पायाखालची वीट दे....!
पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे
दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे
हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे
पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे
संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे
देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे
वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
'अभय' आणि 'धार' दे
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचने
5599
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
देवा मला चारदोन
देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे>>>
भारी
मस्त
खुपच छान मुटे साहेब
देवा मला चारदोन
छान आहे!
वा वा वा वा !
वा वा वा वा !
क्या बात है ! सुरेखच
छान.
आवडली रचना. आशय पोहचला.
देवा, विठ्ठला आता पाऊस पडू दे बाबा.
-दिलीप बिरुटे
मुटेसाहेब,
मुटेसाहेब,
कविता आवडली. परिणामकारक आहे.
डोक थंडगार ठेउन कोणाला विटेने कसे कुटाल ?
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे
वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
देवा मला चारदोन
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक.
वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.
"भले त्यास देवू कासेची लंगोटी
In reply to देवा मला चारदोन by सतिश गावडे
"भले त्यास देवू कासेची लंगोटी " म्हणणारे तुकाराम वारकरी नव्हते का?
भले तरी सोडू कासेची लंगोटी
In reply to "भले त्यास देवू कासेची लंगोटी by शैलेन्द्र
भले तरी सोडू कासेची लंगोटी
परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!!
असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!
मतलब मी नंगा झालो तरी चालेल
In reply to भले तरी सोडू कासेची लंगोटी by जडभरत
मतलब मी नंगा झालो तरी चालेल पण दुष्टाच्या डोस्क्यात फटका घातल्याशिवाय राहणार नाही.
अॅल भले!!!
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्
असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्
असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
ज्ञानेश्वरी ४-५१ ते ५९.
ज्ञानेश्वरी ४-५१ ते ५९.
आभार
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार :)