Skip to main content

मिसिंग यु, सद्दाम !

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 28/05/2015 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
इसीसच्या क्रूर कारवाया वाचल्या बघितल्या की भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. इसिसचा प्रभाव अगदी शेजारी कल्याण सारख्या ठिकाणा पर्यंत पोहोचेल असे स्वप्नात ही वाटले नव्हते. सिरीया, इराकची भयनगरी करून टाकलीय. बायकापोरींचं खेळणं करून टाकलंय. हवेतसे वापरतात आणि वाईट फेकून देतात. या पार्श्वभूमीवर सद्दामची हल्ली प्रकर्षाने आठवण येते. सद्दाम असता तर जग असे भयाच्या खाईत लोटू नसतं दिलं, इसीस आणि अलकाईदाला डोकं वरती काढू नसतं दिलं, ईराक आणि सिरीयाचा नरक नसता होऊ दिला ! पण सद्दामला फासावर लटकवून पृथ्वीवर एक नरक जन्माला घालून आख्या मानव जातीला वेठीस धरून अमेरिका बाजूला झालीय !!! http://i1.wp.com/www.loonwatch.com/wp-content/uploads/2014/08/ISIS_Behe…

वाचने 35533
प्रतिक्रिया 189

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

सद्दाम हुसैन कसे ही असले तरी त्यांनी समस्त इराकला एका सूत्रात बांधून ठेवले होते. (जसे आपले कांग्रेसी किती ही भ्रष्ट असले तरी त्यांनी देशाला एका सूत्रात बांधून ठेवले होते). देशात शांती होती. (आपल्या देशात आज ही आहे आणि भविष्यात ही राहील) इजिप्त, सिरीया, लिबिया आणि इराक सर्व ठिकाणी अमेरिकेने खेळी केली सोशल मेडीयाचा गैर वापर केला (मुख्यत: इजिप्त). तेलाच्या पैश्याच्या जोरावर मध्य आशियात प्रगती झाली नाही पाहिजे असे धोरण अमेरिकेने १९७४ नंतर अमलात आणायला सुरु केले, त्याचा परिणाम, इराक -इराण युद्ध ते आजचे अलकायदा आणि ईसीस). आपल्या देश्यात ही तथाकथित सोशल मिडीयाच्या (... फ...) सहाय्याने देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होतास पण आपल्या जनतेने त्याला निवडणूकीत प्रतिसाद दिला नाही. अन्यथा आपल्या देशात ही यादवी माजली असती. (दिल्लीत थोड्या प्रमाणात तो यशस्वी ही झाला- लोकांच्या मनातून लोकतंत्र विषयी विश्वास उडविण्याचा थोडा फार प्रयत्न पुढील ५ वर्ष हे लोक करतील- पण आपल्या देशाचे एक चांगले आहे. इथे गादी आपल्या हिशोबाने नेत्यांना पूर्व परंपरेनुसार चालविते अराजकतेची शक्यता कमीच)

सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही क्रूर होता. त्याने, त्याच्या बायकोने व जवळच्या नातेवाईकांनी अत्यंत क्रूरपणे अनेकांना ठार केले होते. गडाफी, लादेन, सद्दाम अशा नरराक्षसांना मारून अमेरिकेने मोठे काम केले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ 27 व्या वर्षी देशाचा प्रमुख होऊन 70-72 व्या वर्षी पर्यन्त अतिशय चांगल्या प्रकारे राज्य चालवणारा शासनकर्ता होता. अमेरिका विरोध हा त्याचा अजेंडा असल्याने अमेरिका त्याच्या विरोधात प्रचार करणं ओघानं आलंच. शेवटी शेवटी पळून जाण्याची संधी असतानाही त्यानं पळून न जाता आपल्या जन्मगावीच् राहून तो लढत राहिला व शेवटी हाती लागला. आपल्या कुटुंबियाना त्यानं शेजारच्या देशांमध्ये व फ्रांस सारख्या देशांमध्ये स्थलांतरित केलं होतं. अमेरिका जिथे 'तेल' आहे तिथे तोंड घालतेच् (आतापर्यंत तरी)

In reply to by प्यारे१

सहमत. गडाफी एक प्रखर राष्ट्रभक्त होता. आपल्या कार्यकाळात त्याने अमेरिकेची हुशारी त्यांच्याच घशात घालून मांडलिकत्व पत्करण्यास नकार दिला. गडाफीचा सद्दामसारखा काटा न काढता आल्याने सोशल-मीडीया-क्रांतीच्या नावाखाली अमेरिकेने कार्यभाग साधला. माझे काही चुकत असेल तर दुरुस्त करावे ही विनंती. - (प्रखर राष्ट्रभक्तांच्यात धर्माधारित भेदभाव करू नये असे मानणारा एक राष्ट्रभक्त.)

In reply to by संदीप डांगे

लाहोरच्या क्रिकेट स्टेडियमचे नाव गड्डाफी स्टेडियम का आहे हे पण जरा सांगा की. गड्डाफीचा पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला सपोर्ट होता. सद्दामचा भारताला सपोर्ट म्हणून त्याला चांगले म्हटले जात असेल तर गड्डाफी पाकड्यांना धार्जिणा होता म्हणून त्याला नावे का ठेवली जात नाहीत? की दोघांच्याही उचलबांगडीमध्ये 'अमेरिका' हा कॉमन फॅक्टर होता म्हणून अमेरिका करेल ते चुकीचे असे म्हणत अमेरिकेला नावे ठेवायची?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ओके. या प्रश्नांचे उत्तर देण्याआधी हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by संदीप डांगे

हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
त्याआधी हिटलर, मुसोलिनी आणि माओ यांच्या पंगतीत शिवाजीमहाराजांना का न्यावेसे वाटले हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सद्दामचा भारताला सपोर्ट म्हणून त्याला चांगले म्हटले जात असेल सद्दाम कसा होता हे सगळ्याना माहित आहे आणि काहि सदस्यांच्या प्रतिसादात याचे डिटेल्स सुद्धा आहे. मि भारतीय असल्याने जर कुठलाही आंतरराष्ट्रीय नेता जर भारताच्या भुमिकेचे समर्थन करत असेल तर एक भारतिय म्हणुन तो माझ्यासाठि चांगला आहे. गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट माणस होते, पण त्याना मारण्याचा अमेरिकेला काय अधिकार होता ? आजचि लिबिया आणि इराक ची अवस्था पाहता आपल्याला असे वाटत नाहि काय कि हे ह्या वाईट माणसांच्या हातात असताना ह्यापेक्षा हजार पटिने चांगल्या अवस्थेत होते.

In reply to by होबासराव

गद्दाफी आणि सद्दाम लाख वाईट माणस होते, पण त्याना मारण्याचा अमेरिकेला काय अधिकार होता ? सहमत. आता अमेरिकाही पाकिस्तानला सपोर्ट करते भारताविरुद्ध तेव्हा अमेरिकाप्रेमींचा भारतीयपणा डॉलरच्या गंगेत वाहून जातो काय?

In reply to by प्यारे१

गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच देशातील नागरिकांवर त्याने अत्याचार केले होते. त्याने अनेक देशातील अतिरेकी संघटनांना पाठबळ दिले होते. ब्लॅक पँथर्स पार्टी, आयरीश रिपब्लिकन आर्मी, रेड आर्मी, रेड ब्रिगेड, पॅलेस्टाईनमधील अनेक अतिरेकी संघटना अशा अनेक अतिरेकी संघटनांना त्याने आर्थिक व राजकीय पाठबळ दिले होते. १९७२ मधील म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेत ११ इस्रायली खेळाडूंना मारणार्‍या ब्लॅक सप्टेंबर या अतिरेकी संघटनेला गडाफीचा भक्कम पाठिंबा होता. त्याने त्यावेळी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांचे मृतदेह लिबयाला आणून त्यांना एका हीरोच्या थाटात मूठमाती दिली होती. बांगलादेशाच्या शेख मुजीबर रेहमान हत्याकांडातील दोन आरोपींना गडाफीने लिबयात आश्रय दिला होता. अतिरेक्यांनी लुफ्तांसाच्या फ्लाईट ६१५ चे अपहरण केल्यावर त्यातील प्रवाशांना सोडण्याच्या बदल्यात मुक्त केलेल्या तीन अतिरेक्यांना गडाफीनेच लिबयात आश्रय दिला होता. १९८८ मध्ये या पॅन अ‍ॅम विमान कंपनीचे विमान बॉम्बने हवेत उडवून देण्यात आले होते. त्यात २४३ प्रवासी, १६ क्रू मेम्बर्स व जमिनीवरील ११ नागरिक अशा एकूण २७० जणांचा मृत्यु झाला होता. हे विमान उडविण्यात अब्देल्बसेत अल-मेगराही व लमिन खलिफा फिमा या दोन लिबयन अतिरेक्यांचा हात होता. या दोघांनाही गडाफीनेच आश्रय दिला होता. सप्टेंबर २००९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात गडाफीने भाषणात काश्मिरचा उल्लेख करून काश्मिरच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊन काश्मिर भारत किंवा पाकिस्तानात न जाता स्वतंत्र देश व्हायला हवा असा उल्लेख केला होता. त्याच्या या भाषणानंतर तो काश्मिर फुटिरतावाद्यांचा हीरो झाला होता. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत कायमस्वरूपी सदस्यत्व देण्यास सुद्धा त्याने याच भाषणात विरोध केला होता. हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.

In reply to by श्रीगुरुजी

>>>> आपल्याच देशातील नागरिकांवर त्याने अत्याचार केले होते या एका वाक्यानंतर गद्दाफीच्या अत्याचारांबद्दल आणखी काहीही माहिती दिलेली दिसत नाहीये. माझ्या कम्पनीचं लीबिया मध्ये काम सुरु होतं आणि तथाकथित उठाव झाल्यावर लोक नेसत्या कपड्यानिशी भारतात परतले आहेत. त्या लोकांच्या फर्स्ट हैण्ड माहितीनुसार गद्दाफीनं लीबिया च्या नागरिकांना अगदी व्यवस्थित 'पोसून' आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या होत्या. आणि गद्दाफीच्या राजवटीत तुलनेनं अतिशय चांगली प्रगति लीबिया करत होता.(2008 च्या मंदीनन्तर मध्यपूर्वेतले लोक लीबिया ला व्यवसायासाठी संधी मानत होते) इस्रायल च्या खेळाडूंना मारणं निषेधार्हच तरीही त्या घटनेतील दुसऱ्या बाजुचा समर्थक म्हणून गद्दाफीची काही बाजू असेलच की! भारतातच काही जण आपण अतिरेकी म्हणत असलेल्या लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणताना गद्दाफी सारख्या कडून भारतावर कशाही रीतीने अवलंबून नसलेल्या व्यकीला आपण कुठल्या बळावर आपला समर्थक बनवणार होतो?

In reply to by प्यारे१

गडाफीने केलेल्या अत्याचारांविषयी खालील लेख वाचा. http://www.thedailybeast.com/articles/2011/09/03/inside-muammar-gaddafi… १९९६ मध्ये अबू सालिम तुरूंगात गडाफीच्या सैनिकांनी कैदेत ठेवलेल्या १२०० विरोधकांची हत्या केली होती. Abu Salim prison massacre या नावाने हे हत्याकांड कुप्रसिद्ध आहे. http://www.andyworthington.co.uk/2011/03/02/how-the-abu-salim-prison-ma… http://www.smh.com.au/world/laughter-joy-relief-and-unspeakable-memorie… त्याने लिबयामध्ये काही काळ शरियावर आधारीत कायद्यांची सक्ती केली होती. त्यामुळे नागरिकांवर अनेक बंधने आली होती. गडाफीने केलेल्या अत्याचारांविषयी एवढे पुरेसे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट प्रॉब्लेम झाला. आपल्याला गद्दाफी भारत की नजर से हवा आहे की गद्दाफी लीबिया चा नेता म्हणून बघायचा आहे यावर दृष्टीकोन बदलत असल्यानं सध्या पास देतो. जाताजाता: मध्यपूर्वेत 2008 ला मंदी आल्यानंतर व्यवसाय संधी म्हणून लीबिया कड़े का पाहिलं गेलं होतं? आता तसं पाहिलं जाईल का?

In reply to by प्यारे१

>>> आपल्याला गद्दाफी भारत की नजर से हवा आहे की गद्दाफी लीबिया चा नेता म्हणून बघायचा आहे यावर दृष्टीकोन बदलत असल्यानं सध्या पास देतो. भारताच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर गडाफी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतविरोधी होता. परंतु काश्मिर प्रश्न किंवा संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समितीत भारताला हवे असलेले कायमस्वरूपी सदस्यत्व इ. बाबतीत जगातील सर्वच देश भारताच्या बाजूने आहेत असे नाही. पण तरीसुद्धा त्या देशांशी आपले राजनैतिक संबंध चांगले आहेत. लीबियाचा नेता या नात्याने तो हुकूमशहा होता. तसेच तो अनेक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांना पाठबळ देत होता. या नात्याने तो गेला हे चांगलेच झाले. >>> जाताजाता: मध्यपूर्वेत 2008 ला मंदी आल्यानंतर व्यवसाय संधी म्हणून लीबिया कड़े का पाहिलं गेलं होतं? आता तसं पाहिलं जाईल का? कल्पना नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अरे वा! एक भारतविरोधी हुकुमाशहाची सत्ता असताना भारतीय कंपन्यांना गेली अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळते, अनेक भारतीय वर्षानुवर्षे तिथं राहतात. आजही काहीजण आहेत. अतिरेकी संघटना तुमच्या दृष्टीनं हो. त्यांच्या दृष्टीनं वेगळे आहेत त्यामुळे त्यांना मदत केली जाते. जगाच्या बाजारात अहिंसा वगैरे तत्व वर्षानुवर्ष फाट्यावरच मारली गेलेली आहेत. अगदी पाकिस्तान बरोबर सुद्धा भारत अतिशय सभ्य मुलासारखा नाकासमोर चालतो असं वाटत असल्यास भाबड़ेपणाचा कळस मानावा लागेल. व्यावसायिक संधीबाबत कल्पना नाही म्हणत आहात त्याला होकार भरला तरी अशा संधी सामाजिक राजकीय आणि आर्थिक स्थैर्य असल्याशिवाय निर्माण होत नाहीत हे मान्य करायला प्रत्यवाय नसावा

In reply to by श्रीगुरुजी

हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.
असं कसं बोल्ता गुर्जी तुम्ही? त्याला अमेरिकेने मारला होता ना? मग अमेरिका करते ते सगळेच वाईट असल्यामुळे गड्डाफी मेला तर ते चांगले कसे होइल?

In reply to by श्रीगुरुजी

थोडी अवांतर माहिती - झुल्फिकार आली भुट्टो नी पाकिस्तानच्या अणू कार्यक्रम राबवण्यासाठी गद्दाफी कडे आर्थिक मदत मागितली होती. गद्दाफी ने पाकिस्तान ला १ अब्ज USD ची रोख मदत केली होती तीसुद्धा १९७४ साली. गद्दाफी ची फक्त एकच अट होती ती म्हणजे पहिले अण्वस्त्र लिबियाला मिळावे. तो हुकुमशहा होता का हे माहिती नाही पण २७ व्या वर्षी तत्कालीन हुकुमशहा इद्रिस च्या विरोधात उठाव करून तो सत्ताधीश झाला होता. सद्दाम काय किंवा गद्दाफी काय ..हे लोकं अमेरिकेपुढे कधीच झुकले नाहीत म्हणून अमेरिकीने त्यांना जास्तीत जास्त बदनाम केले.

आपण तर बाबा सद्दाम चांगला होता असंच मानतो. तो काश्मीर प्रश्नावर भारताला युनो मध्ये कायम पाठिंबा द्यायचा. असं करणारा माणूस सैतान असला तरी माझं काही म्ह्णणं नाही.

९/११ च्या धक्क्यातून अमेरिकन सावरायच्या आत खरे खोटे पुरावे मिसळून असे सादर केले की इराकविरुद्ध घोषित करायला कुठलीही अडचण आली नाही. पाताळयंत्री चेनी आणि महामूर्ख बुश आणि अनेक उद्योग ह्या लोकांनी हे कारस्थान केले. अमेरिकन लोकांच्या करातून मिळवलेले हजार अब्ज डॉलर अक्षरशः जळून राख झाले. त्यातून तेल वगैरे मिळायचे सोडाच. उलट एक अत्यंत अस्थिर, धर्मपिसाट लोकांच्या हातात गेलेला भूप्रदेश एवढेच ह्या नस्त्या उठाठेवाचे फलित. तमाम मध्यपूर्व आता अनेक वर्षे खदखदत ठेवण्याची सोय ह्या लोकांनी केली आहे. चेनीच्या हॅलीबर्टनचे उखळ पांढरे झाले. एक खोटारडा, कुठल्याही मुस्लिम देशावर आक्रमण करणारा भांडकुदळ देश अशी अमेरिकेची प्रतिमा बनली. आता खरोखरच कुठे मदत करायची झाली तर अमेरिकन जनता कच खाणार. अमेरिकन इतिहासात ह्या घटनांची एक अश्लाघ्य लांछन म्हणून नोंद कायम राहील. अर्थात आजही डिक चेनीला लाज, पश्चाताप वाटत नाही. नाही म्हणायला बुशचा बंधू राष्ट्राध्यक्ष बनू पहातो आहे त्याची पंचाईत होते आहे. इराकचे युद्ध चुकीचे होते म्हणवत नाही आणि योग्य होते असेही म्हणवत नाही. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारी हिलरीही एकेकाळी इराकविरुद्धच्या युद्धाची मोठी समर्थक होती पण हा इतिहास आता लोक विसरले असावेत. असो. कोळसा उगाळावा तितका काळाच. ९/११ च्या हल्ल्यामागचा खरा शिल्पकार बिन लादेन आणि त्याची अल कायदा ही पिलावळ ह्यांना विसरून इराकच्या मागे लागणे हे खरोखरच संतापजनक होते.

ते सगळे हरामखोर एकाला झाका आणि दुसर्‍याला काढा असले! दगडच. वीट कोणी नाही त्यात. मात्र फोटो बघून माणूस प्राणी सुसंस्कृत आहे यावरचा उरलासुरला विश्वास उडाला. हे असले भयाण प्रकार धर्माच्या नावावर होत आहेत? कुठेत सगळे सेक्युलर लोक??

In reply to by पैसा

मोदींचा-संघाचा-पर्यायाने भारताचा-आणि त्यामूळेच मिपाकरांचा हात आहे. चिनार शेठ उठाओ लेखणी और चलावे इस विषयपर ! हितेसभाई "पुरावे" तयार करायच्या मागे लागाच. आणि कॅप्टन ते सगळ्या रंगाचे चष्मे वाट रे मिपाकरांना (हिरवे-निळे-लाल्-भगवे-काळे) जेप्या सत्काराला "चिखल आणि शेण्साडा" आणायला विसरू नको. गेल्या महिनाभरातल्या मिपा राजकीय धुळवडीला वैतागलेला
कुठेत सगळे सेक्युलर लोक??
ते भाजप्-संघ यांच्या उपद्र्वमूल्यावर बारीक लक्ष्य ठेवून आहेत त्यामुळे या "किरकोळ" बाबींकडे देण्यासाठी वेळ नाहीयं

In reply to by नाखु

चांगला धागा म्हणून वाचायला सुरवात केली तर च्यामारी माझाच उद्धार सुरु आहे इथे ! राहुल गांधी आणि केजरीवाल ची शप्पथ घेऊन सांगतो इराक युद्धामध्ये माझा हात नाहीये हो नाखू साहेब

सद्दामला मारण्यासाठी अमेरिकेने केमिकल वेपन चा बागुलबूवा उभा केला परंतू साधी डांबराची गोळीही तेथे सापडली नाही, तरीही सद्दामला मारलेच. ह्यात अमेरिकेचा मुजोरिपणा व बालिश नेतृत्व दिसून येते.

सद्दामची किर्ती ऐकता तो चांगला होता असे म्हणवत नाही. पण तरीही आयसिस पेक्षा १ लाख पटींनी बरा. त्याला फुकटच मारला तेलापायी. अमेरिकेशी पंगा त्याला एकुणात महागच पडला. तरीही काळा पहाड म्हणतात त्याप्रमाणे सद्दामने भारताला सपोर्ट केले असेल तर तो महान माणूसच म्हणायला हवा.

In reply to by मृत्युन्जय

एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे??? #!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^#!$%$#@%^&#%^&#$@!$!%^ऊ%#%^^%&%$!#@%!@#%@^^%$@^!$@!%!#$%#@$^!#$%~@!!!#%!#$^%#$^!%!%#$%#$%!#$%^#$^#$@^#@#@$^#@^$#@^$#@^%$@^#$%$^

In reply to by टवाळ कार्टा

यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.

In reply to by बॅटमॅन

यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते. अगदी सहमत रे. नैतिक अनैतिकता हे फक्त शब्दभ्रमाचे प्रकार आहेत राजकारणामधे.

In reply to by बॅटमॅन

नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. अगदी-अगदी ! नैतिकता-अनैतिकता या कालसापेक्ष किंवा फारतर स्थितीसापेक्ष संकल्पना आहेत असे माझे मत आहे.

In reply to by टवाळ कार्टा

एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे???
१. जोपर्यंत तो भारताला काश्मीर वर सपोर्ट करतोय तोपर्यंत(च) तो चांगला. नाहीतर तो वाईट. २. राजकारणात कुणीही कायमचा मित्र नसतो. असतात ते फक्त कायमचे हितसंबंध.

In reply to by काळा पहाड

मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण त्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच आहे...कोणीच चूक नै

In reply to by टवाळ कार्टा

नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत का तालिबानी जेव्हा ते रशियाविरुद्ध लढत होते तेव्हा? तसंच असतं सगळं. फक्त लढाई दुसर्‍याच्या भूमीवर लढू द्यायची असते. इराण अमेरिकेला वाईट वाटतो आणि तो अणुबॉम्ब तयार करतो म्हणून तो आपल्याला पण वाईट असं नसतं कै. इराण पाकिस्तानचा गळा आवळू शकतो आणि आपल्या सैन्याला तळासाठी छाबाहार बंदर उपलब्ध करू देतो म्हणून तो चांगला आहे. इस्त्रायलनं वेस्ट कोस्ट आणि गाझा मध्ये बॉंबिंग करून निरपराधांना मारलं तरी आपल्याला रडार सिस्टीम पॅलेस्टीनियन्स देणार नाहीयेत.

In reply to by काळा पहाड

इस्राएल ची बाजु न्याय्य आहे. आणी इस्राएल सारखा छोटासा देश फक्त अस्मितेच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर काय करतोय हे बघुन खुप छान वाटतं.

In reply to by टवाळ कार्टा

जगाच्या सुरुवातीपासून चालत आलेले राजकारणाचे नियम...

नियम क्रमांक १ :

"या जगात हितसंबध हेच अग्रगण्य आणि अचल असतात, मित्र आणि शत्रू त्यावर अवलंबून बदलू शकतात."

नियम क्रमांक २ :

"नियम क्रमांक १ समजू-उमजू न शकणारे एक तर नष्ट होतात किंवा त्या नियमांचे पालन करणार्‍यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुलाम होतात."

In reply to by मृत्युन्जय

सद्दामने आपल्या राजवटीत आपल्या अनेक विरोधकांना ठार मारले होते. अनेक विरोधकांना व महिलांना कैदेत ठेवून त्याच्या सैनिकांनी अनन्वित अत्याचार केले होते. सद्दामला अमेरिकेने डिसेंबर २००३ मध्ये पकडले व डिसेंबर २००६ मध्ये फाशी दिले. त्याच्या मृत्युनंतर एका शियांच्या अतिरेकी संघटनेचा प्रमुख असलेल्या मुक्तदा अल सद्र याचे वर्चस्व इराकमध्ये वाढले. सद्दाम सुन्नी होता. इराकमध्ये शियांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्यामुळे सुन्नींच्या इसिसचा उदय झाला. इसिसच्या उदयामागे इतर कारणांप्रमाणे हे एक प्रमुख कारण होते. या अतिरेकी संघटनेला सुरवातीच्या काळात सौदी अरेबियासारख्या काही सुन्नी देशांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. इसिसचा पुढे भस्मासूर होईल असे कोणालाच वाटले नसावे. इसिस जे अत्याचार करीत आहे तसेच अत्याचार सद्दामनेही केले होते. समजा अमेरिका २००३ मध्ये सद्दामच्या मागे लागली नसती तर २००३ पासून आजतगायत सद्दामनेसुद्धा हजारो लोकांचे प्राण घेतले असते. कदाचित पुन्हा एकदा कुर्दिश बंडखोरांवर रासायनिक अस्त्रांचा प्रयोग करून क्रूरतेचे प्रदर्शन घडविले असते. इसिसचा उदय झाला हे वाईटच झाले पण सद्दाम गेला हे चांगलेच झाले. सद्दाम असता तर इसिसचा उदय झाला नसता हे नक्की, परंतु लोकांवर अत्याचार व ठार मारण्याचे प्रकार सुरूच राहिले असते. सद्दाम आणि इसिस हे एकाच माळेचे मणी आहेत.

अमेरिकेसारखे दहशदवादी राष्ट्र या जगात दुसरे नसावे ! इराक,अफगणिस्तान ची वाताहत तर केलीच पण पाकड्यां वरच्या प्रेमाचा पाझर काही आटत नाही ! ज्या मुक्त हस्ताने ते पाकिस्तानला मदत करत आहेत ते पाहता आपल्याला भविष्यात भयानक हानीला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे ! आपल्याला एकाच वेळी दोन ठि़काणी युद्ध करण्याच्या स्थितीला सामोरे जावे लागेल असे दिसते ज्याला टू-फ्रंट वॉर असे म्हणतात. रशिया सुद्धा पाकिस्तानला भरघोस मदत करु लागला आहे आणि चीनला सुद्धा ! रशियाने पाकिस्तान बरोबर Mi-35 ची डील केली आहे तर चीन बरोबर S-400 Missile Systems ची डील केली आहे,एव्हढेच नव्हे तर रशियाने चीब बरोबर cyber-security agreement देखील केले आहे ! यात कमी म्हणुन की काय Russia-China Superjet-100 ची $3 billion ची डील सुद्धा झाली. बरं अमेरिकेचा पाकड्यांना होणारा मदतीचा ओघ आणि त्याचे डिटेल्स पाहता पाकिस्तान किती विविध प्रकारे सज्ज होत आहे ते पाहुन प्रचंड काळजी वाटते ! Major U.S. Arms Sales and Grants to Pakistan Since 2001 जाता जाता :- आपली अवस्था एका पाण्याच्या पातेल्यात बसलेल्या बेडका सारखी झाली आहे, या पातेल्यातले पाणी तापते आहे आणि बसलेल्या बेडकाला हळु हळु वाढत्या तापमानाच्या पाण्याचे भानच नाही ! जेव्हा पाणी उकळुन चटका बसेल तो पर्यंत वेळ गेलेली असेल !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.net

In reply to by मदनबाण

अमेरिका हे महाहरामखोर राष्ट्र आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा तर मग अख्खा देशच बेचिराख करावा लागेल. बाकी सद्दाम कसाही असला तरी भारताला सपोर्ट देत असेल तर माझाही सपोर्ट त्याला आहेच. अन सद्दाम कसाही असो, अमेरिकेचा नैतिक हक्क काय होता तिकडे जाऊन राडे करायचा? अन वर तोंड करून शहाणपणा शिकवताहेत *****चे! यांच्या ************. असो.

In reply to by बॅटमॅन

प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या फायद्याचंच राजकारण करतं. अमेरिकेनं केलं ते त्यांच्या फायद्याचं. भारत तेवढा शक्तिशाली असता तर भारतानंही असंच करायला हवं. जे राष्ट्र हे करत नाही आणि बाकीच्यांच्या मताबद्दल काळजी करतं ते रसातळाला जातं.

In reply to by काळा पहाड

मुद्दा तो नाही. अमेरिकेने सद्दामला संपवले हे लै भारी काम केले असे इथे काहीजणांना वाटतेय ते चूक आहे इतकेच सांगायचा प्रयत्न आहे.

In reply to by बॅटमॅन

इराक ला असले स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा, सद्दामी हुकुमशाहीच्या काळातली नोकरी अन चटणी भाकरी बरी होती.

In reply to by बॅटमॅन

"अमेरिका हे महाहरामखोर राष्ट्र आहे. त्यांनी केलेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा तर मग अख्खा देशच बेचिराख करावा लागेल." आवो, आमी हिथच अमेरिकेत आहोत वो, थोडी दया दृष्टी असू द्या म्हंटलं. (हलकेच घ्या)

In reply to by मदनबाण

बाण राव एक लक्षात ठेवा अमेरिकेला जशी चीन ची भीती वाटते तशीच भारताची पण वाटते. न जाणो हे ( भारतीय) उद्या आपल्याला डोईजड झाले तर( ज्याची शक्यता बरीच आहे. म्हणू तुम्हाला नियन्त्रणात ठेवण्यासाठी ते पाकिस्तानचा वापर करत राहणारच. पाकिस्तानला ते मदत करतात ते काही पाकिस्तान बद्दल प्रेम आहे म्हणून नाही हे लक्षात घ्या. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाने एकदा संतापून जाहीर वक्तव्य केले होते कि अमेरिका आम्हाला निरोध सारखे वागवते. वापरून झाले कि फेकून द्या. सर्वसामान्य पाकिस्तानी जनता आणि लष्कर अमेरिकेचा द्वेषच करते.उद्या तुम्ही त्यांचे एक्कावान्नावे राज्य( इंग्लंड सारखे) म्हणून मान्य करा कि ते पाकिस्तानचा विध्वंस करतील कि नाही ते पहा

In reply to by सुबोध खरे

पाकिस्तानला भारतासारख्या देशाचा शेजारी अन शत्रु असण्याचा नैसर्गिक फायदा मिळतो. पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नाही. तेथील जनता गवत खाऊन जगायला पण तयार असते.

In reply to by सुबोध खरे

पाकिस्तानला ते मदत करतात ते काही पाकिस्तान बद्दल प्रेम आहे म्हणून नाही हे लक्षात घ्या. डॉक अर्थातच हे माहित आहे मला, पण त्याचा "परिणाम" तर आपल्यालाच भोगावा लागेल की नाही ? अवांतर :- इसीसच्या आणि तिच्या सारख्या क्रूर संघटना त्यांचे काम करतच राहणार, कारण त्यांना रोखणारे आत्ता तरी कोण आहे ? मनुष्याने मनुष्याचा केलेला हिंसाचार तर इतिहासाच्या पानांमधे आढळुन येतोच त्यात नव्या पानाची भर पडते इतकेच ! :( पिंजर्‍यात उभे करुन जिवंत जाळणे { मला वाटत जॉर्डनच्या वैमानिकाला काही काळापूर्वी असेच ठार केले गेले होते} स्फोटके लावुन उडवुन देणे आणि इतर ! क्रूरपणा करण्याला कुठली मर्यादा आहे का ? ह्या आणि इतर घटना पाहिल्या आणि वाचल्या की मन प्रचंड अशांत होते ! माणसा सारखा स्वार्थी प्राणी निर्माण करुन विधात्याने नक्की काय साधले ? असा विचार हल्ली बर्‍याच वेळा टाळक्यात येतो... एक सांगतो हल्ली दिवसेन दिवस मन "मुर्दाड" बनत चालले आहे ! :( माणुस प्राण्यांशीही भयानक क्रूरतेने वागतो... आत्ताच एक व्हिडीयो पाहिला ! गो-हत्या बंदीला विरोध करण्याचा एक क्रूर प्रकार पाहुन मन मेले ! https://www.youtube.com/watch?v=_xRo7LpRZps { ही लिंकी त्रासदायक आहे, आपल्या विवेकानेच ही लिंक उघडावी. } मध्यंतरी असेच एका गाईला एका छोट्या कार मधे कोंबुन नेताना पाहिले होते { https://www.youtube.com/watch?v=xYw-hpJ2PVg } तेव्हा माणसा मधल्या हैवानपणाचे दर्शन घडले ! असो.... हल्ली आजुबाजुला जे काही पाहतो तेव्हा माणसातले राक्षसच अधिक झाले आहेत अशी खात्रीच पटत चालली आहे. जाता जाता :- ‘2,300 Humvees in Mosul alone’: Iraq reveals number of US arms falling into ISIS hands

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकार

In reply to by बॅटमॅन

पण ग्वटानामो बे मध्ये अमेरिकेनं आणखी काय करणं एक्स्पेक्टेड होतं? जिहादी हे जगावरचा कलंक मानला तर कोणत्याही प्रकारे हा कलंक पुसून काढणे हे समर्थनीय आहे. या लोकांवर साम-दाम-भेद याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळं दंडाचा अतिरेकी वापर करूनच त्यांच्या साथीदारांबद्दल माहिती काढणे इत्यादी गोष्टी करता येतात. अमेरिकेच्या सैनिकांनी वापरलेले उपाय हा जिहादींचं मनोबळ तोडणारे होते. याचं एक मवाळ उदाहरण म्हणजे कर्नल आठल्येंचा लेखः http://www.rediff.com/news/2008/dec/19mumterror-no-islamic-burial-for-m… एक आणखी मवाळ उपाय म्हणजे मेलेल्या जिहादी अतिरेक्यांवर डुकराचं रक्त शिंपडून आणि त्यांना उघड्यावर फेकून देणे (आणि बाकी अतिरेक्यांना हे पहायला लावणे). अमेरिकेनं ग्वा.बे. मध्ये वापरलेल्या उपायांमध्ये या कैद्यांना कडक उन, वारा, पाउस यामध्ये छप्पर नसलेल्या पिंजर्‍यात ठेवणे वगैरे आणि इतर सुद्धा उपाय सुद्धा केले होते आणि ते समर्थनीयच आहेत.

In reply to by मदनबाण

माणूस कोंबडी , बोकड सर्रास खातात आणि त्यांना सुद्धा असेच ( निर्दयीपणे ) मारले जाते . जो न्याय गायीला तोच कोंबडी आणि बोकडांना हवा

In reply to by कपिलमुनी

माणूस कोंबडी , बोकड सर्रास खातात आणि त्यांना सुद्धा असेच ( निर्दयीपणे ) मारले जाते . जो न्याय गायीला तोच कोंबडी आणि बोकडांना हवा ह्म्म्म... तस म्हणायच झालं तर हत्ती / डास / मुंगी / यांना मारले आणि माणसांना मारले तरी मग फरक पडु नये कारण "आत्मा" प्रत्येक देहात असतो, बदलते ते फक्त स्थुल शरीर ! आता गायी बद्धल :- मनुष्य प्राणी गाय या प्राण्यावर अवलंबुन राहत आलेला आहे,या गाय प्राण्याचे दुध मनुष्य प्राणी आजन्म पीत असतो आणि ज्या प्रमाणे नारळ हा कल्पवॄक्ष समजला जातो त्याच प्रमाणे गायीला कामधेनु आणि गोमाता ही उपाधी प्राप्त आहे. तेव्हा जन्मा पासुन मॄत्यु पर्यंत { मनुष्याच्या } कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणार्‍या या पशुची हत्या होउ नये असे वाटण्यास काय गैर आहे ? अघोरी लोक { मेलेल्या} मनुष्याचे मांस खातात मग तुम्ही का खाउ शकत नाहीत ? मांसाहार हा मांसाहारच असतो... जो न्याय कोंबडी / बोकड / खेकडा यांच्या मांसाला लागतो तोच न्याय मनुष्य मांस भक्षणाला का लागु शकत नाही ? असो...

मदनबाण.....

आत्ताची बदललेली स्वाक्षरी :- एनडीए सरकारचा यूटर्न... सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली तर कॅ. कालिया प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार...

In reply to by मदनबाण

बायदवे, किती लोक गायीचे दूध पितात आणि किती लोक म्हशीचे दूध पितात याचा जरा तौलनिक अभ्यास केला तर गायीबद्दलच सिलेक्टिव्ह पुळका येणं हे अंमळ रोचक आहे.

In reply to by बॅटमॅन

मला जितके माहित आहे,वाचले आणि ऐकले आहे त्यानुसार गायीचे दूध हे म्हशीच्या दूधा पेक्षा अधिक उत्तम मानले गेले आहे. काही काळा पूर्वी जालावर वाचले होते की हिंदूस्थानी जातीच्या काही गायी लुप्त झाल्या आहेत,तसेच गाय आणि म्हैस यांच्या संख्येची तुलना करावयाची झाल्यास गायींची संख्या फारच कमी आहे. काही संदर्भ :- औषधाविना उपचार : गायीचे दूध - पृथ्वीवरील अमृत A spoon of ghee full of health: 'Poses no danger to cardiac health' and could protect us from cancer दूधाला "पूर्णअन्न" असे म्हंटले जाते, पण देशात मिळणार्‍या दूधा पैकी जवळपास ८० ते ८५ टक्के दूध हे भेसळ युक्त आहे { नक्की किती टक्के ? खरा आकडा कोणता ? } यावरुन भेसळयुक्त दूध विकुन किती पैसा मिळत असावा याचा अंदाज यावा ! हिंदूस्थान जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश असुन या देशात शुद्ध दूध मिळण्याची मारामार आहे हे कटु सत्य असुन त्याचा परिणाम नवजात बालकां पासुन वॄद्ध माणसां पर्यंत होतो कारण हे सर्व दूध पितात. येणार्‍या काळात देशाची वाढती लोक संख्या आणि घटते पशुधन संख्या पाहता दूध आणि दूधाची पावडर आयात करायची वेळ येउ नये म्हणजे झाले ! काही संदर्भ :- दूध…अमृत की विष ? गाय आणि म्हैस - दुध कुणाचे प्यावे ? The Desi Cow – Almost Extinct Maneka Gandhi for country-wide ban on cow, buffalo slaughter India’s livestock population decreases by 3.33 percent: Census जाता जाता :- सत्तेवर येण्या आधी मोदींचे विचार... एक हिंदूस्थानी म्हणुन या विचारांना माझे पूर्ण समर्थन आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela

In reply to by मदनबाण

मुद्दा गायीचे दूध उत्तम की म्हशीचे हा नाहीच. मुद्दा हा आहे की दूध पिणार्‍या समस्त भारतीयांपैकी कितीजण गायीचे दूध वा गोदुग्धजन्यच पदार्थ सेवन करतात? अन किती % म्हशीचे दूध व तज्जन्य पदार्थ सेवन करतात? हा आहे. त्या अनुषंगाने विदा असेल तर बोला.

In reply to by बॅटमॅन

मुद्दा हा आहे की दूध पिणार्‍या समस्त भारतीयांपैकी कितीजण गायीचे दूध वा गोदुग्धजन्यच पदार्थ सेवन करतात? मुद्दा,कमी संख्येने असलेल्या या जीवाचे रक्षण असा आहे. मी तरी गायीचेचे {पिशवी बंद } दूध पितो,बाकीच्या जनतेचे काही माहित नाही बाँ...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela

In reply to by मदनबाण

हर्कत नाही. तुम्ही गायीचे दूध पिता म्हणून तुम्हांला गायीबद्दल विशेष कळवळा असणे समजू शकतो. पण म्हशीचे दूध पिऊनही फक्त गायीबद्दलच कळवळा येणार्‍यांना नक्की काय वाटतं ते समजत नाही.

तुम्ही ह्या धाग्यावर आत disturbing फोटो आहेत असं लिहाल का प्लिझ? जागत हे असं काही घडतय आणि त्यासाठी आपण काहिही करु शकत नाही ह्याचा त्रास होत असतोच.. पण हे फोटो पाहिले की ह्याच जगात आपलंही बाळ आहे हे आठवतं आणि तटकन आत काही तरी तुटतं.

.सद्दाम क्रूर होताच.पण त्याच्या राजवटीत इराकमधे लोक बरेच स्वातंत्र्यात आणि मोकळे सुसह्य जगणं जगत होते असं ऐकलंय.स्त्रियांनाही बरोबरीने नोकर्‍या,हक्क,ड्रायव्हिंग,जबाबदारीची पदं होती म्हणतात.

अरेरावी; एका राष्ट्राध्यक्षाचा दुखावलेला स्वाभिमान; अनेक (सामरीक साहित्य तयार करणार्‍या; तेल उद्योगातल्या आणि इतर काही) कंपन्यांचा आर्थिक फायदा; जागतीक वरचढपणा साधण्याचा स्वार्थ; तेल जगतावर कायम स्वामित्व स्थापन करण्याची अमेरिकेची महत्वाकांक्षा; इ इ इ... इराक बट्ट्याबोळ प्रकरणामागे आहेतच. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुवेत स्वतंत्र करण्यासाठी केलेल्या युद्धातल्या विजयाच्या उन्मादात अमेरिकन लष्करी डावपेच तज्ञ (मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट) इराक युद्धात "इराक = कुवेत" हे समिकरण खरे नसून "इराक = व्हिएतनाम" हे समिकरण खरे आहे हे समजून घ्यायला विसरले ! :( व्हिएतनाम युद्ध आणि इराक युद्ध या दोन्ही युद्धांत अमेरिकेची अपरिमित आर्थिक, राजकीय आणि मान हानी झाली आहे. परंतू, युद्धस्थळांच्या स्थानिक वस्तूस्थितींमुळे त्या युद्धांचे जागतिक पडसाद एकदम विरुद्ध टोकांचे आहेत... १. व्हिएतनाममध्ये कडवे देशाभिमानी व एकसंध कम्युनिस्ट होते. तेथे अमेरिकेचे कोणतेही स्थानिक दीर्घकालीन आर्थिक हितसंबध नसल्याने तेथून पळून जाणे ही अमेरिकेसाठी मानहानीची का होईना पण आपली फासात अडकलेली मान सोडविण्याची एक पळवाट होती. व्हिएतनाम युद्धानंतर तेथे सत्तेत आलेले सरकार कडवे राष्ट्रवादी आणि बर्‍यापैकी लोकाभिमुख होते. तसेच त्यांनी परिस्थितीचे भान राखून उदार आर्थिक धोरण अबलंबिल्यामुळे आज व्हिएतनाम दक्षिण पूर्वेतला एक विकसनशील पण सर्वसामान्य नागरीकांना बर्‍यापैकी सुस्थितीत आणणारा; चीनला टक्कर देणारा *; आणि मुख्य म्हणजे जागतिक शांततेला धक्का न लावणारा देश आहे. त्या युद्धात व्हिएतनामी जनतेने नरकयातना भोगल्या आणि अमेरिकेची आर्थिक, राजकीय व मान हानी झाली, पण बाकी जगाला त्याची फारशी झळ पोचली नाही. याविरुद्ध... २. इराक (अ) शिया विरुद्ध सुन्नी विरुद्ध कुर्द; (आ) धर्मांध विरुद्ध निधर्मी (सद्दामच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेली बाथ पार्टी); (इ) पाश्चिमात्य प्रभाव असणारे शहरी विरुद्ध देशाच्या ३/४ भागांत विखुरलेल्या भटक्या जमाती (नोमॅडीक ट्राईब्ज) अश्या एकमेकाविरुद्ध असलेल्या असंख्य तत्वांमध्ये विभागलेला देश होता. असे असले तरी सद्दामने आपल्या क्रूर लष्करी पकडीत ठेवलेला हा देश मध्यपूर्वेतला आर्थिक स्थैर्य, राजकीय स्थैर्य आणि (सद्दामला राजकीय विरोध न करणार्‍या नागरिकांसाठी) सुस्थिर जीवन असलेला देश होता. इराकमध्ये मूळ युद्धात विजय मिळूनही अमेरिका आपल्याला धार्जिणे सुस्थिर सरकार आणण्यात अपयशी ठरली... कारण ते घडून यावे असे केवळ दिवास्वप्न बाळगून अमेरिका त्यासंबंधी अनुसंधान व कृती (प्लॅनिंग अँड अ‍ॅक्शन) करायला विसरली. याचे मुख्य कारण म्हणजे या दोन युद्धस्थळांत आस्तित्वात असलेली वर विषद केलेली विरुद्ध टोकाची स्थानिक वस्तूस्थिती जाणण्यात अमेरिकन राजकारणी आणि युद्धतज्ञ अपयशी ठरले... काहींच्या मते अहंकार आणि केवळ संकुचीत आर्थिक फायद्यांकडे लक्ष दिल्यामुळे ही चूक झाली. त्यामुळे, युद्धानंतर इराक सुस्थिर करण्याचे प्रयत्न करण्याऐवजी पूर्वीच्या राज्यव्यवस्थेतील महत्वाच्या माणसांना वेचून खटले, शिक्षा, उपेक्षा, इत्यादीव्दारा दूर करण्यात आले. परिणामी शासनव्यवस्था ताब्यात ठेवणारी सर्वच यंत्रणा नष्ट झाली आणि सद्दामच्या पोलदी पकडीत खूप काळपर्यंत दबून राहीलेल्या एकमेकविरोधी गटांचा उद्रेक उफाळून वर आला व अराजक माजले. अर्थातच, "जगातल्या सर्वात मोठ्या विक्रियोग्य तेलसाठ्यावर (मध्यपूर्वेवर) दीर्घकालीन नियंत्रण ठेवून जागतीक अर्थव्यवस्था आणि राजकारण आपल्या पकडीत ठेवणे" हा या युद्धातला अमेरिकेचा मुख्य उद्देश असफल झाला. युद्धानंतर दशकापेक्षा जास्त वेळ अनेक तर्‍हेचे प्रयत्न करून आणि अपरिमित आर्थिक व (दोन्ही बाजूंची) जीवहानी झाल्यानंतर अमेरिकेला इराकमधून सावध पलायन करणे भाग पडले आहे. मागे ठेवलेल्या शासकीय पोकळीत जन्मलेल्या अराजकाने इराक व सिरियात अनेक अतिरेकी तत्वांना जन्म दिला आहे. ISIS ही त्यातली अग्रगण्य अतिरेकी संघटना तर इतकी प्रबळ झाली आहे की तिचा अर्ध्या इराकवर आणि सिरियाच्या काही भागावर ताबा आहे. ताब्यातल्या भूभागातले खनिज तेल विकून आणि हितसंबंधियांकडून मिळणार्‍या देणग्या असे मिळून ISIS कडे जवळ जवळ २ बिलियन डॉलर्स जमले आहेत असा अंदाज आहे. ISIS च्या ताब्यातला भूभाग आणि तिचे उत्पन्न जगातील अनेक देशांपेक्षा जास्त आहे. या भस्मासूराच्या वल्गना आणि कारवाया पहाता त्याच्या आजूबाजूचे मध्यपूर्वेतले अनेक देश आणि सर्व जगही फार मोठ्या आणि दीर्घकालीन अनावस्थेत ढकलले गेले आहेत यात शंका नाही. ====== * व्हिएतनाम हा असा एकुलता एकच देश आहे की ज्याने अमेरिका (व्हिएतनाम युद्ध) आणि चीन (कंबोडियन युद्ध) या दोन आधुनिक जागतीक सामरी सत्तांना युद्धात पाणी पाजले आहे.