हाये बगा..
म्हंजी दिसलं देवाळ की जोड हात, दिसलं देवाळ की जोड हात !
पोरी जरा चालु व्हत्या, आमची खोड लक्षात आली आन त्येनी क्येलं की चालु चिडवाया. आमी देवाळ बगुन नमस्कार क्येला की त्याबी उटायच्या आन खिडकीत वाकुन नमस्कार कराच्या आन वर फ़िदी फ़िदी हासाच्या पण बगा. आमाले तर लैच कसंतरी वाटाया लागलं ना यार.
तेवड्यात काय जालं एका ष्टापवर बस थांबली. ष्टापकडं पायलं (ष्टाप कसला वो, खांबाला लटकवलेली पाटी नुसती) आमचीबी कळी खुलली (आयव मलाबी ते काव्याट्मक की काय ते लिवता अलं की)
तर ष्टापच्या म्हागं ध्यान ग्येलं आन आमी पटकनी हुबे रायलो आन झटकनी नमस्कार क्येला बगा..
तशा त्या पोरीबी हुब्या रायल्या आन त्येनी मी नमस्कार क्येला..
आता हासायची बारी आमची हुती… आमी लै (आक्षी रावणावानी) हासाया लागलो की द्येवानु…
बस हालली, पण हालता हालता पोरींना त्ये दिसलंच…
ज्येला आमी नमस्कार क्येला हुता त्यो एक बोर्ड हुता.
त्येच्यावर लिवलं व्हतं…
“सरकारमान्य देशी दारुचा गुत्ता”
पोरी अशा काय त्वांड करुन बसल्या की ज्याचं नाव त्ये! लै मजा आली राव…
तुमी बी क्येला आसलच की आसला चालुपना कंदी ना कंदी..
मंग सांगा की राव आमाला बी !
इरसाल म्हमईकर
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8007
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला
काय कर्नार द्येवा. समदं जग
In reply to मी पयला by दा विन्ची
जास नाय फकस्त.........
In reply to काय कर्नार द्येवा. समदं जग by विशाल कुलकर्णी
खिक्क
चालूगिरी!
हा हा हा
:)
देवळात पर्साद घ्याया न्याचं
+१
In reply to देवळात पर्साद घ्याया न्याचं by प्यारे१
वा !!
नको विशाल नको.
त्या आक्ख्या रोडवर म्हणजे
In reply to नको विशाल नको. by अभ्या..
त्ये कालिजात आस्ताना आसंल
In reply to नको विशाल नको. by अभ्या..
व्हय.
In reply to त्ये कालिजात आस्ताना आसंल by डॉ सुहास म्हात्रे
नजर लागते अभ्याशेट, चला
In reply to नको विशाल नको. by अभ्या..
आणि हो मी, ९३ साली डिप्लोमा
In reply to नजर लागते अभ्याशेट, चला by विशाल कुलकर्णी
नाही राव तुमच्यासारखि नजर
In reply to आणि हो मी, ९३ साली डिप्लोमा by विशाल कुलकर्णी
2 कोटी????? बाब्बो!
In reply to नाही राव तुमच्यासारखि नजर by अभ्या..
अबे विशल्या कुठल्या कॉलेज ला
दादा, चंडकला होतो,
In reply to अबे विशल्या कुठल्या कॉलेज ला by भीमराव
हे भारी आहे!!!! आता एक किस्सा
भारी आहे.
=)) =))
शेवट कळला नाही.
अर्थातच आहेत, अगदी कोपरापासून
In reply to शेवट कळला नाही. by Pain6
आणी जास्त झाली
In reply to अर्थातच आहेत, अगदी कोपरापासून by विशाल कुलकर्णी
सही :-)
In reply to आणी जास्त झाली by gogglya
हाहाहा!