डाॅक्टरांची फी
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हो, ह्या खर्चाला लुट
उलट मी एकदा असं वाचलं होतं की
डॉक्टर लोक त्यांच्या
डॉक्टर
डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची
आणि घालवतो सुद्धा...
अहो पण अशीच सूट मिळत राहिली
डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी
श्रीमंत लोकपण लोकंच असतात
अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त
१. रास्त दर काय हे कोण
अजून कोण फक्त पैसे
_/\_
माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या
माझा "आय डी" हा संपूर्णपणे
वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा
ओके....
परंतु ह्या दरवाढीस तुम्ही
माझ्या प्रश्नांचे उत्तर
माझ्या आत्याबाईंना तरी मिश्या
तुम्ही सरकारी आणि खाजगी
मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी
आम्हाला कितीही प्रॉब्लेम असू
सॉरी, त्यांना विसरलो ते.
पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे
नाही हो. दोन वेगवेगळ्या
हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून
खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी
@ रिक्षाचे दर कोण ठरवतं?
खरंय
माफ करा
हात तुटला ?
तुटला काय म्हणताय? हाड मोडणे,
या प्रतिसादावर हसावे की रडावे
व्याकरण
मुनिवर, 'लहान मुलांसाठी असे
:)
तुटणे, मोडणे, फ्रॅक्चर होणे
खंडेराव
सगळे मान्य
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार
माझ्या नात्यातील एका
१०० टक्के सहमत..
क्षय रोग उच्चाटनासाठी
स्वत: च्या कौशल्याचे
मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून
नाही
इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत
इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला.अनुभवघ्या पुरावा पण आला...
मला एक सांगणार का कुणी?