Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वधर्म on Wed, 03/11/2015 - 15:32
नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता. एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही. - स्वधर्म
  • Log in or register to post comments
  • 82350 views

प्रतिक्रिया

Submitted by मराठी_माणूस on Wed, 03/11/2015 - 16:47

In reply to LET ME CORRECT by आयुर्हित

Permalink

हो, ह्या खर्चाला लुट

हो, ह्या खर्चाला लुट म्हणण्या एव्हढी ती वाढली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 17:01

In reply to हो, ह्या खर्चाला लुट by मराठी_माणूस

Permalink

उलट मी एकदा असं वाचलं होतं की

उलट मी एकदा असं वाचलं होतं की इंशुरन्स कंपन्यांच्या दबावामुळे अव्वाच्या सव्वा फिया घेण्याला आळा बसला आहे. मिळाला लेख तर परत देतो इथे.
  • Log in or register to post comments

Submitted by गिरकी on Wed, 03/11/2015 - 16:43

Permalink

डॉक्टर लोक त्यांच्या

डॉक्टर लोक त्यांच्या तजुर्ब्याचे पैसे घेतात. काही उपचार असे असतात की एक चूक सुद्धा खूप महाग पडू शकते. अशावेळी अनुभवी आणि त्याच्या क्षेत्रात बेस्ट असलेला डॉक्टर आपण निवडतो. जेव्हा ते येवढे पैसे घेत असतात तेव्हा त्यांनासुद्धा जबाबदारीच्या जाणिवेमुळे मानसिक ताण येत असणारच. आणि इमर्जन्सी कधीही येते त्यामुळे रात्री अपरात्री काम करून शारिरीक ताण तर आहेच. या अनुभवाची आणि त्यांच्या त्या क्षेत्रातल्या कौशल्याची, जबाबदारीची किंमत तासांच्या हिशोबात करणे अयोग्य आहे. पण हल्ली शहरात साध्या ताप सर्दीला पण अ‍ॅडमिट करून पैसे उकळण्याचे जे प्रकार सर्रास चालू आहेत ते नक्कीच चुकीचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 03/11/2015 - 16:46

Permalink

डॉक्टर

मिपावरील डॉक्टरांच्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 16:48

Permalink

डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची

डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची तुलना चुकीची आहे. ड्रायवरांना बस चालवायचे पैसे मिळतात, जीव वाचवायचे नाही. डॉक्टर जीव वाचवायचे पैसे घेतात, ऑपरेशन थिएटरमधे उभे राहायचे नाही. एवढी फी घ्यायला पात्र व्हायला त्यांना आयुष्याची किमान २० वर्षे अखंड मेहनत करावी लागते. पुढेही करतच राहावी लागते. देतांना कधीच कुणाचे पैसे बघू नका, त्याला ती गोष्ट साध्य करायला किती मेहनत पडते ते बघा. तो डॉक्टर जे करू शकतो ते तुम्ही आम्ही चार-दोन महिन्यात शिकून करण्यास पात्र होण्याइतकं सोपं नाही आहे. बाकी या व्यवसायतल्या फसवणुकीबद्दल वेगळी मतं आहेत. पण कधीच कुणाला पैसे देतांना डोळे मोठ्ठे 'अरेरे, लुबाडतात नुसते' वैगेरे करून देऊ नये. घेणारा आणि देणारा दोघांसाठी फार वाईट आहे ते. जो तो आपल्या अक्कलहुशारी आणि मेहनतीच्या लायकीप्रमाणे कमावतो.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 16:52

In reply to डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची by संदीप डांगे

Permalink

आणि घालवतो सुद्धा...

जो तो आपल्या अक्कलहुशारी आणि मेहनतीच्या लायकीप्रमाणे कमावतो आणि घालवतो सुद्धा...
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 17:02

In reply to डॉक्टर आणि ड्रायव्हर यांची by संदीप डांगे

Permalink

अहो पण अशीच सूट मिळत राहिली

अहो पण अशीच सूट मिळत राहिली तर आज हॉस्पिटल चा खर्च हा गरिबांना परवडत नाही उद्या मध्यम वर्गाला हि झेपेनाहीसा होईल. मग ह्या सगळ्यांनी विना उपचार मरावे कि काय??? ह्या खर्चामुळेच सरकारी हॉस्पिटल मध्ये एवढी गर्दी वाढू लागली आहे जी हाताळण्या पलीकडे गेली आहे. जे डॉक्टर सरकारी दवाखान्यात काम करतात ते तिथे कमी वेळ आणि आपल्या खासगी दवाखान्यातच जास्त वेळ असतात. म्हणजे डॉक्टरकी हि फक्त पैसा कमावण्यासाठीच झाली आहे असेच म्हणावे लागेल. मग का त्यांना समाजाचा सेवक अथवा देवता वगैरे म्हणावे. आधी लोक लोकसेवेसाठी डॉक्टर व्हायचे आणि लोकसेवा करायचे ही. आताचे डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी फक्त श्रीमंत लोकांचेच इलाज करतात आणि स्वतःला लोकसेवक वगैरे म्हणवून घेतात......
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 17:15

In reply to अहो पण अशीच सूट मिळत राहिली by निनाद जोशी

Permalink

डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी

डॉक्टर फक्त पैसे कमावण्यासाठी फक्त श्रीमंत लोकांचेच इलाज करतात आणि स्वतःला लोकसेवक वगैरे म्हणवून घेतात......
टाळ्या..शिट्ट्या सगळं काही या एका वाक्याला!!....(आणि हशा सुद्धा)!!
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 17:28

In reply to अहो पण अशीच सूट मिळत राहिली by निनाद जोशी

Permalink

श्रीमंत लोकपण लोकंच असतात

श्रीमंत लोकपण लोकंच असतात त्यामुळे लोकसेवक म्हटलं तर कुठे बिघडलं? अजून कोण फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नाही? ज्यां गरीब किंवा मध्यमवर्गाला या व्यवस्थेची चीड आहे त्यांनी आपाआपल्या वर्गातून असे लोकसेवक डॉक्टर तयार करावे आणि त्यांना खाजगी दवाखाने चालवण्यास मदत करावी. लोकसेवक म्हणजे गरिब लोकांचे काम फुकटात करणारा (काहीच अपेक्षा किंवा मोबदला न घेणारा) असाच असतो हा आपल्या समाजात पसरलेला गोड गैरसमज आहे. गाडगेबाबा होते एक. पण ते संत होते हो.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 17:54

In reply to श्रीमंत लोकपण लोकंच असतात by संदीप डांगे

Permalink

अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त

अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त रास्त दरात द्या एवढीच मागणी आहे. जे उपचार गावात १० हजारात होतात ते तुम्ही शहरात २० ते ३० हजारात द्या त्यासाठी लाखभर रुपयाचे बिल लावण्याची गरज नाही. ह्यातून त्यानाही बक्कल पैसा मिळेल कि...... आणि तुम्ही डॉक्टर अभय बंग किंव्हा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, डॉक्टर विकास बाबा आमटे ह्यांसारख्या लोकांना विसरलात कि .......
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:04

In reply to अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त by निनाद जोशी

Permalink

१. रास्त दर काय हे कोण

१. रास्त दर काय हे कोण ठरवणार? २. दुसर्‍याची गरज किती आणि काय हे आपण कसं ठरवायचं? आणि त्याचवेळी आपली गरज काय हे ठरवायचा अधिकारही आपण दुसर्‍यांना देणार का? ३. किती पैसा असला की बक्कळ झाला असं म्हणता येतं? ४. सगळ्या समाजधुरीणांची नावं इथे लिहिली नाहीत म्हणजे ती विसरली गेली हे आपलं प्रामाणिक मत आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 18:14

In reply to १. रास्त दर काय हे कोण by असंका

Permalink

अजून कोण फक्त पैसे

अजून कोण फक्त पैसे कमावण्यासाठी काम करत नाही?
ह्या प्रश्नाचे मी फक्त उत्तर दिले आणि आपण डॉक्टर ने कितीही पैसे वाढवले तरी गप्प बसतो आणि रेल्वे ने तिकिटात ५ रुपये वाढवले तरी बोम्बाबोम करतो. हि अशी अवस्था असल्यावर काय बोलायचे???? आणि आपण प्रत्तेक वेळी आधीच्या किमतीशी तुलना करून महागाईत किती वाढ झाली हे ठरवत असतो. त्याच विचाराने आपण भाज्या आणि दुध वगैरे गोष्टी महाग झाल्या आहेत म्हणून ओरडतो. ह्यात पेट्रोल इत्यादी गोष्टींचे भावही येतात. तिथे आपण असे नाही म्हणू शकत कि पेट्रोल चे भाव ८० वरून ८०० रुपये लिटर झाले तर तुम्ही ठरावा पेट्रोल घ्यायचं का हि ते. तिथे तुम्ही भाव वाढीला समर्थन का नाही करत ?????
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:19

In reply to अजून कोण फक्त पैसे by निनाद जोशी

Permalink

_/\_

_/\_ माझ्या इतर प्रश्नांचीही अशीच अघळपघळ उत्तरे देऊन उपकृत करावे...
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 18:28

In reply to _/\_ by असंका

Permalink

माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या

माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या कि तुम्ही पेट्रोल चे भाव ८० वरून ८०० रुपये लिटर केले अथवा रेल्वे तिकिटाचे भाव २५ वरून २५० केले तर काही बोलत नाही का??? तेव्हा ह्या दर वाढीला सामान्यतः सर्व लोक तरी अव्वाच्या सव्वा असेच म्हणतात 'कंफ्युज्ड' लोक ह्याला काय म्हणतात हे मला तरी ठाऊक नाही. ह्या दरवाढीला तुम्ही काय म्हणाल हे मला सांगून तुम्ही मला उपकृत करा.....
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:37

In reply to माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या by निनाद जोशी

Permalink

माझा "आय डी" हा संपूर्णपणे

माझा "आय डी" हा संपूर्णपणे माझा वैयक्तिक विषय आहे. तो चर्चेचा विषय नाही. तो चर्चेसाठी उपलब्धही नाही. कृपया वैयक्तिक टीका टिप्पणी टाळा.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 18:39

In reply to माझा "आय डी" हा संपूर्णपणे by असंका

Permalink

वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा

वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा क्षमस्व .......
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:43

In reply to वैयक्तिक टिप्पणी बद्दल अनेकदा by निनाद जोशी

Permalink

ओके....

ओके....
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 18:41

In reply to माझा "आय डी" हा संपूर्णपणे by असंका

Permalink

परंतु ह्या दरवाढीस तुम्ही

परंतु ह्या दरवाढीस तुम्ही तयार व्हाल का आणि ह्यास तुम्ही काय म्हणाल ह्याचे उत्तर अजूनही अपेक्षित आहे......
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:47

In reply to परंतु ह्या दरवाढीस तुम्ही by निनाद जोशी

Permalink

माझ्या प्रश्नांचे उत्तर

माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे सोडून तुमचेच प्रश्न पुढे घ्यायचेत तुम्हाला? हरकत नाही. पण आधी माझा एक अगदी छोटा प्रश्न- खरं तर "माझा" म्हणणं पण योग्य नाही- आत्याबाईला मिशा अस्त्या तर?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 19:02

In reply to माझ्या प्रश्नांचे उत्तर by असंका

Permalink

माझ्या आत्याबाईंना तरी मिश्या

माझ्या आत्याबाईंना तरी मिश्या नाहीत आणि मी तुमच्या एका प्रश्णाच उत्तर दिल आता तुम्ही एका प्रश्णाच उत्तर द्या
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 18:53

In reply to परंतु ह्या दरवाढीस तुम्ही by निनाद जोशी

Permalink

तुम्ही सरकारी आणि खाजगी

तुम्ही सरकारी आणि खाजगी सेवांमधे गल्लत करत आहात. सरकार नियंत्रित क्षेत्रांमधे नागरिकांना सोयीचे पडेल असे निर्णय घेण्याची सोय असते. एक उदाहरण म्हणून मोबाईल सेवेचे घेऊ. वरकरणी इथे आपण खाजगी कंपन्यांची सेवा वापरत असलो तरी मूळ त्या कंपन्या सरकारी मालमत्ता (बँड्विड्थ स्पेक्ट्रम्स) वापरून सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांनी काय दर लावावे यावर ट्राई सारखी संस्था नियंत्रण ठेवून असते. तेच पेट्रोल बाबत पण आहे आणि रेल्वे बाबत पण आहे. खाजगी वैद्यकीय सेवेबद्दल असे म्हणता येणार नाही ते का याचे उत्तर खाली दिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 19:06

In reply to तुम्ही सरकारी आणि खाजगी by संदीप डांगे

Permalink

मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी

मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी दरवाढ झाल्यास प्राबलेम नसेल ना……
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 19:16

In reply to मग तुमचा भाजी अथवा दुधात अशी by निनाद जोशी

Permalink

आम्हाला कितीही प्रॉब्लेम असू

आम्हाला कितीही प्रॉब्लेम असू द्याहो, ऐकतं कोण इथे? भाजीचा दर ५ रुपय किलो असो की ५० रुपए किलो असो, न कुर्कुरता द्यावा लागतो. नाहीतर जेवायला मिळत नाही. कधी भाजी घ्यायला बाजारात जात नाही का तुम्ही?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 18:19

In reply to अहो फुकट द्या कोण म्हणतय फक्त by निनाद जोशी

Permalink

सॉरी, त्यांना विसरलो ते.

सॉरी, त्यांना विसरलो ते. पण कसं आहे ना भौ, ही हेल्थ इंड्स्ट्री आता लोकसेवा म्हणून केली जात नाही. प्रचंड नफा कमावण्यासाठी औषध कंपन्या कुठल्याही थराला जातात. ०.०००५ पैसे उत्पादन खर्च असलेली एक गोळी तिच्या सो-कॉल्ड अव्दितीय असण्यामुळे ५,००० काय ५०,००० रुपयाला पण विकली जाते. जे लोक ती किंमत देऊ शकतात त्यांनाच जगायचा अधिकार आहे का असा मला पूर्वी प्रश्न पडायचा. खरेतर आपल्या संशोधनासाठी उचित रॉयल्टी घेऊन ते संशोधन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले तरी समाधानकारक नफा कमावला जाऊ शकतो. पण समाधान ही सापेक्ष भावना असल्याने वैद्यकिय क्षेत्रात दुर्मिळ झाली आहे. त्याला डॉ़क्टरसुद्धा अपवाद कसे असणार? अमूक एक औषध सांगितले की ते कितीही किंमतीचे असले तरी लोक आणतातच हे त्यांची अगतिकता लक्षात येऊन मस्त लुटालुट चालली आहे. एखाद्या गरीब रुग्णाला सांगितलेला ३० दिवसांच्या गोळ्यांचा कोर्स घेणे परवडत नाही, ते मेडिकलवाल्याला ८ दिवसाचं औषध द्यायला सांगतो. मेडिकलवाल्याला माहिती असतं हा प्राणी पुढील औषधे घेणारंच नाही आणि फुकट मरेल म्हणून तो त्याला पुर्ण कोर्स घ्यायला जबरदस्ती करतो. हे दृश्य फार हेलावून जाते. बर्‍याचदा गरज नसलेल्या शस्त्रक्रिया, औषधे सांगितली जातात. रुग्ण हतबल असल्याने काहीच करू शकत नाही. मी वर दिलेला सल्ला उपरोधिक अजिबात नाही. खरंच कुशल व प्रामाणिक डॉक्टरांना समाजाने अधिक संख्येने पुढे आणले तर समाजाचाच फायदा आहे. सध्या मागणी तसा पुरवठा तत्त्वावर चालू आहे तसे नको असेल तर मागणी कमी करायला लागेल किंवा पुरवठा वाढवायला लागेल. या व्यवसायक्षेत्राला रेगुलेशन यायला पाहिजे. कारण हा नागरिकांच्या जिवनमरणाचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद जोशी on Wed, 03/11/2015 - 18:23

In reply to सॉरी, त्यांना विसरलो ते. by संदीप डांगे

Permalink

पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे

पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे ना कि हि शुद्ध लुटालूट आहे ते..... माझे हेच तर म्हणणे होते. ह्या विरुद्ध नक्कीच काही नियम हवेत हेच तर मी म्हणत होतो नाहीतर हि लुटालूट चालूच राहणार......
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 18:43

In reply to पण म्हणजे तुम्हालाही पटते आहे by निनाद जोशी

Permalink

नाही हो. दोन वेगवेगळ्या

नाही हो. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. १. एखाद्याचा मेहनताना ठरवणे. २. एखाद्या क्षेत्रात मनमानी कारभार चालू असेल तर त्यावर शासकिय नियंत्रण आणणे. दोन्ही गोष्टी शक्य नाहीत कारणः १. एखाद्याचा मेहनताना त्याची सेवा किती दुर्मिळ आणि महत्त्वाची आहे यावर ठरतो. २, सरकारने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकडे पाठ फिरवून खाजगी कडे जाण्याचा निर्णय नागरिक स्वतः घेतात. मग बाजारपेठेनुसार सरकारी सेवेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर सरकारला तक्रार करण्याची काय गरज? सरकार का म्हणून लक्ष देईल? फारतर नागरिक सरकारी सेवा उत्कृष्ठ दर्जाची करण्याबाबत दबाव आणू शकतात. खाजगी क्षेत्रावर नियंत्रण आणणे शक्य होणार नाही कारण खाजगी सेवा ही नागरिकांनी स्वत:च्या चैनीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी उभी केलेली व्यवस्था आहे, त्यात लुटालुट झाली तर आरडाओरडा करण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 03/12/2015 - 05:05

In reply to नाही हो. दोन वेगवेगळ्या by संदीप डांगे

Permalink

हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून

हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून बघतोय... सरकारने लोकल बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याकडे पाठ फिरवून रिक्षाने जाण्याचा निर्णय नागरिक स्वतः घेतात. मग बाजारपेठेनुसार सरकारी सेवेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर सरकारला तक्रार करण्याची काय गरज? सरकार का म्हणून लक्ष देईल?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 03/12/2015 - 08:03

In reply to हेच लॉजिक इतर ठिकाणी लावून by यसवायजी

Permalink

खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी

खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं धरून ते लॉजिक मांडलंय. रिक्षाचे दर कोण ठरवतं? त्यावर खरंच सरकारचं नियंत्रण असतं? एका हॉर्न सोडून सगळं वाजणार्‍या खस्ताहालत रिक्षामधे बसण्याचे तेवढेच पैसे आणि आणि नव्या कोर्‍या गुबगुबित सिट्स असलेल्या आरामदायक रिक्षात बसण्याचे तेवढेच पैसे हे लॉजिक मला ती कधीच पटलेले नाही. फाईव्ह स्टार हॉटेलमधे न धुतलेल्या चादरी, जळमटं, पानाच्या पिचकार्‍या मला तरी अजून कुठे आढळल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 03/12/2015 - 09:58

In reply to खाजगी, सार्वजनिक आणि सरकारी by संदीप डांगे

Permalink

@ रिक्षाचे दर कोण ठरवतं?

@ रिक्षाचे दर कोण ठरवतं? त्यावर खरंच सरकारचं नियंत्रण असतं? >> सरकारचं नियंत्रणच असते. म्हणजे नक्की कोण? बहुतेक काही Regional Transport Authority (RTA) असतात. त्या ठरवतात. The Hindu मधील ही बातमी- The government has increased the minimum fares for autorickshaws and taxis to Rs.20 and Rs.150 respectively. रिक्षासारखी सुविधा, जी मेडीकलपेक्षा कमी महत्वाची आहे असे मला वाटते, तिच्यावर नियंत्रण का आहे मग?
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 03/11/2015 - 18:25

In reply to सॉरी, त्यांना विसरलो ते. by संदीप डांगे

Permalink

खरंय

जेव्हा तातडीच्या मेडिकल सेवेची गरज असते तेव्हा करता रुग्णाच्या नातेवाईकांकडून अत्यंत भावनिक होऊन विचार केला जातो. अशा प्रसंगी रॅशनल विचार करणे शक्यच नसते. या गोष्टींचा फायदा घेऊन पिळवणूक चालू आहे. अमेरिकेत जसे ओबामाकेअरच्या धर्तीवर इन्शुरन्स कंपन्या व हेल्थकेअर इंडस्ट्रीला चाप लावला आहे त्या धर्तीवर भारतात काहीतरी रेग्युलेशन हवे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Wed, 03/11/2015 - 17:11

Permalink

माफ करा

अगदी सरळ बोलतोय. माझ्या नात्यातल्या एका लहान मुलीचा मागच्या महिन्यात हात तुटला. घरचे पैसेवाले असल्यामुळे हैदराबाद च्या प्रसिध्द हॉस्पिटलात गेले. १५ मिनिटात प्लास्टर आणि ओपरेशन झाले, २ नेल्स टाकले. बिल किती यावे? १,३५,००० ( ९०,००० प्लास्टर लावायचे, ४५,००० काढायचे ) कसाही विचार केला तरी हा हिशोब कळत नाही. गावाकडे ५,००० लागले नसते साध्या दवाखान्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 03/11/2015 - 17:12

In reply to माफ करा by खंडेराव

Permalink

हात तुटला ?

मोडला म्हणायचे आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 03/11/2015 - 17:34

In reply to माफ करा by खंडेराव

Permalink

तुटला काय म्हणताय? हाड मोडणे,

तुटला काय म्हणताय? हाड मोडणे, फ्रॅक्चर अशाटाईप शब्द वापरा ना! लहान लेकरांना काय असे म्हणताय.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/11/2015 - 17:55

In reply to तुटला काय म्हणताय? हाड मोडणे, by रेवती

Permalink

या प्रतिसादावर हसावे की रडावे

या प्रतिसादावर हसावे की रडावे तेच कळत नाही. समजा हात तुटला ऐवजी हात मोडला म्हटले तर तेवढ्याने ती मुलगी ऑपॉप बरी होणारे का? कायतरी एकेक चमत्कारिक कल्पना असतात. बाकी यावर बिनबुडाच्या प्रावचनिक बुडबुड्यांच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 03/11/2015 - 17:59

In reply to या प्रतिसादावर हसावे की रडावे by बॅटमॅन

Permalink

व्याकरण

हात तुटणे आणि हात मोडणे यात काही फरक आहे का ? दोन्हीचा अर्थ सारखाच होतो कि वेगवेगळा ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/11/2015 - 18:07

In reply to व्याकरण by कपिलमुनी

Permalink

मुनिवर, 'लहान मुलांसाठी असे

मुनिवर, 'लहान मुलांसाठी असे शब्द काय वापरता' यावरती माझा रोख होता. बाकी मान्यच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 03/11/2015 - 18:00

In reply to या प्रतिसादावर हसावे की रडावे by बॅटमॅन

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on गुरुवार, 03/12/2015 - 09:27

In reply to तुटला काय म्हणताय? हाड मोडणे, by रेवती

Permalink

तुटणे, मोडणे, फ्रॅक्चर होणे

भावना पोहोचल्या. आठवायचा प्रयत्न केला, लहानपणापासुन तुटणे हा समानार्थी म्हणुन वापरला गेलाय गावाकडे. फ्रॅक्चर टाइप करण्याचा प्रयत्न करण्यात बोटे फ्रॅक्चर व्हायची वेळ आली. आता चोप्य पेस्त केलाय.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 03/13/2015 - 20:35

In reply to माफ करा by खंडेराव

Permalink

खंडेराव

खंडेराव मुलीच्या हातात दोन खिळे टाकले म्हणजेच तिची शल्यक्रिया झाली. हि शल्यक्रिया गावाचा हाडवैद्य करू शकेल काय याची शंका वाटते. तो कदाचित ९० % वेळेस काम व्यवस्थित करेलही पण उरलेला १० % धोका आपण पत्करायचा कि नाही हे आपण ठरवु शकता. वाढत्या वयात हाताची दोन हाडे जर व्यवस्थित सांधली गेली नाही तर एका बाजूचे हाड जास्त वाढते आणि दुसरे हाड वाढत नाही. शिवाय जर हाड वाकडे जुळले तर आयुष्यभर वाकडा हात राहिल्याची शिक्षा त्या निष्पाप मुलीला मिळेल. आयुष्यभर अपंग म्हणून तिला राहायला लागेल किंवा परत शल्यक्रिया करून हात सरळ करावा लागेल. (जर हे केले नाही तर) अशा वाकड्या हाताच्या मुलीला लग्नाच्या वेळेस पत्करणारा मुलगा हा त्याची किंमत वसूल केल्याशिवाय राहील काय? शेवटी लग्न हा बाजार आहे. बाकी इतकी किंमत का याचे उत्तर लांबलचक आहे आणि ते देऊनही बर्याच लोकांना पटवून घ्यायचेच नाही त्यामुळे मी ते देत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Mon, 03/16/2015 - 13:52

In reply to खंडेराव by सुबोध खरे

Permalink

सगळे मान्य

आहे हो. जर आपण या किंमतीला योग्य म्हणत असु, आणि वर असेही वाटत असेल की कमी किमतीत हे करण्यात धोका आहे तर परिस्थिती अवघड आहे. किती लोक एवढे पैसे देउ शकतात? प्रत्येक स्किल्ल या योग्य ती किंमत मिळाली पाहीजे, पण जेव्हा अवास्तव पैसा मागितला जातो, तिथे अडचण सुरु होते. झोमटो सारखी एखादी साइट असावी, जिथे दरपत्रके आणि रिव्यु मिळतील दवाखान्यांचे पण.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 17:54

Permalink

एखाद्याचा जीव वाचवणे ही फार

एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का?
:-))
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 03/11/2015 - 17:59

Permalink

माझ्या नात्यातील एका

माझ्या नात्यातील एका व्यक्तीची बायपास सर्जरी १० वर्षापूर्वी झाली होती. तेव्हा एकूण खर्च ५०००० रुपयाच्या आसपास आला होता. मेडिकल'सेवे'चे इन्फ्लेशन बघितले तर दहा वर्षात ही किंमत पाचपट झाली आहे हे सहज लक्षात येईल. त्यामुळे अडीच लाख रुपये खर्च हा सद्य बाजाराच्या दरानुसारच वाटतो आहे. हा दर योग्यच आहे असे मला म्हणायचे नाही. उदा. आजकाल मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रियांचा खर्च सत्तर ते ऐंशी हजारापर्यंत गेला आहे. एकंदर किंमत बाजाराच्या दरानुसार असल्याने त्याच्या अंतर्गत आयटमायझेशन कसे केले आहे याने पेशंटला तत्त्वतः काहीही फरक पडत नाही. माझा असा अंदाज आहे की इन्शुरन्स कंपनीच्या नियमांना वळसा घालण्यासाठी हॉस्पिटले सोयीस्कर आयटमायझेशन करतात. उदा. इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार सलाईनच्या बाटलीचे पैसे देणार पण बाटली अडकवण्याच्या स्टँडचे भाडे नाही असे काही असेल तर बाटली व स्टँड असे मिळून सर्व पैसे बाटलीला लावले जात असावेत. त्याचप्रमाणे डॉक्टरची फी इन्शुरन्स कंपन्यांना एक्स्क्लुड करता येत नसल्याने जो खर्च मिळण्याची शक्यता कमी आहे तो डॉक्टरच्या फीमध्ये पकडला जात असावा. तुम्ही इन्शुरन्स क्लेम केले की नाही याचा यात फरक पडू नये. बिलिंग सिस्टम सोपी ठेवण्यासाठी सर्वच पेशंटला एकाच प्रकारचे दर लावण्याचा हॉस्पिटलचा हेतू असावा. पुन्हा एकदा हॉस्पिटलचा दर व एकंदर सिकनेस केअर व्यवस्थेचे मला चुकूनही समर्थन करायचे नाही. भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 03/11/2015 - 18:30

In reply to माझ्या नात्यातील एका by आजानुकर्ण

Permalink

१०० टक्के सहमत..

भरमसाट पैसे घेऊनही अत्यंत कमी अकाऊंटॅबिलिटी असलेली ही व्यवस्था आहे. दुर्दैवाने आपल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही व तुलनेने भंकस असे घरवापसी, गोहत्याबंदी वगैरे विषयांवर वेळखाऊपणा चालतो याचे वाईट वाटते. पूर्णपणे पटले....
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Wed, 03/11/2015 - 18:00

Permalink

क्षय रोग उच्चाटनासाठी

क्षय रोग उच्चाटनासाठी सरकारी रुग्णालयात डॉट अंतर्गत क्षय निदान व उपचार मोफत राबवला जातो. तेथील तपासण्या व औषधे प्रमाणीत असतात. परंतू क्षयाचे बरेचशे रुग्ण खाजगी रुग्णालयात जास्त पैसे मोजून उपचार घेतात. मोफत त्यात सरकारी म्हणजे कमी दर्जाचे असा लोकांचा समज असतो. त्यामुळे खाजगी डॉक्टरांचे फावते. माझ्या आजोबांच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेला जे.जे.रुग्णालयात अंदाजे ६००० रू. खर्च आला. ह्यात नेत्रतपासणी, लघवी रक्त, ईसीजी तपासणी,शस्त्रक्रीया, लेन्स (नामांकीत कंपनीची) औषधे, दोन दिवस रुग्णालयात मुक्काम,दिवसातून दोन वेळा दूधपाव व डॉक्टरांची व्हीजीट हे सर्व समाविष्ट आहे. खाजगी रुग्णालयात हाच खर्च ३० ते ३२ हजरापर्यंत गेला असता.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Wed, 03/11/2015 - 18:02

Permalink

स्वत: च्या कौशल्याचे

स्वत: च्या कौशल्याचे एखाद्याने किती पैसे मागावे हे तोच ठरवू शकतो. पण ते द्यावे की नाही हे आपण ठरवावे. पैसा सगळ्यांनी कमवावा पण स्वत: पुरती एखादी नियमावली आखून घ्यावी. डॉक्टर च्या बाबातीत बोलायचं तर माझ्या मते नियमावली खालीलप्रमाणे असावी. १. दवाखान्यात दाखल होऊन शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचार घेऊन जर एखादा पेशंट नंतर रुटीन चेक अप साठी आला असेल तर त्याच्याकडून फी घेऊ नये किंवा नाममात्र घ्यावी. (असे काही डॉक्टर माझ्या पाहण्यात आहेत) २. औषध लिहून देताना रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून शक्य असल्यास तुलनेने स्वस्त औषध द्यावीत. ३. मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून अव्वाच्या सव्वा दर लाऊ नये. ४. जेवढी गरज आहे तेवढेच उपचार करावेत. शक्यतो घरगुती उपाय सांगावे. ५. सेकंड ओपिनियन घ्यायला आलेल्या रुग्णाला परत सगळ्या चाचण्या करायला लावू नये
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:16

In reply to स्वत: च्या कौशल्याचे by चिनार

Permalink

मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून

मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून अव्वाच्या सव्वा दर लाऊ नये.
ही खालची माझी मतं आहेत- माझ्याकडे पुरावा नाही. पण कार्यकारणभाव मला तरी योग्य वाटतोय- इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला. सामान्य माणसाकडे मात्र हे दोन्ही नसतं. मुळात तो हॉस्पिटलमध्ये येतो तेच ऐन वेळी. तो थोडीच काही निगोशिएशन करू शकतो. शेवटी अव्वाच्या सव्वा दर हे अन-इन्शुअर्ड माणसाकडनं घेणंच जास्त शक्य होत असावं, असं आपलं मला वाटतं...
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Wed, 03/11/2015 - 18:20

In reply to मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून by असंका

Permalink

नाही

साधारणपणे माझा असा अनुभव आहे की तुम्ही इन्शुरन्स कंपनीशी भांडू शकता. आयआरडीए वगैरेकडे जाऊ शकता. त्यामुळे जास्त क्लेम केला आणि तो नाकारला गेला तर पेशंट व इन्शुरन्स बघून घेतील असे हॉस्पिटलचे साधारण धोरण असते. मात्र हॉस्पिटल व डॉक्टर यांच्या संदर्भात कुठेही दाद मागण्याची सोय मला माहीत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 03/11/2015 - 18:22

In reply to मेडिकल इन्शुरन्स आहे म्हणून by असंका

Permalink

इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत

इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत महंत आहेत का? हॉस्पिटलवाले अव्वाच्या सव्वा दर लावतील आणि कंपन्या देऊन मोक्ळ्या होतील? त्यांच्याकडे अनेक ऑपरेशन्चे तयार दर असतात. ते दर अनेक निगोशिएशन नंतर ठरतात. कुठल्या गोष्टीला नक्की किती खर्च कुठल्या ठिकाणी येऊ शकतो याचा सखोल अभ्यास करूनच ते निगोशिएशनला येतात. त्यांना दर परवडला नाही, तर ते सरळ त्या हॉस्पिटलवर काट मारतील. त्यांच्याकडे पुरेसे लोक आणि वेळ आहे हे सगळं करायला. अनुभव
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 03/11/2015 - 18:31

In reply to इंशुरन्स कंपन्या मंजे काय संत by मोदक

Permalink

घ्या पुरावा पण आला...

घ्या पुरावा पण आला...
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Wed, 03/11/2015 - 20:25

Permalink

मला एक सांगणार का कुणी?

ऐशी हजार त्या डॉक्टरानी घेतले, असे मान्य करू. बाकीचे एक लाख सत्तर हजार कुठे गेले? दुसरे, समजा, तुम्हाला हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर बायपास सर्जरी करायची आहे. तुमच्या समोर ३ पर्याय आहेत. १. डॉ. ख्यातनाम सुप्रसिद्ध क्षक्षक्ष. (यांची फी ८० हजार रुपये आहे. तशी पाटी त्यांनी दवाखान्यात लावलेली आहे, तुम्हाला स्टँप्ड पावतीही दिली आहे. हा व्हाईट व्यवहार आहे, व त्यात सगळे प्रकार मिळून ४०% टॅक्स सरकारला जातो हे तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित. टोटल खर्च २.५ लाख) २. एक नवखे / डॉ. अननोन. यांची फी माफक ४० हजार रुपये आहे. टोटल खर्च १.७५ लाख ३. शासकीय इस्पितळ उदा. जेजे. तिथे अँजिओप्लास्टी करणे पोस्टग्रॅज्युएट वैद्यकिय विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कदाचित डॉ क्षक्षक्ष यांच्याच मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन होईल, पण ते करणारा विद्यार्थी असेल. किंवा नसेल. ते ऑपरेशन नक्की कोण करील ते तुम्हाला समजणार नाही. इथे खर्च फुकट आहे, कारण तुमच्याकडे पिवळे/केशरी रेशनकार्ड आहे. नसेल, तर सगळा मिळून ५५ हजार. आता या परिस्थितीत, तुम्ही कुणाकडे उपचार घ्याल? व का? की ४. उपचार न घेता आपले लाडके आयुर्हित सांगताहेत तसे घरी बसाल?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com