✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

प
पैसा यांनी
Wed, 06/17/2015 - 10:37  ·  लेख
लेख
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47965 वाचन

💬 प्रतिसाद (289)

प्रतिक्रिया

हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर

मृत्युन्जय
Wed, 06/17/2015 - 10:45 नवीन
हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर नव्हता?
  • Log in or register to post comments

शक्यता नाकारता येत नाही :)

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 11:07 नवीन
शक्यता नाकारता येत नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छ्या

नाखु
Wed, 06/17/2015 - 10:47 नवीन
काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला आणि भेंडीची भाजी मिळाली. कसं होणार "ताव-ताव" प्रतिसादींचे. माफ करा ताई तुम्ही सनसनी निर्माण करण्यात लै कमी पडल्या.(रेशीपी पुन्हा लिहून काढा) "ताव-ताव्"=पानभर आणि त्वेशाने दोन्ही अर्थानी पाहिजे तो घ्या.(जय लोक्शाही,जय मिपा,जय मिपाकर) याचकांची पत्रे मधून नाखुस लाह्या-फुटाणे
  • Log in or register to post comments

हॅ:

पैसा
Wed, 06/17/2015 - 10:52 नवीन
अजून काही नावं लिहायची होती. पण नसत्या भानगडीत सापडायला नक्को म्हणून गप बसले. चुरचुरीत, अचाट, अतर्क्य ते सगळं लोकांनी लिहायचं आहे. हम बोलेगा तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

...

आशु जोग
Sun, 06/21/2015 - 00:06 नवीन
असे वर्तमानपत्री धागे काढणे हा काही जणांचा हुप्प्यासिद्ध हक्क आहे पण तोही हिरावलात त्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट

विशाल कुलकर्णी
Wed, 06/17/2015 - 13:16 नवीन
काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला नायतर काय राव. पॉपकान आन कोल्डरिन आर्डर करुन आलो व्हतो, आता आर्डर केन्सल करावी लागनार राव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ऱ्हांउंद्या. ठिवा जरा.

खेडूत
Wed, 06/17/2015 - 13:24 नवीन
ऱ्हांउंद्या. ठिवा जरा. वाट बगा वाईच. आजून धागे यतायत मागनं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

ललित मोदींना माणुसकी म्हणून

अजया
Wed, 06/17/2015 - 10:52 नवीन
ललित मोदींना माणुसकी म्हणून मदत केल्या गेली आहे!ते ब्रिटनमध्ये दिवाळखोरी जाहिर करुन गरीब असल्याने स्वतःच्या जेटने पत्नीचं आॅपरेशन नाही झालं मग आहे विमान हाताशी म्हणून जीवाचे पोर्तुगाल करत आहेत.असे कुजकट धागे काढुन गरीब बिचार्या मोदींना,सुष्माबैंना मिपावर टार्गेट केल्याने एक मिपाकर म्हणून शरम वाटल्या गेली आहे!
  • Log in or register to post comments

पैतै यूटू? बरं झालं, आता मीही

यशोधरा
Wed, 06/17/2015 - 11:00 नवीन
पैतै यूटू? बरं झालं, आता मीही लवकरच तुझ्या पावलावर पाऊल ठेवून अगदी अस्सेच धागे काढीन! =))
  • Log in or register to post comments

कालच्या लोकत्तेत , अन्वयार्थ सदरात,

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 11:01 नवीन
"करूणासिंधू शुषमाजी" ह्या नावाच्या, लेखाची लिंक देत आहे. http://epaper.loksatta.com/522154/indian-express/16-06-2015#page/7/1 "(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )" ह्या बाबत असहमत. शतकी धाग्यांचा तुम्हाला सोस नाही आणि तुम्ही पळपुटेपणा करणार नाही, हे खर्‍या मिपाकरांना ठावूक आहे.
  • Log in or register to post comments

संपादकांनीतरी असं करू नये.

एस
Wed, 06/17/2015 - 11:02 नवीन
संपादकांनीतरी असं करू नये. असो.
  • Log in or register to post comments

नो हार्म इंटेंडेड

पैसा
Wed, 06/17/2015 - 11:07 नवीन
आता गंभीरपणे सांगते. जे काही चालू आहे ते मला एक नागरिक म्हणून अजिबात आवडलेलं नाही. मिपावर सामान्य सदस्य म्हणून चर्चा करायचा मला हक्क आहेच. एका बाजूला झुकलेलं लिखाण वाटू नये म्हणून थोडं विनोदी पद्धतीने लिहिलं. पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 11:15 नवीन
ह्या विषयावर गंभीरपणे काय बोलणार? प्रत्येक पक्षांत अशा काही व्यक्ती असतातच. भाजपाची "ब्रेन टँक/ थिंक टँक" ह्या विषयावर "सुषमा स्वराज" ह्यांना पाठीशी घालते / की त्यांना पक्ष सोडायला भाग पाडते? हे बघणे रोचक ठरेल. स्वच्छ कारभार करायला, स्वच्छ पदाधिकारीच ह्वेत, त्याशिवाय "अच्छे दिन" येणार नाहीत, असे वाटते. बाद्वे, सोत्रिं बरोबर, चावडीवरच्या गप्पा मारायला जायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 11:27 नवीन
मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक यावर उत्तर देतीलच याची खात्री वाटते रच्याकने - मी असा प्रतिसाद लिल्हा याचा अर्थ मी कोणत्या दुस्र्या पक्षाला समर्थन देतो असा घेउ नये (कै दिवस आलेत...मिपावर सुध्धा असे वाक्य लिहायला लाग्ते तर जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार?

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 11:31 नवीन
शिक्षणापेक्षा आणि पैशांपेक्षा, सुसंस्कार महत्वाचे. (धाग्याने शंभरी गाठावी, ह्या साठी दर १०-१५ मिनिटांनी, प्रतिसाद / उप-प्रतिसाद, टंकणारा) मुवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुवी

नाखु
Wed, 06/17/2015 - 11:41 नवीन
तुम्ही चावडीवर जाऊ नका सध्या भुजांमध्ले "बळ" ओसरल्याने लेखण्या गंजल्यात (तश्याही त्या काकांवर कधीच चालवाव्या वाटल्या नाहीत्च). इथेच थांबा गुरुजी आले की उंदीर येतीलच मग काय १०० ची हमी तो पर्यंत डांगे साहेब आणि क्लिंटन ना आवतान धाडा. पानभर प्रतीसादाचे हक्क त्यांचेकडेच आहेत. धागा सजवायचाय, फक्त दांडीया नकोय पै ताईंना. पिटातील प्रेक्षक नाखु पन्नाशीकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्यावरून

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 06/17/2015 - 14:27 नवीन
आगरकर - टिळक ह्यांमध्ये झालेला वाद आठवला … आगरकर म्हणायचे की आधी समाज सुधारावा मग स्वराज्य! टिळक उलटे …. आधी स्वराज्य मग समाज सुधारणा … धाग्याच्या शंभरी मध्ये आम्चेपण योगदान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी आगरकरांच्या बाजूने

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 14:32 नवीन
मी आगरकरांच्या बाजूने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

''आगरकर - टिळक आज असते तर काय

खेडूत
Wed, 06/17/2015 - 14:46 नवीन
''आगरकर - टिळक आज असते तर काय म्हणाले असते?'' यावर एक धागा काढा असे सुचवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

त्यासाठी

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 06/17/2015 - 16:16 नवीन
वाचावे लागेल आगरकर आणि टिळक! तेवढा वेळ काढावा लागल्यास सरकार बदलून जायचं :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

अगदी!

यशोधरा
Wed, 06/17/2015 - 19:42 नवीन
अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

राजकिय (अथवा कुठल्याही)

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/18/2015 - 12:38 नवीन
राजकिय (अथवा कुठल्याही) विषयाबद्दल मिपावर धागा टाकण्यासाठी वाचावेच लागते हे कोणी सांगितले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

अरे टक्या..मिपावरचे (आंधळे)

चिनार
Wed, 06/17/2015 - 11:38 नवीन
अरे टक्या..मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक ही द्विरुक्ती झाली (जसं पिवळा पितांबर, वटवृक्षाच्या झाडाखाली !). भाजप समर्थक म्हणजे आंधळेच हा ठराव मिपावर (किंवा अन्य कोठेही) न मांडताच पास झाला असल्याचं काहींनी जाहीर केले आहे. तेंव्हा फक्त भाजप समर्थक म्हटले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/02/2015 - 11:02 नवीन
मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप कींवा कोणाचेहि समर्थक हे अंधच असतात. न्यायीपणाचा जो काही असतो तो फक्त 'तोरा'. :) त्यामुळे नुसतं समर्थक म्हणण्यास अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

सांभाळुन रहा !

सामान्यनागरिक
Tue, 08/18/2015 - 00:06 नवीन
जरा सांभाळुन रहा. मिपावर कोणी बजरंगदलाचे कार्यकर्ते नाहीत याची खात्री करून घ्या. तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मोटर सायकलवर एकटे फिरत जाऊ नका(कोणी रमेश कदम मागे असू शकतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सदाहरित

वॉल्टर व्हाईट
गुरुवार, 06/18/2015 - 00:38 नवीन
चर्चा छान झाली आहे, काही प्रतिसाद माहितीपुर्ण आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. हा धागा असा वेगळा काढण्याऐवजी 'सदाहरित बातम्या' प्रकारच्या धाग्यात चालला असता असे वाटले. आता फक्त शिर्षक बदलले तरी जमेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असं करू नये म्हणजे कसं करू

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 11:07 नवीन
असं करू नये म्हणजे कसं करू नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कुणी? कुणी काढला हा धागा???

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/17/2015 - 11:09 नवीन
कुणी? कुणी काढला हा धागा??? हा भाजपचा lowकशाही'चा अपमाण आहे. असे धागे काढणार्‍यांना स हार च्या वाळवंटात पाच पाच मिनिटे बांधुन ठेवले पाहिजे. हा आमच्या राष्ट्रीय अस्मितेचा अपमाण आहे.. .......हा आमच्या ...........ह्याचा अपमाण आहे.. ..............हा आमच्या ...........त्याचा अपमाण आहे.. हा आमच्या ........................................................... आहे... .............हा आमच्या ........................................................... आहे... ...........................हा आमच्या ........................................................... आहे... ........................................हा आमच्या ........................................................... आहे... ..........................................................हा आमच्या ........................................................... आहे... .................................... वरिल जागा प्रतिसादांच्या संख्येकडे डोळा ठेऊन योग्यवेळी - भरल्या जातील. जय हिंद!
  • Log in or register to post comments

या संबंधी काही बातम्या :

मदनबाण
Wed, 06/17/2015 - 11:16 नवीन
या संबंधी काही बातम्या :- पतीच्या कबुलीनं सुषमा स्वराज यांना आणखीन एक धक्का ललित मोदी प्रकरणी वसुंधरा राजे अडचणीत, लंडनमध्ये साक्षीदार राहिल्याचा दावा स्वराज-मोदींची मागील वर्षी लंडनच्या हॉटेलमध्ये भेट झाली होती : सूत्र मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Aao Raja... ;):-Gabbar Is Back
  • Log in or register to post comments

विरस झाला.

प्रभाकर पेठकर
Wed, 06/17/2015 - 11:20 नवीन
कांही अभ्यासपूर्ण लेख असणार म्हणून मोठ्या विश्वासाने लेख उघडला आणि सपशेल तोंडघशी पडलो. आता प्रतिसादातून कांही निश्पन्न होते का पाहावे लागणार.
  • Log in or register to post comments

समजू शकते

पैसा
Wed, 06/17/2015 - 11:31 नवीन
पण अशा बाबतीत उघडपणे आपण काही बोलू शकत नाही. मुळात अर्णव गोस्वामीकडे या खाजगी ईमेल्स कशा पोचल्या हा गंभीर प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पोचल्या का पोहचवल्या गेल्या??

टवाळ कार्टा
Wed, 06/17/2015 - 12:49 नवीन
पोचल्या का पोहचवल्या गेल्या?? कैपण होउ शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अर्णव हा एक नीच माणूस आहे हे

हाडक्या
Wed, 06/17/2015 - 14:26 नवीन
अर्णव हा एक नीच माणूस आहे हे यातून सिद्ध होतेय. ६५ वर्षात प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री देशाला लाभला असताना असली कृत्ये म्हणजे देशद्रोहच नव्हे काय ? आमचा देशच करंट्यांचा आहे झालं. (इथे स्वराज यांची एका वर्षातील परराष्ट्र मंत्री म्हणून वेगवेगळ्या देशातील कामगिरी आणि त्याचे वर्णन कल्पावे. आणि हे इथून पुढच्या प्रत्येक प्रतिसादात तुम्हाला सहन करावे लागणार आहे हे आधीच सांगतो. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी ट्विटर वरून आधीच टाईम्स

काळा पहाड
Wed, 06/17/2015 - 14:34 नवीन
मी ट्विटर वरून आधीच टाईम्स नाऊ ला अनफॉलो केलेलं आहे आणि आता ते चॅनेल पण काढून टाकतोय. आता तो धागडधिंगा अती झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री ??

कपिलमुनी
Wed, 06/17/2015 - 15:08 नवीन
ही यादी बघा, https://en.wikipedia.org/wiki/Minister_of_External_Affairs_(India) पूर्वी हे पद लाल बहादूर शास्त्री , अटल बिहारी वाजपेयी, यशवंत राव चव्हाण यांनी भूषविले आहे. त्या कर्तबगार आहेतच पण प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री म्हणण्याचे प्रयोजन कळाले नाही. ( पैसा तै, १०० झाली की पार्टी ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

सहमत.

श्रीगुरुजी
Wed, 06/17/2015 - 23:17 नवीन
सहमत. या यादीत जसवंत सिंग यांचे देखील नाव हवे. प्रथमच म्हणजे गेल्या १० वर्षात प्रथमच असे त्यांना म्हणायचे असावे, कारण युपीए च्या काळात सुरवातीला नटवरसिंग, नंतर एस एम कृष्णा व नंतर सलमान खुर्शिद हे परराष्ट्रमंत्री होते. 'ऑईल फॉर फूड' या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने नटवरसिंगांना जावे लागले, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका परीषदेत भाषण करताना कृष्णांनी स्वत:च्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचे भाषण वाचून दाखवायला सुरूवात केली होती. सलमान खुर्शिद दिग्विजयप्रमाणेच वाचाळतेबद्दलच प्रसिद्ध होते. यांच्या तुलनेत सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सुषमा स्वराज नक्कीच उजव्या

खटासि खट
Wed, 06/17/2015 - 23:21 नवीन
सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात ?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तशाही त्या उजव्या (उजव्या

श्रीगुरुजी
Wed, 06/17/2015 - 23:33 नवीन
तशाही त्या उजव्या (उजव्या विचारांच्या पक्षात) आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

जसवंत सिंग आणि कर्तबगार ?

रॉजरमूर
Wed, 06/24/2015 - 00:48 नवीन
जसवंत सिंग आणि कर्तबगार ? Image removed. आणि यांची कर्तबगारी काय अझर मसूद आणि त्याच्या साथीदारांना कंधार ला पोचवणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वरकरणी या प्रकरणाविषयी

चिनार
Wed, 06/17/2015 - 11:20 नवीन
वरकरणी या प्रकरणाविषयी कळल्यावर हा मिडीयाचा धिंगाणा आहे असे वाटले होते. पण आता वाटते आहे की ही सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनातली मोठी चूक आहे. मानवता असो किंवा काही असो, ललित मोदीसारख्याला मदत करणे निषेधार्ह आहे. सुषमा ताई तुम्ही असे करायला नको होते. सुषमा स्वराज या माझ्या अत्यंत आवडत्या नेत्या आहेत ! थोडसं अवांतर , आयपीऐल घोटाळा उघडकीस आल्यावर ललित मोदी यांना परदेशात जाऊ का दिले असेल ? ऐकीव माहितीनुसार, या घोटाळ्यात सामील असलेल्या सगळ्या मोठ्या लोकांविरुद्ध ललित मोदी जवळ पुरावे होते. मोठ्या लोकांमध्ये सर्वपक्षीय नेते आणि काही मोठे उद्योगपती सामील होते. ललित मोदीन्नी स्पष्ट शब्दात ,"मला हात लावाल तर याद राखा, सगळ्यांना अडकवेल" असं धमकी दिली होती. म्हणूनच त्यांना परदेशी पाठवले. अर्थात ही सगळी ऐकीव माहिती आहे.
  • Log in or register to post comments

आय.पी.एल.

मुक्त विहारि
Wed, 06/17/2015 - 11:26 नवीन
म्हणजे सगळा पैशाचा खेळ. (शंभरी गाठायला (धाग्याने), हा जाणीवपुर्वक दिलेला उप-प्रतिसाद.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

स्वराज कौशल हे मोदींच्या १०

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/02/2015 - 11:07 नवीन
स्वराज कौशल हे मोदींच्या १० पैकि ७ कंपन्यांचे लीगल अ‍ॅडवायजर आहेत ही गोष्ट अगदीच नवीण नाही. वकिली वर्तुळात ही गोष्ट लोकांना ठावूक होती. बर आयपीएल घोटाळ्यात एकटा ललित मोदी दोषी आणि बाकी धुतले तांदूळ होते का हे ही पाहणे महत्वाचे. टाइम्स नाऊ ची सेटलमेंट कशावर होते ते पाहणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

बा द वे भाजप सत्तेत नसताना

बाळ सप्रे
Wed, 06/17/2015 - 11:26 नवीन
बा द वे भाजप सत्तेत नसताना स्वराजबाईंनी ललित मोदींना नक्की काय आणि कशी मदत केली??
  • Log in or register to post comments

हे नंतरचं आहे

पैसा
Wed, 06/17/2015 - 11:32 नवीन
काल समजले त्याप्रमाणे जुलै ऑगस्ट २०१४.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

ललित मोदी अजून एका

अनुप ढेरे
Wed, 06/17/2015 - 11:39 नवीन
ललित मोदी अजून एका परराष्ट्रमंत्र्याला घेऊन बुडणार आहेत. थरूर झाले आता स्वराज. अस्संगाशी संग खुर्चीशी गाठ.
  • Log in or register to post comments

नाही बुडत

पैसा
Wed, 06/17/2015 - 11:43 नवीन
सुनंदा पुष्करचे काय झाले? आय पी एलमधले खरे गड्डे आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळे कधी पोचू शकेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

पैसा ताई - धाग्याने शंभरी

प्रसाद१९७१
Wed, 06/17/2015 - 11:55 नवीन
पैसा ताई - धाग्याने शंभरी गाठावी ( आणि तशी इच्छा आधीच सांगणे ) म्हणुन प्रत्येक प्रतिसादावर प्रतिसाद देण्याची तुमची आयडीया कौतुकास्पद आहे. मी पण नक्की मदत करीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

स्पष्टीकरण वर दिले आहे

पैसा
Wed, 06/17/2015 - 12:03 नवीन
धाग्यात सगळेच मुद्दे लिहिणे शक्य नव्हते. जसे मुद्दे येतील तशी चर्चा होईलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

थरूरांची खुर्ची तर गेलीच.

अनुप ढेरे
Wed, 06/17/2015 - 12:12 नवीन
थरूरांची खुर्ची तर गेलीच. आयपीएल टीमही गेली. राजकीय कारकिर्द ५-१० वर्ष मागे गेली. आणि सुनंदा पुष्करची टांगती तलवार कायम डोक्यावर रहाणार... हा बराच मोठा फटका आहे. याबाबतीत स्वराज यांनी केलेली मदत हा नॉन इशु आहे असं वाटतय. आणि याचा परिणामही काही झालेला नाहिये. परिस्थिती जैसे थे आहे. फक्त ललित मोदी पोर्तुगालला जाउन आले. पण त्यांची मुलगी मोदींची वकील असणं, राजेंच यात ओढलं जाणं यामुळे लोकांचा संशय बळावतोय. बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्‍यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;)

आनंदी गोपाळ
Wed, 06/17/2015 - 13:26 नवीन
बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्‍यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.
लोकसत्तेतल्या लेखातले काही वाक्ये इथे टंकतो : या परराष्ट्रमंत्र्यांनी - ज्यांचे सरकारच मुळात भ्रष्टाचार काळा पैसा खणून काढण्याची शपथ घेत सत्तेवर आले आहे - त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. हा प्रश्न खरे तर भाजप व संघानेच विचारायला हवा. परंतू ते काँग्रेसच्या भ्रष्ट आचाराकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेसने जे खाल्ले तेच तुम्हीही खाणार असाल, तर मग फर्क काय तुमच्यात आणि त्यांच्यात? या सवालावर कट्टर अतिराष्ट्रवादी पांघरूण घालणे शक्य आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा