✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसिंग यु, सद्दाम !

स
सुधीर मुतालीक यांनी
गुरुवार, 05/28/2015 - 19:15  ·  लेख
लेख
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!! http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Beheading.jpg
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35216 वाचन

💬 प्रतिसाद (189)

प्रतिक्रिया

फोटोचे प्रयोजन कळाले नाही.

मोदक
गुरुवार, 05/28/2015 - 19:19 नवीन
फोटोचे प्रयोजन कळाले नाही. कितीही सत्य असले तरी असले फोटो बघवत नाहीत.
  • Log in or register to post comments

+१ मला लेखाचंही प्रयोजन कळलं

आदूबाळ
गुरुवार, 05/28/2015 - 19:22 नवीन
+१ मला लेखाचंही प्रयोजन कळलं नाही. अर्धवट प्रकाशित झाला आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सद्दाम हुसैन कसे ही असले तरी

विवेकपटाईत
गुरुवार, 05/28/2015 - 20:17 नवीन
सद्दाम हुसैन कसे ही असले तरी त्यांनी समस्त इराकला एका सूत्रात बांधून ठेवले होते. (जसे आपले कांग्रेसी किती ही भ्रष्ट असले तरी त्यांनी देशाला एका सूत्रात बांधून ठेवले होते). देशात शांती होती. (आपल्या देशात आज ही आहे आणि भविष्यात ही राहील) इजिप्त, सिरीया, लिबिया आणि इराक सर्व ठिकाणी अमेरिकेने खेळी केली सोशल मेडीयाचा गैर वापर केला (मुख्यत: इजिप्त). तेलाच्या पैश्याच्या जोरावर मध्य आशियात प्रगती झाली नाही पाहिजे असे धोरण अमेरिकेने १९७४ नंतर अमलात आणायला सुरु केले, त्याचा परिणाम, इराक -इराण युद्ध ते आजचे अलकायदा आणि ईसीस). आपल्या देश्यात ही तथाकथित सोशल मिडीयाच्या (... फ...) सहाय्याने देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होतास पण आपल्या जनतेने त्याला निवडणूकीत प्रतिसाद दिला नाही. अन्यथा आपल्या देशात ही यादवी माजली असती. (दिल्लीत थोड्या प्रमाणात तो यशस्वी ही झाला- लोकांच्या मनातून लोकतंत्र विषयी विश्वास उडविण्याचा थोडा फार प्रयत्न पुढील ५ वर्ष हे लोक करतील- पण आपल्या देशाचे एक चांगले आहे. इथे गादी आपल्या हिशोबाने नेत्यांना पूर्व परंपरेनुसार चालविते अराजकतेची शक्यता कमीच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तुम्ही म्हणताय ते दुर्दैवाने

बाबा पाटील
गुरुवार, 05/28/2015 - 19:32 नवीन
खर आहे,सद्दामाला अमेरिकेने मारल्याचा भुर्दंड सगळ्या जगाला भरावा लागतोय.
  • Log in or register to post comments

सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही

श्रीगुरुजी
गुरुवार, 05/28/2015 - 20:20 नवीन
सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही क्रूर होता. त्याने, त्याच्या बायकोने व जवळच्या नातेवाईकांनी अत्यंत क्रूरपणे अनेकांना ठार केले होते. गडाफी, लादेन, सद्दाम अशा नरराक्षसांना मारून अमेरिकेने मोठे काम केले आहे.
  • Log in or register to post comments

जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ

प्यारे१
Tue, 06/02/2015 - 20:33 नवीन
जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ 27 व्या वर्षी देशाचा प्रमुख होऊन 70-72 व्या वर्षी पर्यन्त अतिशय चांगल्या प्रकारे राज्य चालवणारा शासनकर्ता होता. अमेरिका विरोध हा त्याचा अजेंडा असल्याने अमेरिका त्याच्या विरोधात प्रचार करणं ओघानं आलंच. शेवटी शेवटी पळून जाण्याची संधी असतानाही त्यानं पळून न जाता आपल्या जन्मगावीच् राहून तो लढत राहिला व शेवटी हाती लागला. आपल्या कुटुंबियाना त्यानं शेजारच्या देशांमध्ये व फ्रांस सारख्या देशांमध्ये स्थलांतरित केलं होतं. अमेरिका जिथे 'तेल' आहे तिथे तोंड घालतेच् (आतापर्यंत तरी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत.

संदीप डांगे
Tue, 06/02/2015 - 21:03 नवीन
सहमत. गडाफी एक प्रखर राष्ट्रभक्त होता. आपल्या कार्यकाळात त्याने अमेरिकेची हुशारी त्यांच्याच घशात घालून मांडलिकत्व पत्करण्यास नकार दिला. गडाफीचा सद्दामसारखा काटा न काढता आल्याने सोशल-मीडीया-क्रांतीच्या नावाखाली अमेरिकेने कार्यभाग साधला. माझे काही चुकत असेल तर दुरुस्त करावे ही विनंती. - (प्रखर राष्ट्रभक्तांच्यात धर्माधारित भेदभाव करू नये असे मानणारा एक राष्ट्रभक्त.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

लाहोरचे स्टेडियम

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 06/03/2015 - 15:34 नवीन
लाहोरच्या क्रिकेट स्टेडियमचे नाव गड्डाफी स्टेडियम का आहे हे पण जरा सांगा की. गड्डाफीचा पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला सपोर्ट होता. सद्दामचा भारताला सपोर्ट म्हणून त्याला चांगले म्हटले जात असेल तर गड्डाफी पाकड्यांना धार्जिणा होता म्हणून त्याला नावे का ठेवली जात नाहीत? की दोघांच्याही उचलबांगडीमध्ये 'अमेरिका' हा कॉमन फॅक्टर होता म्हणून अमेरिका करेल ते चुकीचे असे म्हणत अमेरिकेला नावे ठेवायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ओके. या प्रश्नांचे उत्तर

संदीप डांगे
Wed, 06/03/2015 - 15:47 नवीन
ओके. या प्रश्नांचे उत्तर देण्याआधी हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

हिटलर, मुसोलिनी, माओ,

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 06/03/2015 - 16:20 नवीन
हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
त्याआधी हिटलर, मुसोलिनी आणि माओ यांच्या पंगतीत शिवाजीमहाराजांना का न्यावेसे वाटले हे जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हा हा हा. आपणांस मुद्दा कळला

संदीप डांगे
Wed, 06/03/2015 - 16:27 नवीन
हा हा हा. आपणांस मुद्दा कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

सद्दामचा भारताला सपोर्ट

होबासराव
Wed, 06/03/2015 - 16:04 नवीन
सद्दामचा भारताला सपोर्ट म्हणून त्याला चांगले म्हटले जात असेल सद्दाम कसा होता हे सगळ्याना माहित आहे आणि काहि सदस्यांच्या प्रतिसादात याचे डिटेल्स सुद्धा आहे. मि भारतीय असल्याने जर कुठलाही आंतरराष्ट्रीय नेता जर भारताच्या भुमिकेचे समर्थन करत असेल तर एक भारतिय म्हणुन तो माझ्यासाठि चांगला आहे. गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट माणस होते, पण त्याना मारण्याचा अमेरिकेला काय अधिकार होता ? आजचि लिबिया आणि इराक ची अवस्था पाहता आपल्याला असे वाटत नाहि काय कि हे ह्या वाईट माणसांच्या हातात असताना ह्यापेक्षा हजार पटिने चांगल्या अवस्थेत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ

बाकि ते

होबासराव
Wed, 06/03/2015 - 16:06 नवीन
बाकि ते हामरिका, व्हिसा, डालरा, ह्याला आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट

संदीप डांगे
Wed, 06/03/2015 - 16:08 नवीन
गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट माणस होते, पण त्याना मारण्याचा अमेरिकेला काय अधिकार होता ? सहमत. आता अमेरिकाही पाकिस्तानला सपोर्ट करते भारताविरुद्ध तेव्हा अमेरिकाप्रेमींचा भारतीयपणा डॉलरच्या गंगेत वाहून जातो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच

श्रीगुरुजी
Wed, 06/03/2015 - 12:25 नवीन
गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच देशातील नागरिकांवर त्याने अत्याचार केले होते. त्याने अनेक देशातील अतिरेकी संघटनांना पाठबळ दिले होते. ब्लॅक पँथर्स पार्टी, आयरीश रिपब्लिकन आर्मी, रेड आर्मी, रेड ब्रिगेड, पॅलेस्टाईनमधील अनेक अतिरेकी संघटना अशा अनेक अतिरेकी संघटनांना त्याने आर्थिक व राजकीय पाठबळ दिले होते. १९७२ मधील म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेत ११ इस्रायली खेळाडूंना मारणार्‍या ब्लॅक सप्टेंबर या अतिरेकी संघटनेला गडाफीचा भक्कम पाठिंबा होता. त्याने त्यावेळी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह लिबयाला आणून त्यांना एका हीरोच्या थाटात मूठमाती दिली होती. बांगलादेशाच्या शेख मुजीबर रेहमान हत्याकांडातील दोन आरोपींना गडाफीने लिबयात आश्रय दिला होता. अतिरेक्यांनी लुफ्तांसाच्या फ्लाईट ६१५ चे अपहरण केल्यावर त्यातील प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मुक्त केलेल्या तीन अतिरेक्यांना गडाफीनेच लिबयात आश्रय दिला होता. १९८८ मध्ये या पॅन अ‍ॅम विमान कंपनीचे विमान बॉम्बने हवेत उडवून देण्यात आले होते. त्यात २४३ प्रवासी, १६ क्रू मेम्बर्स व जमिनीवरील ११ नागरिक अशा एकूण २७० जणांचा मृत्यु झाला होता. हे विमान उडविण्यात अब्देल्बसेत अल-मेगराही व लमिन खलिफा फिमा या दोन लिबयन अतिरेक्यांचा हात होता. या दोघांनाही गडाफीनेच आश्रय दिला होता. सप्टेंबर २००९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गडाफीने भाषणात काश्मिरचा उल्लेख करून काश्मिरच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन काश्मिर भारत किंवा पाकिस्तानात न जाता स्वतंत्र देश व्हायला हवा असा उल्लेख केला होता. त्याच्या या भाषणानंतर तो काश्मिर फुटिरतावाद्यांचा हीरो झाला होता. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास सुद्धा त्याने याच भाषणात विरोध केला होता. हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>> आपल्याच देशातील

प्यारे१
Wed, 06/03/2015 - 13:26 नवीन
>>>> आपल्याच देशातील नागरिकांवर त्याने अत्याचार केले होते या एका वाक्यानंतर गद्दाफीच्या अत्याचारांबद्दल आणखी काहीही माहिती दिलेली दिसत नाहीये. माझ्या कम्पनीचं लीबिया मध्ये काम सुरु होतं आणि तथाकथित उठाव झाल्यावर लोक नेसत्या कपड्यानिशी भारतात परतले आहेत. त्या लोकांच्या फर्स्ट हैण्ड माहितीनुसार गद्दाफीनं लीबिया च्या नागरिकांना अगदी व्यवस्थित 'पोसून' आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या होत्या. आणि गद्दाफीच्या राजवटीत तुलनेनं अतिशय चांगली प्रगति लीबिया करत होता.(2008 च्या मंदीनन्तर मध्यपूर्वेतले लोक लीबिया ला व्यवसायासाठी संधी मानत होते) इस्रायल च्या खेळाडूंना मारणं निषेधार्हच तरीही त्या घटनेतील दुसऱ्या बाजुचा समर्थक म्हणून गद्दाफीची काही बाजू असेलच की! भारतातच काही जण आपण अतिरेकी म्हणत असलेल्या लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणताना गद्दाफी सारख्या कडून भारतावर कशाही रीतीने अवलंबून नसलेल्या व्यकीला आपण कुठल्या बळावर आपला समर्थक बनवणार होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गडाफीने केलेल्या

श्रीगुरुजी
Wed, 06/03/2015 - 14:58 नवीन
गडाफीने केलेल्या अत्याचारांविषयी खालील लेख वाचा. http://www.thedailybeast.com/articles/2011/09/03/inside-muammar-gaddafi-s-libyan-torture-prisons.html १९९६ मध्ये अबू सालिम तुरूंगात गडाफीच्या सैनिकांनी कैदेत ठेवलेल्या १२०० विरोधकांची हत्या केली होती. Abu Salim prison massacre या नावाने हे हत्याकांड कुप्रसिद्ध आहे. http://www.andyworthington.co.uk/2011/03/02/how-the-abu-salim-prison-massacre-in-1996-inspired-the-revolution-in-libya/ http://www.smh.com.au/world/laughter-joy-relief-and-unspeakable-memories-20110829-1jiim.html त्याने लिबयामध्ये काही काळ शरियावर आधारीत कायद्यांची सक्ती केली होती. त्यामुळे नागरिकांवर अनेक बंधने आली होती. गडाफीने केलेल्या अत्याचारांविषयी एवढे पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट

प्यारे१
Wed, 06/03/2015 - 17:53 नवीन
मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट प्रॉब्लेम झाला. आपल्याला गद्दाफी भारत की नजर से हवा आहे की गद्दाफी लीबिया चा नेता म्हणून बघायचा आहे यावर दृष्टीकोन बदलत असल्यानं सध्या पास देतो. जाताजाता: मध्यपूर्वेत 2008 ला मंदी आल्यानंतर व्यवसाय संधी म्हणून लीबिया कड़े का पाहिलं गेलं होतं? आता तसं पाहिलं जाईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> आपल्याला गद्दाफी भारत की

श्रीगुरुजी
Wed, 06/03/2015 - 18:42 नवीन
>>> आपल्याला गद्दाफी भारत की नजर से हवा आहे की गद्दाफी लीबिया चा नेता म्हणून बघायचा आहे यावर दृष्टीकोन बदलत असल्यानं सध्या पास देतो. भारताच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गडाफी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतविरोधी होता. परंतु काश्मिर प्रश्न किंवा संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समितीत भारताला हवे असलेले कायमस्वरूपी सदस्यत्व इ. बाबतीत जगातील सर्वच देश भारताच्या बाजूने आहेत असे नाही. पण तरीसुद्धा त्या देशांशी आपले राजनैतिक संबंध चांगले आहेत. लीबियाचा नेता या नात्याने तो हुकूमशहा होता. तसेच तो अनेक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांना पाठबळ देत होता. या नात्याने तो गेला हे चांगलेच झाले. >>> जाताजाता: मध्यपूर्वेत 2008 ला मंदी आल्यानंतर व्यवसाय संधी म्हणून लीबिया कड़े का पाहिलं गेलं होतं? आता तसं पाहिलं जाईल का? कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे वा!

प्यारे१
Wed, 06/03/2015 - 18:54 नवीन
अरे वा! एक भारतविरोधी हुकुमाशहाची सत्ता असताना भारतीय कंपन्यांना गेली अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळते, अनेक भारतीय वर्षानुवर्षे तिथं राहतात. आजही काहीजण आहेत. अतिरेकी संघटना तुमच्या दृष्टीनं हो. त्यांच्या दृष्टीनं वेगळे आहेत त्यामुळे त्यांना मदत केली जाते. जगाच्या बाजारात अहिंसा वगैरे तत्व वर्षानुवर्ष फाट्यावरच मारली गेलेली आहेत. अगदी पाकिस्तान बरोबर सुद्धा भारत अतिशय सभ्य मुलासारखा नाकासमोर चालतो असं वाटत असल्यास भाबड़ेपणाचा कळस मानावा लागेल. व्यावसायिक संधीबाबत कल्पना नाही म्हणत आहात त्याला होकार भरला तरी अशा संधी सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थैर्य असल्याशिवाय निर्माण होत नाहीत हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असं कसं बोल्ता गुर्जी?

पुण्याचे वटवाघूळ
Wed, 06/03/2015 - 15:38 नवीन
हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.
असं कसं बोल्ता गुर्जी तुम्ही? त्याला अमेरिकेने मारला होता ना? मग अमेरिका करते ते सगळेच वाईट असल्यामुळे गड्डाफी मेला तर ते चांगले कसे होइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

थोडी अवांतर माहिती -

चिनार
Wed, 06/03/2015 - 12:37 नवीन
थोडी अवांतर माहिती - झुल्फिकार आली भुट्टो नी पाकिस्तानच्या अणू कार्यक्रम राबवण्यासाठी गद्दाफी कडे आर्थिक मदत मागितली होती. गद्दाफी ने पाकिस्तान ला १ अब्ज USD ची रोख मदत केली होती तीसुद्धा १९७४ साली. गद्दाफी ची फक्त एकच अट होती ती म्हणजे पहिले अण्वस्त्र लिबियाला मिळावे. तो हुकुमशहा होता का हे माहिती नाही पण २७ व्या वर्षी तत्कालीन हुकुमशहा इद्रिस च्या विरोधात उठाव करून तो सत्ताधीश झाला होता. सद्दाम काय किंवा गद्दाफी काय ..हे लोकं अमेरिकेपुढे कधीच झुकले नाहीत म्हणून अमेरिकीने त्यांना जास्तीत जास्त बदनाम केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आपण तर बाबा सद्दाम चांगला

काळा पहाड
गुरुवार, 05/28/2015 - 23:30 नवीन
आपण तर बाबा सद्दाम चांगला होता असंच मानतो. तो काश्मीर प्रश्नावर भारताला युनो मध्ये कायम पाठिंबा द्यायचा. असं करणारा माणूस सैतान असला तरी माझं काही म्ह्णणं नाही.
  • Log in or register to post comments

लै भारी..

स्वच्छंद
Mon, 06/01/2015 - 01:42 नवीन
लै भारी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बुश आणि चेनी

हुप्प्या
Fri, 05/29/2015 - 10:01 नवीन
९/११ च्या धक्क्यातून अमेरिकन सावरायच्या आत खरे खोटे पुरावे मिसळून असे सादर केले की इराकविरुद्ध घोषित करायला कुठलीही अडचण आली नाही. पाताळयंत्री चेनी आणि महामूर्ख बुश आणि अनेक उद्योग ह्या लोकांनी हे कारस्थान केले. अमेरिकन लोकांच्या करातून मिळवलेले हजार अब्ज डॉलर अक्षरशः जळून राख झाले. त्यातून तेल वगैरे मिळायचे सोडाच. उलट एक अत्यंत अस्थिर, धर्मपिसाट लोकांच्या हातात गेलेला भूप्रदेश एवढेच ह्या नस्त्या उठाठेवाचे फलित. तमाम मध्यपूर्व आता अनेक वर्षे खदखदत ठेवण्याची सोय ह्या लोकांनी केली आहे. चेनीच्या हॅलीबर्टनचे उखळ पांढरे झाले. एक खोटारडा, कुठल्याही मुस्लिम देशावर आक्रमण करणारा भांडकुदळ देश अशी अमेरिकेची प्रतिमा बनली. आता खरोखरच कुठे मदत करायची झाली तर अमेरिकन जनता कच खाणार. अमेरिकन इतिहासात ह्या घटनांची एक अश्लाघ्य लांछन म्हणून नोंद कायम राहील. अर्थात आजही डिक चेनीला लाज, पश्चाताप वाटत नाही. नाही म्हणायला बुशचा बंधू राष्ट्राध्यक्ष बनू पहातो आहे त्याची पंचाईत होते आहे. इराकचे युद्ध चुकीचे होते म्हणवत नाही आणि योग्य होते असेही म्हणवत नाही. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारी हिलरीही एकेकाळी इराकविरुद्धच्या युद्धाची मोठी समर्थक होती पण हा इतिहास आता लोक विसरले असावेत. असो. कोळसा उगाळावा तितका काळाच. ९/११ च्या हल्ल्यामागचा खरा शिल्पकार बिन लादेन आणि त्याची अल कायदा ही पिलावळ ह्यांना विसरून इराकच्या मागे लागणे हे खरोखरच संतापजनक होते.
  • Log in or register to post comments

देवा रे!

पैसा
Fri, 05/29/2015 - 11:03 नवीन
ते सगळे हरामखोर एकाला झाका आणि दुसर्‍याला काढा असले! दगडच. वीट कोणी नाही त्यात. मात्र फोटो बघून माणूस प्राणी सुसंस्कृत आहे यावरचा उरलासुरला विश्वास उडाला. हे असले भयाण प्रकार धर्माच्या नावावर होत आहेत? कुठेत सगळे सेक्युलर लोक??
  • Log in or register to post comments

या सगळ्यामागे

नाखु
Fri, 05/29/2015 - 11:18 नवीन
मोदींचा-संघाचा-पर्यायाने भारताचा-आणि त्यामूळेच मिपाकरांचा हात आहे. चिनार शेठ उठाओ लेखणी और चलावे इस विषयपर ! हितेसभाई "पुरावे" तयार करायच्या मागे लागाच. आणि कॅप्टन ते सगळ्या रंगाचे चष्मे वाट रे मिपाकरांना (हिरवे-निळे-लाल्-भगवे-काळे) जेप्या सत्काराला "चिखल आणि शेण्साडा" आणायला विसरू नको. गेल्या महिनाभरातल्या मिपा राजकीय धुळवडीला वैतागलेला
कुठेत सगळे सेक्युलर लोक??
ते भाजप्-संघ यांच्या उपद्र्वमूल्यावर बारीक लक्ष्य ठेवून आहेत त्यामुळे या "किरकोळ" बाबींकडे देण्यासाठी वेळ नाहीयं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाखु +१

यशोधरा
Fri, 05/29/2015 - 20:30 नवीन
नाखु +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाखु +१००

विशाल कुलकर्णी
Mon, 06/01/2015 - 10:07 नवीन
नाखु +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

चांगला धागा म्हणून वाचायला

चिनार
Mon, 06/01/2015 - 17:17 नवीन
चांगला धागा म्हणून वाचायला सुरवात केली तर च्यामारी माझाच उद्धार सुरु आहे इथे ! राहुल गांधी आणि केजरीवाल ची शप्पथ घेऊन सांगतो इराक युद्धामध्ये माझा हात नाहीये हो नाखू साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सद्दामला मारण्यासाठी

मार्मिक गोडसे
Fri, 05/29/2015 - 11:05 नवीन
सद्दामला मारण्यासाठी अमेरिकेने केमिकल वेपन चा बागुलबूवा उभा केला परंतू साधी डांबराची गोळीही तेथे सापडली नाही, तरीही सद्दामला मारलेच. ह्यात अमेरिकेचा मुजोरिपणा व बालिश नेतृत्व दिसून येते.
  • Log in or register to post comments

सद्दामची किर्ती ऐकता तो

मृत्युन्जय
Fri, 05/29/2015 - 11:43 नवीन
सद्दामची किर्ती ऐकता तो चांगला होता असे म्हणवत नाही. पण तरीही आयसिस पेक्षा १ लाख पटींनी बरा. त्याला फुकटच मारला तेलापायी. अमेरिकेशी पंगा त्याला एकुणात महागच पडला. तरीही काळा पहाड म्हणतात त्याप्रमाणे सद्दामने भारताला सपोर्ट केले असेल तर तो महान माणूसच म्हणायला हवा.
  • Log in or register to post comments

एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट

टवाळ कार्टा
Fri, 05/29/2015 - 13:14 नवीन
एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे??? #!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

यालाच तर राजकारण म्हणतात.

बॅटमॅन
Fri, 05/29/2015 - 13:22 नवीन
यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

यालाच तर राजकारण म्हणतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/31/2015 - 08:27 नवीन
यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते. अगदी सहमत रे. नैतिक अनैतिकता हे फक्त शब्दभ्रमाचे प्रकार आहेत राजकारणामधे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत

विशाल कुलकर्णी
Mon, 06/01/2015 - 10:12 नवीन
नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. अगदी-अगदी ! नैतिकता-अनैतिकता या कालसापेक्ष किंवा फारतर स्थितीसापेक्ष संकल्पना आहेत असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट

काळा पहाड
Fri, 05/29/2015 - 13:31 नवीन
एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे???
१. जोपर्यंत तो भारताला काश्मीर वर सपोर्ट करतोय तोपर्यंत(च) तो चांगला. नाहीतर तो वाईट. २. राजकारणात कुणीही कायमचा मित्र नसतो. असतात ते फक्त कायमचे हितसंबंध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण

टवाळ कार्टा
Fri, 05/29/2015 - 13:39 नवीन
मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण त्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच आहे...कोणीच चूक नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत

काळा पहाड
Fri, 05/29/2015 - 13:55 नवीन
नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत का तालिबानी जेव्हा ते रशियाविरुद्ध लढत होते तेव्हा? तसंच असतं सगळं. फक्त लढाई दुसर्‍याच्या भूमीवर लढू द्यायची असते. इराण अमेरिकेला वाईट वाटतो आणि तो अणुबॉम्ब तयार करतो म्हणून तो आपल्याला पण वाईट असं नसतं कै. इराण पाकिस्तानचा गळा आवळू शकतो आणि आपल्या सैन्याला तळासाठी छाबाहार बंदर उपलब्ध करू देतो म्हणून तो चांगला आहे. इस्त्रायलनं वेस्ट कोस्ट आणि गाझा मध्ये बॉंबिंग करून निरपराधांना मारलं तरी आपल्याला रडार सिस्टीम पॅलेस्टीनियन्स देणार नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१००० मस्त

अभिजित - १
Fri, 05/29/2015 - 20:06 नवीन
+१००० मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

+१ सहमत :)

टवाळ कार्टा
Fri, 05/29/2015 - 20:26 नवीन
+१ सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सहमत

अभिजीत अवलिया
Sun, 05/31/2015 - 01:39 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

इस्राएल ची बाजु न्याय्य आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/31/2015 - 08:30 नवीन
इस्राएल ची बाजु न्याय्य आहे. आणी इस्राएल सारखा छोटासा देश फक्त अस्मितेच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर काय करतोय हे बघुन खुप छान वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

न्याय्य ?

कपिलमुनी
Mon, 06/01/2015 - 13:57 नवीन
बाजू न्याय्य कशी आहे ते समजेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

राजकारणाचे नियम...

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 05/29/2015 - 14:10 नवीन
जगाच्या सुरुवातीपासून चालत आलेले राजकारणाचे नियम...

नियम क्रमांक १ :

"या जगात हितसंबध हेच अग्रगण्य आणि अचल असतात, मित्र आणि शत्रू त्यावर अवलंबून बदलू शकतात."

नियम क्रमांक २ :

"नियम क्रमांक १ समजू-उमजू न शकणारे एक तर नष्ट होतात किंवा त्या नियमांचे पालन करणार्‍यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुलाम होतात."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सद्दामने आपल्या राजवटीत

श्रीगुरुजी
Wed, 06/03/2015 - 15:09 नवीन
सद्दामने आपल्या राजवटीत आपल्या अनेक विरोधकांना ठार मारले होते. अनेक विरोधकांना व महिलांना कैदेत ठेवून त्याच्या सैनिकांनी अनन्वित अत्याचार केले होते. सद्दामला अमेरिकेने डिसेंबर २००३ मध्ये पकडले व डिसेंबर २००६ मध्ये फाशी दिले. त्याच्या मृत्युनंतर एका शियांच्या अतिरेकी संघटनेचा प्रमुख असलेल्या मुक्तदा अल सद्र याचे वर्चस्व इराकमध्ये वाढले. सद्दाम सुन्नी होता. इराकमध्ये शियांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्यामुळे सुन्नींच्या इसिसचा उदय झाला. इसिसच्या उदयामागे इतर कारणांप्रमाणे हे एक प्रमुख कारण होते. या अतिरेकी संघटनेला सुरवातीच्या काळात सौदी अरेबियासारख्या काही सुन्नी देशांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. इसिसचा पुढे भस्मासूर होईल असे कोणालाच वाटले नसावे. इसिस जे अत्याचार करीत आहे तसेच अत्याचार सद्दामनेही केले होते. समजा अमेरिका २००३ मध्ये सद्दामच्या मागे लागली नसती तर २००३ पासून आजतगायत सद्दामनेसुद्धा हजारो लोकांचे प्राण घेतले असते. कदाचित पुन्हा एकदा कुर्दिश बंडखोरांवर रासायनिक अस्त्रांचा प्रयोग करून क्रूरतेचे प्रदर्शन घडविले असते. इसिसचा उदय झाला हे वाईटच झाले पण सद्दाम गेला हे चांगलेच झाले. सद्दाम असता तर इसिसचा उदय झाला नसता हे नक्की, परंतु लोकांवर अत्याचार व ठार मारण्याचे प्रकार सुरूच राहिले असते. सद्दाम आणि इसिस हे एकाच माळेचे मणी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सद्दाम मारला गेला... पण आपले काय ?

मदनबाण
Fri, 05/29/2015 - 12:10 नवीन
अमेरिकेसारखे दहशदवादी राष्ट्र या जगात दुसरे नसावे ! इराक,अफगणिस्तान ची वाताहत तर केलीच पण पाकड्यां वरच्या प्रेमाचा पाझर काही आटत नाही ! ज्या मुक्त हस्ताने ते पाकिस्तानला मदत करत आहेत ते पाहता आपल्याला भविष्यात भयानक हानीला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे ! आपल्याला एकाच वेळी दोन ठि़काणी युद्ध करण्याच्या स्थितीला सामोरे जावे लागेल असे दिसते ज्याला टू-फ्रंट वॉर असे म्हणतात. रशिया सुद्धा पाकिस्तानला भरघोस मदत करु लागला आहे आणि चीनला सुद्धा ! रशियाने पाकिस्तान बरोबर Mi-35 ची डील केली आहे तर चीन बरोबर S-400 Missile Systems ची डील केली आहे,एव्हढेच नव्हे तर रशियाने चीब बरोबर cyber-security agreement देखील केले आहे ! यात कमी म्हणुन की काय Russia-China Superjet-100 ची $3 billion ची डील सुद्धा झाली. बरं अमेरिकेचा पाकड्यांना होणारा मदतीचा ओघ आणि त्याचे डिटेल्स पाहता पाकिस्तान किती विविध प्रकारे सज्ज होत आहे ते पाहुन प्रचंड काळजी वाटते ! Major U.S. Arms Sales and Grants to Pakistan Since 2001 जाता जाता :- आपली अवस्था एका पाण्याच्या पातेल्यात बसलेल्या बेडका सारखी झाली आहे, या पातेल्यातले पाणी तापते आहे आणि बसलेल्या बेडकाला हळु हळु वाढत्या तापमानाच्या पाण्याचे भानच नाही ! जेव्हा पाणी उकळुन चटका बसेल तो पर्यंत वेळ गेलेली असेल !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.net
  • Log in or register to post comments

+१११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Fri, 05/29/2015 - 13:03 नवीन
अमेरिका हे महाहरामखोर राष्ट्र आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा तर मग अख्खा देशच बेचिराख करावा लागेल. बाकी सद्दाम कसाही असला तरी भारताला सपोर्ट देत असेल तर माझाही सपोर्ट त्याला आहेच. अन सद्दाम कसाही असो, अमेरिकेचा नैतिक हक्क काय होता तिकडे जाऊन राडे करायचा? अन वर तोंड करून शहाणपणा शिकवताहेत *****चे! यांच्या ************. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या

काळा पहाड
Fri, 05/29/2015 - 13:18 नवीन
प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या फायद्याचंच राजकारण करतं. अमेरिकेनं केलं ते त्यांच्या फायद्याचं. भारत तेवढा शक्तिशाली असता तर भारतानंही असंच करायला हवं. जे राष्ट्र हे करत नाही आणि बाकीच्यांच्या मताबद्दल काळजी करतं ते रसातळाला जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आपणास मुद्दा कळालेला नाही.

बॅटमॅन
Fri, 05/29/2015 - 13:23 नवीन
मुद्दा तो नाही. अमेरिकेने सद्दामला संपवले हे लै भारी काम केले असे इथे काहीजणांना वाटतेय ते चूक आहे इतकेच सांगायचा प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा