ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे.
ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी -
विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.
सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे.
पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली -
http://ports.com/sea-route/
या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का?
हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे?
पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का?
याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का?
विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली.
ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय?
मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?
आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.
या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.
या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे.
तस्मात,
अखेरचा नमस्कार!
प्रतिक्रिया
__/\__ :))
मार ही त्राटिका, रामचंद्रा
:-)
____/\___ धन्य !! =))
अरेरे
:)))
+D
प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन
जे ब्बात..
हे हे...
यासाठी एक दंडवत स्वीकारावा
अगागागागागागागा =)) =)) =)) _
ठ्ठो!!!
आदुण्णा एक वडक्कम हाणतो _/\_
(No subject)
१००
विच हंटिंग आणि स्कोर
पैसा ताई शी १००% सहमत
मनातलं बोललात !
माझ्या दोन शंका
मला त्या वाचनातुन मिळालेला
बरोबर
फरक नाव दिल्याने कितपत बदलेल
माझी उत्तरे...
'’मऊ मेणाहुनि विष्णुदास आम्ही' ''ना.सी.फडके कलावादी होते'' ''वि.स.खांडेकर जीवनवादी होते'' ''केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत'' ही विधाने सर्वसाधारण, सर्वश्रुत, सर्वसंमत आहेत. तळटीपेत त्यांचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते'' १
संदर्भ : १. डॉ.सदा कर्हाडे, संशोधन सिद्धांत आणि पद्धती, प्रकाशन, लोकवाङ्मय गृह,मुंबई.आवृत्ती दुसरी.पृ.क्र.१३१.
-दिलीप बिरुटेसर सहमत
+१००० पैसाताई
पैसाताई यांच्याशी सहमत
१ प्रश्न खूप जेनुएन्लि पडला आहे
हुश्श हे घ्या या विषयावर अधिक कायदे विषयक माहितीचे दुवे
trap
बुम्प
Pagination