✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

साहित्य संपादकीय आवाहन

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Wed, 07/15/2015 - 22:37  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच. इथे ह्या धाग्यावर म्हणा किंवा व्यक्तीगत निरोपाने म्हणा तुम्ही मदत मागू शकता. नव्या मिपाकरांना सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसमोर तुमचं साहित्य सादर करायला अजिबात घाबरू किंवा लाजू नका. तुम्ही नवे असाल तेव्हा तुमच्याकडून चुका ह्या होणारंच. ह्याचं चुकांमधून शिकून पुढे अत्यंत उत्तम साहित्य लिहिणारे बरेच मान्यवर आयडी इथे मिपावर किंवा एकूणच मराठी आंतरजालावर लेखन करत असतात. मिपाकर तुमच्या लेखनाचं स्वागत करतीलच. कदाचित तुमच्या सुरुवातीच्या काही लेखांवर टिका होईल, चुकांवर बोट ठेवलं जाईल. थोड्याफार प्रमाणामध्ये रॅगिंगही होईल. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. लोकं तुम्हाला हळू हळू ओळखायला लागतील, तुमच्या लेखनाची पद्धत किंवा बाज त्यांच्या सवयीचा झाला की हेच लोकं तुमचे जवळचे मित्र बनतील (स्वानुभवाचे बोल. माझं मिपावर झालेलं अलौकिक स्वागत अजून विसरलेलो नाही. तेव्हा राग आलेला, प्रचंड वाईट वाटलेलं पण आता मात्र हे लोकं माझे मित्र बनलेत :) ). सो, लिहिते व्हा. तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं, पाककृती, अनुभव ह्या सगळ्यांचं मिसळपाववर स्वागतच असेल. काही नियम किंवा मर्यादा मात्र लागू असतील ते म्हणजे लेखन तुमचं स्वतःचं असावं, मोडकं-तोडकं असेल तरी चालेल काही हरकत नाही. अनुवाद करत असाल तर मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय इथे प्रकाशित करू नका. बुद्धी स्वामित्व ही कायदेशीर बाब असल्याने हा नियम कटाक्षाने पाळा. कुठल्याही जाती-धर्माला दुखावलं जाईल असं लेखन टाळा. समिंग अपः लिहिते व्हा. अधून मधून जागोजागी आपले मिसळपावकरांचे कट्टे होतं असतात त्यांनाही हजेरी लावा. नव्या लोकांशी त्यानिमित्ताने ओळखही होईल :). ह्या लिंकवर तुम्हाला साहित्य संपादकांची नावं कळतीलः साहित्य संपादक जुन्या संपादक मंडळामध्ये काही बदल झालेले होते त्याची यादी मी नीट माहिती घेऊन इथे लिहीनच. इथले बरेच जुने आयडी हल्ली वाचनमात्र असतात असं हल्ली लक्षात आलेलं आहे. पूर्वी अत्यंत चांगलं लेखन करणारे हे लोक्स अचानक लेखनसंन्यासी का झालेत ह्यामागचं कारण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुमचं साहित्य वाचूनच, तुमच्या मार्गदर्शनाखालीच हौशी नवमिपाकर आणि माझ्यासारखे लोकं शिकतील असं मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्हीही लिहितं व्हा अशी आग्रहाची विनंती मी करतो. जुन्या लोकांना बहुतांश वेळा मदतीची गरज लागत नाही, पण तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणाला मदत लागल्यास संकोच नं बाळगता मी आणि माझं संपादक मित्रमंडळ हजर आहेच. तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखामध्ये प्रतिसादांमधून मांडा. ही कल्पना प्रत्येक वेळी लेखनाशी संलग्न असायलाचं हवी असं नाही. एखादा सामाजिक उपक्रमही यामध्ये येऊ शकतो. नाखु'न'काकांशी मधे बोलताना त्यांनी एक संकल्पना मांडली होती. ती तेच इथे लिहितील अशी अपेक्षा. मिपावर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर तेही इथे मांडा. काही नवे साहित्यप्रकार मिपावर जोडायच्या विचारामधे सध्या सा.सं. मंडळ आहे. त्यांमध्येही तुमचं योगदान अपेक्षित आहे :) .
कळावे. लोभ असावा. P.S. लेखक/ कवी मंडळींना एक आवाहनः तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल तुम्ही साहित्य संपादकांना कळवत असताना शक्यतो एकापेक्षा जास्तं संपादकांना कळवणं टाळा. म्हणजे तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल अत्यंत योग्य पद्धतीने केले जातील. काही वेळेला एकापेक्षा जास्तं संपादक एका धाग्यावर दुरुस्तीचं काम करत असतील तर जो शेवटी धागा प्रकाशित करेल त्याने केलेले बदल फक्त धाग्यामधे दिसतील. पहिल्या संपादकाने बदल करुनही ते धाग्यामधे दिसणार नाहीत. (Too many cooks spoils the dish) असा प्रकार टाळण्यासाठी वरची सुचना करतो आहे. एंजॉय पावसाळा एंजॉय मिपा. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
13890 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

:) (पूर्वीसारखी स्माइली

प्यारे१
गुरुवार, 07/16/2015 - 23:24 नवीन
:) (पूर्वीसारखी स्माइली नाहीये समजून घेणे)
↩ प्रतिसाद: जडभरत

काही न पटलेल्या गोष्टी पण

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:26 नवीन
काही न पटलेल्या गोष्टी पण बोलू नयेत का आम्ही?

प्यारेजी कदाचित तुम्ही काय

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:28 नवीन
प्यारेजी कदाचित तुम्ही काय बोलताय हे समजलं नाही मला.

माझी फक्त इतकीच इच्छा आहे की

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:35 नवीन
माझी फक्त इतकीच इच्छा आहे की मिपा मराठी मानस, मराठी अभिव्यक्ती, मराठी आकांक्षा यांचे संकेतस्थळ व्हावे ना की काही ठराविक लोकांची मक्तेदारी.

मराठीबाबत आत्ता किती

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:39 नवीन
मराठीबाबत आत्ता किती उपेक्षेचे वातावरण आहे हे अनुभवलेय. आत्ता मराठी ही लाजिरवाणी बाब झालीय खुद्द महाराष्ट्रात! असं वाटतं की मिपासारखं व्यासपीठ मराठीला तिचा मान मिळवून देईल. पण जर आपणच या संस्थळाची अशी वाताहात केली तर मग उपयोग काय?

तुमचं शुद्धलेखन बरेच सुधारलेय

एस
गुरुवार, 07/16/2015 - 23:43 नवीन
तुमचं शुद्धलेखन बरेच सुधारलेय की इतक्या कमी कालावधीत! आणि तुमच्या मिपाअभ्यासालाही दाद दिलीच पाहिजे.
↩ प्रतिसाद: जडभरत

आवाहनाचं शब्दांकन आवडलं. भा

यशोधरा
Fri, 07/17/2015 - 04:05 नवीन
आवाहनाचं शब्दांकन आवडलं. भा.पो.

चला या निमित्ताने अनेकांचे

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/17/2015 - 10:03 नवीन
चला या निमित्ताने अनेकांचे आत्मपरिक्षण/ परपरिक्षण झाले असेल.

माझा आत्ता पर्यंतचा एकच फंडा

मदनबाण
Fri, 07/17/2015 - 10:25 नवीन
माझा आत्ता पर्यंतचा एकच फंडा आहे... स्वतः आनंद घ्या आणि दुसर्‍यांना आनंद ध्या. :) ज्यांच्या टकुर्‍यात हे शिरत नाही त्यांना फाट्यावर मारा ! बाकी काही फाटे इतके "निर्लेज्य" आहेत की त्यांची कितीही ठासली तरी... असो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला आता शिकलो आहे ! तरी सुद्धा कधी कधी सटकतेच ! वायझेड साले असे म्हणतो आणि परत दुर्लक्ष करतो. आदि च्या भावना योग्य आहेत,त्याच प्रमाणे एक्का काकांचा प्रतिसाद सुद्धा अतिशय उत्तम आहे. :) अवांतर :- नामांतर चळवळीला माझा विरोध आहे, अनेक सदस्यांनी { स्त्री/पुरुष} आपल्या जुन्या आयडीचे नामकरण केले आहे, परंतु त्यामुळे अनेकदा यांचा आधीचा "अवतार" कोणता ? हे आठवण्याचे फालतु कष्ट घ्यावे लागत आहेत.तसेच त्यांच्या बरोबर आधी ज्या मोकळेपणाने,बिनधास्तपणे बोलता येत होते ते तसे करणे आता जमत नाही.जरी नामांतर करणे हा व्यक्तिगत निर्यण स्वातंत्र्याचा पर्याय असला तरी मला तरी तो न-रुचणारा वाटला.एकदाच काय तो आयडी घ्या आणि वावरा.अनेक आयडींना त्यांच्या त्या नावावरुन किंवा टोपण नावावरुन हाक मारण्यात,गप्पा मारण्यात जी मजा होती ती निघुन गेली. आजही श्री. डॉ.सुहास म्हात्रे यांना मी एक्का काका याच टोपण नावाने संबोधित करणे पसंत करतो याचे कारण तेच आहे. :) तसेच उध्या {डॉ.}सुबोध खरे ज्यांना डॉक या टोपण नावाने हाक मारतो त्यांनी उध्या "जरत्कारु" असे त्यांच्या आयडीचे नामकरण करुन टाकले तर माझ्या सारख्या बापड्यांची पंचाईत होइल की नाही ? ;) तर मिपा व्यवस्थापनाला माझी विनंती आहे की यापुढे एकदा आयडी घेतल्यावर ते सदस्यनाम बदलण्यास पूर्णपणे बंदी असावी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- जगणे कसले आव्हान इथे, दिन रात नवे छळणारे... :- 'ऋण'

सहमत!

भाते
Fri, 07/17/2015 - 10:50 नवीन
नामांतर चळवळीच्या विरोधाशी सहमत आहे. नविन आयडी आणि जुना आयडी याच्यात बऱ्याचदा गोंधळ होतो. सुरुवातीला मिपावर नविन असताना टोपणनावाने वावरणारे अनेकजण नंतर मिपावर स्थिरावल्यावर आपले पुर्ण नाव नविन आयडी म्हणुन घेतात. यात गैर काही नाही. पण नामांतरानंतर स्वाक्षरीमध्ये जुना आयडी आणि नविन आयडी देणे बंधनकारक करावे अशी सूचना! मी सुध्दा माझा आयडी बदलुन माझे पुर्ण नाव नविन आयडी म्हणुन घ्यायचा विचार केला होता.
↩ प्रतिसाद: मदनबाण

कॅप्टन स्पॅरोजी,

मनीषा
Fri, 07/17/2015 - 11:45 नवीन
आपल्या आवाहनास चांगला प्रतिसाद लाभून माझ्यासारख्या वाचनमात्रं आणि क्चचित प्रतिक्रियालेखनमात्रं सभासदांना " अच्छे दिन" दिसावेत हीच सदिच्छा!

सूत्रोंके अनुसार भाजपा

प्यारे१
Sat, 07/18/2015 - 12:42 नवीन
सूत्रोंके अनुसार भाजपा अध्यक्ष ने कहा अच्छे दिन आने के लिए लगेंगे 25 साल -कैमरामैन ***** के साथ प्यारक चौरासिया, अंत तक!
↩ प्रतिसाद: मनीषा

बऱ्याचदा असं आढळतं की लेख

प्यारे१
Sat, 07/18/2015 - 13:27 नवीन
बऱ्याचदा असं आढळतं की लेख update झालाय. उघडून पाहिल्यावर लक्षात येतं की काही प्रतिसाद दुरुस्त झालेत. ते बऱ्याचदा सम्पादकांचे असतात. सदस्य म्हणून प्रतिसाद दिल्यानंतर संपादकीय अधिकारांचा वापर करुन स्वत:चा प्रतिसाद दुरुस्त करणं हां पदाचा दुरुपयोग आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. यावरुन अनेक सम्पादकांशी अनेकदा भांडण झालं आहे. खुद्द् मिपासंस्थापकांचा शुद्धलेखनासाठी आग्रह नव्हता त्यामुळे कानामात्रावेलांटी साठी प्रतिसाद सम्पादन होऊ नयेच् त्याव्यतिरिक्त एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत. आणि तसं वाटत नसेल तर सामान्य सदस्यांना देखील हां अधिकार मिळावा असं का वाटत नाही? (ही खरड in right spirit घेतली जाईल ही आशा. अशा आक्षेपानंतर सम्पादकांच्या आमच्याप्रति असलेल्या वागण्यात बदल झालेले अनुभवलेले आहेत)

संपादकांना पूर्वनिरिक्षण ही

संदीप डांगे
Sun, 07/19/2015 - 13:47 नवीन
संपादकांना पूर्वनिरिक्षण ही सुविधा नसेल प्यारेभाई...! :-) (मरा आता....)
↩ प्रतिसाद: प्यारे१

पूर्वपरिक्षण असे वचावे,,,

संदीप डांगे
Sun, 07/19/2015 - 13:49 नवीन
पूर्वपरिक्षण असे वचावे,,,
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

स्वसंपादन असतं तर दुसरा

नाव आडनाव
Sun, 07/19/2015 - 14:29 नवीन
स्वसंपादन असतं तर दुसरा प्रतिसाद लिहायला लागला नसता ना संदीप भाऊ ;) पार जुने प्रतिसाद बदलल्यामुळे पुढची चर्चेचा अर्थ बदलंत असेल तर स्वसंपादनाला वेळेची (१ दिवस / २ दिवस आधिचे प्रतिसाद) बदलण्याची मर्यादा ठेवू शकतो. त्यातही मूळ प्रतिसाद आणि बदललेले शब्द याचं प्रमाण असू शकतं. जर या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद बदलत असेल तर ते सर्वर वर सेव्ह होऊ शकणार नाही अशी स्क्रिप्ट / रूल असेल तर ज्या लोकांना फक्त शुध्ध्लेखणात बदल करायचे आहेत त्यांच्यासाठी सोपं होइल. यामुळे जास्त बदल असतील तर नवा प्रतिसाद असतील लिहावा लागेल. अश्या केस मधे बदल करयचेच असतील तर संपादकांना मदत मागता येइल.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

खिक्क...आता तुम्ही रडारवर

टवाळ कार्टा
Sun, 07/19/2015 - 13:51 नवीन
खिक्क...आता तुम्ही रडारवर येणार
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सामान्य सदस्यांना देखील हां

मदनबाण
Sun, 07/19/2015 - 11:45 नवीन
सामान्य सदस्यांना देखील हां अधिकार मिळावा असं का वाटत नाही? पूर्णपणे सहमत ! अवांतर :- सब कुछ सिखाया जा सकता है...पर किसी के भावनाओं का खयाल रखाना कैसे सिखाया जाये ? इति :- श्री देवी फ्रॉम Engliश Vingliश

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता

काही धाग्यांवर जेव्हा लेखनात

आतिवास
Sun, 07/19/2015 - 15:20 नवीन
काही धाग्यांवर जेव्हा लेखनात सुधारणा करायची गरज दिसते (विरामचिन्हे खूप जास्त किंवा चुकीच्या ठिकाणी; शुद्धलेखनाच्या गडबडी, जोडाक्षरे लिहिण्यात अडचणी) अशा प्रसंगी साहित्य संपादकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मदत करावी. साहित्य संपादक अशी मदत करतात हे लक्षात आल्यावर मदत मागतीलही लेखक.

विरामचिन्हे खूप जास्त

सदस्यनाम
Sun, 07/19/2015 - 15:46 नवीन
विरामचिन्हे खूप जास्त
बहुतेक ही सध्याची फ्याशन असावी त्यामुळे त्यांना ते चूक वाटत नसणार. दुरुस्त करुन कशाला मागतील? अगदी जुन्या अन हुशार हुशार आयडींना सर्रास दोन अथवा जास्त पूर्णविराम अथवा प्रश्नचिन्हे देताना पाह्यले आहे.
↩ प्रतिसाद: आतिवास

प्यारे१ आणि तुमच्या

स्रुजा
Sun, 07/19/2015 - 18:57 नवीन
प्यारे१ आणि तुमच्या प्रतिसादाला एकत्र च उत्तर देते. धागे दुरुस्त करायची जेंव्हा वेळ येते म्हणजे टंकन चुका, फोटो ची साईझ बदलणे, लेख मालिका असेल तर आधीच्या लेखांचे दुवे देणे, लेखक च कधी प्रतिसादांतुन लेखांत भर घालतात कारण मुळ लेखात ते लिहायचं राहुन गेलेलं असतं, त्या प्रतिसादामधला मजकुर लेखकाला हवं असल्यास मुळ लेखात घालणे, या सगळ्या दुरुस्त्या सा. सं. करतात आणि लेखकाला व्यनि करतात. बर्‍याच नवीन लेखकांना पण आम्ही व्यनि करुन काही गोष्टी सुचवत असतो. सा. सं ची जेंव्हा अधिकृत घोषणा झाली तेंव्हा हे काम सुद्धा त्यात एक होतं आणि त्यानुसार लेखकांना मदत लागली की अथवा आमच्या लक्षात आलं की ते काम केलं जातंय. हे इथे विस्ताराने लिहीते म्हणजे कुणा लेखकाला मदत हवी असल्यास काय करायचे हा प्रश्न पडणार नाही. तो लेख तसा दुरुस्त केला की "updated" दिसतो. इथे आता "updated" म्हणजे प्रतिसाद संपादित नाहीयेत; धाग्यात सुधारणा केल्यात. जेंव्हा स्वतःचे प्रतिसाद कुणी संपादक सुधारतात तेंव्हा तो प्रतिसाद पुन्हा नवीन प्रतिसाद म्हणुन दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ, धाग्यावर १० प्रतिसाद आहेत, तुम्ही ते वाचले आहेत आणि मग कुणी तरी त्या १० मधला आपला प्रतिसाद सुधारला तर तुम्हाला त्या धाग्यावर एक नवीन प्रतिसाद दिसेल. त्या १ आकड्यावर क्लिक करुन तुम्ही नवीन प्रतिसाद बघायला जाल तर सुधारीत प्रतिसाद दिसेल. updated हे प्रतिसाद सुधारण्यामुळे येत नाही, धागा सुधारण्यामुळे येतं.
↩ प्रतिसाद: आतिवास

प्रतिसादासाठी आभार स्रुजा.

प्यारे१
Sun, 07/19/2015 - 19:14 नवीन
प्रतिसादासाठी आभार स्रुजा. बाकी सगळ्या कामासाठी कौतुक आहेच्च. पण >>>> जेंव्हा स्वतःचे प्रतिसाद कुणी संपादक सुधारतात तेंव्हा तो प्रतिसाद पुन्हा नवीन प्रतिसाद म्हणुन दिसतो. हे वर दिलेलं आहे त्याला आक्षेप आहे. निव्वळ सदस्य म्हणून प्रतिसाद देतात ना आणि त्याबाबत थयथयाट सुद्धा करता ना? (हे शब्द ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचे आहेत) मग संपादन दुसर्‍या संपादकांकडून करवून घ्यावं. यात कमीपणा का वाटतो? चिडचिड का होते? ज्येष्ठांचं आपल्या विचारांवर आणि लिखाणावर प्रभुत्व असतं असावं असं अपेक्शित असताना प्रतिसाद संपादनाची गरज का बरे निर्माण होत असावी? मान्य की चुका होतात आणि त्या दुरुस्त देखील करायला हव्यात पण मग जर तो गैरफायदा नसेल आणि निव्वळ फायदा म्हणुन च वापरला जात असेल तर थोडासा विश्वास मिपासदस्यांवर सुद्धा ठेवा की! त्यांना का या फायद्याचा लाभ देऊ नये? असा साधा सरळ प्रश्न आहे. म्हणणं समजलं असेल असं अपेक्षित आहे.
↩ प्रतिसाद: स्रुजा

त्या बाबतीत मुख्य सं. म> शीच

स्रुजा
Sun, 07/19/2015 - 19:20 नवीन
त्या बाबतीत मुख्य सं. म> शीच बोललेलं बरं. वर आणि इतर अनेक जागी लिहिल्या प्रमाणे सा. सं ना प्रतिसाद संपादित करतात ना पॉलिसी मेकर्स आहेत. सा. सं चं कार्यक्षेत्र वेगळं आहे , वर कॅप्टन नी ते विस्ताराने लिहिलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर तक्रारींची चर्चा इथे करुन काहीच साध्य होणार नाही. अतिवास आणि तुमच्या प्रतिसादानिमित्त विस्ताराने सांगण्याची कारणे २: १. आता पर्यंत कुणाच्या नजरेतुन सुटलं असेल अथवा प्रक्रिया कळली नसेल तर या निमित्ताने कळावी २. updated हे सा. सं च्या कामाशी संबंधित आहे हे अधोरेखित करणे.
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्यारे काकांशी सहमत.

बॅटमॅन
Tue, 07/21/2015 - 12:48 नवीन
प्यारे काकांशी सहमत.
↩ प्रतिसाद: प्यारे१

भाऊ

पैसा
Tue, 07/21/2015 - 14:11 नवीन
भाऊ, तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का? कोणाला कोणते अधिकार द्यायचे हे सर्वस्वी नीलकांतच्या हातात आहे. त्याच्यासारखा समतोल आणि विचारी माणूस एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही याला तसेच कारण असते. निदान त्याच्यावर तरी विश्वास ठेवा.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चालूदे. स्वतःचे मत मांडल्यावर

बॅटमॅन
Tue, 07/21/2015 - 15:09 नवीन
चालूदे. स्वतःचे मत मांडल्यावर इतका त्रास होईल असे वाटले नव्हते.
↩ प्रतिसाद: पैसा

Please specify the hashtag

प्रसाद गोडबोले
Tue, 07/21/2015 - 15:12 नवीन
#स्वमतांध्_दांभिकता कि #निरर्थक्_अत्मरंजन कि #ल्ल्ल्ल्लूऊऊऊ ??
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पायजे ते! लसावि वा मसाविदेखील

बॅटमॅन
Tue, 07/21/2015 - 16:15 नवीन
पायजे ते! लसावि वा मसाविदेखील चालेल =))
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हीहीही!

पैसा
Tue, 07/21/2015 - 22:35 नवीन
मला त्रास होतो असे कुठे बोलले का मी? चालू द्या तुमचे निरर्थक आत्मरंजन! त्रासापेक्षा मनोरंजन होण्याची शक्यता जास्त आहे इथे!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मला कसलाही इतिहास (असल्यास)

अस्वस्थामा
Tue, 07/21/2015 - 15:51 नवीन
मला कसलाही इतिहास (असल्यास) माहिती नाही तरी पण,
तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का?
इथे थोडी असहमती. एक तर हा हल्ला नाही, आक्षेप आहे. ज्यांनी नोंदवलाय त्यांनी जेवढे मांडलेय ते विचारार्ह आहे असे वाटतेय. त्याचबरोबर,
त्याच्यासारखा समतोल आणि विचारी माणूस एखादी गोष्ट का करतो किंवा का करत नाही याला तसेच कारण असते.
असेल की. पण म्हणून नीलकांतने निर्णय घेतल्यास सदस्यांनी आक्षेपदेखील नोंदवू नये काय ? "नोंदवू नये" असे नीलकांतने स्वतः म्हटल्याचे माहित नाही. सदस्यांना स्वसंपादन नाही हे समजू शकतो पण "एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत." हा आक्षेप म्हणून तरी मान्य होण्यात काही प्रॉब्लेम नसावा. ह्यात नीलकांतवर हल्ला वगैरे दिसत नाही. आणि गैरसमज नसावा पण संपादकच नव्हे तर नीलकांतदेखील माणूसच आहे आणि चुकू शकतोच की. बाय डिफॉल्ट एखादी गोष्ट संमं ने केलीय अथवा नीलकांतने केलीय म्हणून आक्षेप नोंदवू नये हे पटत नाही.
↩ प्रतिसाद: पैसा

असेल की. पण म्हणून नीलकांतने

बॅटमॅन
Tue, 07/21/2015 - 16:16 नवीन
असेल की. पण म्हणून नीलकांतने निर्णय घेतल्यास सदस्यांनी आक्षेपदेखील नोंदवू नये काय ? "नोंदवू नये" असे नीलकांतने स्वतः म्हटल्याचे माहित नाही. सदस्यांना स्वसंपादन नाही हे समजू शकतो पण "एका सम्पादकाचा प्रतिसाद बदल करण्याचे अधिकार त्याला स्वत:ला असू नयेत." हा आक्षेप म्हणून तरी मान्य होण्यात काही प्रॉब्लेम नसावा. ह्यात नीलकांतवर हल्ला वगैरे दिसत नाही.
पालथा घडा भरायचा सोस लैच बगा तुमास्नी.
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

:)))

अस्वस्थामा
Tue, 07/21/2015 - 16:32 नवीन
:))) "पालथा घडा" असं वाटत नै म्हणून लिहिलय राव. (येथील व्यवस्थेवर विश्वास असलेला आणि ते मत बदलण्यास अजून कसलाही अनुभव नसलेला )
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माफ करा

पैसा
Tue, 07/21/2015 - 22:46 नवीन
पण सदस्यांवर नीलकांतने विश्वास ठेवून बघावा असे म्हणताना "सध्या नीलकांतचा सदस्यांवर विश्वास नाही" असा सरळ अर्थ निघतो. जो त्याच्यावर भरपूर अन्याय करणारा आहे. शिवाय अनेकदा आपण संपादकांची जिरवली असे वाटून जे अनेक सदस्य लिहीत असतात तेव्हा आपण नकळत नीलकांतला अप्रत्यक्ष जबाबदार धरतोय आणि दुखावतोय हे त्यांना समजत नाही. माझा प्रतिसाद केवळ एवढेच सांगण्यासाठी होता, आहे. इतर पालथ्या घड्यांबाबत मला काहीच म्हणायचे नाही. आणि मी आता दगडांवर डोके आपटायचे सोडले आहे. तुम्ही समंजस आहात म्हणून फक्त तुमच्याशी बोलत आहे. नीलकांतकडे जर आक्षेप नोंदवायचे असतील तर त्यासाठी नीलकांतशी थेट बोलावे लागेल. चिमणरावच्या धाग्यावर लिहून काय होणार? तुम्हाला नरेन्द्र मोदीसाहेबांना सल्ले द्यायचे असतील तर पीएमओ ला लिहावे लागेल. मिसळपाव वर लिहून काय होणार आहे?
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

अप्रत्यक्ष काय ते सोडून द्या,

बॅटमॅन
Wed, 07/22/2015 - 12:46 नवीन
अप्रत्यक्ष काय ते सोडून द्या, प्रत्यक्षाचं बोला. इथे एक प्रतिसाद काय लिहिला तर इतका काय त्रास होतोय की डैरेक नीलकांतला मध्ये आणायची गरज वाटतेय?
↩ प्रतिसाद: पैसा

बॅटुश

पैसा
Wed, 07/22/2015 - 13:01 नवीन
आपले भांडण होते तेव्हा लै मजा येतेच! पण समजून घे रे बाळा, इथे कोणाला कोणते अधिकार द्यावेत किंवा देऊ नयेत हे फक्त आणि फक्त नीलकांत ठरवतो. तेव्हा त्याबद्दल जे काय म्हणायचे असेल ते इथे चिमणरावाला सांगून काय उपयोग आहे? ते आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी होते नाही का? समजतंय का? नैतर जौ दे. मला एका संस्कृत काव्याचे भाषांतर करायचे आहे. तुला काही शब्दांसाठी व्यनि करते थोड्यावेळात.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अभिप्राय

पैसा
Wed, 07/22/2015 - 13:02 नवीन
अभिप्राय दिलास का तू?
↩ प्रतिसाद: पैसा

तुमचं काय ते बोला आज्जी,

बॅटमॅन
Wed, 07/22/2015 - 13:07 नवीन
तुमचं काय ते बोला आज्जी, गावभरचा उपदेश नंतर करा जमलं तर.
↩ प्रतिसाद: पैसा

माझं काय?

पैसा
Wed, 07/22/2015 - 13:14 नवीन
माझा या सगळ्यात काय संबंध?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

>>>>भाऊ, तुम्ही लोक नीलकांतवर

प्यारे१
Wed, 07/22/2015 - 12:42 नवीन
>>>>भाऊ, तुम्ही लोक नीलकांतवर हल्ले करत आहात हे लक्षात येतंय का? सॉरी हा!
↩ प्रतिसाद: पैसा

टैम प्लीज

दिनेश सायगल
Wed, 07/22/2015 - 13:21 नवीन
प्यारे आणि बॅटमॅन काका, मालक काम करत नाहीत किंवा अपुरे काम करतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आवडीच्या संस्थळांवर तुम्ही का जात नाही? किंवा तुमच्या मित्रांप्रमाणे तुम्हाला आवडेल तसे संस्थळ काढायचा पर्याय तुम्हाला खुला आहेच की!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमच्या खुलाशाने उत्साह वाढला

जयन्त बा शिम्पि
Sun, 07/19/2015 - 15:58 नवीन
तुमच्या खुलाशाने उत्साह वाढला आणि लिहावेसे वाटले म्हणून सुरवात केली आहे.धन्यवाद

हा लेख छान उपक्रम सुध्धा छान

माझीही शॅम्पेन
Sun, 07/19/2015 - 20:18 नवीन
हा लेख छान उपक्रम सुध्धा छान पण काही भाबड्या शंका १ जे जे गेले त्यामुळे मिपा चे नुकसान झाले आहे हे तत्वत: मान्य आहे का (मी कोणीही आंडू पांडू नाही तर चांगले चांगले लेखक गेले किंवा काही कारणाने कमी केले गेले) २ कुठल्याही लेखावर संपादन / प्रतिक्रियेवर संपादन केल्यावर कारण मीमांसा , मिळू शकेल का ? बदल हा शेवटी स्वत: पासून करावा लागतो :)

खिक्क....बघु उत्तर मिळते का

टवाळ कार्टा
Sun, 07/19/2015 - 21:09 नवीन
खिक्क....बघु उत्तर मिळते का ते :)
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

शँपेन. रास्तं शंका आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 07/21/2015 - 07:07 नवीन
शँपेन. रास्तं शंका आहेत. मला आता फक्त एक गोष्ट सांग. जर मी आज एका दिवसामधे २०-२५ धागे संपादित केले तर मला सगळ्यांना पोचपावती देणं शक्य आहे का? राहिली गोष्ट प्रतिक्रिया संपादित किंवा हेवनवासी होण्याची ते अधिकार कुठल्याही सा.सं. ला नाही. हिच गोष्ट संपादकांनाही लागु होते. प्रत्येक उडवलेल्या प्रतिक्रिया/ लेखाला पाच ओळी कारण लिहायचं म्हणलं तरी ते व्यवहार्य असेल का? ह्यावर तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग.
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

हेल्थ फ्रीकर्स फोर्मात आहेत

स्पा
Tue, 07/21/2015 - 15:37 नवीन
हेल्थ फ्रीकर्स फोर्मात आहेत
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

माझे प्रतिसाद जेव्हा जेव्हा

अस्वस्थामा
Tue, 07/21/2015 - 15:59 नवीन
माझे प्रतिसाद जेव्हा जेव्हा संपादित झालेत तेव्हा तेव्हा नीट दोन-चार ओळी का होईना पण कारण दिले गेले होते. आणि तेवढी कर्टसी दाखवली जात असेल तर तक्रारीचे कारण नसावे. (इतरांचा अनुभव माहीत नाही.)
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टननी हा लेख लेखन संपादक

मृत्युन्जय
Wed, 07/22/2015 - 13:19 नवीन
कॅप्टननी हा लेख लेखन संपादक म्हणुन टाकला आहे. काही चांगला मदतीचा हात पुढे केला आहे. असे असता संपादक मंडळाबद्दलच्या कुरबुरी इथे लिहुन लोक या धाग्याची आणि एका चांगल्या उपक्रमाची वाट लावत आहे असे वाटते. हे म्हणजे एखाद्या भाजपा नगरसेवकाने शनिवारवाड्याच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला की "आधी बाबरी मशिदीचे काय झाले ते सांगा" म्हणुन बोंबाबोंब करण्यासारखे आहे.
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा