✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

साहित्य संपादकीय आवाहन

क
कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी
Wed, 07/15/2015 - 22:37  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर मित्रमैत्रिणींनो,
साहित्य संपादक मंडळाची स्थापना काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामधले महत्त्वाचे उद्देश म्हणजे नव्या मंडळींना मिसळपाव वर स्वतःचं लेखन करायला प्रोत्साहन देणे आणि त्यासंदर्भात लागेल ती मदत करणे हे होत. इथल्या नव्या आयडींनी मोडकं-तोडकं का होईना पण लेखन करायला सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या चुका सुधारून घ्यायला आणि तुम्हाला मदत करायला दोन्ही संपादक मंडळं तयार आहेतच. इथे ह्या धाग्यावर म्हणा किंवा व्यक्तीगत निरोपाने म्हणा तुम्ही मदत मागू शकता. नव्या मिपाकरांना सांगायची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसमोर तुमचं साहित्य सादर करायला अजिबात घाबरू किंवा लाजू नका. तुम्ही नवे असाल तेव्हा तुमच्याकडून चुका ह्या होणारंच. ह्याचं चुकांमधून शिकून पुढे अत्यंत उत्तम साहित्य लिहिणारे बरेच मान्यवर आयडी इथे मिपावर किंवा एकूणच मराठी आंतरजालावर लेखन करत असतात. मिपाकर तुमच्या लेखनाचं स्वागत करतीलच. कदाचित तुमच्या सुरुवातीच्या काही लेखांवर टिका होईल, चुकांवर बोट ठेवलं जाईल. थोड्याफार प्रमाणामध्ये रॅगिंगही होईल. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाही. लोकं तुम्हाला हळू हळू ओळखायला लागतील, तुमच्या लेखनाची पद्धत किंवा बाज त्यांच्या सवयीचा झाला की हेच लोकं तुमचे जवळचे मित्र बनतील (स्वानुभवाचे बोल. माझं मिपावर झालेलं अलौकिक स्वागत अजून विसरलेलो नाही. तेव्हा राग आलेला, प्रचंड वाईट वाटलेलं पण आता मात्र हे लोकं माझे मित्र बनलेत :) ). सो, लिहिते व्हा. तुमच्या कथा, कविता, प्रवासवर्णनं, पाककृती, अनुभव ह्या सगळ्यांचं मिसळपाववर स्वागतच असेल. काही नियम किंवा मर्यादा मात्र लागू असतील ते म्हणजे लेखन तुमचं स्वतःचं असावं, मोडकं-तोडकं असेल तरी चालेल काही हरकत नाही. अनुवाद करत असाल तर मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय इथे प्रकाशित करू नका. बुद्धी स्वामित्व ही कायदेशीर बाब असल्याने हा नियम कटाक्षाने पाळा. कुठल्याही जाती-धर्माला दुखावलं जाईल असं लेखन टाळा. समिंग अपः लिहिते व्हा. अधून मधून जागोजागी आपले मिसळपावकरांचे कट्टे होतं असतात त्यांनाही हजेरी लावा. नव्या लोकांशी त्यानिमित्ताने ओळखही होईल :). ह्या लिंकवर तुम्हाला साहित्य संपादकांची नावं कळतीलः साहित्य संपादक जुन्या संपादक मंडळामध्ये काही बदल झालेले होते त्याची यादी मी नीट माहिती घेऊन इथे लिहीनच. इथले बरेच जुने आयडी हल्ली वाचनमात्र असतात असं हल्ली लक्षात आलेलं आहे. पूर्वी अत्यंत चांगलं लेखन करणारे हे लोक्स अचानक लेखनसंन्यासी का झालेत ह्यामागचं कारण जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुमचं साहित्य वाचूनच, तुमच्या मार्गदर्शनाखालीच हौशी नवमिपाकर आणि माझ्यासारखे लोकं शिकतील असं मनापासून वाटतं. त्यामुळे तुम्हीही लिहितं व्हा अशी आग्रहाची विनंती मी करतो. जुन्या लोकांना बहुतांश वेळा मदतीची गरज लागत नाही, पण तरीही अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोणाला मदत लागल्यास संकोच नं बाळगता मी आणि माझं संपादक मित्रमंडळ हजर आहेच. तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखामध्ये प्रतिसादांमधून मांडा. ही कल्पना प्रत्येक वेळी लेखनाशी संलग्न असायलाचं हवी असं नाही. एखादा सामाजिक उपक्रमही यामध्ये येऊ शकतो. नाखु'न'काकांशी मधे बोलताना त्यांनी एक संकल्पना मांडली होती. ती तेच इथे लिहितील अशी अपेक्षा. मिपावर तुम्हाला काही बदल अपेक्षित असतील तर तेही इथे मांडा. काही नवे साहित्यप्रकार मिपावर जोडायच्या विचारामधे सध्या सा.सं. मंडळ आहे. त्यांमध्येही तुमचं योगदान अपेक्षित आहे :) .
कळावे. लोभ असावा. P.S. लेखक/ कवी मंडळींना एक आवाहनः तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल तुम्ही साहित्य संपादकांना कळवत असताना शक्यतो एकापेक्षा जास्तं संपादकांना कळवणं टाळा. म्हणजे तुमच्या साहित्यामधे अपेक्षित असणारे बदल अत्यंत योग्य पद्धतीने केले जातील. काही वेळेला एकापेक्षा जास्तं संपादक एका धाग्यावर दुरुस्तीचं काम करत असतील तर जो शेवटी धागा प्रकाशित करेल त्याने केलेले बदल फक्त धाग्यामधे दिसतील. पहिल्या संपादकाने बदल करुनही ते धाग्यामधे दिसणार नाहीत. (Too many cooks spoils the dish) असा प्रकार टाळण्यासाठी वरची सुचना करतो आहे. एंजॉय पावसाळा एंजॉय मिपा. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
13890 वाचन

💬 प्रतिसाद (97)

प्रतिक्रिया

हाहाहा

मितभाषी
Wed, 07/15/2015 - 22:59 नवीन
हाहाहा आमचे विचार तुम्हाल्ला पचणार नाही. असो.ओ

पचवायचा प्रयत्न करु. नै पचले

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 07/15/2015 - 23:12 नवीन
पचवायचा प्रयत्न करु. नै पचले तर मग बघु :)!!!
↩ प्रतिसाद: मितभाषी

लेखन मात्र

अरुण मनोहर
गुरुवार, 07/16/2015 - 07:01 नवीन
मी काही वर्षान्पुर्वी मिपावर सातत्याने लिहायचो. मधे काही काळ फिरकलो नाही. फक्त वाचनमात्र असायचो. आता पुन्हा लिहीणे सुरू केले आहे. तुम्ही हा फिडबॅक उपक्रम सुरू केलात ही चान्गली गोष्ट आहे. न लिहीण्याची माझी कारणे- १) (त्यावेळी) गटबाजी खूप होती. फक्त आपापल्या गटातील लेखनाला प्रोत्साहन आणि चान्गले प्रतिसाद व इतरान्ना फाट्यावर मारायचे असा सन्शय होता. २) लेखक प्रतिसादान्चा भुकेला असतो. ही भूक भागायची नाही. ३) लेखकाने अगदी सतत रोजचा रतीब घालायला हवा, नाहीतर लोक त्याला विसरून जातात असा येथे सन्शय आला. हा (काल्पनिक) रेटा रुचला नाही आता पुन्हा लिहीणे का सुरू केले? १) मिपा खूप बदलले आहे, बरीच नवीन मन्डळी आली आहेत. २) जरा वेळ हाताशी आहे. समस्या- इथे लिहीताना जर काही चुका झाल्या, व बॅक स्पेस ने खोडून पुन्हा लिहीले, तर त्यानन्तर्ची सर्व अक्षरे एकमेकात मिसळली जातात. हे मी प्लेन तेक्ष्ट आणि एच टी एमेल सेटीन्ग वर देखील अनुभवले आहे. असे ट्न्कन गन्डू नये म्हणून काहीही खोडले की एक लाइन फीड घ्यावा लागतो,-- असे मग गन्डत नाही. पण मग सारे झाल्यावर ते लाईन फीड एरॅझ करावे लागतात.

तुम्ही गुगल क्रोम वापरत

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 07/16/2015 - 07:14 नवीन
तुम्ही गुगल क्रोम वापरत असावात. तुमच्या अकाउंट सेटिंग मधे जाउन तुम्ही लेखनपद्धत बदलु शकता. संपादनमधे जाउन युजर इनपुट सेक्शनमधे जाउन गुगल आय.एम.ई. हा पर्याय निवडा.
लेखकाने अगदी सतत रोजचा रतीब घालायला हवा, नाहीतर लोक त्याला विसरून जातात असा येथे सन्शय आला.
रोज रतिब घातलात तर लोक्स ट्रॉलिंग करतील. दोन धाग्यांमधे योग्य अंतर ठेवलं तर लोकांनाही वेळ मिळतो आणि नीट वाचतात :)
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

धन्यवाद

अरुण मनोहर
गुरुवार, 07/16/2015 - 07:43 नवीन
इनपूट मेथड मध्ये बदल केलेला आहे. आता बरोबर वाटते. रोज रतीब घालण्याचा प्रश्नच नाही. ते शक्यही नाही. रोज म्हणजे सातत्याने असे म्हणायचे होते.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ही अडचण मलाही येत होती, आता

इनिगोय
गुरुवार, 07/16/2015 - 08:34 नवीन
ही अडचण मलाही येत होती, आता बदल केलाय. आभार.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सोयीस्कर दुर्लक्ष(??)

अमृत
गुरुवार, 07/16/2015 - 09:18 नवीन
अरूण मनोहरांनी लिहेलेल्या १ व २ या समस्यांवर काहीही भाष्य केलेले नाही?? याचबरोबर बर्‍याच धाग्यांवर कंपूतील एकानी फाटा फोडला की लगेच त्या धाग्याची खरडवही बनवायची, काही नवख्या लेखकांच्या पहील्या धाग्यांपासूनच शुद्धलेखनाच्या चुकांची सरबत्ती करायची वरून 'तुम्हीतर इतक्या वर्षंपासून सदस्य आहात तरी कशा काय चुका? हे जोडीला. सदस्य असणे आणी लिखाण करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही सदस्यांच्या प्रतिभा केवळ विडंबनापूरत्या मर्यादीत आहेत तर बहुतांश केवळ प्रतिक्रिया देउन चुका कढण्यातच सुख मानताना दिसतात. अजुनही बरेच मुद्दे आहेत पण असो लिहून फार काही फरक पडेल असे वाटत नाही. गेल्या ५ वर्षात बर्‍याच जणांनी तक्रारी करून सुद्धा विषेश बदल झालेला नाही. पण यासगळ्यांमूळे तोटा मात्र मिपाचाच झालाय बरीच जेष्ठ व दर्जेदार लेखन करणारी मंडळी सद्ध्या दिसत नाहीत. या धाग्यावर ज्या प्रतिक्रीया येतील त्यातुन जर काही सकारात्मक बदल घडलेत तर ते नक्कीच स्वागतार्ह असतील अन्यथा संपादक मंडळास हा धागा पुन्हा कढावा लागल्यास आश्चर्य वाटणार नाही. ही माझी वैयक्तिक मतं आहेत.
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पण यासगळ्यांमूळे तोटा मात्र

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 09:52 नवीन
पण यासगळ्यांमूळे तोटा मात्र मिपाचाच झालाय बरीच जेष्ठ व दर्जेदार लेखन करणारी मंडळी सद्ध्या दिसत नाहीत
हे मात्र खरं.
↩ प्रतिसाद: अमृत

दुर्लक्ष्य तर होणारच.

सदस्यनाम
गुरुवार, 07/16/2015 - 10:36 नवीन
दुर्लक्ष्य तर होणारच. टवाळ कंपू साथीला घेऊन प्रतिसादाच्या खरडवह्या कोण करतंय ते दिसलय. आवाहन करण्यातली कळकळ ठिकाय पण त्यापेक्षा लेखकाला लिहावे वाटेल असे वातावरण निर्माण करा आधी. नुस्ते लिहा लिहा सांगायचे पण चांगल्या कथांवर प्रतिसाद किती तर १५-२०. परत प्रतिसादांच्या संख्येवर जाऊ नका ही मखलाशी आहेच. नगरीनिरंजन, बहुगुणी, रामदास, ५० फक्त सारख्यांच्या दर्जाच्या कथा आता येतच नाहीत. चांगले काथ्याकूट अगदी दुर्मिळ. फाटे फोडणेच जास्त. विविध क्षेत्रांची माहीती देणारे ले़ख जवळपास नाहीतच. सोताला रिलेट करतील असे इंजिनिअरींग कॉलेज लाईफ, आयटी, हुच्च्भ्रु प्रोब्लेम्स, मॉल अन चित्रपट असेच विषय गाजवले जातात. ते पण सेल्फरेड करुन. टोटल अ‍ॅटिट्युड असा की पुणे मुंबई सोडून मराठी कुठे नसतेच. यावर जरा कुठे बोलले की सूड उगवायला तयारच. नॉस्टॅल्जिक लेखांचे तसेच. रामदास सरांचे अत्यंत माहितीपूर्ण लेख सर्वानाच जमतील असे नाही पण लिमिटेड आठवणींवर उगा काढलेले कढ पण वाचवत नाहीत. संस्कृती अन भाषाविशयक लेखात राही, बॅटमॅन, पैसा, वल्ली अशाच मोजक्या सदस्यांचे प्रतिसाद उत्तम असतात. राजकारणाविषयी अगदी एखादे दुसर्या क्लिंटनसारख्या लेखकांचा अ‍ॅप्रोच अन सातत्य उल्लेखनीय. म्रुत्युंजयसारख्या काहीच सदस्याचे प्रतिसाद वाचनीय. भटकंती काही लेखकांच्या ठिक आहेत. पण ऑलरेडी त्याला वीणावर्ल्ड च्या प्रायोजित पानाची कळा येऊ लागलीय. मराठी वाचकांच्या साहित्यविश्वात पुस्तके, मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रांच्या दर्जेदार पुरवण्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे तसे स्थान आंतरजालावर मिसळपावने मिळवावे असे वाटते. शुभेच्छा सर्वांनाच. वर व्यक्त केलेले हे मत मात्र वैयक्तिक.
↩ प्रतिसाद: अमृत

धाग्यांच्या खरडवह्या झाल्या

अन्या दातार
गुरुवार, 07/16/2015 - 17:54 नवीन
धाग्यांच्या खरडवह्या झाल्या की लेखकाचा उत्साह रखडतो. खरंच अवांतर आणि कैच्याकै अवांतर डोक्यात जाते. चांगला फिडबॅक दिल्याबद्दल आभार
↩ प्रतिसाद: सदस्यनाम

कंपूबाजी उर्फ ऑफिस पॉलिटिक्स

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/16/2015 - 18:39 नवीन
कंपूबाजी उर्फ ऑफिस पॉलिटिक्स हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे आता सर्वमान्य आहे. यातला "ऑफिस" हा शब्द वाच्यार्थाने ऑफिस, कॉलेज, एखादी संस्था, तुम्ही रहात असलेली वसाहत, मिपासारखे संस्थळ, इ इ बरेच काही जिथे चार टाळकी जमतात असे ठिकाण असू शकते. वाईट कंपूबाजीला सर्वोत्तम उपाय म्हणजे (अ) दुर्लक्षाने मारणे किंवा (आ) चांगल्या लोकांचा त्याहून मोठा कंपू करणे. कायदे, नियम, प्रशासन असावेच पण चांगल्या लोकांचा व्यक्त रेटाच वाईट कंपूबाजी जास्त प्रभावीपणे निर्बल करू शकतो. कोणीतरी म्हटले आहेच... "वाईट वागणे हा वाईट लोकांच गुणधर्म आहे. पण, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याच्या प्रवृत्तीमुळेच वाईट लोकांना वाईटपणा करायला प्रोत्साहन मिळते, हे सुद्धा तितकेच खरे आहे." थोडक्यात, मिपावर काही जणांनी कंपूबाजी केली म्हणून "वाचनमात्र राहणे" किंवा "संस्थळ सोडून जाणे" हे उपयोगी पर्याय नाहीत.
↩ प्रतिसाद: सदस्यनाम

"वाईट वागणे हा वाईट लोकांच

मोदक
गुरुवार, 07/16/2015 - 18:48 नवीन
"वाईट वागणे हा वाईट लोकांच गुणधर्म आहे. पण, चांगल्या लोकांच्या गप्प बसण्याच्या प्रवृत्तीमुळेच वाईट लोकांना वाईटपणा करायला प्रोत्साहन मिळते, हे सुद्धा तितकेच खरे आहे." डुआयडी आणि विखारी ट्रोलींगबद्दल हेच विचार लागू पडतात का?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अगदी मनातलं बोललात डाॅक्टर.

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 19:27 नवीन
अगदी मनातलं बोललात डाॅक्टर. तुम्ही आता काहीच सुचवायचं शिल्लक ठेवलेलं नाही.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ज्या गोष्टी माझ्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 07/16/2015 - 12:39 नवीन
ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणामधे नाहीत त्या गोष्टींवर मी काय भाष्य करणारे? तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला गटबाजी ही सापडणारचं. आता त्याकडे लक्ष देण्यात वेळ घालवायचा का दुर्लक्ष करुन चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे सुज्ञ लोकं ठरवु शकतातचं. आणि कंपुबाजी हा प्रकार नेहेमी त्रासदायक असतोचं असं नाही. असो. लिहित रहा. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
↩ प्रतिसाद: अमृत

गेले हो ते दिवस

निनाद मुक्काम …
Fri, 07/17/2015 - 03:56 नवीन
गेले हो ते दिवस कधीच गेले आता अपवाद म्हणून सुद्धा कंपूबाजी येथे दिसत नाही
↩ प्रतिसाद: अमृत

काही लोक सातत्याने चांगले

अजया
गुरुवार, 07/16/2015 - 08:02 नवीन
काही लोक सातत्याने चांगले लिहित असतानादेखील प्रतिसाद नसल्याने लिहायचे सोडुन देतात(नुकतेच एका खरडीत वाचण्यात आले.)उदा.स्केअरक्रो ही सध्या सुरु असणारी लेखमालिका.अत्युत्तम अनुवाद असणारी ही लेखमालिका,अत्यल्प प्रतिसादात सुरु आहे. प्रत्येक वादाच्या,कट्ट्याच्या धाग्याला शंभरी गाठुन देणारे असे साहित्य वाचत नाहीत काय असा प्रश्न पडतो. साहित्य संपादकांनी तरी अशा लेखकांना प्रतिसाद देऊन लिहायला उत्तेजन द्यावे असे वाटते.

सहमत आहे

वॉल्टर व्हाईट
गुरुवार, 07/16/2015 - 08:34 नवीन
सहमत आहे. या निमित्त्ताने बोका यांना सांगु इच्छितो की, प्रतिसाद कमी आहेत म्हणुन लेखनाचा मुड जाऊ देऊ नका. मी तरी इंटर्नेटवर असा प्रयोग झालेला या आधी पाहीला नव्हता. (म्हणजे इतक्या प्रथितयश लेखकाची कादंबरीचे भाषांतर या अर्थी ). तुम्ही खूप मोठे उदाहरण सेट करताय आणि वाचक म्हणुन, मराठी माणुस म्हणुन माझ्यासारख्या अनेकांना याचे निशितच कौतुक वाटत असेल याची खात्री बाळगा.
↩ प्रतिसाद: अजया

ताई ही मालिका वॉच लिस्ट (?)

रातराणी
गुरुवार, 07/16/2015 - 08:34 नवीन
ताई ही मालिका वॉच लिस्ट (?) मधे आहे. माझ्या लक्षात आलं तेव्हा ऑलरेडी 7वा -8वा भाग आला होता, म्हणून मालिका पूर्ण झाल्यावर शिस्तीत वाचू असे ठरवले आहे. बाकी हाच प्रतिसाद तिथेही द्यायला हवा पण आळस केला. माय बॅड. बोका ए आझम प्लीज लिहायचे थांबु नका. : )
↩ प्रतिसाद: अजया

मी वाच्तोय :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/16/2015 - 10:04 नवीन
मी वाच्तोय :)
↩ प्रतिसाद: अजया

लिंक वर गेल्यावर access

उगा काहितरीच
गुरुवार, 07/16/2015 - 08:46 नवीन
लिंक वर गेल्यावर access denied असा मेसेज दिसतोय .

कल्पना - शतशब्दकथा

वॉल्टर व्हाईट
गुरुवार, 07/16/2015 - 08:52 नवीन
तुमच्याकडे काही कल्पना असतील तर त्याही ह्या लेखांमधे प्रतिसादांमधुन मांडा.
शतशब्दकथा हा प्रकार मिपावर अत्यंत फ़ेमस होतोय असे दिसून येतेय. ट्विटर सुरु होतांना तेव्हा मेनस्ट्रिम असणार्या ब्लॉगर्सनी त्याची बरीच खिल्ली उडवली होती, आज ट्विटरने इतिहास घडवलाय हे आपण बघतोय. शतशब्दकथा अशीच एक भरपूर पोटेंन्शिअल असलेला कंटेंट टाईप आहे. मिपाने याचे उत्तम ब्रांडिंग करावे अशी कल्पना सुचवतोय. ब्रांडिंग करावे म्हण्जे काय ? १. कविता , चर्चा इत्यादी साठी जसे वेगळे इंडेक्स आहेत तसा शतशब्दकथा म्हणुन एक इंडेक्स बनवावा. २. मुखपृष्ठावर त्यांचा एक वेगळा स्क्रोल असावा. ३. सगळी कथा फेसबुकवर एका बटनावर पोस्ट होईल अशी सोय करावी ई ई .

खूप छान वाटलं, सीजेएस. मी

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 08:53 नवीन
खूप छान वाटलं, सीजेएस. मी नवीनच आहे. अजून लिहायला सुरूवात केली नाही. कारण मी गविंचा नियम पाळणारः अगदी चांगलं देण्याची गॅरंटी असेल तेव्हाच लिहा.असो. एक विनंतीः १) प्रतिसाद कमी मिळाले नाही म्हणून प्लीज लेखन बंद करू नका.इतरांच्या प्रतिसादापेक्षा तुम्हाला जे एक्सप्रेस व्हायचं समाधान मिळतंय ते खूप मोठं असतं. २) गटबाजीचा विचार करू नका. तुमचं लिहिलेलं थोड्याच जणांना आवडलं तरी ते त्यांना खूप आनंद देतं. गटबाज अर्थातच उत्तम साहित्याच्या आनंदाला मुकतात.

धन्यवाद!

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/16/2015 - 09:00 नवीन
राजीव गांधी यांच्या स्टाईलमध्ये सांगू इच्छितो - हमे लिखना है और हम लिखेंगे!

फारच छान

मोहन
गुरुवार, 07/16/2015 - 09:57 नवीन
खूपच छान उपक्रम आहे. जुने नवे दोघेही लेखकु लिहीते होवोत.

शाब्बास

मी-सौरभ
गुरुवार, 07/16/2015 - 10:18 नवीन
अतिशय योग्य लेख. यामुळे फक्त जिलब्या वाढू नयेत ही अपेक्षा...

वाचुनचं, हळु हळु, मुळ,

सूड
गुरुवार, 07/16/2015 - 15:59 नवीन
वाचुनचं, हळु हळु, मुळ, तुमच्याकडुन, एकुणचं, मागु, जाणुन
वरचे सगळे उकार दीर्घ असायला हवेत असं वाटतं. मीही माझी काही कारणाने थांबलेली कथा सुरु करायच्या विचारात आहे.

मिपावर अभिप्राय देण्यासाठी हा दूवा वापरावा.

जुइ
गुरुवार, 07/16/2015 - 18:15 नवीन
मिपावर अभिप्राय देण्यासाठी हा दूवा वापरावा Feedback

मिपा वर आपण लेखन करतो ते

सुबोध खरे
गुरुवार, 07/16/2015 - 20:16 नवीन
मिपा वर आपण लेखन करतो ते लोकांनी वाचावे म्हणून आणि स्वतःच्या सुखासाठी. मी मिपावर असणार्या अत्यंत अल्पसंख्यांक अशा समुदायाचा प्रतिनिधी. डॉक्टर आणि लष्करी अधिकारी. माझ्या बहुसंख्य लेखांवर दोन आकड्यात प्रतिसाद मिळतात. तीन आकड्यात प्रतिसाद आले ते सर्व ट्रोलिंग कंपूबाजी किंवा ठरवून कुरघोडी करण्याचा प्रयत्न इ होते. मी अर्थात अशा लोकांना फाट्यावरच मारत आलो आहे. त्यामुळे भुंकणारे लोक थोड्या काळाने शांत होतात. परंतु मला अनेक मिपाचे सदस्य असलेले किंवा नसलेल्या लोकांचे वैयक्तिक कौतुकाचे शब्द ऐकायला मिळाले आहेत किंवा मिपा कट्ट्यावर गेल्यावर लोकांनी आवर्जून तुमचे अनुभव आवडले हे सांगितले. बाकी काही लोक एखाद्याला ठरवून निशाण करायचा प्रयत्न करतात त्याने आपण हतोत्साह झालो तर त्यांना विजय मिळाल्यासारखे आहे. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. आपले लेखन हे स्वान्त सुखाय असले कि कुणी प्रतिसाद दिला काय कि नाही काय फरक पडतो? शुद्ध लेखनाच्या चुका मात्र जाणीव पूर्वक टाळाव्यात अशा मताचा मी आहे. कारण उत्तम बिर्याणीच्या भातात जर चावताना खडा आला तर तो रसभंग करतो तद्वत चांगल्या लेखाचा विचका होऊ शकतो.

संपादकांची गटबाजी

आदिजोशी
गुरुवार, 07/16/2015 - 20:17 नवीन
पूर्वी मिपावर नियमीत लिखाण करत होतो. इतकंच नव्हे बंगळूर मुक्कामी मिपा ओसरी सुद्धा सुरु करण्यास हातभार लावला होता. पण नंतर संपादकांची गटबाजी फारच सुरु झाली. आवडत्या आयडींना वाट्टेल ते बोलायची मुभा आणि बाकिच्यांच्या प्रत्येक शब्दावर आक्षेप हे प्रकार अती झाले. काही विचारायला गेलं तर 'चपला घ्या आणि चालू पडा' हा माजोरडा अ‍ॅटिट्यूड दाखवला जायचा. आवडतीचा शेंबूड गोड वाटला तरी बाकिच्यांचं मीठ अळणी वाटायचं कारण नाही. ह्या दरम्यान अनेक लोक मिपा सोडून गेले, काहींना चपला देण्यात आल्या. ह्याचं शून्य दु:ख संबंधीतांना होऊन 'जे गेले ते मिपाचे नव्हतेच' असा ठाकरी आहेर देण्यात आला. त्यामुळे आम्ही त्याला त्यांच्याच शब्दात फाट्यावर मारले. शेवटी ह्या सगळ्याला वैतागून मिपा सोडून दिली. संस्थाळाच्या फार सुरुवातीपासून इथे कार्यरत असल्याने मिपा सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी फार त्रासदायक होता. नंतर एका चांगल्या मित्राच्या सांगण्यावरून आणि परिस्थिती बदलली असल्याचा त्याने दिलेला हवाला ऐकून मिपावर परत आलो. थोडं फार लिखाण केलंही, पण सुरुवातीचा जो मूड होता तो ह्या दळभद्री लोकांमुळे गेला तो गेलाच.

थोडं फार लिखाण केलंही, पण

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/16/2015 - 22:18 नवीन
थोडं फार लिखाण केलंही, पण सुरुवातीचा जो मूड होता तो ह्या दळभद्री लोकांमुळे गेला तो गेलाच. ज्यांना आपण (तुमच्या शब्दात) "दळभद्री" समजतो अशा लोकांसाठी आपण आपल्या आवडीचे काही सोडावे इतके त्यांचे महत्व का वाढवावे ? आपण आपल्या आवडीचे काही सोडण्याने आपण अश्या लोकांचा उद्देश यशस्वी करून त्यांना प्रोत्साहन देत असतो. एकतर त्यांना विरोध करावा किंवा सरळ दुर्लक्षाने मारावे. इतकेही करून ते सुधारले नाही तर प्रशासकीय कारवाई त्यांचा बंदोबस्त करते असे गेल्या काही महिन्यांत दिसत आहे. ...असा माझा व्यक्तिगत दृष्टीकोन आहे.
↩ प्रतिसाद: आदिजोशी

प्रशासकीय कारवाई कुठे आहे

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:06 नवीन
प्रशासकीय कारवाई कुठे आहे साहेब? कधीच दिसत नाही.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

"अनेक डोकेदुखी ठरलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/16/2015 - 23:34 नवीन
"अनेक डोकेदुखी ठरलेल्या आयड्या नुकत्याच नाहिश्या झाल्या असे काही सभासदांनी प्रतिसादांत म्हटले आहे ते का बरे ?" असा विचार मनात आला. तसेच अनेक प्रकारच्या प्रशासकिय कारवाया गाजावाजा न करता पडद्यामागे व्यक्तीगत स्तरावर होऊ शकतात. कारण कोणत्याही चांगल्या प्रशासनाचा उद्देश "शासन करणे" अथवा "नेम अँड शेम" करणे नसून तसे करायला लागून नये यासाठी प्रयत्न करणे असतो. मात्र याचा अर्थ असाही नाही एखाद्या सभासदाचा त्याला योग्य वाटणारा हट्ट मानलाच जावा. मानवस्वभावच असा आहे की सर्वांना सर्वकाळ खूष ठेवणे कधीच शक्य होत नाही. हे जेवढे प्रशासनाने जाणून घेणे आवश्यक आहे तेवढेच सभासदांनीही जाणून घेणे आवश्यक आहे, इतकेच !
↩ प्रतिसाद: जडभरत

प्रशासकीय कारवाई ३ आठवड्यात

स्रुजा
गुरुवार, 07/16/2015 - 23:38 नवीन
प्रशासकीय कारवाई ३ आठवड्यात (तुमचा सदस्य काळ) दिसणार नाही. ३ आठवडे हा खुप कमी काळ आहे. शिवाय वर म्हणलंय तसं कदाचित ते जाहीर करणं प्रशासना ला प्रशस्त वाटणार नाही. साहित्य संपादक कारवाईसाठी नाहीत. त्यामुळे या धाग्ग्यावर हा मुद्दा गैरलागु आहे.
↩ प्रतिसाद: जडभरत

@ आदिजोशी आणि @ सुबोध खरे

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 20:25 नवीन
@ आदिजोशी आणि @ सुबोध खरे धन्यवाद. परखड मत व्यक्त केलेबद्दल.

अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 20:34 नवीन
अपप्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून केवळ तुमच्या वैयक्तिक आनंदासाठी लिखाण करा किंवा लेखन नसेल जमत तर इतरांच्या लेखनाचा आनंद घ्या. त्याला योग्य ते प्रतिसादही आवर्जून द्या. ज्यामुळे अशा व्यक्तिंना लेखनासाठी प्रेरणा मिळेल. निष्पक्षपाती व्यक्तींनी स्वतःचे बहुमत केले तरच या प्रकाराला आळा बसेल.

छान धागा ! - पुलेशु

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/16/2015 - 20:58 नवीन
छान धागा ! - पुलेशु

बाकी परवाच एक नवीन धागा

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/16/2015 - 21:18 नवीन
बाकी परवाच एक नवीन धागा काढायचा विचार मनात आला होता - " मिपा अ‍ॅनालिटिक्स " मिपावरील स्वगृह पानावरील डेटा एक्सेल मधे नेवुन थोडे फार टेक्स्ट मायनिंग करुन मिपावरील लेखनाचे ईनालिसिस करता येईल ... म्हणजे नक्की कोणत्या विशयावर किती लेख येतात ? कोणत्या विशयावर किती प्रतिक्रिया येतात ? कोणाच्या किती प्रतिक्रिया संपादित होतात ? जे ५-६ मेन विषय आहेत त्यांचा मंथ ऑन मंथ काही टाईम सीरीज ट्रेंड आहे का ? म्हणजे काही विशिष्ट महिन्यात काही विषिष्ठ साहित्य प्रकारांना उधाण येते का ? कोण लेखक विशेष अ‍ॅक्टीव्ह आहेत आणि जास्त लेखन करतात ? किती नवीन लोकांचे नवीन लेखन आले ? त्यावर साधारण किती प्रतिसाद आले ? आणि सरते शेवटी ... साहित्य संपादक ह्या रचनेनंतर नवीन लेखकांच्या / नवीन लेखनाच्या संख्येत खरेच काही वाढ झाली का ? जी काही वाढ झाली ती सिग्निफिकंट आहे का प्लेसेबो इफ्फेक्ट आहे ? ( अर्थात : शेवटचा प्रश्ण अत्यंतच स्ट्रेट फॉरवर्ड आणि " नो नॉनसेन्स " अर्थात ते बलिवर्दनेत्रभंजक का काय म्हणतात ते त्याप्रकारातील असल्याने धागा संपादन व्हायची भिती वाटली म्हणुन उगाच कष्ट घेतले नाहीत ... हाही प्रतिसाद घाबरत घाबरत लिहित आहे. )
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

लिहाच हो तुम्ही.

आदूबाळ
गुरुवार, 07/16/2015 - 21:47 नवीन
लिहाच हो तुम्ही. टेक्स्ट मायनिंग + अ‍ॅनालिटीक्सचा निष्कर्ष काहीही येवो, बट द जर्नी इज वर्थ इट.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अश्या प्रयत्नांचे स्वागतच आहे

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 07/16/2015 - 22:29 नवीन
अश्या प्रयत्नांचे स्वागतच आहे. अत्यंत उपयोगी प्रकल्प होईल. जरूर करा. फक्त एक सूचना... साहित्य संपादक ह्या रचनेनंतर नवीन लेखकांच्या / नवीन लेखनाच्या संख्येत खरेच काही वाढ झाली का ? जी काही वाढ झाली ती सिग्निफिकंट आहे का प्लेसेबो इफ्फेक्ट आहे ? सासंमंडळ नुकतेच स्थापन होऊन त्यांचे कार्य सुरू होऊन थोडे दिवसच झाले आहेत आणि त्यांच्या कामाचा प्रभाव जाणवायला अजून काही काळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे, या प्रश्नाच्या उत्तरांचे स्टॅटिस्टिकली योग्य प्रभावाचे आणि योग्य आकाराचे सँपल साईज मिळायला अजून काही वेळ द्यावा लागेल असे वाटते.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

एस
गुरुवार, 07/16/2015 - 23:17 नवीन
हेच म्हणायला आलो होतो.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दोहोंशी सहमत

नाखु
Fri, 07/17/2015 - 09:13 नवीन
मूळ अवांतर : कप्तानाने चांगल्या विषयाला हात घातला आहे. सा.संपादक सक्रीय असतात याचे खणखणीत उदाहरण आहे हे. मूळ खाजगी अवांतर : याला नेहमी पन्नाशीचे धागे कसे काढता येतात समक्ष भेटून इगत माहीत करून घ्यावी काय? मूळ जाहीर अवांतर :मिपावर तत्काळ फरक दिसण्याचा आणि मोदींच्या अच्छे दिन आये है चा काहीही संबध नाही याची नम्र नोंद सभीक्षक आणि (सं)वादक यांनी घ्यावी ही विनंती
↩ प्रतिसाद: एस

मार्कींग सिस्टिम

शब्दानुज
गुरुवार, 07/16/2015 - 21:42 नवीन
माझ एक मत आहे जे आधीपण मांडले होते. ते म्हणजे लेख प्रतिसादानुसार वरखाली सरकतात. त्याएवजी चक्क मार्कींग सिस्टिम चालु करायची. प्रत्येक सदस्याला मार्क देण्याचा अधिकार द्यायचा आणि त्यानुसार लेख वर खाली सरकायला हवेत हे जरा जास्तच वाटत असल्यास प्रत्येक लेखाखाली ' लेख आवडला ' असा अॉप्शन ठेवा. जेवढे जास्त किल्क यावर होतील तेवढा लेख वर. प्रतिसाद संख्या आणि या किल्कचाही मेळ घालता येईल. महिनाअखेरीस निवडणुकीद्वारे निवडलेल्या लेखांचा सन्मान करण्यात आल्यास उत्तम लेखांसाठी चुरस निर्माण होईल.

हे जरा जास्तच वाटत असल्यास

अस्वस्थामा
गुरुवार, 07/16/2015 - 22:03 नवीन
हे जरा जास्तच वाटत असल्यास प्रत्येक लेखाखाली ' लेख आवडला ' असा अॉप्शन ठेवा. जेवढे जास्त किल्क यावर होतील तेवढा लेख वर.
एक कल्पना म्हणून तरी हे आवडलेय असे नमूद करतो. अजून बरीच सुधारणा सुचवता येईल पण पुढचं पुढे. :)
↩ प्रतिसाद: शब्दानुज

माफ करा

पैसा
गुरुवार, 07/16/2015 - 22:06 नवीन
पण ही पद्धत योग्य वाटत नाही. मायबोलीवर हा प्रयोग काही दिवस चालू होता. तो बंद केला. मिपावरही बहुधा काही थोडक्या काळासाठी झाला होता. पण कंपूबाजी करून एखाद्याच्या लेखाला वर ओढणे किंवा मुद्दाम पाडणे हे प्रकार अशा सिस्टीममधे नक्कीच होतात. त्यामुळे ही पद्धत फक्त वाद निर्माण करील. अजून काही होईल असे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: शब्दानुज

वाचनासाठी

मित्रहो
गुरुवार, 07/16/2015 - 22:01 नवीन
खरे सांगायचे म्हणजे मी मिपावर लिखणापेक्षा वाचण्यासाठी असतो. नवीन प्रकारचे लेखन, नवीन अनुभव वाचायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाले तर भितीच्या भिंतीसारखी मालिका किंवा लेहचा सायकलवर केलेला प्रवास. जुने जाणते लेखक जर परत सक्रीय झाले तर आमच्यासारख्या वाचकांचा फायदाच होइल. तसा मला मिपावर टंकण्यात कधी समस्या आली नाही. लेखक हा प्रतिसादांसाचा भुकेला असतो हे खरे आहे पण प्रतिसादांवरुन लिखाणाचा दर्जा ठरविणे म्हणजे एसएमएस वरुन गायक निवडण्यासारखी आहे. कुठल्याही धाग्यावर जर चाळीसच्या वर प्रतिसाद असतील तर तिथे विषयांतर झालेले असते असे माझे निरीक्षण आहे.

@पैसा @मित्रहो :-

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 22:10 नवीन
@पैसा @मित्रहो :- मार्मिक प्रतिसाद!!!!

ज्यांना आपण (तुमच्या शब्दात)

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 22:35 नवीन
ज्यांना आपण (तुमच्या शब्दात) "दळभद्री" समजतो अशा लोकांसाठी आपण आपल्या आवडीचे काही सोडावे इतके त्यांचे महत्व का वाढवावे ? आपण आपल्या आवडीचे काही सोडण्याने आपण अश्या लोकांचा उद्देश यशस्वी करून त्यांना प्रोत्साहन देत असतो
हे मात्र खरेय. असे लोक खरोखर त्या लायकीचे नाहीत.फक्त अनामिक आयडीखाली दडून वार करणे एवढाच त्यांचा पुरूषार्थ!

चिमणराव तुम्ही पुढाकार घेतला

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:12 नवीन
चिमणराव तुम्ही पुढाकार घेतला म्हणून किमान इतकं तरी बोलता येतंय? नाहीतर शक्यच नाही इतकं मोकळं बोलणं. धन्यवाद आपणास की आपण एवढं धाडस दाखवलं!!!

भावा, तुझं मिपावय किती? तू

प्यारे१
गुरुवार, 07/16/2015 - 23:16 नवीन
भावा, तुझं मिपावय किती? तू बोलतो किती? नवसम्पादकांच्या प्रामाणिक प्रयत्नाला रोखीनं हरताळ का फासतोय?
↩ प्रतिसाद: जडभरत

माझ्या मिपावयाचा इथे काय

जडभरत
गुरुवार, 07/16/2015 - 23:21 नवीन
माझ्या मिपावयाचा इथे काय संबंध? चिमणरावांच्या प्रयत्नाला मी कधी हरताळ फासला रे!
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा