नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच. इथे ह्या धाग्यावर म्हणा किंवा व्यक्तीगत निरोपाने म्हणा तुम्ही मदत मागू शकता.
नव्या मिपाकरांना सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसमोर तुमचं साहित्य सादर करायला अजिबात घाबरू किंवा लाजू नका. तुम्ही नवे असाल तेव्हा तुमच्याकडून चुका ह्या होणारंच. ह्याचं चुकांमधून शिकून पुढे अत्यंत उत्तम साहित्य लिहिणारे बरेच मान्यवर आयडी इथे मिपावर किंवा एकूणच मराठी आंतरजालावर लेखन करत असतात. मिपाकर तुमच्या लेखनाचं स्वागत करतीलच. कदाचित तुमच्या सुरुवातीच्या काही लेखांवर टिका होईल, चुकांवर बोट ठेवलं जाईल. थोड्याफार प्रमाणामध्ये रॅगिंगही होईल. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. लोकं तुम्हाला हळू हळू ओळखायला लागतील, तुमच्या लेखनाची पद्धत किंवा बाज त्यांच्या सवयीचा झाला की हेच लोकं तुमचे जवळचे मित्र बनतील (स्वानुभवाचे बोल. माझं मिपावर झालेलं अलौकिक स्वागत अजून विसरलेलो नाही. तेव्हा राग आलेला, प्रचंड वाईट वाटलेलं पण आता मात्र हे लोकं माझे मित्र बनलेत :) ). सो, लिहिते व्हा. तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं, पाककृती, अनुभव ह्या सगळ्यांचं मिसळपाववर स्वागतच असेल. काही नियम किंवा मर्यादा मात्र लागू असतील ते म्हणजे लेखन तुमचं स्वतःचं असावं, मोडकं-तोडकं असेल तरी चालेल काही हरकत नाही. अनुवाद करत असाल तर मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय इथे प्रकाशित करू नका. बुद्धी स्वामित्व ही कायदेशीर बाब असल्याने हा नियम कटाक्षाने पाळा. कुठल्याही जाती-धर्माला दुखावलं जाईल असं लेखन टाळा. समिंग अपः लिहिते व्हा. अधून मधून जागोजागी आपले मिसळपावकरांचे कट्टे होतं असतात त्यांनाही हजेरी लावा. नव्या लोकांशी त्यानिमित्ताने ओळखही होईल :).
ह्या लिंकवर तुम्हाला साहित्य संपादकांची नावं कळतीलः साहित्य संपादक
जुन्या संपादक मंडळामध्ये काही बदल झालेले होते त्याची यादी मी नीट माहिती घेऊन इथे लिहीनच.
इथले बरेच जुने आयडी हल्ली वाचनमात्र असतात असं हल्ली लक्षात आलेलं आहे. पूर्वी अत्यंत चांगलं लेखन करणारे हे लोक्स अचानक लेखनसंन्यासी का झालेत ह्यामागचं कारण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुमचं साहित्य वाचूनच, तुमच्या मार्गदर्शनाखालीच हौशी नवमिपाकर आणि माझ्यासारखे लोकं शिकतील असं मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्हीही लिहितं व्हा अशी आग्रहाची विनंती मी करतो. जुन्या लोकांना बहुतांश वेळा मदतीची गरज लागत नाही, पण तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणाला मदत लागल्यास संकोच नं बाळगता मी आणि माझं संपादक मित्रमंडळ हजर आहेच.
तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखामध्ये प्रतिसादांमधून मांडा. ही कल्पना प्रत्येक वेळी लेखनाशी संलग्न असायलाचं हवी असं नाही. एखादा सामाजिक उपक्रमही यामध्ये येऊ शकतो. नाखु'न'काकांशी मधे बोलताना त्यांनी एक संकल्पना मांडली होती. ती तेच इथे लिहितील अशी अपेक्षा. मिपावर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर तेही इथे मांडा. काही नवे साहित्यप्रकार मिपावर जोडायच्या विचारामधे सध्या सा.सं. मंडळ आहे. त्यांमध्येही तुमचं योगदान अपेक्षित आहे :) .
कळावे. लोभ असावा.
P.S. लेखक/ कवी मंडळींना एक आवाहनः तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल तुम्ही साहित्य संपादकांना कळवत असताना शक्यतो एकापेक्षा जास्तं संपादकांना कळवणं टाळा. म्हणजे तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल अत्यंत योग्य पद्धतीने केले जातील. काही वेळेला एकापेक्षा जास्तं संपादक एका धाग्यावर दुरुस्तीचं काम करत असतील तर जो शेवटी धागा प्रकाशित करेल त्याने केलेले बदल फक्त धाग्यामधे दिसतील. पहिल्या संपादकाने बदल करुनही ते धाग्यामधे दिसणार नाहीत. (Too many cooks spoils the dish) असा प्रकार टाळण्यासाठी वरची सुचना करतो आहे. एंजॉय पावसाळा एंजॉय मिपा. :)
वाचने
13947
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा
पचवायचा प्रयत्न करु. नै पचले
In reply to हाहाहा by मितभाषी
लेखन मात्र
तुम्ही गुगल क्रोम वापरत
In reply to लेखन मात्र by अरुण मनोहर
धन्यवाद
In reply to तुम्ही गुगल क्रोम वापरत by कॅप्टन जॅक स्पॅरो
ही अडचण मलाही येत होती, आता
In reply to तुम्ही गुगल क्रोम वापरत by कॅप्टन जॅक स्पॅरो
सोयीस्कर दुर्लक्ष(??)
In reply to तुम्ही गुगल क्रोम वापरत by कॅप्टन जॅक स्पॅरो
पण यासगळ्यांमूळे तोटा मात्र
In reply to सोयीस्कर दुर्लक्ष(??) by अमृत
दुर्लक्ष्य तर होणारच.
In reply to सोयीस्कर दुर्लक्ष(??) by अमृत
धाग्यांच्या खरडवह्या झाल्या
In reply to दुर्लक्ष्य तर होणारच. by सदस्यनाम
कंपूबाजी उर्फ ऑफिस पॉलिटिक्स
In reply to दुर्लक्ष्य तर होणारच. by सदस्यनाम
"वाईट वागणे हा वाईट लोकांच
In reply to कंपूबाजी उर्फ ऑफिस पॉलिटिक्स by डॉ सुहास म्हात्रे
"वाईट वागणे हा वाईट लोकांच गुणधर्म आहे. पण, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याच्या प्रवृत्तीमुळेच वाईट लोकांना वाईटपणा करायला प्रोत्साहन मिळते, हे सुद्धा तितकेच खरे आहे."डुआयडी आणि विखारी ट्रोलींगबद्दल हेच विचार लागू पडतात का?अगदी मनातलं बोललात डाॅक्टर.
In reply to कंपूबाजी उर्फ ऑफिस पॉलिटिक्स by डॉ सुहास म्हात्रे
ज्या गोष्टी माझ्या
In reply to सोयीस्कर दुर्लक्ष(??) by अमृत
गेले हो ते दिवस
In reply to सोयीस्कर दुर्लक्ष(??) by अमृत
काही लोक सातत्याने चांगले
सहमत आहे
In reply to काही लोक सातत्याने चांगले by अजया
ताई ही मालिका वॉच लिस्ट (?)
In reply to काही लोक सातत्याने चांगले by अजया
मी वाच्तोय :)
In reply to काही लोक सातत्याने चांगले by अजया
लिंक वर गेल्यावर access
कल्पना - शतशब्दकथा
खूप छान वाटलं, सीजेएस. मी
धन्यवाद!
फारच छान
शाब्बास
वाचुनचं, हळु हळु, मुळ,
मिपावर अभिप्राय देण्यासाठी हा दूवा वापरावा.
मिपा वर आपण लेखन करतो ते
संपादकांची गटबाजी
थोडं फार लिखाण केलंही, पण
In reply to संपादकांची गटबाजी by आदिजोशी
थोडं फार लिखाण केलंही, पण सुरुवातीचा जो मूड होता तो ह्या दळभद्री लोकांमुळे गेला तो गेलाच.ज्यांना आपण (तुमच्या शब्दात) "दळभद्री" समजतो अशा लोकांसाठी आपण आपल्या आवडीचे काही सोडावे इतके त्यांचे महत्व का वाढवावे ? आपण आपल्या आवडीचे काही सोडण्याने आपण अश्या लोकांचा उद्देश यशस्वी करून त्यांना प्रोत्साहन देत असतो. एकतर त्यांना विरोध करावा किंवा सरळ दुर्लक्षाने मारावे. इतकेही करून ते सुधारले नाही तर प्रशासकीय कारवाई त्यांचा बंदोबस्त करते असे गेल्या काही महिन्यांत दिसत आहे. ...असा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे.प्रशासकीय कारवाई कुठे आहे
In reply to थोडं फार लिखाण केलंही, पण by डॉ सुहास म्हात्रे
"अनेक डोकेदुखी ठरलेल्या
In reply to प्रशासकीय कारवाई कुठे आहे by जडभरत
प्रशासकीय कारवाई ३ आठवड्यात
In reply to प्रशासकीय कारवाई कुठे आहे by जडभरत
@ आदिजोशी आणि @ सुबोध खरे
अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून
छान धागा ! - पुलेशु
बाकी परवाच एक नवीन धागा
In reply to छान धागा ! - पुलेशु by प्रसाद गोडबोले
लिहाच हो तुम्ही.
In reply to बाकी परवाच एक नवीन धागा by प्रसाद गोडबोले
अश्या प्रयत्नांचे स्वागतच आहे
In reply to बाकी परवाच एक नवीन धागा by प्रसाद गोडबोले
साहित्य संपादक ह्या रचनेनंतर नवीन लेखकांच्या / नवीन लेखनाच्या संख्येत खरेच काही वाढ झाली का ? जी काही वाढ झाली ती सिग्निफिकंट आहे का प्लेसेबो इफ्फेक्ट आहे ?सासंमंडळ नुकतेच स्थापन होऊन त्यांचे कार्य सुरू होऊन थोडे दिवसच झाले आहेत आणि त्यांच्या कामाचा प्रभाव जाणवायला अजून काही काळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे, या प्रश्नाच्या उत्तरांचे स्टॅटिस्टिकली योग्य प्रभावाचे आणि योग्य आकाराचे सँपल साईज मिळायला अजून काही वेळ द्यावा लागेल असे वाटते.+१
In reply to अश्या प्रयत्नांचे स्वागतच आहे by डॉ सुहास म्हात्रे
दोहोंशी सहमत
In reply to +१ by एस
मार्कींग सिस्टिम
हे जरा जास्तच वाटत असल्यास
In reply to मार्कींग सिस्टिम by शब्दानुज
माफ करा
In reply to मार्कींग सिस्टिम by शब्दानुज
वाचनासाठी
@पैसा @मित्रहो :-
ज्यांना आपण (तुमच्या शब्दात)
चिमणराव तुम्ही पुढाकार घेतला
भावा, तुझं मिपावय किती? तू
In reply to चिमणराव तुम्ही पुढाकार घेतला by जडभरत
माझ्या मिपावयाचा इथे काय
:) (पूर्वीसारखी स्माइली
In reply to माझ्या मिपावयाचा इथे काय by जडभरत
काही न पटलेल्या गोष्टी पण
प्यारेजी कदाचित तुम्ही काय
माझी फक्त इतकीच इच्छा आहे की
मराठीबाबत आत्ता किती
तुमचं शुद्धलेखन बरेच सुधारलेय
In reply to मराठीबाबत आत्ता किती by जडभरत
आवाहनाचं शब्दांकन आवडलं. भा
चला या निमित्ताने अनेकांचे
माझा आत्ता पर्यंतचा एकच फंडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी:- जगणे कसले आव्हान इथे, दिन रात नवे छळणारे... :- 'ऋण'सहमत!
In reply to माझा आत्ता पर्यंतचा एकच फंडा by मदनबाण
कॅप्टन स्पॅरोजी,
सूत्रोंके अनुसार भाजपा
In reply to कॅप्टन स्पॅरोजी, by मनीषा
बऱ्याचदा असं आढळतं की लेख
संपादकांना पूर्वनिरिक्षण ही
In reply to बऱ्याचदा असं आढळतं की लेख by प्यारे१
पूर्वपरिक्षण असे वचावे,,,
In reply to संपादकांना पूर्वनिरिक्षण ही by संदीप डांगे
स्वसंपादन असतं तर दुसरा
In reply to पूर्वपरिक्षण असे वचावे,,, by संदीप डांगे
खिक्क...आता तुम्ही रडारवर
In reply to संपादकांना पूर्वनिरिक्षण ही by संदीप डांगे
सामान्य सदस्यांना देखील हां
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ताकाही धाग्यांवर जेव्हा लेखनात
विरामचिन्हे खूप जास्त
In reply to काही धाग्यांवर जेव्हा लेखनात by आतिवास