ही एका देवळा मागची गोष्ट . एका छोट्या गावातले हे देऊळ. दरवर्षी इथे जत्रा भरते. तिथे लाखो लोक येतात. सरकारतर्फे त्यासाठी ज्यादा गाड्या सोडल्या जातात, लोकप्रतिनिधी प्रचंड निधी देतात. दरवर्षी भाविकांची संख्या फुगतच चालली आहे .त्यात आजकाल अनेक वीवीआयपी भाविक असतात . त्या देवळाची तुलना आता थेट पंढरपूराशी केली जाते . तर या देवळाची किंवा जत्रेची ही सत्यकथा .
सुमारे १८५० नंतरचा काळ. (नक्की साल माहित नाही ). ब्रिटीश राजवटीत अनेक छोटेमोठे संस्थानिक होते . त्यातील एका छोट्याश्या संस्थानिकाच्या पदरी एक सरदार होता . आजूबाजूच्या गावातील सारा वसुलीचे काम त्याच्याकडे होते. सरदाराला एक राणी होती पण त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याचे नायकिणी, दासी यांच्याशी सुद्धा संबंध होते. सरदाराला जरी औरस संतान नसले तरी वेगवेगळ्या दासींपासून झालेले दोन दासीपुत्र होते. पुढे वसुलीतील काही भांडणावरून सरदाराचा खून झाला . तो कुणी केला याचा काही शोध लागला नाही . साहजिकच सर्वांना वाटले की विधवा राणी काही आता वसुली वगैरे भानगडीत पडणार नाही . पण राणी होती खमकी . तिने नोकाराला बरोबर घेऊन वसुलीचे काम सुरूच ठेवले. बरं राणी हयात असेपर्यंत सरदाराच्या संपत्तीवर अनौरस मुलाना काही हक्क सांगता येईना . त्यामुळे त्यांनी राणीलाही मारायचा डाव आखला . त्याप्रमाणे ती वसुलीला त्या गावात आली असताना रात्रीच्या वेळी तिच्या डोक्यात मोठ्ठा दगड घालून ठेचून तिला ठार मारले . मारेकऱ्यांना कुणी बघितले नव्हते यामुळे याहीवेळी कोणी सापडले नाही .
सर्व आता सुरळीत होईल असे वाटत असताना त्या दासीपुत्राच्या कुटुंबातील कुणी कर्ता माणूस अचानक मरण पावला . काही दिवसानंतर अजून कोणी मृत्यू पावले. अशा दुर्घटना वारंवार होऊ लागल्या . सगळे घाबरले . राणीचा शाप भोवतोय असे त्यांना वाटू लागले . गावात तेव्हा भगत म्हनुन्लोक असत . ते अशा गोष्टींमध्ये सल्ला देत असत . भगताकडे गेल्यावर त्याने सांगितले," राणीचे दिवस ( मरणोत्तर क्रियाकर्म) केले गेले नाही म्हणून हा त्रास होतोय . तर तिचे यथोचित श्राद्ध करा आणि जिथे तिला ठार मारले तिथे प्रसाद नेउन ठेवा .पण घरातील पुरुषांनी मात्र तिथे त्या दिवशी जाऊ नका " त्याप्रमाणे त्या घरातील पुरुषांनी केस कापले , श्राद्ध केले , ज्या दगडाने तिला मारले त्या दगडापाशी वडे आणि वाटाण्याची आमटी हा श्राद्धाच्या वेळचा प्रसाद ठेवला . घरातील सर्व पुरुष त्यावेळी गावाबाहेर थांबले . त्यानंतर दर वर्षी ,राणीला मारले साधारण त्या तिथीच्या आसपास त्या कुटुंबातील लोंक ही प्रथा पाळू लागले . बाजूच्या जंगलात त्या सुमारास डुक्कर किंवा सश्याची शिकार करत आणि ती मिळाल्यानंतर काही दिवस सोडून श्राद्धाचा मुहूर्त पकडला जाई . हळूहळू त्या दगडाच्या भोवती शेड बांधली . लोक जातायेता त्याला नमस्कार करू लागले , घुमटीचे छोटे देऊळ झाले. त्या देवळात प्रसाद तसेच थोडीफार दक्षिणा जमा होऊ लागली .
आता प्रश्न आला या दक्षिणेवर, उत्पन्नावर हक्क कोणाचा ? इतक्या वर्षांत ते दोन्ही दासीपुत्र मरण पावले होते . पण त्यांची मुले होती . ती कोर्टात गेली . केस चालू झाली . सर्व जुन्या लोकांच्या साक्षी झाल्या आणि वरती संगितलेली माहिती बाहेर आली . ज्याने कर्म केले त्याला त्याचे फळ या न्यायाने त्या दोन्ही कुटुंबाना खरेतर त्या घुमटीचे उत्पन्न मिळायला पाहिजे . पण गोम इथेच होती . एका कुटुंबाला स्वत:ला दासीपुत्र म्हणून घेणे लाजिरवाणे वाटत असे म्हणून त्यांनी आपली जात बदलून मराठा करून घेतली होती . विरुद्ध बाजूच्या वकिलांनी हाच मुद्दा कोर्टासमोर मांडला आणि त्या आधारे त्यांचा उत्पन्नावरील हक्क उडवून लावला . आणि केस जिंकली .
दरवर्षीच्या श्राद्धाची प्रथा चालूच राहिली . घुमटीचे छोटे देऊळ झाले . हळूहळू त्या दगडाच्या बाजूला एक देवीची मूर्ती आली . देऊळ मोठे झाले . आणि देवळाचा बिझिनेस चालू झाला . काही वर्षांपूर्वी ऐकण्यात आले की देवीची मोठी मूर्ती बसवण्यात आली आणि दगड काढून टाकण्यात आला . भाविकांची गर्दी वाढतच आहे . अजूनही जत्रेच्या वेळी वाडे आणि काळ्या वाटण्याची आमटी हा नैवेद्य दाखवला जातो . ७५ सालापर्यंत त्या विशिष्ठ आडनावाचे लोक जत्रेच्या वेळी क्षौर ( केस कापणे) करत असत . त्या जागी जत्रेच्या पहिल्या दिवशी फिरकत नसत . सध्या काय होते माहित नाही .
हे सर्व सांगायचे कारण की परवा विकीपीडीया मध्ये या जत्रेची आणि देवस्थानाची (?) माहिती वाचली . त्यात या देवीचा उगम ४०० वर्षे सांगितला आहे , एवढेच नाहे तर एक गाय इथल्या दगडावर आपणहून दुध देत असे कुणा गावकऱ्याने हे पाहिले किंवा त्याच्या स्वप्नात आले असेही सांगितले आहे .( विकिपीडियात कुणी चुकीची माहिती सुद्धा फीड करू शकतात . )
म्हणून वाटले की ही सत्य माहिती समोर यायला हवी .
१ ज्यांच्या हयातीत ही घटना घडली ते सर्व केव्हाच मरण पावले . ही केस कोर्टात लढली गेली तेव्हा त्या केसशी जोडले गेलेले लोक देखील आता हयात नाहीत. ( माझ्या आजोबांनी ही केस चालवली होती) . त्यावेळी लहान असलेले लोक किंवा माझे वडील ज्यांना ही माहिती त्यांच्या वडिलांकडून मिळाली ते सर्व आता सत्तरीत किंवा त्याहून वयस्कर आहेत . त्या पिढीबरोबर ही माहिती सुद्धा नष्ट होईल . म्हणून इथे सांगायचा प्रयत्न केलाय . खरे तर त्यासाठी त्या स्थानाचे नाव सांगायला हवे . पण हल्लीच्या सुसंस्कृत , पुढारलेल्या महाराष्ट्रात जिथे नरेंद्र दाभोलकरांची दिवस ढवळ्या हत्या होते तिथे नाव सांगायची हिम्मत नाही .
२ ही केस कोर्टात लढली गेली . कोर्टात सर्व केसेस ची माहिती जपून ठेवली जाते म्हणून अजूनही ती माहिती असावी असे वाटते.
३ देऊळ चित्रपट पाहिल्यानंतर ही घटना पुन्हा आठवली .
वाचने
25295
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
पटण्यासारखं आहे !!
काळूबाई मांढरादेवी
रोचक माहिती..
रोचक माहिती..
माका पण समजला
In reply to रोचक माहिती.. by योगी९००
बकवास.
In reply to माका पण समजला by योगी९००
माका समाज्ला
अवांतर : माज्या यूज़रid मधला
यासाठी "नीलकांत" अथवा
In reply to अवांतर : माज्या यूज़रid मधला by स्वप्निल रेडकर
आभारि आहे!
In reply to यासाठी "नीलकांत" अथवा by डॉ सुहास म्हात्रे
धर्मकारणामधे,..मूळ कारणं
अभिनंदन
अरेरे!
जबरीच! बहुत धन्यवाद
सत्य माहिती समोर यायला हवी .
आपल्या अगदी आंगणामधल आहे अस
In reply to सत्य माहिती समोर यायला हवी . by आदूबाळ
:):)
In reply to आपल्या अगदी आंगणामधल आहे अस by स्वप्निल रेडकर
हे घ्या
In reply to सत्य माहिती समोर यायला हवी . by आदूबाळ
अनेक देवदेवतांच्याभोवती जे
हि कथा आजीकडून कळली होती.
भले शाब्बास!
In reply to हि कथा आजीकडून कळली होती. by सतीश कुडतरकर
अंगणाचा रेफरन्स आला तेव्हा
In reply to हि कथा आजीकडून कळली होती. by सतीश कुडतरकर
मानला तर देव
देऊळ मोठे झाले . आणि देवळाचा
मालवणचे ग्रामदैवत देऊळवाड्यातला रामेश्वर फ़ेमस
धन्यवाद
हे सगळे माहित नव्हते.
म्हणती देव मोठे मोठे ।
छान १ नम्बर
In reply to म्हणती देव मोठे मोठे । by पुणेकर भामटा
हम्म! इथे माहिती दिल्यावद्दल
असल्या भडभुंज्या पुजार्यांच काय टेशंन घेता राव ?
हे काय असत, या भागात बर्याच
In reply to असल्या भडभुंज्या पुजार्यांच काय टेशंन घेता राव ? by बाबा पाटील
हे काय असत, या भागात बर्याच जणाच्या अंगात येत एकदा हा उपाय करून पहायला हवाहम्म
विकीपीडिया वर चूकीची माहीती
जानकारांन्नी प्रकाश टाकावा.
In reply to विकीपीडिया वर चूकीची माहीती by वगिश
नशीब, "जानकरांनी प्रकाश
In reply to जानकारांन्नी प्रकाश टाकावा. by हाडक्या
'जानकर'
In reply to नशीब, "जानकरांनी प्रकाश by डॉ सुहास म्हात्रे
तो कोर्टाचा निर्णय मिळाला तरच
In reply to विकीपीडिया वर चूकीची माहीती by वगिश
विकीवर...
In reply to तो कोर्टाचा निर्णय मिळाला तरच by आदूबाळ
विकीपीडिया वर चूकीची माहीती
In reply to विकीपीडिया वर चूकीची माहीती by वगिश
ता.क. अजून थोडे तर्क
In reply to विकीपीडिया वर चूकीची माहीती by माहितगार
माहितीबद्दल धन्यवाद! चिमाजी
In reply to विकीपीडिया वर चूकीची माहीती by माहितगार
कोर्ट केसचे कागदपत्र
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! चिमाजी by प्राची अश्विनी
कोणत्या कोर्टात झाली?
In reply to कोर्ट केसचे कागदपत्र by प्राची अश्विनी
मी काल गूगल करताना वेगळी लिंक
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! चिमाजी by प्राची अश्विनी
ह्या लोकसत्ता वृत्तात सुद्धा
In reply to माहितीबद्दल धन्यवाद! चिमाजी by प्राची अश्विनी
डोळे उघडणारा लेखः थोडं उत्खनन केल्यावर हे सापडलं...
कोकणच्या राजा आणि त्याच्या
In reply to डोळे उघडणारा लेखः थोडं उत्खनन केल्यावर हे सापडलं... by बहुगुणी
च्यामारी...
In reply to डोळे उघडणारा लेखः थोडं उत्खनन केल्यावर हे सापडलं... by बहुगुणी
कोपरापासून हात जोडण्याशिवाय
In reply to डोळे उघडणारा लेखः थोडं उत्खनन केल्यावर हे सापडलं... by बहुगुणी
हे असलं पण काही असतं माहितीच
ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे
एकदा ट्रेन मध्ये माझ्या
In reply to ज्यांच्या धार्मिक भावना वगैरे by खटपट्या
आपली श्रेष्ठ संस्कृती हो...
In reply to एकदा ट्रेन मध्ये माझ्या by प्राची अश्विनी
या अश्या लेखांची अतिशय गरज
हे का?
In reply to या अश्या लेखांची अतिशय गरज by स्पंदना
- जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!
- जिकडं खोबर, तिकडं चांऽऽगभलं!!!.....२
या लेखाबद्द्ल धागाकर्तीचे धन्यवाद. अडीच वर्षांपूर्वी कार्ला येथील एकवीरा देवी मंदिरात प्रथमच गेलो होतो. तेव्हा लोक बिनधास्तपणे बळी देण्यासाठी प्राणी आणत होते. मी आजवर कधीच हा प्रकार पाहिला नव्हता. विदर्भामध्ये गाडगेबाबांनी केलेल्या लोकजागृतीमुळे असले प्रकार कधीच बंद पडले.हो! हो!
In reply to हे का? by श्रीरंग_जोशी
हा दुवा बघा
In reply to हो! हो! by स्पंदना
घुसखोरी
In reply to हे का? by श्रीरंग_जोशी
लेण्याद्रीमधील गणेशसुद्धा.
In reply to घुसखोरी by सतीश कुडतरकर
बट्टमन
In reply to लेण्याद्रीमधील गणेशसुद्धा. by बॅटमॅन
पण मला 'मोदक' नकोच्चे मुळी.
In reply to बट्टमन by कपिलमुनी
खायचा मोदक रे मेल्या!!
In reply to पण मला 'मोदक' नकोच्चे मुळी. by बॅटमॅन
आयला तेवढं कळतंय की बे.
In reply to खायचा मोदक रे मेल्या!! by सूड
घुसखोरी असं रूढार्थाने नाय
In reply to लेण्याद्रीमधील गणेशसुद्धा. by बॅटमॅन
तसं असेल! प्वाइंटाचा मुद्दा
In reply to घुसखोरी असं रूढार्थाने नाय by प्रचेतस
उदाहरणार्थ?
In reply to तसं असेल! प्वाइंटाचा मुद्दा by बॅटमॅन
विजापूर जिल्ह्यात काही उदा.
In reply to उदाहरणार्थ? by प्रचेतस
ओह्ह. ओके.
In reply to विजापूर जिल्ह्यात काही उदा. by बॅटमॅन
कॉलेज संपल्यावर आमच्या एका
In reply to ओह्ह. ओके. by प्रचेतस