Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 10:37
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
  • Log in or register to post comments
  • 47965 views

प्रतिक्रिया

Submitted by बाळ सप्रे on Wed, 06/17/2015 - 14:14

In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ

Permalink

हेच म्हणतो !!

हेच म्हणतो !!
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 06/17/2015 - 14:16

In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ

Permalink

:)

ललित मोदीला इंग्लंडातून पोर्तुगालला जौ द्या असं सांगणे आणि गुन्हेगाराला भारतातून पळून जायला मदत करणे हे सारखं आहे असं म्हणत असाल तर अवघड आहे. यात नक्की काय तोटा झाला भारताचा किंवा कोणावर काय अन्याय झाला हे थोडं विस्कटून सांगणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/17/2015 - 15:08

In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ

Permalink

>>> त्यांनी देशाच्या आर्थिक

>>> त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. नक्की कोणते धोरण बदलले? आधी कोणते धोरण होते आणि आता त्यात काय बदल झाला? आधीच्या धोरणामुळे देशाचा नक्की कोणता व किती फायदा होत होता? या बदलामुळे देशाचे नक्की कोणते व किती नुकसान झाले?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 06/17/2015 - 15:15

In reply to >>> त्यांनी देशाच्या आर्थिक by श्रीगुरुजी

Permalink

औचित्याचे काय?

एका गुन्हेगाराला मदत करत असताना , किंवा एका गुन्हेगाराची विनंती आली असताना देशाच्या परराष्ट्र खात्यास कळविणे औचित्यपूर्ण ठरले असते. "एखाद्या गुन्हेगाराला परस्पर मदत करणे आणि ते लपवून ठेवणे" हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे . बाकी औचित्याचे काय? ह्याला तुम्ही पुन्हा एकदा बगल दिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/17/2015 - 15:26

In reply to औचित्याचे काय? by कपिलमुनी

Permalink

>>> एका गुन्हेगाराला मदत करत

>>> एका गुन्हेगाराला मदत करत असताना , किंवा एका गुन्हेगाराची विनंती आली असताना देशाच्या परराष्ट्र खात्यास कळविणे औचित्यपूर्ण ठरले असते. त्या स्वतःच परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांनी काय स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का? >>> "एखाद्या गुन्हेगाराला परस्पर मदत करणे आणि ते लपवून ठेवणे" हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे . मोदीला नक्की कोणती मदत केली? मोदीला इंग्लंडने प्रवासासाठी कागदपत्रे देण्याबद्दल कोणताही निर्णय घेतला तरी त्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होणार नाही असे सांगणे म्हणजे गुन्हेगाराला मदत होते का? केवळ एका व्यक्तीवर दोन देशांमधील संबंध अवलंबून असतात का? पूर्वी इंग्लंडने भारतात वाँटेड असलेल्या अनेक अतिरेक्यांना व गुन्हेगारांना आश्रय देऊन भारताची प्रत्यार्पणाची मागणी धुडकावून लावली होती. त्यावळी द्विपक्षीय संबंधांवर किती परीणाम झाला होता? मोदीला प्रवासाची कागदपत्रे दिल्यास द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होईल अशी भूमिका घेणे हे अत्यंत हास्यास्पद होते. सुषमा स्वराजांनी फक्त ही हास्यास्पद भूमिका खोडून काढली इतकेच. असे होण्यात मोदीला कणभरही मदत झालेली नाही. मोदी अजूनही भारतात वाँटेड आहे, त्याच्यावरील गुन्हे कायम आहेत आणि इंग्लंड कोणत्याही परिस्थितीत त्याला भारताच्या हवाली करणार नाही हे नक्की. >>> बाकी औचित्याचे काय? ह्याला तुम्ही पुन्हा एकदा बगल दिली आहे. जे झाले त्याच्यात काहीही अनुचित झालेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 06/17/2015 - 15:38

In reply to >>> एका गुन्हेगाराला मदत करत by श्रीगुरुजी

Permalink

स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का ?

एकट्या सुषमा स्वराज्य म्हणजे सर्व परराष्ट्र खात आहे का ? या मधे सचिव असतात अधिकारी असतात त्याना अंधारात का ठेवले ? आणि सदर मनुष्य गुन्हेगार असताना , एक गुन्हेगार आपणासोबत संपर्क ठेवुन आहे तर त्याची माहिते गृह आणि अर्थ खात्यास द्यायला हवी. यूपीए सरकारने जर ट्रॅव्हल डॉक्युमेंट देण्यास मनाई केली असेल आणि ती स्वराज यांनी त्यांच्या अधिकारामध्ये ( त्यांना नक्कीच तो आहे ) कॅन्सल केली असेल तर त्याचे डॉक्युमेंटेशन हवे. जर "हास्यास्पद भूमिका खोडून काढली" तर तसे जाहीर करायला हवे जेणे करून अधिकार्‍यांनाही कळेल इतर खात्यानांही कळेल . चुपके चुपके कारभार कशाला??
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/17/2015 - 23:09

In reply to स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का ? by कपिलमुनी

Permalink

सुषमा स्वराज म्हणजे संपूर्ण

सुषमा स्वराज म्हणजे संपूर्ण परराष्ट्र खाते नव्हे. परंतु परराष्ट्र खात्याचे सचिव आणि अधिकारी यांना त्यांनी अंधारात ठेवले होते याची खात्री आहे का? मुळात हा इश्यूच नाही. मोदीला परदेशी जायची इंग्लंडने परवानगी द्यावी अशी कोणतीही शिफारस केलेली नाही सुषमा स्वराजांनी केलेली नाही. इंग्लंडने नियम व कायद्यानुसार त्याच्या अर्जाचा विचार करावा व निर्णय घ्यावा. जो काही निर्णय असेल त्यामुळे द्विपक्षीय संबंधात फरक पडणार नाही असेच त्यांनी लिहिले होते. समजा त्यांनी सचिवांना व अधिकार्‍यांना अंधारात ठेवले होते असे क्षणभर गृहीत धरू या. पण ही गोष्ट इतकी किरकोळ व बिनमहत्त्वाची आहे की ती सचिवांना/अधिकार्‍यांना समजून्/न समजून काहीही फरक पडला असता असे वाटत नाही. मुळात मोदीच्या बाबतीत असे नक्की काय घडले होते ज्यामुळे मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देऊ नका अन्यथा आपल्या संबंधांवर परीणाम होईल असा इशारा युपीए सरकारला द्यावासा वाटला? युपीए सरकारने या इशार्‍यामागची कारणमीमांसा जनतेला कधीच सांगितलेली नाही. मोदी हा अमानुल्ला खान किंवा जगजितसिंग चौहान किंवा लिट्टे संघटनेपेक्षा खतरनाक गुन्हेगार होता का? ललित मोदी या एका व्यक्तीवर दोन देशातील संबंध अवलंबून असतात का? >>> आणि सदर मनुष्य गुन्हेगार असताना , एक गुन्हेगार आपणासोबत संपर्क ठेवुन आहे तर त्याची माहिते गृह आणि अर्थ खात्यास द्यायला हवी. तशी ती दिली असेल सुद्धा. नक्की कोणाला यबद्दल खात्रीशीर माहिती आहे का? >>> चुपके चुपके कारभार कशाला?? यात कोणताही कायदा मोडलेला नाही किंवा आऊट ऑफ वे जाऊन, नियम मोडून मदत केलेली नाही. मुळात ही गोष्टच इतकी किरकोळ व बिनमहत्त्वाची आहे की जगाला हे सर्व ओरडून सांगण्याची त्यांना गरज वाटली नसावी. २-३ दिवसांपूर्वी पहिल्यांदा याविषयी वाहिन्यांवर बातम्या येत होत्या तेव्हा इतक्या फालतू गोष्टीला इतके कव्हरेज मिळाल्याचे पाहून आश्चर्य वाटत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by मंदार दिलीप जोशी on Fri, 06/19/2015 - 13:47

In reply to कट्टर अतिराष्ट्रवादी.. ;) by आनंदी गोपाळ

Permalink

भ्रष्टाचार इज अ ग्लोबल

भ्रष्टाचार इज अ ग्लोबल फेनोमेना असं म्हटलं की झालं, नै का?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 06/17/2015 - 14:10

In reply to थरूरांची खुर्ची तर गेलीच. by अनुप ढेरे

Permalink

पण त्यांची मुलगी मोदींची वकील

पण त्यांची मुलगी मोदींची वकील असणं
मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं कुणाचं वकीलपत्र घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये असणार्‍या नात्यामुळं एका व्यक्तीच्या कार्यांबद्दल दुसर्‍या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही. कायद्यानं नाही, औचित्यानं सुद्धा नाही. किंबहुना सुषमा स्वराज यांनी जरी त्यांचं वकीलपत्र घेतलं असतं (त्या मंत्री नसताना) आणि नंतर जर त्या मंत्री झाल्या असत्या तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. हां, मंत्री असताना वकीलपत्र घेता येत नाहीच.
राजेंच यात ओढलं जाणं
मोदींची पत्नी राजेंची ३० वर्षांपासून मैत्रीण आहे. तिला राजेंनीच ऑपरेशन साठी दाखल केलं होतं. हा कसा गुन्हा होवू शकतो? ललीत मोदींची पत्नी = ललीत मोदी असं तर नाहीये ना?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 14:19

In reply to पण त्यांची मुलगी मोदींची वकील by काळा पहाड

Permalink

मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं

मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं कुणाचं वकीलपत्र घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये असणार्‍या नात्यामुळं एका व्यक्तीच्या कार्यांबद्दल दुसर्‍या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही. कायद्यानं नाही, औचित्यानं सुद्धा नाही. किंबहुना सुषमा स्वराज यांनी जरी त्यांचं वकीलपत्र घेतलं असतं (त्या मंत्री नसताना) आणि नंतर जर त्या मंत्री झाल्या असत्या तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही.
हाच न्याय कसाबचे वकिलपत्र घेणार्याला अथवा अतिरेक्यांची वकिलपत्रे घेणार्यांना सुध्धा लागू होतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 06/17/2015 - 14:25

In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा

Permalink

हो.

हो.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 14:33

In reply to हो. by काळा पहाड

Permalink

आणि तो खाप पंचायतवाल्या

आणि तो खाप पंचायतवाल्या केसमधला लॉयर? ज्याने टीव्हीवर मुक्ताफळे उधळलेली
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 06/17/2015 - 14:41

In reply to आणि तो खाप पंचायतवाल्या by टवाळ कार्टा

Permalink

एकतर मला ह्या खाप पंचायत

एकतर मला ह्या खाप पंचायत वाल्या प्रकाराबद्दल माहिती नाही. पण भारतीय कायद्या नुसार एखाद्याचं वकीलपत्र घेता येत नाही असा नियम नाही. प्रत्येकाला वकीलाचा अधिकार आहेच. भारतीय कायद्यानुसार दावूद इब्राहीमला / लख्वीला सुद्धा वकील घेण्याचा व एखाद्या वकीलाला त्याचं वकीलपत्र घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला याच्यात आश्चर्य कशाचं वाटतंय? टीपः हां याचा अर्थ सगळ्याच गुन्हेगारांना (आणि खासकरून देशद्रोही अतिरेक्यांना) कोर्टापर्यंत पोचू द्यावं असा होत नाही. पण ते अलाहिदा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 06/17/2015 - 14:34

In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा

Permalink

इथ

कसाबचा काय संबंध?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 06/17/2015 - 14:45

In reply to इथ by अनिरुद्ध.वैद्य

Permalink

http://www.misalpav.com

http://www.misalpav.com/comment/708080#comment-708080 हे वाचले नै का? कसाबचा संबंध नैच कुठे
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 06/17/2015 - 16:19

In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा

Permalink

नैच समजल :(

नैच समजल :(
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 06/17/2015 - 14:39

In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा

Permalink

हाच न्याय कसाबचे वकिलपत्र

हाच न्याय कसाबचे वकिलपत्र घेणार्याला अथवा अतिरेक्यांची वकिलपत्रे घेणार्यांना सुध्धा लागू होतो का?
याचे उत्तर होच असेल, फक्त मग आपल्याकडचे "काही" लोक, त्यांना (पक्षी: वकिलांना) भर चौकात हाल हाल करुन मारु इच्छित असतील इतकेच (संधी मिळाली तर करतील का कै म्हैत).
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/17/2015 - 14:41

In reply to मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं by टवाळ कार्टा

Permalink

पूर्वी राम जेठमलानींनी इंदिरा

पूर्वी राम जेठमलानींनी इंदिरा गांधी खून खटल्यातील आरोपी, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, संजय दत्त इ. चे वकीलपत्र घेतले होते. कपिल सिब्बलांनी चंदिगड उच्च न्यायालयातील भ्रष्ट न्यायाधीश रामस्वामी, गोव्यातील कुख्यात तस्कर चर्चिल आलेमाव, बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन इ. चे वकीलपत्र घेतले होते. पूर्वी जेटलींनी चिंदंबरमचे वकीलपत्र घेतले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 06/17/2015 - 14:19

In reply to पण त्यांची मुलगी मोदींची वकील by काळा पहाड

Permalink

यात गुन्हा घडला आहे असं मी

यात गुन्हा घडला आहे असं मी म्हणत नाहीच्चे. या सबंधांमुळे इथे काहितरी पाणी मुरतय असा संशय कोणालाही येईल आणि तो अस्थानी नसेल. सज्ञान वकील वगैरे केवळ तांत्रिक बाबी आहे. आई परराष्ट्र मंत्री असताना एखाद्या वकिलाने इमिगेशनच्या केसेस घेणं यात कॉन्फ्लिक्ट ऑफ ईटरेस्ट ची शंका येणं स्वाभाविक आहे. (पण बहुधा वकील फक्त ऑगस्ट २०१४ पर्यंत होत्या त्या)
  • Log in or register to post comments

Submitted by सव्यसाची on Wed, 06/17/2015 - 12:09

In reply to ललित मोदी अजून एका by अनुप ढेरे

Permalink

माझ्या माहितीप्रमाणे थरूर

माझ्या माहितीप्रमाणे थरूर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 06/17/2015 - 12:17

In reply to माझ्या माहितीप्रमाणे थरूर by सव्यसाची

Permalink

आयपीएल प्रकरणाआधी

आयपीएल प्रकरणाआधी परराष्ट्रराज्यमंत्री होते.२०१२ मध्ये परत मंत्री बनले ते 'एचार्डी'मधे विकीवरून
As Minister of State for External Affairs he re-established long-dormant diplomatic relationships with African nations, where his fluency in French made him very popular with Francophone countries and their heads of state. He was also the first Indian Minister to visit Haiti after the devastating earthquake of 2010. He initiated new policy-planning activities on the Indian Ocean and represented India at global events during his eleven-month tenure as Minister. In April 2010, however, he resigned from his Ministry following unsubstantiated allegations that he had misused his office to get shares in the IPL cricket franchise.
  • Log in or register to post comments

Submitted by सव्यसाची on Wed, 06/17/2015 - 12:29

In reply to आयपीएल प्रकरणाआधी by अनुप ढेरे

Permalink

धन्यवाद. माहिती दिलेबद्दल &

धन्यवाद. माहिती दिलेबद्दल & माझी चूक दुरुस्त केल्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by आकाश कंदील on Wed, 06/17/2015 - 11:56

Permalink

कोन्ग्रेस कडे आता मुद्देच उरले नसावेत

मला असे वाटते कोन्ग्रेस कडे आता मुद्देच उरले नसावेत. म्हणून हे असे जनतेशी कमी जवळीक असलेले मुद्दे ते मांडत आहेत. काल कोग्रेस् च्या आनंद शर्मां ललित मोदी ची तुलना चक्क मुंबई बॉम्ब स्पोट खटल्यातील आरोपी दाउद इब्राहीम बरोबर करत होते. माला वाटते ह्या मुद्या पेक्षा भाजपला घेरायला बाकी बरेच मुद्दे आहेत जसे कि जमीन अधिग्रहण, बुलेट ट्रेन, गंगा सफाई इत्यादी. खरे सागतो पैसा तैनी हा धागा काढला म्हणून मी लिहिले नाहीतर हल्ली मी बातम्या मधे हा विषय आला तर सरळ च्यानल बदलतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 12:05

In reply to कोन्ग्रेस कडे आता मुद्देच उरले नसावेत by आकाश कंदील

Permalink

वेळ महत्त्वाची

हे प्रकरण आताच उघडकीला का आले? हा प्रश्न आहेच. म्यानमारमधील अतितेक्यांवरील कारवाईची चर्चा संपली नाही तोच हे प्रकरण उघडकीला आले.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 07/02/2015 - 12:10

In reply to वेळ महत्त्वाची by पैसा

Permalink

आणि हो एका बाजूला अभिषेक मनू

आणि हो एका बाजूला अभिषेक मनू सिंघवी भाजपाचा समाचार घेत असताना सूरजेवाला मात्र 'मम्मामॅडम'च्या नावाबद्द्ल छोट्या मोदींची मोठ्या मोदींना मदत वगैरे म्हणत होते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by सव्यसाची on Wed, 06/17/2015 - 12:07

Permalink

या प्रकरणात गोष्टी आहेत. १.

या प्रकरणात गोष्टी आहेत. १. Legality २. Propriety आता कायदेशीर बाजूने कदाचित बरोबरही असेल असे म्हणायला वाव आहे कारण सुरुवातीला विरोधकांनी राजीनामा मागताना 'नैतिक मुद्द्यावरून राजीनामा द्या' असे म्हटले होते. काल कि परवा कॉंग्रेस ने गुन्हा नोंदवा वगैरे अशी भाषा सुरु केली. मला कायदा तितपत कळत नाही पण यात गुन्हा कोणता आणि काय नोंदवायचा हे समजले नाही. तसेच कॉंग्रेस ने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली. पण कॉंग्रेस ला वाटते आहे सर्वोच्च न्यायालयाने सुओ मोटो कार्यवाही करावी. मला वाटत नाही कि ते होईल. बरेच प्रोटोकॉल पाळले गेले नाहीत (जसे कि कॉंग्रेस ने केलेला आरोप : लंडन मध्ये भारतीय राजदुताशी चर्चा न करता निर्णय घेतला वगैरे) असे जरी विरोधकांचे म्हणणे असेल तरी यात कायदा कोणता पाळला गेला नाही हे समजले नाही. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ही केस किती बळकट आहे याबद्दल काही सांगता येत नाही. दुसरा एक मुद्दा आला कि ललित मोदींच्या पासपोर्ट ची केस दिल्ली उच्च न्यायालयात सुरु होती. त्यावेळी हा निर्णय घेणे चुकीचे होते. त्याला उत्तर असे आले कि एप्रिल २०१४ मधेच ह्या केस चे आर्ग्युमेंट संपुष्टात आले होते आणि ऑर्डर रिजर्व केली होती. त्यामुळे नवीन सरकारने कोर्टात जाऊन आपले मत बदलले असे झाले नाही. पुढे ऑगस्ट मध्ये त्यांचा पासपोर्ट त्यांना परत मिळाला आणि पासपोर्ट काढून नाही घ्यायला पाहिजे होता असे कोर्टाने जजमेंट मध्ये म्हटल्याचे कळते आहे. ललित मोदींना कोणतेही travel document द्यायला युपीए ने विरोध करताना जे कारण युके ला दिले ते होते कि आपल्या द्विपक्षीय संबंधाना हानी पोहोचेल. सुषमा स्वराज यांनी युके ला सांगितले कि तुमच्या कायद्यानुसार जे असेल ते करा, द्विपक्षीय संबंधांवर फरक पडणार नाही. वरकरणी पाहता एका माणसामुळे दोन देशांमधील संबंध संपुष्टात वगैरे नाही यायला हवेत आणि त्यामुळे सुषमा स्वराज यांनी केले ते बरोबर केले असे वाटेल. परंतु त्यानंतर ललित मोदी - सुषमा स्वराज यांचे संबंध खूप जुने आहेत आणि यामागे काही quid pro quo तर नाही ना अशी शंका सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. युपीए सरकारने स्वतः ललित मोदींचे extradition करायला नको असे ठरवल्याची बातमी काल आउटलूक मध्ये आली होती. हे प्रकरण आता इतके गुंतागुंतीचे झाले आहे कि प्रत्येक गोष्टीवर दोन्ही बाजू आपले आपले पुरावे देत आहेत आणि त्यामुळे नवीन लोकांची नावे, नवीन प्रकरणे बाहेर पडत आहेत. कालच वसुंधरा राजे यांचे एक 'प्रतिज्ञा पत्र' समोर आले. पण ते 'प्रतिज्ञापत्र' वाचून मला बोधच होईना. आपण प्रतिज्ञापत्र दिले तर stamp असतो किंवा प्रत्येक पानावर सही करतो पण इथे तसे काहीच नाही. त्या कागदाच्या मागे 'file copy' असा watermark आहे आणि खाली २-४ ओळींचा मसुदा आहे. ते खरे आहे कि खोटे यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता हे प्रकरण राजस्थान मध्ये सरकले आहे. Blue corner notice वरून पण एक प्रकारचे वादळ उठले आहे. इंटरपोल ने BCN नाही असे सांगितले तर युपीए म्हणते आहे कि BCN आहे. शेवटी काल अरुण जेटली यांनी स्पष्ट केले कि रेवेन्यु विभागाकडून Light Blue corner notice जारी केली होती. या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट हि आहे कि अजूनही पंतप्रधान काहीही बोलले नाहीत. राजनाथ सिंग यांचे प्रकरण समोर आले होते तेव्हा पंतप्रधानांनी स्वतः येउन बाजू स्पष्ट केली होती. पण आता ते अजून नाही घडले. काल पहिल्यांदाच अरुण जेटली यांनी सुषमा स्वराज यांची बाजू घेतली. त्यामुळे सुषमा स्वराज राजीनामा देतील किंवा तो घेतला जाईल असे 'सध्या' वाटत तरी नाही. पुढे काय होईल ते पाहूयात!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 12:22

In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची

Permalink

माहितीपूर्ण प्रतिसाद

माहितीपूर्ण प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/17/2015 - 12:31

In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची

Permalink

मस्त प्रतिसाद!!! बरेच काही

मस्त प्रतिसाद!!! बरेच काही उलगडून सांगणारा. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध.वैद्य on Wed, 06/17/2015 - 14:46

In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची

Permalink

छान आणि सविस्तर

फार छान आणि सविस्तर लिहिलेत, माहितीसाठी धन्यवाद! एकंदरीत सगळेच गुंतलेले आहेत आणि ललित मोदी अडचणीत आलेत तर सगळ्यांना त्रास होईल असे दिसतेय…
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 06/17/2015 - 16:27

In reply to या प्रकरणात गोष्टी आहेत. १. by सव्यसाची

Permalink

मान्य..

ललित मोदींना कोणतेही travel document द्यायला युपीए ने विरोध करताना जे कारण युके ला दिले ते होते कि आपल्या द्विपक्षीय संबंधाना हानी पोहोचेल. सुषमा स्वराज यांनी युके ला सांगितले कि तुमच्या कायद्यानुसार जे असेल ते करा, द्विपक्षीय संबंधांवर फरक पडणार नाही. वरकरणी पाहता एका माणसामुळे दोन देशांमधील संबंध संपुष्टात वगैरे नाही यायला हवेत आणि त्यामुळे सुषमा स्वराज यांनी केले ते बरोबर केले असे वाटेल.
मान्य.. एका व्यक्तीला मानवीय वा इतर कूठल्याही कारणाने संबंधित देशाने त्यांच्या कायद्यानुसार मदत केल्यास आमची हरकत नाही, हे म्हणणे ह्यात काही चुक नाही.. बाकी आयपीएल आणि त्यातला सगळा सावळागोंधळ पुर्वीच्या सरकारच्या काळातच आणि मला वाटतं, पवारसाहेब बीसीसीआय मध्ये असतांनाच झाला होता.. आता उगाच मोरल हायग्राऊंड घेण्यात अर्थ नाही..
परंतु त्यानंतर ललित मोदी - सुषमा स्वराज यांचे संबंध खूप जुने आहेत आणि यामागे काही quid pro quo तर नाही ना अशी शंका सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे.
Quid Pro Quoचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा स्वराज ह्यांनी ललित मोदीला कुठलीही Out of the way जाऊन मदत केली तर.. जर कुठल्याही इतर भारतीय नागरीकबद्दल जी भुमिका त्यांनी घेतली असती तीच जर त्यांनी मोदीच्या बाबतीत घेतली तर त्यात काही चुक आहे, असं मला तरी वाटत नाही.. Caeser's wife should be above all suspicion हे जरी मान्य असलं तरी फक्त कौटुंबिक संबंध आहेत म्हणून just to be above suspicion त्यांनी संबंधित व्यक्तीला मदत करु नये असं मी म्हणणार नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 06/17/2015 - 12:10

Permalink

कोणाही नेत्याला मखरात बसवून

कोणाही नेत्याला मखरात बसवून पूजा करणे आणि मुख्य म्हणजे ते डोळे बंद करून सतत करत राहणे हे बुद्धिच्या कमतरतेचे लक्षण होय. परंतु, बर्‍याचदा तसे करणारेही बुद्दु नसून काहीतरी व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासाठी तसे करत असतात. नेत्यांच्या वचकात राहणार्‍या जनतेपेक्षा नेत्यांवर सतत वचक ठेवणार्‍या जनतेला जास्त चांगली लोकशाही मिळते. सगळे नेते म्हणजे स्खलनशील माणसेच. संत मंडळींच्या जिवनातही एखादा काळा क्षण येऊन गेलेला आहे. त्यामुळे कोणी १००% पांढरा नी कोणी १००% काळा असे होऊ शकतच नाही. सगळे करड्या रंगांच्या छटा घेऊन असतात. तात्कालिक परिस्थिती पाहून त्यातल्या त्यात पांढर्‍या रंगाकडे झुकणारे नेते निवडत राहणे हेच जनतेच्या हातात असते... आणि लोकशाही ती संधी तरी लोकांना मिळते, इतकेच ! स्वच्छ प्रतिमा बाळगणार्‍या नेत्यांच्या आयुष्यात काही गैरसोईचे प्रसंग असणे हे काही अपवादात्मक नाही. पण पकडले गेल्यावर ही त्याबाबत शिक्षा न होणे चांगले लक्षण नाही. मात्र शिक्षा न झाल्यास ते काही जगातले पहिले उदाहरण नसेल... ही दुर्दैवी पण सत्य वस्तूस्थिती आहे !
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 06/17/2015 - 12:23

In reply to कोणाही नेत्याला मखरात बसवून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

प्रतिसाद आवडला

की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
याबद्दल काय म्हणाल?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 06/19/2015 - 18:34

In reply to प्रतिसाद आवडला by पैसा

Permalink

राजकारण, व्यापार, समाजकारण,

राजकारण, व्यापार, समाजकारण, किंबहुना कोणतेही '-कारण' करताना कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छोट्याछोट्या गोष्टी सगळ्यांच्याच हातून घडतात. मात्र धडधडीत बेकायदेशीर अथवा अनैतिक गोष्टी नकळत होत नाहीत. त्या न टाळणे म्हणजे बनेलपणा करणे होय. एखादी व्यक्ती वरच्या पदाला पोहोचल्यावर तिचे विरोधकही तेवढेच वरच्या स्तराचे (आणि पोचलेले) असतात आणि ते त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी भूत व वर्तमानातल्या 'राईचा मेरु पर्वत' आणि 'मेरु पर्वताची राई' करण्यात कसूर करणार नाहीत हे नक्की ! शेवटी जो जिंकतो तो नंतर आपल्याला सोईचा इतिहास आणि आपले समर्थन करणारे नीतीमत्तेचे नियम बनवतो. याला जीवन ऐसे नाव ! बघुया कोण जिंकते ते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गुलाम on Fri, 06/19/2015 - 16:28

In reply to कोणाही नेत्याला मखरात बसवून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

+१

सुंदर प्रतिसाद!! हा प्रतिसाद भारताच्या जवळजवळ कोणत्याही राजकीय घटने/व्यक्तीसाठी लागू होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 06/19/2015 - 18:49

In reply to कोणाही नेत्याला मखरात बसवून by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सगळे नेते म्हणजे स्खलनशील

सगळे नेते म्हणजे स्खलनशील माणसेच.
नेत्यांना माणसे म्हटल्याबद्दल निषेध. नेते (सगळ्याच पक्षातले) आणि त्यांचे समर्थक यांच्या डोक्याचं उद्घाटन बंदुकीच्या दस्त्यानं ठेचून करावं एवढीच त्यांची लायकी आहे. तेव्हा कृपा करून राजकारणी लोकांना माणसाचा रंग देवू नये ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on Wed, 06/17/2015 - 12:12

Permalink

भाजपा जर कॉंग्रेस ने ही असेच

भाजपा जर कॉंग्रेस ने ही असेच केले होते असे समजून आरोप उडवून लावत असेल तर हे साफ चुकीचे आहे. हे म्हणजे "आधीचा साहेब ५ तास झोपा काढत होता मग मी दोनच तास काढल्या तर काय बिघडले?" असे झाले. हे अनैतिकच आहे (बेकायदेशीर आहे की नाही तो वेगळा मुद्दा). अशा गोष्टी भाजपा विषयी जनमानसात अविश्वास निर्माण करू शकतात. भजपा ने व समर्थकन्नि (मिहि एक) आपल्या चुकिन्चे समर्थन कॉंग्रेस कडे बोट दाखवून करू नये.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Wed, 06/17/2015 - 12:13

Permalink

पुरूषप्रधान संस्कृती

संघिष्ट भाजपमधील पुरूषप्रधान संस्कृतीतून सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे या स्त्री नेत्यांना एलिमिनेट करायला नागपुरातूनच हा डाव खेळला गेला आहे असे कुणा फेमिनिष्टाने म्ह्णायची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Wed, 06/17/2015 - 12:24

In reply to पुरूषप्रधान संस्कृती by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

हा!हा! ही काडी जरा बरीय!

हा!हा! ही काडी जरा बरीय!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 06/17/2015 - 12:37

In reply to पुरूषप्रधान संस्कृती by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

ठ्ठो =)) =)) =))

ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Wed, 06/17/2015 - 12:43

In reply to पुरूषप्रधान संस्कृती by पुण्याचे वटवाघूळ

Permalink

हा हा!

किर्ती आझादांच्या #अस्थीओकासाप ट्विटमुळे काल तशा नसत्या शंका-कुशंकांना काल जोर चढला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 06/17/2015 - 12:38

Permalink

किती करायचेत? टार्गेट बोला

किती करायचेत? टार्गेट बोला तुम्हाला डिस्काउंट.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 06/17/2015 - 12:41

Permalink

=))=))

=))=))
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 06/17/2015 - 12:47

Permalink

लोकसत्तातला लेख काही बाबी

लोकसत्तातला लेख काही बाबी वगळता चांगला आहे. स्वराज आणि मोदी यांचे डोळ्यावर येण्याइतपत हितसंबंध आहेत. असे हितसंबंध जपताना बर्‍याच वेळा काही फेवर केले जातात. त्यात नविन असे काही नाहिच. पण या केसमध्ये हे हितसंबंध ज्याच्याशी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत, तो एक फरारी गुन्हेगार आहे आणि काही कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींमुळे अजुन ब्रिटनने त्याला भारताच्या हवाली केलेले नाही (अर्थात ब्रिटन बरोबर आपला गुन्हेगार हस्तांतरणाचा करार असतानाही ते मोदीला आपल्या ताब्यात देय नसतील तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की मागचे आणि हे सरकार जाणुनबुजुन काही लूपहोल्स ठेवत आहे किंवा ब्रिटन सरळसरळ त्या करारालाच आव्हान देतो आहे आणि भारत सरकारच्या कायदेशीर मागण्यांना जुमानत नाही आहे म्हणजेच तो भारताच्या सार्वभौमिक सरकारला आवाहन देतो आहे जे युपीएच्या काळात शक्य होते किंबहुना फक्त तेवढेच शक्य होते पण आक्रमक परराष्ट्र धोरण राबवणार्‍या भाजपा सरकारला हे जमत नाही हे मान्य होण्यासारखे नाही). अश्या गुन्हेगाराला आपले राजकीय वजन वापरुन काही फेव्हर्स मिळवुन देण्यामागे स्वराज यांचे खाजगी हितसंबंध गुंतले आहेत असे आरोप होणारच. माझ्या मते मोदी अजुन भारतात आलेला नाही हाच मुख्य मुद्दा आहे. या प्रकरणाचीच दुसरी बाजू अशी की मोदींना त्यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला भेटण्यासाठी आणि त्यासंदर्भात काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी पोर्तुगाल ला गेले होते. तुमच्या माझ्या पैकी कोणी अश्या अधिकारिक जागेवर असले असते तर आपण काय केले असते?: १. मोदीला पोर्तुगाल ला जाताच येउ नये आणि बायकोला भेटताच येउ नये यासाठी प्रयत्न केले असते? यातुन कदाचित काही लोकांना आसुरी आनंद झाला असता पण भारताचा नक्की काय फायदा झाला असता कळत नाही. २. काहिच केले नसते. मरेना का मोदी आणि त्याची बायको म्हणुन शांत बसलो असतो. ३. त्याला पोर्तुगालचा परवाना द्या पण त्याहुन आधिक काही नाही असे मानवतावादी दृष्टीकोनातुन सांगितले असते (जे सुषमा स्वराज यांनी त्यांच्या अखत्यारित केले) सुषमा स्वराज यांनी स्वतःच्या पदाचा उपयोग करुन त्यांच्या मर्जीतल्या ललित मोदीला पोर्तुगालला जायचा परवाना मिळवुन दिला. असे करताना त्यांनी कुठलाही कायदा मोडलेला नाही. त्यांनी त्यांचा शब्द खर्ची घातला. हा शब्द मानवतावादी दृष्टीकोनातुन खर्ची न घालता केवळ मैत्रीखात्यात खर्चा घातला असता तर तो नक्कीच गंभीर नैतिक अपराध ठरला असता. सद्यस्थितीत तो तसा ठरत नाही. यात काहिच चुकीचे वर्तन झाले नाही असे नाही पण बेकायदेशीर देखील काही झालेले नाही. अधिकारिक पदाचा गैरवापर झालाच असे म्हणवत नाही पण एका गुन्हेगारावर फेव्हर करणे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हे देखील कळत नाही. अर्थात भारतीय न्यायालयीन कक्षेबाहेर असलेल्या अश्या घटनांमध्ये निर्णय घेणे अर्थात परराष्ट्रखात्याच्या अखत्यारित येते. असा निर्णय सुषमा स्वराज यांनी स्वतःच्या सदसदविवेक्बुद्धीला धरुन घेतला असाबा अशी शंका घ्यायला जागा आहे पण त्यांचे खाजगी हितसंबंध लक्षात घेता त्यांचे अधिकारक्षेत्र बाजुला ठेवुन त्यांनी हा निर्णय पंतप्रधान कार्यालयाला घ्यायला लावला असता तर बरे झाले असते. लोकसत्तेने उपस्थित केलेला औचित्याचा मुद्दा (अर्थ आणि गॄह खात्याला विश्वासात घ्यायच्या मुद्द्यावरुन) कितपत योग्य आहे त्याबद्दल शंका आहे. परराष्ट्रखात्याच्या अखत्यारित येणार्‍या मुद्द्यांवर गृह खाते काय भाष्य करणार? आणी अर्थमंत्री तर स्वतःच स्वराज यांचे समर्थन करत आहेत. तर मग या मुद्द्यावरुन औचित्याचा भंग झाला असेही म्हणवत नाही. थोडक्यात सांगायचे तर काहितरी चुकले आहे. नक्की काय ते कुणालाच नीट सांगता येणार नाही. शब्दाशब्दावर बोट ठेवुन "मी इथे चुकले की तिथे चुकले" असे स्वराज यांनी विचारले तर सगळ्यांची तोंडे बंद होतील. पण तरीही एक वाँटेड गुन्हेगार परराष्ट्रमंत्र्यांशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेउन नसते फेव्हर्स लाटून परदेशात पार्ट्या झोडत असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. शिवाय या संपुर्ण प्रकरणात ललित मोदीला भारतात आणण्यासाठी अजुन भारत सरकारने काहिच केलेले नाही हे देखील डोळ्यावर येण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सव्यसाची on Wed, 06/17/2015 - 12:51

In reply to लोकसत्तातला लेख काही बाबी by मृत्युन्जय

Permalink

बऱ्याच बाबी उलगडून सांगणारा

बऱ्याच बाबी उलगडून सांगणारा प्रतिसाद. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 06/17/2015 - 12:53

In reply to लोकसत्तातला लेख काही बाबी by मृत्युन्जय

Permalink

तुमचा प्रतिसाद माझा प्रतिसाद

तुमचा प्रतिसाद माझा प्रतिसाद लिहून झाल्यावर वाचला.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 06/17/2015 - 15:20

In reply to लोकसत्तातला लेख काही बाबी by मृत्युन्जय

Permalink

औचित्याचा मुद्दा

स्वराज यांनी मानवतावादी दृष्टीकोनामधून मदत केली . मान्य . त्यात त्यांचा वैयक्तीक फायदा नव्हता किंवा देशाचे नुकसानही नव्हते. फक्त त्यांनी मोदींच्या हालचालींची माहिती त्या वेळी अर्थ आणि गॄह खात्याला द्यायला हवी होती. एवढेच वाटते.औचित्याचा मुद्दा इथे उपस्थित होतो
  • Log in or register to post comments

Submitted by सव्यसाची on Wed, 06/17/2015 - 16:03

In reply to औचित्याचा मुद्दा by कपिलमुनी

Permalink

मला वाटते मोदींच्या हालचालीची

मला वाटते मोदींच्या हालचालीची माहिती सगळ्यांनाच होती. लंडन मधील घराचा पत्ता देखील सगळ्यांना ठाऊक होता. त्यांची ट्विटर वरची टाईमलाईन पाहिली तरी कुणालाही कळले असते कि कुठे आहेत ते. जिथे जिथे गेलेत तिथले सगळे फोटो वगैरे कायमच टाकत असतात. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी सांगितले नाही म्हणून गृह खात्याला कळायचे राहिले असे कधीच नव्हते. (तसेही गृह खात्याचा या संदर्भात काही संबंध आहे असे वाटत नाही. 'इडी' अर्थखात्याच्या अखत्यारीत येते.)
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 06/17/2015 - 16:10

In reply to मला वाटते मोदींच्या हालचालीची by सव्यसाची

Permalink

एखादा गुन्हेगार

एखादा गुन्हेगाराने तुम्हाला संपर्क केल्यास तुम्ही संबंधित खात्यास कळवणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 06/17/2015 - 12:52

Permalink

आज ललित मोदींची मुलाखत बघितली

आज ललित मोदींची मुलाखत बघितली. त्यावरून खालील गोष्टी कळल्या. १. श्री. स्वराज हे ललित मोदी यांचे २२ वर्षांपासून वकील आहेत. २. कु. स्वराज या ललित मोदी यांच्या ४ वर्षापासून वकील आहेत (त्या टीमच्या पार्ट आहेत). ३. सौ. स्वराज यांचे ललित मोदी यांच्याशी फॅमिली संबंध आहेत. ४. सौ. मोदी या एका प्रकारच्या कॅन्सरने आजारी होत्या. त्यांचे उपचार फक्त पोर्तुगालच्या एका रिसर्च इन्स्टिट्यूट मध्येच (प्रयोगात्मक प्रकारे) होवू शकत होते. ते हॉस्पिटल नाही. ५. या ऑपरेशन साठी श्री. मोदींच्या हस्ताक्षराची गरज नाही. ६. पोर्तुगालला जाण्यासाठी श्री. मोदींना युके डॉक्युमेंटस उपलब्ध करून देवू शकतो कारण ते युके चे नागरिक आहेत. ७. सौ. वसुंधरा राजे या सौ. मोदी यांच्या मित्र मागील ३० वर्षांपासून आहेत. त्यांनीच सौ. मोदींना पोर्तुगालच्या सेंटरमध्ये दाखल केलं. ८. सौ. मोदींचे काही अवयव काढण्यासाठी श्री. मोदींच्या हस्ताक्षराची गरज पडली असती. त्यामुळे श्री. मोदींना पोर्तुगालला जाणं भाग पडलं. ९. यासाठी भारत सरकारच्या परवानगीची गरज नसतानाही (बहुधा प्रत्यार्पणासंबंधी वगैरे इश्श्यूज मध्ये येवून काही अडचण येवू नये म्हणून) श्री. मोदींनी भारत सरकारकडे परवानगी मागितली. १०. सौ. मोदींच्या जिवासाठी सौ. स्वराज यांनी परवानगी दिली. वरचं जर खरं असेल तर स्वराज यांचा दोष दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Wed, 06/17/2015 - 12:57

In reply to आज ललित मोदींची मुलाखत बघितली by काळा पहाड

Permalink

नक्की का?

६. पोर्तुगालला जाण्यासाठी श्री. मोदींना युके डॉक्युमेंटस उपलब्ध करून देवू शकतो कारण ते युके चे नागरिक आहेत.
ललित मोदी हे युकेचे नागरिक आहेत हे नक्की का? तसे असेल तर सुषमा स्वराज या ट्रॅव्हेल डॉक्युमेन्टसाठी मध्ये पडायचा प्रश्नच येणार नाही. आपल्या नागरिकाला ट्रॅव्हेल डॉक्युमेन्ट द्यावे की नाही हे इंग्लंडचे सरकार भारत सरकारला थोडीच विचारणार आहे? पण ते इंग्लंडचे नागरिक असतील तर त्यांचा भारतीय पासपोर्ट २०१० मध्ये रद्द होणे आणि ऑगस्ट २०१४ मध्ये कोर्टाच्या आदेशावरून परत बहाल होणे हा प्रकार कसा काय झाला?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com