Skip to main content

मिसिंग यु, सद्दाम !

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 28/05/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!! http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Behe…

वाचने 35533
प्रतिक्रिया 189

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

* व्हिएतनाम हा असा एकुलता एकच देश आहे की ज्याने अमेरिका (व्हिएतनाम युद्ध) आणि चीन (कंबोडियन युद्ध) या दोन आधुनिक जागतीक सामरी सत्तांना युद्धात पाणी पाजले आहे. व्हिएतनामीज 'अमेरिका सेव्ज मॅनकाइंड' वाले सायकोलॉजिकल प्रोपागंडा सिनेमे बघत नसतील. विवेचन अगदी योग्य आणि माहितीपूर्ण.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या सगळ्या निर्नायकी देशांच्या वाताहतीच्या पार्श्वभूमीवर नेल्सन मंडेलांचं नेतेपण (Leader आणि visionary या दोन्ही प्रकारे चोवीस कैरेट सोन्याप्रमाणं उजळून दिसतं) एक्कामालकांचं विवेचन नेहमीप्रमाणेच भारी

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर प्रतिसाद. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते. शिवाय खोमैनी, सद्दाम, लादेन यांसारख्या भस्मासुरांच्या निर्मितीचेही. पहिल्या इराण-इराक युद्धाच्यावेळी टीवीवर अमेरिकेने तुफान प्रचार केला होता. अमेरिकेची 'पेट्रियट' क्षेपणास्त्रे इराकच्या (सोविएतदत्त) स्कड क्षेपणास्त्रांची कशी धूळदाण उडवीत याच्या चित्रफिती तेव्हा सी एन एन दाखवीत असे. त्या सर्व खोट्या होत्या असे नंतर पुढे आले. ते काहीही असले तरी त्या क्षेपणास्त्री लढाया आपल्या रामायण-महाभारत मालिकांतल्या बाणांच्या लढायांप्रमाणे लुटुपुटीच्या वाटत. म्हणजे टीवी स्क्रीनच्या एका कोपर्‍यातून स्कड अस्त्र निघालेले दिसे . तेवढ्यात दुसर्‍या कोपर्‍यातून पेट्रियट निघे आणि दोघांची हवेत टक्कर होऊन पडद्यावर धूर आणि आग पसरे. वगैरे. स्टार-वॉर्सप्रमाणे ही युद्धे पाहाण्यास मजा येई.

In reply to by राही

विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते.
बरोबर आहे. पण केवळ अमेरिकेला नावे ठेऊन विचारवंतीपणा मिरवायचा हा प्रकार आपल्याकडे चालतो त्याचा मात्र भयंकर संताप येतो.अमेरिकेने व्हिएटनाममध्ये जे काही केले ते समर्थनीय नाहीच.पण मग रशियाने पूर्व युरोपात, अफगाणिस्तानात केले त्याचे काय? सर्वत्र पोलादी पडद्याआड रशियाने कोट्यावधी लोकांना कशा हालापेष्टा भोगायला लावल्या त्याचे वर्णन अलेक्झांडर सोल्झेनिस्टीनच्या गुलाग या कादंबरीत आहे-- आणि हो हा लेखक मुळातला रशियनच बरं का? अमेरिकेला नावे ठेवणारे लोक रशियाने जे काही केले त्याविषयी मात्र कायम मौन बाळगतात. मी तर म्हणतो की दुसर्‍या महायुध्दानंतर रशियाने पूर्व युरोप गिळंकृत केला नसता तर पुढचे सगळे रामायण कदाचित घडलेही नसते. तरीही केवळ अमेरिकेला नावे ठेवायची हा स्वतःचा विचारवंतीपणा मिरवायचा एक मार्ग म्हणून अनेक लोक वापरतात (आणि त्याचवेळी अमेरिकेत जायलाही धडपडतात) त्याचा मात्र नक्कीच संताप येतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विएत्नाममधले 'मा लाय' मॅसॅकर हे जगातील रक्तरंजित घटनांमध्ये आणि नरसंहारामध्ये 'मानाचे पान' मिळवून बसले आहे. किंवा अमेरिकेच्या मुकुटातले एक मानाचे पीस म्हणा हवं तर. कोपोलाच्या 'अ‍ॅपॉकलिप्स नाव्' या अप्रतिम चित्रपटातली अशी नापाम बॉम्बची जळिते अंगावर काटा आणतात.

आयसिस क्रूरकर्मा आहेच पण सद्दाम हा पण त्याच माळेचा मणी आहे . अनेक निष्पाप लोकांच्या मृतदेहावर त्याचा राज्यशकट उभा होता . त्याचा मुलगा उदय तर निव्वळ कसाई होता . या उदयवर एक 'devil's double ' नावाचा जबरी चित्रपट आहे . या क्रूरकर्मा उदय चा एक 'body double ' होता त्याच्या निवेदनावर आणि सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे . अर्थातच हा चित्रपट म्हणजे सगळे सत्य सांगणारा चित्रपट आहे असा माझा गैरसमज आहे . पण तुम्ही गुगल वर जरी उदय हुसेन असा सर्च केला तरी हा कसला नर राक्षस होता याची भरभरून माहिती मिळेल

In reply to by पिंपातला उंदीर

सद्दाम हलकट होता तो त्याच्या देशापुरताच. भारतातील कल्याण नामक नगरातून काही तरूण सद्दामकरता लढायचे ह्या ध्येयाने प्रेरित होऊन इराकला रवाना झाले असते का? आयसिसने ते केले आहे. जगभरातून डोकी फिरलेले, धर्मपिसाट लोक भरती करण्याची ताकद त्यांच्या खिलाफती संदेशात आहे.

In reply to by हुप्प्या

सद्दाम हा हुकुमशहा होता पण धर्मयोद्धा नव्हता. किंबहुना सुन्नी असून सुद्धा तो जिहादींचा तिरस्कारच करे. इराण इराक युद्धात सद्दाम अमेरिकेचा लाडका होता आणि इराणला संपवण्याचा प्रयत्न म्हणून अमेरिकेनं त्याला शस्त्रास्त्र पुरवली. अमेरिकेनं याच्या पूर्वी इराणच्या शहाला (म्हणजे खोमेनीच्या विरोधी सत्ताधीशाला) सुद्धा शस्त्रास्त्रं पुरवली होती. जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली. मध्य पूर्वेतलं राजकारण बरंच गुंतागुंतीचं आहे.

In reply to by काळा पहाड

जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली.
परत पेट्रोल भरून घेउन नै गेले?

In reply to by टवाळ कार्टा

नाही, तसं बहुधा शक्य नसावं कारण एकतर पायलट्स इराणी होते. १४० एफ-१४ इराणींच्या ताब्यात होती आणि त्यावर लावण्यासाठे ४०० फिनिक्स मिसाईल्स सुद्धा त्यांच्याकडे होती. दुसरं म्हणजे विमानं पळवून नेण्यासाठी तेवढं इंधन कुठून आणणार? त्या विमानांना रिफ्युएल कसं करणार? कुठे करणार? अमेरिकन्स नी या मिसाईल्स वापरण्यासाठीच्या विमानातल्या चिप्स पळवून मग देश सोडला. गूगलच्या सहाय्याने: As the Iranian revolution gathered speed in the final months of 1978, the possibility of all those weapons falling into unfriendly hands became a terrifying reality. The American intelligence community was seized with panic, for the fatal flaw of the Nixon Doctrine - the "special relationship" that had existed between Washington and Tehran - had finally surfaced, dashing a throne and a major alliance as inexorably as the furies of Greek tragedy. In the dark hours that preceded the Shah's flight from Iran, the CIA station chief in Tehran hastily dismantled US listening posts stretched along Iran's 1200 mile-long border with the Soviet Union. Sensitive equipment was destroyed or shipped out. Grumman technicians left the country carrying top secret repair manuals for the F-14 fighter. Others pocketed computer chips powering the "brains" of the Phoenix missiles that armed them http://www.iran.org/tib/krt/fanning_ch5.htm

सत्ता मिळवणे आणि तिचा विस्तार करणे या मूलभूत मानवी प्रवृत्ती नुसार सगळेच जण वागत असतात आणि आलेले आहेत. राजकारणात सारं काही माफ़ असतं या उक्तिनुसार ISIS च्या तथाकथित 'विचार'सरणी नं प्रेरित काही लोक या विचाराना पाठबळ देत आहेत. बरेच मुस्लिम लोक या विचारसरणीच्या लोकांना मुस्लिम मानत नाहीत. they are crazy people असं म्हणून बोळवण करतात. तरीही पाटला चं बाद पोर असल्यानं पाटलाच्या घरावरच दोष येतो यात नवल नाही (अर्थात पाटलांच्या घरात ज़रा जास्तच उद्योगी लोक आधीपासूनच आहेत हे लपून राहिलेलं नाहीच्च म्हणा)

स्त्रियांना स्वातंत्र्य. इराकमधे अल-कायदा प्रभावी होउ न देणं. ट्विन टॉवर हल्ल्यानंतर अफगाणीस्तान आधी इराकमधे आश्रय मिळेल का याची चाचपणी ओसामाने केली होती त्याला सद्दामने नकार दिला होता. धार्मीक कट्टरतेपेक्षा आधुनीकतेची कास धरणे. उदा. मी लोकांना त्यांची हातली आहेत ती कामधाम सोडून दिवसातुन ५ वेळा नमाजाची सक्ती करु शकत नाही वगैरे वगैरे विधाने. भारताने काश्मीर प्रश्नी युनोत जितके ठराव मांडले त्याला पाठींबा दिला. असे सद्दामचे काही नक्किच चांगले गुण आहे. पण तो क्रुरही तितकाच होता. उदा. त्याच्या दरबारात जेंव्हा तो विनोद करत असे तेंव्हा सर्वांना त्यावर हसणे बंधनकारक असे. एक जण हसला न्हवता तर तिथेच त्याला गोळी घातली होती :)

In reply to by द-बाहुबली

स्त्रियांना स्वातंत्र्य. सद्दाम आणि त्याचा मुलगा उदय हे दोघेही बलात्कारांबद्दल बदनाम होते. त्यातही उदय फारच वाईट. असे म्हणतात की त्याच्या काळात त्याचे बॉडीगार्डस शाळा / कॉलेजांच्या बाहेर सुंदर मुलींची टेहळणी करत उभे रहायचे. त्यांच्याबरोबर उदय देखील असायचा. तो ज्या मुलीकडे बोट दाखवेल तिला उचलुन नेले जायचे आणि मग तिचे मर्जी असो अथवा नसो, उदयचे समाधान होइपर्यंत उदय तिला ठेउन घ्यायचा. जर तिने त्रागा केला किंवा ती त्रासदायक ठरेल असे वाटले तर तिची रवानगी तुरुंगात अथवा वेश्याघरात व्हायची. जर तिने सहकार्य केले तर काही दिवसांनी जेव्हा उदयचे समाधान होइल तेव्हा तिची सुटका व्हायची. असहकार्य करणार्‍या मुलींना त्याने दिलेल्या यातनांवर एक लेख वाचला आहे तो तर फारच हॉरिबल होता. त्यामुळे त्यांनी स्स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि दुसरीकडे त्यांचे स्वातंत्र्य हिरावुन घेतले असेच म्हणावे लागेल.

In reply to by मृत्युन्जय

सध्या बरं चाललंय का इराकमधे स्त्रियांचं ? सद्दाम आणि उदय गेल्यापासून? उपरोध सोडून देऊ, पण तुलना सद्यस्थिती आणि सद्दामराज्य यांच्यात चालली आहे. जंगलात बिबट्या लांडग्यांनी हरणं ससे मारुन खाणं हे हरीण ससा यांच्या दृष्टीने निश्चित दुर्दैवीच.. पण त्याच जंगलात बिबट्याच्या भीतीने मनुष्यप्राणी येत नसे, तो आता आला.. त्याउपर हजारो लाखोंच्या झुंडी घेऊन आला.. बंदुका घेऊन आला.. हरीण ससे यांची दिवसरात्र कत्तल केली, जमीन उजाड करुन स्वतःच्या ताब्यात घेतली.. इत्यादि. यात बिबट्या, लांडगा म्हणजे थोर मसीहा असा अर्थ नसून तुलनेत ते परवडले अशी स्थिती सर्व हरीणसशांची या निर्नायकीमुळे झाली असा अर्थ अभिप्रेत आहे.

In reply to by गवि

सध्या जे चाललय ते घ्रुणास्पद आहे. पण त्यामुळे सद्दाम स्त्रियांचा रक्षणकर्ता होत नाही. दगडापेक्षा वीट मऊ म्हणायची असेल तर म्हणु शकतो आपण. हिटलर जर्मनीमधुन गेला आणि रशियन्सनी नंगानाच घातला. तेव्हाही परिस्थिती काही फार सुधारली नव्हतीच पण म्हणुन हिटलरला ज्युप्रतिपालक म्हणता येइल का?

In reply to by मृत्युन्जय

सद्दामने बुरखा सक्ति केलि न्हवती. स्त्रियांनी घराबाहेर पडणे, नोकरी करणे, शिक्षण घेणे त्याला गैर वाटत नसे.

In reply to by द-बाहुबली

बुरखा सक्ती केली असती. घराबाहेर पडण्यावर बंदी घातली असती, शिक्षण घेणे थांबवले असते तर उदयला बायका कश्या हेरता आल्या असत्या? एवढे सगळे केलेच तर उदयला सगळ्यात पहिल्यांदा तुरुंगात टाकायला हवे होते. अर्थात थोड्या फार फरकाने सद्दामही तसाच होता म्हणतात.

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो. जगातल्या इतर कोणत्याही देशातल्या समस्येबद्दल आपले मत बनवतांना एक काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे की आपले मत कुठल्याही प्रोपगंडातर्फे प्रेरित किंवा आधारित नसावे.

In reply to by संदीप डांगे

अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो.
अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो. अर्थात असे म्हणणे म्ह. सद्दाम = संत म्हणणे नव्हे हेवेसांनल. पण सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच.

In reply to by बॅटमॅन

सद्दाम = संत म्हणणे नव्हे याच्याशी बाडीस. सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच. म्हणूनच सावध पवित्रा घेऊन बातम्या वाचल्या तर मनोरंजनाव्यतिरिक्त काही हेतू ठेवू नये. कुणीतरी कुठेतरी दाबू पाहतं ती बातमी. बाकी सगळ्या जाहिराती.

In reply to by बॅटमॅन

आता क्रमांक उत्तर कोरियाच्या साहेबांचा आहे. गेल्या वर्षीपासून जनमानस बनवायला सुरुवात झाली आहे. येत्या तीन वर्षात उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी आपल्या जनतेला वेटीस धरले आहे आणि जनता स्वातंत्र्य मागत आहे अशी बातमी येईल. मग सद्दाम, गडाफी, अरब स्प्रींगची पुनरावृत्ती होईल. अमेरिकेचे टेबलाखालून प्रतिस्पर्ध्याचे पाय तुडवल्या जातात. प्रतिस्पर्धी वेदनेने ओरडला की बघा किती असभ्य म्हणून पार्टीत त्याला बदनाम केले जाते. अशा असभ्य माणसाला पार्टीतून हाकलून लावणे किती आवश्यक आहे हे कुणाला पटवून द्यायची गरज पडत नाही. आणि त्या माणसाला पार्टीतून उचलून 'अत्यंत सभ्यपणे' बाहेर फेकले जाते.

In reply to by बॅटमॅन

अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो.
एक गोश्त कळत नाही. इथे सगळे अमेरिकेला शिव्या घालत आहेत आणि त्यातले बरेचसे आय.टी हमाल आहेत (माझ्यासारखे). जर अमेरिकेत ऑन-साईट ओपोर्ट्यूनिटी मिळाली तर अमेरिकेला हरामखोर वगरे म्हणणारे बरेचसे लोक लंगडी घालत अमेरिकेत जायला तयार होतील. तसेही आय.टी मध्ये कधी ऑनसाईट जायला मिलते यावर सगळ्यांचे डोळे असतातच. आणि त्याचवेळी अमेरिकेला शिव्याही घालायच्या--हरामखोर म्हणायचे. आणि यात आपण काही विसंगत वागत आहोत हे त्यांच्या गावीही नसते. जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

जरा असहमती. एखादा देश म्हणजे केवळ त्याचे सरकार नव्हे. सरकारच्या अनेक धोरणांना अन कारनाम्यांना त्या देशातल्या जनतेचा (कधी अल्पसंख्य कधी बहुसंख्य) विरोध असतोच.

In reply to by श्रीरंग_जोशी

ही पळवाट झाली हो. आणि अनेक आय.टी हमालांचे प्रोजेक्ट अमेरिकन सरकारच्या कुठल्यातरी डिपार्टमेन्टचेही असतात. मी स्वतः डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरचा प्रोजेक्ट केला आहे. चांगले सहा महिने वॉशिंग्टनमध्ये होतो मी. आणि जरीही प्रोजेक्ट प्रायव्हेटचा असला तरी अमेरिकेतल्या प्रायव्हेट कंपन्या कशा आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. तिकडे चांगले बक्कळ पैसे मिळतात त्यालाच नुसते महत्व. बाकी तत्वज्ञान गेले भाड्यात. पैशाला महत्व देण्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.पण मग ज्या देशात जायला आपण टपून बसलेले असतो त्यालाच (विशेषतः आपण स्वतः त्या देशाचे नागरिक नसताना) हरामखोर वगैरे म्हणणे हा ढोंगीपणाच आहे. स्वतःच्या बायकांची बाळंतपणे अमेरिकेत करावीत म्हणजे आपल्या मुला/मुलीला जन्मजात अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल यासाठीही धडपडणारे महाभाग आहेत आमच्या हापिसात. अशांनी परत अमेरिकेला हरामखोर म्हणणे यात काहीच ढोंग नाही?आणि ज्यांना कधीच अमेरिकेत ऑनसाईट जावेसे वाटत नसेल त्यांनी काहीही म्हटले तरी हरकत नाही.पण आपण स्वतः ज्याची इच्छा ठेवतो त्यालाच विसंगत वागताना लोक दिसले तर त्या ढोंगीपणाची कीव याते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

तुमचे म्हणणे पटत आहे पण 'हरामखोर' किंवा त्या प्रकारचे शब्द न वापरता विरोध दर्शवला किंवा आक्षेप घेतला तर? अमेरिकेत किंवा कुठल्याही देशात काम करायला जाणे अन asylum (मराठीत शरणागती बहुधा) घेणे यामध्ये त्या व्यक्तिच्या वर्तनातला फरक अपेक्षित आहे. आमच्या शहरात ९० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेने asylum दिलेल्या सुमारे ५० हजार सोमालियन लोकांना वसवले गेले. काही महिन्यांपूर्वी त्या लोकांच्या इथे जन्मलेल्या मुलांनी (वय १९-२० वगैरे) आयसिसमध्ये सामिल होण्यासाठी टर्की वगैरे कडे कूच केले. तर काही जण इथल्या विमानतळावरच पकडले गेले. तर इथल्या सोमालियन समाजातील धुरिणांनी या तरुणांच्या कृत्याचे समर्थन केले तर तो ढोंगीपणाच काय द्रोहच समजला जाईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

तुमचे म्हणणे पटत आहे पण 'हरामखोर' किंवा त्या प्रकारचे शब्द न वापरता विरोध दर्शवला किंवा आक्षेप घेतला तर?
माझा आक्षेप दुटप्पीपणावर आहे.एकीकडे अमेरिकेला नावे ठेवायची (शब्द कुठलेही असले तरी) आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जायला धडपडायचे हा दुटप्पीपणा आहे. काही लोक म्हणतात की अमेरिकन लोक चांगले असतात पण अमेरिकन सरकार हरामखोर आहे.पण मग असे म्हणणारे भारतीय त्याच हरामखोर अमेरिकन सरकारच्या भारतातील दूतावासात जातात आणि त्याच हरामखोर सरकारकडून मिळालेला व्हिसा (एच-१) आपल्या सी.व्ही वर मोठ्या अभिमानाने मिरवतात.हल्ली अपॉइन्टमेन्ट सिस्टिममुळे रांगेत उभे राहावे लागत नाही.पण मी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत गेलो (सन १९९९) त्यावेळी रात्री ३ पासून कॉन्सुलेटपुढे रांगेत उभे राहणारे लोक होते. हा दुटप्पीपणा नाहीतर काय आहे? एकीकडे इराकमध्ये अमेरिकेने लोक मारले म्हणून मगरीचे अश्रू ढाळायचे आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जाऊन प्रोजेक्ट करायचे, अमेरिकन इकॉनॉमीमध्ये आपल्या परिने खारीचा वाटा उचलायचा आणि त्याच अमेरिकन सरकारचे हात बळकट करायचे ते सगळे चालते अशांना. शेवटी काय की तुम्ही त्या देशाचे नागरिक नसूनही तुम्हाला तिथे जायला मिळते, तिथल्या चांगल्या लाईफस्टाईलचा उपभोग घेता येतो आणि बक्कळ पैसे साठवता येतात या सगळ्यात अमेरिकन सरकारचा काहीच वाटा नाही? ठिक आहे तुम्ही तिथे जाता ते उपकार करायला नाही आणि तुम्ही जे काम करता त्याचा फायदा त्यांनाही होतो.पण त्यातून तुमचा फायदा काहीच होत नाही का? म्हणजे आपला फायदा होत असेल तिथे त्याच हरामखोर अमेरिकन सरकारपुढे रांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत. समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा. मग अमेरिका किती थोर याचे गोडवे गायलाही हे कमी करणार नाहीत. शेवटी आपला स्वार्थ साध्य होत असेल की सगळे काही चालते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा. वटवाघूळ यांच्याशी दणकून सहमत

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंगरावांशी सहमत आहे. पाकिस्तान सरकार व आर्मी हरामखोर आहे म्हणजे एखादा सर्वसामान्य 'पाकडा' हरामखोर असेलच असे नाही. अन राहता राहिला ढोंगीपणाचा मुद्दा, ढोंगी तर आपण आहोतच पण या केसमध्ये ते लागू होत नाही. पण काळापहाड साहेबांनी उपस्थित केलेले लॉजिकच अजून ताणल्यावर त्यातला फोलपणा दिसून येईल. अमेरि़का हरामखोर आहे तर मग तिकडे ऑनसाईटची संधी मिळाल्यास कशाला जायचे? जर तिकडे जाऊन त्यांचे पैसे पगाररूपाने आपल्या देशात आणता येत असतील तर का नाही जायचे? तेवढीच अद्दल घडणार नाही का हरामखोरांना? तेवढीच लूट अजून येईल आपल्या देशात, नै का? तस्मात सैद्धांतिकरीत्याही अमेरिकेला शिव्या घालणे आणि संधी मिळाल्यास तिकडे पळणे या भूमिकेत दुटप्पीपणा नाही. भले मग वापरलेले लॉजिक कितीही हास्यास्पद असो.

In reply to by बॅटमॅन

जर तिकडे जाऊन त्यांचे पैसे पगाररूपाने आपल्या देशात आणता येत असतील तर का नाही जायचे? तेवढीच अद्दल घडणार नाही का हरामखोरांना? तेवढीच लूट अजून येईल आपल्या देशात, नै का?
याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा? लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा?
काय पायजे ते समजा. मूळ आक्षेपच इतका हास्यास्पद आहे की त्याचे प्रत्युत्तरही असेच येणे क्रमप्राप्त आहे.
लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?
माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.

In reply to by बॅटमॅन

माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.
पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?
त्यात तर अजून आनंद आहे. हरामखोरांचा पैसा अतिशय अत्यल्प प्रमाणात का होईना आपण हडपू शकलो हे समाधान नाही काय? =))

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?
हा स्वदेशासाठी केलेला त्याग असतो ;) :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

दोन बी.एच.के चे फ्लॅट
फ्लॅट घेतले की रियल इस्टेट सेक्टर ला बूस्ट मिळतो, सरकारला सर्व्हिस चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे मिळतात, एजंट लोकांना फ्लॅट भाड्याने देता येतो, भाड्याने घेणार्‍यांवर किराणा मालाची दुकानं चालतात, फ्लॅट मध्ये काम करणार्‍या लोकांना रोजगार उपलब्ध होतो, झाडूवाले, रद्दीवाले, चहा टपरीवाले, फूलवाले यांची दुकानं चालतात. म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्‍याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.
फॅट बॅन्क बॅलन्स
बँकेची लिक्विडिटी वाढते, बँक ते पैसे कर्ज देवू शकते, कर्ज घेणारा त्यातून उद्योग उभा करू शकतो, बँक कर्मचार्‍यांना काम मिळते, कर्जाच्या एजंट लोकांना काम मिळते. म्हणजे परत इकॉनॉमीला चालना मिळते.

In reply to by काळा पहाड

मी माझ्या मुनशीपालीटी,आमदार्,खासदार्,राज्यसरकार, आणि केंद्र सरकार यांना नेहमी चांगलेच म्हणायचे. अगदी हबीब तन्वीर प्रहार मध्ये पोलिसांना म्हणतो "कोई प्रोब्लेम नही ". कुणीतरी लिंकाळे अड्कवा इथे. चला मिपा सशक्त व्हावे म्हणूनही टिका-टिप्पणी करू नका (अन्यथा मिपावर येऊ नका) घाबरट नाखु

In reply to by काळा पहाड

म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्‍याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.
देअर यू गो. मग त्याच न्यायाने भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशानेही इकॉनॉमीला चालना मिळते. मग ते पण समर्थनीय व्हायला हवे. हरामखोरांची चाकरी करून मिळालेला पैसाही हरामच नाही का?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बरं बरं, राहिलं बुवा. आम्ही आहोत हरामखोर, बास ?

In reply to by काळा पहाड

काळा पहाड , बॅटमॅन आणि श्रीरंग भाऊ अमेरिकत जाऊन पैसा कमावणे (मग तो स्वत: साठी असो किंवा देशासाठी) ह्यात काहीही वावगं नाही. प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा आणि त्याला वाट्टेल तसा खर्च करावा. काहीही आक्षेप नाही पण एक अवांतर प्रश्न : अमेरिकत गेलेल्या काही (किंवा बहुतांश) भारतीयांना रुपयाची किम्मत घसरली की फार आनंद होतो आणि वाढली की दु:ख होतं. कारण रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते.हे वर्तन समर्थनीय आहे का ?

In reply to by चिनार

अमेरिकत जाऊन पैसा कमावणे (मग तो स्वत: साठी असो किंवा देशासाठी) ह्यात काहीही वावगं नाही. प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा आणि त्याला वाट्टेल तसा खर्च करावा. काहीही आक्षेप नाही
अहो त्याला आक्षेप कोणाचाच नाही हो. आक्षेप जिथे जाण्यासाठी जीव वरखाली होतो त्याच देशाला हरामखोर वगैरे म्हणण्यावर आहे. म्हणजे ज्या ताटात खायचे त्याच ताटात ह*यचे या प्रवृत्तीला.

In reply to by चिनार

रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते
पण रुपयाची किंमत घसरली की वाईट हे कोण सांगितलं? रुपया स्ट्राँग म्हणजे इकॉनॉमी स्ट्राँग असं नस्तं कै. कित्येक वेळा तर रुपयाचं डिव्हॅल्यूएशन ही एक विचारपूर्वक केलेली स्टेप असते.

In reply to by काळा पहाड

मी गृहीत धरतो की माझ्या प्रश्नाचा रोख तुम्हाला कळला आहे ! तरीसुद्धा तुमच्या मुद्द्याला प्रतिसाद देतोय..
रुपयाचं डिव्हॅल्यूएशन -
मी रोज होणाऱ्या पाच -दहा पैशांच्या चढ उतरविषयी बोलत नाहीये . ६०-६२ रुपयांवरून USD ची किंमत जेंव्हा ६८ वर गेली होती तेंव्हा ती एक भारत सरकारची विचारपूर्वक स्टेप होती असे मला तरी वाटत नाही. कृपया मुळ प्रश्नावर उत्तर द्यावे. माझा हेतू कोणावर टीका करण्याचा नसून ही मानसिकता समजून घेण्याचा आहे.

In reply to by चिनार

अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच उत्तर देतोय. तुम्ही म्हणालात,
अमेरिकत गेलेल्या काही (किंवा बहुतांश) भारतीयांना रुपयाची किम्मत घसरली की फार आनंद होतो आणि वाढली की दु:ख होतं. कारण रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते.हे वर्तन समर्थनीय आहे का ?
रुपयाचं डिव्हॅल्यूएशन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न झाला तरी अमेरिकेतल्या भारतीयांना त्यांच्या पैशाला जास्त किंमत येत असल्यामुळे आनंद होतो हा तुमचा मुद्दा आहे. माझं म्हणणं असं आहे की रुपया घसरला की भारतीयांना आनंद होतो हे खरंच आहे. पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तुम्ही स्ट्राँग आणि वीक या शब्दांच्या ढोबळपणामुळे एका विशिष्ट प्रकारे गृहीत धरत आहात. डिव्हॅल्यूएशनमुळे इकॉनॉमी वर काय परिणाम होईल हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि ती गोष्ट इतकी साधी नाही. त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.

In reply to by काळा पहाड

त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.
+१ आणि इथे अनिवासी भारतीयच नव्हे तर भारतात राहूनच आयात्/निर्यात करणारेही त्यानुसार आनंदी/दु:खी होतील कारण इथे आनंदी होणारे फक्त ट्रेडर म्हणून आनंदी असतात आणि प्रत्यक्षात भारतीय अर्थव्यवस्थेस सक्रीय हातभार लावत असतात. डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय तर रुपयांचा दर वाढलेला असताना परकीय चलन विकून (आणि रुपये विकत घेऊन) ही घसरण थांबवण्यात सक्रिय सहभाग घेतात असेही म्हणू शकता. म्हणून दुसर्‍या बाजूने बोलायचे झाले तर जर तुम्ही असे मानत असाल की डिव्हॅल्यूएशनने (मग ते ५० पैसे असो की १० रुपये) रुपया कमजोर (आणि पर्यायाने अर्थव्यवस्था कमकुवत) होतोय तर तुम्ही अशी आशा करायला हवी की डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय अजून वाढायला हवेत. :)

In reply to by काळा पहाड

ओके ! या विषयावर ज्ञान नसल्यामुळे वरील प्रश्न विचारला होता. विनिमय दर, कच्च्या तेलाचे भाव, सोने चांदीचा भाव आणि एखाद्या देशाची अर्थव्यवस्था याचा परस्परांशी काय संबंध आहे हे सांगू शकाल का ? वेगळा धागा काढला तर उत्तम ..

In reply to by चिनार

डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरल्यास मला आनंद होतो. निर्यात हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असल्याने अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण अशा वेळी तुलनेत कमी होतो. बाकी परदेशात राहणार्‍या भारतीयांपैकी एक असल्याने देशाची परकीय गंगाजळी थेट वाढवण्यास अमीबाएवढा का होईना आपला वाटा असतो याचेही समाधान असते. कुठलाही सामान्य माणूस पहिले स्वतःचा फायदा तोटा बघणार. एखाद्याने २००६ मध्ये १० लक्ष रुपयांना घेतलेला फ्लॅट २०१४ मध्ये ४० लक्ष रुपयांना विकला गेल्यास आनंद मानणारा माणूस पाहायला मिळतो की त्याच वेळी घरांच्या किमती अवाजवी वाढल्याने सर्वसामान्यांचे जिणे अवघड होताना पाहून मनापासून दु:खी कष्टी झालेला पाहायला मिळतो? इथे आम्हाला जेव्हाही भारतात बनलेल्या वस्तु जसे कपडे वगैरे दुकानात दिसतात तेव्हा खरेदी करायच्या वेळी आवर्जुन त्यांना प्राधान्य देतो. अवांतर - गेली अनेक वर्षे डॉलर रुपया विनिमय दर बर्‍यापैकी स्थिर आहे. जुलै २०१३ मध्ये काही दिवसांसाठीच हा भाव ₹६८ प्रति डॉलर वर गेला होता.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.
अरेवा. अजब तर्कट लावून भारतीय ढोंगीपणाचे सरकटीकरण केल्याबद्दल अभिनंदन. इथे अमेरिकेतच काय गल्फ आणि इतर मुस्लिम देशांमधे नोकरीस असणारेही लोक आहेत. मुस्लिमांचा प्रचंड राग करणारे विप्रोमधे हिरिरिने काम करायला जातात. एखाद्या देशाची परराष्ट्र धोरणं आणि एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी याचा तुम्ही जबरदस्त संबंध लावलाय. वा, मजा आली.

In reply to by संदीप डांगे

एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी ....
हे वाचून मात्र मस्त मनोरंजन झाले बघा. आमचे कामकरी हिंजवडीला २ बी.एच.के घेतात. आपला दोन बी.एच.के कलिगच्या २ बी.एच.के पेक्षा ५० स्क्वेअर फूट कमी असेल तरी ते त्यांना कमीपणाचे वाटते. म्हणून कुठेतरी रो-हाऊस घेतात नाहीतर सेकंड होम म्हणून दुसरा फ्लॅट घेतात. असे हे कामकरी लोक :) अमेरिकेविषयी इतका राग असेल तर कोणी जायला सांगितले आहे तिथे? कोणाचाही आग्रह नाही. रच्याकाने का हो मिसळपावचा सदस्य नसलेले लोक सदस्य व्हायला धडपडत असतील आणि त्याचवेळी मिसळपावला 'हरामखोर' संकेतस्थळ म्हणत असतील तर त्यात तुम्हाला काहीच ढोंगीपणा वाटणार नाही का हो?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

कामकरी हा शब्द वर्किंग प्रोफेशनल या अर्थाने घेतलाय साहेब. गरिब, हातावर पोट असणार्‍या मजूराचा अर्थ तुम्ही काढताय. तसेही भारत सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत होते म्हणून बरेच लोक ठो-ठो करायचे. त्यांनाही देश सोडून जायला सांगायला पाहिजे, नाही?

In reply to by संदीप डांगे

तसेही भारत सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत होते म्हणून बरेच लोक ठो-ठो करायचे. त्यांनाही देश सोडून जायला सांगायला पाहिजे, नाही?
असेच लोक सौदी अरेबियात गेले तर त्यांना हाकलायचा सौदी सरकारला नक्कीच हक्क आहे आणि तसे त्यांनी केले तरी त्यात काहीच चुकीचे नाही. एकीकडे एका विशिष्ट धर्माचे नावही सहन होणार नाही आणि दुसरीकडे त्याच विशिष्ट धर्माच्या सर्वात महत्वाच्या दोन प्रार्थनास्थळांचा प्रतिपालक असे बिरूद मिरविणार्‍या राजाच्या सरकारने दिलेल्या व्हिसासाठी खटपट करणे हा पण तसाच दुटप्पीपणा झाला.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

रावसाहेब. ते व्हिसा व्हिसा सोडून द्या. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल काय? भारत सरकारची धोरणं पटत नाहीत तरी भारतात राहणार्‍यांना तुम्ही ढोंगी म्हणाल काय?

In reply to by संदीप डांगे

ते व्हिसा व्हिसा सोडून द्या.
का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा. कारण माझा मुद्दा अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून जीव वरखाली होत असलेल्यांविषयी आहे. माझा मुद्दा अमेरिकेचे नागरिक नसलेल्या पण अमेरिकेत जाण्यासाठी आसुसलेल्या आणि त्याच वेळी अमेरिकेला हरामखोर म्हणणार्‍या लोकांविषयी आहे.अमेरिकन नागरिकही अमेरिकन सरकारवर टिका करतच असतात आणि तो त्यांना त्या देशाच्या नागरिकत्वाबरोबर मिळालेला अधिकार आहे. माझा मुद्दा त्यांच्याविषयी नाहीच. माझा मुद्दा इथल्या हरामखोर कंपनीविषयी आहे. इतकी अमेरिका आवडत नसेल तर कशाला जाता तिथे?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा.
बरं नका सोडू पण शांत व्हा. उगीच रक्तदाब वाढेल तर काय घ्या?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बरं बरं. पण कुणी अमेरिकेविरुद्ध बोलतंय तर तुमचा का जीव वरखाली होतोय? जगात शांतता राहावी म्हणून जगाचा नागरिक म्हणूनही कोणत्याही देशाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. फसलेल्या अमेरिकन धोरणांमुळे भारताला झळ पोचत असेल तर अमेरिकेवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे? कित्येक अमेरिकन मुस्लिम देशांना शिव्या घालत असतील पण त्यांनी मुस्लिम देशात जाणे सोडले काय? तुमचं अमेरिकाप्रेम इतकं उफाळून आलंय की त्या नादात इथल्या सदस्यांना तुम्ही चक्क हरामखोर म्हणत आहात? की काही वैयक्तिक स्कोर सेट्लिंगचा मामला आहे? बायदवे, तुम्ही हरामखोर हा शब्द वापरून ही चर्चा कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. आशा आहे तुम्हाला या शब्दाचा योग्य अर्थ माहित असेल.

In reply to by संदीप डांगे

जर अमेरिकेचा ढोंगीपणा चालतो तर भारतीयांनीच काय घोडं मारलंय? आमचाही सो कॉल्ड ढोंगीपणा चाललाच पाहिजे, नै का? (मुळात आहे ती भूमिका ढोंगी म्हणावी का इथून सुरुवात आहे. समजा ती भूमिका ढोंगी आहे असे सिद्ध झाले तरी मग एकतर कुणाचाच ढोंगीपणा सहन करायला नको किंवा सगळ्यांचा करा. असं एकाला एक न्याय अन दुसर्‍याला दुसरा असला प्रकार नको.)

In reply to by बॅटमॅन

मक्काय्तर... जिथं रुपये-डॉलर-पाउंड्स-युरो-दिनार-रुबल्स चा प्रश्न येतो तिथं माणसानं खमक्या क्यापीटालिस्ट व्हावं. तेवढं सोडलं तर बाकी जगात ढोंगीपणाशिवाय काय नाय असं आमच्या बाचं ठाम मत हाय.

In reply to by संदीप डांगे

पण मला तर ते म्हंतात ते बरोबर दिस्तंय. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरणार्‍यांनी चीन वर टीका करू ने. हॉलिवूड मूव्हीज बघणार्‍यांनी अमेरिकेवर, जपानी कार/कॅमेरा वापरणार्‍यांनी जपानवर, वाईन पिणार्‍यांनी शरद पवारांच्यावर, आधार कार्ड असणार्‍यांनी युपीए वर आणि बुलेट ट्रेन मधे बसणार्‍यांनी (जेव्हा होईल तेव्हा) मोदींवर टीका करू ने.

In reply to by काळा पहाड

टीका करण्यात नक्की प्रॉब्लेम काय आहे? वरील एंटिटीज़ काही घटकांचा पुरवठा करतात म्हणजे कै उपकार करत नाहीत. आज शरद पवार आहेत, उद्या दुसरा कुणीतरी येईल. टीका केली तर जणू त्या घटकांचा पुरवठा बंद होईल अशी भीती आहे की काय तुम्हांला? =))

In reply to by बॅटमॅन

एकूणच आपण तर बुवा या दोन वाक्यांवर बेहद्द खूष आहे. एकूणच कुठेही वापरता येतातः १. एकूणच मिरची जोरदार झोंबलेली दिसत आहे. उत्तम. २. एकूणच काही जणांच्या धोतराच्या सोग्याला हात घातला आहे मी असे दिसते :)