नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वाचने
82765
प्रतिक्रिया
429
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही सरकारी आणि खाजगी
In reply to परंतु ह्या दरवाढीस तुम्ही by निनाद जोशी
मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी
In reply to तुम्ही सरकारी आणि खाजगी by संदीप डांगे
आम्हाला कितीही प्रॉब्लेम असू
In reply to मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी by निनाद जोशी
सॉरी, त्यांना विसरलो ते.
In reply to अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त by निनाद जोशी
पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे
In reply to सॉरी, त्यांना विसरलो ते. by संदीप डांगे
नाही हो. दोन वेगवेगळ्या
In reply to पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे by निनाद जोशी
हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून
In reply to नाही हो. दोन वेगवेगळ्या by संदीप डांगे
खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी
In reply to हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून by यसवायजी
@ रिक्षाचे दर कोण ठरवतं?
In reply to खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी by संदीप डांगे
खरंय
In reply to सॉरी, त्यांना विसरलो ते. by संदीप डांगे
माफ करा
हात तुटला ?
In reply to माफ करा by खंडेराव
तुटला काय म्हणताय? हाड मोडणे,
In reply to माफ करा by खंडेराव
या प्रतिसादावर हसावे की रडावे
In reply to तुटला काय म्हणताय? हाड मोडणे, by रेवती
व्याकरण
In reply to या प्रतिसादावर हसावे की रडावे by बॅटमॅन
मुनिवर, 'लहान मुलांसाठी असे
In reply to व्याकरण by कपिलमुनी
:)
In reply to या प्रतिसादावर हसावे की रडावे by बॅटमॅन
तुटणे, मोडणे, फ्रॅक्चर होणे
In reply to तुटला काय म्हणताय? हाड मोडणे, by रेवती
खंडेराव
In reply to माफ करा by खंडेराव
सगळे मान्य
In reply to खंडेराव by सुबोध खरे
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार
माझ्या नात्यातील एका
१०० टक्के सहमत..
In reply to माझ्या नात्यातील एका by आजानुकर्ण
क्षय रोग उच्चाटनासाठी
स्वत: च्या कौशल्याचे
मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून
In reply to स्वत: च्या कौशल्याचे by चिनार
नाही
In reply to मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून by असंका
इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत
In reply to मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून by असंका
इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला.अनुभवघ्या पुरावा पण आला...
In reply to इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत by मोदक
मला एक सांगणार का कुणी?
ध च मा करु नका डॉक्टरसाहेब.....
In reply to मला एक सांगणार का कुणी? by आनंदी गोपाळ
I don't discuss Modern
In reply to ध च मा करु नका डॉक्टरसाहेब..... by आयुर्हित
Modern Medical Procedures
In reply to I don't discuss Modern by आनंदी गोपाळ
आता कुणी किती फी लावावी, व का? याबद्दल पुढे.
आता फायनल गम्मत.
गोपाळसाहेब
In reply to आता फायनल गम्मत. by आनंदी गोपाळ
खाली दिलंय ते स्टँडर्ड
In reply to गोपाळसाहेब by आजानुकर्ण
आपण उद्वेगाने असेल कदाचित
In reply to खाली दिलंय ते स्टँडर्ड by आनंदी गोपाळ
जाता जाता :
पेशंटच्या आर्थिक /सामाजिक परिस्थितीची एका लिमिटच्या पलीकडे पर्वा न करता कमालीच्या सेवाभावाने आपले काम करणारे आणि हाताला गुण असणारे शेकडो डॉक्टर्स आजहि कार्यरत आहेत आणि तुम्ही कमालीच्या कुत्सितपणे ज्यांना हेटाळून बोलता ते 'जीप्डे'पण आहेत आणि प्रख्यात सर्जन्स वगैरे पण आहेत ...आणि देव करो ते ते तसे सतत कुठे नं कुठे समाजात येत राहोत ...क्षुल्लक गाडी रिपेयर
In reply to आपण उद्वेगाने असेल कदाचित by अत्रन्गि पाउस
माफ करा भाऊ
In reply to क्षुल्लक गाडी रिपेयर by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१००००००
किंवा
In reply to +१०००००० by अजया
आँ?
In reply to किंवा by आजानुकर्ण
अकाउंटावरचे शहाणे डॉक्टरला पैसे देताना का खळखळ करतात? )I cannot
In reply to आँ? by आनंदी गोपाळ
एका कॉन्फरन्सला ला
In reply to आँ? by आनंदी गोपाळ
जाऊ नका ना मग अशा ठिकाणी
हो पण
In reply to जाऊ नका ना मग अशा ठिकाणी by अजया
आयफोनबाबत तसे नाही. निदान
In reply to हो पण by आजानुकर्ण
:)
In reply to आयफोनबाबत तसे नाही. निदान by आनंदी गोपाळ
क्षमा करा, वर उत्तर टाईप करतच
In reply to :) by आजानुकर्ण
उपचाराने वाचणारे किती
ठरवून हलगर्जीपणा करणे आणि
In reply to उपचाराने वाचणारे किती by अजया
शिवाय अॅलोपथीच्या
In reply to ठरवून हलगर्जीपणा करणे आणि by आजानुकर्ण
बालाजी तांबे
In reply to शिवाय अॅलोपथीच्या by आनंदी गोपाळ
चिरफाडविरहित व धोकाविरहित प्रक्रिया
In reply to उपचाराने वाचणारे किती by अजया
आयुर्हीत साहेब
In reply to चिरफाडविरहित व धोकाविरहित प्रक्रिया by आयुर्हित
खुप सुंदर आणि स्पष्ट विवेचन!
In reply to आयुर्हीत साहेब by सुबोध खरे
अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात..
In reply to खुप सुंदर आणि स्पष्ट विवेचन! by आयुर्हित
अधिक माहितीसाठी
In reply to अन्जिओग्राफिच्या खर्चात पूर्ण शरीरातील ब्लॉकेज निघू शकतात.. by रुस्तम
व्यनी
In reply to अधिक माहितीसाठी by आयुर्हित
उपचारपद्धती
In reply to व्यनी by कपिलमुनी
धन्यवाद !
In reply to उपचारपद्धती by आयुर्हित
तुम्ही कदाचित या औषधांबद्दल बोलताय
In reply to उपचारपद्धती by आयुर्हित
आपले काही अनमोल अनुभव येवू द्या सर्वांसमोर.
In reply to तुम्ही कदाचित या औषधांबद्दल बोलताय by स्पंदना
टंकण्याचा भयानक कंटाळा
ते हि आहेच
In reply to टंकण्याचा भयानक कंटाळा by खटासि खट
अनुभव वैयक्तिक आहेत.
चर्चा भरकटू देऊ नका.
कॅटरीना कॅटला द्यायच्या पैशात
In reply to चर्चा भरकटू देऊ नका. by संदीप डांगे
अहो पण इथे पैसे दिल्यावर कळतं
In reply to कॅटरीना कॅटला द्यायच्या पैशात by खटासि खट