✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Sun, 02/01/2015 - 22:24  ·  लेख
लेख
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २. कथा सुमारे ५०० ते २००० शब्द या शब्दमर्यादेत असावी. ३. स्पर्धकांनी फक्त स्वत:च्याच कथा द्याव्यात, इतर कुणाच्या कथा परवानगी असली तरीही देऊ नयेत. ४. स्पर्धेचा निकाल तज्ञ परीक्षक ठरवतील, जो दि. २७-२-१५ रोजी जाहीर केला जाईल. ५. स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन पारितोषिके दिली जातील. ही पारितोषिके पुस्तके या रुपात असतील. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा !! :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वाङ्मय
कथा
मुक्तक
भाषा
साहित्यिक
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12163 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

सुंदर उपक्रम

सानिकास्वप्निल
Sun, 02/01/2015 - 22:34 नवीन
लेख / लघुकथा वाचण्यास उत्सुक :) सर्वांना शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

हैला! भारीच!

आदूबाळ
Mon, 02/02/2015 - 00:05 नवीन
हैला! भारीच! नगरीनिरंजन, आतिवास, गवि, स्पार्टाकस मोजी, मकले यांच्या कथा वाचण्यास उत्सुक आहे. सर्वांनी नक्की मनावर घ्यावे!
  • Log in or register to post comments

+ १....

मुक्त विहारि
Mon, 02/02/2015 - 07:53 नवीन
रामदास, सर्वसाक्षी ह्यांनी पण कळफलक हातात घेतला तर फार उत्तम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अरे............????????

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/02/2015 - 14:09 नवीन
अरे............???????? वरच्या यादित माझे नाव राहिले की. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असं कसं, असं कसं ? मी

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/03/2015 - 00:06 नवीन
असं कसं, असं कसं ? मी खालच्याच प्रतिसादात "नव्या-जुन्या मिपाकरांना" आवाहन केले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

कथा सांगण्यास सर्व नव्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/02/2015 - 01:05 नवीन
कथा सांगण्यास सर्व नव्या-जुन्या मिपाकरांच्या कथांची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात आहे ! सर्वांना अनेक शुभेच्छा !! ओए मिपाकरो, शुरू होज्जावो !!!
  • Log in or register to post comments

सुरेख उपक्रम ! शुभेच्छा !

स्वामी संकेतानंद
Mon, 02/02/2015 - 08:10 नवीन
सुरेख उपक्रम ! शुभेच्छा ! (लघुकथांच्या प्रतिक्षेत) स्वामी
  • Log in or register to post comments

@लघुकथांच्या प्रतिक्षेत - (??

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/02/2015 - 08:45 नवीन
@लघुकथांच्या प्रतिक्षेत - (????) स्वामी! :-\ स्वामिज्जिंच्या लेखन प्रतिक्षेत - आत्मू! ;-) हां! आता जम्लं! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

फ़ुर्र्र्र्र्रर्र्र्

स्वामी संकेतानंद
Mon, 02/02/2015 - 08:53 नवीन
फ़ुर्र्र्र्र्रर्र्र्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ठीक आहे. च्या पिवून झालं की

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/02/2015 - 10:58 नवीन
ठीक आहे स्वामीजी. च्या पिवून झालं की मंग लिवा. आम्चं कायबी म्हण्णं नाय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

अरे वा ! छान उपक्रम, वाट

विशाल कुलकर्णी
Mon, 02/02/2015 - 10:20 नवीन
अरे वा ! छान उपक्रम, वाट पाहतोय मेजवानीची :)
  • Log in or register to post comments

बादवे

आदूबाळ
Mon, 02/02/2015 - 12:46 नवीन
बादवे
मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख.
याबद्दल अधिक माहिती द्यावी. कोण कोण लिहिणार आहे? आम्ही (वाचक) फरमाईश करू शकतो का?
  • Log in or register to post comments

सर्व सभासदांच्या सुचना

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 02/02/2015 - 12:49 नवीन
सर्व सभासदांच्या सुचना/फर्माईशांचे स्वागतच असेल ! तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे नाव सुचवू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

मिपावरील सुप्रसिद्ध-वयोवृद्ध

खेडूत
Mon, 02/02/2015 - 19:38 नवीन
मिपावरील सुप्रसिद्ध-वयोवृद्ध दाम्पत्याची कथा जोडीने आली तरी आवडेल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्यांचे हे काय म्हणतात त्यावर

सूड
Mon, 02/02/2015 - 19:40 नवीन
त्यांचे हे काय म्हणतात त्यावर सगळं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सुचवा सुचवा.पण लवकर

अजया
Mon, 02/02/2015 - 13:42 नवीन
सुचवा सुचवा.पण लवकर.लिहिणार्याना पुरेसा वेळ मिळेल लवकर निरोप गेल्यास.
  • Log in or register to post comments

अरे वा आता छान लघुकथा वाचायला

जागु
Mon, 02/02/2015 - 14:05 नवीन
अरे वा आता छान लघुकथा वाचायला मिळतील तर.
  • Log in or register to post comments

अरे वा ! मस्तच....

वेल्लाभट
Mon, 02/02/2015 - 16:31 नवीन
अरे वा ! मस्तच....
  • Log in or register to post comments

वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/02/2015 - 16:37 नवीन
वा मस्तचं. एखादी नॉन टेक्निकल कथा प्रसवायचा प्रयत्न करुन पहातो. *mail1* *WRITE* *MAIL* *mail1* *WRITE* *MAIL* *mail1* *WRITE* *MAIL*
  • Log in or register to post comments

टेक्निकलसुद्धा चालेल हो !

सस्नेह
Mon, 02/02/2015 - 16:43 नवीन
टेक्निकलसुद्धा चालेल हो ! =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ही घ्या टायपिस्ट

स्पंदना
Wed, 02/04/2015 - 14:05 नवीन

कॅलिस्पो!!!

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅलिस्पो नै!!! कॅलिप्सो!!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 02/04/2015 - 19:32 नवीन
कॅलिस्पो नै!!! कॅलिप्सो!!! =)) नको. लेखणीमधुन भयकथा निघायची ती पण दिर्घ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

किती एंट्री पाठवायचा याला काय

जेपी
Mon, 02/02/2015 - 17:01 नवीन
किती एंट्री पाठवायचा याला काय मर्यादा हायती का ? नाय मंजे दोन डोक्यात हायती पाठवतो. पुस्तकासाठी कायपण . अवांतर-जल्ला आदी का नाय सांगितल आमच "गुपित " होत की .. *wink*
  • Log in or register to post comments

किती लिवाल तितक्या द्या,

सस्नेह
Mon, 02/02/2015 - 21:30 नवीन
किती लिवाल तितक्या द्या, हाकानाका +)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आँ..!

प्रभाकर पेठकर
Fri, 02/06/2015 - 10:02 नवीन
>>>> दोन डोक्यात हायती हा दुतोंडीपणा ठिक नाही हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ह्म्म्म !!

सूड
Mon, 02/02/2015 - 17:35 नवीन
ह्म्म्म !!
  • Log in or register to post comments

का हो ?

सस्नेह
Wed, 02/04/2015 - 08:35 नवीन
लै इच्चारात पडलात +)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

व्हय जी!!

सूड
Wed, 02/04/2015 - 16:40 नवीन
व्हय जी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

करा करा

सस्नेह
गुरुवार, 02/05/2015 - 09:41 नवीन
चांगला इचार करा आन लिवा येक झकास ष्टुरी ! +)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/02/2015 - 20:08 नवीन
कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका फरक काय?
  • Log in or register to post comments

कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका

वैभव जाधव
Mon, 02/02/2015 - 20:12 नवीन
कथा/लघुकथा/आणि लेख यात नेमका फरक काय?
अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. (दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

या हिशोबाने शतशब्दकथा म्हणजे

आदूबाळ
Mon, 02/02/2015 - 20:18 नवीन
या हिशोबाने शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

@अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर /

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/02/2015 - 21:21 नवीन
@अनुक्रमे: वैदिक / रजिस्टर / आणि साग्रसंगीत यात जेवढा आहे तेवढा. >> :-D आले व्वा व्वा! :-D कित्ती चान चान चमजाऊन छांगितलत! ;-) @(दक्षिणेतला फरक घेतला तरी चालेल ) >> व्वाह! हे तल लैच्च भाली! :HAPPY: रच्याकने:- आपण उत्तरेतून आलात की काय? :P कुणीतरी खरच सांगा ना....???? :-\ .. :-\ .. :-\ @ शतशब्दकथा म्हणजे "आळंदी" की काय? >> =)) आदू रॉक्स! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

व्याख्या...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/03/2015 - 00:09 नवीन
या लेखात दिलेल्या नियमात बसेल ती कथा या स्पर्धेसाठी लघुकथा समजली जाईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

दोन हजार शब्दांपेक्षा मोठी

आदूबाळ
Fri, 02/06/2015 - 02:04 नवीन
दोन हजार शब्दांपेक्षा मोठी कथा चालेल का संपादक्स?
  • Log in or register to post comments

शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे,

सस्नेह
Fri, 02/06/2015 - 12:50 नवीन
शब्दसंख्या प्रातिनिधिक आहे, काटेकोरपणे मोजली जाणारी नाही. तथापि 'लघुकथा' म्हणता येईल इतपत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बर्र...

आदूबाळ
Fri, 02/06/2015 - 12:56 नवीन
बर्र...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा