✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

झिंग बोचर्‍या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु

स — सूड, Fri, 05/22/2015 - 15:35
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले वृंदगान : दु दु दु दु काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले वृंदगान : ऑ अच्च जालं तल नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर वृंदगान : नाच गं घुमा तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम् श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले वृंदगान : आयला गो गौरीचा काका कैची घेऊनि संमं आले, टवाळातुनि कार्टे बोले "गुर्जी नाही मंमं केले?", धागा हाले धागा हाले वृंदगान : जुळू नये ती रेशीमगाठी काकेमामेमावसझिंगे, जल की रानी कन्या पेंगे अहंकार जा घेऊन संगे, हमरा धागा हम ना देंगे वृंदगान : भाग्यदा लक्ष्मी बारम्मा लालेलाली चुटुकच धागी, एश्यन पेंटी डब्बा संपे आंतरजाले आत्मनहत्ये, धागा जाई धरणी कंपे वृंदगान : साय साय, फळा फळा (हरदिनी पहाणीकर) २२-०५-२०१५

प्रतिक्रिया द्या
42666 वाचन

💬 प्रतिसाद (140)

+ __/\__

पाटील हो
Sat, 05/23/2015 - 09:07 नवीन
"" भाग्यदा लक्ष्मी बारम्मा "" येणार येणार .
  • Log in or register to post comments

जीची थट्टा करताय ती केव्हाच

कविता१९७८
Sat, 05/23/2015 - 10:10 नवीन
जीची थट्टा करताय ती केव्हाच मिपाला टाटा करुन निघुन गेली.
  • Log in or register to post comments

कहर आहे मालक. दंडवत

मृत्युन्जय
Sat, 05/23/2015 - 10:19 नवीन
कहर आहे मालक. दंडवत स्वीकारावा. एका दगडात किती ते पक्षी मारशील रे?
  • Log in or register to post comments

लै म्हन्जी लैच जबराट !

विशाल कुलकर्णी
Sat, 05/23/2015 - 11:54 नवीन
लै म्हन्जी लैच जबराट !
  • Log in or register to post comments

(awesome)(awesome)(awesome)

सांजसंध्या
Sat, 05/23/2015 - 11:59 नवीन
(awesome)(awesome)(awesome)(awesome)
  • Log in or register to post comments

मस्त....

मुक्त विहारि
Sat, 05/23/2015 - 12:08 नवीन
झक्कास...
  • Log in or register to post comments

सूड

सविता००१
Sat, 05/23/2015 - 13:23 नवीन
कहर दंडवत घे _________/\_________
  • Log in or register to post comments

१०१

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/23/2015 - 13:27 नवीन
१०१ एका दगडात अनेक पक्षी उडवल्याबद्दल श्री. सूड ह्यांचा गोफण, दगड, गलोल, बॉल बेअरिंग्स आणि छृर्‍याची दंबुक देउन सत्कार करण्यात येत आहे. -अखिल मिपा मापंकाढे समिती-
  • Log in or register to post comments

असल्या गोष्टी देण्याऐवजी

लॉर्ड फॉकलन्ड
Sat, 05/23/2015 - 14:08 नवीन
असल्या गोष्टी देण्याऐवजी तारेचे वळलेले दागिने देऊन सत्कार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कुठल्या तारेतले म्हणे? ;)

बॅटमॅन
Sat, 05/23/2015 - 14:45 नवीन
कुठल्या तारेतले म्हणे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉर्ड फॉकलन्ड

जबरी विडंबन!

लॉर्ड फॉकलन्ड
Sat, 05/23/2015 - 14:10 नवीन
जबरी विडंबन! सूड यांच्या प्रतिभेची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहून थक्क झालो.
  • Log in or register to post comments

__/\__ :)))))

सानिकास्वप्निल
Sat, 05/23/2015 - 14:19 नवीन
__/\__ :)))))
  • Log in or register to post comments

झकास सूडभौ ! एकदम चाबूक !

खेडूत
Sat, 05/23/2015 - 14:35 नवीन
झकास सूडभौ ! एकदम चाबूक ! वृन्दगान तर अफाट ! अवांतर: कुणाला संदर्भ लागत नसेल तर इथे पहा * ( * ही सवलत फक्त तिथे धागा असेपर्यंतच मर्यादित …… त्वरा करा !)
  • Log in or register to post comments

दोन-तीन गंमतीदार

संदीप डांगे
Sat, 05/23/2015 - 19:48 नवीन
दोन-तीन गंमतीदार प्रतिक्रियांनंतर तिथेही 'बचाव बचाव' ची विनंती करण्यात आली आहे. दुकानदारांना भौतेक सगळी संस्थळे म्हणजे आठवडी बाजार वाटतात काय कोण जाणे? एवढ्या आत्ममग्न लोकांनी मग असे सोशल धंदे करूच नयेत सोसत नसेल तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

भौ

नाखु
Mon, 05/25/2015 - 12:48 नवीन
ह्ये "सोशल धंदे" बाबतचा खुलासा पहाच आंजा सोशल धंदे आणि सोसंल (तितकेच) धंदे. हा जरी-तारीचा प्रश्न आहे. संदर्भासह वाचक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

भयाण वारल्या गेले आहे __/\__

स्पा
Sat, 05/23/2015 - 14:37 नवीन
भयाण वारल्या गेले आहे __/\__
  • Log in or register to post comments

धन्य धन्य ते मिपाकर.

चित्रगुप्त
Sat, 05/23/2015 - 20:38 नवीन
अचाट, अफाट, अतर्क्य, अशक्य, अविस्मरणीय, अद्भुत ... आमचा कुर्निसात स्विकारावा प्रभु. ब्यात्मन्पंतांचे पण अक्षरा-अक्षराला महत्व असलेले कवन अतुलनीय. तारेच्या त्या वळणातून अशी रत्ने निघाली. धन्य धन्य ते मिपाकर.
  • Log in or register to post comments

या खतरनाक इडंबनाच्या

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/24/2015 - 06:21 नवीन
या खतरनाक इडंबनाच्या निमित्तानि एक सांगावसं वाटतं. सुडुकशास्त्रि आपल्या भास्कर चंदावरकरां सारखे आहेत. कमी चित्रपटांना संगित दिलं त्यानी,पण जे दिलं ते एकदम खटक्यावर बोट ,जागेवर पलटी!
  • Log in or register to post comments

+१ काय तुलणा आहे!

आदूबाळ
Sun, 05/24/2015 - 11:13 नवीन
+१ काय तुलणा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

भयानक हसतेय....

कवितानागेश
Sun, 05/24/2015 - 11:07 नवीन
भयानक हसतेय.... बाकी ते भाग्यदा लक्ष्मी कळले नाही.
  • Log in or register to post comments

वेळात वेळ काढून धागा उघडून

सूड
Mon, 05/25/2015 - 14:29 नवीन
वेळात वेळ काढून धागा उघडून बघितलेल्यांचे आणि धाग्यावर हजेरी लावलेल्यांचे मंडळ काच्चकन आभारी आहे.
  • Log in or register to post comments

कहर

अमृत
Mon, 05/25/2015 - 14:47 नवीन
हापिसातला बाजूचा भैया दोनदा ओरडला माझ्यावर इतका हसतोय.....
  • Log in or register to post comments

हिक्क …हिच्क …. हिच्चीक ….

कहर
Mon, 05/25/2015 - 15:08 नवीन
हिक्क …हिच्क …. हिच्चीक …. Image removed. इतक्या प्रतिसादात आमचा उल्लेख झाला कि आमच्या उचक्या थांबेचनात … बाकी सूडोपंत … खरेच तुमची वाक्प्रतीभा पाहून हेच शब्द ओठी येतात "कहर केलात राव" (आज झाला उचक्यांचा)
  • Log in or register to post comments

आत्ता हा मोती गवसला

सामान्य वाचक
Tue, 07/26/2016 - 17:20 नवीन
तुफान च आहे कवीच्या प्रतिभेला शिरसाष्टांग नमस्कार थोड्या उत्खननानंतर कवितेची प्रेरणा पण कळाली बेक्कार जमलीय कविता
  • Log in or register to post comments

लई लई लईच भारी.

चित्रगुप्त
गुरुवार, 04/27/2017 - 17:12 नवीन
लई लई लईच भारी. 'प्रेरणा' कोणती म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

धागा वर काढल्याबद्दल आभार !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/27/2017 - 18:24 नवीन
धागा वर काढल्याबद्दल आभार ! हे प्रकरण आठवुन परत हसु आले =)))) खुप मजा आली होती राव त्या वेळेला .... पुर्वीचं मिपा राहिलं नाही आता :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हा ना राव.

अभ्या..
गुरुवार, 04/27/2017 - 18:32 नवीन
हा ना राव. सुडक्या, कडू.....पार सानिधपमग केलतांस बे. =)) =)) =)) . . चालतेत का अशी मापे काढलेली? आँ? तिकडं थोडं कुणी रोखठोक बोललं तर भाषेसाठी केवढे तुटून पडलात सगळे. हे म्हनजे "हाणा पण चप्पल डेटॉलने धुवून हाणा बरं का प्लीज" असलं झालं. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कॉर्नर कॉर्नर नक्को बाई ! असे

मितान
गुरुवार, 04/27/2017 - 20:20 नवीन
कॉर्नर कॉर्नर नक्को बाई ! असे आज म्हणणारे आय डी पण या धाग्यावर मस्त मज्जा करून गेलेत की ! बाकी अभ्याशी सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अगागागागागागागागा

इरसाल कार्टं
गुरुवार, 04/27/2017 - 18:44 नवीन
काय ती कल्पकता
  • Log in or register to post comments

जबरदस्त __/\__

प्राची अश्विनी
गुरुवार, 04/27/2017 - 19:46 नवीन
जबरदस्त __/\__
  • Log in or register to post comments

अगायायाया!!+=))

चतुरंग
गुरुवार, 04/27/2017 - 21:06 नवीन
ही झिंगलेली तोडफोड कशीकाय नजरेतून सुटली? धागा वराणल्याबद्दल मंडळ आभारी आहे... सूड्राव कमाल केलीत! _/\_ (नी धप्प) रंगा
  • Log in or register to post comments

>>वृंदगान : साय साय, फळा फळा

सतिश गावडे
गुरुवार, 04/27/2017 - 21:28 नवीन
>>वृंदगान : साय साय, फळा फळा या कवीला लिहीते करा राव.
  • Log in or register to post comments

>>वृंदगान : साय साय, फळा फळा

आदूबाळ
गुरुवार, 04/27/2017 - 21:33 नवीन
>>वृंदगान : साय साय, फळा फळा
हा एक प्रश्न होता - काय आहे हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मिपामहाकवी लील्या (लीलाधर)

अभ्या..
गुरुवार, 04/27/2017 - 22:01 नवीन
मिपामहाकवी लील्या (लीलाधर) ह्यांची दोन खंडकाव्ये. साय आणि फळा. लिंक हवी असेल तर वल्ली किंवा अत्रुप्तगुर्जी ह्या उरलेल्या दोन महाकवींकडे मागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ही घ्या साय

सूड
गुरुवार, 04/27/2017 - 22:29 नवीन
ही घ्या साय गोरी गोरी पान फुलासारखी छान या चालीवर वाचा/गा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

पुन्हा पुन्हा वाचून बेक्कार

मितान
गुरुवार, 04/27/2017 - 21:36 नवीन
पुन्हा पुन्हा वाचून बेक्कार हसतेय =)) =))
  • Log in or register to post comments

पुन्यांदा सर्व्यांचे अ

सूड
गुरुवार, 04/27/2017 - 22:30 नवीन
पुन्यांदा सर्व्यांचे अ‍ॅटिकानी धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

वर आणतोय. ह्या ह्या ह्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/01/2017 - 13:15 नवीन
वर आणतोय. ह्या ह्या ह्या.
  • Log in or register to post comments

ब्याट्म्यानपंतांचा धागा

चित्रगुप्त
Mon, 05/01/2017 - 13:51 नवीन
या विषयावरील ब्याट्म्यानपंतांचा धागा उपसा रे कुणीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कैच्याकाय लिहिलंय ..

अद्द्या
Tue, 05/02/2017 - 17:20 नवीन
कैच्याकाय लिहिलंय .. आता यावरचा ब्याट्म्यान चा धागा शोधणे आले
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा