आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.
दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले.
२.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले.
आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते"
म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्हाइकच वाईट.
एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला.
बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड.
मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
72661
प्रतिक्रिया
233
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर
In reply to अरेच्च्या.... by सविता००१
बिबवेवाडे चौकात "नवरत्न"
In reply to त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर by रेवती
ओके, धन्यवाद जयंतकाका.
In reply to बिबवेवाडे चौकात "नवरत्न" by जयंत कुलकर्णी
'मथुरा'
In reply to बिबवेवाडे चौकात "नवरत्न" by जयंत कुलकर्णी
थंडगार दोसा पुढ्यात आला.
In reply to तुमचा अनुभव वाचून आठवले. by रेवती
सवाई गंधर्व महोत्सवात जे
In reply to थंडगार दोसा पुढ्यात आला. by गवि
गवि, विनोदी आहात. अत्यंत
In reply to थंडगार दोसा पुढ्यात आला. by गवि
..उलट मीही तेच म्हणतोय.
In reply to गवि, विनोदी आहात. अत्यंत by रेवती
कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम
In reply to थंडगार दोसा पुढ्यात आला. by गवि
तिथली रसम इडली तर वाह!!!!!!!!
In reply to कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम by बोका-ए-आझम
तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा
In reply to तुमचा अनुभव वाचून आठवले. by रेवती
अ-क्षय?
In reply to तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझ्या आईनी त्याला बरचं काही
In reply to अ-क्षय? by सुनील
नाही नाही. वर नाव दिलय.
In reply to तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुळशीबागेत
In reply to तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे!! माझा थायी हॉटेलवाला वेळ
एक शिक्षा
इथे एवढी गर्दी आहे म्हणजे
केलंय. छान आहे.
In reply to इथे एवढी गर्दी आहे म्हणजे by नित्य नुतन
फेब्रुवारी-मार्चमध्ये मी सलग
In reply to इथे एवढी गर्दी आहे म्हणजे by नित्य नुतन
तुम्हाला वाईट अनुभव आला हे
प्रतिसादात मांडलेली एकंदरित
In reply to तुम्हाला वाईट अनुभव आला हे by वेल्लाभट
हाहा
In reply to प्रतिसादात मांडलेली एकंदरित by काळा पहाड
पावसात जायचं नाही आणि टबात
In reply to प्रतिसादात मांडलेली एकंदरित by काळा पहाड
अन तुम्ही टीका करा की आणि काय
In reply to पावसात जायचं नाही आणि टबात by वेल्लाभट
अहो, पैसे देवून जेवायला जायचं
In reply to अन तुम्ही टीका करा की आणि काय by वेल्लाभट
नाही कळलं? राहिलं !
In reply to अहो, पैसे देवून जेवायला जायचं by काळा पहाड
टीका करणं म्हणजे पाय ओढणं हे
In reply to प्रतिसादात मांडलेली एकंदरित by काळा पहाड
मत
In reply to तुम्हाला वाईट अनुभव आला हे by वेल्लाभट
मान्य.
In reply to मत by सर्वसाक्षी
मेटाकूट?
मेटेंखुंटीस, मेटाखुटी,
In reply to मेटाकूट? by सुनील
माणूस मराठी असो की अमराठी...
एक विशेष म्हणजे आता पुण्यातील
जागेचा पुरेपूर वापर ही पुण्या
In reply to एक विशेष म्हणजे आता पुण्यातील by काळा पहाड
नुकतेच ऐकले की पुण्यात नवी
In reply to जागेचा पुरेपूर वापर ही पुण्या by मृत्युन्जय
एक अनुभव
प्रत्येक वेळी आपल्या हॉटेलात
In reply to एक अनुभव by वेल्लाभट
सहमत.
In reply to प्रत्येक वेळी आपल्या हॉटेलात by असंका
मला वाटतं एवढं हे हॉटेल
असहमत
..प्रचंड सहमत..नुसते हजरच
In reply to असहमत by सर्वसाक्षी
सहमत.
In reply to असहमत by सर्वसाक्षी
@ सर्वसाक्षी
व्हॉट्सअॅपवर टाका
काही वर्षापुर्वी ठाण्यात
मी यावेळी चांगल्या म्हणवल्या
कठीण आहे....
In reply to मी यावेळी चांगल्या म्हणवल्या by रेवती
(No subject)
In reply to कठीण आहे.... by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to कठीण आहे.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
वाईट अनुभव
In reply to मी यावेळी चांगल्या म्हणवल्या by रेवती
जाऊ द्या हो हुप्प्याभौ! त्या
In reply to वाईट अनुभव by हुप्प्या
ब्लोक-लिस्ट
सर्जा? का बर??
In reply to ब्लोक-लिस्ट by गुळाचा गणपती
हिंजेवाडी नही हो
In reply to सर्जा? का बर?? by आदूबाळ
हे बरं नै राव.. मलाबी हेच
In reply to हिंजेवाडी नही हो by नाखु
'गानकोकिळा'
In reply to ब्लोक-लिस्ट by गुळाचा गणपती
महाड रेस्टारंड चा अनुभव..
हे सर्व ठिकाणी कॉमन आहे. इथे
In reply to महाड रेस्टारंड चा अनुभव.. by योगी९००
आत्ताच मेतकूटला जाऊन आलोय.
माझा एक बेशिक प्रश्न हाय.
In reply to आत्ताच मेतकूटला जाऊन आलोय. by किसन शिंदे
+१
In reply to माझा एक बेशिक प्रश्न हाय. by प्रचेतस
पूर्वी खव्याचे गुलाबजाम
In reply to माझा एक बेशिक प्रश्न हाय. by प्रचेतस
नाय रे!
In reply to पूर्वी खव्याचे गुलाबजाम by निनाद मुक्काम …
मेतकूटच्या व्यवस्थापनाच्या
In reply to आत्ताच मेतकूटला जाऊन आलोय. by किसन शिंदे
+१
In reply to मेतकूटच्या व्यवस्थापनाच्या by डॉ सुहास म्हात्रे
फोडणीचा भात कोशिंबीर हे उंच
"मेतकूट" तर्फे
...उत्कृष्ट प्रतिसाद..
In reply to "मेतकूट" तर्फे by मेतकूत