✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 01/11/2015 - 17:59  ·  लेख
लेख
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली. दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला. त्याने हातातील कागदावर लिहिलेल्या प्रतिक्षा यादीत माझे नाव टाकताच मी त्याला आरक्षणाचे स्मरण करुन दिले. पाचेक मिनिटात जागा होईलच असे त्याने आश्वासन दिले व कोपर्‍यतले मोठे टेबल दाखवुन हे रिकामे झाल्यावर तुम्हालाच देणार आहोत असे संगितले. २.३० झाले तरी काही हालचाल नाही. चौकशी केली असता. होइलच इतक्यात असे मोघम उत्तर मिळाले. आता इतका उशीर केला आहात, आत आल्यावर जेवण संपले असे सांगु नका असे म्हणताच काळजी नको, पोटभर जेवा असे आश्वासन मिळाले. अखेर २.४५ ला प्रवेश मिळाला. ८ जणांना दोन जागी विभागुन बसावं लागलं. तसच बसवायचं होतं तर आधीच बोलवायचं होतं! असो. गर्दी आहे तर बसू वेग़ळे म्हणुन आम्ही सोडुन दिले. वास्तविक शेजारचे टेबल दुसर्‍या कुटुंबाला देण्याऐवजी आम्हाला जोडुन देता आले असते, पण कुणाला पडली नव्हती. अखेर दहा मिनिटे वाट पाहुन वेटरला मेनू कार्डाची विचारणा केल्यावर चौघात एक दिले गेले. आम्ही थाळी मागवणार होतो, पण अन्य वेळेस आले तर काय मिळते ते पाहायचे होते. वेटरला ऑर्डर देताच त्याने थाळी संपल्याचे सांगितले. संतप्त होऊन व्यवस्थापकाला जाब विचारला असता हो संपली असे उत्तर मिळाले. आम्ही बाहेर पडायचे ठरवले. कुणाला काही पडली नव्हती. बाहेर श्री सनी पावसकर यांना "आमचे आरक्षण असतानाही पाऊण तास रखडवलत आणि आता जेवण संपलय असे सांगता?" असे विचारले असता त्यांनी कसलीही दिलगिरी व्यक्त न करता ' आ ला कार्टे मागवा असे मग्रूर उत्तर दिले. जेवण संपले याचा सरळ अर्थ पोळी, भाजी, वरण, भात हे पदार्थ निश्चितच उपलब्ध नव्हते. मग भर दुपारी आम्ही जेवणा ऐवजी काय वडे, भजी, आळुवड्या, थालिपिठ खावे? आम्ही पैसे मोजुन आपल्या आवडीचे जेवायला अलो होतो, उपाहारगृहातले उरले सुरले संपवायला आलो नव्हतो. नाराजी व्यक्त करुन बाहेर पडत असता श्री सनी पावसकर यांच्याशी बोलत असलेल्या बाई त्यांना म्हणाल्या, 'आपण तर यांना टेबल तर दिले होते" म्हणजे केलेली मेहेरबानी ऩ जाणणारे गिर्‍हाइकच वाईट. एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. बाहेर पडलो आणि राम मारुती रस्त्यावरील शिव सागर मध्ये गेलो. उत्तम स्वागत झाले, उत्तम जेवण मिळाले. चार वाजुन गेल्यावर म्हणजे बंद करायची वेळ झाली असताना सुद्धा अखेरपर्यंत तत्पर सेवा मिळाली, कसलीही घाई केली गेली नाही. नाइलाजाने असे वाटले की त्या मेतकूटवाल्यास जाऊन सांगावे की बाबारे, हॉटेल कसं चालवायचं, ग्राहकाशी कसं वागायचं हे शिकायला इथे काही दिवस नोकरी कर आणि मग हॉटेल उघड. मिपाकरांनो, पैसे द्यायची तयारी असतानाही जर गैरसोय, मनस्ताप व अपमान सहन करायचा असेल तर घंटाळी, ठाणे येथे सुरू झालेल्या 'मेतकूट' ला अवश्य भेट द्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
अनुभव

प्रतिक्रिया द्या
72400 वाचन

💬 प्रतिसाद (233)

प्रतिक्रिया

धर्मराज साहेब

सुबोध खरे
Sun, 01/11/2015 - 20:22 नवीन
धर्मराज साहेब आपले म्हणणे मान्य नाही उलट हाटेल नवीन असेल तर मालकाने जास्त अगत्यशील असायला हवे. सुरुवातीलाच असा माज असेल तर त्यांना का सहानुभूती दाखवावी?जेवण संपले हेही समजू शकतो त्याऐवजी आत्ता काही तरी सुरुवातीचे मागवा. वीस मिनिटात तयार करून देतो असे नम्रपणे सांगता आले असते. असे सांगितले तर समजू शकतो आम्ही सुद्धा व्यवसाय करतो. वीज गेली असेल तर इंव्हर्टर असूनही त्यावर लेसर प्रिंटर(थर्मल असल्याने) चालत नाही म्हणून मी रुग्णांची किती तरी वेळेस माफी मागितली आहे.( जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्याबद्दलही) \माज दाखविणे हे अजिबात चालवून घेऊ नये. जर तुम्ही मराठी म्हणून तुम्हाला माज असेल तर आम्ही काय उपरे आहोत? @सर्व साक्षी-- नक्कीच अभिप्राय लिहा. आठ जणांची दुपारीची वाट लावली याबद्दल काहीही वाईट न वाटणाऱ्या हाटेलात मी तरी नक्की जाणार नाही. धन्यवाद
  • Log in or register to post comments

अगदी अस्साच अनुभव

भाते
Sun, 01/11/2015 - 20:28 नवीन
मला गेल्या महिन्यात आला होता. शनिवारी रात्री ९ वाजता ८ जणांसाठी टेबल (थंडीत आणि एसीमध्ये) आगाऊ आरक्षित करून ठेवले असताना अर्धा तास वाट पाहायला लागली. हॉटेलमध्ये खुप गर्दी होती. नंतर आमच्यावर उपकार केल्यासारखे दोन टेबले जोडुन आम्हाला बसायला जागा मिळाली. मागवलेले जेवण यायला (चक्क) अर्धा तास ऊशिर (!) झाला. जेवण आल्यावर आधीच्या अनुभवावरून लगेच पुढच्या जेवणाची ऑर्डर केली. तरीही, रोटया आणि राईस यायला (आधीचे खाऊन संपल्यावर) २० मिनिटे लागली. शेवटी बिल आल्यावर सर्वानुमते टिप द्यायची नाही आणि पुन्हा इकडे कधीही यायचे नाही हे ठरवुन आम्ही बाहेर पडलो.
  • Log in or register to post comments

फारच वाईट अनुभव आणि ते एका

कंजूस
Sun, 01/11/2015 - 21:00 नवीन
फारच वाईट अनुभव आणि ते एका आपल्या माणसाने केल्यामुळे चीड येते.
  • Log in or register to post comments

च्यायला

अत्रन्गि पाउस
Sun, 01/11/2015 - 21:43 नवीन
एका दिवसात २ वाईट रिव्ह्यूज ?? तिकडे चे पु वर पण एक आलाय (हा पण टाकलाय आणि अजून एक आहे ) खरेतर आत्ता रात्री जायचे ठरवले होते घंटाळी रोड वर वळलो आणि हे वाचले ... बेत बदलला पण जाता जाता बघितले कि बाहेर लोकस थांबलेले होते... आता आधी एकदा पार्सल आणून मग पुढे ठरविन जायचे कि नै ते ... पण उर्मटपणा / टगेगिरी असेल तर मग कठीण आहे ... तिकडे स्वाद / गोखले बघा म्हणावे...दादरला जिप्सी वगैरे मध्ये मराठी असून हे असले वाईट अनुभव नाहीत...
  • Log in or register to post comments

गोखले बद्दल असहमत

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 13:05 नवीन
गोखलेंचा वडापाव पूर्वापार गोखले रोड वरील सगळ्या वडापाव विक्रेत्यांपेक्षा एक दोन रुपये महाग आहे. आता गोखले मंगल आहार बघा. इथे तुम्ही नुसती पोळी / नुसती भाजी घेऊ शकत नाही. तुम्हाला पोळीबरोबर भाजी अथवा भाजीबरोबर पोळी पार्सल घ्यावीच लागते. याला म्हणतात ..... तळटीप : हे संबंधित व्यक्तीला दर्शवून झालेलं आहे. परंतु ते यापलिकडचे दिसतात. तेंव्हा आता इतर उपाय करावे लागतील. तूर्तास तरी पर्यायी हॉटेलांना/पोळीभाजी केंद्रांना प्राधान्य दिलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

..गोखले..हॅ हॅ हॅ..

गवि
Mon, 01/12/2015 - 13:19 नवीन
..गोखले..हॅ हॅ हॅ.. ..किती वाढवल्यात हो किंमती?.. असा प्रश्न करताच "मराठी माणसानेच दर वाढवलेले बरे खुपतात तुम्हाला"इ.इ.मुद्दे काढून विचारणार्‍याचेच बौद्धिक घेतले. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हे कसले मेतकूट हे तर रद्दडकूट

मदनबाण
Sun, 01/11/2015 - 21:49 नवीन
हे कसले मेतकूट हे तर रद्दडकूट ! एकुण "उघडुन चार दिवस नाही लागले तर कशी दारात लाईन लागली" असा आविर्भाव दिसुन आला. कोणाचाही फुकटचा माज कधीच सहन करु नये... ग्राहकांना सेवा देत नसेल तर हॉटल बंद करुन टाका अशी तंबी द्यायला हवी होती त्या माजुरड्या हॉटेल चालकाला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Beatbox brilliance | Tom Thum | TEDxSydney
  • Log in or register to post comments

घरीच मऊ भात करून त्यावर तूप

चित्रगुप्त
Sun, 01/11/2015 - 22:55 नवीन
घरीच मऊ भात करून त्यावर तूप-मेतकूट टाकून खाणे खाणे काय वाईट ?
  • Log in or register to post comments

+ १....

मुक्त विहारि
Mon, 01/12/2015 - 01:40 नवीन
सहमत... स्वगत : सध्यातरी ज्या हॉटेलात बियर मिळते तिथेच जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

.

hitesh
Mon, 01/12/2015 - 03:32 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अश्या माजोरड्या लोकांना धडा

निनाद मुक्काम …
Mon, 01/12/2015 - 02:34 नवीन
अश्या माजोरड्या लोकांना धडा शिकवायचा मार्ग म्हणजे वोट्स अप वर तुमच्या अनुभवाची पोस्ट टाका , लोकांना नकारात्मक पोस्ट खात्री न करता पुढे ढकलण्यात लय मजा येते , तेव्हा आपोआप तुमचा अनुभवातून अनेकांना तेथे जाण्याची दुर्बुद्धी सुचणार नाही , मराठी असो वा मराठी हॉटेल लाईन मध्ये माजोरडे पणां करून चालत नाही आणि शेफारून चालत नाही
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा संबंधित व्यक्तीला

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:59 नवीन
त्यापेक्षा संबंधित व्यक्तीला जाऊन स्पष्ट शब्दात सांगा. नाही समजली ती भाषा तर तमाशा करा तिथेच. चार असलेली गि-हाईकं पण जातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

तुमचा अनुभव वाचून आठवले.

रेवती
Mon, 01/12/2015 - 05:17 नवीन
तुमचा अनुभव वाचून आठवले. गेल्या महिन्यात पुण्यात (आता मध्यवर्ती राहिलय कुठे!) एका हाटेलात दोसा मागवला. हा काही जगावेगळा दिव्य पदार्थ नव्हे. त्याने आणायला २० मिनिटे लावली व थंडगार दोसा पुढ्यात आला. आधी वेटरला तसे सांगितले, त्याने तिथल्या व्यवस्थापकाला बोलावले, त्याने त्याच्या साहेबाला बोलावले. थंडीचे दिवस आहेत, आम्ही काय मुद्दाम होवून गार नाही केला, त्यात काय एवढं हो म्याडम. मग प्लेट पुढे सरकवली व सांगितले की मी खाणार नाही. तुमच्या ग्राहकाने गरम पदार्थ खावेत असे तुम्हाला वाटते की गार? एव्हाना आजूबाजूची दोन टेबले बघायला लागली. काय राव तुमीपण असे म्हणत त्याने दुसरा आणाय्ला सांगितला. तोही कोमट आला पण थंड नव्हता एवढेच. पण एकंदरीतच कोणाला काही पडलेली नसते. एक गेला तर आणखी दहा ग्राहक असणारेत हे पक्के ठाऊक असते. हा हाटेल मालक शेट्टी प्रकारातला असावा असा दिसत होता. मराठी तर नक्कीच नव्हता.
  • Log in or register to post comments

हॉटेलचं नाव द्या हो. निदान

काळा पहाड
Mon, 01/12/2015 - 10:17 नवीन
हॉटेलचं नाव द्या हो. निदान आम्ही तरी पुढच्या वेळी जाणार नाही. गेलाबाजार रस्त्याचं तर नाव द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पुणे सातारा रस्त्यावरील

रेवती
Mon, 01/12/2015 - 16:31 नवीन
पुणे सातारा रस्त्यावरील बासुरी हे उपहारगृह आहे. येथे मी आधी तीन चार वेळा गेलीये (सत आठ वर्षात). यावेळी सर्व्हीस जामच वाईट होती. पदार्थांची क्वालीटीही बरी नव्हती. अर्थात, हे नेहमीचे असेल तर माहित नाही. फारशी ओळख नसलेल्या हाटेलात मी इडली, दोसा असं मागवते म्हणजे फार वेळ लावत नाहीत, फार फसवता येत नाही असे वाटायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

जेव्हा हॉटेल उघडलं (साधारण

काळा पहाड
Mon, 01/12/2015 - 16:41 नवीन
जेव्हा हॉटेल उघडलं (साधारण चौदा पंधरा वर्षापूर्वी) त्यावेळी त्याचा अँबियन्स, चव वगैरे फार छान होतं. सीट्स भरपूर जागा सोडून वगैरे होत्या. त्यानंतर मागच्या वर्षी तिथे गेलो होतो. हर हर. कशीही टेबलं टाकली होती. स्पेस नावाचा कॉन्सेप्टच नाहीसा केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

हां, तेच म्हणते, शिवाय

रेवती
Mon, 01/12/2015 - 21:28 नवीन
हां, तेच म्हणते, शिवाय स्वच्छताही बेताची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बासुरी

कपिलमुनी
Mon, 01/12/2015 - 21:32 नवीन
बासुरी लैच टुकार आहे रेटस च्या मानाने सर्विस आणि चव नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अहो आधी बरं होतं म्हणून तिकडे

रेवती
Mon, 01/12/2015 - 21:50 नवीन
अहो आधी बरं होतं म्हणून तिकडे कामे करायला गेलं की भूक लागल्यास जायला सोपं वाटायचं. आता यावेळी मी ३ वर्षांनी गेले तर जामच वैट! बरं, तिथे आजूबाजूला आणखी खाण्याची सोय आहे का याची कल्पना नाही. आजकाल कितीतरी हाटेलं सुरु झाली म्हणेपरेंत बंद पडतात. नैतर दुसरा पर्याय सांगा. आता पंचमीपर्यंत जायला सांगू नका. तिथे जाऊन साताठ वर्षे झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अरेच्च्या....

सविता००१
Wed, 01/14/2015 - 14:54 नवीन
मागच्या वर्षी कोल्हापूर हून बर्‍याच उशीरा - वाहन नादुरुस्त झाल्याने -पुण्यात पोहोचलो होतो. (११:४५ वाजून गेले होते). बरोबर वयस्क व्यक्तीही होत्या. पण त्या बासुरी वाल्यांनी आम्हाला अर्ध्या तासात सगळं करून वाढलं. सेवा उत्तम, जेवण पण. रात्री १ वाजला तरी आठी नव्हती कुणाच्या कपाळावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर

रेवती
Wed, 01/14/2015 - 18:35 नवीन
त्या उ. गृहात पूर्वी दिवसभर अशी सर्व्हिस मिळत असे. ते फार सोयीचे पडायचे. माझी कामाची ठिकाणे तिथे आजूबाजूला असल्याने जरा जाणे झाले होते. अजूनही मला हे माहितीये की येत्या दोन तीन वर्षात दुसरे उ. गृह तिथे उघडले नाही तर बास्रीवाल्यांशिवाय मला इलाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

बिबवेवाडे चौकात "नवरत्न"

जयंत कुलकर्णी
Sat, 01/17/2015 - 16:21 नवीन
बिबवेवाडे चौकात "नवरत्न" नावाचे एक हॉटेल आहे. खाण्यासाठी उत्तम.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ओके, धन्यवाद जयंतकाका.

रेवती
Sat, 01/17/2015 - 17:22 नवीन
ओके, धन्यवाद जयंतकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

'मथुरा'

एस.योगी
गुरुवार, 09/24/2015 - 12:08 नवीन
पुणेकरांच्या डेक्कन भागात 'मथुरा' आहे. काही पदार्थ शुद्ध (गावठी) तुपातले असतात. २-३ वेळा जेवण घेतलेय. अनुभव एकूणच छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

थंडगार दोसा पुढ्यात आला.

गवि
Mon, 01/12/2015 - 11:03 नवीन
थंडगार दोसा पुढ्यात आला.
कोणत्याही हॉटेलात वाफाळता "गरम डोसा" पुढ्यात आल्याचं आजवरच्या हयातीत आठवत नाही. त्यासाठी रस्त्याकडेचा एखाद्या अण्णाचा गाडा किंवा दावणगिरी लोणी स्पंज डोश्याची गाडी गाठावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सवाई गंधर्व महोत्सवात जे

ग्रेटथिंकर
Mon, 01/12/2015 - 12:43 नवीन
सवाई गंधर्व महोत्सवात जे खाण्याचे स्टॉल लागतात तिथे वाफाळता डोसा मिळतो ,बहुतेक जण त्यासाठीच सवाईला आल्याचे जाणवत होते. *ROFL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि, विनोदी आहात. अत्यंत

रेवती
Mon, 01/12/2015 - 16:35 नवीन
गवि, विनोदी आहात. अत्यंत कुरकुरीत दोसा खाण्याने जसे समाधान होत नाही तसेच दोसा हा फारवेळ गरम राहू शकत नाही तर त्यातील गरम भाजी, सांबार यांच्या साथीने त्याचे तापमान, लज्जत वाढते हे आपल्याला माहित आहेच. तुम्ही माझी चेष्टा करताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

..उलट मीही तेच म्हणतोय.

गवि
Mon, 01/12/2015 - 16:43 नवीन
..उलट मीही तेच म्हणतोय. ..चेष्टेचा अजिबातच उद्देश नाही हो. ..सर्वच गार दिलं असेल हे लक्षात आलं नाही...ते तर फारच बेकार. ..दोसाही गरम मिळू शकतो पण हॉटेलात नाही इतकाच मर्यादित मुद्दा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम

बोका-ए-आझम
गुरुवार, 01/15/2015 - 13:39 नवीन
कॅफे मद्रास - माटुंगा. गरमगरम तव्यावरुन येतो - नीर डोसा आणि सेट डोसा तर अप्रतिम असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तिथली रसम इडली तर वाह!!!!!!!!

बॅटमॅन
Tue, 01/20/2015 - 16:05 नवीन
तिथली रसम इडली तर वाह!!!!!!!!!!!! गरमागरम आणि मस्त आंबटशार चवीचा नादच नाय करायचा. कार्टूनमध्ये दाखवतात तसे तोंडातील सगळे दात तोंडाला सुटलेल्या पाण्याबरोबर वाहत जातील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/12/2015 - 14:52 नवीन
तुळशीबागेमधलं "अगत्य" किंवा अक्षय का हो? अक्षय वाल्यानी एकदा आंबलेली बटाट्याची भाजी घालुन डोसा दिलेला. त्यावर तक्रार केली असता खालच्या मालकानी सॉरी बिरी नं म्हणता अनुनासिक स्वरामधे "जंराँशीं तंरं लांगंलेंलीं दिंसंतेंयं" किंवा "झांलीं अंसेंलं खंरांबं" अश्या टायपाचं उत्तर दिलं होतं. बरं असं उत्तर ऐकुन आईनी तिथे चामुंडा अवतार धारण केला होता. परत कै त्या हाटेलात गेलो नाही कधी. अगत्य वाला मात्र चांगला आहे. कधे मधे गार देतो, पण ते सोडुन क्वालिटी चांगली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अ-क्षय?

सुनील
Mon, 01/12/2015 - 14:58 नवीन
नाव बदल म्हणावं! अ-क्षय म्हणे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या आईनी त्याला बरचं काही

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/12/2015 - 15:15 नवीन
माझ्या आईनी त्याला बरचं काही बदलायला आणि उरलेलं जाळुनं टाकयला सांगीतलं सो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नाही नाही. वर नाव दिलय.

रेवती
Mon, 01/12/2015 - 16:36 नवीन
नाही नाही. वर नाव दिलय. यावेळी तुळशीबागेत मी हरवले होते. लगेच स्वत:ला सापडले. ;) काय ती गर्दी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तुळशीबागेत

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 01/12/2015 - 16:40 नवीन
एकही चांगले फॅमिली हॉटेल नाहिये. दुनियाभरचे लोक्स तिथे ख्ररेदीला येतात, शिवाय गणपतीमध्ये लांबलांबुन लोक येतात त्यामुळे इथे कायम हमखास गिर्‍हाईक असते.पण मला वाटत नाही त्यातले कोणी रिपीट कस्टमर असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे!! माझा थायी हॉटेलवाला वेळ

स्पंदना
Mon, 01/12/2015 - 05:57 नवीन
अरे!! माझा थायी हॉटेलवाला वेळ असेल तर माझ्या टेबलवर खुर्ची घेउन हमखास बसतो. मस्त नवर्‍या मुलांबरोबर टीपी करतो. एकदा त्यांनी सुपचा बेसच खारट करुन ठेवला होता, तीनदा सूप (चार माणसांच) बदललं तेंव्हा कुठे लक्षात आलं त्यांच्या काय झालय ते. त्या बद्दल कितीदा सॉरी म्हणावं. ( थायी हॉटेलचा मालक ऑस्सी आहे. आणि ऑस्सी लय म्हणजे लय बोलतात. अक्षरशः अरे बाबा आता बास बॉस म्हणावं लागत) भारतात मात्र डोसा थंड आहे, याला आचारी म्हणतात का? ( गणपा भाऊंची कृपा ;) ) अश्या अनेक खोडी काढुन आम्ही निवांत डीशेश
  • Log in or register to post comments

एक शिक्षा

हुप्प्या
Mon, 01/12/2015 - 10:06 नवीन
मिपावरील हा धागा प्रिंट करुन त्याच्या काप्या हॉटेलच्या मालकाला वा म्यानेजराला द्या. वाईट अनुभव. भलताच माजोरडेपणा.
  • Log in or register to post comments

इथे एवढी गर्दी आहे म्हणजे

नित्य नुतन
Mon, 01/12/2015 - 11:53 नवीन
इथे एवढी गर्दी आहे म्हणजे जेवणाची चव चांगलीच असावी ... कोणी ट्राय केलंय का ...
  • Log in or register to post comments

केलंय. छान आहे.

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:09 नवीन
लोक वेडे म्हणून नाही ना गर्दी करत. (हे मी उपहासाने म्हणतोय बरं का. तुम्हाला नव्हे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

फेब्रुवारी-मार्चमध्ये मी सलग

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/27/2015 - 04:23 नवीन
फेब्रुवारी-मार्चमध्ये मी सलग दोन आठवड्यांत तीनदा 'मेतकूट'मध्ये गेले होते. गर्दी होती तेव्हा व्यवस्थापन, अन्नाची चव सगळ्या बाबतीत जेवढं जमेल तेवढं सगळं गंडलेलं होतं. पदार्थ संपलेला वेटरांना माहित नव्हता. ते सांगायलाही चिकार वेळ लावला. मोदकासारखा पदार्थ "तीनच देणार, एक किंवा दोन नाही मिळणार" छाप नियम का बनवतात कोण जाणे! पण ती जागा म्हणजे खुराडं आहे. चकचकीत फरश्या आणि आरसे लावून क्षीण प्रयत्न केला आहे. पण तिथे बसून मला कोंदटल्यासारखं होत होतं. फार गर्दी नसूनही. बाकी चकचकीत असूनही हात धुवायची सोय भीषण आहे. गर्दी नव्हती तेव्हा तिथल्या वेटरांची विनम्रता अंगावर येणारी होती. गर्दी नसताना पदार्थांची चव मात्र चांगली होती. कष्ट न करता सणासुदीचं जेवण ... नॉट बॅड. गर्दी नसताना मी एकटी गेले होते, तेव्हा मालक आणि वेटर लोकांनाही पुरेशा विचित्र नजरांनी बघितलं. एकटी बाई कशी काय हाटेलात येऊन खाते असा भाव होता. थोड्या वेळाने मैत्रीण आली, हे नशीब. नाहीतर बहुदा जेवायला वाढलंच नसतं अशी शंका आली. पुढे आमचं पाच-कोर्सचं जेवण, दोन बायकांनी वारेमाप खाणं हे सुद्धा तिथल्या मंडळींना फार पचलं नसावं असं त्यांच्या चेहेऱ्यावरून दिसत होतं. बाहेर लोक ताटकळत उभेही नव्हते. त्यामुळे आम्ही त्या नजरांकडे दुर्लक्ष करत दोन तास गप्पा मारत जेवलो. 'मेतकूट'च्या समोरच 'श्रद्धा' आहे. तिथे वडे मिळतात, "पाव मिळणार नाही" अशी पाटी सुरुवातीपासून आहे. तिथेही चिक्कार गर्दी असते. अनेक वर्षं तिथले वडे, समोसे, मूगभजी खाऊन वजन चिक्कार वाढवलं आहे. तिथे कधीही असा माजोर्डेपणा दिसत नाही. "पाव मिळत नाही" हे पण प्रेमाने सांगतात. 'श्रद्धा' ही टपरीवजा जागा आहे. हे वडेवाले आणि तिथे काम करणारे लोक जितके प्रेमळ आहेत त्यांतला अर्धा भाग जरी 'मेतकूट'वाल्यांनी उचलला तरी अनुभव बराच सुधारेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नित्य नुतन

तुम्हाला वाईट अनुभव आला हे

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:08 नवीन
तुम्हाला वाईट अनुभव आला हे वाईटच आहे. परंतु धाग्यात किंवा विशेषतः प्रतिसादात मांडलेली एकंदरित मतं ही अतिरेकाची आणि केवळ रागापोटी मांडलेली वाटतात. आम्हाला याच हॉटेलचा अगदी चांगला अनुभव आहे. पदार्थांची चवही उत्तम होती, मालक स्वतः गप्पा मारून गेले, त्यांनी गर्दीमुळे त्यांची उडणारी तारांबळ आम्हाला सांगितली. तेंव्हा, त्यांची चूक त्यांच्यापर्यंत पोचवणं इथपर्यंत ठीक आहे. पण मराठी माणूस, त्याचं ते नेहमीचं जनरलायझेशन की त्याला बिजनेस कसा करायचा न कळणं इत्यादी टिप्पण्या निषेधार्ह आहेत. मराठी माणसाने मराठी माणसाचेच पाय ओढणं का काय ते यालाच म्हणतात. जा ना, तोंडावर सांगा हे असं आवडलं नाही हे हे सुधारा. नाही ऐकलं तर करा मग जे हवं ते. आहेच तुमचं व्हॉट्सॅप, फेसबुक, ट्विटर; राग काढायला.
  • Log in or register to post comments

प्रतिसादात मांडलेली एकंदरित

काळा पहाड
Mon, 01/12/2015 - 12:35 नवीन
प्रतिसादात मांडलेली एकंदरित मतं ही अतिरेकाची आणि केवळ रागापोटी मांडलेली वाटतात.
बघा, म्हणजे राग कसा काढायचा, केव्हा काढायचा आणि कुठे काढायचा याचे पण नियम तयार झालेत वाटतं. अर्थातच इथे रागच आहे. स्वतःचे पैसे घालून अशी वागणूक मिळत असेल तर राग येणार नाही तर काय लोकांना?
तेंव्हा, त्यांची चूक त्यांच्यापर्यंत पोचवणं इथपर्यंत ठीक आहे.
हो ना सुधारणेचा मक्ता घेतलाय ना लोकांनी मग्रूर वागणूक सहन करून. बाय द वे, म्हणजे जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत या लोकांना त्यांची चूक कळलीच नाहीये की काय?
मराठी माणसाने मराठी माणसाचेच पाय ओढणं का काय ते यालाच म्हणतात.
टीका करणं म्हणजे पाय ओढणं हे म्हणजे नवीनच. या गुंठामंत्र्यानी कुठेही हॉटेल काढायचं. मग्रूरी करून लोकांचा अपमान करायचा आणि टीकाही सहन होत नाहीये काय? मराठी माणसाला पायाची काळजी नव्हे, त्याच्या खिळे ठोकून ताठ केलेल्या पाठीच्या कण्याची काळजी करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

हाहा

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:42 नवीन
हेच ते मी म्हटलं ते. चालूदे :) यन्जॉय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पावसात जायचं नाही आणि टबात

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:43 नवीन
पावसात जायचं नाही आणि टबात थबथबाट करत बसायचं. LOL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अन तुम्ही टीका करा की आणि काय

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:46 नवीन
अन तुम्ही टीका करा की आणि काय करा मला कैच्च नाही त्याचं. फक्त शितावरून भाताची; किंवा सुतावरून स्वर्ग; किंवा असलं काहीतरी करू नका असा आपला सल्ला. सहज शब्द आठवला. रॅशनॅलिटी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अहो, पैसे देवून जेवायला जायचं

काळा पहाड
Mon, 01/12/2015 - 12:58 नवीन
अहो, पैसे देवून जेवायला जायचं असतं ना? त्यात रॅशनॅलिटी कुठे आलीय? बाकी तुमचे मित्र असले ते हॉटेलवाले तर सांगा ना त्यांना त्यांच्याच फायद्यासाठी. बाकी शितावरूनच भाताची परिक्षा करतात यात काही नवीन किंवा चुकीचं आहे का? बाकी पाऊस आणि टब या उपमा कशासाठी वापरल्यात काही कल्पना नाही. आमची जबाबदारी हॉटेल मालकाला सुधारणं नाही. यड्या मराठी हॉटेल मालकांना सुधारणं तर त्याहून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

नाही कळलं? राहिलं !

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 13:09 नवीन
नाही कळलं? राहिलं ! नाही सुधारायचं? राहिलं ! बाकी हॉटेलवाले माझे मित्र नव्हेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

टीका करणं म्हणजे पाय ओढणं हे

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 13:29 नवीन
टीका करणं म्हणजे पाय ओढणं हे म्हणजे नवीनच
दोहोंतला फरकच अनेकांना कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मत

सर्वसाक्षी
Mon, 01/12/2015 - 12:50 नवीन
मी माझा अनुभव जसा आला तसा व्यक्त केला. वर धर्मराज यांना नुकत्याच दिलेल्या प्रतिसादात उहापोह केलाच आहे, कृपया वाचा. जेव्हा मालकाला सांगितल्यावर तो तुम्हालाच बदलायचा सल्ला देतो तेव्हा राग हा येणारच. मी मराठी माणसाचे जनरलायझेशन व कशाचेच जनरलायझेशन करत नाही. अनेक उत्तम सेवा देणारे मराठी व्यावसायिक मला माहित आहेत. अनेक मराठी उद्योजक यशस्वी आहेत. मी माझा तिथला अनुभव सांगितला. आपला अनुभव वेगळा असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मान्य.

वेल्लाभट
Mon, 01/12/2015 - 12:56 नवीन
तुम्ही नाही; मी म्हटलंय प्रतिसादात जनरलायझेशन्स झालीयत. तुम्हाला आलेला अनुभव वाईट आणि खेदजनकच आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं. त्याबाबत नो दुमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा