Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सर्वसाक्षी on Sun, 01/11/2015 - 17:59
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
अनुभव
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
  • Log in or register to post comments
  • 72400 views

प्रतिक्रिया

Submitted by आदूबाळ on Sun, 01/18/2015 - 14:52

In reply to "मेतकूट" तर्फे by मेतकूत

Permalink

सकारात्मक प्रतिसाद आवडला.

सकारात्मक प्रतिसाद आवडला. तुम्हाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Mon, 01/19/2015 - 00:56

In reply to सकारात्मक प्रतिसाद आवडला. by आदूबाळ

Permalink

सहमत

शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 01/18/2015 - 22:02

In reply to "मेतकूट" तर्फे by मेतकूत

Permalink

मेतकूट साहेब

मेतकूट साहेब दोन वाजता आरक्षण करून २. ४५ ला जागा मिळाली हि गोष्ट साधी नव्हे "थाळी संपली आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले" एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. हि नव्याची नवलाई चार दिवस असू शकते परंतु जर ग्राहकाचे समाधान हा जर आपला केंद्रबिंदू नसेल काळाच्या ओघात कठीण होत जाते. या ओळी पाहून कुणालाही असेच वाटेल कि जर वाट पाहून कोशिंबीर आणि फोडणीचा भातच खायचा असेल तर मराठी म्हणून अभिमानाने हाटेलात का जायचे? जर मी मराठी थाळी खायला आलो आणि कोशिंबीर आणि फोडणीचा भात खाऊन परत जावे लागले तर मी परत त्या हाटेलात पाय ठेवणार नाही हे नक्की. ठाण्यातीलच एक हाटेल रॉयल च्यालेंज मध्ये आम्ही नोव्हेंबर २०१३ मध्ये पाईन एपल रायते मागवले तेंव्हा त्यातील दही "करकरीत" आंबट होते. ( दही खाताना दात करकरले तर त्याला करकरीत आंबट म्हणतात). मी त्याबद्दल तक्रार केली असता त्यांनी गरमी मुळे दहि आंबट होते म्हणून सांगितले. आम्ही परत घेऊन जा आणि दुसरे आणा सांगितल्यावर त्यांनी त्यातच शुगर सिरप( साखरेचा पाक फ्रेश लाइम सोडा वाले ) घालून आणून दिले. आम्ही त्याबद्दलची तक्रार वरिष्ठ व्यवस्थापकाकडे केली असता त्यांनी आमच्याकडे असेच रायते मिळते.मी शांतपणे विचारले कि आमचा दही पुरी वाला भैया मे मध्ये सुद्धा गोड दही घालूनच दही पुरी देतो. तो अमुलचे दही वापरतो तुमचे दही आंबट झाले तर तुम्ही त्या ऐवजी बाहेरून दही आणणे आवश्यक आहे. त्यावर त्यांनी आमच्या कडे असेच आहे हे सांगितले ताबडतोब पुढच्या सर्व ऑर्डर आम्ही रद्द केल्या आणि तिथून बाहेर पडलो. zomato सारख्या जालावर त्याचा साद्यंत इतिहास लिहिला आणि आजतागायत तेथे पूल ठेवलेले नाही यात आम्ही कमीत कमी २५ मित्र आणि परिवार असू. असो आपला खुलासा वाचला गैरसमज झाला असेलहि परंतु ज्याअर्थी एखादा माणूस लिहितो त्याअर्थी त्यात थोडेतरी तथ्य नक्कीच आहे असे मी मानतो. आपल्या हॉटेलला जरूर भेट देऊ पण हाच अनुभव परत आला तर …। शेवटी माणूस हॉटेलात जातो ते एक दुपार किंवा संध्याकाळ मजेत घालविण्यासाठी त्यासाठी तो घरच्या पेक्षा तिप्पट( किंवा जास्त) किंमत मोजत असतो. त्यामुळे आपल्या पैश्याचे मुल्य मिळाले पाहिजे हि अपेक्षा असते त्याशिवाय एका संध्याकाळीवर विरजण घालणारा अनुभव जर आला तर तो सहजासहजी विसरता येत नाही जाता जाता --- मुलुंड मधील काही हॉटेल्स "नम्रपणे" फोनवर सांगतात, "साहेब, शनिवारी आणि रविवारी आम्ही आरक्षण ठेवत नाही. आणि हे पटण्यासारखे आहे. कारण एखादी व्यक्ती येउन बसली तर तिला विविक्षित वेळेत उठवणे शक्य नाही हे मान्य.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Mon, 01/19/2015 - 01:38

In reply to मेतकूट साहेब by सुबोध खरे

Permalink

बरोबर आहे!! 'आमच्याकडे असेच

बरोबर आहे!! 'आमच्याकडे असेच मिळते' अशा उत्तरावर असेच केले पाहिजे!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/19/2015 - 00:09

In reply to "मेतकूट" तर्फे by मेतकूत

Permalink

सकारात्मक प्रतिसाद, आवडला.

सकारात्मक प्रतिसाद, आवडला. चुका सगळेच करतात... मात्र त्या मान्य करून, समजावून घेऊन, सुधारणा करणारेच प्रगती करू शकतात. तुमचे यश उत्तरोत्तर वर्धित होत जावे हीच एक मराठी माणुस म्हणून सदिच्छा !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 01/19/2015 - 16:43

In reply to सकारात्मक प्रतिसाद, आवडला. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

किती प्रतिसादांचं स्वसंपादन

किती प्रतिसादांचं स्वसंपादन कराल एक्का काका!!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/19/2015 - 16:48

In reply to किती प्रतिसादांचं स्वसंपादन by अनुप ढेरे

Permalink

पुढच्या वेळेला चुकार शब्द

पुढच्या वेळेला चुकार शब्द बदलायला तुम्हाला विनंती करेन, बास ! +D
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 01/19/2015 - 17:03

In reply to पुढच्या वेळेला चुकार शब्द by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

हे आणि वर खिजवणं दुसर्‍याला!

हे आणि वर खिजवणं दुसर्‍याला!
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Mon, 01/19/2015 - 05:22

In reply to "मेतकूट" तर्फे by मेतकूत

Permalink

तुमचा मेनू

सर्वसाक्षी यांना आपल्या मेतकुट या नवीन उपक्रमात खूप वाट पाहिल्यावर जेवल्या शिवाय परत फिरावे लागले. या विषयावर बरीच आणि सविस्तर चर्चा झाली आहे. त्यातून एक निष्पन्न हे निघाले कि सध्या आपले हॉटेल अल्पावधीत खूप लोकप्रिय झाले आहे. या मुळे आमच्यासारख्या दूरस्ताना तेथे खास मिळणार्या पदार्था विषयी कुतूहल निर्माण झाले आहे. तरी तुमचा मेनू याच चर्चेत -अर्थात संपादकीय संमतीने -आपण टाकलात तर पुढे मागे त्याचा लाभ घेण्याचा विचार करता येईल . बराच उहापोह झाल्यांनतर आपण आवर्जून मिपा चे सदस्य झालात आणि आपली दिलगिरी व्यक्त केली या बद्दल आपले अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by vikramaditya on Sun, 01/18/2015 - 18:18

Permalink

धागाकर्त्यांना

आलेला अनुभव निराशाजनक होता ह्यात दुमत नसावे. व्यवस्थपनाचा प्रतिसादही योग्य वाटला. ह्या निमित्ताने जी चर्चा झाली त्या अनुषंगाने असे म्हणेन की कधी कधी काही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे अशक्य असते. उदा. पॅकेज टूर मध्ये निघालेल्या काही व्यक्ती टूर सुरु झाल्या पासुन फक्त भांडतच असतात. तुम्ही अमुक कबुल केले मग तमुक का दिले असे क्षुल्लक गोष्टींवरुन वाद घालत राहतात ते टूर संपेपर्यंत... जर काही major breach of commitment असेल तर गोष्ट वेगळी, पण सतत 'निट-पिकिंग' करत राहण्या-यांना संतुष्ट करणे फार कठीण असा ही एक अँगल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/19/2015 - 00:20

In reply to धागाकर्त्यांना by vikramaditya

Permalink

सेवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा

सेवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा म्हणजे मोठ्या संख्येने अनेक प्रकारची माणसे येणे गृहीत आहे... आणि (काही अतिरेकी उदाहरणे सोडता) त्या सर्वांना यशस्वीपणे सेवा देणे हा त्या व्यवसायाचा आवश्यक अंगभूत भाग आहे. म्हणूनच सेवा व्यवसाय दीर्घकाळ व्यवस्थितपणे करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे !
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 01/19/2015 - 00:27

In reply to सेवा व्यवसाय यशस्वीपणे करायचा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

सहमत. या धाग्याच्या

सहमत. या धाग्याच्या निमित्ताने मलाही चार गोष्टी शिकायला मिळाल्या. उपहारगृह व्यवसायात कष्ट असतात हे जाणून होते पण यानिमित्ताने ते किती असू शकतात व ग्राहकाचे समाधान कसे करावे, असमाधानी ग्राहकाशी वर्तन कसे असावे यासारख्या गोष्टींकडे बघता आले. मिपाकर पेठकरकाकांबद्दल आदर दुणावला. मेतकूट मालकांचा प्रतिसादही आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/19/2015 - 00:34

In reply to सहमत. या धाग्याच्या by रेवती

Permalink

आताच एका दुसर्‍या धाग्यावर

आताच एका दुसर्‍या धाग्यावर लीडर आणि मॅनेजर यांच्यावर चर्चा चालू आहे... सेवा व्यवसाय उत्तम चालण्यासाठी मालक उत्तम लीडर असणे आवश्यक आहे आणि व्यवसायात काम करणारा इतर प्रत्येक माणूस त्याला नेमून दिलेल्या कामाचा उत्तम मॅनेजर असणे आवश्यक असते... मॅनेजर नावाची व्यक्ती केवळ "सेकंड लेवल रिस्क मॅनेजमेंट" असायला हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 01/19/2015 - 00:37

In reply to आताच एका दुसर्‍या धाग्यावर by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

ओक्के. धागा वाचला नाही . आता

ओक्के. धागा वाचला नाही . आता वाचते.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 01/19/2015 - 00:48

Permalink

सुखद आश्चर्य....

सहसा मिपावर सदस्यता मिळवायला महिनाभरापेक्षा जास्त वेळ लागतो. हा धागा सुरु होण्यापूर्वीच जर 'मेतकुत'चि सदस्यता रिक्वेस्ट आलि आहे का माहित नाहि, पण तसं नसल्यास हल्लि मिपावर सदस्यता लवकर मिळु लागली आहे हे बघुन बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/19/2015 - 16:41

In reply to सुखद आश्चर्य.... by अर्धवटराव

Permalink

मेतकूट या शब्दाचे मराठीत

मेतकूट या शब्दाचे मराठीत एकापेक्षा जास्त अर्थ आहेत ! :) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पूनम खरे on Fri, 01/23/2015 - 15:57

Permalink

maraathit type karane

maraathit type karane bhayankar watat aahe. kahi marathi akshare yetach nahit. koni madat karu shakel ka?
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Fri, 01/23/2015 - 21:41

In reply to maraathit type karane by पूनम खरे

Permalink

मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे

मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे आहे . क्रोम वापरू नये त्यात टायपिंग गंडते. बादवे तुम्ही इथल्या डॉ. खरेंच्या कोणी आहात काय ? :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 01/27/2015 - 13:43

In reply to मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे by हाडक्या

Permalink

आमच्या चुलत बहिणीचे नाव पण

आमच्या चुलत बहिणीचे नाव पण पूनम ( पौर्णिमा) आहे. पण या "त्या नव्हेत". मी आमच्या पुनमला फोन करून विचारले तेंव्हा तिने मिसळपाव चे सदस्यत्व घेतलेले नाही असे सांगितले. या पुनम ताई महेश अशोक खरे यांच्याशी संबंधित आहेत काय ( किंवा डू आय डी) हे पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 01/27/2015 - 18:16

In reply to आमच्या चुलत बहिणीचे नाव पण by सुबोध खरे

Permalink

खरे-खोटे करुन पाहिले पाहिजे

खरे-खोटे करुन पाहिले पाहिजे =)) (ह.घ्या.) :)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Tue, 01/27/2015 - 19:59

In reply to खरे-खोटे करुन पाहिले पाहिजे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

"खरे" नावाचे सर्वच आयडी,

"खरे" नावाचे सर्वच आयडी, डुआयडी महापराक्रमी असे ऐकून आहे. (खरंच, चेष्टा नव्हे!) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बहुगुणी on Sat, 01/24/2015 - 02:53

Permalink

मिपा म्हणजे अनावृत्त ग्राहक व्यासपीठ?

सर्वसाक्षी यांचा अनुभव, त्यावरील साधक-बाधक चर्चा आणि त्यानंतर मेतकुट उपहारगृहाच्या चालकांचा सकारात्मक प्रतिसाद वाचल्यावर वाटलं की मिसळपाव डॉट कॉम हे केवळ एक भावना व्यक्त होण्याचं ठिकाण न राहता या संस्थळाची अनावृत्त ग्राहक व्यासपीठ म्हणून वाटचाल सुरू झाली आहे! एक ग्राहक-मंच म्हणून विभागच सुरू करायला हरकत नाही, जिथे ग्राहक म्हणून आलेल्या भल्या बुर्‍या अनुभवांची नोंद केली जाईल, आणि व्यावसायिकांना आपली बाजू मांडायला (आणि झाल्या असल्यास चुका सुधारायला :-) ) संधी दिली जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 09/25/2015 - 00:25

In reply to मिपा म्हणजे अनावृत्त ग्राहक व्यासपीठ? by बहुगुणी

Permalink

+१

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश अशोक खरे on Tue, 01/27/2015 - 01:16

Permalink

’मेतकूट’विषयीची खमंग चर्चा

श्री. सर्वसाक्षी यांना मेतकूट हॉटेलमध्ये आलेल्या वाईट अनुभवानंतर मिसळपाववर झालेली खमंग (काहीवेळा जळजळीतही) चर्चा वाचली. थोडी गंमत, थोडी खंत वाटली. एकूणच समाजामध्ये संयम कमी झाला आहे याचा आणि तो अजिबात संपलेला नाही याचाही पुनःप्रत्यय आला. श्री. सर्वसाक्षी यांना आलेला अनुभव आणि त्यांचा संताप एकवेळ समजू शकतो पण त्यावर इतर काहींनी दिलेल्या प्रतिक्रियामात्र खटकल्या. सर्वसाक्षी यांना दोन ऐवजी पावणेतीन वाजेपर्यंत ताटकळावे लागले. त्यामुळे त्यांचे संतापणे स्वाभाविक आहे. थाळी मागितल्यावर ती संपली आहे असे उत्तर मिळाल्यावर आलेला रागही समजू शकतो. पण ‘जेवण संपलय असे का सांगता? असे विचारल्यावर आ ला कार्टे मागवा. असे मग्रुर उत्तर मिळाले.....’ या वेळचा राग कळू शकत नाही. आ ला कार्टे म्हणजे स्वतंत्रपणे पोळी किंवा भाकरी, मेनुतील हव्या त्या भाज्या, स्वीट डिश अशी ऑर्डर केल्यास त्यांना तेथे जेवण मिळू शकले असते असे वाटते. त्याहीनंतर पदार्थ, सेवा चांगली मिळाली नसती तर त्यांचे चिडणे १००% वाजवी ठरले असते असे मला वाटते. मला जेव्हा अशा प्रकारचा अनुभव येतो तेव्हा मी तेथे उपस्थित असलेल्या सर्वात मोठ्या पदावरील व्यक्तीला ताबडतोब भेटून माझे म्हणणे त्याच्या कानावर घालतो. योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर त्याच्यावर कायमची फुल्ली मारतो. खूपच संतापलो तर माझा अनुभव इतरांनाही सांगतो. मात्र तोही अशा स्वरूपात की अबक ठिकाणी मला असा अनुभव आला तुम्ही काय करायचं ते ठरवा. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे श्री. सर्वसाक्षी यांनी जास्त जळजळीतपणे इतरांना गैरसोय, अपमान, मनस्ताप सहन करण्यासाठी मेतकूटला जा असे सांगितले. असो. हा अनुभव वाचून आलेल्या इतर अनेक प्रतिक्रियामात्र पचण्यास कठीण होत्या. ‘हॉटेल मालकाची गुर्मी जिरवा...., चार दिवसात सुतासारखे सरळ येतील..., धडा शिकवलाच पाहिजे..., लवकर अक्कल येण्यासाठी रिव्ह्यु लिहायलाच पाहिजे...’’ काळा पहाड या सद्ग्रहस्थांनीतर सनी पावसकर या नावावरून हॉटेलमालकाचे व्यक्तिमत्त्वच गुंडपणाचे ठरवले. हा तर केवळ अविचारीपणा नाही का? म्हणजे यांना माहित असलेले तथाकथित सनी नावाचे आणि वेगळ्या आडनावाचे गुंड नगरसेवक पुण्यात असल्यामुळे जगातले सर्व सनी नावाचे लोक गुंड व्यक्तिमत्त्वाचे असल्याचा शिक्का ठोकून श्री. काळा पहाड मोकळे होणार. या न्यायाने दाऊद किंवा गवळी नाव असलेले सर्व डॉन आणि पांडुरंग किंवा धर्माधिकारी नाव असलेले सर्वजण संत होतील. त्यांचे स्वतःचे टोपणनावही गुप्तहेर सदृश असल्याने त्यांनी हे शोध लावले आहेत का? श्री. मदणबाण यांनी तर मेटकूटला स्वतः अनुभव न घेता रद्दडकूट ठरवून टाकलं. वर ‘ग्राहकांना सेवा देता येत नसेल तर हॉटेल बंद करा‘ अशी तंबी देण्याचा सल्लाही दिला. बर्‍याचवेळा आपण सर्वच जण उचलली ‘जिभ लावली टाळ्याला’ अशा स्वरुपात प्रतिक्रिया देऊन टाकतो. ’’या तेंडूलकरला ना रिटायर केलं पाहिजे...’’ असं एखादा, गल्ली क्रिकेटमध्येही बॅट हातात न धरलेला सहजपणे म्हणून जातो. ‘‘पाकिस्तानवर सरळ हल्लाच का करत नाहीत हे आर्मीवाले?’’ असं एखादा, लोकलमध्ये चढताना दोन गाड्या सोडाव्या लागणारा तावातावाने म्हणतो. एवढंच कशाला ’अमक्या तमक्याने घटस्फोट घ्यायला नको होता.’ असं त्या प्रकरणाची दोन्ही बाजूंची काहीही अथवा पूर्ण माहिती नसताना एखादा मत व्यक्त करतो. आपण काय बोलतोय? कुणाबद्दल बोलतोय? आपल्याला त्या विषयी थोडीतरी वस्तुस्थिती माहित आहे का? आपण आपल्याला आलेल्या लहानशा अनुभवाचे सार्वत्रीकरणतर करत नाही आहे ना? असा कोणताच विचार आपण मत देताना, प्रतिक्रिया व्यक्त करताना करत नाही का? सोशल नेटवर्कवर तर बर्‍याच वेळा याचा अतिरेक आणि काही जणांवर नक्कीच अन्याय होतो. ‘आलिया भट खरोखरच एवढी मठ्ठ आहे का? असा प्रश्‍न कुणाला कधी पडत नाही का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवेळी असा अनुभव प्रकाशित केल्यावर संबंधित व्यक्तीला खुलासा करण्याची संधीही मिळत नाही. जी सुदैवाने यावेळी मेतकूट मालकांना मिळाली. त्यांनी केलेला खुलासा व मागितलेली माफी आवडली. मात्र त्यांनी सेवा व दर्जाबाबत जास्त जागरूक राहणे आवश्यक आहे. चांगला प्रतिसाद व प्रसिद्धी या अपेक्षा निर्माण करतात आणि वाढलेल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास काय होते याचा अनुभव भारतीय क्रिकेटपटूंनी अनेकवेळा घेतला आहेच. तसे त्यांचे न होवो. या सर्व चर्चेत सर्वश्री धर्मराज मुटके, प्रभाकर पेठकर, वेल्लाभट, मृत्युंजय यांच्या प्रतिक्रिया समंजस व संतुलित होत्या. श्री. किसन शिंदे यांनी तर ‘हा सूर्य हा जयद्रथ’ करून पाहिले आणि स्वतःचा सकारात्मक अनुभव लिहिला याचे कौतुक वाटले. मिसळपाव वर पुढेही स्वतंत्र अनुभव लेखनाच्या स्वरुपात व्यक्त व्हायला आवडेल. महेश अशोक खरे
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 01/27/2015 - 10:30

In reply to ’मेतकूट’विषयीची खमंग चर्चा by महेश अशोक खरे

Permalink

लेख परत एकदा नीट वाचा एवढचं

लेख परत एकदा नीट वाचा एवढचं म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Tue, 01/27/2015 - 11:58

In reply to लेख परत एकदा नीट वाचा एवढचं by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१

मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१/२०१५ २७/०१/२०१५ रोजी श्री. महेश अशोक खरे यांचा सदस्यकाळ : 1 week 2 hours श्री. महेश अशोक खरे यांच्या आत्तापर्यंतच्या बाकीच्या पोस्टसः 0 हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन करण्यासाठी तयार केला गेलेला आहे या बद्दल काही शंका?
  • Log in or register to post comments

Submitted by महेश अशोक खरे on Tue, 01/27/2015 - 13:31

In reply to मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१ by काळा पहाड

Permalink

अरेरे

श्री. काळा पहाड यांची प्रतिक्रिया वाचून वाईट वाटले. त्यांच्या मताविरुद्ध लिहिले म्हणजे मी मेतकूटचे समर्थन करण्यासाठी आय.डी. बनवला आहे हे म्हणणे अन्यायकारक आहे. वादासाठी ते खरे आहे असे गृहीत धरले तरी त्यामुळे माझे मुद्दे चुकीचे ठरत नाहीत. मिसळपाव या छान साईटवर नवीन सदस्यांनी फक्त छान छान ! वा वा ! अशा प्रतिक्रिया द्याव्यात काय? हे म्हणजे कॉलेजमध्ये/ऑफिसमध्ये ज्युनिअर्सनी सिनिअर्सच्या हो ला हो केल्यासारखे होईल. असो. हा विषय मी माझ्याकडून थांबवतो. पुढे अन्य लेखांविषयी प्रतिक्रिया देताना किंवा स्वतंत्रपणे इतर विषयावर सुचेल तेव्हा लिहेन. माझा लोकशाहीवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे श्री. काळा पहाड यांच्या मताचा मी आदर करतो आणि माझे वेगळे मत मी मांडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Tue, 01/27/2015 - 15:49

In reply to अरेरे by महेश अशोक खरे

Permalink

(अवांतर : तुमच्या

(अवांतर : तुमच्या मुद्द्यांबद्दल काही म्हणणे नाही हे आधीच नमूद करतो.)
मिसळपाव या छान साईटवर नवीन सदस्यांनी फक्त छान छान ! वा वा ! अशा प्रतिक्रिया द्याव्यात काय?
ह्या ह्या ह्या.. हाय कंबख्त तुमने मिपा वाच्या ही नही .. :) सदस्यत्व घेण्याआधी मिपा वाचले असेल तर (तशी काही पूर्वअट नाही हो, तरी पण) तुमच्या लक्षात येईल की इथे कोणाच्याही धोतरास हात घातला जातो. उगी जास्त पत्रास ठेवली जात नाही.. दांभिकास दांभिक त्याच्या तोंडावर म्हणतात.. उगी "चान चान" म्हणण्याची कोणाकडून ही शक्यता तशी कमीच. इथले संपादक आमचेच असतात, आणि वर्गातल्या मॉनिटर झालेल्या पोरांना बाकीची पब्लिक जसा तरास देते तसाच इथे संपादकाना पण हक्काचा तरास दिला जातो. (त्यावर ते कितीपण तक्रार करु देत मग ;) ) मिपावर "चान चान" पणाचा आरोप केलात तर खरेसाहेब, तुमचे काही "खरे" नाही.. (नावावरच्या श्लेषाचा विनोदासाठी सपक प्रयोग.. हलके घ्या, नायतर घेऊ नका, तुमची मर्जी )
  • Log in or register to post comments

Submitted by महेश अशोक खरे on Tue, 01/27/2015 - 17:09

In reply to (अवांतर : तुमच्या by हाडक्या

Permalink

खर्‍याची दुनिया नाही : )

मा. हाडक्याभाऊ, तुमचं म्हणणं खरं आहे काही अंशी. मी नवा नवाच मिपाकर असल्याने मिपावर प्रकाशित काही मजकूराचाच आनंद घेऊ शकलोय. पण तुमची एक मात्र गल्लत झाली आहे असे वाटते. मी मिपाच्या संपादक मंडळावर किंवा मिपावर कोणताच आरोप केलेला नाही. मला हा सर्व परिवार आवडलाय. मी केवळ श्री. काळा पहाड यांच्या प्रतिक्रियेवर प्रतीप्रतिक्रिया दिली एवढंच. असो. सध्या खर्‍याची दुनिया नाही हा आमचा अनुभव आहेच. (ह्ये केवळ गंमतीने लिवले हाये. आमी आमच्याच नावावर कोटी करू शकतो. त्यामुळे तुम्ही केलीत तरी हरकत नाही. केवळ दैवगतीने खरेकुलात जन्मलो. खैरे किंवा खुरमांडीकर असतो तरी काय करणार होतो?)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Wed, 01/28/2015 - 05:09

In reply to खर्‍याची दुनिया नाही : ) by महेश अशोक खरे

Permalink

ठिक .. आम्ही पण असे नाय

ठिक .. आम्ही पण असे नाय म्हटले की तुम्ही संपादकांवर कसले आरोप करताव म्हणून. ती आगावू माहीती होती हो. लई झाले की "बाई मला हा मारतोय बगा" म्हणित जायचे संमंकडे, त्यासाठी सांगून ठेवलं. हाकानाका. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Tue, 04/19/2022 - 20:57

In reply to मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१ by काळा पहाड

Permalink

हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन

हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन करण्यासाठी तयार केला गेलेला आहे या बद्दल काही शंका?
ही शंका कदाचित खरी असावी असे मानण्यास भरपूर जागा आहे. या सदस्यनामाने सदर धाग्यावरील प्रतिसादाव्यतिरिक्त फक्त इतर तीन धाग्यांवर प्रतिसाद दिलेला आहे आणि एका हिंदी व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डचे मराठी अनुवाद केलेला स्वतंत्र धागा काढला आहे.
मेतकूटची आलेली पोस्टः १८/०१/२०१५ २७/०१/२०१५ रोजी श्री. महेश अशोक खरे यांचा सदस्यकाळ : 1 week 2 hours
फेब्रुवारी २०१५ नंतर या सदस्यनामाने काहीच लेखन (स्वतंत्र अथवा प्रतिसादात्मक) केलेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 04/20/2022 - 01:12

In reply to हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन by चेतन सुभाष गुगळे

Permalink

म्हणजे असा एक धागा होता माबोवर.

आता आइडी उडालाय लेखकाचा. धागा सध्या 'डाइबेटिस रिवर्स करतात' अशी जाहिरात रोज असते टीवी चानेलवर.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 04/20/2022 - 01:12

In reply to हा आयडी फक्त मेतकूटचं समर्थन by चेतन सुभाष गुगळे

Permalink

म्हणजे असा एक धागा होता माबोवर.

आता आइडी उडालाय लेखकाचा. धागा सध्या 'डाइबेटिस रिवर्स करतात' अशी जाहिरात रोज असते टीवी चानेलवर.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 01/27/2015 - 02:02

Permalink

यावरून आठवले

कॅन्सस सिटी येथील एका उपहारगृहाबाबत एका व्यक्तिने खालील परिक्षण लिहिले. Image removed. त्यावर उपहारगृह मालकाने लिहिलेला प्रतिसाद... Image removed. Image removed. संदर्भः ही बातमी
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 01/27/2015 - 03:39

In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी

Permalink

माझा गणेशा झाला आहे....

माझा गणेशा झाला आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 01/27/2015 - 04:06

In reply to माझा गणेशा झाला आहे.... by मुक्त विहारि

Permalink

पर्यायी दुवा

खालील बातमीमध्ये मजकूर लिहिला आहे जसाच्या तसा. A Negative Yelp Review Led To This Hilarious Take Down From The Restaurant’s Owner
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Tue, 01/27/2015 - 19:16

In reply to पर्यायी दुवा by श्रीरंग_जोशी

Permalink

त्या रेस्टॉरंट मालकाचा

त्या रेस्टॉरंट मालकाचा रिप्लाय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by महेश अशोक खरे on Tue, 01/27/2015 - 13:20

In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी

Permalink

केवळ अप्रतिम !

केवळ अप्रतिम ! काही मनाविरुद्ध झालं की ठोका त्याला सोशल नेटवर्कवर या प्रवृत्तीते हे उदाहरण हसवून गेले.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 01/27/2015 - 13:36

In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी

Permalink

कहर...

कहर म्हणजे कहर आहे हा रिप्लाय.. मानलं बॉस त्या रेस्टॉरंटवाल्याला..
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/27/2015 - 13:43

In reply to कहर... by चिगो

Permalink

मूळचा पुण्याचा मंगुश हॉटेलचा

मूळचा पुण्याचा मंगुश हॉटेलचा मालक आहे का ते बघायला हवे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Tue, 01/27/2015 - 22:48

In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी

Permalink

सोनल?

सोनल? मराठी किंवा गेला बाजार भारतीय आहे का काय तक्रारकर्ती? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 01/27/2015 - 23:06

In reply to सोनल? by चिगो

Permalink

भारतीय वंशाची नक्कीच

नाव व फोटोवरून ही व्यक्ती भारतीय वंशाची नक्कीच असावी. मराठी असण्याबाबत ख्रात्री वाटत नाही. येल्पवर ३३ परिक्षणे लिहून त्यांनी सदस्यत्व रद्द केलेले दिसत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 01/28/2015 - 23:56

In reply to यावरून आठवले by श्रीरंग_जोशी

Permalink

भारी प्रतिसाद ! सज्जड

भारी प्रतिसाद ! सज्जड शालजोडीतले मारलेत !! तक्रार करणारीचा नवरा वकील आहे हे माहित असून अमेरिकेतला व्यावसायीक असे लिहीतो म्हणजे त्याचा वकील तिच्या वकिलापेक्षा भारी असणार !
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 09/24/2015 - 09:13

Permalink

नवी बातमी काय आहे मग?

नवी बातमी काय आहे मग? मेतकुटवाले सुधरलेत की मेटाकुटीला आलेत?
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 09/24/2015 - 11:10

In reply to नवी बातमी काय आहे मग? by आनंदी गोपाळ

Permalink

मेतकूट सध्या जोरात सुरूये.

मेतकूट सध्या जोरात सुरूये. जागा कमी पडायला लागली म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांनी तिथेच बाजुला मोठ्या जागेत हॉटेल शिफ्ट केलं. अगदी सोमवार ते शुक्रवारही संध्याकाळच्या वेळी वेटींग लिस्ट्मधे माणसं बाहेर उभी असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 09/24/2015 - 11:26

In reply to मेतकूट सध्या जोरात सुरूये. by किसन शिंदे

Permalink

आम्ही आपलं घरीच मेतकूट भात,

आम्ही आपलं घरीच मेतकूट भात, फोडणीचा भात, चटणी, कोशिंबीर आणि आळू वडी खातो ब्वॉ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 11:30

In reply to आम्ही आपलं घरीच मेतकूट भात, by प्रचेतस

Permalink

बरं मग????

बरं मग????
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/24/2015 - 11:36

In reply to बरं मग???? by प्यारे१

Permalink

मग काय!

लायनीत उभे राहून फोडणीचा भात कोण खाणार? जायचा यायचा वेळ, पेट्रोल, लायनीत उभे रहायचा वैताग आणि या सगळ्याला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात सगळा स्वयंपाक घरी करून होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 09/24/2015 - 11:43

In reply to मग काय! by पैसा

Permalink

अहो पण स्टॅटिस्टिक्स वेगळं

अहो पण स्टॅटिस्टिक्स वेगळं सांगतंय की. ;) तुम्ही नका जाऊ. हॉटेल चा धंदा वाढतोय ना? हल्लीच्या मुलांना किंवा मुलींनाही फोडणीचा भात विकतचा खाण्याची आवड, गरज, नाइलाज किंवा खाज यातलं काही एक असावं असं मानायचं. फ़क्त हल्लीचीच पिढी की पूर्वीचीही याबाबत विदा मिळाला तर विकी वर देखील टाकू.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/24/2015 - 11:46

In reply to अहो पण स्टॅटिस्टिक्स वेगळं by प्यारे१

Permalink

हीहीही!

कोणाला कमी पडू नये म्हणून जरासा जास्तच भात असतो रोज घरात. फोडणीचा भात करून मस्त प्याकिंग करून विकू १५० २००ला न काय! बाकी ते पिढ्या बिढ्या, विदा बिदा काय ते तुम्ही बघा आपलं. २५ वर्षांपूर्वी आम्ही आजची पिढी होतो. जी आजची पिढी आज आहे ती २५ वर्षांनंतर काय करील म्हैत नै!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: विजय दिनानाथ चौहान
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 23:21
  • सदस्य: CHETAN KAMBLEEE
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 16:53
  • सदस्य: बाबासाहेब गायकवाड
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 16:36
  • सदस्य: अमित+
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 15:55
  • सदस्य: विजयनवीन
    नोंदणी: गुरुवार, 03/19/2026 - 14:07

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com