Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खेडूत on गुरुवार, 06/04/2015 - 19:06
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
माहिती
आज धाव्वीचा निकाल लागला. श्यात्तर टक्के पडले. आबांनी पेडे वाटले . मला बरं वाटलं, निकालात नाव बरोबर छापलंय म्हणून ! ''स्मिता गजानन यादव'' दादाच्या पाठीवर मी झाली त्यवाबी आज्जीला पोरगाच पायजेल व्हता . पन मी झाली. माजीच चूक जनु ! आज्जी रडली. माज्यावरच चिडली. म्या तिला फशिवलं म्हनं . नाव ठ्येवलं फशीबाई ! समद्या पोरी हासायच्या शाळंत. * * * धाव्वी सुरु झाली, तशी गेली हेडसरांकडं ! म्हनलं, ''सर नाव बदलायचंय माजं - पन घरला सांगायचं नाय ! धाव्वीच्या निकालावर स्मिता नाव यायला पायजेल'' . मास्तर द्येवमानुस. त्येनला पटलं - बदलूया म्हणालं ! लगीच कुटंकुटं फोन क्येले आन अर्जावर सही घ्येतली. दिला पाट्वून. - धाव्वीचा फॉर्म भरायच्या आदुगर दाखल्यावर नाव बदलूनबी आलं ! आईच्या मनाजोगतं नाव - स्मिता !
  • Log in or register to post comments
  • 11131 views

प्रतिक्रिया

Submitted by स्रुजा on Mon, 06/08/2015 - 21:12

Permalink

सुंदर कथा. मुलगी आवडली. एकदा

सुंदर कथा. मुलगी आवडली. एकदा एक ओळखीच्या काकु खुप अभिमानाने सांगत होत्या की मी सांगितलं आमच्या विहिणबाईंना, बारशाला जरा आमच्या मुलीची हौस मौज करा, काहीही झालं तरी मुलगा दिलाय ना तिने तुम्हाला ! आता मला कशाची भीती. सहज बोलता बोलता उच्च शिक्षित लोकं पण कसे परंपरांना बळी पडतात आपल्याकडे हे तेंव्हा कळलं.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 06/09/2015 - 09:55

Permalink

कथा वाचून वाईट वाटलं .

कथा वाचून वाईट वाटलं . अशी कशी माणसं वागू शकतात? आपल्याच लेकीबरोबर ? इतक्या लहान वयात, असा धाडसी निर्णय घेऊ शकणार्या या मुलीचे भवितव्यं नक्कीच उज्वल असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 06/09/2015 - 10:01

Permalink

चांगली आहे कथा. :)

चांगली आहे कथा. :)
  • Log in or register to post comments

Submitted by उमा @ मिपा on Tue, 06/09/2015 - 12:11

Permalink

अतिशय आवडली कथा.

अतिशय आवडली कथा. या निमित्ताने सुधा कांकरिया यांच्या कामाची माहिती मिळाली, हेही महत्वाचं.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 06/09/2015 - 12:23

Permalink

मस्त. जमलीय एकदम.

मस्त. जमलीय एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 06/09/2015 - 13:01

Permalink

नवे प्रतिसाद वाचून पुन्हा

नवे प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा टंकायला आलो . एकीकडे चिगो , स्रुजा यांचे अनुभव तर दुसरीकडे अजया , नक्शत्त्रा यांनी सांगितलेले काही वाईट अनुभव...! स्पंदना यांचा लक्ष्यवेधी प्रतिसाद काहीसा कडवट वाटला तरी भयंकर सत्य दिसते आहे . इतक्या लहान बालकांच्या मनाचा विचार पालक का करू शकत नाहीत? समाज म्हणून अजून आपण काळाच्या किती मागे आहोत हे सत्य अधोरेखित होते. आपण अशी उदाहरणं पहात नाही तोवर हे विचित्र वाटतं पण याहीपेक्शा अतिशय वाईट केसेस गावात पहायला मिळतात …शक्य तितके त्यांच्यासाठी आपण करतोच पण गरज खूप मोठी आहे. त्याबद्दल परत कधी ! सर्वांचे पुन: आभार !
  • Log in or register to post comments

Submitted by जुइ on Tue, 06/09/2015 - 20:13

Permalink

कथा आवडली!

दुर्दैवाने अजूनही बर्‍याचदा खेड्या पाड्यात अशा गोष्टी आढळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on गुरुवार, 06/18/2015 - 17:23

Permalink

शंभर शब्दात लाखाचा संदेश दिलाय आपण.

कथा आवडली हे वेगळं सांगायला नकोच. स्पंदना---नुसतं वाचुनच काटा आलाय अंगावर.....प्रत्यक्ष अनुभवतांना तुला काय वाटलं असेल याची कल्पनाही नाही करू शकत......
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on गुरुवार, 06/18/2015 - 17:53

Permalink

परत एकदा वाचली .

परत एकदा वाचली . सुंदर कथा . मस्तच . दुसरी मुलगी झाली म्हणून दिल्ली पर्यंत येउन "लक्ष्मी आणलीस घरात " म्हणून कौतुक करणारे आजोबा . आणि अक्ख्या कॉलनी मध्ये मिठाई वाटणारे शेजारी फर्नांडीस काका . . आणि अगदी विरुद्ध अनुभव सांगणाऱ्या स्पंदना ताई . . इतकी विरुद्ध टोकं असतात आमच्या समाजात . . :(
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com