नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वाचने
82765
प्रतिक्रिया
429
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापरे ! बारा हजार सर्जन
केलाॅईड
In reply to बापरे ! बारा हजार सर्जन by मार्मिक गोडसे
पण म्हणून सहा ते अाठ
आकडेवारी
In reply to पण म्हणून सहा ते अाठ by मराठीप्रेमी
नाही सांगू शकत
In reply to पण म्हणून सहा ते अाठ by मराठीप्रेमी
न्याय्य वगैरेचा काय संबंध आहे
नाहीतर असेच लोक उपचाराविना मारत राहणार
In reply to न्याय्य वगैरेचा काय संबंध आहे by आजानुकर्ण
पॉपकॉर्न घेउन बसलो आहे
एक टब मला पण द्या हो!!
In reply to पॉपकॉर्न घेउन बसलो आहे by कपिलमुनी
घ्या
In reply to एक टब मला पण द्या हो!! by सूड
अश्लिल कशाने!! धन्यवाद. आता
In reply to घ्या by संदीप डांगे
नै ते ठिके, पण टबातच बसा,
In reply to अश्लिल कशाने!! धन्यवाद. आता by सूड
निश्चिंत असा हो तुम्ही!!
In reply to नै ते ठिके, पण टबातच बसा, by हाडक्या
ट्बातून अजीबात उठू नका....
In reply to नै ते ठिके, पण टबातच बसा, by हाडक्या
हे हाड्क्यारावांना सांगताय का
In reply to ट्बातून अजीबात उठू नका.... by खटपट्या
चित्रातल्या दोघांना !!
In reply to हे हाड्क्यारावांना सांगताय का by सूड
बघा बरं..
In reply to अश्लिल कशाने!! धन्यवाद. आता by सूड
अरे, किती सांडून ठेवल्यात
In reply to घ्या by संदीप डांगे
बर्याच दिवसात खाल्ले नव्हते
In reply to पॉपकॉर्न घेउन बसलो आहे by कपिलमुनी
इथे आहे
In reply to बर्याच दिवसात खाल्ले नव्हते by अजया
आपल्या मित्राचे मनापासून अभिनंदन
सर्वसामान्यासाठी काहीतरी सोय असावी.
वादग्रस्त विषय
हेल्थकेअर ही इंडस्ट्री आहे
शिवाय माणसांची शरीरं जितकी
In reply to हेल्थकेअर ही इंडस्ट्री आहे by नगरीनिरंजन
गरज आणि पुरवठा
skill , Brand, Technology
डॉक्टरांनी किती फी आकारावी हे
शहरातली लुटालूट.....
१५००० ?
In reply to शहरातली लुटालूट..... by निनाद जोशी
माढा येथील पाटील हॉस्पिटल,
In reply to १५००० ? by कपिलमुनी
गावातले भाव आणि शहरातले भाव ह्यांच्यात फरक राहणारच
In reply to शहरातली लुटालूट..... by निनाद जोशी
तरीपण १५०००
In reply to गावातले भाव आणि शहरातले भाव ह्यांच्यात फरक राहणारच by आदिजोशी
अहो आता बिल पाठवू का फोटो
In reply to तरीपण १५००० by कपिलमुनी
अगदीच पटत नाही .... स्टेंटचीच
In reply to तरीपण १५००० by कपिलमुनी
+१००
In reply to तरीपण १५००० by कपिलमुनी
कदाचित त्यांना अँजियोग्राफी
In reply to +१०० by संदीप डांगे
आता त्यांनी खरच अँजिओप्लॅस्टी
In reply to कदाचित त्यांना अँजियोग्राफी by असंका
अहो आत्ता तर मी आपण बिल इथे
In reply to आता त्यांनी खरच अँजिओप्लॅस्टी by निनाद जोशी
खात्री असल्याशिवाय
In reply to आता त्यांनी खरच अँजिओप्लॅस्टी by निनाद जोशी
अहो माझ्या घरी बिल आहे त्यावर
In reply to खात्री असल्याशिवाय by कपिलमुनी
बिल अजून आलं नाही का?
In reply to अहो माझ्या घरी बिल आहे त्यावर by निनाद जोशी
बिल बिल बिल
In reply to अहो माझ्या घरी बिल आहे त्यावर by निनाद जोशी
ते १५००० नसुन १,५०,००० आहेत
In reply to बिल बिल बिल by रुस्तम
मग तसं सांगु दे. आम्ही आपले
In reply to ते १५००० नसुन १,५०,००० आहेत by प्रसाद१९७१
प्रसाद साहेब
In reply to ते १५००० नसुन १,५०,००० आहेत by प्रसाद१९७१
वर लिहिलेल्या किमती सरकारी
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
अतिशय महत्वपूर्ण माहिती
In reply to वर लिहिलेल्या किमती सरकारी by सुबोध खरे
हेल्थ इंशुरन्स मुळे वैद्यकीय
LET ME CORRECT
In reply to हेल्थ इंशुरन्स मुळे वैद्यकीय by मराठी_माणूस
हो, ह्या खर्चाला लुट
In reply to LET ME CORRECT by आयुर्हित
उलट मी एकदा असं वाचलं होतं की
In reply to हो, ह्या खर्चाला लुट by मराठी_माणूस
डॉक्टर लोक त्यांच्या
डॉक्टर
डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची
आणि घालवतो सुद्धा...
In reply to डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची by संदीप डांगे
अहो पण अशीच सूट मिळत राहिली
In reply to डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची by संदीप डांगे
डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी
In reply to अहो पण अशीच सूट मिळत राहिली by निनाद जोशी
श्रीमंत लोकपण लोकंच असतात
In reply to अहो पण अशीच सूट मिळत राहिली by निनाद जोशी
अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त
In reply to श्रीमंत लोकपण लोकंच असतात by संदीप डांगे
१. रास्त दर काय हे कोण
In reply to अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त by निनाद जोशी
अजून कोण फक्त पैसे
In reply to १. रास्त दर काय हे कोण by असंका
_/\_
In reply to अजून कोण फक्त पैसे by निनाद जोशी
माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
In reply to _/\_ by असंका
माझा "आय डी" हा संपूर्णपणे
In reply to माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या by निनाद जोशी
वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा
In reply to माझा "आय डी" हा संपूर्णपणे by असंका
ओके....
In reply to वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा by निनाद जोशी
परंतु ह्या दरवाढीस तुम्ही
In reply to माझा "आय डी" हा संपूर्णपणे by असंका
माझ्या प्रश्नांचे उत्तर
In reply to परंतु ह्या दरवाढीस तुम्ही by निनाद जोशी
माझ्या आत्याबाईंना तरी मिश्या
In reply to माझ्या प्रश्नांचे उत्तर by असंका