Skip to main content

राजकीय चर्चा

२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्याच्या भूमिकेतून

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 09/06/2019 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्याच्या भूमिकेतून राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या स्मृती इराणी यांच्या अनेक मुलाखती झाल्या. त्यातल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न तसं बघितलं तर अगदी ओघातला होता. मात्र स्मृती इराणी यांचं उत्तर मला काहीसं अंतर्मुख करून गेलं. प्रश्न होता : २०१९ च्या निवडणुकीची तयारी आपण कधीपासून सुरू केलीत? त्यावरचं स्मृती इराणी यांचं उत्तर फारच मार्मिक होतं.

ओ बीसी मोर्चा

लेखक ओम शतानन्द यांनी मंगळवार, 04/10/2016 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा ओ बी सी मोर्चा म्हनजे छगन भुजबळ आणि कम्पनी ने प्रायोजित केलेला कार्यक्रम होता अशी शन्का येते , कारण मोर्चात ओबीसी जनतेच्या समस्या पेक्शा छगन भुजबळ यान्ची अटक आणि त्यान्च्यावर झालेली कारवाई , जप्ति इ कशी अन्याय करणारी आहे यावरच पूर्ण भर होता,

पश्चात्ताप का पश्चात बुद्धी?

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 28/11/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सहिष्णूपणाचे वारे वेगात वहात आहेत. तेव्हा त्या वार्‍याच्या झोत्यात आल्यामुळे म्हणा किंवा राजकीय सोय म्हणा पण माजी गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की सलमान रश्दीच्या सॅटॅनिक व्हर्सेसवर आम्ही बंदी घातली ती एक चूक होती. १९८८ साली सलमान रश्दीने लिहिलेल्या पुस्तकावर जगात प्रथम बंदी घालून आपल्या परमसेक्युलरतेचे आणि सहिष्णूतेचे भारताच्या तात्कालिन काँंग्रेस सरकारने अनोखे प्रदर्शन केले होते. पण २७ वर्षे उलटल्यावर चिदंबरम अचानक पलटी मारते झाले आणि आपल्या चुकीची कबुली देते झाले.

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

लेखक पैसा यांनी बुधवार, 17/06/2015 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते.